वाचन संस्कृती लोपण्याच्या काळात,काहि व्यक्ति यासाठी हिरिरिने काम करतात.ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद असते. शिवाय ज्या भागात पुस्तकांची म्हणुन विशेष दुकाने नाहित तिथे तर अश्या कामांना अतिशय महत्व असते. हेच काम आज राज जैन यांनी सिंहगड रोडवर पुष्पक मंगल कार्यालय येथे १० दिवसांचे पुस्तक प्रदर्शन भरवुन केले आहे. वेगवेगळे बहुविध विषय,आणी दर्जेदार प्रकाशनं या दोहोंचा मिलाफ राज जैन यांनी उत्तम घडवुन आणला आहे.
आज सकाळी ११ वाजता दिपप्रज्वलनानी या प्रदर्शनाची सुरवात झाली.प्रदर्शनातील कामाचा भार सांभाळणारा राजेंचा अंतरजालीय मित्र परिवार उपस्थित होताच,पण पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन ,साहित्यिक श्री. राजेंद्र खेर ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
व्यक्तिशः माझा सहभाग समई भोवती फुलांची रांगोळी काढणे,एवढाच होता.पण आपण राहतो त्या भागात वाचन संस्कृती वाढवणारं काम होतय याचा आनंदही मनात होत होता. ज्यांना जमेल त्यांनी अवश्य या प्रदर्शनास भेट द्यावी/हजेरी लावावी ही विनंती. :-)
पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटन वेळचे काहि फोटो :-)
प्रतिक्रिया
12 Oct 2012 - 11:27 pm | पैसा
यशस्वी पुस्तक प्रदर्शनासाठी राजेला शुभेच्छा! एका जागी इतकी पुस्तके बघून तुम्हा लोकांचा हेवा वाटतोय.
बुवा, फुलांचा गालिचा नेहमीप्रमाणे मस्तच!
12 Oct 2012 - 11:37 pm | सुहास..
मायला तेच्या !! ईनो आण रे जरा !!!
काही ओळख्स
१ ) धोतरात : खुद्द आत्म्या ( हा आत्मु डँम्बीस आहे : ओळखा कशातल आहे ते )
२ ) चेक्स च हाफ शर्ट : रंजनीकांत ज्यांच्या फॅन आहे ..ते विमो ..
३ ) ते उगा मेणबत्त्या जाळणारे : रोश वि. अॅडम्स वाले ररा ( एक दिवस स्साल ...ररा वि. सुहास : पुनम कट्ट्याच्या निमीत्ताने हे लिहीणार आहे ! )
बाकी तिथे आहेच उद्या ...सो बाकीचे प्रतिसाद आणि फोटोज माझ्यातर्फे ..उद्या :)
15 Oct 2012 - 11:03 pm | अत्रुप्त आत्मा
@ हा आत्मु डँम्बीस आहे >>>
@ओळखा कशातल आहे ते >>>
@ रंजनीकांत ज्यांच्या फॅन आहे ..>>> ते विमो ..
17 Oct 2012 - 7:51 pm | पांथस्थ
काय भाउ फोटो कुठे आहेत?
12 Oct 2012 - 11:42 pm | सोत्रि
फुलांची रांगोळी बघताच गुर्जी कुठे दिसतात का ते पाहिले आणि धोतरातला आत्मु डॅम्बीस दिसलाच लगेच ;)
राजेचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
- (राजच्या धडाडीचा फॅन) सोकाजी
12 Oct 2012 - 11:47 pm | जेनी...
गुर्जि लय भारी :)
शुभेच्छा :)
13 Oct 2012 - 12:10 am | रेवती
अरे वा! पुस्तक प्रदर्शन!
रांगोळी नेहमीप्रमाणे भारी बरं का गुरुजी!
फटू बघून पुस्तके खरेदीची इच्छा झाली आहे.
13 Oct 2012 - 12:20 am | विकास
राजेंना आणि त्यांच्या या प्रकल्पास मनःपूर्वक शुभेच्छा! प्रत्यक्ष येता आले असते तर जास्त आवडले असते. पण वृत्तांत दिल्याबद्दल धन्यवाद!
केल्या कामातून आनंद वगैरे होत असेल तर, मला वाटते, तुमच्या आयडीतील "अतृप्त" हा शब्द काढून टाकू शकता. ;)
13 Oct 2012 - 1:02 am | मराठे
राज ला मनःपूर्वक शुभेच्छा. रांगोळीही मस्त. पण गुर्जी रांगोळी काढण्याच्या नादात जरा जास्तच मोठी काढलीत की काय? खेरसाहेब दीप-प्र्ज्वलन करता करता धाडकन् तोंडावर पडले असते म्हणजे?
13 Oct 2012 - 3:33 am | अत्रुप्त आत्मा
@धाडकन् तोंडावर पडले असते म्हणजे? >>> काय काळजी हो तुंम्हाला? ;-) ... असो. अहो रांगोळी मोठ्ठी नव्हती,समई लावायची मेणबत्ती लहान होती. त्यामुळे मेणबत्ती मोठी ठेवा,असं म्हणायला पाहिजे होतं तुंम्ही! :-b
जाउ दे वय झालं अता तुमच! चुकतो नेम कधी कधी ! :-b
13 Oct 2012 - 3:20 am | अजितजी
झक्कास !
13 Oct 2012 - 3:51 am | अभ्या..
स्माय्लात्माराव तुम्ही तुमच्या स्मायल्या सारखीच रांगोळी पण भारी टाकलीत की हो.
बेस्ट एकदम.
स्माय्ल्या यलो, रांगोळी यलो. तुमी मात्र एक्दम क्रियेटिव्ह फेलो.
13 Oct 2012 - 7:42 am | प्रचेतस
राजेंना मनःपूर्वक शुभेच्छा.
पुस्तक प्रदर्शनात हजेरी अवश्य लावली जाईल.
13 Oct 2012 - 8:20 am | किसन शिंदे
पुस्तक प्रदर्शनासाठी राजला मनःपुर्वक शुभेच्छा!!
चेपुवर पाहिला होता रांगोळीचा फोटो तेव्हाच कळालं होतं,बुवांशिवाय हे कोणाचं काम दिसत नाही. ;)
13 Oct 2012 - 8:48 am | लीलाधर
आणि गुरूजी रांगोळीही अप्रतिम हो :)
13 Oct 2012 - 9:07 am | इरसाल
आत्माराम धन्यवाद बरं का!
13 Oct 2012 - 9:19 am | प्रेरणा पित्रे
कालच ऑफिसात जातांना हे पुस्तक प्रदर्शन दिसले.. आज नक्की जाऊन येणार...:) गेल्या वर्षी सुद्धा या प्रदर्शनात मी बरीच चांगली पुस्त्के खरेदी केली होती..
13 Oct 2012 - 9:24 am | ज्ञानराम
रांगोळी छान काढली ... हे. पुस्तक प्रदर्शनासाठी प्रयत्न करणार्या सर्वांना मनःपुर्वक शुभेच्छा!
13 Oct 2012 - 9:28 am | ज्ञानराम
13 Oct 2012 - 9:55 am | प्रभाकर पेठकर
आत्मारामपंत, रांगोळी एकदम झकास.
पुस्तक प्रदर्शन म्हणजे पर्वणीच. तिथे असतो तर नक्की नक्कीच भेट दिली असती. तुमचा उद्देश सफल होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
13 Oct 2012 - 2:37 pm | प्रकाश घाटपांडे
गुरुजींच्या रांगोळ्या या एक वातावरण प्रसन्न करतात.
13 Oct 2012 - 2:53 pm | खेडूत
सुरेख रांगोळी !
14 Oct 2012 - 12:44 am | श्रीरंग_जोशी
या प्रदर्शनाबद्दल राज जैन यांचे अभिनंदन.
अआ - पुष्प-रांगोळी खरंच सुंदर दिसत आहे.
14 Oct 2012 - 2:55 am | सुहास झेले
खूप भारी... राजचे अभिनंदन
गुरुवारी पोचतोय इथे... :) :)
14 Oct 2012 - 8:43 am | चौकटराजा
गुर्जीनी रांगोळ्या काढलेले फोटो तेवढे मोठे ठेवलेले दिसतायत. याची चौकशी झाली पाहिजे जमलं तर निदान श्वेतपत्रिका
तरी काढा !
14 Oct 2012 - 5:11 pm | अत्रुप्त आत्मा
फक्त त्यात गुरुजींना गोवू नका...कारण ते सगळे फोटू राजेंच्या टीमनी काढलेले आहेत. ;-)
14 Oct 2012 - 8:46 am | नंदन
राजेंचे अभिनंदन आणि मन:पूर्वक शुभेच्छा! फुलांची रांगोळीही उत्तम.
अवांतर - रराआजोबांना दिव्याने 'वात' आणलेला दिसतोय ;)
15 Oct 2012 - 9:03 pm | रमताराम
दिव्याने नव्हे 'ज्योती'ने वात आणला होता. :)
15 Oct 2012 - 11:13 pm | सुहास..
दोन कोटीसम्राटाना पाहुन (स्वामी) अत्यानंद जाहला ! उगा तेजाची ज्योतीने आरती आठवले.
रम-डॅन्स आठवले गट !
वाश्या
16 Oct 2012 - 9:29 pm | मालोजीराव
झक्कास ! आलुच परदरशनाला
17 Oct 2012 - 11:31 am | सस्नेह
गुरुजींच्या स्मायल्यांसारखीच.
आमच्या कोल्हापुरात भरवा की हो असली पुस्तक-जत्रा एकदा !
17 Oct 2012 - 11:54 am | बन्या बापु
वाचनाचा आनंद घेणारी मंडळी वाढत आहेत हे वाचून ( आणि प्रदर्शनाची चित्र बघून ) आनंद झाला..
अभिनंदन आणि कौतुकास्पद प्रयोग.
अवांतर:
मिपावरील जाणकार मंडळींनी आम्हा गरिबाला कॅनडामध्ये पुस्तके कशी मागवता येतील ह्याचे मार्गदर्शन करावे.. आंतरजालावरील तद्दन फालतू दुकानांतून चांगली मराठी पुस्तके मिळत नाही हा आमचा अनुभव..
18 Oct 2012 - 8:18 pm | रेवती
बापूसाहेब, आपल्या परिकथेतल्या राजकुमाराला विचारा पाठवतोय का परदेशात म्हणून. त्याचं आख्खं दुकान आहे पुस्तकांचं.
19 Oct 2012 - 3:15 pm | पांथस्थ
http://www.rasik.com/ -- हे ट्राय केले का?
18 Oct 2012 - 9:59 pm | मदनबाण
चांगला उपक्रम... :)
राजेंना मनःपूर्वक शुभेच्छा. :)