हाय लोक्स..
१९ मे किंवा २० मे रोजी मुंबईत (ठाणे नव्हे हा ;) ) कट्टा करण्याचे योजिले आहे.
ठिकाण : veg alweys
परळ एस टी डेपोजवळ
गोखले रोड , प्रभादेवी , मुंबई
(http://www.zomato.com/mumbai/restaurants/central/prabhadevi/veg-always-3...)
वेळ : १९ मे शनिवार संध्याकाळ
बरोबर ६ वाजता
कळावे,
आपला नम्र जिलबीपाडू स्पा
प्रतिक्रिया
16 May 2012 - 12:40 pm | पुण्याचे वटवाघूळ
कट्ट्याला शुभेच्छा. लाईव्ह टेलिकास्ट लिहा.
बाय द वे: धागाकर्त्याला हा धागा नृत्य/प्रेमकाव्य/ विनोद किंवा फलज्योतिष या प्रकारात मोडतो असे का वाटले असावे?
16 May 2012 - 12:55 pm | बिपिन कार्यकर्ते
शुभेच्छा!
16 May 2012 - 1:02 pm | गवि
कट्ट्याला शुभेच्छा...!!!
16 May 2012 - 1:33 pm | मी-सौरभ
माझ्याही शुभेच्छा :)
(या वीकांती मुंबईला येणे जमणार नाही, नायतर यायची खऊप ईच्छा होती :( )
16 May 2012 - 1:38 pm | प्रभो
माझ्याही शुभेच्छा !!
या वीकांती मुंबईला थांबणे जमणार नाही, नायतर यायची ईच्छा होती
16 May 2012 - 1:04 pm | निखिल देशपांडे
१९ मेला दोघेही मी आणि स्वाती येउ शकतो.
२० ला गावाला जात आहोत. त्यामुळे शक्य नाही.
16 May 2012 - 2:34 pm | विश्वनाथ मेहेंदळे
स्वाती कोण ?? ;-)
16 May 2012 - 3:18 pm | मस्त कलंदर
मी!!
कोई शक?
16 May 2012 - 7:15 pm | नाना चेंगट
हॅ ! हिम्मत आहे का?
16 May 2012 - 8:19 pm | रेवती
अहो मेहेंदळे, आपण एरवी त्यांना देशपांडेकाकू म्हणतो ना ....त्याच त्या.;)
17 May 2012 - 5:39 am | सूड
'आपण' का ? ब ऽऽऽरं !!
17 May 2012 - 7:20 pm | रेवती
आपण म्हणजे आपण सगळे कळ्ळं का सुडा!
16 May 2012 - 1:25 pm | कवितानागेश
अर्थव्यवहार/नृत्य /प्रवास/ प्रेमकाव्य/विनोद /फलज्योतिष /भूगोल/ मौजमजा.
याबरोबर, "२० मे ची भयानक अमावस्या!" असे शीर्षक हवे होते. ;)
16 May 2012 - 1:46 pm | पैसा
म्हणून भयानक अमावस्या काय? =)) =)) असो. कट्ट्याला शुभेच्छा!
16 May 2012 - 1:51 pm | सूड
१९ मे जमवू शकेन, २० मे जमणार नाही.
16 May 2012 - 1:52 pm | यकु
कट्टर कुठचे!
कामधंदा नाय का काही :p
इकडे सराफ्यात खपा म्हटलं तर कुणी ढुंकून पहायला तयार नाही. :(
16 May 2012 - 4:18 pm | श्रावण मोडक
सराफ्यात दहा जणांनी येणं नाही परवडायचं... त्यापेक्षा तू ये इथं पुणे - ३० मध्ये. ;)
16 May 2012 - 7:31 pm | यकु
मै आऊंगाऽऽऽ !
16 May 2012 - 1:59 pm | अत्रुप्त आत्मा
कट्टा बारश्या निमित्त का ? ;-)
16 May 2012 - 2:10 pm | स्पा
तूर्तास तरी शनिवार संध्याकाळ सर्वांना सोयीस्कर वाटत आहे
16 May 2012 - 2:40 pm | परिकथेतील राजकुमार
शनिवारी बहूदा मिरा भाईंदरला आहे. जमल्यास हजेरी लावतोच, अन्यथा फोनवरून हजेरी असेलच.
16 May 2012 - 2:44 pm | स्पा
अन्यथा फोनवरून हजेरी असेलच
मुंबईत असून कट्ट्याला हजेरी लावली नाहीत तर विमेकडून जाहीर सत्कार करण्यात येईल याची नोंद घ्यावी
16 May 2012 - 3:35 pm | परिकथेतील राजकुमार
ह्याला विमे कितपत तयार होतील हे त्यांना विचारून मग काडी सारावी. ;)
बाकी आपण एकटेच येणार आहात, का होणार्या वहिनी देखील कट्याला येणार आहेत हे कळवावे.
18 May 2012 - 9:46 am | जेनी...
हा हे सांग पर्याला ,कारण वहिनी आल्या तरच पर्या न विसरता हजेरि लावेल
अन्यथा फोनवरुनच " हजर " म्हनेल ....;)
16 May 2012 - 3:54 pm | स्पा
आत्तापर्यंत अपेक्षित मेंबर
विमे, प्रास, सूड, मोदक,च चा , स्पा, नि. दे. , मकी, रामदास काका, विजुभाव , सर्वसाक्षी काका, सौरभ उप्स
,वरून मोहिते , झेले सरकार, जयपाल,लीमौजेट,परा ;)
16 May 2012 - 3:55 pm | परिकथेतील राजकुमार
बूच.
16 May 2012 - 3:57 pm | स्पा
:P
हलकट परा
16 May 2012 - 3:51 pm | स्मिता.
कट्ट्याला शुभेच्छा... आम्ही वृतांत वाचनात उपस्थिती लावू :)
16 May 2012 - 4:16 pm | चिरोटा
१६ ला टोकियो,१७ ला पॅरिस,१८ ला लंडनला कामानिमित्त असेन.१९ ला फ्लाईट मुंबईत वेळेवर आली तर हजेरी लावतोच.
16 May 2012 - 5:24 pm | वपाडाव
शांघाय / न्युयॉर्क राहिले का हो??
16 May 2012 - 4:21 pm | मेघवेडा
या वीकेंडला अंटार्क्टिकामध्ये असल्यानं उपस्थिती लावू शकत नाही. समक्ष्व.
16 May 2012 - 4:29 pm | स्पा
या वीकेंडला अंटार्क्टिकामध्ये असल्यानं उपस्थिती लावू शकत नाही. समक्ष्व.
मायला मी मंगळावरून १०३००३०६५८४१२२०००५६ BEST ने येतोय ती पण ए सी
आणि तुम्हाला इथल्या इथे यायला होत nahi का रे
16 May 2012 - 4:29 pm | स्पा
या वीकेंडला अंटार्क्टिकामध्ये असल्यानं उपस्थिती लावू शकत नाही. समक्ष्व.
मायला मी मंगळावरून १०३००३०६५८४१२२०००५६ BEST ने येतोय ती पण ए सी
आणि तुम्हाला इथल्या इथे यायला होत nahi का रे
17 May 2012 - 12:25 am | नितिन थत्ते
स्थूल रूपात येताय मंगळावरून की सूक्ष्म रूपात?
19 May 2012 - 8:40 am | अत्रुप्त आत्मा
@स्थूल रूपात येताय मंगळावरून की सूक्ष्म रूपात? >>> एका प्रश्नात दोघांचा निकाल.
प.रा. -येण्याची वेळ सायंकाळची असल्यामुळे स्थूल-रुप ;-)
स्पा- ईकडे दुसरा प्रश्न नाही, कारण रूपच सूक्ष्म आहे ;-)
19 May 2012 - 11:48 am | परिकथेतील राजकुमार
तुम्हाला 'हलत डूलत' रुप म्हणायचे आहे का ?
16 May 2012 - 5:38 pm | स्वातीविशु
कट्ट्याला खुप शुभेच्छा....... व्रुत्तांतास नक्की हजेरी लावणार.
16 May 2012 - 7:17 pm | नाना चेंगट
पुणे ३० मधे डान्रावांसमवेत विश्लेषण करायचे असल्याने जमणार नाही :)
17 May 2012 - 12:26 am | नितिन थत्ते
बाटली आणि ग्लासाच्या शकलांचं?
17 May 2012 - 11:11 am | छोटा डॉन
हेच म्हणतो.
पुणे ३० मध्ये विष्लेषण करुन झाल्यावर नाना आणि परासोबत पनवेल किंवा नगररोडला जायचे असल्याने येणे जमणार नाही.
कट्ट्याला मनापासुन शुभेच्छा :)
- छोटा डॉन
17 May 2012 - 12:19 pm | विश्वनाथ मेहेंदळे
परा म्हणे की तो त्या दिवशी मुंबईच्या हद्दीत आहे. जमले तर येईन. तुम्ही त्याच्याबरोबर त्याच दिवशी पनवेल किंवा नगररोडला जाणार. काय प्रकार काय आहे ??
थापा मारणे ही कला आहे. थाप निट तयारी करून मारावी भाऊ ;-)
(Seinfeld च्या काही भागांची यादी पाठवतो. बघा एकदा)
16 May 2012 - 8:21 pm | रेवती
कट्टेको मेरी तरफसेपण शुभेच्छा.
लग्न ठरलेलं सांगू नका बरं महाराज.
16 May 2012 - 8:31 pm | पैसा
हे काय आणि? तुला सांगितलं नाही?
16 May 2012 - 8:34 pm | रेवती
अगं तेच तर!
मला सांगितलं नाही त्यानं.
आता केळवणाला आला ना की चांगली खरडपट्टी काढते. ;)
16 May 2012 - 8:45 pm | नंदन
कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा!
16 May 2012 - 10:04 pm | सुनील
कट्ट्याला शुभेच्छा!
फोटोसहित वृतांत टाकण्यास विसरू नये!
16 May 2012 - 11:42 pm | शैलेन्द्र
अरे वा.. कट्टा का.. जमवायला हवं..
17 May 2012 - 8:58 am | नाखु
भरघोस शुभेच्छा........
17 May 2012 - 12:29 pm | मुक्त विहारि
कट्ट्याला मनापासून शूभेच्छा...
17 May 2012 - 12:42 pm | स्पा
विमे, प्रास, सूड, मोदक,च चा , स्पा, नि. दे. , मकी, रामदास काका, विजुभाव , सर्वसाक्षी काका, सौरभ उप्स
,वरून मोहिते , झेले सरकार, जयपाल,लीमौजेट,परा ,अन्या दातार ( खास बंगाल हून मागवलं आहे यांना ;) ), किस्ना
17 May 2012 - 1:00 pm | सूड
अन्या दातार ( खास बंगाल हून मागवलं आहे यांना
हे वाचून अं ह झालो. अन्या काय रे हे ?
17 May 2012 - 11:25 pm | विश्वनाथ मेहेंदळे
अरे व्वा !!! मोदक येतोय म्हणजे प्याकेज डील मध्ये वल्ली पण येणार. वल्ली येणार म्हणजे भटजी आणि पन्नास राव पण येणार. मज्जाच की हो !!!
वल्ली असा पण येणार होताच म्हणा. संदर्भ :- http://www.misalpav.com/node/21523#comment-392598 ;-)
18 May 2012 - 9:42 am | प्रचेतस
तूर्तास हापिसने गळ्यात काढण्या अडकवून कामास जुंपल्यामुळे येणे शक्य नाही तेव्हा कट्ट्यास शुभेच्छा. :(
17 May 2012 - 1:02 pm | प्यारे१
वेताळ येणार आहे का? का तोच सगळी सूत्रं हलवत आहे???? ;)
17 May 2012 - 1:19 pm | पियुशा
आमच्या पण शुभेच्छा जाता - जाता :)
17 May 2012 - 3:41 pm | स्पा
मा श्री अमोल जी खरे साहेब :)
17 May 2012 - 9:49 pm | ५० फक्त
अबे कट्टा करताय का नविन पक्ष स्थापन करताय, जी काय साहेब काय, का मुजरा वगैरे ठेवलाय गितांजलीचा शनिवारी.
18 May 2012 - 10:14 am | पुश्कर
मला यायला आवडेल. त्या निम्मिताने सगळ्यांच्या ओळखी होतील. जमवायचे म्हणतोय ...चालेल ना ?
18 May 2012 - 10:33 am | प्यारे१
वेताळाला विचारा! ;)
18 May 2012 - 11:17 am | अमोल खरे
चालेल रे चालेल. ये नक्की. तुला कोण काही बोलणार नाही. स्पा कडुन फुल्ल प्रोटेक्शन आहे तुला.
18 May 2012 - 11:21 am | स्पा
तेजायचं खरं
गप कि लेका :D
18 May 2012 - 12:17 pm | विश्वनाथ मेहेंदळे
आणि स्पाला चचाचे प्रोटेक्शन आहे.
चचाला कोण प्रोटेक्शन देणार भगवान जाणे ...
18 May 2012 - 2:13 pm | लीलाधर
चचाला कोण प्रोटेक्शन देणार
अहो विमे काका तुम्ही असतांना आणखी कोणाचे प्रोटेक्शन असायला हवे हो :)
18 May 2012 - 3:20 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मला पुश्कर (?) प्रोटेक्शन देईल काय ??
18 May 2012 - 11:20 pm | किसन शिंदे
हा पुश्कर कोण रे विमे???
19 May 2012 - 8:36 am | लीलाधर
तेच म्हणतोय मी हा पुश्कर कोण रे विमे?????????
19 May 2012 - 11:39 am | विश्वनाथ मेहेंदळे
तुम्ही दोघे धागा नीट वाचत जा रे !!!!
http://www.misalpav.com/node/21676#comment-397618
18 May 2012 - 10:37 am | इरसाल
कट्ट्याला शुभेच्छा.
वेंजाय माडी.
18 May 2012 - 10:51 am | विश्वनाथ मेहेंदळे
धन्यवाद !!!
काहीही काय ? माडी बिडी चढत नाही आम्ही !! :-)
18 May 2012 - 10:54 am | प्रचेतस
त्यांना माडी प्या असे म्हणायचे असेल हो विमेकाका. :P
19 May 2012 - 8:51 am | अत्रुप्त आत्मा
आंम्ही सध्या कोकण दौय्रामधे व्यस्त आहोत. आज इकडे एक महत्वाची मिटिंग आहे. ती लवकर संपली तर येउच. तसेही आंम्ही आत्म-रूपानी सर्वत्र असतोच. ;-)
19 May 2012 - 3:30 pm | स्पा
वेळेवर या रे सर्वांनी
19 May 2012 - 3:35 pm | भिकापाटील
पण माझ्या हाताला कुणी अत्तर लावलेले आवडत नाही. :P
19 May 2012 - 3:40 pm | कुंदन
ओक्के
19 May 2012 - 3:57 pm | प्यारे१
आईशप्पथ... इन्टरनॅशनल कट्टा आहे तर!