According To Accordion

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
8 May 2012 - 8:15 pm

निमित्त होतं ते Accordion या जादुई वाद्याच्या १८३व्या वाढदिवसाचं... मा.चौराकाकांच्या मुळे मी व मोदक (दिनांक ६ मे रोजी) या एका अभूतपूर्व कार्यक्रमाचे सह-भागी होऊ शकलो...होय सहभागीच..! ते दोन तास ज्या विलक्षण धुंदीत गेले.ते तिथल्या कुठल्याही श्रोत्याला विचारलं तर या पेक्षा वेगळं असं काहीच सांगणार नाही तो.एकतर हे वाद्य, कायम एखाद्या कतृत्व माहित असलेल्या पण कधीच प्रत्यक्ष न पाहिलेल्या/अनुभवलेल्या एखाद्या महनीय व्यक्ति सारखं गोषात राहिलेलं.Accordion बद्दल ना कधी कुठे फारसं ऐकू येतं,ना कुठे या वाद्याचे खास कार्यक्रम कोणी सादर करतं.ती जबाबदारी अतीशय आत्मीयतेनं उचलली ती श्री.अमित वैद्य यांनी.या माणसाला या वाद्याचं कुळ,गोत्र.कुळाचार, हे सगळ तर ठाऊक आहेच.शिवाय या वाद्याचा भारतीय भूमीमधे झालेल्या शिरकावापासून त्याचा इथल्या संस्कृतीशी झालेला मिलाफ,वाढ,प्रसार,इथलं वेगळेपण याही गोष्टी ठाऊक आहेत.आंम्ही त्या दिवशी जितके कार्यक्रमात सादर झालेल्या गाण्यांनी मंत्रमुग्ध झालो होतो,त्या पेक्षा अधिक या माणसानी दिलेल्या माहितीनी वेडे झालो...

मी तर फक्त एक संगीत प्रेमी माणूस आहे. मला त्यातल्या अभ्यासातला खरोखरी 'अ' सुद्धा ठाऊक नाही.पण या वाद्याचे लहानपणा पासुन आकाशवाणी कृपेकरोन जे संस्कार मनावर झालेत,त्यानी या वाद्याबद्दलच एक कुतुहल जनक प्रेम मनामधे कायमचं निर्माण करुन ठेवलं आहे. नाट्यसंगीतातले ऑर्गनचे सूर मनावर जे गारुड करुन गेलेत,तेच स्थान लहानपणी रेडिओवर ऐकलेल्या हिंदी चित्रपटातल्या काही गाण्यांचं आहे.आणी याला कारण त्यात वापरलं गेलेलं Accordion. या वाद्यामुळे मनात घर करुन बसलेली....
'प्यार हुआ इकरार हुआ'
'आ जा सनम मधुर चांदनी मे हम'
अशी अनेक गाणी ...आणी माझी आणखिन एक अठवण म्हणजे माझ्या अत्यंत अवडत्या असलेल्या टॉम अँड जेरी या कार्टुन शो मधल्या बर्‍याचश्या शों मधे असलेलं पियानो आणी या वाद्याच्या साहाय्यानी आलेलं पार्श्वसंगीत... यामुळेच तर मी या कार्यक्रमाला अतीशय उत्सुकतेनी गेलो. हा संपूर्ण कार्यक्रम म्हणजे एक प्रकारचा संगीतमय माहितीपट आहे. आणखी यातलं एक विशेष म्हणजे श्री.सुनील गोडबोले नामक एक हरहुन्नरी कलाकार.हा माणुस शिट्टी म्हणण्यापेक्षा-शिळ घालणं-हा जो काही प्रकार असतो,त्यातून गाणी म्हणतो..हा एक अफलातून प्रकार आहे. कार्यक्रमातल्या काही गाण्यांना श्री.वैद्य आणी गोडबोले या काँबिनेशननी अशी काही बहार आणली म्हणता,की निवारा वृद्धाश्रमाचं त्या दिवशी खर्‍या अर्थानी निवारा संगीताश्रमात रुपांतर झालं... ते शीळेतून गाणं वाजवणं म्हणजे एक शारिरीक आणी बौद्धिक दृष्ट्या प्रचंड मेहेनतीचं काम आहे.पण गोडबोले गाणी इतकी लीलया वाजवत होते,की त्यांच्याकडे बघताना काही क्षण गेल्यानंतर..'हे खरच स्वतः शीळ वाजवतायत की एखादी दैवी शक्ती हे काम त्यांच्याकडून करवून घेतीये' असा भास व्हावा..!

चौराकाकांनी त्यांच्या लेखात केलेल्या उल्लेखा प्रमाणे,मी कार्यक्रम संपल्यानंतर श्री.वैद्य यांची परवानगी ज्या कारणा साठी खास करुन घेतली ते आधी सांगतो..''या कार्यक्रमावर आधारीत लेखन करणे...व संपूर्ण कार्यक्रम मिसळपाव.कॉम या संकेतस्थळावर लोकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करणे'' या दोन गोष्टींची परवानगी मी श्री.वैद्य यांचे कडे मागितली...त्यांनीही अत्यंत मनापासुन होकार दिला...कारण त्यांनी या वाद्याच्या प्रसाराचं व्रत घेतलय...होय व्रतच...! कारण श्री.वैद्य हे एका (मला अठवत नाही..क्षमस्व) कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहेत...इंजिनीअर आहेत..पण तरिदेखिल स्वतःच्या कार्यक्रमामधुन त्यांनी Accordion साठी त्यांनी जे स्वतःला वाहुन घेतलय,ते पहाता मी तरी याला व्रतच म्हणेन. असो...मी अता या उप्पर रसिकांची उत्कंठा ताणत बसत नाही. त्यांच्या कार्यक्रमाचे मी रेकॉर्ड केलेले सर्व भाग मी क्रमशः खाली देत आहे. मित्रांनो...हा दोन तासांचा कार्यक्रम आहे.त्यामुळे तो तुंम्ही एका बैठकीत ऐकाल न ऐकाल पण वेळ होइल तसा संपूर्ण ऐका मात्र जरूर...कारण मला तरी आजपर्यंत या वाद्याची अशी इत्थंभूत माहिती मिळाली नव्हती...त्यामुळे ही एक आनंदमय अनुभूती आहे...जमेल तशी घ्या..आणी इतरत्र शेअर सुद्धा करा... :-)

१) ही क्लिप म्हणजे अ‍ॅकॉर्डिअननी सजलेल्या काही लोकप्रीय गीतांची झलक आहे

२)आणी हि क्लिप (माझ्या अठवणी प्रमाणे) मुळात एका लोकप्रीय पाश्चात्य सिंफनीचा इकडे झालेला अविष्कार आहे.

३) अता वरती झालेल्या इष्ट/कुल देवतांच्या नमनानंतर आपण मुळ आराध्य दैवताच्या संगीताराधनेला प्रारंभ करु... भाग पहिला...

४) भाग दुसरा... आणी अंतिम

कलासंगीतसंस्कृतीवावरविचारअनुभवप्रतिक्रियाआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

8 May 2012 - 8:23 pm | बिपिन कार्यकर्ते

क्लिप्स ऐकायला लॉग इन करणे जरूरीचे आहे असा मेसेज येत आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

8 May 2012 - 8:44 pm | अत्रुप्त आत्मा

होय हो... एक दोन जणांनी तसा मेसेज दिलाय.. :-(
मला या क्लिप्स दुसरीकडून सहज सगळ्यांना ऐकायला कश्या उपलब्ध करुन देता येतील ते कुणितरी सांगा...प्लीज ...मला या साइट शिवाय इतरत्र कश्या अप्लोड कराव्या याचे ज्ञान नाही.. :-(

गणपा's picture

8 May 2012 - 8:53 pm | गणपा

व्यनी धाडलाय. :)

प्रभाकर पेठकर's picture

8 May 2012 - 8:40 pm | प्रभाकर पेठकर

श्री.वैद्य यांची परवानगी ज्या कारणा साठी खास करुन घेतली ते आधी सांगतो..''या कार्यक्रमावर आधारीत लेखन करणे...व संपूर्ण कार्यक्रम मिसळपाव.कॉम या संकेतस्थळावर लोकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करणे'' या दोन गोष्टींची परवानगी मी श्री.वैद्य यांचे कडे मागितली...त्यांनीही अत्यंत मनापासुन होकार दिला.

श्री. अमित वैद्य आणि आपणांस मनापासून धन्यवाद.

श्री. अमित वैद्य ह्यांनी मोठ्या मनाने तशी परवानगी दिली पण उपकृत होऊन त्यांना ह्या लेखाची http://www.misalpav.com/node/21601 ही लिंक पाठवली का? तसे केल्यास ते शिष्टाचारास धरून होईल.

अत्रुप्त आत्मा's picture

8 May 2012 - 8:44 pm | अत्रुप्त आत्मा

पाठवली आहे... :-)

चौकटराजा's picture

9 May 2012 - 9:14 am | चौकटराजा

या अगोदर मी मिपावर लिहिलेल्या वृतांताची लिंक मी श्री अमित वैद्य याना पाठविली आहे. ते माझे फेसबुक वरचे मित्र असल्याने त्यानी मेसेज मध्ये तिथेच धन्यवादाची भावना व्यक्त केली आहे.
चौ रा

प्रभाकर पेठकर's picture

9 May 2012 - 10:05 am | प्रभाकर पेठकर

उत्तम. ही अत्यंत संतोषजनक बाब आहे. अभिनंदन.

JAGOMOHANPYARE's picture

8 May 2012 - 8:53 pm | JAGOMOHANPYARE

छान

अन्या दातार's picture

9 May 2012 - 9:34 am | अन्या दातार

झकास हो अ.आ. आणि चौराकाका. तिसर्‍या क्लिपमध्ये वैद्य यांनी फार सुरेख माहिती दिली आहे. बर्‍याच गोष्टी "हे बघा", "इथे बघा" असल्याने समजणार नाहीत, पण कार्यक्रम किती सुरेख झाला असेल याची कल्पना नक्कीच येतेय.

अत्रुप्त आत्मा's picture

8 May 2012 - 11:55 pm | अत्रुप्त आत्मा

संपादकांस(गंपा भाऊस :-) ) विनंती-या फाइल्स मुळ धाग्यात लाऊन द्याव्यात...प्लीज...

१) ही क्लिप म्हणजे अ‍ॅकॉर्डिअननी सजलेल्या काही लोकप्रीय गीतांची झलक आहे

२)आणी हि क्लिप (माझ्या अठवणी प्रमाणे) मुळात एका लोकप्रीय पाश्चात्य सिंफनीचा इकडे झालेला अविष्कार आहे.

३) अता वरती झालेल्या इष्ट/कुल देवतांच्या नमनानंतर आपण मुळ आराध्य दैवताच्या संगीताराधनेला प्रारंभ करु... भाग पहिला...

४) भाग दुसरा... आणी अंतिम

बिपिन कार्यकर्ते's picture

9 May 2012 - 12:02 am | बिपिन कार्यकर्ते

डन!

यकु's picture

9 May 2012 - 12:14 am | यकु

डनाडन !

लै मजा येते आहे.

dancing in music smileyMore Animated Gif - GoodLightscraps.com

थँक्यू परागसर.

अत्रुप्त आत्मा's picture

9 May 2012 - 12:25 am | अत्रुप्त आत्मा

थँक्यू हो..बि.का. :-)

@डनाडन !लै मजा येते
प्रेषक यकु Wed, 09/05/2012 - 00:14
. >>> यक्कू तू खरच क्रूरसींह आहेस...ही तंतोतंत भावाविष्कार देणारी स्मायली टाकुन तू मला आज अगदी
अता रात्रभर ऐकत बस हां... ;-)

यक्कूशेठच्या मंत्रमुग्धतेला आमचा

चौकटराजा's picture

9 May 2012 - 7:12 am | चौकटराजा

अ आ ,
आपला रिपोर्ट माझ्या रिपोर्टपेक्षाही मला आवडला. चांगल्या व्यंगचित्रकाराला मूळ चित्रकला बर्‍याच वेळेस उत्तम येत असते उदा दीनानाथ दलाल ,शिद फडणीस , राज ठाकरे ई. आपले विडंबन कसब व ललित लेखन दोन्ही ही प्रतिभेचा ताजवा असलेले असते. हे मना पासून आलेले शब्द !
चौ रा

अत्रुप्त आत्मा's picture

9 May 2012 - 10:35 am | अत्रुप्त आत्मा

@अ आ याची दखल घ्या >>>

@आपला रिपोर्ट माझ्या रिपोर्टपेक्षाही मला आवडला. >>>
SCRAP ANIMATED SMILIES.
CLICK HERE

सगळ्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद हो काका free smiley face images for orkut, myspace, facebookMore Animated Gif - GoodLightscraps.com

चौकटराजा's picture

9 May 2012 - 12:22 pm | चौकटराजा

छ्या , अ आ , तुमी काय नीट डाकतर व्हनार नाय कारन ह्ये स्माईली ची लिंक देऊनशान त्ये आउषधाचं नाव फ्वाडलं क्यी वो !

सुहास झेले's picture

9 May 2012 - 8:19 am | सुहास झेले

व्वा व्वा... सकाळी सकाळी एका सुरेल मैफिलीला हजेरी लावायचे भाग्य मिळाले :) :)

अआ, मनापासून आभार :)

प्रचेतस's picture

9 May 2012 - 10:28 am | प्रचेतस

मस्त हो बुवा.
लघुकळफलकीयमुक्ततारवायुसंयत्र कार्यक्रमाचा वृत्तांत आवडला.

चौकटराजा's picture

9 May 2012 - 12:29 pm | चौकटराजा

चौ रा मोड ऑन
लघुकळफलकीयमुक्ततारवायुसंयत्र
भाषांतर व्याकरणात बसत नाही मुक्त तार नाही " तारमुक्त" हवे !
अधिक अभ्यासासाठी केशवकुमार यांचा " झेंडूची फुले" हा काव्यसंग्रह वाचावा. त्यातील
कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत ही कविता अभ्यासावी .
चौ रा मोड ऑफ
वल्ली
प्रयत्न उत्तम आहे .

प्रचेतस's picture

9 May 2012 - 12:32 pm | प्रचेतस

म्हणूनच तुमच्याकडे शिकवणी लावावी म्हणतो. ;)

दोन्ही लेख अप्रतीम झालेत

रणजित चितळे's picture

9 May 2012 - 2:41 pm | रणजित चितळे

गोरे गोरे गाणे आठवले त्या निमित्ताने