तेझ : एका तिकिटात ५ चित्रपट

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
30 Apr 2012 - 1:23 pm

लहानपणी 'एका तिकिटात दोन बालनाट्ये आणि आइसक्रीम मोफत' अशा जाहिराती आपण सगळ्यांनीच पाहिलेल्या आहेत. मध्ये कुठल्याश्या फेस्टिवल मध्ये एका तिकिटात दोन चित्रपट ही बातमी देखील वाचनात आली. मात्र तेझ हा चित्रपट एकाच तिकिटावरती, एकाच पडद्यावरती आणि एकाच चित्रपटाद्वारे आपल्याला पाच चित्रपटांचा आनंद मिळवून देतो. स्पीड, बुलेट ट्रेन, पोलिस स्टोरी ३, ट्वायलाईट ह्या चार इंग्रजी चित्रपटांसह द बर्निंग ट्रेन ह्या हिंदी चित्रपटाचा उपभोग आपल्याला ह्या चित्रपटात मिळतो. कथा, अभिनय, संवाद, डबिंग, लोकेशन्स,संगीत, स्टंट्स इ. सर्व फालतू गोष्टी फाट्यावरती मारल्या, की जे काही निर्माण होईल ते म्हणजे 'तेझ' हा चित्रपट. चित्रपट किती बिनडोक असावा ह्याचे सुंदर उदाहरण. अनिल कपूर, बोमन इराणी, अजय देवगण, झायेद खान, कंगना राणावत आणि समीरा रेड्डी अशी भरभक्कम स्टारकास्ट आणि खुद्द प्रियदर्शन सारखा माणूस देखील २५ च्या वरती प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचू शकत नाही, ह्यावरून काय तो अंदाज बांधावा.

आकाश राणा अर्थात महादू देवगण हा अनाधिकृतपणे इंग्लंडमध्ये राहणारा एक इंजिनिअर. त्याला एकटे एकटे वाटू नये म्हणून त्याच्या प्रेमात पडलेली एका बड्या आसामीची मतिमंद (म्हणजे अभिनयात मतिमंद) कन्या कंगना राणावत. आता अशा कार्ट्याला (खरे तर नववृद्धाला*) कोण आपली पोरगी देईल ? हिचा बाप पण नकार देतो. मग ही घर सोडून अजय देवगण बरोबर बाहेर पडते. साडे चौथ्या मिनिटाला तिला बँकेतून लोन मिळते आणि सातव्या मिनिटाला त्यांचे नवीन ऑफिस सुरू देखील होते. ह्या ऑफिसात काम करणारे अदिल खान अर्थात झायेद खान अर्थात छोटा टॉम क्रूझ आणि मेघा म्हणजे समीरा रेड्डी हे दोघे देखील अजय देवगणच्याच जातकुळीचे, अर्थात चोरून इंग्लंडात राहणारे.

मग एके दिवशी अचानक इमिग्रेशन डिपार्टमेंटवाले ह्याच्या हापिसात धाड टाकतात. झायेद खान आणि समीरा रेड्डीला अजय देवगण पळवून लावतो पण स्वतः मात्र अधिकार्‍यांच्या ताब्यात सापडतो. मग कोर्टात लगेच त्याचे लग्न देखील बेकायदेशीर ठरवले जाते आणि त्याला लाथ मारून परत भारतात हाकलले जाते. त्याला कसाई बकरे घेऊन जातात तसे एयरपोर्टवरून घेऊन जात असताना बाहेरच्या काचेतून स्वतःच्या पोटावर थापट्या मारत ती मतिमंद कंगना काहीतरी ओरडताना दाखवली आहे. ती आधी काय कोकलते आहे तेच कळत नाही. "माझे पोट बिघडले आहे", किंवा "फुकट मिळते आहे म्हणून विमानात जास्ती खाऊ नकोस' असे काहीतरी ती बोलते आहे असे वाटते. अजय देवगणच्या चेहर्‍याकडे बघून, त्याला देखील असेच काहीसे वाटत असावेसे वाटते. काही काळाने मत ती "मी प्रेग्नंट आहे" असे कोकलते आहे हे लक्षात येते. ह्यानंतर मग एकदम चार वर्षाचा काळ गेलेला दाखवलेला आहे. आणि अचानक मग एके दिवशी 'बदले की आग' हृदयात घेऊन अजय देवगण पुन्हा एकदा इंग्लंडमध्ये दाखल होतो.

आल्या आल्या त्याला रिसिव्ह करायला जुना सहकारी झायेद खान आलेला आहे. तो ताबडतोब अजयला घेऊन एका खुंखार गुंडाकडे जातो. तिथे ते 'एक्स्प्लोझिव्ह' खरेदी करणार असतात म्हणे. पुन्हा एकदा पोलिस आडवे येतात आणि त्या अड्ड्यावरती धाड पडते. इंग्लंडमधले पोलिस हे मौजे बुद्रुकवाडीच्या साखर कारखान्याच्या वॉचमनपेक्षा देखील मूर्ख आणि सुस्त असल्याने देवगण साहेब आणि खान मियाँ त्यांना सहज उल्लू बनवून पळ काढतात. पळतात ते एकदम 'देसी बार' नावाच्या अड्ड्यावरती पोचतात. तिथे रुमालाची चोळी आणि रुमालाची लुंगी घालून 'लैला लैला' करत मलिका शेरावत कवायत करताना दाखवली आहे. ती 'देसी बार' ची पाटी आणि इंग्लंडचे हिंदी बोलणारे पोलिस बघून, आता आपल्याला पुढचे दोन अडीच तास कुठल्या भीषण प्रसंगाला तोंड द्यायचे आहे ह्याचा आपल्याला अंदाज येतो आणि एशीत देखील घाम फुटतो. ह्या चित्रपटात सर्व परदेशी पोलिस, एजंट आणि काही अनिल कपूरचे संवाद हे मुळात इंग्रजीत आहेत, जे नंतर हिंदीत डब केले आहेत. ते इतके भयावह आणि अंगावरती काटा आणणारे आहेत की विचारू नका.

हान तर आता बदले की आग मे जलनेवाला अजय देवगण एका प्रवासी ट्रेन मध्ये बॉम्बं लावतो आणि लगेच रेल्वे खात्याला तसे कळवून टाकतो. आता एंट्री घेतो रेल्वे कंट्रोल ऑफिसर संजय रैना म्हणजेच बोमन इराणी. त्याची पोरगी त्या रेल्वेतूनच प्रवास करत असते. मग पाठोपाठ अँटी टेरिरिझम ऑफिसर अर्जुन खन्ना अर्थात अनिल कपूर आणि त्याच रेल्वेतून प्रवास करणारा पोलिस ऑफिसर शिवनं नायर म्हणजे मोहनलाल ह्यांचे आगमन होते. इंग्लंडवासीयांमधे शिक्षण, बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा, देशभक्ती ह्या सर्वांचीच कमतरता असल्याने तिथे सगळ्या महत्त्वाच्या पदावरती भारतीय व्यक्ती कार्यरत असतात हे आतापावेतो आपल्या लक्षात आले असेलच. तर आता ह्या ट्रेनचा स्पीड ६० पेक्षा कमी झाला की तो बॉम्बं फुटणार असतो. आता हा स्फोट थांबवणे आणि गुन्हेगारांना पकडणे ह्या महान कार्याची सुरुवात होते.

अजय देवगण सारखे सारखे फोन करत धमक्या देत शहरभर हिंडत असतो, त्याच्या मागे मागे अनिल कपूर. अजय देवगण नेहमीप्रमाणे पोलिस खात्याला२/५ वेळा हातोहात मूर्ख बनवतो. मात्र पुढे पुढे अतिशय विनोदी पद्धतीने केलेला पाठलाग, पोलिसांच्या धाडी इ. इ. होत असल्याने अनुक्रमे समीरा रेड्डी आणि झायेद खान हे (एकदाचे) मारले जातात. समीरा रेड्डी मोटरसायकलवरून शहरभरच्या पोलिसांना गुंगारा देत ५०/६० किलोमीटर जे काही गोल गोल फिरताना दाखवली आहे त्याला तोड नाही. एका शॉट मध्ये तर ती चिरंजीवीसारखी बंद ट्रकच्या खालून मोटार सायकल घसरवत नेते. आता बोला !
तर आता सगळे सहकारी मेल्याने अजय देवगण बायको पोराला घेऊन (ह्याच्या पोराचे नाव पण बायकोने आकाशच ठेवलेले असते) परत भारतात जायचा निर्णय घेतो, मात्र अनिल कपूरच्या जाळ्यात अडकला जातो. पुढे काय होते, ट्रेनमधली लोकं वाचतात का इ. इ. प्रश्नांसाठी चित्रपटच पहा. म्हणजे पाहाच असे नाही, हो उगाच कशाला तुमचे वाईट चिंतू मी ?

चित्रपटात मोहन लाल ह्या चांगल्या अभिनेत्याने काय बघून भूमिका स्वीकारली असावी असा पहिला प्रश्न डोक्यात येतो. आपण चक नॉरीस नाही हे अनिल कपूरच्या आणि आपण टॉम क्रूझ नाही हे झायेद खानच्या लक्षात यायला अजून किती कालावधी जायला लागणार आहे ? नुसते ओरडून बोलणे आणि सतत तोंडाचा 'आ' करणे म्हणजे अभिनय नाही हे बोमन इराणीच्या कधी लक्षात येणार आहे ? रँप आणि चित्रपटाचा सेट ह्यातला फरक कंगना राणावतला कधी समजणार आहे ? लोकं आपल्याला बघायला येतात, आपल्या अभिनय क्षमतेला नाही ह्याचे ज्ञान समीरा रेड्डीला कधी होणार आहे ? आणि रतन जैन म्हणजे झामु सुगंध नाही हे प्रियदर्शनच्या डोक्यात कधी घुसणार आहे हे अजून काही पडलेले प्रश्न.

*श्रेयाव्हेर : नंदन

मौजमजाचित्रपटमाध्यमवेधअनुभवमाहितीआस्वादसमीक्षाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

30 Apr 2012 - 1:34 pm | मुक्त विहारि

दंडवत तुमच्या सहनशक्तीला...

भारी.. नुसते परीक्षण वाचून इतकं मनोरंजन तर सिनेमा काय असेल...

वाह..

धमाल परीक्षणाबद्दल धन्यवाद...

स्मिता.'s picture

30 Apr 2012 - 1:57 pm | स्मिता.

परा, कित्ती कित्ती महान आहेस तू!!
आमचे चार पैसे वाचावे आणि वरून आमचे मनोरंजन करावे म्हणून स्वतःचे पैसे खर्च करून किती अत्याचार सहन करतोस... तुझ्यासारखा परोपकारी तूच!

नाखु's picture

30 Apr 2012 - 2:10 pm | नाखु

होती कि याची जहिरात का जास्तीच फास्ट दाखिवतात हे टि व्हि वाले..

अमृत's picture

30 Apr 2012 - 2:27 pm | अमृत

चे परिक्षण वाचूनच चित्रपट पहायचे ठरविलेले आहे आम्ही. पण हे वाचता वाचता तोंड दाबून हसताना(हापिसात) जे श्रम पडतात त्याचे काय?

अमृत

प्रचेतस's picture

30 Apr 2012 - 2:27 pm | प्रचेतस

परीक्षण एकदम फर्मास.

सध्याच्या रामगोपाल वर्माच्या वाटेवरच प्रियदर्शन चाललाय हे बघून हळहळ व्यक्त होतीय.

सुहास..'s picture

30 Apr 2012 - 2:34 pm | सुहास..

ही ही ही ही !!

पाहिल्या पासुन चा वेळ कसा घालविलास रे ? ;)

ऋषिकेश's picture

30 Apr 2012 - 2:57 pm | ऋषिकेश

ट्रेलर मुळे फसणार होतो.. वाचलो म्हणायचो
परा, आभार! :)

चिंतामणी's picture

30 Apr 2012 - 3:10 pm | चिंतामणी

तुझ्या सहन शक्तीला सलाम करून सांगतो तुझ्या लिहीण्याने हसून हसून पोट दुखु लागले आहे.

सबब तु "दवादारू" देणे.

बाकी "तिथे रुमालाची चोळी आणि रुमालाची लुंगी " वाक्याने तर

Skype Emoticons

पाषाणभेद's picture

30 Apr 2012 - 9:48 pm | पाषाणभेद

आता तिची लावणीही होवूद्या.
रुमालाची चोळी माझे अंग अंग जाळी

जबरा चित्रपट परिक्षण आहे परा. कहर आहेस तू.

अत्रुप्त आत्मा's picture

1 May 2012 - 12:18 am | अत्रुप्त आत्मा

@रुमालाची चोळी माझे अंग अंग जाळी >>> हसून हसून मरायची माझ्यावरंही आली पाळी :-D

मृत्युन्जय's picture

30 Apr 2012 - 3:26 pm | मृत्युन्जय

चित्रपट परीक्षण फर्मास. २३० + २३० + ४० + १०० = ६०० रुपये वाचवल्याबद्दल धन्यवाद. पण खालील वाक्यासाठी २ गुण वजा

लोकं आपल्याला बघायला येतात, आपल्या अभिनय क्षमतेला नाही ह्याचे ज्ञान समीरा रेड्डीला कधी होणार आहे ?

तू समीरा रेड्डीला बघतोस? समीरा रेड्डी? अर्रे नारयण पेठेतल्या लेल्यांच्या गोठ्यातल्या म्हशी काय वाईट आहेत तिच्यापुढे. सौंदर्यफुफाट्याच्या जागी काय रद्दी आणि नारळ केंद्र उघडलय काय?

गणपा's picture

30 Apr 2012 - 4:16 pm | गणपा

खर सांग.... चित्रपट समिक्षकाच्या कोट्यातून फुकटात पाहिलास नी नाही? ;)
शेवटच्या परिच्छेदात लैलाच नाव कसा काय विसरलास?

अरे खाल्लेल्या मीठाला जागाव माणसाने.

सोत्रि's picture

30 Apr 2012 - 10:22 pm | सोत्रि

अरे खाल्लेल्या मीठाला जागाव माणसाने.

गणापाने 'खाल्ल्या मिठा'ची उपमा द्यावी हीच त्याची बल्लवाचार्य असण्याची साक्ष आहे :)

- (गणपाच्या खाल्ल्या मिठाला जागण्याची आस असलेला) सोकाजी

तिमा's picture

30 Apr 2012 - 6:59 pm | तिमा

कधीतरी, कोणीतरी, चांगला हिंदी चित्रपट काढेल या दुर्दम्य आशावादाबद्दल तुम्हाला मानलं.
परीक्षण नेहमीप्रमाणेच फर्मास खास भाषेत.

कधीतरी, कोणीतरी, चांगला हिंदी चित्रपट काढेल या दुर्दम्य आशावादाबद्दल

तिरशिंगराव, उम्मीद पे दुनिया कायम है!

- (हिंदीतही चांगले चित्रपट असतात ह्यावर दृढ विश्वास असलेला) सोकाजी

रेवती's picture

30 Apr 2012 - 7:24 pm | रेवती

बरं झालं वेळ वाचला.

राजघराणं's picture

30 Apr 2012 - 7:45 pm | राजघराणं

विनोदी लेखनाला वाव मिळण्यासाठी माणूस असे काही चित्रपट सहन करू शकतो ?

दंडवत हो !

प्रभाकर पेठकर's picture

30 Apr 2012 - 8:20 pm | प्रभाकर पेठकर

तिथे रुमालाची चोळी आणि रुमालाची लुंगी घालून 'लैला लैला' करत मलिका शेरावत कवायत....

इथे तुम्हाला 'फाटक्या रुमालाची चोळी' असे म्हणायचे आहे का?

बोम्मन इराणीला अभिनय येत नाही ही माझ्यासाठी नविन माहिती आहे. असो. तरीपण तुमच्या मतांचा आदर आहेच.

एकूण परिक्षण आवडले आहे. अभिनंदन.

सोत्रि's picture

30 Apr 2012 - 10:15 pm | सोत्रि

बोम्मन इराणीला अभिनय येत नाही ही माझ्यासाठी नविन माहिती आहे.

सहमत!

- (फिरोज इराणी पासून सर्व इराण्यांचा पंखा) सोकाजी

चिगो's picture

30 Apr 2012 - 10:47 pm | चिगो

बोम्मन इराणीला अभिनय येत नाही ही माझ्यासाठी नविन माहिती आहे.

सहमत !!

फिरोज इराणी पासून सर्व इराण्यांचा पंखा

लैवेळा सहमत.. :-)

पराशेठ, खंग्री परीक्षण.. आम्हाला असे मस्त चित्रपट परीक्षण वारंवार वाचायला मिळावेत, ह्यासाठी धनलक्ष्मी तुमच्यावर कृपादृष्टी ठेवो, हीच शुभकामना.. (नाय म्हंजे, अशे पिक्चरं बघायची हिम्मत व्हायला पैसे वर यायला लागतात, म्हणून.. ;-))

फारएन्ड's picture

30 Apr 2012 - 8:53 pm | फारएन्ड

साडे चौथ्या मिनिटाला तिला बँकेतून लोन मिळते आणि सातव्या मिनिटाला त्यांचे नवीन ऑफिस सुरू देखील होते. >>>
ग्लंडमधले पोलिस हे मौजे बुद्रुकवाडीच्या साखर कारखान्याच्या वॉचमनपेक्षा देखील मूर्ख आणि सुस्त असल्याने>>>
हो उगाच कशाला तुमचे वाईट चिंतू मी ?>>>
अफाट वाक्ये आहेत अशी बरीच. खतरनाक! :)

बँक लोन देताना, ऑफिसचे रजिस्ट्रेशन होताना यांना कोणी लीगल स्टेटस विचारत नाही असे दिसते.

स्वाती दिनेश's picture

30 Apr 2012 - 9:00 pm | स्वाती दिनेश

मस्त परीक्षण रे,
स्वाती

चित्रगुप्त's picture

30 Apr 2012 - 9:04 pm | चित्रगुप्त

हे वाचून आता २३० + २३० + ४० + १०० = ६०० खर्चून, समिरा रेड्डिणीला बघायला जाणे प्राप्त आहे.

तीला प्रत्यक्षात एकदा बघायची वेळ आली होती हो. आमचे सामान आमच्याच फ्लाईटने आले नसल्याची तक्रार करायला गेलो तर तिथे ही सुद्धा "मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा हय" ;) म्हणत होती. त्यातून तिच्या कार्यक्रमात घालायचे कपडे असलेल्या ब्यागा आल्या नव्हत्या. त्या कोणत्या मार्गाने वेळेवर मिळतील म्हणून काळजीत होती. बर्याच कंटाळलेल्या आजूबाजूच्या लोकांना ती समीरा रेड्डी आहे हेही समजले नाही. आणि चित्रात दाखवतायत इतकी गोरी तर ती अज्याबात नाही.

शिल्पा ब's picture

1 May 2012 - 4:27 am | शिल्पा ब

काजोलसुद्धा (म्हणजे या म्हाद्याची खरी बैको) गोरी नै म्हणे!!

होय. काजोलही गोरीपान वगैरे नाही.

प्रभाकर पेठकर's picture

2 May 2012 - 1:14 am | प्रभाकर पेठकर

आणि प्रियांकाही गोरी नाही.

हीहीही
दबत दबत हसून
|| ती आधी काय कोकलते आहे तेच कळत नाही. "माझे पोट बिघडले आहे", किंवा "फुकट मिळते आहे म्हणून विमानात जास्ती खाऊ नकोस' असे काहीतरी ती बोलते आहे असे वाटते. अजय देवगणच्या चेहर्‍याकडे बघून, त्याला देखील असेच काहीसे वाटत असावेसे वाटते. काही काळाने मत ती "मी प्रेग्नंट आहे" असे कोकलते आहे हे लक्षात येते || यावर परिक्षणाबादप्रमाणे हास्यस्फोट झालाच
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=))
शेवटी काहीतरी दुसराच विनोद झाल्याने त्यावर जाहीर ठो ठो हसत असल्याचे नाटक करावे लागले ;-)

किसन शिंदे's picture

30 Apr 2012 - 9:58 pm | किसन शिंदे

बाकी गणपाशी सहमत. ;)

प्रियदर्शनसारखा माणूस असे टुकार सिनेमे काढायला लागलाय याचं खुप दु:ख होतंय. :(

शिल्पा ब's picture

30 Apr 2012 - 10:06 pm | शिल्पा ब

आणि म्हणुनच मी हिंदी पिच्चर बघत नाही.

पाषाणभेद's picture

30 Apr 2012 - 10:39 pm | पाषाणभेद

एकतर महादू देवगण हा अनाधिकृतपणे इंग्लंडमध्ये राहणारा तरूण असतो. म्हणजे तो बेकायदेशीर काम करत असतो. असे असतांना तेथील पोलीसांनी त्याला GPL दिली तर त्यांचे काय चुकले?

आणखी त्यात भर म्हणजे हा म्हाद्या तेथील पोलीसांचा 'गैरकानुनी राहाणार्‍यास हाकलणे' या रोष मनात ठेवतो अन बदले की आग जाळण्यासाठी परत तेथे जातो. पासपोर्ट, विमानतळाचे अधीकारी काय भांग खातात काय तेथले की अशा गुन्हेगाराचे ते स्वागत करतात? काहीतरीच.

हे म्हणजे चोर तो चोर वर शिरजोर असला प्रकार झाला.

सगळा बिनडोकपणाचा कळस आहे.

पैसा's picture

30 Apr 2012 - 10:47 pm | पैसा

चिरफाड आवडली.

संजय क्षीरसागर's picture

1 May 2012 - 12:50 am | संजय क्षीरसागर

पिक्चर बघण्याची हौस फिटली, प्रचंड धन्यवाद!

रमताराम's picture

1 May 2012 - 7:39 am | रमताराम

अरे चार दिवस तरी धंदा करू देत बिचार्‍यांना, लगेच दुकान बंद करायला बसला आहेस* ते

ती आधी काय कोकलते आहे तेच कळत नाही. "माझे पोट बिघडले आहे", किंवा "फुकट मिळते आहे म्हणून विमानात जास्ती खाऊ नकोस' असे काहीतरी ती बोलते आहे असे वाटते. अजय देवगणच्या चेहर्‍याकडे बघून, त्याला देखील असेच काहीसे वाटत असावेसे वाटते. काही काळाने मत ती "मी प्रेग्नंट आहे" असे कोकलते आहे हे लक्षात येते.
=)). हाण्ण तिज्यायला.
मला ती 'मला भूक लागली आहे. दोन घास पोटाला दे ना' असं म्हणते आहे असा भास झाला होता.

एका कचरापेटीत पैशाची ब्याग टाकण्याचा शीन - स्पीडवरून ढापण्याचा क्षीण प्रयत्न- लै इनोदी हाय राव. स्पीड मधे ती बॅग कचरापेटीच्या खालच्या बाजूने - ती एका भुयारी मार्गावर असते याचा फायदा घेऊन - काढली जाते. हिते साला डायरेक खालच्या बाजूने बाम्ब लावून ती थेट खालच्या गटारात पाडली जाते. हवेत न उडता खालच्या बाजूला पडेल असा कन्ट्रोल्ड एक्स्प्लोजनचा फंडा हे ध्यान कोणाकडून शिकलं याचा उल्लेख चित्रपटात नाही...(पुराणा कुराणात तर नाहीच, पण नासाही याबाबत मौन राखून आहे.) शिवाय हे ध्यान पिच्चरभर वैट्ट माजुरी चेहरा करून बोम्मनला फोन करण्यापलिकडे काहीच करत नाही. ती बिचारी समीरा मात्र थोडी स्टंटबाजी करून काहीतरी हालचाल करण्याचा प्रयत्न तरी करते. शिवाय 'आख्खे लंडन उडवण्याइतकं एक्स्प्लोजिव'** विकत घेण्यासाठी जे पैसे तो मोजतो त्या पेक्षा मागितलेली खंडणी 'दहा मिलियन युरोज' जास्त असतात का कमी. आमच्या हिशेबाने जास्त असावेत. मग जल्ला हैत ते पैसे बाम्ब इकत घेण्यात वेष्ट करन्यापरिस गुमान तेच पैशे घेऊन सुशेगात का न्हाई र्‍हात न्हाईत हे लोक?

* हल्ली जगात काय बोल्लं जात ह्याच्यापेक्षा मिपावर काय बोल्लं जातं यावर लक्ष ठेवून असतात सगळे शेलेब्रिटी, असं कायसंस परागुरू आपल्या एका व्याख्यानात बोल्ले होते त्यावरून म्हंतोय.
** आसं ते इकनार अंडरवर्ल्ड वालं बेनं म्हनतंय न्हवं का.

ता.क. पर्‍याचं गणित कच्चं आहे असं मी म्हणतो ते का ते सांगतो. एका तिकिटात पाच नाही, सहा चित्रपट बघा. अहो म्हादेव देवगण परत्येक फोन घुमवतं नि लगेच तो फोन फेकून देतं. यावरून 'ए वेनस्डे' आठवलाय नाय का? तिथला नसिर बिच्चारा गरीब असतो (फक्त दोन बाँब इतकेच एक्स्प्लोजिव विकत घेऊ शकतो तो) त्यामुळे तो फक्त सिमकार्ड बदलत असतो, हा लंटनमधे असतो त्यामुळे त्याच्याकडे वेष्टं करायला जास्त पैशे असल्यानं आख्खा फोनच फेकून देतं हे.

पैसा's picture

1 May 2012 - 8:34 am | पैसा

म्हणजे हा पिक्चर बघण्याचं पाप तुम्ही केलंत असं कबूल करताय करताय म्हणा की!

फारएन्ड's picture

1 May 2012 - 10:59 am | फारएन्ड

ही स्टोरी वाचून थोडी डेन्झेल वॉशिंग्टनच्या अनस्टॉपेबल चीही आठवण होत आहे. कदाचित ७ चित्रपट होतील एका तिकीटात मग. चांगले डील आहे.

हि आयडिया जेफ्री आर्चर च्या फॉल्स इम्प्रेशन या पुस्तकावरून उचलली आहे. त्यातील व्हीलानिणबाई असेच करत असतात.

प्यारे१'s picture

1 May 2012 - 7:21 pm | प्यारे१

ह्या चित्रपटात काय आनि कोन 'व्हर्जिनल' (अशोक सराफ उवाच इन नवरा माझा नवसाचा) हाय काय????

- ओरिगिनल ;) प्यारे

श्रीरंग's picture

1 May 2012 - 8:22 pm | श्रीरंग

तुमची परिक्षणं वाचायला मिळावीत म्हणून तरी असले चित्रपट येत राहोत...
शेवटचा परिच्छेद तर वरचा क्लास!!

सुहास झेले's picture

1 May 2012 - 10:06 pm | सुहास झेले

हा हा हा ... लैच. :) :)