------
भाग १:
------
प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......!
बर्फ़च घेऊन जणु बाहेर वाहतोय सुसाट वारा !
सूर्यकिरणांनी चकाकतोय दवबिंदू... की पारा?
निसर्गाने उघडलाय बघ! सौंदर्याचा गाभारा....
माझ्या हातात तुझा हात उबदार जरा...
तुझ्यासवे चालत चालत सरावा जन्म सारा....
प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......!
तुझ्यासह घालवलेला क्षण क्षण न्यारा....!
------
भाग २:
------
प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......!
झोपावे जरा, अजून कामाचा शीण नाही गेला सारा....
पहाटे पहाटे पेपरवाल्याने बेल वाजवली कराकरा..
सकाळी सकाळी "ही" का आवरतेय आज घरातला पसारा?
आज रविवार! पुन्हा दुलई ओढून साखरझोप घ्यावी जरा.
मिळेल का आज अंथरुणातच गरमागरम चहा जरा?
"अहो, उठा! .... इतका आळस नाही बरा.
नळ जाण्याच्या आत अंघोळ करा."
प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा...... !
आता उठा राव लवकर.. चढण्याआधी "हिचा" पारा.....!!
प्रतिक्रिया
23 Jan 2012 - 11:54 pm | गणेशा
मस्त ..
भाग १ अप्रतिम
24 Jan 2012 - 12:18 am | अत्रुप्त आत्मा
ठिक आहे काव्य....हां...पण मला कुणाची अठवण होतीये ब्बरं..? अरे..हो..! अठवलं...>>>
<<<कॉलिंग चतुर चाणक्य .... हॅल्लो...हॅल्लो कम फास्ट... ब्रेक-फास्ट फॉर यू ;-)
24 Jan 2012 - 11:59 am | प्रभाकर पेठकर
हा नविन काव्यप्रकार आवडला.
भाग १ मस्त जमून आला आहे. भाग दोन - विरोधाभासाने खुलला आहे.
अभिनंदन.
24 Jan 2012 - 12:21 pm | फिझा
मस्तच !!! भाग १ आणि २ ,,,खुपच छान जमलि आहे कविता !!!
24 Jan 2012 - 12:21 pm | फिझा
मस्तच !!! भाग १ आणि २ ,,,खुपच छान जमलि आहे कविता !!!
24 Jan 2012 - 12:26 pm | श्रीरंग
मस्त रे प्रशांत!
भाग १ सुंदरच.
भाग २ मधील जरा-जरा आणी पारा-पारा ही यमके जरा विचित्र वाटली. पण बाकी उत्तमच.
:)
25 Jan 2012 - 1:21 pm | प्रशांत उदय मनोहर
हो. भाग २ मधली यमके मलाही खटकली आहे. पण चालायचंच.
24 Jan 2012 - 12:31 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
छान
24 Jan 2012 - 7:24 pm | पक पक पक
भन्नाट आहे....
25 Jan 2012 - 8:01 am | मदनबाण
मस्त ! :)
26 Jan 2012 - 12:27 pm | पैसा
या प्रकाराला 'दोनुली' असा शब्द मला वाटतं विनीता देशपांडे यांनी सांगितला होता.
26 Jan 2012 - 12:41 pm | सुहास झेले
मस्त... दोन्ही भाग आवडले :) :)