सी वर्ल्ड, सॅन डिएगो सहल

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जनातलं, मनातलं
6 Jun 2008 - 11:02 pm

नुकतीच सॅन डिएगो या अमेरिकेच्या नैऋत्य टोकावरील सुंदर शहरास भेट दिली. तेथील समुद्रकिनारे फिरलो व सी वर्ल्ड ला भेट दिली. या सहलीतील काही चित्रे मिपाकर रसिकांसाठी देत आहे.
शामू१
शामू - द किलर वेल
शामू२
आणखी एकदा शामू
शामू३
शामूचे कुटुंब
शामू हा किलर वेल (देवमासा) दिवसाला साधारण सरासरी १५० ते २५० पौंड अन्न (मासे) खातो :) सी वर्ल्ड मध्ये दररोज त्याचे विविध खेळ बघायला मिळतात. शामू व त्याचे प्रशिक्षक यांच्यातल्या प्रेमाचे, त्याच्या प्रशिक्षणाचे नेहमीच कौतुकमिश्रित आश्चर्य, अप्रूप वाटत राहते.
समुद्रशार्दुल
सी लायन (समुद्रशार्दुल) आणि त्याचा एक मित्र :)
सी लायन, ऑटर आणि वॉलरस यांच्यातला फरक मला बरेचदा चटकन कळत नाही. वॉलरसला हत्तीसारखे (हत्तीएवढे नाही) सुळे असतात, त्यामुळे तो जरा ओळखता तरी येतो. ऑटर हा तुलनेने सगळ्यात लहान असावा. खालच्या चित्रात (बहुदा) ऑटरच आहे :)
ऑटर
रोहित१
हे आहेत फ्लेमिंगो (रोहित पक्षी?) कोलंब्या खाऊन खाऊन यांच्या रंग असा लालगुलाबी होतो म्हणे :) मुंबईला शिवडीच्या खाडीवर हे पक्षी दिसतात व त्यांच्यासंबंधीच्या 'मोसमी' बातम्याही वर्तमानपत्रांमध्ये वाचावयास मिळतात.
रोहित२

प्रवासदेशांतरसमाजजीवनमानराहणीभूगोलमौजमजाआस्वाद

प्रतिक्रिया

पक्या's picture

6 Jun 2008 - 11:05 pm | पक्या

बेसनलाडू,
एकही चित्र दिसत नाही. शामू बघायला आवडला असता. काय प्रॉब्लेम झालाय?

बेसनलाडू's picture

6 Jun 2008 - 11:05 pm | बेसनलाडू

चित्रे वर न दिसल्यास येथे पाहता येतील.
(दुवादार)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

6 Jun 2008 - 11:07 pm | विसोबा खेचर

पिकासावरील चित्रांचा बर्‍याचदा प्रॉब्लेमच होतो. फ्लिकरचा कधी होत नाही!

तात्या.

भाग्यश्री's picture

6 Jun 2008 - 11:14 pm | भाग्यश्री

बेला, फ्लिकर वरूनच टाक फोटोज.. सोप्पं आहे एकदम..पिकासा फार त्रास देते...
बाकी सिवर्ल्ड अफलातून धमाल जागा आहे! आख्खा दिवस कसा जातो कळत पण नाहि.. तुमचे फोटोज दिसले की मी माझे पण थोडे इथेच टाकीन, चालेल ना?

http://bhagyashreee.blogspot.com/

प्रियाली's picture

6 Jun 2008 - 11:40 pm | प्रियाली

फ्लेमिंगो (रोहित पक्षी?) कोलंब्या खाऊन खाऊन यांच्या रंग असा लालगुलाबी होतो म्हणे

बरं झालं मी फ्लेमिंगो नाही. ;)

कोलबेर's picture

6 Jun 2008 - 11:58 pm | कोलबेर

खरंय...नाही तर तुम्ही 'रेडनेक' झाला असतात! :)

व्यंकट's picture

6 Jun 2008 - 11:52 pm | व्यंकट

माझं आवडतं गाव.... सोडायला लागलं नोकरी मुळे.

व्यंकट

कोलबेर's picture

6 Jun 2008 - 11:56 pm | कोलबेर

..नक्की कोणता? आम्ही ओरलँडोच्या सी वर्ल्ड मध्ये गेलो असताना तिथल्या देव माश्याला देखिल शामू शामूच करत होते. ओरिजीनल शामू कोणता सॅन डिएगोचा की ओरलँडोचा?

अवांतर : मलाही चित्रे दिसली नाहीत दुव्यावर जाऊन बघतो..

भाग्यश्री's picture

7 Jun 2008 - 12:36 am | भाग्यश्री

सॉरी बेला.. मी तुझ्या लेखात आगंतुकपणा करतीय.. तुझे फोटो पाहून, हे पण टाकावेसे वाटले.. आणी तेव्हढ्यासाठी कुठे नविन नोड उघडा.. म्हणून इथेच.. आय होप, चालेल तुला..

शामूचे फोटो.. ( माझ्यामते इथे काम करणार्या सगळ्याच किलर व्हेल्सना शामू म्हणतात.. चु.भु.द्या.घ्या..)
शामू आणि इन्स्ट्रक्टर यांच्यातले नाते फार मस्त आहे.. कसं काय कम्युनिकेट करतात माहीत नाही.. 'किलर' व्हेल असून, शामू अगदी छान माणसाळलेले आहेत.. अर्थात इन्स्ट्रक्टरवर हल्ला करण्याचे १-२ प्रसंग झालेत.. रेअर आहे ते..)

फ्लेमिंगो.. खूप सुंदर रंग.. आणि त्यांच्या आसपास अतिशय घाण वास.. का कुणास ठाऊक..

ऑटर्स.. खूप बेढब प्राणी.. पण मस्त ओरडतात.. :) आणि सदा भुकेले! ओरडून ओरडून मासे मागत असतात.. आणि प्रेक्षकांनी फेकलेले मासे झेलतात!

शार्क!! :SS

सगळ्यात सुखद धक्का!! पोलर बेअर !! हे मला माझ्या आयुष्यात पाहायला मिळेल असे वाटले नव्हते.. पण सीवर्ल्ड च्या वाईल्ड आर्क्टीक मधे ऍक्चुअल पोल बेअर आहे.. एकटांच आहे बिचारा.. भयंकर बोअर झाला होता तो बेअर.... पण क्युट होता!

अजुन काही स्नॅप्स इथे पाहायला मिळतील..

शितल's picture

7 Jun 2008 - 12:32 am | शितल

फोटो छान आहेत , फुला॑चे कलर ही मस्त.

शितल's picture

7 Jun 2008 - 12:37 am | शितल

भाग्यश्री तुझे फोटो ही एकदम सह्ही आहेत.

इनोबा म्हणे's picture

7 Jun 2008 - 12:47 am | इनोबा म्हणे

बेला आणि भाग्यश्री...तुम्हा दोघांचेही फोटू लई आवडले.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jun 2008 - 8:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेला आणि भाग्यश्री...तुम्हा दोघांचेही फोटू लई आवडले.

भाग्यश्री's picture

7 Jun 2008 - 5:13 am | भाग्यश्री

धन्यवाद...

यशोधरा's picture

7 Jun 2008 - 9:30 am | यशोधरा

बेसनलाडू आणि भाग्यश्री, दोघांनी काढलेले फोटो मस्तच आहेत.
भाग्यश्री, ऑटर्सनाही भयानक वास येतो!!

झकासराव's picture

7 Jun 2008 - 8:22 pm | झकासराव

दोघानीहि काढलेले फोटो मस्तच. :)
फ्लेमिंगोचे फोटो खुपच छान आहेत.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao