नमस्कार मंडळी,
आज ८ नोव्हेंबर! उभ्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत असलेल्या पु.ल.देशपांडे उर्फ भाईकाका यांचा ९१वा जन्मदिवस. आपल्या विनोदी साहित्याने संपुर्ण महाराष्ट्राला खळखळून हसायला लावणारा हा अवलिया!!
चि.वि.जोशी, आचार्य अत्रे यांसारख्या दिग्गज विनोदी साहित्यीकांच्या साक्षीने आपल्या विनोदी लिखानाची सुरूवात केलेल्या पुलंची साहित्य संपदा उत्तरोत्तर आणखीनच बहरत गेली.
हरितात्या, नारायण, सखाराम गटणे, बोलट, अंतू बर्वा त्यांनी रेखाटलेल्या या व्यक्तीरेखा मराठी साहित्य विश्वात अजरामर झाल्या. बटाट्याची चाळ, नसती उठाठेव, खोगीरभरती या आणी अशा अनेक विनोदी पुस्तकांमुळे अनेकांना वाचनाची गोडी निर्माण झाली.
विनोदी लेखन हा पुलंच्या एकूण साहित्यीक लिखानाचा आत्मा होता.
पुलंच विनोदी लेखन वाचून वाचून आपण लहानाचे मोठे झालो आहोत. तर विनोद हा ज्यांच्या स्वभावाचा एक पैलु होता अशा या भाईकाकांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठीच हा सगळा प्रपंच!!
इथल्या प्रत्येक मिपाकराने आपल्या जीवनात घडलेला एखादा विनोदी किस्सा इथे सादर करून त्यात थोडा हातभार घालावा.
सुरूवात माझ्यापासूनच करतो..
विद्यार्थीदशेत असतानाचा हा किस्सा. ८वीच शैक्षणिक वर्ष सुरू होऊन ३-४ महिने उलटले होते आणी अशातच एक दिवस शाळेला खबर मिळाली, १५ दिवसानंतर तसापणी अधिकारी शाळेला भेट देणार होते.
झालं! मुख्यध्यापकांबरोबरच शाळेतल्या प्रत्येक वर्गशिक्षेकाची त्यांना खुश करणासाठीची जोरदार तयारी सुरू झाली. साहजिकच आमचा वर्गही त्याला अपवाद नव्हता. मग सर्व विद्यार्थ्यांच्या वर्गशिक्षकेसोबत झालेल्या चर्चेतून असा निर्णय झाला कि, तपासणी अधिकारी आपल्या वर्गात येताच विद्यार्थ्यांमधल्या एकाने उठून मोठ्याने स्टँड अपऽऽऽ असे म्हणायचे आणी मग असे म्हटल्यानंतर बाकिच्या संपुर्ण वर्गाने उठून त्या अधिकार्याला वंदन करायचे आणी मग खुद्द वर्गशिक्षकाने सिट डाऊन असे म्हणायचे.
....आणी हो नाही करता करता, वर्गातल्या हुशार विद्यार्थ्यांच्या गटातलाच एक म्हणून माझी या स्टँड अप म्हणण्याच्या कामासाठी नेमणूक झाली. रोजची रंगीत तालीमही सुरू झाली. वर्गशिक्षिका वा दुसर्या तासाचे शिक्षक जेव्हा वर्गावर येत असत तेव्हा सर्वात आधी उठत खच्चून, अगदी मोठ्या आवाजात स्टँड अपऽऽऽऽ असं मी म्हणायला लागलो.
सुरूवातीला खुप गम्मत वाटत होती. वर्गातल्या तेव्हढ्या एकाच क्षणाला मोठ्ठ्याने ओरडायची परवानगी खुद्द वर्गशिक्षेकेने दिली होती ना मग!!
आणी तो काळा दिवस उजाडला. एका एका वर्गात फेरी मारत शेवटी तपासणी अधिकारी आमच्या वर्गात आले, मी आपला सवयीनुसार उठलो आणी त्यांच्यावर आणखी इंप्रेशन जमवण्याठी खच्चून ओरडलो....
सिट डाऊनऽऽऽऽऽऽ!!!!
पुढचं काही लिहित नाही तुम्ही कळून चुकला असाल, काय झालं असेल ते.!
अंवातर ::: आज सकाळीच प्रशांतबरोबर झालेल्या चर्चेतून ह्या धाग्याची कल्पना निघाली.
प्रतिक्रिया
8 Nov 2011 - 6:01 pm | किचेन
'जे कारंजे गंजले, तसी म्हण्जे जो आपुले'.....हे अस आहे हे मला लहानपणी वाटत होत!
मोठी झाल्यावर कळल कि पुलंनाही ते तसाच आहे अस वाटत होत.
8 Nov 2011 - 6:05 pm | गवि
एका मित्राच्या घरी पहिल्यांदाच गेलो होतो. त्याच्या आईशी ओळख करुन घेतली.. गप्पा मारत उभा होतो.. दाराजवळच टीव्ही होता. मी टीव्हीच्या पुढे पण घरात आतल्या बाजूला तोंड करुन उभा.
टीव्ही चालूच होता. त्यात एका कलाकाराचा चेहरा दिसला.. तो कलाकार भारतात लोकप्रिय झाला होता पण नुकतंच त्याने भारताविषयी अनुदार उद्गार काढले होते..
त्या कलाकाराचा चेहरा टीव्हीत दिसताच मी मित्राकडे पहात टीव्हीच्या दिशेने मागे अंगुलिनिर्देश करुन ओरडलो, "हा एक नंबरचा हरामखोर मनुष्य आहे",
आणि मग यथावकाश मागे वळून पाहिलं तर मित्राचे बाबा दारातून आत येतायेता माझं बोट त्यांच्या पोटात घुसलं होतं.. कधीही न बघितलेला आपल्या मुलाचा पोरगेला मित्र आपल्याच घरात उभा राहून बोट ठेवून आपल्याला आपल्याच बायकोपोरासमोर हरामखोर म्हणतोय या प्रथमदर्शनाने ते चांगलेच हादरलेले दिसत होते.. टाईमिंग फार वाईट्ट जमून आलं होतं..
नंतर त्यांच्याकडे फार कधी गेलो नाही.. मित्राला बाहेरच भेटत असे.
8 Nov 2011 - 6:23 pm | धमाल मुलगा
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
काय फोटो काढण्यालायक चेहरा झाला असेल ना......सगळ्यांचेच
8 Nov 2011 - 7:05 pm | मोहनराव
हॅ हॅ हॅ!!
8 Nov 2011 - 7:07 pm | धमाल मुलगा
च्यायला विनोदी किस्सा = फजिती चालत असेल तर http://www.misalpav.com/node/1409 इथे आहेत बर्याच फजित्या. :)
8 Nov 2011 - 8:45 pm | विकास
कदाचीत आधी देखील लिहीला असेन...
नववीत असताना, आमचे भुगोलाचे मास्तर विविध पिकां-झाडांबद्दल आणि त्यांच्या उपयुक्ततेबद्दल शिकवत होते. त्यात एरंडाचा विषय आला...
मास्तरांनी प्रश्न विचारला, "एरंड्याच्या तेलाचा ..... उपयोग काय?"
तेंव्हा मी माझ्या बाकावरील बाजूच्या मित्राशी बोलत असल्याने लक्ष नव्हते. पण हा प्रश्न अर्धवट ऐकला आणि हात वर केला.
मास्तरः सांग उत्तर
मी: पोट साफ करायला
मास्तरः ताबडतोब वर्गातून चालता हो!
मी: (खरेच काय चुकले ते न समजल्याने गोंधळून), अहो पण खरेच असतो तसा उपयोग, अपचन वगैरे झाल्यास.
मास्तर: मी कधी नाही म्हणले? पण माझा प्रश्न एरंड्याच्या तेलाचा "औद्योगीक" उपयोग काय असा होता?
मी: अहो मी "औद्योगीक"च्या ऐवजी चुकून "औषधी" ऐकले...
मास्तरः म्हणूनच म्हणतो, वर्गात लक्ष नव्हते, बाहेर जाऊन मुकाट्याने उभा रहा. :( ;)
8 Nov 2011 - 9:51 pm | यकु
सध्या ट्रान्सीक्रप्शन करण्याइतपत सोय नाहीय राव.. स्वारी.
नाहीतर पुलंची बटाट्याच्या चाळीचं सार असणारी, एक अनोखा प्रयोग असणारी आणि फारशी अंतर्जालावर न दिसणारी एक संगीतिका टाकणार होतो.
टिपः कृपया या संगीतिकेत पुलंनी कोणकोणत्या रागांचा वापर केला आहे हे संगीतातल्या कुणा दर्दीने सांगितलं तर बरं होईल.
तशीही ऐकूनच, पाहूनच जास्त मजा येईल.. त्यामुळं ऐका.
8 Nov 2011 - 9:22 pm | रेवती
बाबांचे मावसभाऊ श्रीरामकाका आणि त्यांची मुलगी एका परिक्षेसाठी पुण्यात येणार होते.
भाद्रपद होता. गणपतीची तयारी, रस्त्यावर असलेली गर्दी, लाऊडस्पिकर्सचे आवाज यामुळे आई वैतागलेली होती.
आधीच दम्याचा त्रास, त्यातून गणपतीत गुलाल उधळला की हिला दम लागायचा. काम सुचायचं नाही.
पाहुण्यांनी कळवलेल्या वेळेपेक्षा पोहोचायला उशीर झाला होता (गर्दीमुळे). घरात आवराआवर करून आई जरा टेकली आणि तिचे नेहमीचे वाक्य सुस्कारा टाकून म्हटले "देवा, श्रीरामा, मला वाचव बाबा या (दम्याच्या) त्रासापासून!" त्याचवेळी श्रीरामकाका आणि ताई दारात उभे होते. त्यांचा चेहरा गोरामोरा झाला होता. आईलाही फार अवघडल्यासारखं वाटलं. आम्हाला हसण्यासाठी आतल्या खोलीत पळावं लागलं. नंतर देवाचा धावा करण्यासाठी आईनं "आई अंबाबाई मला वाचव." असा बदल केला.
12 Nov 2011 - 1:04 pm | पाऊसवेडा
आम्ही मित्रमंडळी जमून एकदा समुद्रकिनारी क्रिकेट खेळत होतो. त्यात प्रभात म्हणून आमचा एक उत्तर-भारतीय मित्र होता. अतिशय हजरजबाबी. त्याच्या संघाची फलंदाजी सुरू होती आणि आमची गोलंदाजी. यष्टिरक्षकापासून काही अंतरावर तो बसला होता आणि तोंडाची टकळि अव्याहत चालू होती.
तेव्ह्ढ्यात एका गोलंदाजाच्या चेंडूवर एक फलंदाज चकला.
लगेच प्रभात त्याला म्हणाला, "कोई बात नही. परसो सचिनभी ऐसेही आउट हुआ था".
यष्टिरक्षकाने शंका काढली, "पर यह आउट किधर हुआ है ?"
लग्गेच प्रभात म्हणाला, "हां. तो यह भी किधर सचिन है ?"
पुढची पाचेक मिनिटं आम्ही रेतीवर गडाबडा लोळत होतो.