पु.ल एक आठवण!
नमस्कार मंडळी,
आज ८ नोव्हेंबर! उभ्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत असलेल्या पु.ल.देशपांडे उर्फ भाईकाका यांचा ९१वा जन्मदिवस. आपल्या विनोदी साहित्याने संपुर्ण महाराष्ट्राला खळखळून हसायला लावणारा हा अवलिया!!
चि.वि.जोशी, आचार्य अत्रे यांसारख्या दिग्गज विनोदी साहित्यीकांच्या साक्षीने आपल्या विनोदी लिखानाची सुरूवात केलेल्या पुलंची साहित्य संपदा उत्तरोत्तर आणखीनच बहरत गेली.
हरितात्या, नारायण, सखाराम गटणे, बोलट, अंतू बर्वा त्यांनी रेखाटलेल्या या व्यक्तीरेखा मराठी साहित्य विश्वात अजरामर झाल्या. बटाट्याची चाळ, नसती उठाठेव, खोगीरभरती या आणी अशा अनेक विनोदी पुस्तकांमुळे अनेकांना वाचनाची गोडी निर्माण झाली.
विनोदी लेखन हा पुलंच्या एकूण साहित्यीक लिखानाचा आत्मा होता.
पुलंच विनोदी लेखन वाचून वाचून आपण लहानाचे मोठे झालो आहोत. तर विनोद हा ज्यांच्या स्वभावाचा एक पैलु होता अशा या भाईकाकांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठीच हा सगळा प्रपंच!!
इथल्या प्रत्येक मिपाकराने आपल्या जीवनात घडलेला एखादा विनोदी किस्सा इथे सादर करून त्यात थोडा हातभार घालावा.
सुरूवात माझ्यापासूनच करतो..
विद्यार्थीदशेत असतानाचा हा किस्सा. ८वीच शैक्षणिक वर्ष सुरू होऊन ३-४ महिने उलटले होते आणी अशातच एक दिवस शाळेला खबर मिळाली, १५ दिवसानंतर तसापणी अधिकारी शाळेला भेट देणार होते.
झालं! मुख्यध्यापकांबरोबरच शाळेतल्या प्रत्येक वर्गशिक्षेकाची त्यांना खुश करणासाठीची जोरदार तयारी सुरू झाली. साहजिकच आमचा वर्गही त्याला अपवाद नव्हता. मग सर्व विद्यार्थ्यांच्या वर्गशिक्षकेसोबत झालेल्या चर्चेतून असा निर्णय झाला कि, तपासणी अधिकारी आपल्या वर्गात येताच विद्यार्थ्यांमधल्या एकाने उठून मोठ्याने स्टँड अपऽऽऽ असे म्हणायचे आणी मग असे म्हटल्यानंतर बाकिच्या संपुर्ण वर्गाने उठून त्या अधिकार्याला वंदन करायचे आणी मग खुद्द वर्गशिक्षकाने सिट डाऊन असे म्हणायचे.
....आणी हो नाही करता करता, वर्गातल्या हुशार विद्यार्थ्यांच्या गटातलाच एक म्हणून माझी या स्टँड अप म्हणण्याच्या कामासाठी नेमणूक झाली. रोजची रंगीत तालीमही सुरू झाली. वर्गशिक्षिका वा दुसर्या तासाचे शिक्षक जेव्हा वर्गावर येत असत तेव्हा सर्वात आधी उठत खच्चून, अगदी मोठ्या आवाजात स्टँड अपऽऽऽऽ असं मी म्हणायला लागलो.
सुरूवातीला खुप गम्मत वाटत होती. वर्गातल्या तेव्हढ्या एकाच क्षणाला मोठ्ठ्याने ओरडायची परवानगी खुद्द वर्गशिक्षेकेने दिली होती ना मग!!
आणी तो काळा दिवस उजाडला. एका एका वर्गात फेरी मारत शेवटी तपासणी अधिकारी आमच्या वर्गात आले, मी आपला सवयीनुसार उठलो आणी त्यांच्यावर आणखी इंप्रेशन जमवण्याठी खच्चून ओरडलो....
सिट डाऊनऽऽऽऽऽऽ!!!!
पुढचं काही लिहित नाही तुम्ही कळून चुकला असाल, काय झालं असेल ते.!
अंवातर ::: आज सकाळीच प्रशांतबरोबर झालेल्या चर्चेतून ह्या धाग्याची कल्पना निघाली.
प्रतिक्रिया
'जे कारंजे गंजले, तसी म्हण्जे
एका मित्राच्या घरी
खल्ल्लास्स!
हॅ हॅ हॅ!!
अवांतर -
एक किस्सा
रुमाल टाकून ठेवतो.सविस्तर
बाबांचे मावसभाऊ श्रीरामकाका
क्रिकेट