मित्र/मैत्रिणींनो,
ज्यांनी या धाग्यावरच्या कविता वाचल्या आणि त्यातल्या तीन निवडल्या त्यांनी केलेले विश्लेषण खाली देत आहे. अगोदर पहिल्या तीन कविता.
सर्वांचे अभिनंदन !
१] पाहता खोल डोहात मोती जरी मिळाले - लिमाउजेट
२] आजही तू आला नाहीस - अभिजीत राजवाडे
३-अ} सागरा तव थांग नाही - बहुगुणी
[बहुगुणी यांनी ही कविता वाहिदा यांच्या कवितेचा अनुवाद आहे, असं म्हटलं आहे. पण ही स्वतंत्र कविताच वाटते.]
३-अ} विकाल यांची 'ऐलतीरी करूण किती'
नमस्कार !
कविता निवडायचं काम खरंच खूप अवघड आहे. कारण जवळजवळ सगळ्याच कविता कविता म्हणून चांगल्याच आहेत. पण चित्रावरून लिहिलेली कविता हा निकष लावून मी खालील तीन कविता निवडल्या आहेत.
१] पाहता खोल डोहात मोती जरी मिळाले - लिमाउजेट
२] आजही तू आला नाहीस - अभिजीत राजवाडे
३] सागरा तव थांग नाही - बहुगुणी
[बहुगुणी यांनी ही कविता वाहिदा यांच्या कवितेचा अनुवाद आहे, असं म्हटलं आहे. पण ही स्वतंत्र कविताच वाटते.]
बक्षिस विभागून द्यायचे असेल तर विकाल यांची 'ऐलतीरी करूण किती' ही देखील तिसऱ्या क्रमांकावर घेता येईल.
गवि यांची चारोळी सुंदर आहे, पण शेवटच्या ओळीत खळखळा वाचाळणारा किनारा हे चित्राशी विसंगत आहे.
तसाच वेगळेपणा मनीषा, शब्दमेघ यांच्या कविता वाचताना दिसला.
[उसळत्या तव लाटा -- किरणांची मिरवीत नक्षी |
रोखती मज आता -- मी बंदीवान या किनारी ||
लाटांवर सळसळतो
गर्द केशरी वर्ख
या मनीषाच्या कवितांतल्या ओळी]
नजरेच्या आकाशावरती थरथरलेला भावकल्लोळ ...
भिजलेल्या समुद्रावरती, सैरभैर विचारांची टोळ ...
या शब्दमेघ यांच्या कवितेतील ओळीत टोळ अगदीच ऑड मॅन आऊट वाटतोय. बाकी कविता सुंदर आहे. पण अशा एखाद्या शब्दाने ती जुळवलेली वाटते, भाव कमी होतात असं मला जाणवलं.
शानबा यांची चार ओळींची कविता अगदी सहजपणे आलेली आहे.
ज्ञानेश यांची रचना अप्रतिम आहे, पण चित्राचा विचार करता त्यांच्या रचनेतील तळ्याचा उल्लेख वेगळा वाटला.
अभिजीत यांची दुसरी कविता चांगली आहे, पण ही जास्त समर्पक वाटली चित्रासाठी.
५०फक्त यांची कल्पना नवी आणि चांगली आहे. कविताही नवीन प्रयत्न म्हणून चांगली आहे.
पेठकरांनी लिहिलेल्या दोन्ही कविता उल्लेखनीय आहेत, त्यातही मुलीच्या मनातले विचार चांगले उतरले आहेत.
या स्पर्धेच्या निमित्तानं मला सुंदर कविता वाचायला मिळाल्या, परिक्षण आणि समीक्षा करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल
धन्यवाद !
सर्वांच्या वतीने मी परिक्षकांचे आभार मानतो.
लिमाउजेट यांनी बक्षिस स्विकारण्यासाठी कुठे भेटायचे हे सांगितल्यास तसे करता येईल. त्यांना पाहिजे असल्यास ते बक्षिस पोस्टानेही पाठवता येईल.
हे मी माझ्या पुण्यातील उत्साही/अनुत्साही मित्रांवर सोडतो. :-)
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
22 Oct 2011 - 4:51 pm | प्रचेतस
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
इतरांच्याही कविता सुरेखच आहेत.
22 Oct 2011 - 4:58 pm | पैसा
विजेत्यांबरोबरच भाग घेणार्या सर्वांचे अभिनंदन!
22 Oct 2011 - 11:21 pm | जाई.
+१
22 Oct 2011 - 5:13 pm | मनीषा
सर्व विजेत्यांचे अभिनंदन !!
फोटो बघून कविता करण्याची कल्पना खरोखरच अभिनव ...
22 Oct 2011 - 5:14 pm | धन्या
सर्व विजेत्यांचे अभिनंदन !!!
( हल्ली र ल र आणि ट ला ट जोडावेसेच वाटत नाहीत. नाहीतर कदाचित ओझरता का होईना पण आमचाही उल्लेख इथे झाला असता. ;) )
1 Nov 2011 - 12:42 pm | वपाडाव
संसाराचा रहाट ओढण्याआधीच हे टाळ वाजविण्याचे विचार ऐकुन मनात कल्लोळ निर्माण न व्हावा तर नवलच....
22 Oct 2011 - 7:44 pm | मन१
हार्दिक अभिनंदन...
22 Oct 2011 - 10:16 pm | वाहीदा
सर्वांचे हार्दिक अभिनंदन !!
23 Oct 2011 - 10:24 am | पिंगू
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.. बाकी पार्टी कोण देतय.. ;)
- पिंगू
23 Oct 2011 - 6:46 pm | बहुगुणी
मी काल धनाजीरावांच्या प्रतिक्रियेनंतर माझी प्रतिक्रिया लिहिली होती ती somehow गायब झाली आहे (धनाजीरावांचा यक्कु यच्टीयमेल शिकत असल्याने असं झालं असावं का) ;-) असो.
प्रथम सर्वच सन्मानितांचं अभिनंदन. मी लिहिलेल्या ओळी या केवळ वाहीदाच्या सुंदर शब्दांचं मराठी रुपडं होत्या, त्या परीक्षकांना आणि जयंतरावांना आवडल्या, याचं कारण वाहीदाच्या मूळ उर्दू-मिश्रीत हिंदी शब्दांमध्ये (आणि अर्थातच जयंतरावांच्या मूळ प्रकाशचित्रात) ते सामर्थ्य आहे म्हणूनच. तेंव्हा खरा मान त्या दोघांचा. मी केवळ अर्थ'वाही'.
जाता जाता, व्यक्तिशः मला गगनविहारींच्या ओळीही आवडल्या.
23 Oct 2011 - 8:00 pm | पैसा
तुमची प्रतिक्रिया गायब होण्यात संपादकांचा काही हात नाही हो! :)
23 Oct 2011 - 11:08 pm | कवितानागेश
अरेच्चा!
:)
धन्यवाद!
24 Oct 2011 - 2:56 am | अभिजीत राजवाडे
जयंत कुलकर्णी आपले हार्दिक आभार!!!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
माझ्या मते ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला ते सर्व मनाने विजेते आहेत.
पण या निमित्ताने कविता करण्याची एक वेगळी मजा अनुभवली. असे आणखी उपक्रम इथे यावेत अशी आशा करतो.
24 Oct 2011 - 11:16 am | मी-सौरभ
विजेत्यांचे अभिनंदन!!
मान्यवरांचे आभार!!
24 Oct 2011 - 11:20 am | मदनबाण
लिमाचिमा चे अभिनंदन ! ;)
24 Oct 2011 - 2:24 pm | पुष्करिणी
सर्व स्पर्धक, विजेत्यांचे अभिनंदन
लिमाउजेटकडून पार्टी कधी/कुठे?
1 Nov 2011 - 7:28 pm | रेवती
माऊतै, बहुगुणी, अभिजीत राजवाडे, विकाल यांचे अभिनंदन!
1 Nov 2011 - 8:25 pm | गणेशा
सर्व विजेत्यांचे मनपासुन अभिनंदन !!
खुप दिवसानी मनापासुन लिहिले आणि वाचले गेले..
आवडले.
सर्व कविता वाचताना खुप छान वाटले..
व्यक्तीशा सर्वात आवडलेली कविता : वहिदा.
आणि सर्वात आवडलेली चारोळी : गवि
1 Nov 2011 - 8:26 pm | गणेशा
अभिजित यांची एकही कविता वाचायला मिळाली नाहि मला तेथे ..
पुन्हा येथे टेक्स्ट मध्ये दिल्यास छान वाटेलच
2 Nov 2011 - 10:53 am | ५० फक्त
विजेत्यांचे अभिनंदन, पार्टीच्या प्रतिक्षेत.
13 Nov 2011 - 7:30 pm | कवितानागेश
कालच बक्षीस घरी आले. :)
श्री. जयंत कुलकर्णी यांचे मनःपूर्वक आभार.
अवांतरः अजून कुणाला हे पुस्तक वाचायचे असल्यास माझ्या पाठोपाठ नंबर लावा. ;)
14 Nov 2011 - 6:42 pm | वाहीदा
आता त्या पुस्तका बध्द्ल संक्षिप्त स्वरुपात थोडे काही लिहाल तर मस्तच
आम्हाला वाचायला आवडेल :-)