शरदीनितैंच्या कविता आम्हाला नेहेमीच आवडतात, त्यातल्याच लेटेष्ट बावळे बुडाले धामी यावरून प्रेरणा घेउन..
मावळे बुडाले कामी
//एक //
धडक उरावर तप्त पर्वणी
नर्मपणिचे उन्नत चरणी
मिकामुकातील संथ चुंबनी
मंतरले सावंतासदनी
//दोन//
अल्प त्यावरी भर्जर त्राता
राहुलभजनी विचित्रवस्त्रा
भर्कन शोधा मोडीत मूढा
त्रिकोणमग्रूर तुरंतखोला
//तीन//
भंगअपेक्षा नाकफेंदरी
स्वयंवराची हावहावरी
बंधननक्षी उभयापक्षी
प्रसिद्धीकिडा चावलवक्षी
धाडीशिकंजी प्रयासखोटा
वसकन उघडा मिरवीसर्वा
मिपास्थळावर कशास बोधा
कविताकर्मी फुटला माथा.
//चार//
विकृतकारण गंमतखाशी
आकंठफसफस गटारीग्लासी
मरमरणातून आवकुंथूनी
भोगभोगीतो कविताशरदिनी
प्रतिक्रिया
31 Jul 2011 - 7:58 pm | चतुरंग
अर्धवटा, केलीस रे, शरदिनीतैंची कविता तडीपार केलीस! ;)
-रंगा
31 Jul 2011 - 9:21 pm | अत्रुप्त आत्मा
हा हा हा!....तुकडं...तुकडं...मोडुन तोडुन फटेक....
31 Jul 2011 - 9:25 pm | प्रास
आता तुम्हीही आमच्याकडून एक साष्टांग __/\__ घ्या..... :-)
31 Jul 2011 - 11:03 pm | रमताराम
च्यायचं हे बेनं बी कामातून ग्येलं. कुटं मलेशिया, विएतनामला जाऊनशान आरबट चरबट (तपशीलासाठी इच्छुकांनी व्य. नि. करू नये) खाल्लं काय रं पोरा?
1 Aug 2011 - 10:25 am | अर्धवट
च्यायला... कुठे बरेच दिवसात गेलो नाही, म्हणून तर असं होत नसेल?
1 Aug 2011 - 1:31 pm | परिकथेतील राजकुमार
शमत हाये.
बर्याच दिवसांनी ररांशी शमत व्हायचा योग आला आहे.
परमानंद झाला. ह्या आनंदाप्रित्यर्थ आज ररांकडून दोन पेग प्यावेत असा विचार आहे.
1 Aug 2011 - 8:56 pm | रमताराम
श्रावणात पेग? हरी हरी... हरी हरी.
1 Aug 2011 - 9:06 am | नगरीनिरंजन
लै भारी!
1 Aug 2011 - 1:21 pm | विजुभाऊ
हम्म.....शेवटी शरदिनी तैंचे भूत तुझ्याही मानगुटीवर बसले ना?