नमस्कार मिपाकरांनो,
आज आपल्या मिसळपाव या बेव साईटचे मालक श्री. नीलकांत यांचा आज (२२ मार्च) वाढदिवस आहे!
सुरुवातीस मिपाची तांत्रिक बाजु भक्कमपणे सांभाळणारे नीलकांत, अनेक महिन्यांपासुन मिसळपाव.कॉम चा एवढा प्रचंड डोलारा एकहाती समर्थपणे चालवत आहेत. काळाबरोबर अतिशय वेगाने बदलत्या तांत्रिक आणि अन्य आव्हानांच्या आजच्या घडीला नीलकांत यांच्या शिवाय मिपा ही कल्पना सुद्धा करवत नाही.
नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना हे वर्ष सुखसमाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे व आरोग्याचे जावो ही सदिच्छा तसेच त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्व बाबींमध्ये सुयश मिळावे ही शुभकामना!
-
शुभेच्छुक, इंट्या.
प्रतिक्रिया
22 Mar 2011 - 11:04 pm | माझीही शॅम्पेन
नीलकांत -
वाढदिवसाच्या शुभेच्छा !!! एकदम दगडी (रॉकिंग) वाढदिवस होऊन जाऊद्या !!!
22 Mar 2011 - 11:08 pm | अविनाशकुलकर्णी
तुम जियो हजारो साल..
जन्म दिवस मुबारक..
22 Mar 2011 - 11:20 pm | सांजसखी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
23 Mar 2011 - 12:33 am | नीलकांत
नमस्कार,
तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. मिपावरच्या मित्रांनी आवर्जून दिलेल्या शुभेच्छांमुळे येत्या काळातील कठीण ( हे माझ्या व्यक्तिगत आयुष्याच्या संदर्भात आहे.) प्रसंगी माझ्या मागे शुभकामनांचे बळ उभे आहे यात शंका नाही.
पुन्हा एकदा सर्वांचे आभार.
- नीलकांत
23 Mar 2011 - 12:52 am | इंटरनेटस्नेही
सर्व प्रतिसादकांचे मनापासुन आभार.
23 Mar 2011 - 7:46 am | सुधीर काळे
नीलकांतना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
23 Mar 2011 - 5:20 pm | नि३
नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.