दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-१)

चिंतामणी's picture
चिंतामणी in जनातलं, मनातलं
2 Mar 2011 - 1:11 am

(काही वर्षांपुर्वी एका कम्युनिटीवर हा लेख मी इंग्रजीत लिहीला होता. त्याचेच रुपांतर थोडा संपादित करून येथे ठेवत आहे.)

३-४ वर्षांपुर्वी विविध भारतीला ५० वर्षे पुर्ण झाली. त्यानिमीत्ताने जे विविध कार्यक्रम प्रसारीत व्हायचे त्यात "सुहाना सफर" नावाचा एक कार्यक्रम वर्षभर प्रसारीत व्हायचा. त्यात एकाच संगीतकाराची/संगीतकार जोडीची वाटचाल गाण्यासहीत प्रसारीत व्हायची.

क्रमाक्रमाने नौशाद, बर्मन पिता व पुत्र, शंकर जयकीशन, लक्षीकांत प्यारेलाल, रोशन, मदन मोहन, सी.रामचंद्र, वसंत देसाई इत्यादी आघाडीच्या संगीतकारांबद्दल प्रसंगी २-४ भागात कार्यक्रम प्रसारीत व्हायचा.

एकदा मात्र BEST SONGS OF LESS KNOWN MUSIC DIRECTORS अर्थात दुस-या फळीतील संगीतकारांची प्रसीध्द गाणी सादर करण्यात आली. हा कार्यक्रमामु़ळे मी त्या संगीतकार आणि त्यांच्या प्रसीध्द गाण्यांबद्दल लिहायचे ठरवले.

याची सुरवात एस. एन. उर्फ श्री नाथ त्रिपाठी यांचे पासुन करतो.

यांनी आपल्या प्रदिर्ध कारकिर्दीत अनेक प्रकारे चित्रपट विश्वात काम केले. संगीत दिग्दर्शक, गायक, नट, कथा आणि पटकथा लेखक आणि निर्माते म्हणून काम केले.

त्यांची काही प्रसीध्द गाणी पुढील प्रमाणे

चित्रपट- राणी रूपमती (१९५९))
आ लौट के आजा मेरे मीत तुझे मेरे गीत बुलाते हैं
मेरा सूना पड़ा रे संगीत तुझे मेरे गीत बुलाते हैं

( मुकेश आणि लतादिदींनी गाइलेले प्रसीध्द युगलगीत)

बाट चलत नई चुनरी रँग डारी
हे ऽ ऽ ऐसो है बेदर्दी बनवारी
बाट चलत ...

(म.रफी आणि कृष्णराव चोणकर)

चित्रपट- संगीत सम्राट तानसेन (१९६२)

बदली बदली दुनिया है मेरी
जादू है ये क्या तेरे नैनन का

(स्व. महेंद्र कपुर आणि लतादिदींनी गाइलेले प्रसीध्द युगलगीत)

हे नटराज, आ आ
गँगाधर, शम्भो भोलेनाथ, जय हो

(महेंद्र कपुर आणि कमल बारोट)

झूमती चली हवा, याद आ गया कोई
बुझती बुझती आग को, फिर जला गया कोई
( मुकेश आणि लतादिदींनी गाइलेले प्रसीध्द युगलगीत)

राग भैरव प्रथम शान्त रस जाके
शंकर को प्रिय लागे
(मन्ना डे यांनी गाइलेली रागमाला)

सप्त सुरन तीन ग्राम, उनंचास कोटि तान
गुनिजन सब करत ध्यान नाद ब्रह्म जाके
(मन्ना डे यांनी गाइलेली "धृपद" बंदीश)

चित्रपट- लाल किला (१९६०) यातील काव्ये "बहादुर शाह जफर" यांची आहेत

म.रफी यांनी गाइलेले हे गाणे आतड्याला पिळ पाडते.

न किसी की आँख का नूर हूँ
न किसी के दिल का क़रार हूँ
जो किसी के काम न आ सका
मैं वो एक मुश्त-ए-गुबार हूँ

म.रफी यांनी गाइलेली ही अजून एक "बहादुर शाह जफर" यांची रचना.

लगता नहीं है जी मेरा उजड़े दयार में
किस की बनी है आलम-ए-ना-पायेदार में

चित्रपट- जनम जनम के फेरे (१९५७)

ज़रा सामने तो आओ छलिये
छुप छुप छलने में क्या राज़ है
(पै.म. रफी आणि लतादिदींनी गाइलेले प्रसीध्द युगलगीत)

चित्रपट- चंद्रमुखी(१९६०)

नैन का चैन चुराकर ले गई
कर गई नींद हराम
चन्द्रमा सा मुख था उसका
चन्द्रमुखी था नाम
(मुकेश)

चित्रपट- हतीमताई(१९५६)
पर्वरदिगार-ए-आलम तेरा ही है सहारा
तेरे सिवा जहाँ में कोई नहीं हमारा
( म.रफी.)

ही काही उदाहरणा दाखल गाणी येथे ठेवली आहेत. अजून खूप गाणी आपणसुद्धा यात लिहू शकता.

(क्रमशः)

कलासंगीतइतिहासचित्रपटमाहितीआस्वादसमीक्षाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

शुचि's picture

2 Mar 2011 - 8:04 am | शुचि

काही गाणी माहीत आहेत काही माहीत नाहीत. छान वाटताहेत पण.
"सज्जाद हुसेन" हे संगीतकार देखील दुसर्‍या फळीतील असावेत का? त्यांची रुस्तम सोहराब ची गाणी अतिशय अवीट गोडीची आहेत.

ये कैसी अजब दास्तान हो गई है
आणि
माझनदरां माझनदरां

चिंतामणी's picture

2 Mar 2011 - 8:13 am | चिंतामणी

त्या व्यतिरीक्त इतर चित्रपत आहेत. सज्जद हुसेन बद्दल तसेच इतर १८ ते २० संगीतकारांबद्दल अजून लिहायचे आहे. काहींसाठी एक स्वतंत्र भाग असेल तर काहींसाठी एकत्र एका भागात लिहीले जाईल.

निवांत पोपट's picture

2 Mar 2011 - 7:45 am | निवांत पोपट

'एस.मोहिंदर' ह्यांचे 'शिरी फरहाद' मधील गाणे ..".गुजरा हुवा जमाना.. आता नही दुबारा"...हा संगीतकार पण दुस-या फळीतलाच असावा. पण हे एकच गाणं त्यांना लक्षात ठेवण्यासाठी पुरेसं आहे.

पैसा's picture

2 Mar 2011 - 8:52 am | पैसा

गाण्यांच्या एम्पी३ लिंक्स देऊ शकशील का?

प्रीत-मोहर's picture

2 Mar 2011 - 9:03 am | प्रीत-मोहर

देउ शक्शिल नाहे ..द्याच!!!

चिंतामणी's picture

10 Mar 2011 - 12:36 am | चिंतामणी

एस. एन. त्रिपाठी यांची गाणी येथे ऐका/ डाउनलोड करा.

http://www.hummaa.com/music/artist/2712/S+N+Tripathi/charts

एस. एन. त्रिपाठी यांची गाणी येथे ऐका

http://smashits.com/s-n-tripathi/albums/music-director-524-page-1.html

स्मिता चावरे's picture

2 Mar 2011 - 9:34 am | स्मिता चावरे

सुरेख गाण्यांचे स्मरण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

आ लौटके आज मेरे मीत...

http://www.youtube.com/watch?v=hyIVG9SM46Y&feature=player_detailpage

स्मिता चावरे's picture

2 Mar 2011 - 9:51 am | स्मिता चावरे

मुकेश यांचे झूमती चली हवा..
http://www.youtube.com/watch?v=FsTr-3ahQxE&feature=player_detailpage

न किसीकी आन्ख का नूर हु

http://www.youtube.com/watch?v=XTzp2H86q64&feature=player_detailpage

जरा सामने तो आओ छलिये
http://www.youtube.com/watch?v=vtX8KCqGp7Q&feature=player_detailpage

नैन का चैन चुराकर ले गयी

http://www.youtube.com/watch?v=wL-oOw7QwAg&feature=player_detailpage

ही आम्हा गरीबांसाठी पहिली फळी असल्याने प्रतिसाद देण्यास असमर्थ आहोत ..

अवांतर : संगीत संगीत असते असा आमचा समज आहे,त्यात कसली फळा-फळी ;)

चिंतामणी's picture

2 Mar 2011 - 1:23 pm | चिंतामणी

भावना पोहोचल्या. दुसरी फळी म्हणून त्यांना दूय्यम लेखले नाही. पण व्यवहारात ज्या नावांची चलती होती (ती वरती दिली आहेतच) त्यात यांचा समावेश होत नव्हता. (थोडक्यात म्हणजे या नावांना Star Value नव्हती ) वरती इंग्लीश नाव लिहीले होते या धाग्याचे. ते वाचले असेलच. त्याचा मराठीकरण करताना मला जे शब्द सुचले ते नावात वापरले आहेत.

परन्तु लेख लिहीण्याच्या उद्देश हाच आहे की अनेक गाणी आपल्याला माहीत असतात. पण संगीतकार माहीत नाही असे होउ शकते. ती माहिती व्हावी आणि या संगीतकारांची थोडीफार माहिती व्हावी यासाठी हा प्रपंच.

५० फक्त's picture

2 Mar 2011 - 2:13 pm | ५० फक्त

'झूमती चली हवा, याद आ गया कोई
बुझती बुझती आग को, फिर जला गया कोई ' आणि 'जरा सामने तो आओ छलिये' ही दोन माझी अतिशय आवडती गाणि आहेत. मी गाणी ही गाणी म्हणुन ऐकतो, त्याचा गायक, संगीतकार, लेखक असले डिटेल लागत नाहीत.

तरी ही ही माहिती छान आहे, धन्यवाद चिंतामणिजी.

गणेशा's picture

2 Mar 2011 - 3:10 pm | गणेशा

येवुद्या आनखिन