चारा वैरण नेसून पैरण
विकसित मार्गा ऊर्जा भक्षण
नकोनको ते एकलजीवन
बुद्धी नेव्हर वांछी
अट्टल चोरा कत्तल साची
डिंडिमवृद्धी फ़ुटाफ़ुटाची
कशास मागे धावून पाहे
उंची अलमट्टीची
तवंग कट्टर भालाबरची
प्रवेशचंचू मृगेन्द्रकैची
नोनचिचुंद्री कुरतडचीची
गोचीड पंखी लोभस गोची
सांगा सत्वर
....
कुठे वाढली
किती जाहली
................उंची अलमट्टीची ???
आर्द्रलाकडे बोलटभीरू
भल्या पहाटे उठला मोरू
दिव्या काव्या बेहतरनारू
कॉकसस्ट्रेप्टो कीड विखारू
तोडमोजड्या सलज्जचोच्या
कलादुगाण्या गोरजमिथ्या
पत्रीगोत्री अट्टलभोज्ज्या
जळूवाकडे द्विदलकुपथ्या
उजाडबागी तद्धितझोला
हटयोग्याचा स्वतंत्र चेला
अटकेपारी तुरुंग लोला
तख्त भंगले मौलामौला
सांगा सत्वर
....
कुठे वाढली
किती जाहली
................उंची अलमट्टीची ???
भिन्नमतीचे लालापिंड
कयाक छोटी मोठी धिंड
कटू वावरे बोजडगुंड
कोला ढोसू तद्दनथंड
मनात अणूच्या साधक पिंगा
किती सावरू निवांत दंगा
रात्री मिठ्ठी दिवसा खट्टी
अलमट्टीशी घेऊ कट्टी
------- शरदिनी
०४ फ़ेब्रुवारी २०११, पुणे
प्रतिक्रिया
4 Feb 2011 - 3:12 pm | सुत्रधार
आवडली कविता
4 Feb 2011 - 3:13 pm | प्रकाश१११
भन्नाट ...!!!
4 Feb 2011 - 3:16 pm | अमोल केळकर
वा वा छान कविता बनवलीत पण
:(
४ एक वर्षापुर्वी अलमट्टी धरणामुळे सांगली परिसरात कृष्णेला आलेला महापूर आणि त्यामुळे झालेले नुकसान - बापरे !! नकोतच त्या आठवणी परत !!!
(सांगली कर ) अमोल
4 Feb 2011 - 3:23 pm | टारझन
चल ग शरदिनी डेट ला चल .. !! मी तुझ्या कविता डेटभर ऐकेन :)
- डेटली टी
4 Feb 2011 - 3:36 pm | गणपा
* उखाणे * नृत्य * संगीत * धोरण * व्याकरण * व्युत्पत्ती * शब्दक्रीडा * शृंगार * भयानक
* कृष्णमुर्ती *बिभत्स * राजकारण * करुण * मौजमजा * वीररस * अद्भुतरस * रेखाटन * रौद्ररस
ही ठळक कॅटेगरी. शब्दशः पटली. ;)
बाकी नेहमी प्रमाणेच एक लयबद्ध काव्य.. जाणकारांकडुन याच निरुपण वाचण्यास उत्सुक..
4 Feb 2011 - 3:45 pm | मैत्र
शरदिनी तै आपल्या नावाला आणि कवितेला जागल्या या वेळी..
कर्मदरिद्री दधीची,डिग्गी राजा, टेन नंबरी, रिक्की फिक्की, पूजा बात्रा, वाय एस एल - बरंच समजलं होतं...
यावेळी मात्र अलमट्टीचं सगळं पाणी डोक्यावरून गेलं...उंची कितीही वाढवा ... काहीही कळालं नाही!
अभिनंदन... ब्याक टू ओरिजिनल फॉर्म !
6 Feb 2011 - 9:48 pm | केशवसुमार
अलमट्टीचं सगळं पाणी डोक्यावरून गेलं...उंची कितीही वाढवा ... काहीही कळालं नाही!
अभिनंदन... ब्याक टू ओरिजिनल फॉर्म !
केशवसुमार
4 Feb 2011 - 4:03 pm | मुलूखावेगळी
नादपुर्न
पन न कळनरी कविता
बाकि तुमचा शब्दांचा कारखाना आहे का भट्टी?
काहितरी अचाट शब्द ऐकाय्ला मिळाले
असेच लिहित जा नवे नवे
4 Feb 2011 - 5:10 pm | मानस्
मस्तच!!!काय भन्नाट शब्द वापरले आहेत्.एखादे संस्क्रुत काव्य वाचत असल्यासारखे वाटले.जरा अर्थ पण समजावून सांगा कोणी.माझा ४ वर्षाचा मुलगा पण असेच न समजणारे शब्द जोडून गाणी म्हणत असतो.
4 Feb 2011 - 5:37 pm | वाहीदा
आपल्या मितानचे लेख कसे काय चोरीला जातात अन तुझी कविता कशी काय कोणी चोरत नाही ग ??
(देव करो कोणाचेच लिखाण चोरीला न जावो पण एक शंका..)
काय महाभन्नाट लिहतेस बाब्बो !
कधी तरी स्वत:च्या कवितेचे रसग्रहण तरी कर ग बाई ,
का छळतेस, असे चित्र विचित्र शब्दजंजाळ टाकून ?
4 Feb 2011 - 5:43 pm | ५० फक्त
शरदिनितैच्या कविता ह्या पुन्हा बहरात आलेल्या आहेत याची सर्व जालवाचकांनी नोंद घ्यावी व या वाटेला आपल्या आपल्या जबाबदारीवर यावे ही नम्र सुचना,
हुकुमावरुन
/ ; / ] \ \ - = /
., ' ; / दाणादिणि..
तसेच या कवितेला संगीतबद्ध करुन त्यावर न्रुत्य करायला ''म्हागुरु'' सांगावे म्हणजे ते फुकटचे टिरी बडवुन नाही ते पालथे धंदे करायचे थांबवतील.
4 Feb 2011 - 8:26 pm | क्रान्ति
खाता खाता चारा वैरण
कुठून आली ठण्ठण ढण्ढण
अलमट्टीची कट्टी वाचुन
खड्ड्यात पडला रेडा तत्क्षण!
आणि म्हणाला..............
सांगा सत्वर
कुणी पाडली
कशी गाडली
खोली अलमट्टीची!!!!!!!!!!!!!!!!
6 Feb 2011 - 9:51 am | विजुभाऊ
बुद्धी नेव्हर वांछी
वावा प्राचीन आणि अर्वाचीन शब्दांचा मिलाफ पाहून डोळे पाणावले ( कोण रे म्हणाला जडावले म्हणून )
शरदिनी काका ( आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हंटले असते ) छान छान कविता आहे.
7 Feb 2011 - 2:52 pm | ज्ञानराम
कविता छान आहे,, जिभेला व्यायाम.. पण बाउन्सर गेली.. अर्थ कळाला तर फार बर होईल.
रचना छान आहे,, काही तरी नवीन वाचायला मिळालं...
लहान पणीची कटट्टी-बट्टी आठवली...