नायकिणीचा नाच

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
19 Dec 2010 - 9:05 am

आमच्या गावच्या जत्रेच्या आदल्या रात्री ग्रामदैवताच्या अश्वाची सवाद्य मिरवणूक असते. रात्रभर ती गावाच्या चौकाचौकात रेंगाळून पहाटेच्या सुमारास देवाच्या डोंगरावर न्यायची असा प्रघात पडलेला किँवा पाडलेला आहे. या मिरवणूकीचे पूर्वीचे वैशिष्ट्य म्हणजे सोंगाच्या गाड्या असत. सुतारनेटावरची पुरुषमंडळी व पोरं विविध पौराणिक देखावे प्रत्यक्ष संवादातून, हुबेहूब वेशभुषेसह सादर करीत. ते पाहण्यासाठी अबालवृद्धांची रस्त्याकडेला गर्दी उसळायची.
परंतु आता जमाना बदललाय... सोंगाच्या गाड्या कालबाह्य झाल्यात. त्यांच्या जागी नाचणाऱ्‍या नायकिणी आल्यात. त्यांचा नाच पहायला तरुण पोरांची झुंबड उडू लागलीय...
तो रस्त्यावरचा तमाशा बहुतेकांना आवडणारा. रात्र कशी सरते ते जाणवू न देणारा तो जलसा अनुभवणं म्हणजे तरुणांसाठी वर्षातून एकदाच लाभणारी पर्वणी. उडत्या चालीच्या गावरान गाण्यांच्या ठेक्यावर पदर उडवीत नाचणाऱ्‍या त्या कोवळ्या कमनीय तरुणी जवळून पाहण्यासारखा दुर्मिळ योग पुन्हा बारा महिने नसतो. म्हणून मिसरुड फुटलेल्यांचं नायकिणींच्या भोवती दाट कोँडाळं. वर्षानुवर्षे बायांची संख्या वाढतेच आहे, अन् त्यांना न्याहाळणाऱ्‍यांचीसुद्धा.
संध्याकाळी नाचणाऱ्‍या युवतीँची 'डान्सिँगपार्टी' आपल्या लवाजम्यासह गावातल्या दलालाच्या घरी उतरली की त्यांना पहायला तरुण पोरांची हीऽऽ झुंबड! त्या बोलतात कशा, चालतात कशा, खातात-पितात कशा हे पाहणं म्हणजे वेगळीच मौज. 'दलालाची लै मज्जा आसंल नै?' अशी खालच्या आवाजात एकमेकांना टीपण्णी दिली की दलालाच्या अहोभाग्यावर जळणं व्हायचं. दलालानं दारातून डोकावणारी पोरं हाकलली की समजायचं पोरी आता नटायला बसल्यात. मग तासभर इकडं तिकडं घुटमळून कोणाला कोणती आवडली याची सकारण चर्चा ठरलेली. दीडेक तासाने दार उघडलं जायचं अन् त्या चिरतरुण नृत्यांगना स्वर्गीय शृंगार करुन बाहेर यायच्या.
त्यांचं ते नटणं म्हणजे 'भडक' सदरात मोडणारं. गर्द दाट रंगाची काठापदराची साडी चोपून चापून नऊवारासारखी नेसलेली, पदर थेट पोटरीपर्यँत सोडलेला, चांदीचा गच्च कंबरपट्टा, केस चोपून अंबाडा केलेला, त्यावर काळा फिट्ट बो, अंगभर चमचमणारे दागिने, चेहरा उजळवलेला, चंद्रकोरी टिकली, अन् ओठांना लालचुटुक लाली. तंग ब्लाऊज, अन् नजरेत भरणारी ती दोन टोकदार टोकं!
'ओऽय होये!' प्रत्येक तरुण रसिकाच्या नजरेतून सौंदर्यास्वाद बोलून जायचा. तशा आस्वादक नजरांची त्या नर्तिकांना नेहमीची सवय. त्यादेखील त्या चौकस नेत्रशरांचा सस्मित स्विकार करीत मोहकपणे लाजल्या की तरुणांचा कलेजा खल्लास! असा समोरासमोरचा 'प्रेमानुभव' खेडेगावात कोठून मिळायला? दिवसा उजेडी तर शक्यच नाही. आणि रात्रीच्या काळोखात बायकोचं असं मोहक लाजणं अनुभवणार कसं? त्यामुळेच नायकिणीँच्या नाचाला तरुण आशिक पोरांबरोबरच अनेक विवाहित बाप्येसुद्धा लाभत असतात. 'ती' आपल्याला आवडली असून तिने आपल्याकडे पाहून गोग्गोड स्मित करावं अशा आशेने बहुतेकजण रुंजी घालतात...
मग एकदाची मिरवणूक सुरु झाली की शिट्यांच्या सलामीत नाचकाम सुरु. नामांकित ब्रासबँडचा यावेळी कस लागे. एकसे बढकर एक अशा ठेकेबाज गाण्यावर कमनीय कंबर लचकतांना पाहून अधाशी डोळ्यांना पंख न फुटते तरच नवल! मनमोहक पदन्यासाची ती दिलखेचक अदा नखशिखांत प्राशून घेण्यासाठी एकच धडपड उडू लागते. हळूहळू नाचगाणे गर्दीचा ताल धरू लागते. गोलाकार उभारलेल्या रसिकांना चुचकारत पोरींचे नृत्य चालू होते...
त्या डान्सपार्टीचा एक हस्तक अगोदरच गर्दीत मिसळून शिट्ट्या फुंकीत दहाची नोट उंचावित असतो. ती नोट कोणी घ्यावी हे दुसऱ्‍या हाताने निर्देशित केल्यावर ती तरुणी ठुमकत त्याच्याजवळ येते व त्याच्या डोक्यावर लाडीक टपली मारून नोट हस्तगत करते. त्याचंच अनुकरण करीत अनेक पोरं मग आपल्या आवडत्या नर्तिकेच्या कोमल बोटांची नाजुक टपली खातात...
थोड्यावेळाने तोच हस्तक त्याच्या मित्राच्या गालावर वीसची नोट धरतो. यावेळी त्या मित्राला आवडलेली पोरगी कंबर हलवित येऊन त्या गालाचा आपल्या मऊ बोटांना गालगुच्चा घेऊन ती विसाची नोट आपल्या कंचुकीत दडवून पुन्हा मध्यभागी चाललेल्या नृत्यात सहभागी होते. हे पाहून तशीच नाजूक मऊ बोटे अनेक आसुसलेल्या मित्रांच्या गालावर वीस वीस रुपयांत रुतू लागतात..
रात्र चढत जाते, नृत्य रंगत जाते. चौकाचौकात मिरवणूक अधिकाधिक थबकू पाहते.
एका मोठ्या चौकात पुन्हा तोच हस्तक पन्नासाची नोट उंचावून आपल्या आवडतीला बोलावतो. यावेळी ती पदराचा आडोसा धरून केवळ त्याच्याचकडे पाहत येत असते. ती आडपडदा ठेऊन नेमके करते काय? ही उत्सुकता शमविण्यासाठी एकजण पन्नासाची नोट उंचावित आपल्या आवडतीला खुणावतो. ती हसते, डोईवर पदर घेऊन आडोसा धरते अन् त्याच्याजवळ येतांना दोन तीनवेळा चक्क डोळा मारते, हे दिसतं फक्त त्या नोटधारकालाच!
मग अनेक रसिकलोक आपल्या आवडत्या पाखराकडून डोळे मारून घेतात. चारचौघात मिळणारा डाव्या डोळ्याच्या कौलाने धन्यधन्य होऊन जातात. गर्दीच्या खिशातील नोटांना नायकिणींचा ऊर जवळ करावासा वाटू लागतो. मिळतील तितक्या नोटांच्या भाराने पोरीँचा उभार आणखीनच उभारी घेतो. आता रात्र बरीच चढलेली असते. काही शौकिनांच्या डोक्यापर्यंत मदिरा चढलेली दिसते. ते नायकिणीँच्या अंगचटीला जाऊ पाहतात, पण तिथे उधारीचा धंदा अजिबात चालत नसतो. नोट दाखवून 'दौलतजादा' करणाऱ्‍या जहागिरदारालाच त्या हसून -लाजून भाव देत असतात अन् फुकटात घसट वाढवणाऱ्‍या पेताडांना दलालाचे पंटर व डान्सपार्टीचे बॉडीगार्ड यथेच्छ चोप देत रिंगणाबाहेर घालवून देत असतात...
अनेकांचे खिसे रिकामे पडतात. मात्र पोरीँची छाती दबून गेलेली असते, नाचूनही, नोटा साठवूनही!

( <"www.mimarathi.net/node/4388">चौफेर" मधून.)

कलानृत्यइतिहाससमाजजीवनमानमौजमजालेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

गांधीवादी's picture

19 Dec 2010 - 9:33 am | गांधीवादी

'मनुष्याच्या विकृतीस पाजाळणे' हे पैसा मिळविण्याचे एक साधन झालेले आहे.
'पण मिळणारा पैसा असा किती कामास येत असेल आणि किती मानसिक समाधान लाभत असेल' यांनाच माहित. 'नायाकीणींना हे माहित नसेल' असे वाटत नाही. पण झटापट मिळणारा पैसा हा मनुष्याची बुद्धी सुन्न करतो त्यात वर वर्णन केल्या प्रमाणे जवानीची नशा.

ग्रामदैवत मनात काय विचार करत असेल ?

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

19 Dec 2010 - 11:45 am | जाई अस्सल कोल्हापुरी

विकृती पाजळणे. योग्य शब्दप्रयोग!
अशा नाचणार्‍यांच्या आहारी अनेक सुसंस्कृत गणले जाणारे तरूणही नजरेस पडतात्.त्यांच्या एखाद्या लगटीसाठी पैसा उधळला जातो.
जवानीची नशा... मुलींना मिळणारा easy money या गोष्टी समाज, स्वत्व, आपण जे काम करतो ते बरे कि वाईट या गोष्टी विसरायला लावतो.
त्यांच्यातली मादकता ओसरल्यावर किंवा त्यांची जागा दुसर्‍या मुलींनी घेतल्यावर त्याना येणारे वैषम्य ही त्यांना गर्तेत नेणारे असते. त्यानंतर पुढे काय? हा प्रश्न असतोच ना!
कित्येक दा.... या नाचणार्‍यां मुलींच्या मुळे अनेक विवाहीत जोडप्यांम्ध्ये कटुता आलेली किंवा नाती दुरावलेली सुद्धा पहायला मिळतात.
तीव्र संताप आणणारा विषय आहे हा.... माझ्यासाठी तरी!

सहमत.

आणि
त्यांच्यातली मादकता ओसरल्यावर किंवा त्यांची जागा दुसर्‍या मुलींनी घेतल्यावर त्याना येणारे वैषम्य ही त्यांना गर्तेत नेणारे असते. त्यानंतर पुढे काय? हा प्रश्न असतोच ना!
कित्येक दा.... या नाचणार्‍यां मुलींच्या मुळे अनेक विवाहीत जोडप्यांम्ध्ये कटुता आलेली किंवा नाती दुरावलेली सुद्धा पहायला मिळतात.

हे तर फारच उत्तम. चुकीला शिक्षा हल्ली फार दुर्मिळ झाली आहे.

+१००००० सहमत.

हे सर्व ग्रामदैवताच्या निमित्ताने घडवायचं कारण काय?

पूर्वापार अशा प्रथा पडत गेल्या आहेत, किंवा पुरुषप्रधान संस्कृतीच्या नावाने गैरफायदा घेवून पाडण्यात आल्या आहेत. खापर मात्र एखाद्या दैवताच्या नावावर फोडलं गेलं आहे.

ह्या असल्या मागासलेल्या ग्राम्य चालीरीतींमुळेच हिंदूविरोधी लोकांच्या हातात टीका करण्यासाठी आयतंच कोलीत वर्षानुवर्षे मिळत आलेलं आहे.

शिल्पा ब's picture

19 Dec 2010 - 11:27 am | शिल्पा ब

तुमचे लेख असेच वेगळे वेगळे असतात.

डॉ.श्रीराम दिवटे's picture

19 Dec 2010 - 2:31 pm | डॉ.श्रीराम दिवटे

लहानपणी जे मी पाहिलं त्यावर भाष्य करणारा हा लेख आहे. एक विरंगुळा किंवा अवांतर वाचन म्हणून त्याकडे पहावे ही अपेक्षा.

अविनाशकुलकर्णी's picture

19 Dec 2010 - 2:39 pm | अविनाशकुलकर्णी

खुप मस्त लिहिले आहे..वर्णन शैली व शब्द वापर अफाट..चित्र डोळ्या समोर उभे रहाते..
मजा आली वाचायला...झ्याक..दादा ....लई भारी

स्वाती२'s picture

19 Dec 2010 - 5:21 pm | स्वाती२

+१
असेच म्हणते

इंटरनेटस्नेही's picture

19 Dec 2010 - 5:23 pm | इंटरनेटस्नेही

+३

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Dec 2010 - 6:50 pm | निनाद मुक्काम प...

आमच्या वतनाच्या गावी माझे आजोबा सांगतात कि ते पुण्याहून सुट्टीसाठी आले .कि गावात तमाशाचे फड असत तसे नायकीनि चे सुद्धा
ह्या बायकांचा पिढीजात धंदा असतो . व ह्याचे मुख्य स्त्रोत गरिबी आहे . .हि परंपरा भारतात फार पूर्वीपासून सुरु आहे .दूरदर्शन वर गाजलेल्या फुलवंती मालिकेत(अर्चना जोगळेकर निर्मित संगीत हद्यानाथ व टायटल ट्रक लता दीदी ) दुसर्या बाजीरावाच्या काळात घडलेल्या कथानकात अर्चना जोगळेकर जेव्हा पुणे दरबारात नर्तकी म्हणून येते .तेव्हा तेथील एक विद्वान (अरुण गोविल )म्हणतो इससे बढीया तो कुल्ले मटकाने वाली नायकीण नाचती हे मग .अर्थातच मस्तानी बाईचा ह्या शहराने अपमान केल्याचा सूड उगवावा. म्हणून ती अर्चना गोविल ह्यांना आव्हान देते .मला तुझ्या तालावर नाचव .किंवा माझा नोकर बनून राहा; .थोडक्यात पूर्वापार मनोरंजनाचे चातुर्वर्ण्य श्रेणी ह्या समाजात पूर्वीपासून होत्या .अत्यंत गरीब समाजाला राजदरबारातील जलसे किंवा बैठकीची लावणी एकाने व पाहणे शक्य नव्हते .(परवडणारे नव्हते )तेव्हा त्यांच्या मनोरंजनासाठी हा प्रकार अस्तित्वात आला असावा असे वाटते .माझ्या मते तमाशा आणि नायकिणीचा नाच ह्या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत व त्याचा सादर होण्यामागचा उद्देशही भिन्न आहे .परदेशात स्त्रीप क्लब किंवा मुंबईत डान्स बार होतेच ( ते बंद झाल्यावर आज मुंबईतील काळा पैसा असणारे बंकोक ला जातात ) .थोडक्यात विविधरंगी भारतीय सांस्कृतिक आर्थिक व सामाजिक स्तर असलेली आपली संस्कृती हि बहुढंगी आहे .भारत एकाच वेळी अनेक शतकात जगत आहे .त्यामुळे कोणताही एक वर्ग व त्याची संस्कृती हि संपूर्ण भारतीय संस्कृती नसून ती मोठ्या व प्राचीन संस्कृतीचा एक भाग आहे .हे ह्या विषयावर टीका व स्तुती करतांना घ्यानात ठेवले पाहिजे .

अतिषय चित्रदर्शी वर्णन केले आहे.
बदलता काळ कोण थांबणार?
काही दिवसांनी अजून काही वेगळे येणार.
मला हे तमाशे इ. आवडत नसले तरी तो एक पेशा आहे हे विसरून चालणार नाही.
लेखन आवडले.

षिर्षक वाचुन एखाद दुसरा फोटु दिसेल असं वाटलं होतं .. पण छ्या ...
आता संस्कृती रक्षणाचं दळण दळावं भौतेक ...

( फेटेबाज) टारझन

फार मजा येते राव तुम्च्याकढे, नाहि तर आम्च्याकढे आबानी डान्स बार बद केलेत, नाय तर आम्ही ही मजा अनुभवली अस्ती

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

20 Dec 2010 - 11:51 am | जाई अस्सल कोल्हापुरी

:)
तिथे बरेच आहेत!

सुनील's picture

20 Dec 2010 - 11:04 pm | सुनील

अगदी सगळेच काही बंद नाही झाले, काही आहेत अजून!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

20 Dec 2010 - 6:05 pm | निनाद मुक्काम प...

दुबई ची बाजारपेठ विविध आंतराष्ट्रीय मालाने गजबली असते .पण बेन्कोक हि स्वदेशी मालावर आधारित आहे .त्यामुळे तुलनेन स्वस्त विसा सुद्धा त्यांच्या विमानतळावर आगमन केल्यावर देतात .त्यामुळे युरोपातून व जगभरातून हौशी पर्यटक आपला कार्यभाग साधण्यासाठी येतात ,बाकी दुबईत डी चे वास्तव्य नसल्यामुळे व त्याच्या गतंविधीवर इंटर पोल लक्ष ठेवून असल्याने दुबई ची ९०च्य दशकातील रौनक आता उरली नाही .

दुबई ची ९०च्य दशकातील रौनक आता उरली नाही .

अच्छा! असे आहे काय?
९० च्या आसपास पुण्यातून अनेक उच्चवर्गीय लोक्स शॉपिंग फेस्टीव्हलला जात असत आणि आम्हा शाळकरी पोरींना फारच हेवामिश्रीत आश्चर्य किंवा आश्चर्यमिश्रीत हेवा वाटत असे. असेही ऐकिवात होते कि भाराभर खरेदी करून ती नातेवाईकांमध्ये वाटून टाकणे हाही शौक असे. आपल्याला असे नातेवाईक नसावेत याचे त्या वयात फार वाईट वाटत असे. आता मात्र हसू येते कि शॉपिंग या महाभयानक कंटाळवाण्या प्रकाराचं एका वयात किती कौतुक होतं.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

20 Dec 2010 - 11:08 pm | निनाद मुक्काम प...

दुबई आजही शॉपिंग चे नंदनवन आहे .भले युरोप व अमेरिकेतील सिझन संपल्यावर नामवंत ब्रांड (कपड्याचे ) आपला माल करमुक्त दुबई त आणते .इलेक्ट्रोनिक वस्तू स्वस्त देण्यात सिंगापूर नि दुबईत नेहमीच स्पर्धा असते.
आजही दुबई चा फेस्टिवल त्यांच्या सवलती व आकर्षक ऑफर व गिफ्ट ह्यासाठी प्रसिध्द आहे( मला स्वस्तात लेपाटोप मिळाला व बरोबर मोफत आयापोड ) .माझी प्रतिक्रिया हि महेश मया ह्यांना जाई ह्यांनी दुबईत या अशी प्रतिक्रिया दिली .तिला उल्लेखून होती . .

रेवती's picture

20 Dec 2010 - 11:19 pm | रेवती

युरोप व अमेरिकेतील सिझन संपल्यावर नामवंत ब्रांड (कपड्याचे ) आपला माल करमुक्त दुबई त आणते .
ओह्! मला वाटायचं कि सिझन संपल्यावर दणक्या सेल लावून विकून संपवतात.
अच्छा, दुबईला नेतात तर....

सुनील's picture

20 Dec 2010 - 11:05 pm | सुनील

लिहिण्याची शैली मस्तच!

नरेशकुमार's picture

22 Dec 2010 - 9:29 am | नरेशकुमार

आता गेलं पाईजे लवकर , बरं झालं, आठवन झाली.