स्पायडरमॅन, सुपरमॅन अगदी गेला बाजार शक्तिमान देखील आपल्याला भुरळ पाडून गेले. जादुई, साहसी जगातल्या ह्यांच्या पराक्रमाने, साहसाने आपण थक्क होत आलो आहोत. पण ह्या नायकांच्या साहस जगात नायिका तशा दुर्मिळच आणि त्यामुळेच कॅटवूमन अनेकांना भुरळ घालते ह्यात नवल नाही. कॉमिक्स मधून भेटिला येणारी कमनीय, देखणी मांजराप्रमाणेच धूर्त असलेली कॅटवूमन थेट पडद्यावर अवतरली ती २००४ साली वॉर्नर ब्रदर्सच्या 'कॅटवूमन' चित्रपटातून. कॅटवूमनच्या जन्माची कहाणी सांगणारा हा एक सुंदर चित्रपट. टायटल्स पासून बघण्यालायक जे काही मोजके चित्रपट असतात त्यातलाच हा एक चित्रपट.
चित्रपट काही फार भव्य, साहसाने ठासून भरलेला असा नाही, पण एका सामान्य तरुणीचा कॅटवूमन पर्यंत होणारा प्रवास अतिशय छान चित्रित केलेला आहे. हेली बेरी, शेरॉन स्टोन, बेंजामिन ब्रॅट ह्या सारख्या कलाकारांनी अभिनयाची बाजू अतिशय सुंदर सांभाळलेली आहे. पेशन्स फिलिप्स (हेली बेरी) हि सौंदर्य प्रसाधने बनवणाऱ्या एका कंपनीत ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत असते. लाजऱ्या बुजऱ्या पेशन्स फिलिप्सवर ह्यावेळी पहिल्यांदाच त्यांच्या कंपनीच्या नवीन लाँच होणाऱ्या प्रॉडक्टची जबाबदारी सोपवण्यात आलेली असते. पेशन्स देखील ह्या संधीचे सोने करण्याचा तयारीने काम करत असते.
अशाच एका रात्री पेशन्सला आपल्या खिडकीखाली पहिल्यांदाच एका मांजरीचे दर्शन होते. सकाळी पुन्हा ती मांजर पेशन्सच्या खिडकीत हजर होते, ह्यावेळी मात्र ती खिडकीतून दर्शन देऊन सरळ वरच्या कठड्यावर चढते. इकडे मांजर बहुदा त्या उंच ठिकाणी अडकली असावी असे समजून पेशन्स तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करते आणि त्या प्रयत्नात स्वतःचा जीव धोक्यात घालते. खिडकीच्या कडेला लटकलेल्या पेशन्सला बघून रस्त्यावरून जाणाऱ्या डीटेक्टिव टॉम लोनचा (बेंजामिन ब्रॅट) ती आत्महत्या करत आहे असा गैरसमज होतो. मात्र शेवटी तो तिला वाचवतो आणि त्याला सत्य देखील उमगते. पहिल्याच भेटीत तो ह्या साध्या सरळ मुलीकडे आकर्षित होतो.
एके रात्री उशीरापर्यंत काम पूर्णं केल्यावर पेशन्स स्वतःच आपली डिझाइन्स पोचवण्यासाठी गेलेली असताना तिला कंपनीच्या मालकाचे व इतर लोकांचे बोलणे कानावर पडते. नवीन लाँच होणाऱ्या प्रॉडक्ट मध्ये विषारी द्रव्ये असून ते त्वचेला हानिकारक व प्रचंड घातक असल्याचे तिला समजते. आता हे बोलणे कानावर पडलेली पेशन्स जिवंत राहणे हे कंपनीच्या फायद्यासाठी नुकसानकारक आहे हे ओघाने आलेच. त्यामुळे मालकाचे हस्तक कंपनीतून थेट समुद्रात सोडल्या जाणाऱ्या पाण्याच्या पाइपमध्ये अडकवून पेशन्सचा जीव घेतात.
पेशन्सचे प्रेत वाहत वाहत समुद्राच्या कडेच्या गाळात येऊन अडकते आणि इथेच चित्रपटाला वेगळे वळण लागते. पेशन्सच्या घराभोवती घुटमळणारे मांजर आता आपल्या बरोबर अजून काही मांजरे घेऊन तिथे हजर होते. सर्व मांजरे पेशन्सच्या प्रेताला घेरतात. पेशन्सच्या शरीरावर उभे राहून ते मांजर जणू पेशन्सच्या शरीरात पुन्हा प्राणच फुंकते... आणि खरंच पेशन्स पुन्हा जिवंत होते. हा पेशन्सचा कॅटवूमनच्या रूपातला पुनर्जन्म होतो. जिवंत झालेली पेशन्स डोळे उघडून आजूबाजूला पाहते आणि आपल्याबरोबर नक्की काय घडले होते ते आठवण्याचा प्रयत्न करू लागते, मात्र तिला काहीच आठवत नाही. जिवंत झाल्यानंतरची पेशन्सची पहिली हालचाल हि अगदी मांजरीसारखीचं दाखवली आहे, तर तिला दिसणारी आजूबाजुची दृश्ये, जमिनीखालील जाणवणारी हालचाल हे दृश्य अतिशय सुंदररीत्या पडद्यावर दाखवले आहे.
आपल्यात काहीतरी बदल घडला आहे हे पेशन्सला जाणवत असते, मात्र तो नक्की काय आहे हे तिच्या लक्षात येत नाही. सकाळी पुन्हा एकदा त्या रहस्यमय मांजरीचे पेशन्सकडे आगमन होते. आता मात्र पेशन्स तिच्या गळ्यातील बेल्ट मधून तीच्या मालकाचा पत्ता शोधून काढते व मांजर परत देण्यासाठी निघते. मिळालेल्या पत्त्यावर तिची भेट एका खूपश्या मांजरी पाळणाऱ्या आणि जुन्या इतिहासाच्या अभ्यासाचे वेड असणाऱ्या प्राध्यापिकेशी होते. तिच्याकडूनच ह्या रहस्यमय मांजराचे नाव 'मिडनाईट' असल्याचे समजते. प्राध्यापिका पेशन्सला मांजरांची इजिप्तमधील दैवत असलेली गॉडेस, तिची प्रतिरुपे आणि कॅटवूमन ह्या सर्वाबद्दल माहिती देते. ति पेशन्सला तिचा एक कॅटवूमन म्हणून पुनर्जन्म झाल्याचे सांगते आणि त्या रात्री घडलेल्या घटनांची आठवण करून देते. पेशन्स मात्र हे सत्य स्वीकारायला नकार देते.
साधी सरळ पेशन्स आणि कावेबाज कॅटवूमन ह्या दोन रूपांचे द्वंद आता पेशन्समध्ये सुरू होते. साहसाची, मुक्ततेची आवड असणारी कॅटवूमन पेशन्सला बेधुंद आयुष्याकडे ओढत असते तर दुसऱ्या बाजूला अल्लड पेशन्स डिटेक्टिव टॉम लोनकडे आकर्षली जात असते. कॅटवूमन ह्या प्रकाराबद्दल आता पेशन्स इंटरनेटवरून शक्य ती सर्व माहिती गोळा करते आणि वाचते. हळूहळू आता कॅटवूमन म्हणूनच जगण्याचे तिचे आकर्षण वाढत जाते. त्यातच एका रात्री बेदरकारपणे हिंडताना ते कॅटवूमनच्या रूपात एका सोन्याचे दुकान लुटणाऱ्या टोळीला बुकलून काढते. आता तर तिच्या आत्मविश्वासात दुपटीने वाढ होते. आपल्या खुनाचा बदला घेण्याचा निश्चय आता कॅटवूमन करते आणि एकेका खलनायकाच्या मागावर निघते.
शेवटी शेवटी ह्या सर्व प्रकरणामागे तिच्या कंपनीच्या मालकाच्या बायकोचा लॉरेलचा (शेरॉन स्टोन) हात असल्याचे उघड होते. मात्र कावेबाज लॉरेल स्वतः आपल्या पतीचा खून करते व त्याचा आळ कॅटवूमनवर आणते. इकडे पेशन्सची एकूण वागणूक, तिच्या स्वभावात होणारे बदल ह्यांनी अस्वस्थ असलेल्या टॉम लोनच्या त्रासात ह्यामुळे वाढच होते. आणि एका अनपेक्षित क्षणी तो पुराव्यानिशी पेशन्सला कॅटवूमन म्हणून अटक करतो. पुढे काय होते हे पडद्यावरच बघण्यात खरी गंमत आहे.
हेली बेरीच्या सुंदर अभिनयाने आणि शेरॉन स्टोनच्या सौंदर्याने लक्षात राहणारा हा चित्रपट. अल्लड, थोडा आत्मविश्वासाचा अभाव असणारी पेशन्स ते बेदरकार, रंगेल कॅटवूमन हा विविध शेडने रंगलेला प्रवास हेली बेरी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने मोठा छान पार पाडते. कपटी आणि कावेबाज लॉरेलच्या भूमिकेत शेरॉन स्टोन भाव खाऊनं गेली आहे हे सांगायला नकोच. एकूण काय तर वयाचा विसर पाडून मनमुराद आनंद लुटावा असा हा चित्रपट तुम्ही पाहायलाच हवा.
प्रतिक्रिया
8 Dec 2010 - 12:46 pm | अवलिया
क्याफेत सौंदर्य फुफाटा कमी झालेला दिसतोय.. त्यामुळे रिकामा वेळ पिच्चर पाहात घालवत आहे... असो.
हा प्रतिसाद लगोलग दिला आहे.. लेख वाचुन परत प्रतिसाद देईन ;)
8 Dec 2010 - 12:50 pm | अवलिया
मस्त परिक्षण !!
8 Dec 2010 - 1:35 pm | टारझन
हा चित्रपट कसाही असता तरी हॅलेबॅरी साठी पहाणारच होतो ...
परिक्षण लै भारी !!
8 Dec 2010 - 2:04 pm | राजेश घासकडवी
हा चित्रपट मी हॅलेबॅरी साठी दोनदा बघितला आहे...
परिक्षण लै भारी!!
8 Dec 2010 - 2:19 pm | नगरीनिरंजन
हॅलेबॅरी आणि शेरॉन स्टोनसाठी पाहिला आहे.
परीक्षण सराईतपणे सुबक आणि रंजक.
8 Dec 2010 - 1:35 pm | टारझन
हा चित्रपट कसाही असता तरी हॅलेबॅरी साठी पहाणारच होतो ...
परिक्षण लै भारी !!
8 Dec 2010 - 2:04 pm | राजेश घासकडवी
हा चित्रपट मी हॅलेबॅरी साठी दोनदा बघितला आहे...
परिक्षण लै भारी!!
8 Dec 2010 - 12:49 pm | स्पा
सुंदर परीक्षण....
बघेन नक्की
शेवटचा फोटू लय आवडला............ ;)
_________________________________________________________________
8 Dec 2010 - 12:52 pm | गवि
हेली बेरी खरेच देखणी दिसते आहे.
एकूण गूढ थरारक दिसतोय...
बघायला पायजे.
परिक्षण रंजक..
8 Dec 2010 - 1:29 pm | sneharani
मस्त परिक्षण...छानच!
8 Dec 2010 - 2:13 pm | pramanik
मराठी संस्थळावर ईंग्लिश चित्रपटाचे समीक्षण लिहले आहे,असो.
- १
उर्वरीत समीक्षण छान लिहले आहे.
8 Dec 2010 - 2:15 pm | परिकथेतील राजकुमार
आधी लिहित न्हवतो. पण काही हुच्चभ्रु मराठी संस्थळ असुनही इथे इंग्रजी मध्ये नावे घेउन वावरायला लागले, मग केली सुरुवात लिहायला :)
8 Dec 2010 - 4:45 pm | स्पा
ह्या ह्या ह्या ...............
direct SIX !!!!
8 Dec 2010 - 11:40 pm | pramanik
उच्चभ्रु? म्हणजे ते सर्व ईंग्लिश बोलणारे उच्चभ्रु का? मग आमच्या म्युन्सिपाल्टी शाळेत येणारे ते कॅथलीक पोरं पण उच्चभ्रु आहे तर.असो.
आणि मराठी संस्थळावर 'मी ईंग्लिश चित्रपट बघतो' अशा बिनबुडाच्या फुशरक्या मारणारे कोण म्हणायचे?
9 Dec 2010 - 12:05 pm | परिकथेतील राजकुमार
संशयाला खात्रीत बदलल्याबद्दल धन्यवाद.
मराठी संस्थळावर 'मी ईंग्लिश चित्रपट बघतो' अशा बिनबुडाच्या फुशरक्या मारणारे आणि आपण जवळजवळ सर्व मराठी संस्थळे हिंडतो / तिथे चर्चा करतो असे कौल फोडत सांगणारे एकाच मापातले आहेत बघा.
8 Dec 2010 - 2:47 pm | आत्मशून्य
१) पण तूम्हाला स्त्री देहाच्या काही विशीश्ट हलचाली अतीकलात्मक आणी अतीआ़कर्शक वाटतात
२) तम्ही तद्दन फेमीनीस्ट आहात
३) अथवा तूम्हाला अख्या चीत्रपटात फक्त हॅलेबेरीच्या सून्दर अभिनयच भावलाय
वरील पैकी एक अथवा अधीक कारणे आणी तूम्ही एकटेच हा चीत्रपट पहात होता, म्हणून हा अप्रतीम चीत्रपट भासतो.... पण तसा तो मित्रांसोबात धमाल करत बघता येउ शकत नाही असा कंटाळवाणा आहे. शेरॉन स्टोन ला असे वाया घलवलेले बघणे जास्तच दूखः देते
8 Dec 2010 - 4:57 pm | परिकथेतील राजकुमार
असु शकेल, अशा प्रकारे विचार केलाच न्हवता. मात्र पुरुष असल्याने हि सर्व कारणे ग्राह्य धरण्यास हरकत नाही.
अशा वेळासांठी कदाचीत 68 / 10 Attitudes / A Man of No Importance असे चित्रपट बघता येतील.
वाक्याचा अर्थ कळला नाही. जर तुम्हाला तिला 'वाया न गेलेले' बघण्याची इच्छा होती तर मग :-
१)तूम्हाला स्त्री देहाच्या काही विशीश्ट हलचाली अतीकलात्मक आणी अतीआ़कर्शक वाटतात
२) तम्ही तद्दन फेमीनीस्ट आहात
हे तुम्हाला देखील लागु होत नाहित काय ?
8 Dec 2010 - 5:00 pm | गवि
तम्ही तद्दन फेमीनीस्ट आहात
अँ ? फेमिनिस्ट म्हणजे स्त्रियांच्या चळवळी वगैरे करतात त्यांना म्हणतात ना?
8 Dec 2010 - 6:42 pm | नगरीनिरंजन
त्यांना मेल शॉविनिस्ट म्हणायचे असेल. समजून घ्या हो.
10 Dec 2010 - 1:38 am | आत्मशून्य
पण मी त्यांच्याबाबत नाही तर "तद्दन फेमीनीस्ट" लोकांबाबत बोलत आहे. आता वीचारा म्हणजे नक्की कोण ?
10 Dec 2010 - 1:13 am | आत्मशून्य
पण तूम्हाला स्त्री देहाच्या काही विशीश्ट हलचाली अतीकलात्मक आणी अतीआ़कर्शक वाटतात
मला माहीत नाही मिपावर हे सरळ सरळ कसे वीचारावे म्हणून मी "अतीकलात्मक आणी अतीआ़कर्शक" अशी भाषा वापरली, पण मला तूम्ही BDSM चे पंखे आहात काय असे म्हणायचे होते :)
वरील पैकी एक अथवा अधीक कारणे आणी तूम्ही एकटेच हा चीत्रपट पहात होता, म्हणून हा अप्रतीम चीत्रपट भासतो...
खरे तर अनूभव आसाच आहे की आपण एकटे(च) असतानाच हा चीत्रपट (हॅलेबेरीच्या अभिनयाने) चूकून आवडून जातो इतर कोणी सोबत असेल तर जाम बोर होतो हा रोकडा अनूभव आहे
मात्र पुरुष असल्याने हि सर्व कारणे ग्राह्य धरण्यास हरकत नाही.
हे म्हणजे चीत्रपट भारीच होता हे ग्राह्य धरा असेच सांगणे नाही काय (म्हणजे तूम्ही पूरूष आहात म्हणून चीत्रपट भारी होता असा काही अर्थ काढावा काय ?)
शेरॉन स्टोन ला असे वाया घलवलेले बघणे जास्तच दूखः देते
होय कारण तीला मूळात हलचालीच दिल्या नाहियेत...
वाक्याचा अर्थ कळला नाही. जर तुम्हाला तिला 'वाया न गेलेले' बघण्याची इच्छा होती तर मग :-
१)तूम्हाला स्त्री देहाच्या काही विशीश्ट हलचाली अतीकलात्मक आणी अतीआ़कर्शक वाटतात
या बाबत मला काय म्हणायचे आहे ते मी वर स्पश्ट केले आहे.
२) तम्ही तद्दन फेमीनीस्ट आहात
पूरूषाला स्त्री आवडने हे जर फेमीनीस्ट असेल तर मग होय आम्हाला फेमीनीस्ट म्हणाच
तरीहि तूम्हाला जाता जाता थोडे सांगतोच फेमीनीझम असलेला चीत्रपट कसा ओळखावा
१) महामूर्ख आणी महा नाजूक स्त्रीयाना प्रचंड धाडसी आणी कर्तबगार दाखवणे
Catwomen, Charlie's angels, Salt, Tomb raider
२) जाणीवपूर्वक चीत्रपटातील पूरूषपात्रांना खलनायक अथवा मंदबूध्दी आणी शारीरिक द्रूश्ट्या कमकूवत दा़खवणे, आणी स्त्रीयांचे पूरूषांवाचून काही अडत नाही असे दाखवणारे (हास्यास्पद) प्रसंग ओढून ताणून घूसडने
Catwomen, Charlie's angels, Salt,Tomb raider
३) स्त्रीयाना फक्त स्त्रीयाच compit करू शकतात असे दाखवणे
Catwomen, Charlie's angels
४) स्त्रीया महाभयानक मीशन एकट्याच पूर्ण करताना दा़खवणे
Catwomen, Charlie's angels, Salt,Tomb raider
५) खरे तर ज्या फक्त उन्हात गेल्या तर चक्कर येउन पडतील मग फाईट करणे दूरच राहो अशा स्त्रीयांना चीत्रपटातील पूरूषपात्रांचे रक्षण करताना दा़खवणे
थोड्क्यात काय तर स्त्रीयांना पूरूषांसमान न दाखावता नसताना शारीरीक द्रूश्ट्या महान आणी कर्तूत्ववान दाखवणे आनी चीत्रपटातील पूरूषपात्रांना जाणीव पूरवक कमी/कमकूवत दाखवणे...
तूम्ही म्हणाल स्त्रीया प्रमूख भूमीका असणारे सगळेच चीत्रपट तूम्ही फेमीनीस्ट म्हणनार काय ?
अर्थातच नाही मला "नीकीता" ,"रेसीडंट इवील" अथवा "अंडर वर्ल्ड" फेमीनीस्ट वाटत नाही आणी असे बरेच चित्रपट आहेत ज्यात स्त्री कलाकारांच्या मूख्य भूमीका असून सूध्दा ते बिंडोक फेमीनीस्ट नाहीत.
10 Dec 2010 - 1:20 am | राजेश घासकडवी
पराभाऊ, आहे का यावर काही उत्तर?
11 Dec 2010 - 11:02 am | परिकथेतील राजकुमार
आत्मुत्सु ह्यांच्याशी वाद न घालण्यात शहाणपणा आहे हे आम्हाला जाणवले आहे.
11 Dec 2010 - 3:05 pm | आत्मशून्य
त्यापेक्षा आत्मुत्सु यांचे विचार मान्य करायचा शहाणपणा न जाणवन्याला जबाब्दार कोन हाय ?
11 Dec 2010 - 2:49 pm | आत्मशून्य
त्यांच्या कडून कसल्या प्रतीसादाची अपेक्षा करायची ?
तेथे वीचार पाहीजेत बूध्दीचे, परीकथांचा हा प्रांत न्हवेच....
- आत्मशून्य
11 Dec 2010 - 2:58 pm | परिकथेतील राजकुमार
सहमत आहे.
आत्मुत्सु ह्यांच्याकडून एका बौद्धीक व सकलजनांना शहाणे करुन सोडणार्या लेखाची अपेक्षा आहे :)
11 Dec 2010 - 3:07 pm | आत्मशून्य
त्यासाठी परीकथांचा त्याग करावा लागेल
11 Dec 2010 - 3:33 pm | परिकथेतील राजकुमार
तुमचे लेखन वाचुन बुद्धी आणि आत्मा शुन्य होईलच मग शरिराचा पण त्याग होईलच ;)
11 Dec 2010 - 10:45 pm | आत्मशून्य
शरीर हे नश्वर आहे त्याचा त्याग अपरीहार्यच, पण तूर्तास परीकट्यांचा त्याग पूरेसा आहे....... ;)
8 Dec 2010 - 4:33 pm | प्राजक्ता पवार
मस्तं परिक्षण .....
8 Dec 2010 - 6:56 pm | निनाद मुक्काम प...
ह्या सिनेमामुळे आमच्या कुटुंबाला तिची मैत्रीण म्हणे केट वूमन म्हणायला लागली (कारण कुटुबांचे नावाचा शोर्ट फॉर्म केट आहे .)
परीक्षण जबरा आहे. बेरीचा बॉंड पटच आवडतो . .
स्टोन बाई म्हातार पणीपण बरा अभिनय करतात .नाही तर त्याची कन्यका ( ब्रूस विलीसचा चा अभिमय व आईचे (सौदर्य का मादकता) ह्यातील रत्तीभर देखील अंश नाही ho .) मात्र भय पटात फुटकळ भूमिका करते .
हिचे आईबाप हिच्यासाठी एखादा भव्य दिव्य सिनेमा का काढत नाहीत ?
शिका म्हणावं आमच्या बॉलीवूड वाल्यांकडून
8 Dec 2010 - 7:04 pm | प्रियाली
कोण कन्या? ब्रूस विलिस आणि शेरॉन स्टोन यांची कन्या आहे? मला माहित नव्हतं. असो. जरा अनुस्वारांचा वापर करा. स्टोन बाईंना त्याची असे म्हटल्याने गोंधळ उडाला.
बाकी परीक्षण वाचले नाही. चित्रपट अनेकदा पाहिला आहे. चित्रपट फ्लॉप का झाला माहित नाही. मला आवडतो.
8 Dec 2010 - 8:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
"म्हातार पणीपण" वाचताना पणीपण शब्दामुळे उगाच नवीन 'हेराफेरी'तल्या 'शिवशंकर पणीकर' या न दाखवलेल्या पात्राची आठवण झाली.
मी हा पिच्चर तुकड्यातुकड्यात पाहिला होता आणि आवडला होता. आता पुन्हा कधीतरी सलग पहातेच.
परिक्षण आवडलं रे पर्या!
निनाद, राग नका मानू, पण तुम्ही मराठी शब्द हिंदी शब्दांप्रमाणे लिहीता आहात, किंवा अनावश्यक जागी तोडता आहात. म्हातारपण, बाँडपट, भयपट, हे सगळे शब्द मराठीत एकसंध लिहीतात.
8 Dec 2010 - 7:23 pm | स्वानन्द
नेहमीप्रमाणेच झकास परीक्षण.
UTV Action वर कधी येतो आहे त्याची वाट पाहतोय :)
9 Dec 2010 - 11:59 am | परिकथेतील राजकुमार
परवाच्याच रविवारी झाला की तिकडे :) सकाळी मला अगदी शेवटी शेवटी बघायला मिळाला. पण त्या चॅनेलवर सहसा कुठलाही चित्रपट दिवसभरात दोनदा लावत असल्याने सांजच्याला संपुर्ण पहायला मिळाला.
8 Dec 2010 - 8:27 pm | निनाद मुक्काम प...
@ब्रूस विलिस आणि शेरॉन स्टोन यांची कन्या आहे? मला माहित नव्हतं
हीच तर खरी व्यथा आहे .आपली इशा देओल /झायाद खान /फरदीन निदान लोकांना ठाऊक तरी आहेत .
बाकी ध चा मा केल्याबद्दल शमस्व
घाईघाईत गोर्यांच्या नजरा चुकवून चालले असतात हे धंदे म्हणून जरा ..
8 Dec 2010 - 8:29 pm | प्रियाली
पण कोण आहे त्यांची कन्या ते सांगा की.
आता त्यांचा काय संबंध आपापसात?
8 Dec 2010 - 8:30 pm | नगरीनिरंजन
काय हा ब्रूस विलीस माणूस म्हणायचा का नरपुंगव? अरे डेमी मूर काय, शेरॉन स्टोन काय? छ्या.
9 Dec 2010 - 2:52 am | सविता
http://en.wikipedia.org/wiki/Rumer_Glenn_Willis
शेरॉन स्टोन नाही हो... डेमी मूर....ब्रूस विलिस आणि शेरॉन स्टोन यांचा निदान लग्नाचा आणि मुंलांचा तरी नक्की संबंध नाहीये....
9 Dec 2010 - 3:52 am | Nile
तुम्हाला बरी खात्री!!
9 Dec 2010 - 4:13 am | प्रियाली
रुमर विलीस आम्हालाही माहित्ये हो पण तिची आई ब्रूसची लग्नाची बायको पण वर जितक्या छातीठोकपणे सांगताहेत निनाद त्यावरून शेरॉन स्टोन आणि ब्रूस विलीस यांची अंदरकी बात त्यांना ठाऊक असावी अशी शंका आली. ;)
10 Dec 2010 - 3:09 am | निनाद मुक्काम प...
चूक झाली खरे
माझ्या पहिल्या प्रतिक्रियेत म्हटल्या प्रमाणे फोर्म विदिन हा तद्दन भुक्कड सिनेमा (नेटवरून मोठ्या टीवीवर एका केबल च्या सहाय्याने फुकटात ) पहात असताना ह्या बाईसाहेब केवळ ५ मिनिटासाठी अत्यंत फालतू रोल मध्ये होत्या .तेव्हा आमच्या कुटुंबाने तिच्या मात्या पित्याची माहिती सांगितली .
का कुणास ठावूक डेमी मूर पेक्ष्या स्टोन माझ्या डोक्यात तिची आई म्हणून फिट झाली .
असो तिच्या बद्दल बोलायचे तर बॉलीवूड वाले आपल्या पोरांना एकतर सिनेमे किंवा हॉटेल काहीतरी कामधंदे काढून देतात .हॉलीवूड वाले ह्या बाबतीत उदासीन असतात .त्यांची मुले आईबाच्या वलयातून बाहेर येउच शकत नाहीत बरेच जण आईबापाच्या पैशाने ड्रग्स वा बाकीचे पोरकट धंदे करतात ..असा काहीच आशय होता.
चूक भूल द्यावी ध्यावी .
8 Dec 2010 - 10:57 pm | स्वाती दिनेश
परिक्षण आवडले, शिनूमा बघेनच म्हणते.
स्वाती
स्वगत- हा परा हल्ली फार शिनूमे बघायला लागला आहे असं वाटतय..
9 Dec 2010 - 3:57 am | Nile
परवाच फेसबुकावर हार्ड डिस्क कुणीतरी फुकट्याने पळवली आहे म्हणुन कोणीतरी ओरडंत होतं ब्वॉ! ;-)
9 Dec 2010 - 4:14 am | मस्त कलंदर
नांव घ्यायला घाबरतोस काय रे सर्वद्वेष्ट्या नायल्या???
ती पराकडे नाहीय. त्याला दिलेली हार्ड-डिस्क मी लगेच वेळेवर परत मागून घेतली. नंतर उगीच पुणेरीपणा करत पळवली म्हणजे भामट्याने कायमचीच????
अवांतरः आमची हार्ड-डिस्क ही आमची खाजगी मालमत्ता आहे. तिची चिंता कुणा आंग्लभाषाधारी सदस्याने करू नये!!!!
9 Dec 2010 - 4:20 am | Nile
वुई डोंट टेक नेम्स.
इथे मस्त कलंदर असलेली व्यक्ती आणि तिथे फेसबुकावर क्ष नाव असलेली व्यक्ती एकच कशावरुन? मुळात मस्त कलंदर ही एकच व्यक्ती असेल कशावरुन, ग्रुप आयडी सुद्धा असु शकतो.
मुळात, तिकडे फेसबुकावर दिवसभर स्पॅम करणारा क्ष आयडी आणि इथे मिपावर मध्यरात्री उच्छाद मांडणारा मस्त कलंदर आयडी ग्रुप आयडी आहे अशी आता खात्री पटत चाल्ली आहे.
चिंता करीतो विश्वाची!
9 Dec 2010 - 4:41 am | मस्त कलंदर
>>>इथे मस्त कलंदर असलेली व्यक्ती आणि तिथे फेसबुकावर क्ष नाव असलेली व्यक्ती एकच कशावरुन? मुळात मस्त कलंदर ही एकच व्यक्ती असेल कशावरुन, ग्रुप आयडी सुद्धा असु शकतो.
तुला बाबा भारीच प्रश्न!!!
>>>मुळात, तिकडे फेसबुकावर दिवसभर स्पॅम करणारा क्ष आयडी आणि इथे मिपावर मध्यरात्री उच्छाद मांडणारा मस्त कलंदर आयडी ग्रुप आयडी आहे अशी आता खात्री पटत चाल्ली आहे.
अरे नावातच 'कलंदर' आहे. कलंदरास दिवस-रात्र अशी बंधने नसतात रे.. जाऊ दे, अजून जरा मोठ्ठा हो, मग कळेल..
>>>चिंता करीतो विश्वाची!
परि जागा चुकलासी!!!
असो, बाकीचं अवांतर आपापल्या खवमध्ये करूयात. कांताने सहकार्य करा असं लिहिलेलं वाचलं नाहीस वाटतं.
9 Dec 2010 - 4:45 am | Nile
नावात मस्त पण आहे, कसले कसले डोस घेतल्याने लोक मद-मस्त होतात ते माहित आहे आम्हाला.
स्वतःला काय ओरायनचे समजता का?
तुम्हाला आपापल्या म्हणायचं का एकमेकांच्या? स्वत:च्या खवत लिहण्याचं परमिट आमच्याकडे नाही (आणि असतं तरी स्वतःच्या खवत अवांतर करण्याइतके "मस्त- कलंदर" आम्ही नाही). बाकी तुम्ही कोण हे नक्की पटल्याशिवाय तुमच्या खवत काय लिहणार कपाळ?
मला वाटलं पराचं कंत्राट आहे म्हणुन इथे .. असो.
9 Dec 2010 - 3:06 am | इंटरनेटस्नेही
चांगले चित्रपट परीक्षण. अत्यंत चित्रदर्शी वर्णन. आत्त्ताच सदर चित्रपट डाउनलोडिंगला टाकला आहे.
-
ॠषिकेशकुमार इंटेश
मुंबई प्रदेश उपाध्यक्ष,
श्री. परिकथेतील राजकुमार संस्थापित मिसळपाव दुर्लक्षित पँथर.
9 Dec 2010 - 3:52 am | फारएन्ड
इतके दिवस बघितला नव्हता, काहीतरी फालतू असेल म्हणून. पण हे वाचून इंटरेस्ट आला आहे. बघतो आता.
9 Dec 2010 - 4:28 am | गुंडोपंत
परा छान लिहितो रे!
मला मटाच्या कमलाकरची आठवण होते तुझे लेखन वाचताना.
पुनर्जन्म हा बर्यापैकी गाभा दिसतो आहे चित्रपटाचा.
परिक्षण वाचून पाहावासा वाटतो आहे.
असेच छान लिखाण होऊ दे तुझ्या हातून...
11 Dec 2010 - 5:51 pm | वेताळ
परत कधी संधी मिळेल त्यावेळी बघता येईल.