मुंबैच्या किनारी ओबामा नाचला.. :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
8 Nov 2010 - 11:11 am

'मी हाय कोली..' या सुंदर कोलीगीतावर अखेर ओबामामामाही नाचला..

मिशेलमामी मात्र मला फार आवडल्या.. त्याही मनमोकळ्या नाचल्या.. :)

इथे पाहा..

जळ्ळा आमचा परशा कोली.. दोन टाईम फक्त दारू खायची ज्याला फक्त माहिती.. त्याचीच ओबामामामा इथे आल्यापासून सारखी हुशारी सुरू होती की " ओबामामामाला आमच्या कोली गीतांवर नाचवतो की नाय ते बग..! " :)

परशाचीही हकिकत लिहून तैय्यार होते आहे.. सवड मिळतातच इथे टाकतो..

ओबामामामा आणि मिशेलमामीनं मात्र भारतात अजून काही दिस राहावं..

अगदी नाय म्हणायला एखाद्या सकाळी आमच्या कोकणातली पानगी, आणि एका सांच्याला देशी दारू अन् आमच्या मिपाच्या ब्रिटिशने बनवलेलं झणझणीत आगरी मटन अन् भाकरी खाऊन अवश्य जावं.. :)

मात्र त्यामुळे एफ बी आय ची मंडली मात्र नाराज होतील..होऊ देत..!

आम्ही मात्र ओबामामामाला सुक्क्या जवल्याची चटनी, अन् तांदलाची भाकरी-आगरी मटन खिलवायला उत्सुक आहोत.. :)

(ओबामामामाचा अन् मिशेलमामीचा प्रेमी) तात्या.

नृत्यसंगीतसंस्कृतीसद्भावनाअभिनंदनमाध्यमवेधप्रतिक्रियाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

येऊ द्या मिपाच्या मुखपृष्ठावर मामीला .

यकु's picture

8 Nov 2010 - 11:28 am | यकु

ओबामामा,
कोण होतास तु? काय झालास तु? हे ओबामा म्हणजे अमेरिकेचेच राष्ट्राध्यक्ष ना??
एवढा वेळ असतो यांच्याकडे? म्हणजे एकाच शहरात दोन-दोन ठिकाणी भाषणं, एका ठिकाणी डान्स. पुन्हा दिल्लीत राजघाट हुंगणे वगैरे.
हा बेकार राष्ट्राध्यक्ष दिसतो. अमेरिकन जनतेनं काही कमावून दाखव म्हणून इकडे पिटाळला असेल.

बाकी बाई मस्त नाचल्या. पण कुछ फायदा नहीं.

ओबामामांपेक्षा मिशेलमामी अंमळ बर्‍या नाचत होत्या.

उपास's picture

8 Nov 2010 - 9:01 pm | उपास

थिरकला हा सध्या सगळ्या मराठी वर्तमानपत्रांचा आवडता शब्द दिसतोय.. ;)
सामन्याचा आजचा ओबामाच्या भारतभेटीवरचा अग्रलेख तथ्यपूर्ण वाटला..
असो, प्रत्येकाने आपला फायदा बघावाच त्यात गैर नाहीच.. :)
अंतू बर्वा म्हणतो, (महात्मा)गांधीला कोकणंच अप्रूप असण्याचं कारण नव्हतं, आणि (त्यांच्या भक्ताला) ओबामाला अप्रूप दाखवण्यावाचून पर्याय नाही.. ;)

विकास's picture

8 Nov 2010 - 9:35 pm | विकास

ओबामा भारतात कसे समरस होऊ शकले याचे हे चित्रिकरण बघण्यासारखे आहे. ;)

भार्रीय हो!! तुम्ही तयार केलंत का??

स्पंदना's picture

9 Nov 2010 - 7:43 am | स्पंदना

जाईल तिथ पोर नाचत होती.

काय म्हणेल जग? सगळा भारत म्हणजे बॉलिवुडचा पडदा आहे अस वाटत होत.

काय करेल बिचारा आफ्रिकेत गेला तर मसाइ लोकांच नृत्य कराव तस भारतात येउन बॉलिवुड च ठुमका स्टाइल कराव लागल. त्याच्या आजुबाजुचे नाचत होते म्हणुन त्याला सहभाग दाखवावा लागला.