स्थळ : छत्रपती शिवाजी टर्मिनल च्या आसपास चा परिसर
वेळ : साधारण रात्रीचे ८
अशीच एक स्त्याच्या कडेची चायनिस ची गाडी ...
कुठल्याही सामान्य इतर खाण्याच्या गाड्या असतात तशीच , लालभडक रंगात रंगवलेली
द्र्यागन ची भडक चित्र असलेली , आणि तसंच काहीसं नाव असलेली ..
फक्त C .S .T . परिसरात म्हणून, सोन्याची किंमत..
गाडीच्या आजूबाजूला ४ फळकुट ,४ टेबलं, गाडीच्या आतल्या बाजुला गिऱ्हाइकांच "उरलेलं ,उष्ट-माष्ट" टाकण्यासाठी एक डबा, पाण्याचं एक पिंप एवढीच काय ती investment
आजूबाजूच्या ५ स्टार,2 स्टार , किंव्हा अतिशय सामान्य हाटेलात सुद्धा जायची ऐपत नसणाऱ्या लोकांचं आश्रय स्थान .
शिवाय राती बेरात्री "land " होणाऱ्या विमानांचा ( अर्थातच बेवडे हो) विमानतळ म्हणा हवतर...
याच गाडीवरचा एक किस्सा ..
रात्र झाल्याने धंदा एकदम तुफान चाललेला , मालक घामाने डबडबून निघालेला, त्याचा "शेफ" चीनी तोतया (तो तर हवाच) मिचमिच्या डोळ्यांनी इकडे तिकडे बघत संपूर्ण भात कढईतून वर एक दोन फूट उडवून परत कढईत
झेलण्यात मग्न ......
एकूण काय तर सगळा तसा सुरळीत नेहमी प्रमाणे
पण आज गाडीवर एक नवीन कामगार रुजू झालेला असतो....
पप्पू नाव त्याचं.. त्या चीनी तोतायाचाच भाऊ ,..... गोरागोमटा , मिचमिच्या डोळ्यांचा, असेल साधारण १३-१४ वर्षांचा , तो सुद्धा मुंबईची अफाट गर्दी बघून मजबूत बावरलेला, पहिलाच दिवस असल्याने त्याला फक्त पाणी आणि फडका मारायचं काम दिलेलं असतं. मालक मात्र, वेटर आणि कॅशीअर या दोन्ही आघाड्यावर लढत असतो..... शिवाय कोणी बिल न देता मागच्या मागे कलटी तर मारत नाहीये ना.. याकडे सुद्धा लक्ष देत असतो...
होता होता १० वाजतात , आणि त्याचं वेळी एक विमान मस्त आवाज करत land होतं.... तडफडत एका टेबलापाशी येऊन धडपडत..
येsssssss शिवा (मालकाचं नाव ) .....आज मस्त दो प्लेट "लालीपाप" खिला..
already विमानात एवढं "इंधन" असताना हा अजून किती खाईल असा विचार करून शिवा स्वताशीच हसतो.... आणि ओरडतो... "दो प्लेट लोलिपोप"... तोतया कामाला लागतो...
"आज में बहुत खुश हु सिवा डार्लिंग......... , आज उसे मार दालुंगा . साली.. मुझ्हे पैसे नही देती....... " असे काहीतरी बरळत विमान खिशातून बाटली काढून अजून प्यायला लागतं... बाकीच्यांचा मस्त timepass होत असतो...
तेवढ्यात त्याची प्लेट येते... पण पहिलाच घास खाल्यावर "ब्वां ssssssssss क " विमानातला सगळ इंधन त्या "लालीपाप " वर आणि आजूबाजूला उडतं.. सगळ्यांनाच किळस येते..
ते बघून अजून एक दोन बेवडे ओकतात .....
आता मात्र शिवा जाम वैतागतो..... ए उठाव इसको.. साले जमता नय तो क्यो पिताय इतना?
ए पप्पू ये साफ कर ले सब..... और बचा खाना वो दिब्बे मे दाल दे बहार मत फेंक .....
प्रचंड किळस आलेली असताना देखील पप्पू बिचारा ते सगळं साफ करत होता
हे संपतंय तोच .. सायरन चा आवाज ऐकू येतो.... एक जीप येऊन थांबते
शिवा च्या शिव्या परत सुरु होतात...पण मनातल्या मनात, कारण.. जीप मुंबई पोलिसांची असते .....
एक विद्रूप चेहऱ्याचा , पोट सुटलेला , असा हवालदार उतरतो....उतरल्या उतरल्या त्याच तोंड सुरु होतं.
ए भड* तुला काय हिंदीत सांगू काय ? आ? अब तक खान भेजा नाही चौकी पे? क्या रोज में लेनेको औ क्या?
भो**** बांबू टाकेन ........
गाडी उभी करायचीये न उद्यापासून इथे?
आज शेवटचा आलो इथे? समजदार बन जरा...
हा साब गलती हो गयी . आज जादा भीड था तो आपका special rice बनानेको time नाय मिला...
अभी १० मिनिट में पप्पू को भेजता... में ...
साब आज माफ कर देना....
त्यावर जरा हवालदार थंड होऊन परत ४- ५ शिव्या देऊन निघून जातो.....
आता शिवाचा दीनवाणा, लाचार झालेला चेहरा बदलला असतो , त्यात जणू सूड पेटलेला होतां...
साले रोज आके फोकटका खा जाते हे हरामी......
इनकी मां कि......
शिवाचा आवाज आता घोगरा होतो.... तो शांत स्वरात "तोतया" ला ऑर्डर देतो, चल अब police rice बना.. विथ २ प्लेट लेगपीस ...
तोतया सुद्धा आता छद्मी हसतो.. त्याचे मिचमिचे डोळे जवळपास बंदच होतात..
कोणाचं लक्ष नाही असा बघून, एक प्लास्टिक चा मोठा चमचा घेऊन तो त्या " कचऱ्याच्या डब्यात" खुपसतो.... जेवढा येईल तेवढा उरलेला राइस, नुडल्स , घेतो......
एका वेगळ्या कढईत तो सगळा माल टाकतो.... मस्त नवीन मसाला , आणि नवीन तडका देऊन .. सोबत तो मगासचे "तीर्थात" पावन झालेले "लेगपीस" सुद्धा टाकतो.....
हाच तो...... "स्पेशल पोलीस राइस"
पप्पू चाललेला प्रकार डोळे फाडून बघत असतो.....
त्याच्या डोक्यात पण प्रकाश पडलेला असतो, दिवसभराचे कष्ट विसरून त्याच्या गोड गुलाबी चेहऱ्यावर आता हसू उमललेले असते ..
धावत तो पार्सेल घेऊन समोरच्या चौकीत पळतो...
इकडे शिवा परत त्याच्या धंद्यात गर्क असताना तिकडे चौकीत......
साहेब : वा जाधव काय rice आहे. गरम गरम..... मजा आ गया..... साला फुकट खायची मजाच वेगळी आहे.....
जाधव : साहेब लेगपीस घ्या ना..... मजबूत दिलेत आज..... असा झापलाय त्या भड*ला ...
साहेब : आ? rice मध्ये लेगपीस कधी पासून द्यायला लागला?
जाधव : साहेब असं काय करता...... हा आपला पोलीस राइस हाये .....
स्पेशल पोलीस राइस.................
ता. क. :-
वरील घटना पूर्णपणे काल्पनिक असून वरील पात्रांचा वा कथेचा खऱ्या घटनेशी काही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ;)
प्रतिक्रिया
5 Nov 2010 - 5:26 pm | शुचि
कहर! वर्णन अफाटच.
5 Nov 2010 - 5:56 pm | चांगभलं
अफाट वर्णन ...
हरामखोर पोलीस असेच फुकट खातात.......
मस्त झकास कथा.....
5 Nov 2010 - 5:32 pm | ५० फक्त
असंच हॉटेल मधल्या स्पेशल( पे$$$शल), चहा बद्दल असतं तिथं पण इतर गिर्हाइकांच्या कपातला उरलेला चहा एकत्र करुन देतात स्पेशल म्हणुन, त्या साठी स्पेशल चहा बनवायला फार वेळ लागतो नेहमी.
5 Nov 2010 - 6:40 pm | रेवती
ईऽऽऽऽऽ
5 Nov 2010 - 6:42 pm | इंटरनेटस्नेही
पण माझं मत असं आहे की नाहीतरी हा धंदा संपुर्णपणे बेकायदेशीर असताना पोलिसांना दोन प्लेट राईस दिला तर काय बिघडलं? सरकारी नोकराला काही जास्तीच मिळालं की सगळ्यांच्या पोटात दुखत असेल तर तो मानवतेला काळीमा आहे.
(व्यवहारी) इंट्या.
5 Nov 2010 - 6:52 pm | स्पा
पण माझं मत असं आहे की नाहीतरी हा धंदा संपुर्णपणे बेकायदेशीर असताना पोलिसांना दोन प्लेट राईस दिला तर काय बिघडलं?
__/\__
:)
5 Nov 2010 - 7:21 pm | इंटरनेटस्नेही
__/\__
स्पा ला धन्यवाद.. अरे या दुनैयेत असेच वागाव लागतं..
5 Nov 2010 - 7:32 pm | पैसा
सगळंच ईईईऽऽऽऽ याक! पोलीस पण..
आणि इंट्याची प्रतिक्रिया पण कहर आहे!
5 Nov 2010 - 7:35 pm | अडगळ
कोल्हापूरात काही फाळकूट दादा मांसाहरी खानावळीत असंच फुकट खातात.
त्यांच्या या खास ताटाला बॉस ताट म्हणतात.
5 Nov 2010 - 9:26 pm | चिगो
हे असले विचार करत जाऊ नकोस... आणखी अपचन होईल... ;-)
जबरा लिवलयंस... चुरचुरीत किळसंवाणं... हॅ हॅ हॅ..
5 Nov 2010 - 9:30 pm | स्पा
हॅ हॅ हॅ.. :)
5 Nov 2010 - 9:48 pm | चिगो
झ्याक... काय चुरचुरीत किळसवाणं लिहीलयंस, व्वा... ;-)
5 Nov 2010 - 10:33 pm | सुक्या
किळसवाणं आहे खरं, पण फुकटखाउ लोकांना असे काही देउन त्या अन्यायाची भरपाइ कोणी करुन घेत असेल तर मला तरी त्यात काही वावगं वाटत नाही. बाकी पोलिस नेहमी फुकटच खातात असे काही नाही परंतु बरेच पोलिस तसे आहेत.
5 Nov 2010 - 10:48 pm | मराठमोळा
>>वरील घटना पूर्णपणे काल्पनिक असून वरील पात्रांचा वा कथेचा खऱ्या घटनेशी काही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
हॅ हॅ हॅ....
बर्याच ठिकाणी याला कुत्ता पाव भाजी, कुत्ता चायनीज, कुत्ता बिर्याणी म्हणतात. फुकटखाऊ आले की उरलेला, सांडलेला सगळा माल एकत्र करुन पॅक करुन पाठवला जातो.. ;)
नुसतं एवढच नाही मित्रांनो, कोणत्याही रेस्टॉरंट मधे गेल्यावर वेटरशी वाईट वर्तन करु नये.. नाहीतर समोर आलेली डिश कितीही अप्रतिम दिसत असली तरी तिच्यामागे काय ईतिहास घडलाय हे सांगण कठीण असतं. (सौजन्यः हॉटेल मॅनेजमेंट ची पदवी घेतलेला आत्येभाऊ) ;)
5 Nov 2010 - 10:52 pm | बिपिन कार्यकर्ते
किळसवाणं!!!
5 Nov 2010 - 11:01 pm | यकु
स्पा,
ईईईईईईईई.........य्य्य्याक्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क वगैरे
उदगार आले असले तरी जसं होतं तसं इथे मांडल्याबद्दल तुझे आभार.
शिवाय लेखन जबराट असल्यामुळे वाचणारा पण तिथे होता असा फील आला आहे.
बिलकुल भीडभाड न बाळगता लिहीत राहा आणि अशीच रिअॅलिटी आम्हाला वाचायला मिळो.
5 Nov 2010 - 11:28 pm | प्रियाली
थोड्यावेळापूर्वी जेवता जेवता लेख वाचायला घेतला. लेखाआधी प्रतिसाद वाचण्याच्या (वाईट) सवयीमुळे ४-५ वाक्यांनंतर काहीतरी भयंकर होणार आहे याची जाणीव झाली आणि लेख बंद केला. ;)
आता पूर्ण वाचला. जेवण तासाभरात बरंच खाली गेलं आहे. तेव्हा वाचला असता तर बिच्चार्या किबोर्डची शामत नव्हती. ;)
6 Nov 2010 - 7:40 am | स्पा
घटना किळसवाणी असली तरी....
प्रत्यक्षात असे किस्से घडतात.....
"ममो" ने सांगितल्याप्रमाणे आपल्याबरोबर पण असं होऊ शकतं..
त्यामुळे बाहेर खाताना.. जरा जपूनच........
एवढाच संदेश.....
6 Nov 2010 - 11:44 am | अवलिया
मस्त !!
6 Nov 2010 - 8:38 pm | प्रीत-मोहर
शीईईईईईईई
6 Nov 2010 - 11:02 pm | सूड
अगदी किळसवाणं, तरीही छान जमलंय !! पण एक चूक झाली जेवणाच्या अगोदर वाचला मी हा लेख.
7 Nov 2010 - 7:16 am | स्पंदना
आज उपास!
7 Nov 2010 - 7:50 am | स्पा
:)
बरंय न .... तेवढाच पोटाला आराम...
7 Nov 2010 - 9:14 am | मदनबाण
मस्त लिवलं हाय... :)
मी तर बर्याच वेळेला पोलिसांना पैसे खाताना पाहिले आहे !!! हा पोलिस राइस खायला वेळ कसा मिळाला त्यांना ? ;)
7 Nov 2010 - 9:17 am | स्वानन्द
लई भारी ( चायला खरं तर ... बुळ्ळुक्..व्वॉक )
बाकी ती विमानाची उत्प्रेक्षा मस्तच!
7 Nov 2010 - 10:29 am | स्पा
मनापासून धन्यु................. :)
__/\__
7 Nov 2010 - 10:52 am | वेताळ
पोलिस लाचखोर आहेत म्हणुन तो चायनिज गाडीवाला नितीवान ठरत नाही. त्याचा बेकायदेशीर धंदा पोलिसाच्या डोळेझाक पणा मुळे निदान चालतो आहे त्यामुळे त्याचे व इतर लोकाचे पोट भरत आहे हा तो विसरला आहे. जर त्याचा धंदा पोलिसानी बेकायदेशीर आहे म्हणुन बंद केला तर हेच मानवतावादी पोलिसांच्या अन्यायाविरुध्द टाहो फोडताना दिसतील.पोलिस रात्री तो फुकट जेवण देतो म्हणुन त्याचा धंदा बंद करत नाहीत तसे त्याने देखिल त्याच्यामुळे रात्री उशीरपर्यत धंदा चालु राहतो म्हणुन पोलिसांना जेवण दिले पाहिजे.
शेवटी दोघेही बेकायदेशीर वागत आहेत , तर त्यात तरी निदान प्रामाणिकपणा दाखवावा.
7 Nov 2010 - 10:58 am | स्पा
पोलिस लाचखोर आहेत म्हणुन तो चायनिज गाडीवाला नितीवान ठरत नाही.
चायनिज गाडीवाला नितीवान आहे असे ह्यात कुठेच म्हटलेले नाहीये .
बेकायदेशीर धंदा
कायदेशीर परमिट असून देखील, पोलीस अरेरावी करतातच.
शेवटी हा लेख कोणाची बाजू म्हणून लिहिण्यात आलेलाच नाहीये... तर एका third person च्या नजरेने मांडण्यात आलेला आहे....
धन्यवाद.......
7 Nov 2010 - 11:06 am | वेताळ
गाडी चालु ठेवण्याचे असते. पण बर्याचदा पोलिसाच्या सहकार्याने हे लोक रात्री २ ते ३ वाजेपर्यंत धंदा करत असतात. हे जरी चुकीचे असले तरी बर्याचदा रात्री खाणार्याचे त्यामुळे वांदे होत नाहीत. कधीतरी गाड्यावर दंगा झालातर पोलिसगाडीवाल्याला संरक्षण देखिल देतात. मग त्याना जेवन देताना असे वागणे चुकीचे आहे.
7 Nov 2010 - 3:23 pm | गांधीवादी
राजकारण बाजूला ठेऊन, लेख आवडला.
आता राजकारण,
>>त्याना जेवन देताना असे वागणे चुकीचे आहे.
गाडीवाल्यांना संरक्षण देणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. त्यासाठी त्यांना सरकारकडून यथोचित मानधन मिळते.
राहिला प्रश्न, २ ते ३ वाजेपर्यंत गाड्या चालू ठेवण्याचा, अश्या गाडीवाल्यांनी रात्रभर गाड्या चालू ठेवण्याचे रीतसर परमिट काढून घ्यावे. जर लोकांना रात्रभर खाणे हि एक सामाजिक गरज असेल तर सरकारला अशी परवानगी देण्याचा विचार करायला काय हरकत नाही. पण असे धंदे बेकायदेशीरपणे चालू न राहणे हेच समाजासाठी हिताचे.
>>हे जरी चुकीचे असले तरी बर्याचदा रात्री खाणार्याचे त्यामुळे वांदे होत नाहीत.
काही जणांचे वांदे टाळण्यासाठी कायदा मोडणे हे काही योग्य नाही. इथेच तर भ्रष्टाचाराची सुरुवात होते.
माझ्या मते या फुकट खाऊ पोलिसांना लेखातील 'पोलीस राइस' नाही तर त्याच्या सोबत **** *** द्यायला पाहिजे.
प्रस्तुत लेखातील गाडीवाल्याला माझे समर्थन नाही. पण पोलिसाला हि नाही.
7 Nov 2010 - 10:34 am | ब्रिटिश टिंग्या
:)
7 Nov 2010 - 1:08 pm | स्वाती दिनेश
कथा वाचताना इइइइ, य्य्याक असे मनात येते यातच तिचे यश आहे,
म्हणजे एखाद्या खलनायकचे दुष्ट काम पाहून त्याच्याबद्दल भीती, तिरस्कार वाटतो तसेच काहीसे..
पुलेशु!
स्वाती
7 Nov 2010 - 5:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>कथा वाचताना इइइइ, य्य्याक असे मनात येते यातच तिचे यश आहे,
अगदी खरं आहे.
पुलेशु
-दिलीप बिरुटे
7 Nov 2010 - 6:13 pm | चिंतामणी
याचा Long form माहीत आहे का?
तुम्ही म्हणाल "महाराष्ट्र पोलीस."
हा बरोबर आहे पण मला अभीप्रेत अर्थ वेगळा आहे.
मला पोसा.
(गमतीतसुध्दा कुठल्याही पोलीसाला म्हणू नका)