कव्वाली: एक उत्कट गायनप्रकार भाग २

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
1 Aug 2010 - 3:36 am

पहिल्या भागात कव्वाली या संगीतप्रकाराविषयी मला ज्ञात असलेली थोडीशी माहिती दिली होती, यात कव्वालीचा इतिहास, ती गाण्याची पद्दत आणि चित्रपटांमध्ये कव्वालीचा शिरकाव यांविषयी माहिती होती. आज दुसर्‍या भागात सार्वजनिक मैफिलींमधील धार्मिक कव्वालींची काही उदाहरणं पाहूयात.

(चित्रपटांमधील कव्वाल्या येतील तिसर्‍या भागात, लवकरच).

तुमच्या प्रतिसादांत आणखी उदाहरणं येउ द्यात, चला घेउ यात 'लुत्फ-ए- कव्वाली'!

पहिली धार्मिक कव्वाली आहे दमा दम मस्त कलंदर. हझरत लाल शाहबाझ कलंदर या सूफी संताचं हे स्मृतीगान. शाहबाज कलंदर या फकीराचं मूळचं नाव होतं सय्यद मोहम्मद उस्मान. त्याचा जन्म ईराण-अज़रबैजान सीमेवरील मरवंद गावातला. (१११७) या गाण्याच्या मागची पार्श्वभूमी ही की शाहबाज कलंदर याने हिंदू-मुस्लीम सलोख्यासाठी प्रयत्न केले, आणि सिंध प्रांतातले हिंदू (आणि आजच्या भारतातले सिंधीही) त्याला कृष्णाचा अवतार (झुलेलाल) म्हणून ओळखतात.

'दम' म्हणजे श्वास, 'दमादम' (दम-आदम) म्हणजे श्वासोच्छ्वास; श्वासोच्छ्वासावर (प्राणावर) ज्याचं पूर्ण नियंत्रण आहे आणि जो सदा-सर्वकाळ मनस्वी आनंदी आहे, असा शाहबाझ कलंदर - त्याची ही प्रार्थना.

पूर्ण भजन खाली देतो आहे, अर्थासहः (चूक-भूल द्यावी घ्यावी)

ओ लाल मेरी पत रखियो बला झूले लालण
सिंदडी दा सेवण दा सखी शाहबाज़ कलंदर
दमा-दम मस्त कलंदर, अली दम दम दे अन्दर
दमा-दम मस्त कलंदर, [अली दा पहला नंबर - हे शब्द मूळ गाण्यात नसावेत}

[हे सिंधच्या झुलेलाल देवा, शेवान प्रांताच्या राजा,
लाल वस्त्रांतल्या मस्त कलंदरा, माझं कायम रक्षण कर (मेरी पत रखियो)]

चार चराग तेरे बरण हमेशा
पंजवा मैं बारण आई बला झूले लालण
सिंदडी दा सेवण दा सखी शाहबाज़ कलंदर

[तुझ्या मंदिरात चार दिवे कायम असतात
मी तुझ्या आदरार्थ (माझ्या प्राणांचा) हा पाचवा दिवा घेऊन आलो आहे]

हिंद सिंद पीरा तेरी नौबत बाजे
नाल बाजे घड़ियाल बला झूले लालण
सिंदडी दा सेवण दा सखी शाहबाज़ कलंदर

[तुझ्या शौर्याचं गान हिंद आणि सिंध भर गाजू देत
दर प्रहराच्या नादाबरोबर तुझा घोष होवो (घडियाल= प्रहरी; symbolism of night )]

हर दम पीरा तेरी खैर होवे
नाम-ए-अली बेडा पार लगा झूले लालण
सिंदडी दा सेवण दा सखी शाहबाज़ कलंदर

[हे देवा, तू कायमच माझं रक्षण कर
आणि माझी नौका पार करून दे]

बर्‍याच कव्वालांनी ही कव्वाली गायलीय, सर्वांत प्रसिद्ध असलेले कव्वाल म्हणजे नुसरत फतेह अली खान, साब्री ब्रदर्स आणि बांगला देशची रूना लैला.

(नुसरत प्रसिद्ध होते त्यांच्या आवाजाच्या पहाडी तानांबद्दल. Superb control आणि improvisation यांसाठीही प्रसिद्ध असणार्‍या या गायकाची माझी पहिली 'कान-ओळख' नव्वदीच्या दशकाच्या सुरूवातीला. तेंव्हाच तो 'आडमाप' देह पाहून "हा कसा इतक्या टीपेने गातो बाबा" असं वाटलं तेंव्हाच 'याच्या heart चं काही खरं नाही, हा cardiac arrest ने जाणार' असं मी मित्रांत म्हंटलं होतं, १९९७ साली माझी बत्तिशी खरी ठरली तेंव्हा खूप वाईट वाटलं!)

नुसरत यांच्या या प्रत्यक्ष कव्वालीचा व्हिडीओ इथे embed करू शकत नाही ते तुम्ही खाली दिलेल्या दुव्यावर पाहू शकाल.

दुवा १: नुसरत फतेह अली खान - या व्हिडिओत मैफिलीतल्या कव्वालीतले बरेच पैलू पहायला मिळतील, प्रेक्षकांचा बेधुंद सहभाग, जीव तोडून वाजवलेला तबला-ढोलक, नुसरतचे आलाप, सरगम...

या खाली दिलेला नुसरत चा मूळ व्हिडिओ नाही, पण त्याचं voice-over आहे, यू ट्यूब वर मिळणार्‍या आधी दिलेल्या मैफलीतल्या वरच्या गाण्यापेक्षा इथल्या गाणं हे फ्यूजन कव्वालीच्या प्रकारातलं. घरी (किंवा ऑफिसात हेडफोन लावून!) जमणार असेल तर हा व्हिडिओ चांगल्या स्टिरीओ स्पीकर्स वर ऐका, अफलातून साऊंड इफेक्ट्स आहेत!

" alt="" />

आणि आता ऐका रूना लैलाचं अप्रतिम गोडव्याचं गाणं (हो, 'ऐका', तिने प्रत्यक्ष म्हंटलेल्या गाण्याचे जे व्हिडिओज् मला यू ट्यूब वर पहायला मिळाले ते दुर्दैवाने -काही प्रेक्षणीय असले तरी- श्रवणीय नाही वाटले मला, कुणाला चांगले मिळाले तर जरूर द्या प्रतिसादात)

" alt="" />

साब्री ब्रदर्स नी गायलेली हीच कव्वाली इथे ऐका, या सादरीकरणात नुसरत घेतात ते आलाप टाळून सरळ कव्वालीलाच सुरूवात आहे, पण मध्ये सरगम मात्र आहे (शिवाय तबलजीला मध्ये खास वाव देऊन दाद दिली आहे तीही ऐकण्यासारखी!):

" alt="" />

दुसरी धार्मिक कव्वाली देतोय नुसरत फतेह अली खान यांची:

अली अली मौला अली अली
: व्हिडिओच्या प्रत्येकी दहा मिनिटांच्या दोन भागांत असलेली या कव्वालीची काही वैशिष्ट्ये:
- सुरूवातीलाच दिसणारा नोटांचा ढेर ('वेल')
- पहिली ३-एक मिनिटे चालणारा अप्रतिम तबला
- नंतरची २ मिनिटांहून आधिक असलेले आलाप
- कव्वालीभर मधून-मधून नुसरत आणि सह-गायकांनी घेतलेल्या कधी-कधी अशक्य वाटणार्‍या ताना
- 'अली, अली, अली ही अली, अली, अली' हे अत्यंत नजाकतीने म्हंटलंय ती जागा
- आणि मधून मधून सातत्याने 'वेल' टाकणारे रसिक प्रेक्षक

Enjoy!

भाग १:

भाग २:

तिसरी कव्वाली आहे नुसरत यांचीच "आफरी, आफरी"

पुढली कव्वाली आहे साब्री ब्रदर्सनी गायलेली "मुझे नजारे कदम की भीख़ मिले, मै झोली ख़ाली लाया हूं" ही:

पुन्हा एकदा नुसरतः मेरा पिया घर आया, ओ बालनी

हे गाणं प्रेमाशी संबंधित आहे, आता हे प्रेम पहिल्या भागात लिहिल्याप्रमाणे इश्वराचं की प्रियतमेचं हे गुलदस्तातच आहे! म्हणूनच कदाचित हे गाणं रूप बदलून 'मेरा पिया घर आया, हो रामजी' म्हणत हिंदी सिनेमात दाखल झालं असावं!

तेच मेरा पिया घर आया, ओ बालनी, साब्री ब्रदर्स च्या आवाजात या दुव्यावर पहायला मिळेल. [या बंधूंपैकी एक अजरामर विनोदी कलाकार मेहेमूदसारखा दिसतो (आणि हे मला जाणवलं त्याचक्षणी शेजारच्या दुसर्‍या भावाने मेहेमूद सारखंच "अल्लाSS!" म्हंटलं तेंव्हा गंमत वाटली होती!)]

प्रेम हीच भावना घेऊन पुढे सरकलो आहोत तर
'पियासे भेद मिलाओ' ही नुसरत फतेह अली खान
यांची आणखी एक प्रसिद्ध कव्वाली ऐकुयात.

या कव्वालीतही नुसरत आणि सहकलाकारांचे आलाप, सरगम ऐकण्यासारखे आहेत.

आणि आता एक नमूना कव्वालीला वाहिलेल्या सातव्या पीढीचा, नुसरत चा मुलगा राहत फ़तेह अली खान याने गायलेली 'देवाहून श्रेष्ठ अश्या आईचे' गुणगान गाणारी ही कव्वाली

सुणिया ज़माने विच फ़रिश्ते न हों दे रे,
नाल सा ण देणे वाले रिश्ते न हों दे रे
मां णु ना देखे आप, फ़रिश्ता ना देखे आप
मां नाले वड्डा कुछ रिश्ता ना देखे आप

आणि आता आहे, मैफिलीतील धार्मिक कव्वाली आणि चित्रपटातील धार्मिक कव्वाली यांच्या सीमारेषेवरची, नुकत्याच येऊन गेलेल्या जोधा अकबर या चित्रपटातील ए आर रेहेमान ने संगीतबद्द केलेली आणि उत्कृष्ट चित्रीकरणाने गाजलेली 'ख़्वाज़ा मेरे ख़्वाज़ा' ही जावेद अख़्तर लिखित, ए आर रेहेमाननेच गायलेली अप्रतिम कव्वाली:

शेवट करतो आहे मला अत्यंत आवडणार्‍या एका अजरामर कव्वालीने.
चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा: १९७० च्या सुमारास ऐकण्यात आलेली ही शायर कैसर रत्नागिरवी यांची रचना गायलीय त्यावेळचे सुप्रसिद्ध कव्वाल अझीझ नाझा यांनी. कधीही, कोणत्याही यशाची मस्ती माज म्हणून डोक्यात का जाऊ नये, आणि ती ज्यांच्या डोक्यात गेली त्यांचे इतिहासाने काय शिल्लक ठेवले हे केवळ ऐकण्यासारखे आहे.

या अत्यंत अर्थपूर्ण कव्वालीचे संपूर्ण शब्द द्यायचा मोह आवरत नाही, व्हिडीओ पाहतांना ते डोळ्यासमोर असू द्यात (या साठी व्हिडिओ नव्या खिडकीत उघडावा लागेल, आणि दोन्ही खिडक्या आजू-बाजू ला पहाव्या लागतील, ही गैरसोय मान्य आहे, पण trust me, it will be worth the trouble!)

हुये नामवर बेनिशाँ कैसे-कैसे !
जमीं खा गई, नौजवान कैसे-कैसे !
आज जवानी पर इतराने वाले, कल पछताएगा,
चढता सूरज धीरे धीरे, ढलता है ढल जायेगा ॥

तू यहां मुसाफ़िर है, ये सरा-ए-फ़ानी है,
चार रोज़ की मेहमां तेरी जिंदगानी है,
ज़र, जमीं, ज़ेवर कुछ न साथ जायेगा ,
खाली हाथ आया हैं, खाली हाथ जायेगा ।
जान कर भी अनजाना बन रहा है दीवाने ,
अपनी उम्र-ए-फ़ानी पर तन रहा है दीवाने ।

इस कदर तू खोया है, इस जहां के मेले में,
तू खुदा को भूला है, फ़ंस के इस झमेले में ।

आज तक तो देखा है, पाने वाला खोता है,
ज़िंदगी को जो समझा ज़िंदगी पे रोता है,

मिटने वाली दुनिया का ऐतबार करता है,
क्या समझ के तू आखिर इस से प्यार करता है ?

अपनी-अपनी फ़िक्रों में जो भी है, वोह उलझा है,
ज़िंदगी हकीकत में क्या है, कौन समझा है ?
आज समझलें...
आज समझलें, कल यह मौका, हाथ न तेरे आयेगा,
ओह गफ़लत की नींद में सोने वाले, धोखा खायेगा ।
चढता सूरज धीरे धीरे, ढलता है ढल जायेगा ॥

मौत ने जमाने को क्या समां दिखा डाला,
कैसे कैसे रुस्तम को खाक में मिला डाला ।
याद रख उस सिकंदर के हौसले तो आली थे,
जब गया था दुनिया से, दोनो हाथ खाली थे ।
अब ना वोह हलाकू है, और ना उसके साथी है,
जंग-जु ना पौरस और ना उसके हाथी है ।
कल जो तनके चलते थे, अपनी शानों शौकत पर ,
शम्मा तक नहीं जलती आज उनकी तुरबत पर ।
अदना हो या आला हो ,
सबको लौट जाना है,
मुफ़्लिस-ओ-तवंगर का कब्र ही ठिकाना है ।
जैसी करनी...
जैसी करनी-वैसी भरनी, आज किया कल पायेगा,
सर उठा कर चलने वाले, एक दिन ठोकर खायेगा ।
चढता सूरज धीरे धीरे, ढलता है ढल जायेगा ॥

मौत सबको आनी है, कौन उससे छूटा है,
तू फ़नाह नहीं होगा, ये खयाल झूठा है ।
सांस टूटते ही सब रिश्ते टूट जायेंगे,
बाप, मां, बहेन, बिवी, बच्चे छूट जायेंगे ।
तेरे जितने भाई है, वक्त का चलन देंगे,
छीन कर तेरी दौलत, दो ही गज कफ़न देंगे ।
जिन को अपना कहता है, कब यह तेरे साथी है ?
कब्र है तेरी मंजिल और यह बाराती है ।
लाके कब्र में तुझको मुर्दा-पाक डालेंगे,
अपनेही हाथों से तेरे मुंह में खाक डालेंगे ।
तेरी सारी उल्फ़त को खाक में मिला देंगे ,
तेरे चाहने वाले कल तुझे भुला देंगे ।
इसलिए ये कहता हूं, खूब सोचलें दिलमें,
क्यूं फ़सायें बैठा है, अपनी जान मुश्किल में ?
कर गुनाहों से तौबा , आगे वक्त संभल जाए ..आगे वक्त संभल जाए ,
दम का क्या भरोसा है, जाने कब निकल जाए ।
मुठ्ठी बांध के आने वाले... हाथ पसारे जाएगा ।
धन-दौलत-जागीर से तुने क्या पाया है, क्या पायेगा ?
चढता सूरज धीरे धीरे, ढलता है ढल जायेगा ॥

नामवर: नामवंत (well-known)
बेनिशाँ: खूण ही नष्ट झालेले, विस्मृतीत गेलेले (forgotten)
गफ़लत: बेहोश / बेसावध
सरा-ए-फ़ानी: मृत्यूलोक
समां: दृष्य /देखावा
सिकंदर: Alexander
पौरसः सिकंदराशी झुंज देणारा राजा पौरस
आली: उत्तुंग
तुरबतः मजार/ समाधी
अदना: लहान
आला: मोठे
मुफ़्लिस-ओ-तवंगर: गरिब (निर्धन) आणि श्रीमंत
फ़नाह: नष्ट
खाक: माती
उल्फ़त: प्रेम

" alt="" />

हा भाग आवडला असेल अशी आशा आहे.
पुढील भागात घेऊन येणार आहे हिंदी चित्रपटांतील काही प्रसिद्ध कव्वाल्या.

संगीतधर्मइतिहासप्रेमकाव्यभाषाआस्वादमाध्यमवेधविरंगुळा

प्रतिक्रिया

पुष्करिणी's picture

1 Aug 2010 - 3:58 am | पुष्करिणी

मस्तच झालाय हा भागही.

मौला मौला मौला मेरे मौला
दरारे दरारे है माथे पे मौला
मरम्मत मुक्कदर की करदो मौला

ही कवाली पण आवड्ते खूप मला. लिंक काही मिळत नाहीये पण यु-ट्युबवर

अर्ज़ियां - देल्ही सिक्स मधील कव्वाली, सुंदरच आहे (पण मी ती पुढच्या चित्रपटांवरील भागात टाकणार होतो, तुम्ही मला pre-empt केलं, काही हरकत नाही, धार्मिक आहे म्हणून इथेही चालेल.)

बहुगुणी's picture

1 Aug 2010 - 5:50 am | बहुगुणी

राहत फतेह अली खान हा नुसरत फतेह अली खान यांचा पुतण्या आहे, मी वर म्हंटल्याप्रमाणे मुलगा नव्हे.

अरे वाह!!! ही मेजवानी नजरेस पडलीच नव्हती.

बहुगुणी तुमच संगीत प्रेम ठाउक होतच (त्या शिवाय का ती अफलातुन कानसेन मालिका उदयास आली?) पण तुमचा संगितातला अभ्यासही दांडगा आहे हे या कव्वाली मालिकेतुन दिसतय.

कव्वाली शी पहिल्यांदा ओळख झाली ती हिंदी चित्रपटांमुळेच.
आणि मग कव्वालिचा सरताज चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा ऐकण्यात आली आणि प्रेमातच पडलो.
या मलिकेतुन मस्त मस्त कव्वाल्या तर ऐकायला मिळतायतच पण त्याबद्दल नवी माहितीही कळतेय.
अजुन एक आवडलेली कव्वाली म्हणजे ब्लॅक फ्रायडे मधली . दुवा मिळाला तर देतोच.

बहुगुणी's picture

1 Aug 2010 - 8:00 pm | बहुगुणी

प्रतिसादाबद्दल धन्यवाद, गणपा.

तुम्ही "अरे रूक जा रे बंदे" या गाण्याविषयी म्हणता आहात का? या व्हर्जन मध्ये तरी ते गाणं कव्वाली नसावं असं वाटतं (टाळ्या ऐकू येत नाहीत), दुसरं कोणतं आहे का?

धनंजय's picture

1 Aug 2010 - 6:17 am | धनंजय

आता एक-एक करून दुवे ऐकायला घेतो.

फक्त वाचूनच झूलेलालबद्दल जी माहिती समजली, ती नवीन होती, आवडली. ऐकूनतर मजाच मजा येईल.

चित्रा's picture

1 Aug 2010 - 6:46 am | चित्रा

रूना लैलाची "दमा दम" आम्ही लहानपणी मन लावून ऐकत असू आणि तिला कधी गाणे टीव्ही वर लागले तर झुलत नाचत गाणे म्हणताना पाहणे म्हणजे गंमतच असायची.

माहितीपूर्ण उत्तम लेख. ऐकते आता सगळी गाणी हळूहळू.

स्वाती२'s picture

1 Aug 2010 - 7:42 am | स्वाती२

दोन्ही लेख अतिशय आवडले.

अतिशय अभ्यासपूर्ण आणि सुरेख लेख! आवडला!!

'चढता सुरज' कव्वाली लहानपणी मी खूपदा ऐकली आहे.
आमच्या वस्तीत शोलेचे डायलॉग जेवढे लोकप्रिय होते तेवढीच ही कव्वालीही.
त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात ती कधीही वाजत असे.

http://www.manogat.com/node/13700

वरील दुव्यावर मी तिच्या मराठीत केलेल्या अनुवादाचा एक भाग वाचता येईल!

क्रान्ति's picture

1 Aug 2010 - 10:34 am | क्रान्ति

हा लेखही. अतिशय माहितीपूर्ण आणि श्रवणीयही! मस्त कलंदरचा अर्थ प्रथमच व्यवस्थित कळला. मालिकेतील पुढच्या भागाची वाट पहातेय.

प्रकाश घाटपांडे's picture

1 Aug 2010 - 12:11 pm | प्रकाश घाटपांडे

वाचताना आमच्या सारख्या अनभिज्ञ लोकांना देखील एका अनोख्या मैफीलीत सामावुन घेतल्याचा आनंद मिळाला.

..मी स्वतः देखील अनभिज्ञच आहे हो!

मी केवळ एक हौशी 'ऐकणारा' म्हणून हे लेख टाकतो आहे, मला संगीतातलं काही कळतं हा माझा मुळीच दावा नाही, इथल्या खर्‍या संगीतातील दर्दी लोकांकडून शिकायला मिळावं हाच उद्देश आहे हे स्पष्ट करायला हवं.

अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Aug 2010 - 12:28 pm | बिपिन कार्यकर्ते

प्रणाम!!!

स्वाती दिनेश's picture

1 Aug 2010 - 12:32 pm | स्वाती दिनेश

खूप वाट पहायला न लावता लगेच २रा भाग टाकलात, धन्यवाद.
हा लेखही आवडला.कव्वालींचे दुवे आता एकेक करुन ऐकते.
स्वाती

प्रदीप's picture

1 Aug 2010 - 1:04 pm | प्रदीप

वाचतोय.

रूना लैला प्रथम ७५ साली जेव्हा आली ती हीच 'दमादम मस्त कलंदर' घेऊन. तिचा तेव्हाचा टी. व्ही. कार्यक्रमातील तो पर्फॉर्मन्स (तिची वेशभूषा व तिचे हावभाव) पाहून सदर गीत काहीतरी हॉट शृंगारिक चीज आहे अशी माझी तेव्हा समजूत झाली होती!

वरील सगळ्याच क्लिप्स पाहिलेल्या नाहीत, हळूहळू पहातोय. नुसरत फते अलींची 'दमादम मस्त कलंदर' छान वाटली, साब्री ब्रदर्सच्या ह्याच कव्वालीची सुरूवात छान वाटली, हे काहीतरी वेगळेच आहे असे म्हणतो न म्हणतो एव्हढ्यात गायक व तबला 'जुगलबंदी' सुरू झाली. पुढील काही पहावले/ ऐकवले नाही.

चित्रपटातील कव्वाल्या पुढील भागात येणार आहेत, तरीही रफीसाहेबांच्या ३० व्या पुण्यतिथीच्या दिनानिमीत्ता त्यांच्या तीन कव्वाल्या (तिन्ही चित्रपटातील) इथे देत आहे:

१. पर्दा है पर्दा (अमर, अकबर, अ‍ॅंथनी: एल. पी.)

ह्यापुढीला दोन्ही कवाल्या 'लैला मजनू' मधील आहेत (मदन मोहन). चित्रपटात त्या एकामागोमाग येतात-- एक पर्वणीच आहे ती.
२. तेरे दर पे आया हूं

३. होके मायूस तेरे दर से सवाली न गया

बहुगुणी's picture

1 Aug 2010 - 7:51 pm | बहुगुणी

मी देणार होतो पुढच्या लेखात, पण रफींची पुण्यतिथी साधून तुम्ही वर दुवे दिलेच आहेत तर लैला मजनू मधीलच तिसर्‍या तितकीशी न गाजलेल्या "ये दिवाने की ज़िद है के अपने दीवाने के खातिर आ" या कव्वालीचाही इथेच दुवा देतो आहे.

प्रदीप's picture

1 Aug 2010 - 8:44 pm | प्रदीप

कव्वाली ह्या सदरात मोडते का?

बहुगुणी's picture

1 Aug 2010 - 9:06 pm | बहुगुणी

...पण तबला/ढोलक, हार्मोनियम, सारंगी आणि टाळ्या हे elements background मध्ये ऐकू येतात म्हणून माझी तशी समजूत होती (आणि चित्रपटात कव्वाली define करायला 'दृश्य' स्वरूपात हे सर्व असायलाच हवं की नाही हे माहित नाही) , पण साथीदारांचा कोरस नाही हे खरं, तेंव्हा नसेलही ही कव्वाली कदाचित, तुमचं काय मत आहे ते कळवलंत तर आवडेल. धन्यवाद!

मेघवेडा's picture

1 Aug 2010 - 2:50 pm | मेघवेडा

अहाहा! बहुगुणीजी, मस्तच! दमादम मस्त कलंदर, चढता सूरज, आफरी, अली मौला तर अत्यंत आवडीच्या आहेतच, पण साब्री ब्रदर्सच्या तितक्या ऐकल्या नव्हत्या. मस्तच आहेत. नुसरत फतेह अली खाँसाहेबांच्या तर एकसे एक आहेत! त्यांची अशीच अजून एक आवडणारी - 'सानु इक पल चैन ना आवे, सजना तेरे बिना'. तुम्ही पुढल्या भागात याबद्दल लिहालच असं समजून दुवा देत नाही! :)

मस्त उपक्रम. आणखी येऊ द्या!

मी आधी 'सानु इक पल चैन ना आवे' हे एक सुंदर भजन आहे, पण ती by definition कव्वाली नाही, असं समजून चाललो होतो, कारण बरेचदा (खालच्या पहिल्या व्हिडीओप्रमाणे) पाहिलं तर कव्वालीचं एक महत्वाचं अंग (साथीदारांच्या टाळ्या) या गाण्यात नाही, असं दिसलं.

पण ही देखील कव्वालीच आहे हे नुसरत यांच्या खालील दुसर्‍या एका मैफिलीवरून दिसतं:

याच कव्वालीच/भजनाचे आणखी दोन श्रवणीय दुवे इथे देतोयः

१) नुसरत
२) कैलाश खेर

आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!

हे गाणं चित्रपटात देखील आलं आहे का? माहित असेल तर तो दुवा द्या.

जयंत कुलकर्णी's picture

1 Aug 2010 - 3:18 pm | जयंत कुलकर्णी

संगिताचा हाही प्रकार अर्थाने आणि संगिताने किती समृध्द आहे हे या लेखावरून समजून येत आहे.

प्रभो's picture

1 Aug 2010 - 7:53 pm | प्रभो

मस्त मस्त मस्त लेख.....

तुमच्या या लेखामुळे काल आम्हा मित्रांची कव्वाली नाईट साजरी झाली.. :)

मस्त कलंदर's picture

1 Aug 2010 - 10:58 pm | मस्त कलंदर

वा:.. हा लेख म्हणजे कव्वालींची मेजवानीच आहे.. दमादम मस्त कलंदरचा तुम्ही दिलेला अर्थ तर छानच.. आणि एकच कव्वाली वेगवेगळ्या गळ्यांमधून ऐकणे म्हणजे तर क्या कहने!!!
ही चढता सूरज कव्वाली मला पूर्ण पाठ आहे आणि तिचा अर्थ मनोमन पटतो...
सगळे व्हिडिओज बफर होत आहेत.. आता एकेकाचा लुत्फ उठवतेय..

आणि हो, या मालिकेबद्दल धन्यवाद!

या धाग्याची मेजवानी मी माझ्या शगुफ्ता आप्पी च्या घरी रविवारी संध्याकाळी त्यांच्या नातेवाईकांसोबत खुप खुप Enjoy केली

Believe me कोणीही अक्षरशः कोणीही २.३० तास तरी संगणकासमोरून हलले नाही
बहुगुणी काका ,
माषा-अल्लाह !! (Literally means 'Whatever Allah (God) wills'. It is often used in occasions where there is surprise in someones' good deeds or achievements ) तबियत, खुष कर दि आपने !! :-)
माझी एक सिंधी मैत्रिण नेहमी "दमा-दम मस्त कलंदर" म्हणायची अन सांगायची हे तुमच्या
वलींचे (संतांचे) गाणे आहे. मी confuse असायचे , 'झुलेलाल' अन 'शाहबाज़ कलंदर' एक कसे.. मला ही माहीत नव्हते, आत्ता समजले. धन्यू ! धन्यू !

पार्टनर's picture

3 Aug 2010 - 7:58 am | पार्टनर

'दमादम' चा अर्थ आत्ता कुठे जाऊन कळाला ..

'मौला मौला' आणि 'ख्वाजा मेरे..' सारखी गाणी / कव्वाली ऐकल्यानंतर हेच गाणं आठवलं.

हे गाणं बरंच मोठं असल्यामुळे यूट्यूबवर एकसलग गाणं तर मिळालं नाही, या दोन लिंक्स मिळाल्या -

http://www.youtube.com/watch?v=1MhoABnJdyU

http://www.youtube.com/watch?v=vIAIzXIHM2k&feature=related

मला यातल्या काही ओळी खूप भावतात. मन अगदी शांत होऊन जातं.

- पार्टनर

For everything you have missed, you have gained something else,
and for everything you gain, you lose something else.

विजुभाऊ's picture

3 Aug 2010 - 4:38 pm | विजुभाऊ

कच्चे धागे : सैफ अली खान / अजय देवगण चित्रपटातील नुसरत फतेह अली नी म्हंटलेली कव्वाली सुद्धा झकास आहे दुर्दैवाने चित्रपट फारसा चालला नाही आणि एक उत्तम संगीत मागे पडले.

बहुगुणी's picture

3 Aug 2010 - 5:32 pm | बहुगुणी

पुढच्या (१९७६-२००५) भागात देतो आहे हे गाणं.