या आधीच्या दोन भागांत मी कव्वाली या गायनप्रक्राराची ओळख आणि सार्वजनिक मैफिलींमधील धार्मिक कव्वाल्या यांची माहिती दिली होती. या तिसर्या भागात वळूया चित्रपटांतील काही गाजलेल्या कव्वाल्यांकडे. (हा लेख म्हणजे सर्वच हिंदी चित्रपटीय कव्वाल्यांचं सर्वंकष संकलन नव्हे, केवळ मला आवडलेल्या आणि आता लक्षात असलेल्या कव्वाल्यांची यादी आहे इतकंच, तुम्हाला या शिवाय वेगळ्या काही कव्वाल्या आवडल्या असतील, तसंच मी काही चांगल्या कव्वाल्या नमूद करायला विसरलोही असेन, तुम्ही प्रतिसादात त्यांची नक्की नोंद घ्याल अशी खात्री आहे.)
पहिल्या भागात म्हंटल्याप्रमाणे चित्रपटात गेल्यावर कव्वाली अर्थपूर्ण असण्यापेक्षा 'प्रेक्षणीय' आधिक कशी असेल या कडे दिग्दर्शकांचं लक्ष होतं (आणि आजही आहे), त्यामुळे बरेचदा चित्रपटातील कव्वाली लक्षात राहते ती तिच्या visual appeal मुळे, आणि कधी कधी खरे कलाकार, जे पडद्यामागे राहून कव्वालीच्या निर्मितीत महत्वाचा भाग घेतात (गायक, गीतकार आणि क्वचित संगीतकारही) त्यांचं म्हणावं तसं कौतुक होत नाही. तरीही, चित्रपटातील कव्वाल्यांना जेंव्हा दाद मिळते आणि त्यांच्यामुळे यशस्वी चित्रपट गर्दी खेचतात, तेंव्हा त्या पडद्यामागच्या कलाकारांनाही मूठभर मांस नक्कीच चढत असावं.
कालानुक्रमे सुरूवात करतो आहे, मी या तिसर्या आणि यापुढील चवथ्या भागात १९५५ पासून २००४ पर्यंतच्या कव्वाल्या निवडल्या आहेत, म्हणजे गेल्या पन्नासाहून आधिक वर्षांत चित्रपटांमध्ये कव्वालीने कसं रूप बदललंय तेही लक्षात येईल. (१९५५ हे पहिले वर्ष नसेलही कव्वाली चित्रपटात दिसण्याचं, पण जी प्रसिद्ध आहे आणि जिचा व्हिडिओ उपलब्ध आहे अशी मला सापडलेली सर्वात जुनी कव्वाली सुरूवातीला देतो आहे, वाचकांना त्याहून जुनी प्रसिद्ध कव्वाली माहित असेल तर जरूर कळवा प्रतिसादात. तसंच मी जरी २००४ पर्यंत येउन थबकलो असेन, तरी त्यानंतरच्या ५ वर्षांत काही चांगल्या कव्वाल्या माहित असतील त्याही नक्की कळवा, पुढच्या आणि शेवटच्या भागात त्यांचा समावेश करीन.)
१९५५: मरना भी मुहब्बत में किस काम में न आया:
चित्रपट: आझाद
कलाकार: दिलीप कुमार आणि मीनाकुमारी, गायक - रघुनाथ यादव, गीतकार - राजेंद्र कृष्ण, संगीतकार- सी. रामचंद्र
त्याकाळी प्रचंड गाजलेल्या या श्वेत-श्यामल चित्रपटात दिलीप कुमार आणि मीनाकुमारी असले तरी कव्वाली गायकांवरच सगळं गाणं चित्रीत आहे. सारंगी आणि हार्मोनियम दोन्ही वाद्ये दिसतात. (मला एकाच गायकाचं नाव मिळालं तरी या गाण्यात आणखी एक गायक आहे त्याचं नाव काय ते कोणाला माहित असेल तर प्रतिसादात सांगा.)
१९५८: हमें तो लूट लिया मिल के हुस्न वालों ने:
चित्रपटः अल हिलाल
कलाकार: महिपाल- शकिला, गायक - इस्माईल आझाद, गीतकार - शेवान रिझवी, संगीतकार- बुलो सी. रानी
नज़र मे शोख़ियां और बचपना शरारत मे
अदाएं देखके हम फंस गए मोहब्बत मे
हम अपनी जान से जायेंगे जिनकी उल्फत मे
यकीं है की ना आयेंगे वो ही मैय्यत मे
तो हम भी कह देंगे, हम लुट गए, शराफत मे.......
काय दिलदारपणा आहे! (नाही तर आज-कालचे काही टपोरी आशिक, एकतर्फी प्रेम 'पटत' नाही म्हंटलं की निघाले अॅसिड घेऊन!)
१९५८: आज क्यों हमसे परदा है?
चित्रपटः साधना
कलाकार: सुनील दत्त, वैजयंती माला, गायक - रफी, बलबीर, गीतकार - साहिर लुधियानवी, संगीतकार- एन. दत्ता
१९६०: तेरी मेहेफिल में किस्मत आजमां कर हम भी देखेंगे
चित्रपटः मुघ़ल-ए-आझम
कलाकार: दिलिप कुमार आणि मधुबाला, गायिका - शमशाद बेगम आणि लता, गीतकार - शकील बदायुनी, संगीतकार- नौशाद
१९६०: शरमाके ये क्यूं सब परदानशी
चित्रपट: चौदहवी का चांद
कलाकारः गुरूदत्त, वहिदा रेहेमान, गायिका - शमशाद बेगम आणि आशा भोसले, गीतकार - शकील बदायुनी, संगीतकार - रवि
कव्वाली मुकाबला
१९६०: निगाहें नाझ के मारोंका हाल क्या होगा
चित्रपटः बरसात की रात
कलाकार: भारत भूषण आणि मधुबाला, गायक/ गायिका - शंकर शंभू, सुधा मल्होत्रा आणि आशा भोसले, गीतकार - साहिर लुधियानवी, संगीतकार- रोशन
ये है इष्क़ इष्क़
चित्रपटः बरसात की रात
कलाकार: भारत भूषण आणि मधुबाला, गायक/ गायिका - महंमद रफी, मन्ना डे, सुधा मल्होत्रा आणि आशा भोसले, गीतकार - साहिर लुधियानवी, संगीतकार- रोशन
१९६०: ना तो कारवां की तलाश है ना हमसफ़र की तलाश है
चित्रपटः बरसात की रात
कलाकार: भारत भूषण आणि मधुबाला, गायक/ गायिका - आशा भोसले, शिवदयाल बातिश, महंमद रफी, मन्ना डे आणि सुधा मल्होत्रा, गीतकार - साहिर लुधियानवी, संगीतकार- रोशन
१९६२: किसने चिलमन से मारा
चित्रपटः बात एक रात की
कलाकार: देव आनंद आणि वहिदा रेहेमान, गायक - मन्ना डे, गीतकार - मजरूह सुलतानपुरी, संगीतकार- सचिन देव बर्मन
१९६३: निगाहें मिलाने को जी चाहता है
चित्रपटः दिल ही तो है
कलाकार: राज कपूर आणि नूतन, गायिका - आशा भोसले, गीतकार - साहिर लुधियानवी, संगीतकार- रोशन
१९६३: तुम्हे हुस्न देके ख़ुदाने सितमगर बनाया
चित्रपटः जब से तुम्हे देखा है
शम्मी कपूर आणि शशी कपूर दुर्मिळपणे एकत्र पाहुणे कव्वाली कलाकार म्हणून होते या चित्रपटात, आणि ओम प्रकाश आणि आगा होते पेटीवादक.
कलाकार: प्रदीप कुमार आणि गीता बाली, गायक/गायिका - मन्ना डे, महंमद रफी, सुमन कल्याणपूर, आशा भोसले आणि लता, गीतकार - आनंद बक्षी, शैलेन्द्र, संगीतकार- दत्ताराम वाडकर/ नाईक
१९६३: चांदी का बदन सोने की नझर
चित्रपट: ताजमहल
कलाकारः प्रदीप कुमार आणि बीना रॉय, (पण ही कव्वाली शहेझादा सैफुद्दीनची भूमिका करणार्या जीवन वर चित्रीत आहे) गायक-गायिका: रफी, मन्ना डे, आशा भोसले, मीना कपूर, गीतकार - , संगीतकार - रोशन
हा कव्वाली असलेला आणि रोशन यांचं संगीत असलेला पहिला रंगीत चित्रपट असावा.
१९६५: निगाहें क्या जो देखे ये जलवे डर डर के
चित्रपटः मुजरीम कौन, खूनी कौन?
कलाकार: जयराज आणि इंदिरा, गायक/गायिका - जानी बाबू कव्वाल, लता (?) आणि शमशाद बेगम, गीतकार - अख़्तर रोमानी, संगीतकार- बाबूल
यानंतर गाजली ती बलराज सहानी आणि अचला सचदेव यांच्यावर चित्रीत झालेली आणि आजही सदाबहार म्हणून ओळखली जाणारी ही कव्वाली! मन्नादांनी इतर अनेक गाण्यांप्रमाणे या गाण्याचं सोनं केलंय.
१९६५: ऐ मेरी जो़हरा ज़बीं
चित्रपटः वक्त़
कलाकारः हा पहिला हिंदी मल्टी-स्टारकास्ट सिनेमा म्हणता येईल इतके सगळे नामवंत कलाकार या चित्रपटात होते, त्यामुळे सगळ्यांची नावं नाही देत इथे (ती तुम्हाला हवी तर या दुव्यावर मिळतील) हे गाणं बलराज सहानी आणि अचला सचदेव यांच्यावर चित्रीत आहे आणि चित्रपटात म्हंटलंय बलराज सहानी यांनी. गायक - मन्ना डे, गीतकार - साहिर लुधियानवी, संगीतकार - रवि
Waqt 1965 - Aye Meri Zohra Jabeen WWW.BHARATLOVER.COMUploaded by desiguy36. - Watch more music videos, in HD!
१९६७: ना मूंह छिपाके जियो
चित्रपटः हमराज़
कलाकार: सुनील दत्त आणि मुमताज़, गायक - महेंद्र कपूर, गीतकार - साहिर लुधियानवी, संगीतकार- रवि
१९६७: मै इधर जाऊं या उधर जाऊं
चित्रपटः पालकी
कलाकार: , गायक - रफी, मन्ना डे आणि आशा, गीतकार - शकील बदायुनी, संगीतकार- नौशाद
१९७१: जीना तो है उसीका जिसने ये राज़ जाना
चित्रपटः आधिकार
कलाकार: अशोक कुमार आणि नंदा, गायक - रफी, गीतकार - रमेश पंत, संगीतकार- राहुल देव बर्मन
आर डी ची ही बहुधा पहिली स्वतंत्र कव्वाली असावी (प्रदीपजी आणि डॉ. दाढे: माझं चूक असेल तर कृपया दुरूस्ती सुचवा.)
त्यावर्षी गाजलेल्या बन्ने खां भोपाली प्राण ची ही कव्वाली पाहिली, त्याचे इथले चेहेर्यावरचे आविष्कार पाहिले की दोन वर्षांनंतर येणार्या आणि त्याच्यावरच चित्रीत झालेल्या दुसर्या एका लोकप्रिय कव्वालीची चाहूल लागते...कुठली ते पुढे पाहू.
१९७१: वादा तेरा वादा
चित्रपटः दुष्मन
कलाकार: राजेश खन्ना आणि मुमताझ, गायक - किशोर कुमार, गीतकार - आनंद बक्षी, संगीतकार- लक्ष्मीकांत-प्यारेलाल
निदान 'गाजलेली' अशी किशोर ची ही पहिलीच कव्वाली असावी (चु भू दे घे). लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या राजेश खन्नाची या गाण्यातील अदाकारी बघण्यासारखी आहे (या चित्रपटासाठी त्याला १९७२ चं फिल्म्फेअर अॅवॉर्ड मिळालं).
यानंतर १९७२ साली प्रचंड गाजली ती पुतलीबाई या डाकू राणीच्या जीवनावरील चित्रपटातील 'ऐसे बेशर्म आशिक है ये आज के, इन को अपना बनाना गज़ब हो गया' हे युसुफ आझाद आणि रशिदा ख़ातून यांची सवाल-जवाब असलेली ही अफलातून कव्वाली.
स्त्री विरूद्ध पुरुष यांचे 'गुण' काय काय आहेत, आणि ते देवाने कुठून कुठून पैदा केले ते ऐकाच!
दुर्दैवाने हा व्हिडिओ मी इथे embed करू शकत नाही, तो तुम्हाला यू ट्यूब वर इथे पहावा लागेल. चित्रपटातील कलाकार होते जयमाला, हबीब आणि सुजीत कुमार.
१९७२ याच वर्षी आली किशोर च्या आवाजातली 'हाल क्या है दिलों का न पूछो सनम' ही अनोखी अदा या चित्रपटातील कव्वाली.
जीतेंद्र, विनोद खन्ना आणि रेखा यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटातील गीतकार होते मजरूह सुलतानपुरी आणि संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल.
यारी है इमान मेरा, यार मेरी ज़िंदगी
१९७३ हे वर्ष घेउन आलं हिंदी चित्रपटांमध्ये एक वादळः रोमँटिक सिनेमे एका फटक्यात मागे टाकणारा 'अँग्री यंग मॅन' अमिताभ बच्चन चा ज़ंजीर. या चित्रपटात जया भादुरीशीही फटकून, awkwardly वागणारा, कायम चिडका असा अमिताभ, जेंव्हा कव्वाली गाणार्या दिलदार पठाण शेर खान प्राण ने हात धरून ऊठवल्यावर जे स्मित चेहेर्यावर आणतो, आणि पुढे 'तेरी हंसी की कीमत क्या है ये बता दे तू' म्हंटल्यावर जे खळखळून मोकळं हसतो, त्याला तोड नाही!
गर ख़ुदा मुझ से कहे कुछ मांग ऐ बंदे मेरे, मै ये मांगू, मैफिलों के दौर यूं चलते रहे
हम से आला, हम नेवाला, हमसफर, हमराज़ हो, ताकयामत जो चिरागों की तरह जलते रहे
या चित्रपटाचे गीतकार (ज्यांचं नुकतंच दुखःद निधन झालं) ते गुलशन बावरा यांना या गाण्यासाठी फिल्मफेअर पारितोषिक मिळालं होतं, आणि संगीतकार होते कल्याणजी-आंनंदजी.
१९७४ साली आला आय. एस. जोहर यांचा 'फाईव्ह रायफल्स' हा चित्रपट. राकेश खन्ना आणि शाही कपूर असे look-alike कलाकार घेऊन केलेला हा चित्रपट सपशेल पडला, पण आधी मेहेफिल-ए-समां मध्ये जानी बाबू कव्वालांनी गाजवलेली कव्वाली त्यांनी या चित्रपटात वापरली ती मात्र खूप गाजली; झूम बराबर झूम शराबी. चित्रपटासाठी वापरलेली कव्वाली गायली होती अझीझ नाझा यांनी, कल्याणजी-आनंदजी यांच्या संगीत दिग्दर्शनात.
तुलनेसाठी म्हणून मी खाली अझीझ नाझा यांची मैफिलितील कव्वाली देतो आहे, पण मला स्वतःला (सुरूवातीचे 'leader' बोल सोडले तर) ही कव्वाली चित्रपटातील कव्वालीपेक्षा डावी वाटली.
मग १९७५ साली आली पहिली राजकीय कव्वाली, अर्थातच पहिल्या खर्या राजकीय चित्रपटात.चित्रपटा संजीवकुमार आणि सुचित्रा सेन यांच्या 'आंधी' त नेता 'आरतीदेवी'चं 'स्वागत' करायला विद्यार्थी नेता असरानी आणि सहकारी ही sarcastic कव्वाली म्हणतात: सलाम किजीये. रफी, भुपिंदर सिंग आणि अमित कुमार यांनी गायलेल्या या कव्वालीचे शब्द होते गुलझार यांचे आणि संगीत होतं आर डी बर्मन यांचं.
हा तिसरा भाग इथे थांबवतोय, १९५५ च्या प्रेमिकांच्या कव्वालीपासून सुरू झालेला वीस वर्षांचा हा प्रवास, सामाजिक जाणीव (चित्रपटः हमराझ आणि आधिकार), यारी-दोस्ती (चित्रपटः ज़ंजीर), मद्यपानाचं व्यसन (Five Rifles) अशा टप्प्यांतून १९७५ मध्ये एका राजकीय कव्वालीवर आला आहे. एक प्रकर्षाने लक्षात येतं, धार्मिक कव्वाल्या या वीस वर्षांत चित्रपटांत फारश्या आल्याही नाहीत आणि चालल्याही नाहीत. आता पुढच्या कालावधीत कव्वालीत काय बदल घडले ते पाहुयात शेवटच्या, चवथ्या भागात. तेंव्हा पुन्हा भेटुया.
प्रतिक्रिया
2 Aug 2010 - 9:04 am | प्रभो
मस्तच.....यातल्या बहुतेक कव्वाल्या माझ्या फेवरीट....
२-३ न ऐकलेल्या आता ऐकेन शांतपणे...
हा धागा चालू केल्या बद्दल शतशः धन्यवाद हो बहुगुणी काका.. :)
ही माझी एक आवडती कव्वाली
2 Aug 2010 - 4:45 am | सुनील
अतिशय सुंदर, वाचनीय लेखमाला. या भागातील कव्वालींचा संग्रह वाचनखूण म्हणून साठवण्यासारखा.
अवांतर - बर्याच कव्वाल्यांचे गीतकार साहीर लुधियानवी हे आहेत. लुधियानात जन्मलेला हा पंजाबी मुस्लीम, फाळणीपूर्वीच लाहोरात स्थायीक झाला होता. विचाराने कम्यूनिस्ट असलेल्या साहीरवर पाकिस्तानी सरकारचा रोष असला तर त्यात नवल ते काय? १९४९ साली त्याच्यावर अटक वॉरन्ट जारी झाले आणि तो पाकिस्तान सोडून भारतात पळून आला. पुढे हिंदी चित्रसृष्टीतील त्याची गीतकार म्हणून झालेली कामगिरी तर ज्ञातच आहे.
2 Aug 2010 - 8:14 am | स्पंदना
सुन्दर लेख, गाण्यांवरच तुमच प्रेम जाणवत .
पु.ले.शु.
2 Aug 2010 - 8:39 am | सहज
गझल संग्रह छान
छायागीत-चित्रहार मुळे प्राणची अजुन एक माहीती असलेली गझल (सवाल जवाब)
2 Aug 2010 - 8:59 am | सुनील
ईशारोंको अगर समझो, राझ को राझ रहने दो!
क्या बात है!!
2 Aug 2010 - 9:20 am | बहुगुणी
मस्त गाण्याची आठवण करून दिलीत, सहज राव! थँक्स हं!
चित्रपटः धर्मा, १९७३ (याची जाहिरात असायची पोस्टर्स वर: "जहां प्राण है वहां जान है"!
रफी, आशा, गीतकार वर्मा मलिक, संगीतकार सोनिक ओमी
2 Aug 2010 - 9:13 am | क्रान्ति
अलिबाबाच्या खजिन्यात आणखी थोडी भर........
">अल्लाह ये अदा कैसी है
">बरसात की रात मधली आणखी एक कव्वाली.
">मदनमोहनजींची अप्रतिम रचना - दुल्हन एक रातकी
">प्राण आणि बिंदू यांची जुगलबंदी
">आरजू-शंकरजयकिशन
">कव्वाली की रात ">कव्वाली की रात-रफी-शमशाद बेगम
">काबुलीवाला-रफी
2 Aug 2010 - 9:45 am | बहुगुणी
ख़ुष कर दिया!
2 Aug 2010 - 12:39 pm | वाहीदा
बहुगुणीकाका, ही लेख मालिका तर "बेहतर से , बेहतरीन हो रही हैं !"
पण नविन मिपावर वाचनखुण साठवून कशी ठेवावी हा पर्याय दिसत नाही. सरपंचानी कृपया मदत करावी.
2 Aug 2010 - 1:29 pm | गणपा
वा मस्त चालली आहे मलिका.
मिपाकर पण आपल्या आवडी प्रमाणे भर घालताहेतच. :)
2 Aug 2010 - 2:07 pm | मदनबाण
तीनही भाग वाचले...एक अप्रतिम लेखमाला वाचतोय याचा आनंद मिळाला. :)
पुढच्या भागाची वाट पाहतो आहे. :)
2 Aug 2010 - 3:48 pm | चित्रा
अप्रतिम लेखमाला. जुनी गाणी परत ऐकून खूप मजा आली.
तेरी मेहफिल में मधील सगळी भावखाऊ कडवी (कव्वालीतील याला पर्यायी शब्द माहिती नाही) मधुबालेच्या वाट्याला आली आहेत असे आता जाणवते, पण निगार सुलतानाचे डोळेही लक्षात राहतात.
ए मेरी जोहरा जबी हे सिचुएशन, बलराज साहनी आणि एकंदरीत अभिनय, अशा सगळ्यासाठी मला आवडते.. :) फार लोकप्रिय असणारे हे गाणे नंतर "दिलवाले दुल्हनिया.. " मध्ये अमरीश पुरी आणि फरीदा जलाल यांच्यावर काही क्षणांसाठी का होईना, चित्रित करण्याचा मोह दिग्दर्शकाला आवरला नसावा..
मस्त, श्रवणीय आणि प्रेक्षणीय कव्वाल्या.
धन्यवाद!
2 Aug 2010 - 5:26 pm | स्वाती दिनेश
मस्तच.. हा भागही श्रवणीय..
स्वाती
2 Aug 2010 - 5:42 pm | मेघवेडा
व्वा! एकसे एक! मस्त! अजून येऊ द्या! :)
2 Aug 2010 - 9:23 pm | मस्त कलंदर
सही चालू आहे..
मी भर घालण्या आधीच पडली आहे.. :)
क्रांतीतैंचे पण कव्वालींचे सिलेक्शन भारी आहे..
बाकी, यात 'खलीवली' अजून कुणी अॅडवले नाही. ते कव्वाली प्रकारात मोडत नाही का?
2 Aug 2010 - 9:55 pm | बहुगुणी
म्हणून दिलं नाही, मूळ पाकिस्तानी गाणं आहे बहुतेक, जानी बाबू यांनीच गायलेल्या आणि संगीतबद्द केलेल्या शायर खुर्शीद हल्लौरी यांच्या कव्वालीचा हा घ्या (श्राव्य!) व्हीडिओ:
" alt="" />
2 Aug 2010 - 9:40 pm | बहुगुणी
वरती चित्रपटातील कव्वालीचा दुवा दिला होता, इथे देतोय युसुफ आझाद आणि रशिदा ख़ातून यांनी प्रत्यक्ष गायलेलं हे गाणं, सवाल जवाबांची ना-फिल्मी लज्जत लुटा:
ऐसे बेशर्म आशिक है ये आज के, इन को अपना बनाना गज़ब हो गया
2 Aug 2010 - 10:31 pm | पुष्करिणी
अप्रतिम झालीय ही लेखमाला, खूप आवडली!
3 Aug 2010 - 9:06 am | क्रान्ति
आगाज तो अच्छा है, अन्जाम खुदा जाने- उस्तादों के उस्ताद, रफी-मन्नादा-आशाजी
">
निरुत्तर करणारे सवाल-जवाब, चित्रपट काला समंदर, आशाजी, रफी आणि बलवीर, संगीत एन. दत्ता.
">
वाकिफ हूं खूब ईश्क के तर्ज-ए-बयां से मैं -बहुबेगम-रफी-एस. डी. बातिश्-संगीत - रोशनजी.
">
याच कव्वालीचा दुसरा भाग - ढूंढके लाऊं कहां से मैं
">
याच चित्रपटातला हा मुजरा देखील कव्वालीच्या अंगानं जाणारा वाटतो, म्हणून त्याचाही उल्लेख
">
जब रात है ऐसी मतवाली - मुगल-ए-आजम-लताजी-संगीत नौशाद
">
या लेखमालेच्या निमित्तानं बर्याच विस्मरणात जाणार्या खजिन्याच्या आठवणींना उजाळा मिळाला. शतशः धन्यवाद बहुगुणीजी.
9 Aug 2010 - 4:42 am | बहुगुणी
ही एक कव्वाली आठवली:
मनोजकुमार, मौशुमी चटर्जी आणि इतर कलाकार
नरेंद्र चंचल, जानी बाबू, मुकेश, लता
गीतकार - वर्मा मलिक, संगीतकार - लक्ष्मीकांत-प्यारेलाल
पहेले मुट्ठी विच पैसे लेकर
थैला भर शक्कर लाते थे
अब थैलेमे पैसे जाते हैं
मुट्ठी में शक्कर आती है.........