अनोखे वंशवृक्ष

सृष्टीलावण्या's picture
सृष्टीलावण्या in जनातलं, मनातलं
2 Apr 2008 - 7:16 am

कर्नाटकातल्या हुलिकल गावातील एक दलित जोडपं, तिमक्का आणि तिचा नवरा बिक्कालु चिकैय्या. लग्नाला बरीच वर्ष झाली तरी त्यांना मूल होईना. एव्हाना शेजारी पाजारी आणि सग्यासोयर्‍यांनी तिमक्काला 'वांझ' म्हणून दूषणं द्यायला सुरुवात केली होती. एकाकीपणाची भावना घेरू लागलेल्या या जोडप्याने मग अखेर निर्णय घेतला मूल दत्तक घ्यायचा.

मूल दत्तक घेण्यात काय एव्हढं विशेष. विशेष होते कारण तिमक्काने पालनपोषण करून मोठ्ठं करण्यासाठी निवडली ३०० वडाची रोपटी. १९५० च्या आसपास ह्या जोडप्याने लावलेल्या त्या रोपट्यांनी आता चांगलाच आकार घेतला आहे. कर्णाटकातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ च्या दोन्ही बाजूला काट्याकुट्या रोवून तिमक्काने जीवापाड जपलेल्या रोपट्यांचे आता डेरेदार वटवृक्ष झाले आहेत. बाजारात सुमारे ८५ कोटी रुपये इतकी किंमत असलेले हे वृक्ष वनविभागाने नुकतेच आपल्या ताब्यात घेतले. त्या बाजारभावाचा विचार कधी न तिमक्काच्या मनाला शिवला, न आज हयात नसलेल्या बिक्कालुच्या.

तिमक्काला नुकताच पंतप्रधानांच्या हस्ते सामाजिक वनीकरणासाठीचा राष्ट्रीय नागरिक पुरस्कार देण्यात आला. कुणाही कृतार्थ आईने म्हणावं तशी तिमक्का त्यावेळी म्हणाली, "त्यांना मोठ्ठं होताना पाहणं ह्यातच माझे सुख आहे".

- मटा १९९५

मांडणीसमाजजीवनमानभूगोलशिक्षणप्रकटनबातमीमाध्यमवेधआस्वाद

प्रतिक्रिया

विजय आचरेकर's picture

2 Apr 2008 - 10:11 am | विजय आचरेकर

सुन्दर
अनोखि माया.

प्रभाकर पेठकर's picture

2 Apr 2008 - 1:18 pm | प्रभाकर पेठकर

सर्व दृष्टीकोनातून अतिशय सुंदर विचार्/कृती. एक समाजिक आदर्श.
तिमक्का आणि बिक्कालू चिकैय्याचे त्रिकाल वंदन.

कोलबेर's picture

2 Apr 2008 - 9:26 pm | कोलबेर

तिमक्का आणि बिक्कालू चिकैय्याचे त्रिकाल वंदन.

अतिशय सुंदर आणि मोठा आदर्श आपल्यासमोर ठेवणारी.
तिमक्का आणि बिक्कालू यांना साष्टांग प्रणिपात!
ह्या माहितीबद्दल धन्यवाद सॄला.
चतुरंग

प्राजु's picture

2 Apr 2008 - 8:25 pm | प्राजु

तिमक्का आणि बिक्कालू.... हॅट्स ऑफ टू यू..
माहिती एकदम छान. सृ.ला.ताई धन्यवाद.

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com