किल्ल्यांवर भटकंती करताना आमची काही विशेष आवडती गाणी असायची आणि आम्ही ती
अगदी आवडीने हेल काढून घसा बसेपर्यंत म्हणायचो.
किल्ल्यामधे किल्ला शिवाजी आत कसा शिरला, जंबोजेट, काळूबाई, सो गया ये जहाँ, माझी सुशीला, संध्याकाळी संध्या काळी असली अनेक भन्नाट गाणी. ही गाणी कोणी लिहिली माहित नाहीत आणि ज्याने लिहिली त्याच्या मनात बुद्धिसंपदा, स्वामीत्व हक्क इ. खुळचट कल्पना
नक्कीच नव्हत्या. आम्ही ती गाणी नुसती वापरत नसू तर जो तो जमेल तशी त्यात भरच घालायचा.
त्यातील माझी सुशीला हे एक ढासू गाणं खास तुमच्यासाठी (चिंतातूर जंतुंनी कविचा पत्ता कळवल्यास लगेच कविची अधिकृत परवानगी सुद्धा घेण्यात येईल) जसे आठवेल तसे.
माझी सुशीला,
माझी सुशीला,
माझी सुशीला,
माझी सुशीला
उंच होती गोरीपान
जणू काही अप्सरा
माझी सुशीला, माझी सुशीला,
माझी सुशीला, माझी सुशीला
गेली होती एकदा ती
मुळेकाठी फिरायला
पाय घसरून आत पडली
तिच माझी सुशीला,
म्हातार्याला धक्का बसला
तो ही गेला स्वर्गाला,
म्हातारा गेला,
इस्टेट गेली
मीच राहिलो एकटा..
आपण ह्या गाण्यात साहित्यिक मूल्य वैगरे शोधायला गेलो तर निराशाच पदरी येईल पण आजही ही गाणी आठवली कि ते मंतरलेले, चिंतामुक्त दिवस आठवतात आणि मनाला एक निखळ आनंद मिळतो.
प्रतिक्रिया
27 Mar 2008 - 7:53 pm | llपुण्याचे पेशवेll
'मालवण पाण्यामधे किल्ला, शिवाजी आत कसा शिरला' असे आहे.
पुण्याचे पेशवे
27 Mar 2008 - 10:33 pm | सुधीर कांदळकर
अगदी बरोब्बर
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.
28 Mar 2008 - 9:07 pm | आवडाबाई
मी तर हे गाणं हर्णे पाण्यामध्ये किल्ला असं ऐकलं आहे !!
अच्छा, म्हणजे वन साँग फिट्स ऑल?
27 Mar 2008 - 8:03 pm | सृष्टीलावण्या
की प्रत्येक जण आपापल्या आवडीप्रमाणे भर घालायचा...
>
>
नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा वाहिन तुला..
27 Mar 2008 - 9:05 pm | वरदा
हे गाणं झकास आहे.....लहान असताना रेडीओ वर लागायचं आणि मी अगदी ओरडून म्हणायचे.....मस्त टॉपिक....
27 Mar 2008 - 10:41 pm | सुधीर कांदळकर
सकालच्या पाराला
सुटलाय वारा
तू उभी कला मगे दारा
सांजचा टोला कोंबरा आरवला
तू उभी कला मगे दारा
पॅक पॅक पॅक ह्यो बदक पलाला
तू उभी कला मगे दारा
चून चून चून ह्यो डुक्कर पलाला
तू उभी कला मगे दारा
२.
पहिल्या गारीमधे कोन आ ....ला
कोन आ ....ला
$$$ आला
मागच्या गारीतून कोन आ......ली
कोन आ ....ली
@@@ आली
ही गाणी पिकनिक साँग्स आहेत. मस्त कोरसमध्ये गाता येतात. अशी अनेक अहेत. ब-याच जणांना येत असतील.
फू बाई फू तर सगळ्यांनाच ठाऊक असेल.
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.
28 Mar 2008 - 9:12 pm | आवडाबाई
रामदास बोट बुडाली ....
(... पुढचं माहित नाही )
3 Apr 2008 - 3:38 am | अभिता
मेरी तुझे केस लाब लाब बाहेर नको येऊ तुझे पापा बघतात.
पापा बघतात पापा बघतात हलूच आईला दोला घालतात
3 Apr 2008 - 3:40 am | अभिता
सातार्याचा म्हातारा शेकोतिला आला.
3 Apr 2008 - 4:44 am | मानस
उंच होती, टंच होती ... होती गोरी गोरी पान
कंबर चोविस, बाकी छत्तिस ...... तीच माझी सुशिला .....................
एके दिवशी संध्याकाळी, गेली होती फिरायला
हात पसरुन, पाय घसरुन .... पडली माझी सुशिला ......................
असेही, आम्ही म्हणत असू.
3 Apr 2008 - 4:50 am | मानस
ए जाने डार्लिंग टूमॉरो मॉर्निंग एसटि च्या थांब्यावर भेटशील का?
एसटि च्या थांब्यावरच पुढची मला अपॉईन्टमेंट देशिल का?
असही एक भन्नाट गाणं आम्ही म्हणायचो .................
3 Apr 2008 - 7:54 am | सृष्टीलावण्या
एस्टीच्या थांब्यावर लोकांची घाई,
कुनीबी आपल्याला बघायचं नाही,
तिथे तू भेट ना जराशी खेट ना,
..............................
>
>
मधून मेघ हे नभास ग्रासती, मधेच ह्या विजा भयाण हासती, दहा दिशांतूनी तूफान व्हायचे..
5 Apr 2008 - 7:48 pm | बन्ड्या
गोमु
गोमु तुला फिरायला नेतो........नेतो
भेल पुरी खायाला देतो ..........देतो
पुरीचा आकार गोल गोल .......गोल गोल
आता तरी मझ्याशी गोड बोल....गोड बोल
गोमु तुला रुप्याची माळ घे ......माळ घे
माळ परिस लेडिज घड्याळ घे...घड्याळ घे
घड्याळाचा आकार गोल गोल ....गोल गोल
आता तरी मझ्याशी गोड बोल....गोड बोल
गोमु तुझा बा हाय टकल्या ...... टकल्या
टकल्याला आवडतात चकल्या...चकल्या
चकल्यांचा आकार गोल गोल .....गोल गोल
आता तरी मझ्याशी गोड बोल....गोड बोल
गोमु तुझी आई आहे काळी........ काळी
काळीला आवडते गोळी ..........गोळी
गोळीचा आकार गोल गोल .......गोल गोल
आता तरी मझ्याशी गोड बोल....गोड बोल .............................................
सोनतळी वरच्या कॅंपातला.... बन्ड्या