भटकंती गाणी -३

सृष्टीलावण्या's picture
सृष्टीलावण्या in जनातलं, मनातलं
3 Apr 2008 - 7:51 am

मूळ धागा

गाऽऽऽऽऽऽऽऽर, गार डोंगराची हवा न् बाईला सोसंना गारवा...
गाऽऽऽऽऽऽऽऽर अहा गाऽऽऽऽऽऽऽऽर ओहो गाऽऽऽऽऽऽऽऽर
डोंगराची हवा न् बाईला सोसंना गारवा ।।धृ।।

लिंबूनारळ घेऊन हाती,
काळूबाईला इनवूं किती..
या काळूच्या ह्या बाळूच्या
मळवट भरियला न्
बाईला सोसंना गारवा ।।१।।

साडी चोळी घेऊन हाती,
काळूबाईला इनवूं किती..
या काळूच्या ह्या बाळूच्या
मळवट भरियला न्
बाईला सोसंना गारवा ।।२।।

हळदकुंकू घेऊन हाती,
काळूबाईला इनवूं किती..
या काळूच्या ह्या बाळूच्या
मळवट भरियला न्
बाईला सोसंना गारवा ।।३।।

मौजमजाविरंगुळा