टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
भटकंती गाणी -२
जम्बो जेट जम्बो जेट झुऽऽऽऽऽऽऽऽऽऽई
(चाल - अशोक कुमारच्या 'रेलगाडी रेलगाडी' ची)
जम्बो जेट जम्बो जेट,
लंडन-मुंबई प्रवास थेट,
जगलो वाचलो पुन्हा भेट,
जम्बो जेट जम्बो जेट झुऽऽऽऽऽऽऽऽऽऽई
विमानात होता माथेफिरु,
त्याचा झाला भेजा सुरू,
तो म्हणाला पायलटला,
विमान वळव बैरुटला,
विमान उतरव त्या शेतात,
पिस्तुल आहे ह्या हातात,
जम्बो जेट जम्बो जेट झुऽऽऽऽऽऽऽऽऽऽई
ठेवीन प्रवासी तुमचे ओलीस,
मग काय करतील तुमचे पोलीस,
जम्बो जेट जम्बो जेट झुऽऽऽऽऽऽऽऽऽऽई
अरे जम्बो जेट जम्बो जेट झुऽऽऽऽऽऽऽऽऽऽई
मधल्या ओळी आठवत नाहीयेत, कोणाला आठवल्या तर जरूर लिहा आणि तुम्हाला जर अशी भटकंती गाणी येत असतील तर भटकंती - ३, ४ इ. भाग सुद्धा लिहिलेत तरी हरकत नाही.
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

भतकन्ती गाणी...
हे गाणे पत्रकार भाऊ तोरसेकर यानी लिहीले आहे.
(मिसळीतला रस्सा भूरकणारा)
अरे वा ........
भाऊ रूपारेलमधीलच की.
आम्ही कॉलेजात असतांना महमूदचा पडोसन सिनेमा आला. तेव्हा याने त्याच्यासारखी शेंडिसह वेषभूषा केली होती. हा फारच लोकप्रिय होता. याच्या अवतीभोवती अनेक पोरे सदासर्वदा असायची. पण हा आर्ट्स ला अस्ल्यामुळे आमचा संबंध कधी आला नाही. ओळखहि झाली नाही. हे गाणे याचे हे वचून बरे वाटले.
माहितीबद्दल धन्यवाद उदयशेठ.
रुपारेल की जै.
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.