राजीव गांधी!... आपल्या सर्वांचं एक आदरणीय आणि लाडकं व्यक्तिमत्व! भारताचे यशस्वी -माजी पंतप्रधान!
२१ मे १९९१, रोजी रात्री, कोणाच्याही ध्यानीमनी नसताना तामिळनाडू येथे घडवून आणलेल्या मानवी बॉम्ब-हल्ल्यात झालेला राजीव'जींचा मृत्यू केवळ भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण विश्ववासीयांना मोठा मानसिक आघात देऊन गेला!.....
राजीवजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन! ..... *~*~*~*
STILL WE MISS YOU.... RAJEEV'JI...... LOVE YOU....... ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
प्रतिक्रिया
22 May 2012 - 3:11 pm | मृगनयनी
क्लिन्टन'जी.. तो फोटोतला दाढीवाला सरदार "बलवन्तसिन्ग" आहे.. हे मला माहित नव्हते...
असो..त्याचा फोटो इतर महारथींबरोबर नको होता.... या विधानाशी सहमत!
21 May 2012 - 11:54 pm | दादा कोंडके
ह्या पुरुषमंडळी बरोबरच जयललीथा :), मायावती वगैरेंचे देखील फोटू द्यायचे की हो! ;)
21 May 2012 - 10:37 pm | अप्रतिम
भावपूर्ण श्रद्धान्जली
21 May 2012 - 11:59 pm | विकास
भावपूर्ण श्रद्धान्जली
हे ही दिवस जातील.
म्हणजे? राजीवजींना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचे दिवस जातील? असे म्हणायचे आहे का? अर्थ कळला नाही :(
22 May 2012 - 9:37 am | कवटी
म्हणजे? राजीवजींना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचे दिवस जातील? असे म्हणायचे आहे का?
मला वाटतय त्याना असेच म्हणायचय....
णैणी'तै दर मे महिन्यात हा धागा वर आणतात... लोक पण ' आलाच आहे शिमगा तर बोंबलून घेउ' असे म्हणून उलट सुलट प्रतिसाद देतात... विकास'भौंना हेच दिवस बहुतेक घालवायचे असतील ;)
22 May 2012 - 2:44 pm | अविनाशकुलकर्णी
२१ बोफोर्स तोफान्ची सलामी
21 May 2013 - 7:18 pm | मृगनयनी
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~..राजीव'जींना भावपूर्ण श्रद्धांजली..~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
21 May 2015 - 5:38 pm | बॅटमॅन
ठ्ठो =)) =)) =))
(प्रतिक्रिया आणि आवाज दोन्हींसाठी लागू आहे.)
6 Sep 2013 - 3:35 pm | arunjoshi123
मला भारतीय असल्याची भारतीय लोकांच्या वर्तनाने बर्याचदा भयंकर शिसारी आली आहे. त्यातील राजीव गांधीच्या निगडीत आठवणी अशा -
१. 'जब तक सुरज चांद रहेगा, इंदिरा तेरा नाम रहेगा' या गाण्याची प्रसिद्धी. ( हे १९८४ मधे निवडणूक गीत होते. प्रचारासाठी हे गाणे चालू होताच गावातल्या बायका कशा रडायला चालू करायच्या ...)
२. युद्धानंतर चर्चिलची गरज नाही म्हणून त्याला पाडणारा युके आणि सहानुभूतीच्या लाटेत राजीवला मिळालेले अशक्यप्राय बहुमत यांची वृत्तपत्रांत चर्चा.
३. दैनिक लोकमतच्या 'देशाला ..... च्या मजबूतीची गरज - पंतप्रधान' टाइपच्या १९८४ ते १९८९ पर्यंतच्या बातम्या. (प्रकार अति झाल्यामुळे शिसारी, तसा मुळात यात वाईट काही नाही.)
४. राम जेठमलानी संसदेत राजीव गांधीला रोज १० प्रश्न विचारत. राजीवचे सबब विषयांतले ज्ञान आणि नाठाळपणा.
५. श्रीलंकेत साध्या सैनिकाने त्यांच्या डोक्यावर रायफल आपटली. कपाळमोक्ष झाला असता, बिचारे कसेबसे वाचले. (तसे राष्ट्रपतींची डबल झडती घेतली जाणे, ट्रॉफी देणार्या कॄषिमंत्र्यांना आमच्याच भारतात विदेशी कॅप्टनकडून धक्का देऊन लोटले जाणे, इ घटनांमुळे सबब जाणीव बोथट पडली आहे.)
६. न्यायसंस्थेच्या अवमानाचा पायंडा. शाहबानो प्रकरणानंतर 'न्यायालय' नावाच्या प्रकरणाच्या इज्जतीची दुरावस्था.
७. राजीव क्यूट आहे म्हणून त्याला मत देणार्या कॉलेजकुमारी
८. समाजवादाचे खानदानी प्रेम
९. अर्थव्यवस्थेला १९९१ कडे लोटणे. यातून तर हा बाबा नामानिराळा सुटला आहे.
21 May 2014 - 10:42 am | मृगनयनी
*~*~*~* राजीव'जी... आपल्या स्मृतीस विनम्र अभिवादन!!! *~*~*~* .........
खरंतर खेदाने म्हणावे लागतेय.. की बरे झाले.. आज आपण नाही आहात!!!! आपल्या सुपुत्राची व पक्षाची एकंदर कार्यक्षमता लक्षात घेता, संपूर्ण देशवासीयांनी "काँग्रेस आय"ला नाकारले आहे. अर्थात आज आपण असता तर कदाचित परिस्थिती बरीच वेगळी असती. आपले ज्ञान व खानदानी राजनीती आपल्या मुलामध्ये- चि. राहुलमध्ये, उतरू शकली नाही... हे दुर्दैव!!!!
निवडणुका जवळ आल्या, की लोकांना आपला "आजीसारखा" चेहरा दाखवून, जास्त न बोलता शहाण्या राहणार्या सौ. प्रियांका वद्रा'ही फारसा प्रभाव पाडू शकल्या नाही. प्रत्येक वेळी "इंदिरा गांधी"ची स्टाईल मारून चालत नाही... तेवढे कर्तृत्व व गुणही अंगी असावे लागतात... हे कळायला बराच उशीर झाला. आपल्या पत्नी- श्रीमती सोनिया'जींनी रडत खडत का होईना... काही वर्षे एकहाती सत्ता सांभाळली. पण त्यात देशप्रेमाचा, नाविन्याचा, प्रॉडक्टीव्हिटीचा, पॉझिटीव्ह स्ट्रॅटेजीचा अभाव असल्यामुळे आणि त्यांचे आता वयही बर्यापैकी झाल्याने .... लोकांना काँग्रेस'चा कंटाळा आला.
तुलनेने भारताचे भावी पंतप्रधान- "श्री. नरेन्द्र मोदी" हे प्रॅक्टीकल व रिलायबल आहेत. त्यांचे "इरादे" पक्के आहेत. मुख्य म्हणजे काँग्रेस'वाल्यांसारखी हवेतल्या फुग्यांसारखी स्वप्ने तरी त्यांनी (अजूनपर्यन्त) दाखवलेली नाहीत. आणि संघाचे उर्फ हाफचड्डीवाल्यांचे सुसंस्कार त्यांच्यावर आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाने भाजपा'ला प्रचंड बहुमताने विजयी केले आहे.
राजीव'जी... कदाचित तुम्ही जिथून कुठून आपल्या भारतदेशाकडे पाहत असाल.. तर इथली एकंदर परिस्थिती.. तुम्हालाही कळत असेल... किमान देशाचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी "कॉग्रेस" पेक्षा "भाजपा" कितीतरी पटीने चांगला आहे!!!!!!
कदाचित तुम्हीदेखील म्हणत असाल...- "अब की बार मोदी सरकार!!!!
*~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~*
21 May 2014 - 12:52 pm | मदनबाण
मुख्य म्हणजे काँग्रेस'वाल्यांसारखी हवेतल्या फुग्यांसारखी स्वप्ने तरी त्यांनी (अजूनपर्यन्त) दाखवलेली नाहीत.
मॄग्गा हे वाक्य सुपर-डुपर लाइक केल्या गेले आहे.
मोदींनी सगळे फुगे अगदी व्यवस्थीत फोडले आहेत ! ;)
कॉंग्रसवर काय वेळ आली आहे...
30 May 2019 - 9:15 pm | एकुलता एक डॉन
ट्रॉफी देणार्या कॄषिमंत्र्यांना आमच्याच भारतात विदेशी कॅप्टनकडून धक्का देऊन लोटले जाणे
हे आत्ता झालेले आहे
21 May 2014 - 10:43 am | जेपी
१००
21 May 2015 - 4:57 pm | कपिलमुनी
*~*~*~* राजीव'जी... आपल्या स्मृतीस विनम्र अभिवादन!!! *~*~*~* .........
( सालाबादप्रमाणे श्रद्धांजली )
21 May 2015 - 5:36 pm | बॅटमॅन
ठ्ठो =)) =)) =)) असे लिहिले तरी प्रत्यक्ष कधी होत नाही, पण आज मात्र झाले. सुदैवाने बिस्कीट अगोदरच खाऊन संपल्यामुळे बिस्कीटदेहाचे अवशेष इतस्ततः पसरले नाहीत.
21 May 2015 - 7:22 pm | विकास
नमस्कार...
27 May 2015 - 10:41 pm | शशिकांत ओक
धागाकर्त्यांची यावर्षी अनुपस्थिती जाणवली...
28 May 2015 - 11:40 am | प्रसाद गोडबोले
हेच्च म्हणतो !
स्॑ध्या असतात तरी कोठे मृगा तै ??
21 May 2018 - 12:55 pm | कपिलमुनी
*~*~*~* राजीव'जी... आपल्या स्मृतीस विनम्र अभिवादन!!! *~*~*~* .........
( सालाबादप्रमाणे श्रद्धांजली )
21 May 2019 - 2:34 pm | ऋतुराज चित्रे
भावपूर्ण श्रद्धान्जली!
21 May 2019 - 9:19 pm | जेम्स बॉन्ड ००७
भावपूर्ण श्रद्धांजली
20 Aug 2021 - 10:34 am | आग्या१९९०
विनम्र अभिवादन!!!
20 Aug 2021 - 12:34 pm | चंद्रसूर्यकुमार
२०१०-११ मध्ये राजीव गांधींवरील हा आणि आणखी एक धागा यावर बरीच चर्चा झाली होती. त्यावेळी राजीव गांधींविषयी अनेक गोष्टी मला माहित नव्हत्या. नंतरच्या काळात अधिक वाचन केल्यावर आणि अधिक माहिती घेतल्यावर राजीव गांधी म्हणजे नक्की काय चीज होते हे समजले. त्यांच्या कारकिर्दीत सोशल मिडिया असता तर कदाचित आद्य पप्पू म्हणून राजीव गांधींचे नाव झाले असते. तरीही ल्युटिन्स दिल्लीमधील मिडियाची ताकद अशी असते की अशा काही गोष्टी सहजासहजी बाहेर येत नसतात.
टेलिकॉम क्रांती
असा नेहमी दावा केला जातो की राजीव गांधी आणि सॅम पित्रोदा या जोडगोळीने भारतात टेलिकॉम क्रांती आणली. अनेक वर्षे मी पण त्या खोट्या प्रचाराला बळी पडलो होतो. पूर्वी फोनचा अर्ज केल्यापासून फोन मिळायला दहा-दहा वर्षे थांबायला लागायचे. माझ्या अनेक ओळखीच्यांकडे १९८२-८३ च्या सुमारास फोनचा अर्ज केल्यानंतर १९९२-९३ मध्ये फोन आले होते. नंतरच्या काळात दहा वर्षे थांबायला लागत नसेल पण तीन-चार वर्षे नक्कीच थांबायला लागायचे. भारतात फोन ऑन डिमांड ही परिस्थिती आली ती १९९८ च्या सुमारास. सॅम पित्रोदांचा टेलिकॉम कमिशनचे प्रमुख म्हणून कार्यकाळ त्यापूर्वी बराच काळ आधी संपला होता. मग पित्रोदांनी नक्की कोणती टेलिकॉम क्रांती भारतात आणली? अगदी १९९७-९८ मध्ये मुंबईत फोर्टमध्ये हातात मोबाईल फोन घेऊन त्यावर बोलत चालणारे लोक स्वत:ला फार उच्चभ्रू समजायचे आणि मी म्हणजे कोण आणि बाकी सगळी दुनिया झाडू असा आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर असायचा. अशा लोकांना मी स्वत: बघितलेले आहे. पण त्यानंतर ५-६ वर्षातच मोबाईल फोन अगदी रस्त्यावर भाजी विकणाऱ्यापर्यंत गेला. ती खरी टेलिकॉम क्रांती म्हणता येईल. या क्रांतीचा सॅम पित्रोदांशी काहीही संबंध नाही.
https://data.worldbank.org/indicator/IT.MLT.MAIN.P2?end=1989&locations=I... या लिंकवर जागतिक बँकेच्या वेबसाईटवर विविध देशांमध्ये दर १०० लोकांमागे किती फोन होते हा १९६० ते १९८९ या काळातील विदा आहे. १९८९ पर्यंतचा डेटा म्हणजे अर्थातच लॅन्डलाईन फोन होते. यात बघता येईल की १९६० ते १९८४ पर्यंत जितका वाढीचा वेग होता तितकाच नंतरची पाच वर्षेही राहिला. भारत अफगाणिस्तान, म्यानमार वगैरे देशांच्या पुढे होता पण पाकिस्तान, केनिया, इंडोनेशिया वगैरे देशांच्या मागे होता. खरं तर १९८५ ते १९८९ या काळात पाकिस्तानात फोनचा प्रसार अधिक वेगाने झाला हे त्या लाईन्सच्या स्लोपवरून कळेलच. १९८९ मध्ये पाकिस्तानने केनियाला मागे टाकले. आणि तुलना करताना अमेरिका, जर्मनी वगैरे देशांशी नाही तर पाकिस्तान, केनिया, इंडोनेशिया वगैरे म्हणजे भारतासारखीच आर्थिक स्थिती असलेल्या देशांशी तुलना करत आहे. मग कसली डोंबलाची टेलिकॉम क्रांती या महाशयांनी आणली होती?
संगणकक्रांती
दुसरी भूलथाप म्हणजे राजीव गांधींनी भारतात संगणकक्रांती आणली. राजीव गांधी पंतप्रधान असताना संगणकाचा प्रसार अधिक प्रमाणात झाला (आताच्या तुलनेत ०.१% ही नाही) असेल तर ती संगणकक्रांती राजीव गांधींनी आणली असे म्हणायचे असेल तर मग त्याच न्यायाने एच.डी.देवेगौडांनी भारतात इंटरनेट क्रांती आणली असे म्हणायला हवे. बरं टी.सी.एस वगैरेंची स्थापना राजीव गांधी पंतप्रधान होण्यापूर्वी अनेक वर्षे झाली होती त्याचे काय? इन्फोसिसची स्थापनाही १९८१ मधील- राजीव पंतप्रधान व्हायच्या तीन वर्षे आधीची. मग भारतात राजीव गांधींनी संगणकक्रांती नक्की कसली आणि कुठून आणली?
बोफोर्स
राजकीय दृष्ट्याही राजीव गांधी हे अत्यंत अपरिपक्व नेते होते. १६ एप्रिल १९८७ रोजी बोफोर्स कंपनीने भारताकडून तोफांचे कंत्राट मिळवायला मध्यस्थांना लाच दिली ही बातमी स्विडीश रेडिओवर आल्यानंतर सुरवातीला थेट आरोप पंतप्रधानांवर नव्हताच तर तो मध्यस्थांवर होता. असे असताना राजीव गांधींनी 'मी किंवा माझ्या कुटुंबियांपैकी कोणीही लाच स्विकारलेली नाही' असे हजारदा म्हटले. त्याची काय गरज होती? की ते चोराच्या मनातले चांदणे होते?
बोफोर्स प्रकरण उघडकीला यायच्या आधी वि.प्र.सिंग संरक्षणमंत्री असताना त्यांनी एच.डी.डब्ल्यू या जर्मन कंपनीकडून पाणबुड्या विकत घ्यायच्या व्यवहारातही बोफोर्सप्रमाणेच लाच दिली गेली या आरोपाची चौकशी सुरू केली होती. त्यावेळी ११ एप्रिल १९८७ या दिवशी राजीव गांधींनी वि.प्र.सिंगांना 'ती जर्मन कंपनी कोणाकोणाला लाच दिली हे थोडीच जाहीर करणार आहे' असे म्हटले होते. हा उल्लेख मी India since independence making sense of Indian politics या व्ही. कृष्ण अनंत या जनेयुच्या प्रोफेसरने लिहिलेल्या पुस्तकात वाचला आहे.
अयोध्या
अयोध्येत राम जन्मभूमीचे १९४९ पासून असलेले कुलूप उघडले. यावर कोणी म्हणेल की राजीव सरकारने फैजाबाद जिल्हा न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले.पण तो आदेश आल्यापासून ४० मिनिटात कुलूप उघडले जाणे आणि तिथे दूरदर्शनचे कॅमेरे आधीपासून हजर असणे यावरूनच काहीतरी ’फिक्सिंग’ त्यात होते असे म्हटले तर काय चुकले?पुढे राजीव सरकारनेच शीलान्यासाला परवानगी दिली.गृहमंत्री बुटासिंग तिथे हजर होते. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराची सुरवात राजीव गांधींनी फैजाबादपासून केली.आता कोणी म्हणेल की कुठून तरी सुरवात करायची ती फैजाबादपासून केली (संस्कृतमधला अशोकवनिकान्याय). पण या सगळ्या पार्श्वभूमीवर राजीव गांधींनी नेमकी फैजाबादपासूनच प्रचाराला सुरवात करणे नक्की काय दर्शविते? वातावरण तापविल्याबद्दल संघ परिवार जितका दोषी आहे त्यापेक्षा जास्त तशी पार्श्वभूमी बनायला पंतप्रधान असताना मदत केल्याबद्दल राजीव गांधी जबाबदार आहेत असे म्हटले तर?
श्रीलंका
१९८० च्या दशकात तामिळ वाघांना आपण (म्हणजे भारत सरकार) उघडपणे समर्थन देत होतो हे जगजाहिर आहे. म्हणजे पाकिस्तान काश्मीरमध्ये आता करत आहे ते आपण श्रीलंकेत १९८० च्या दशकात करत होतो आणि ते पण उघडपणे. मे १९८७ च्या शेवटच्या आठवड्यात श्रीलंकन सैन्याने तामिळ वाघांविरूध्द मोहिम उभारून त्यांना जाफनात चांगलेच अडचणीत आणले होते. ३० मे १९८७ रोजी ऑपरेशन पूमलाई या नावाने भारतीय हवाईदलाची विमाने जाफनात गेली आणि त्यांनी अडचणीत सापडलेल्या तामिळ वाघांसाठी मदत म्हणून काही गोष्टी खाली टाकल्या. इतकेच नव्हे तर परराष्ट्रराज्यमंत्री नटवरसिंग यांनी श्रीलंकेच्या दिल्लीतील राजदूताला बोलावून घेऊन आमची विमाने तुमच्या देशात जाऊन असे करणार आहेत त्यांना श्रीलंकेकडून कोणताही प्रतिकार झाल्यास गंभीर परिणाम होतील ही दमदाटी केली. उद्या काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे अशी हाकाटी करत पाकिस्तानची विमाने श्रीनगरमध्ये येऊन त्यांनी जमिनीवर मदत टाकली तर ते आपल्याला चालेल का? श्रीलंकेच्या सार्वभौमत्वाचे पूर्ण उल्लंघन राजीव गांधींच्या या अविचारी कृतीने झाले होते. हा प्रकार अंगाशी येणार हे दिसताच मग बाजू बदलून स्वत: राजीव गांधींनी कोलंबोत जाऊन अध्यक्ष जयवर्धने यांच्याशी करार करून तामिळ वाघांविरूध्द लढायला भारतीय शांतीसेना पाठवली. आपल्या सैनिकांवर श्रीलंका सरकारचा विश्वास असायचे कारणच नव्हते आणि तामिळ वाघ पण विरोधात गेले. अशा दोन्ही बाजूंनी अडचणीत आलेल्या आपल्या शांतीसेनेचे १३०० पेक्षा जास्त सैनिक श्रीलंकेत मारले गेले होते. नक्की कोणत्या कारणासाठी राजीव गांधींनी आपल्या सैनिकांचे बळी दिले?
असो. आद्य पप्पू राजीव गांधींचे पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.
20 Aug 2021 - 2:54 pm | श्रीगुरुजी
शहाबानो प्रकरणात मुस्लिम धर्मांधांसमोर लोटांगण घालून कोट्यवधी मुस्लिम महिलांना अंधारात ढकलून देण्याच्या निर्णयाचा उल्लेख राहिला की.
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर, "महावृक्ष कोसळल्यानंतर आजूबाजूची जमीन हादरतेच" असे सांगून हजारो शिखांच्या हत्याकांडाचे समर्थक सुद्धा राहिले की.
हरकिशनलाल भगत, ललित माखन, जगदीश टायटलर, सज्जनकुमार, धरमदास शास्त्री या हजारो शिखांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपींना मंत्रीपदाचे बक्षीस देण्याचा उल्लेखही राहिला की.
20 Aug 2021 - 2:25 pm | आग्या१९९०
पुण्यतिथी???आज राजीव गांधींची जयंती आहे.