तिचं हसणं, तिच्या चेहर्यावर उमटणार्या सुरेख भावछटा, तिचं डोळ्यांतून चांदणं बरसणं....नूतन म्हणजे चित्रपटसृष्टीतील एक सुमधुर काव्य होतं.
नूतनचे सर्वच चित्रपट एक से एक होते. पण तिचा ''सुजाता'' फार गाजला. मला विशेष लक्षात राहिला कारण एरवी कडक धोरणे असणार्या आमच्या शाळेत तो आम्हाला चक्क चित्रपटाची रीळे आणून सभागृहातील पडद्यावर दाखवला गेला. त्यातीलच हे एक सदाबहार गाणं....
जलते है जिसके लिए
तेरी आंखोंके दिये ढूंढ लाया हूं वही गीत मैं तेरे लिए....
त्या गाण्यातील नूतन आणि सुनील दत्तच्या मुद्राभिनयावर मी जाम फिदा झाले होते. दोघांचा तो उत्कट अभिनय, एकमेकांसाठीची ओढ, तळमळ, गाण्यातील ती आर्तता, तलतचा तो किंचित थरथरणारा आवाज.... सर्व काही हृदयास स्पर्शून गेलेले....अप्रतिम!
ते गाणे इथे पहावयास मिळेल :
http://www.youtube.com/watch?v=CnF-tO2WYBI
आणि आता अजून काही....
हेच गाणे एका मल्ल्याळम चित्रपटात नायिकेच्या मुखातून गाववून घ्यायचा मोह संगीतकाराला आवरला नाही. विद्यासागर ह्या संगीतकाराने पुन्हा एकदा हेच गाणे, संथ लयीत, गायत्री असोकन ह्या अत्यंत प्रतिभावान गायिकेकडून ''कैयोप्पू'' ह्या मामुटी व खुशबू सुंदर ह्यांचा अभिनय असलेल्या २००७ साली प्रदर्शित गाजलेल्या चित्रपटात मोठ्या खुबीने गुंफले आहे.
सध्या सुप्रीम कोर्टाच्या 'लिव्ह इन रिलेशनशिप' निकालामुळे चर्चेत आलेली हीच ती तमिळ अभिनेत्री खुशबू. तिला नूतनच्या नखाचीही सर येणे अवघड. पण तिच्या परीने तिने ह्या गाण्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. मामुटीचा पायर्यांवर बसलेला शॉट मला खूप आवडला.
आणि सर्वात खास गोष्ट ही की हे गाणे माझ्या अत्यंत जिव्हाळ्याच्या मैत्रिणीने, गायत्रीने गायले आहे! :-) त्यामुळे मी ते अनेकदा ऐकत असते. आज तुम्हीही ऐका/ पहा :
http://www.youtube.com/watch?v=wjMJrEubBXY
गायत्रीची स्वतःचीही वेबसाईट आहे. पुण्याच्या अलकाताई मारुलकरांकडे तिने काही वर्षे हिंदुस्थानी संगीताचे प्रशिक्षण घेतले व त्यानंतरही बंगळूर येथे तिचे पुढचे संगीत शिक्षण चालू आहे. अतिशय गुणी, प्रतिभासंपन्न अशी ही गायिका अनेक मल्ल्याळम, तमिळ, कानडी चित्रपटांत गायली तर आहेच, शिवाय येशूदासांबरोबर, शंकर महादेवन, हरीहरन, चित्रा अशा दिग्गजांबरोबरही गायलेली आहे व गात असते! तिच्या विषयी अधिक जाणून घ्या तिच्या संकेतस्थळावर, व तिच्या सुश्राव्य आवाजातील गाणीही ऐका :
http://www.gayatriasokan.info/
-- अरुंधती कुलकर्णी
प्रतिक्रिया
28 Mar 2010 - 1:51 am | चित्रा
माझे आवडते गाणे. चित्रपटही अतिशय आवडता.
तुमच्या मैत्रिणीनेही गाणे छान म्हटले आहे.
28 Mar 2010 - 6:12 am | मुक्तसुनीत
हेच म्हणतो. गाणे चांगले गायले आहे.
मात्र नूतनच्या जागी खुशबूताईना बघणे फार (अव)जड गेले.
28 Mar 2010 - 6:32 pm | बिपिन कार्यकर्ते
वर्जिनल गाणे आवडतेच, पण गायत्रीतैंनी पण सुंदरच गायले आहे. मजा आली.
बिपिन कार्यकर्ते
28 Mar 2010 - 4:30 am | शुचि
मस्त गायलय गाणं तुमच्या मैत्रिणीनी.
आमच्या शाळेत - हुजुरपागेत देखील हा चित्रपट दाखवला होता. मी मला वाटतं ६ वी / ७ वी त होते. सुनील दत्त ची एन्ट्री झाली की आम्ही मुली इतक्या चिडायचो कारण तो नूतनच्या मागे मागे आणि तेव्हा प्रेम वगैरे काही कळत नसतं.
पण अर्थात त्या सिनेमाचं सार कळलं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
28 Mar 2010 - 6:22 am | सन्जोप राव
'गीत नाजुक है मेरा शीशे से भी टूटे ना कहीं' असे तो शायर म्हणून गेला आहे. तरीही लोक बोध घेत नाहीत हे दुर्दैव!
सन्जोप राव
वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे
वही कहेंगे कभी हमने खुदखुशी कर ली
28 Mar 2010 - 9:30 am | विसोबा खेचर
प्रतिसाद सवडीने..
तात्या.
28 Mar 2010 - 12:35 pm | इन्द्र्राज पवार
एखादा दिवस असा काही उजाडतो की मन अचानक प्रसन्न होते....आजचा रविवार याच पठडीतील झाला त्याला कारण अन्य कोणतेही नसून नूतनचे हे अमर गीत >> आणि तलत >>> आणि त्याचबरोबरीने गायत्रीचीही ओळख !!! मामुटी ... खुशबू !! आणि केरळाचा तो हिरवकन्च नजारा ..... सर्व काही एक सुन्दर कविताच !! धन्यवाद.
28 Mar 2010 - 2:11 pm | अरुंधती
धन्यवाद!
काल मी गायत्रीने गायलेले ''जलते है जिसके लिये'' गाणे ऐकत होते आणि विचार आला, अरे! आपण हे गाणे इतरांनाही ऐकवू शकतो की! :-)
आज गायत्रीचे मल्याळम चित्रसृष्टीत हजारो चाहते आहेत, पण तुलनेने आपल्या येथे तिला फारसे कोणी ओळखत नाही...म्हटले, चला, त्या निमित्ताने तिची काहीजणांना ओळख होईल! तिने गायलेली अनेक गाणी ''हिट'' झाली आहेत!
बाकी, खुशबूला पाहणे खरंच अव(जड)घड होते नूतननंतर! ;-) पण चित्रीकरणातील 'निसर्गरम्यता' नजरेला सुखावून जाते.
शुचि, सेम पिंच! डिट्टो शाळा, डिट्टो वर्ग! तुझी बॅच कुठली? :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
28 Mar 2010 - 2:50 pm | इन्द्र्राज पवार
गाण्यावरील मत वाचल्यावर मी लागलीच थ्रीचुर केरळ येथील नेट फ्रेन्ड्ला याबाबत मेसेज दिला. तिलाही आपण येथे गायत्रीबाबत चर्चा करीत आहोत याचा खूपच आनंद झाला. उत्तरादाखल तीने त्या चित्रपटाचे थोडक्यात कथानक पाठवीले आहे, ते मिसळपाव सदस्यासाठी....
"Indra, it is from a movie Kayoppu,starred Mamutty and Khushboo made by Ranjit , very exclusive classic movie where Mamutty is a writer but struggles with his unfinished novel,as he faces some writer's block ,and his college friend Khushboo again comes in contact and encourages him with communication through cell phone, to finish the book.I had very much liked this beautifully made movie .But in the end He dies in a bomb blast, khushboo who was his sweetheart once, also fails to see him, whom she wishes to meet after long years of gap.It is really a nice movie Indra,try to get a Dvd of it and Enjoy. Thanks for discussing the song ad movie with your state friends."
28 Mar 2010 - 7:31 pm | शुचि
अगं मी मला वाटतं ८९ साली झाले असावे १० वी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
28 Mar 2010 - 8:28 pm | अरुंधती
शुची, मग बहुतेक तू व मी एकाच बॅचच्या.... तुझ्या बॅचला प्राची कर्वे, स्वरदा भट, मधुरा देव, प्राची रानडे, ज्योती जोशी, वैदेही वाबळे वगैरे होत्या का? माझ्या ब्लॉगवर जाऊन तिथून मला मेसेज/ ईमेल पाठव ना! तुझं माहेरचं नाव वगैरे डिटेल्स पण कळव! :-) हे लई भारी!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
28 Mar 2010 - 8:49 pm | मुक्तसुनीत
मी सुद्धा , मी सुद्धा ना त्याच सुमारास (पहिल्यांदा) दहावीला बसलो होतो ! :S
(हलके घेणे. )
28 Mar 2010 - 9:17 pm | अरुंधती
मुक्तसुनील, दहावीत हलकेच बसला होतात का? :-) (ह.घे.)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
29 Mar 2010 - 12:34 am | बिपिन कार्यकर्ते
आता त्यांनी (पहिल्यांदा) असं मुद्दाम स्पेसिफाय केलं आहे म्हणजे नक्कीच ते दहावीत हलकेच बसले असणार ना... ;)
बिपिन कार्यकर्ते
29 Mar 2010 - 12:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हं, म्हणजे तेव्हा इतर "व्यवधानं" जड पडली असणार!
अरुंधतीताई, मस्त वर्णन आणि गाणं आवडलंच आवडलं!
अदिती
29 Mar 2010 - 12:55 am | चित्रा
प्रतिसादातले शुद्धलेखन सुधारते म्हणजे संपादकांचे काम करते असे वाटेल! ;)
मुक्तसुनील नाही हो, मुक्तसुनीत ते.
29 Mar 2010 - 11:44 am | अरुंधती
हा हा हा.... 'ल' चा 'त' कसा काय झाला बॉ? :? O:)
असो. मुक्तसुनीत साहेब समजून घेतील! :)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
28 Mar 2010 - 9:14 pm | सखी
अरुंधती हे गाणं व चित्रपट माझं आणि माझ्या बाबांच अगदी ऑलटाईम फेव्हरेट - ते आता भारतात असले तरी तु या गाण्याच्या आठवणीने मला त्यांच्याजवळ पोहोचवलेस.
मला हे गाणं ऐकताना नेहमीच एक अनामिक हुरहुर लागुन रहाते पण गायत्रीच्या आवाजात ऐकताना डोळे भरुन वहायला लागले - मला गाण्यातले काही कळत नाही पण पार्श्वसंगित नसतानाही किंवा अगदीच कमी वापर असताना खूप सुंदर गायले आहे तिने. परत परत ऐकले आणि नेहमीच ऐकीन, व अजुन तिच्याबद्दल जाणुन घ्यायलापण आवडेल.
दुसरे असे की - तुझे सगळेच लेख आवडतात - आणि तुही हुजुरपागेची हे वाचुन आनंद दुणावला :) मीही तिथुनच ९१ साली मॅट्रिक झाले.
28 Mar 2010 - 9:22 pm | अरुंधती
सखी
तू सुध्दा हुजुरपागा! व्वा! :-) मस्तच....माझी धाकटी बहिण म्हणजे तुला ज्युनियर होती...प्रियंवदा.... आता मी जेव्हा शाळेतल्या काही गमतीजमती पोस्टेन तेव्हा तुला त्यांचे संदर्भही लगेच लागतील!!
गायत्रीची जी वेबसाईट आहे त्यावर तिची बरीच गाणी, गझला, अल्बम्स, मुलाखती, सिनेमातील गाणी, भजने वगैरे आहेत. भजने हिंदी, संस्कृत मधील असल्याने त्यांचा आनंद लुटू शकतेस. तसेच इतर गाणी अर्थ जरी कळला नाही तरी अतिशय सुश्राव्य आहेत. नक्की ऐक! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
28 Mar 2010 - 11:37 pm | शुचि
होय होय या सगळ्या "अ" तुकडीतलया मुली. मला माहीतेत.पल्लवी देसाई, सैरन्ध्री देसाई, सोमण, प्रिय अवधानी, अन्जली दांडेकर, वैशाली पवार, रुपाली बकरे वगैरे.
माझं माहेरचं आडनाव टिपणीस.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
29 Mar 2010 - 12:18 pm | अरुंधती
अगं शुचि, मग मीही त्याच तुकडीत होते! हो, पल्लवी, सैरन्ध्री, सोमण, अवधानी, तेजस्विनी शेंड्ये, देवस्थळे, अदिती कामत, करकरे, गनबोटे, क्षीरसागर....
माझं नाव इरावती. तुला आठवत नसेन कदाचित. तशी शाळेत मी अतिशय बावळट, वेंधळी होते म्हणा! :-)
माझ्या इतर दोन मावसबहिणीही आपल्याच बॅचला होत्या, ज्योत्स्ना बापट व जुईली तापीकर....
'अ' मध्ये एकदा एक टिपणीस होती ती तूच का? असो. आपली इथे मि.पा. वर भेट झाली हे छानच म्हणायचे! आपल्या बॅचवाल्या इतर मुलींशी तुझा कॉन्टॅक्ट आहे का? माझा ओर्कुट, फेसबुक वर आहे. हा हा हा.... ही तर धमालच झाली! ह्याला म्हणायचं योगायोग! मला ईमेल/ मेसेज कर ना.... हितं समदं नाय बोलता येत! ;-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
29 Mar 2010 - 1:28 pm | वाहीदा
स्वर आले जुळूनी...
जुळल्या सगळ्या त्या आठवणी .. <:P
जुन्या मैत्रिणी अन मित्र गवसण्याचा आनंद काही औरच असतो
मी ही हा अनुभव खुप कुरवाळला आहे .
अन माझ्याही पेक्षा आमच्या आईने, आईला एखादी जुनी मैत्रीण भेटली की ती अगदी सगळं जग विसरायची अन मग ते संवाद, फोना फोनी , जेवणावळ, हसणं अन खिदळण मनसोक्त गप्पा अन बागडणं फक्त त्या दोघीच जणी ... आम्हाला ईतकी jealousy फील व्हायची त्यांच्या मैत्रीवर पण सांगतो कोणाला ?? आमचं अस्तित्व असून नसण्या सारखे त्यांच्या गप्पाटप्पात ..मग प्रत्येक वेळी 'अम्मी आप मुझे नजरअंदाज कर रहे हो' सांगून ही फरक नाही पडायचा .
शुची अन अरुंधती अभिनंदन पण आम्हालाही आवडेल तुमची मैत्रिण व्हायला :-)
29 Mar 2010 - 2:00 pm | अरुंधती
वाहिदा, यू आर मोस्ट वेलकम! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
30 Mar 2010 - 1:03 am | शुचि
आई शप्पत इरावती क पाहून मला तुझीच आठवण झाली ग. हो मी एकदा (४ थी त) अ तुकडीत होते :D
मला गनबोटे, शेन्ड्ये, देवस्थळे, क्षीरसागर, आदिती कामत, जुईली तापीकर आठवतायत. माझा कुणाशीही कॉन्टॅक्ट नाही :(
गनबोटे थोडी धीटाई (bullying) करायची माझ्याशी. मी अगदी सर्वात बावळट, व्यक्तीमत्वहीन मुलगी असणार शाळेतली =)) ...... I am a true late bloomer. :P
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
30 Mar 2010 - 5:56 am | रेवती
ए, एकतर या गप्पा खरडवहीत मारा ........ नाहीतर आम्हाला त्यात सामिल करून घ्या! ;) अहिल्यादेवी, मॉडर्नवाले चालणार नाहीत काय? ;)
रेवती
30 Mar 2010 - 1:34 pm | अरुंधती
रेवती, अगं, ख व ची सोय अजून नाहीये मला.... म्हणून तर अशा गप्पा मारायला लागत आहेत.... :-)
हो, अहिल्यादेवी, मॉडर्नपण मोस्ट वेलकम :-) तिथेही होत्याच की अनेक मैत्रिणी!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
30 Mar 2010 - 1:41 pm | अरुंधती
शुचि, तू ओर्कुटवर ये ना.... तिथे आहेत बर्याच जणी आपल्या बॅचच्या.... मला तू अंधुक अंधुक आठवत आहेस :) गनबोटे भेटत असते कधीतरी.... तिला आता तिच्याचसारखे गुंड जुळे मुलगे आहेत जे भरपूर दंगा करून तिची कसोटी पाहात असतात! :D
बाकी इतर काहीजणी आहेत कॉन्टॅक्टमध्ये.... किमान ईमेल किंवा ओर्कुट/ फेसबुकवर. बाय द वे, ओर्कुटवर हुजुरपागेची एक कम्यूनिटीपण आहे. सर्व हुच्च पोरींनी तिथे आपल्या काहीच्याबाही आठवणी, शेरे संग्रहित केलेत :D मी तर लई हसले होते! कोणत्या बाईंना काय म्हणायचे इथपासून ते बर्याच बर्याच गोष्टी!
आता तू चकाट्यानेमु मला मेसेज/ ईमेल कर पाहू :) हे इथे गप्पा मारणे बरे नाही! :P हा हा हा
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
30 Mar 2010 - 7:17 pm | शुचि
अगं बाई मी ना ऑर्कुट वर आहे ना फेसबूक वर. मिपा माझं पहीलं व्हेन्चर आहे. तुला ख व मिळाली की मी तुला माझा आय डी देइन.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
30 Mar 2010 - 7:51 pm | अरुंधती
ओके. डन! :-)
तात्या......... मला ख.व. सोय हवी!!!!! :T :D
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
30 Mar 2010 - 7:59 pm | शुचि
"नमस्कार तात्या,
अरुंधती ला ख. व आणि व्य. नि. द्या ना प्लीज. अम्ही दोघी हुजुरपागेच्या आहोत. आम्हाला गप्पा मारता येतील."
अशी खरड तात्यांना पाठवण्यात आली आहे :)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
30 Mar 2010 - 9:36 pm | अरुंधती
=D> =D> =D> =D> =D> =D> =D>
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
28 Mar 2010 - 6:09 pm | चित्रगुप्त
नूतन ने गायिलेले अतिशय सुंदत्र गाणे.... ऐ मेरे हमसफर.....
http://www.youtube.com/watch?v=EsXnFlx3qRA
28 Mar 2010 - 9:42 pm | अक्षय पुर्णपात्रे
अरुंधतीतै, तुमच्या मैत्रिणीने गाणे सुंदरच गायले आहे. गाण्याचे चित्रीकरण खुशबूसकट आवडले. जुन्या गाण्यात सुनिल दत्त यांचा माउथपीस त्यांच्या घशाला टेकतांना दिसत असल्याने बिचारी नूतन कितपत गाणे ऐकू शकली असेल असा प्रश्न पडला.
28 Mar 2010 - 10:08 pm | अरुंधती
अक्षय,
कदाचित म्हणूनच नूतन गाण्याच्या मध्येच रिसीव्हर कानापासून अलग करताना दिसते . तिच्या डोळ्यांतील कणभर पाणी त्यामुळे वाढले तर नसेल? ;-) [हलकेच घेणे]
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
30 Mar 2010 - 9:41 am | विशाल कुलकर्णी
जसं गाण्यातलं थोडं थोडं कळायला लागलं, गाण्याचं वेड वाढायला लागलं तसं तलत नावाचं व्यसनही पक्कं होत गेलं..... हे गाणं तर कळस आहे....
आभार ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"