मी इकडून आलो
ती तिकडून आली
मी बघताच थांबलो
पण ती निघून गेली
सुस्कारा सोडत वर बघितले
हळूच इकडेतिकडे बघितले
दुसरी मटकत येतच होती
ती पण न बघताच निघून गेली
कैक आल्या वाटेवरती
अशाच गेल्या वाटेवरुनी
अजून एक दुरुन येत होती
चालता चालता लाजत होती
काय होतंय ते काहीच कळेना
उगाच छाती धडधडत होती
गजरा सुंदर माळलेला
चेहरा कोमल उजळलेला
लटके झटके बघुनी सारे
भाव मनातील पिसाळलेला
जवळ येऊनि मला म्हणाली
काका, घड्याळात वाजले किती ?
गेली दीडफूट आत खोल गेली
ताणलेली छाती पार गळून गेली
उगाच वणवा भडकलेला
गजरेवालीने त्यात टाकली माती
कितीतरी गेल्या वाटेवरून देवा
एकतरी माझ्यासाठी मिळायला हवी होती
सिद्धेश्वर विलास पाटणकर
प्रतिक्रिया
1 Jun 2018 - 6:11 pm | टवाळ कार्टा
=))
या निमित्ताने आमच्या सरांची सखू आठवली
2 Jun 2018 - 12:36 pm | खिलजि
धन्यवाद टका साहेब . हि सरांची सखू कुठे वाचायला मिळेल बरं .
सिद्धेश्वर विलास पाटणकर
2 Jun 2018 - 1:36 pm | टवाळ कार्टा
सखू
2 Jun 2018 - 1:42 pm | खिलजि
उघडत नाही आहे साहेब हि लिंक . शोधतो आणि वाचतो . धन्यवाद प्रतिसादाबद्दल .
15 Jun 2018 - 4:28 am | चित्रगुप्त
याचे उत्तर काय दिलेत ?

15 Jun 2018 - 4:36 am | चित्रगुप्त
हीच का ती गजरेवाली ?


