लोकल मधले लोकल्स.

रघुनाथ.केरकर's picture
रघुनाथ.केरकर in जनातलं, मनातलं
20 Jul 2017 - 3:05 pm

असाच एक कुठलासा सोमवार होता, संध्याकाळचे ६.३० होउन गेले होते, मी पावसाचं कारण सांगुन ऑफ़ीस मधुन मोठ्या उत्साहात लवकर पळालो होतो. पण स्टेशन वर येताच पावसानी त्यावर पाणी फ़िरवलं होतं. घाटकोपर स्टेशन च्या १ नंबर फ़लाटावर प्रवांशाचे उधाण आले होते. पहील्या प्रयत्नात गाडी मिळेल ह्याची शक्यताच नव्हती. किमान ३ -४ गाड्या सोडाव्या लागणार होत्या. ते कमी झाले म्हणुन की काय वरुन वरुण राजा बरसत होता. का कुणास ठावुक पण असे वाटतं होत की सगळे डाउन वाले प्रवासी फ़क्त स्लो लाइन वरुनच प्रवास करु इच्छीत होते. मागच्या लेडीज आणी जेंट्स फस्ट क्लास च्या मध्ये छप्पर नसल्याने काही महीला प्रवासी खुशाल छ्त्री उघडुन उभ्या होत्या. त्यांच्या छत्र्यांच्या काड्यां मुळे शेजार्यांरच्या अंगावर पाणी पडत होतं. पण छत्रीवाल्यांना त्याचं काही सोयरं-सुतक नव्हतं. एवढ्या गर्दीत आणी पावसात सुध्धा काही महान आत्मे फ़्रंट क्यामेरा चालु करुन भांग बसवत होत्ये.

इंडिकेटर मालवला गेला होता. मध्येच तो लकलकला. ००.०० T चे इंडीकेशन देउ लागला. एवढ्यात गर्दीतले काही चेहरे चकाकले. इतक्यात एक ठाणा आली. मी थोडा सुटकेचा श्वास सोडला. मनात म्हणालो की मागच्या गाडीत आपल्याला नक्की शिरायला मिळेल. पण कसलं काय. एका दरवाज्यातुन फक्त ४ ते ५ लोक आत घुसले, प्रत्येक दरवाज्यात माझा अंदाजाने एवढेच लोक आत गेले असतील. फ़ार फ़ार तर एक दोन दारात लोंबकळले असतील. गर्दीत अजुन भर पडत होती, पण गर्दी कमी होत नव्हती. गाडी गेल्यावर ईंडीकेटर महाराज पुन्हा निद्रिस्थ झाले. आता कुठली गाडी येणार यावर फुल्टू सस्पेन्स होतं. रेल्वे अनाउंस्मेंट मधले दोन तीन शब्दच कळत होते. "भारी वर्षा के कारण.... " बाकी काहीयेक कळत नव्हत.

मी समजुन गेलो होतो. की आपले रस्ते लागलेयत. ते पण लोखंडी रस्ते.

ठाणा जाउन चीथन् दिसेनात. लोक फलाटाच्या कडेला जाउ जाउ वाकुन पाहु लागले. पाचाची धा मिनीटे झाली पण गाडी येइना. एवढ्या वेळात समोरच्या फलाटावरुन मुंबै कडे जाणार्या. किमान ५ ते सात गाड्या गेल्या. हे नेहमीच होतं हा. एवढ्यात रेल्वेचा हॉर्न वाजला. श्रीक्षेत्र डोंबिवली देवाची येथे जाणारी लोकल येताना दिसली. ते पाहुन मी आणी माझ्या सारख्या काहीनी. पाठीवरची ब्याग पोटाशी कवटाळाली हेडफोन कानातुन काढुन त्यांचे वेटोळे करुन ब्यागेत कोंबले गेले. मोबाइल खीशात सरकले. जे काही लोक स्टेशन वरचा लाइव अपडेट फोन वरुन देत होते त्यानी पटापटा "चल ठेवते/ठेवतो गाडी आली" " चल्चल रक्ता हू." तर एकादोघांनी "लव्व्यु" करत फोन कट करत खिशात ठेवले. तोपर्यंत गाडीचा पहीला डब्बा स्टेशनात घुसला होता. इथे शर्टाच्या बाह्या मागे गेलया. एका हाताने खिशातला मोबाइल बाहेरुनच दाबुन चेक झाला. दुसर्याट हाताने मागच्या खिशातल्या पाकीटाचा मागोवा घेतला. तोवर गाडीचा दुसरा डब्बा स्टेशनात आला. पोटाच्या ब्यागा अजुन घट्ट केल्या. ब्यागेची एखादी चैन वैगरे लावायची तर राहीली नाही ना. हे तपासुन घेतलं. अजुन दोन डब्बे पुढे सरकले. तोवर फ़ूट्स्टेप बरोबर करुन घेतल्या. कुठला डोअर पकडायचा यावर मनात खल चालु झाला. सेकंद पुढे सरकतोय न सरकतो तोवर ट्रेन चे डब्बे समोरुन जायला लागले. मग थोडसं वाकुन धावत्या ट्रेन च्या खीडक्यांमधुन आतल्या गर्दीचा अंदाज घ्यायला सुरुवात झाली. यावरच ठरणार होतं की कुठला डोअर पकडायचा आनी कुठ्ल्या हाताला वळायच. अजुन काही सेकंद पुढे सरकले. फ़स्टक्लासचा पहीला डोअर यायला २ डब्बे बाकी होते. इतक्या मागुन एक जोरदात धक्का आला. कुणीतरी ऐन वेळी पुढे यायचा प्रयत्न करत होता. पण त्याला वळुन न बघताच त्याचा तो प्रयत्न सर्व ताकतीनीशी पुन्हा मागे लोटुन दिला. ह्यात शेजारी उभ्या असलेलया एका सहप्रवाशाने देखील मदत केली. त्याल नुसत्या नजरेनेच धन्यवाद दीले. त्यानी देखील नुसत्या नजरेनेच ते स्वीकारले. एवढ्या क्षणासाठी ट्रेन वरुन नजर हटली बाकी पुर्णवेळ नजरा ट्रेन वर होत्या. इतक्यात ज्या डब्ब्यात चढायचं, तो डब्बा आला. पुन्हा पाकीट ब्यागेची चैन व्हाया मोबाइल सर्व चेक झालं. पुन्हा ऑन यॉर माक, गेट सेट. आणी रेडी. हवा असलेला दरवाजा समोर येत होता. आधीच एक पाय पुढे टाकुन, दुरुनच उजवा हात लांब करत दरवाज्याच्या हँडल्वर क्लेम सांगीतला. उतरणारे उतरते झाले होते. दरवाजा समोर आला. गाडी अजुन चालुच होती . पण वेग कमी कमी होत चालला होता. हँडल पकडणार तीवढयात एक जण आतुन बाहे येउन हँडल्वर लोंबकळला.

मनात म्हणालो " कोइ बात नही" क्षणाचाही विलंब नकरता प्लान बी अँक्टीवेट झाला. उजव्या हाताचं हँडल "हातचं" गेल्यावर डाव्या हाताने लगेच *खंबा* पकडला. आणी स्थीतीज उर्जेला गतीज उर्जेत रुपांतरीत करत थोडासा रन-अप घेत. पहीलं पाउल डब्ब्यात टाकल. पण पुढे जाताच येइना. मग सेकंदाच्या १००० व्या हिस्श्याला लक्षात आलं की एक मंद सहप्रवाशी धडपडलाय. आणी साहेबानी आधारासाठी माझ्या ब्यागेचा शोल्डर स्ट्र्याप पकडलाय. मग लगेचच सेकंदाच्या ५०० हीश्श्याला पकडलेल्या शोल्डर स्ट्र्याप च्या शोल्डर ला एक जोरकस हिसका देत ब्यागेचा स्ट्र्याप आणी माझी पडण्यापासुन सुटका करुन घेत दुसरं पाउल आत टाकलं. आता मी सेफ़ झोन मध्ये होतो. (मी जर तस नसत केल असत तर मी, तो आणी अजुन दोन तीन लोक्स लोकांच्या बुटाखाली आलो असतो. कदाचीत रुळावर पण घसरलो असतो, वाचायला थोडा क्रुर वाटेल पण नाइलाज होता.) पण अजुन काही संकट आत माझा आणी माझ्या सारख्यांची वाट बघत बसली होती . गाडीचा वेग कमी होत होता. गाडी पुर्ण थांबली नव्हती. माझ्या मागुन पाच सात लोक चढले होते. आत दरवाज्याच्या शेजारी ब्यागा सावरुन उभे असलेले लोक्स समोरच्याच्या धक्का लागेल म्हणुन आधीच हाताचे आणी कोपरांचे भाले करत स्पार्टन्स शीपायांसारखे उभे होते. त्याना चुकवुन आमची चार जणांची तुकडी डाव्या साइडला वळली. इतक्यात एकजण डाव्या बाजुच्या दोन बाकड्यांच्या मधुन एक जण आमच्यावर चाल करुन आला. आम्ही चौघानी त्याला बगल देत. पुढे कुच करत निघालो. कानाला फोन लावत तोइसम दरवाज्याच दिशेने झेपावला. ह्या सगळ्यात शेवटी उतरणार्याे इसमाने चढणार्‍या लोकांकडुन ग म भ न च्या बाराखडीतल्या किमान डजन भर शिव्या खाल्या असतील. खीडकीतुन प्ल्याट्फ़ॉर्म बघुन मग सिट सोडणार्‍या जमातीमधला हा इसम होता. आणी वरुन फोनवर बोलत उतरत होता.

इथे मी आणी माझी तुकडी सेफ़ झोन मध्ये आल्यावर सेकंदाच्या १५०० व्या हिशश्याला लक्षात आलं की डावीकडे दोन सीट च्या बाकड्यामध्ये कुणीच उभं नव्हत. आणी उजवीकडच्या ४ सीट च्या बाकड्यांकडे , जिथुन लेडीज फ़स्ट क्लास "दिसतो" तीकडे बरीच गर्दी होती. एवढयात आमची तुकडी २ बाकड्यांच्या मध्ये येउन पोहोचली. चौघांपैकी मी आणी इतर एकाने पटापट पोटाशी घेतलेल्या ब्यागा मोकळ्या करुन वर लॉफ्ट वर टाकलया. २ बाकड्यांच्या मध्ये घुसताना सगळं लक्ष वर लॉफ़्ट कडेच होतं. कारण बसायला आणी उभं रहायच्या जागे इतकीच ब्यागे साठी जागा पण महत्वाची असते. पाठीमागुन तुकड्याच्या तुकड्या आत शिरत राहील्या. गाडी थांबायच्या आधीच डब्बा खचाखच पॅक झाला. पण ह्या सगळ्या ग़डबडीत २ बाकड्यांवर बसलेल्या कडे लक्षच गेलं नाही. गेलं असत तर किमान मी तरी डावीकडे वळलो नसतो.

क्रमषः

हे ठिकाणजीवनमानमौजमजाप्रकटनविचारलेखअनुभव

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Jul 2017 - 3:23 pm | ज्ञानोबाचे पैजार

मस्त...
हि काही सेकंद बर्‍याच वेळा अनुभवली आहेत.
मुंबईच्या लोकल मधे चढणे हे खरेच दिव्य असते.
आमच्या सारख्या अमुंबईकरासाठी तर ते महाकर्मकठीण काम आहे.
लवकर पुढचा भाग टाका
पैजारबुवा,

महेश हतोळकर's picture

20 Jul 2017 - 3:26 pm | महेश हतोळकर

तंतोतंत

मितान's picture

20 Jul 2017 - 6:35 pm | मितान

+११११

पैसा's picture

20 Jul 2017 - 3:26 pm | पैसा

क्रमशः बघून बरं वाटलं. लिहा पटापट!

भारी आहे स्लो मोशन. सोनीचा ९६०फ्रेमस/सेकंद कॅम्रा मोबाइल वापरलाय!!
शिवाय "श्रीक्षेत्र डोंबिवली देवाची" लोकल वाचून कृतकृत्य झालो,हात जोडले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2017 - 3:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारी लिहिलंय !

तुमच्या तुकडीचा सभासद असल्यासारखा गाडीत चढून दोन बाकड्यांच्या मधे शिरलो आणि खांद्यावरची बॅग लॉफ्ट्वर टाकली सुद्धा ! मात्र, तुमच्या "क्रमषः" ने जाग आली आणि लॅपटॉपसमोर बसलो आहे याचे भान आले. :)

टाका पुढचा भाग लवकर.

राजाभाउ's picture

21 Jul 2017 - 2:37 pm | राजाभाउ

+१ असेच म्हणतो.

पी. के.'s picture

20 Jul 2017 - 3:47 pm | पी. के.

"भारी वर्षा के कारण.... " बाकी काहीयेक कळत नव्हत."
आमच्याकडे अनाउंस्मेंट अशी असते.. " हार्बर लाईन से यात्रा करणे वाले प्रवासी तथा कर्मचारी कृपया ध्यान दे.. ब्ला ब्ला ब्ला.. तथा ब्ला ब्ला ब्ला.... कारण .. ब्ला ब्ला ब्ला... अप तथा डाउन. ब्ला ब्ला ब्ला.. यात्रींयांको होणे वाली असुविधा के लिये हमे खेद है.

मी समजुन गेलो होतो. की आपले रस्ते लागलेयत. ते पण लोखंडी रस्ते.

इथेच फुटलो... =))

आता फूडचे वाचतो...

Sandy

संजय पाटिल's picture

20 Jul 2017 - 3:54 pm | संजय पाटिल

सगळे डोळ्यासमोर उभं केलत... पुभाप्र...

रघुनाथ.केरकर's picture

20 Jul 2017 - 6:31 pm | रघुनाथ.केरकर

फार पुर्वी कधीतरी मिपावर एका दंगलीचं वर्णन केलं होत. मला आता नक्की आठवत नाही कोण लेखक होते ते. पण ते एवढं जबर्दस्त होतं. की सगळा नजारा डोळ्यासमोर आला. त्या लेखनाच्या जवळ्पास देखील जाता आलं तरी खुप झालं अस मला वाटतं. बाकी बरीचशी प्रेरणा "अभ्या यांचे लेखन" मधुन घेतली. जी-नाइन तर १५ ते २० वेळा वाचला गेलाय.

बाकी सगळ्यांचे धन्यवाद.

मस्तच लिहिलय. असं रिअलटाईम कॅप्चरिंग मला लै आवडते. परफेक्ट जमलेय.
लोकलचा इनमिन महिनाभर अनुभव. सध्या कधे मधे आलो तरच. तेही पीक टाइमात नाहीच. पण अंदाज आला.

चित्तथरारक! पुभाप्र.

चांदणे संदीप's picture

20 Jul 2017 - 3:58 pm | चांदणे संदीप

क्रमषः

वा वा!

पुभाप्र!

Sandy

त्रिवेणी's picture

20 Jul 2017 - 4:05 pm | त्रिवेणी

अय्यो वाचूनच दमायला झालं. टीव्ही त लोकल बघूनही घाबरायला होत मला तर.

टीकोजीराव's picture

20 Jul 2017 - 4:56 pm | टीकोजीराव

भारी लिहीलय,
सध्या पावसात ट्रेन ५ मीनिट जरी उशीरा आली तर हेच दृश्य अनुभवायला मीळते
पुभाप्र

पद्मावति's picture

20 Jul 2017 - 5:07 pm | पद्मावति

क्लास्सच!!!
पु.भा.प्र.

श्रीनिवास टिळक's picture

20 Jul 2017 - 6:16 pm | श्रीनिवास टिळक

...स्थीतीज उर्जेला गतीज उर्जेत रुपांतरीत करत थोडासा रन-अप घेत पहीलं पाउल डब्ब्यात टाकल...

लै भारी

श्री क्षेत्र डोंबिवली देवाची येस्स!
मस्त लिहिलंय. अगदी अनुभवलं सर्व.
पुभाप्र.

निशाचर's picture

20 Jul 2017 - 8:04 pm | निशाचर

कोपरांचे भाले करत स्पार्टन्स शीपायांसारखे उभे होते.

लोकलचा प्रवास सुटून वर्षं झाली, पण ही सवय रक्तात भिनल्येय. गर्दीत उजवा हात आपोआप तिरका समोर येतो.

अनुप ढेरे's picture

20 Jul 2017 - 8:23 pm | अनुप ढेरे

श्री क्षेत्र डोंबिवली देवाची

डोंबिवलीचं हपिशिअल नाव हे आहे काय?

रघुनाथ.केरकर's picture

21 Jul 2017 - 5:55 pm | रघुनाथ.केरकर

ते तर आपलं श्रद्धेपोटी घेतो कधी कधी नाव

ज्योति अळवणी's picture

20 Jul 2017 - 11:27 pm | ज्योति अळवणी

अशक्य परफेक्ट!

आता गर्दीची वेळ चुकवून मुंबई लोकल मधून प्रवास करते. पण जुने दिवस अगदी परफेक्ट डोळ्यासमोर उभे केलेत.

भेंड्या ग्रुप होता एक त्याकाळात...

गामा पैलवान's picture

21 Jul 2017 - 3:37 am | गामा पैलवान

रघुनाथराव,

काय अचूक वर्णन आहे. जुने दिवस आठवले.

१.

इतक्या मागुन एक जोरदात धक्का आला. कुणीतरी ऐन वेळी पुढे यायचा प्रयत्न करत होता. पण त्याला वळुन न बघताच त्याचा तो प्रयत्न सर्व ताकतीनीशी पुन्हा मागे लोटुन दिला.

असा धक्का बसू नये म्हणून एक सोंग वठवायचं असतं. आपण अशा स्थितीत उभं राहायचं की जणू दिसणारा पहिला डबाच पकडणार आहोत. अगदी हातबित पुढे सरसावून व्यवस्थित पोझिशन घ्यायची. ब्रूसलीच्या सिनेमांत तो घेतो तशी. त्यामुळे मागून धक्का देणाऱ्याला वाटतं की तुम्ही एकदम तयार गडी आहात. मग तो तुमच्या मागोमाग निर्माण होणाऱ्या पोकळीत घुसायची स्वप्नं पाहायला लागतो. साहजिकंच तुम्हाला धक्का मारून डिस्टर्ब करणं त्याला फायद्याचं नसतं. आपला हेतू आपल्या देहबोलीतनं फुल्टू दाखवायचा.

२.

हँडल पकडणार तीवढयात एक जण आतुन बाहे येउन हँडल्वर लोंबकळला.

याला मात्र खरंच काही उपाय नाही. पार नाईलाज आहे. माझा प्रथम वर्गाने लोकल प्रवास करायचा अनुभव एकदम मर्यादित आहे. द्वितीय वर्गाने प्रवास करतांना अशी परिस्थिती फारशी उत्पन्न होत नाही. कारण की ह्यांडलला सदैव कोणीतरी लोंबकळंत असतोच.

३.

आणी साहेबानी आधारासाठी माझ्या ब्यागेचा शोल्डर स्ट्र्याप पकडलाय.

लोकलगाडीत चढतांना म्हणूनंच ब्याग कधीही अंगावर वागवू नये. नेहमी शरीरापुढे हातांत धरावी. मागे काहीही माग सोडू नये.

आ.न.,
-गा.पै.

सुबोध खरे's picture

21 Jul 2017 - 12:39 pm | सुबोध खरे

एक तत्व म्हणजे ठाणे गाडी आली तर त्या गाडीने मुलुंड पर्यंत पुढे जायचं आणि मुलुंडला उतरून मागून येणारी डोंबिवली पकडायची.( म्हणजे जिना चढायला लागत नाही)
पावसाळ्यात समोर आलेली गाडी हीच खरी. मी तर दादर हुन कुर्ला गाडी आली तरी तिच्यात शिरून कुर्ल्यापर्यंत सुखाने प्रवास करतो( कुर्ल्याचा एक नंबर आणि दोन नंबर जोडून असल्याने जिना चढवा लागत नाही . मग ठाणे आली तर त्यातून पुढे.
पाच मिनिटे स्टेशनवर उभे राहण्यापेक्षा पुढच्या स्टेशन पर्यंत जात राहणे मला जास्त पसंत पडते. कारण जसा जसा वेळ जातो तशी फलाटावरील गर्दी आणि आपली चिंता व्यस्त प्रमाणात वाढत जाते.

mbhosle's picture

21 Jul 2017 - 2:49 pm | mbhosle

जुने दिवस आठवले.

ओ काका पुढच्या महिण्यात मुंबै ला शिफ्ट व्हायचय ओ, आदिच मला लोकल ट्रेनची भिती वाटते राव. जरा नव्याला भिड चेपेल अशा टिप्स द्या कि.
भारीय हे

अभिजीत अवलिया's picture

22 Jul 2017 - 9:44 am | अभिजीत अवलिया

मस्त लिवलात ओ केरकरानू.

हतोळकरांचा प्रसाद's picture

22 Jul 2017 - 11:26 am | हतोळकरांचा प्रसाद

लैच भारी, एकदम चित्रदर्शी वर्णन!!

सचिन काळे's picture

22 Jul 2017 - 4:40 pm | सचिन काळे

भारी लिहिलंय. मी गेली २८ वर्षे मरेवर हेच अनुभवतोय. पण अगदी सेकंदाच्या १००० व्या हिश्श्याचे वर्णन वाचून अवाक् झालोय. असंही लिहिता येते याचा मला नवीनच शोध लागलाय. मस्तं!!!

पण एवढ्या वर्षातला माझा असा अनुभव आहे, की अशा आणीबाणीच्या प्रसंगी साधारण तिसरी, चौथी गाडी सोडली की पुढे येणारी गाडी आत शिरण्याऐवढी रिकामी नक्कीच असते. कारण सर्व गर्दी पुढे निघून गेलेली असते.

नावातकायआहे's picture

26 Jul 2017 - 9:14 am | नावातकायआहे

मस्त लिहिलंय.
पुभाप्र.

सतीश कुडतरकर's picture

27 Jul 2017 - 9:56 am | सतीश कुडतरकर

नेहमीची धांदल छान पकडली आहे.

रघुनाथ.केरकर's picture

27 Jul 2017 - 11:30 am | रघुनाथ.केरकर

सर्वांचे धन्यवाद....

माझ्या तोडक्या-मोडक्या अनुभवाना वाचल्या बद्दल.

संग्राम's picture

27 Jul 2017 - 4:08 pm | संग्राम

सगळे अगदी डोळ्यासमोर उभं केलत ...