उडदामाजी "काळे"-गोरे

गुलाम's picture
गुलाम in जनातलं, मनातलं
22 Nov 2016 - 11:44 pm

'प्रधानसेवकांची मोठी घोषणा. काळ्यांविरुध्द सर्जिकल स्ट्राईक.'
(आता सगळे काळे हद्दपार होणार.. आपले तर १००% पांढरे.) गुलाम बेहद खुष झाला.

"अगं ऐकलंस का? १०० चे किती आहेत तुझ्याकडे?"
"४ फक्त. तुमच्याकडे?"
"२. आणि पेपरचं बिल पण द्यायचं आहे अजुन. सकाळीच येउन गेला तो."
"अहो मग त्याला ५०० ची नोट देउन टाका ना. आत्ताच आलीय बातमी. त्याला अजुन कळलं सुध्दा नसेल."
"अगं पण तो बिचारा..."
"लवकर जा. एकदा कळलं की घेणार नाही तो."
.
.
.
"हे काय बिनकांद्याचे पोहे?"
"अहो तिकडे आपले सैनिक रोज शत्रुच्या गोळ्या खातात. तुम्ही एक दिवस बिनकांद्याचे पोहे नाही खाउ शकत?"
" "
"आणि आज जर का पैसे नाही मिळाले तर चहा पण बिनदुधाचा प्यावा लागेल. आज टिव्हीवर सांगत होते की आता पेट्रोल पम्पावर पण पैसे मिळणार आहेत. तिथंच बघा आज."
.
.
.
१. "ओ भाउ. कार्ड स्वाइप करुन कॅश मिळेल का?"
"कितीचं पेट्रोल टाकायचंय?"
"अहो पेट्रोल नको फक्त कॅश पाहिजे."
"कुठुन येरवड्यावरुन आलात का?"
"नाही. चिंचवडवरुन"
"खी:.. खी:.. खी:.."
""
२. "ओ भाउ. कार्ड स्वाइप करुन कॅश मिळेल का?"
"आमाला पावर नाय"
"म्हणजे? हा पेट्रोल पम्प नाही?"
"पेट्रोल पम्प नाहीतर काय देशी दारुचा गुत्ता आहे? ते फक्त एसबाय च्या मशिन असेल तर मिळतंय."

३. "भैय्या. स्वाइप करके कॅश मिलेगा क्या?"
"कितना चाहिये?"
"२०००"
"गाडी साइड मे लगाओ और कार्ड लेके इधर आओ."
(आज मै उपर, आसमां निचे...)
"चार्जेस लगेगा"
"कितना"
"२००"
"अहो पण माझे तर १००% पांढरे..."
.
.
.

शेवटी मनाचा हिय्या करुन गुलामानी रणांगणावर जायची तयारी सुरु केली. कानात हेडफोन, खिशात किंडल, कमरेला आयपॅड, कपाळाला गंध, हातात भवानी आपलं.. पाण्याची बाटली..

गनिमाचं बळ बरंच दिसत होतं. हरकत नाही. शक्ती दे जगदंबे. हर हर महादेव!!!

"च्यायला... २ तास झाले. रांग अजुन तिथंच आहे. काळे लोक तिकडे मस्त मजेत आहेत. ५०० कोटी नुसत्या लग्नावर उडवतायेत आणि गरिबाला स्वतःचेच ५०० सुध्दा मिळत नाहीत."
"अहो थोडे दिवस त्रास सहन करा. मग बघा. राजकारण्यांची तर चांगलीच जिरणार आहे. सगळे काळे बाहेर येणार आहेत"- पाठीमागुन एक गोरा म्हणाला
"पण मी तर ऐकलं की त्यांच्याकडे कॅश फारशी नसतेच. सगळे शेअर्स, जमिनी आणि सोनं वगैरे.."- गुलाम
"सगळंच निघणारे आता. बघाच तुम्ही. या भ्रष्टाचारी राजकारण्यांनी सगळा देश पोखरलाय. ही कीड एकदाची काढून टाकायलाच पाहिजे. आता अख्खा देश बदलायचा म्हणजे आपण पण थोडा त्रास सहन करायला नको का? ३० डिसेंबर पर्यंत कळ काढा फक्त." - पुन्हा तोच गोरा माणूस

शरीराचं ओझं या पायावरुन त्या पायावर करत गुलामानी निमुटपणे मान हलवली.

"अरे दार उघडलं. दार उघडलं."
"शांतपणे रांगेत या सगळ्यांनी."
"अरे ढकलु नका रे"
"अहो पण मी सिनीअर सिटीझन आहे..."
"सोबत लहान मुल आहे हो..."

"अरे देवा!!! दार पुन्हा बंद झालं. म्हणजे गेला अजुन एक तास..."

"अहो दार उघडा ना प्लीज.. माझा भाउ आत गेलाय आणि डॉक्युमेंट्स माझ्याकडेच राहिलीत..."

"तो आत्ताचा गोरा माणूस कुठे गेला? आत्तातर माझ्या मागे उभा होता" - गुलाम


करड्या रंगाच्या काचेतुन तो गोरा माणूस मात्र शांतपणे कॅश काउंटरवर उभा असलेला दिसत होता...

समाजजीवनमानअर्थकारणराजकारणप्रकटनविचारअनुभवमत

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

23 Nov 2016 - 12:55 am | पिलीयन रायडर

त्याच चिंचवडमध्ये माझे आईबाबा मस्त आहेत हो. इतका काहीच त्रास नाही.

शिवाय भारतात आपली किराणामालाच्या दुकानात उधारी नाही हे मला पटतच नाही. वर्षानुवर्ष आम्ही डायरीत नोंद करुन किराणा घेतो आणि महिन्याच्या शेवटी चेक देतो.

रोजचे इस्त्रीवाला, दुधवाला, फुलपुडीवाला इ. सगळे समजुन घेतात. लगेच काही कुणी महिन्याच्या पहिल्याच दिवशी दारात ठिय्या मारत नाही की दुध्/पेपर टाकणं बंद करत नाही.

सरकार अगदीच बिनडोक आहे आणि काहीच कारण नसताना इतका व्याप ओढवुन घेतलाय असं मला वाटत नाही. मी मोदी भक्त नसले तरी इतका विश्वास तर दाखवु की सरकारवर.

अर्धवटराव's picture

23 Nov 2016 - 1:05 am | अर्धवटराव

सरकार अगदीच बिनडोक आहे आणि काहीच कारण नसताना इतका व्याप ओढवुन घेतलाय असं मला वाटत नाही.

आताशी मला खरच वाटायला लागलय कि सरकार बिंडोकच आहे. उगाच असल्या भानगडीत पडलं. आपल्या १० औरस/अनौरस पिढ्यांची सोय लावायची, जमलच तर लोकांना जात, प्रदेश, वगैरे बाबतीत भांडायला खाद्य पुरवायचं, ४ वर्ष १० महिने जनतेच्या बुडावर लाथा मारायच्या, आणि शेवटचे २ महिने काहि पैसे वगैरे वाटुन परत निवडुन यायचे प्लॅन करायचे... असे छान उद्योग सोडुन उगाच असल्या सो कॉल्ड स्वच्छता अभियानात उतरलं सरकार.

मारवा's picture

23 Nov 2016 - 3:10 pm | मारवा

वाचली आणी फार आवडली . बंधु सध्या वातावरण तणावपुर्ण आहे गैरसमज नाही झाले थरच आश्चर्य वाटेल ☺

अरेरे.. मला काय सांगायचंय ते अजिबातच कळलेलं दिसत नाहिये. हि माझ्या लेखनाची मर्यादा कि सध्याच्या वातावरणाचा परिणाम?पहिली शक्यताच जास्त आहे. असो. बाकी प्रतिसाद कसे येतात ते बघुन सगळ्यांना एकदमच उत्तर देतो. तोपर्यंत या वाक्यातुन (विशेषतः पहिल्या शब्दातुन) काही कळतंय का बघा.

करड्या रंगाच्या काचेतुन तो गोरा माणूस मात्र शांतपणे कॅश काउंटरवर उभा असलेला दिसत होता...

याला लेखनमर्यादाच म्हणावे लागेल.. जर तुम्ही लेखात काळे-गोरे दोघांचाही उल्लेख केला असतात, जो करणे सहज शक्य होता, तर हे ललित असे एकांगी झाले नसते.
पण तुम्ही फक्त गोरेच घेऊन बसलात, त्यामुळे हा घोळ झाला.

उडदा माजी काळेगोरे ,काय निवडावे निवडणारे...
-
असो काहि लोकांना नेमके काळेच सापडतात,नजरेचा दोष काय करणार??

(गोरे उडीद शोधुन काढणारा)जेपी

लेखातला आशय निट पोचला नाही हे तर दिसतंच आहे. मला वाटतं शीर्षक देताना गडबड झालीय. असो. मला काय मांडायचं होतं ते थोडक्यात मांडतो.

लेखातले प्रसंग बर्‍याच प्रमाणात खरे आहेत. आणि नीट विचार केला तर असं दिसतं कि त्यातल्या जवळपास सगळ्यांचाच सरकारच्या निर्णयाला पाठिंबा आहे. होणार्‍या त्रासामुळे काही लोक कुरकुर करतायेत. पण भ्रष्टाचार आणि काळा पैसा निपटुन काढलाच पाहिजे यावर दुमत नाहिये. शिवाय भ्रष्टाचारी लोकांना कडक शासन झालं पाहिजे असंही वाटतंय. पण कुठेतरी त्यामध्ये आपण (सज्जन, पांढरपेशा) आणि ते (राजकारणी, बिल्डर्स) अशी विभागणी दिसतीय. पण हे जे सज्जन पांढरपेशा लोक आहेत ते खरंच मनापासुन प्रामाणिक आहेत कि केवळ संधी नाही म्हणून तसे (honest by lack of opportunity) आहेत? आणि जेंव्हा अशा लोकांना संधी मिळते तेंव्हा ते कसे वागतात? लेखामधला पेट्रोल पम्पावरचा भैय्या संधी मिळताच लुबाडायला बघतो किंवा भ्रष्ट राजकारण्यांवर तावातावाने बोलणारा रांगेतला माणूस वेळ येताच बिनदिक्कतपणे रांग तोडुन पुढे घुसतो. हे लोकं रुढार्थानी सामान्य माणसेच आहेत. इतकंच कशाला स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी काही पैसे कॅशनी देणारे, वॅट लागु नये म्हणून पावतीशिवाय सोनं घेणारे ग्राहक, कट प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स हे सगळे आपल्याच समाजाचा भाग आहेत. पण कधीही भ्र्ष्टाचाराचा विषय निघाला कि लोक राजकारण्यांकडे बोट दाखवुन मोकळे होतात आणि आपण स्वत: कसे वागतो हे विसरुन जातात. याचा अर्थ राजकारणी धुतल्या तांदळाचे आहेत असा नाहीच. पण शेवटी तेदेखील आपल्याच समाजामधुन आले आहेत. आणि जर पुर्ण समाजच भ्र्ष्ट असेल तर फक्त राजकारण्यांनी स्वच्छ असावं ही अपेक्षाच भाबडी आहे.

In the end, society gets the government it deserves..

संदीप डांगे's picture

24 Nov 2016 - 1:59 am | संदीप डांगे

ये क्या बोलते मियां... भारीच!

कुठे भेटतात तुम्हाला अशी माणसे? नव्या सर्वेनुसार तर भारतात अशी भ्रष्टाचारी, देशद्रोही फक्त २ टक्के माणसे शिल्लक आहेत. मोदींनीच सांगितलंय..

मराठी कथालेखक's picture

24 Nov 2016 - 12:28 pm | मराठी कथालेखक

२०१४ मध्ये रालोआ ला ९८% मते मिळाली होती का ? :)

संदीप डांगे's picture

24 Nov 2016 - 12:42 pm | संदीप डांगे

ते काय माहीत नाही, आता मात्र सर्वच भारतीय मोदींच्या पाठीशी उभे आहेत. भारत एका महान बदलाच्या दिशेने जात असतांना तुम्हाला असे कुजकट प्रश्न पडतात हे तुम्हाला झालेल्या वैचारिक कावीळीचे, काळ्या चष्म्याचे, अंधविरोधाचे आजून कसले कसले लक्शन आहे. कोणीतरी काहीतरी 'पहिल्यांदाच' चांगलं करण्याचा प्रयत्न करतंय त्यात तुम्ही असे भोचक प्रश्न विचारता... :)

खरे तर तुम्ही हे विचारायला पाहिजे की २०१४ च्या आधी जेव्हा जेव्हा भारत सरकारने जनकल्याणकारी निर्णय घेतले तेव्हा तेव्हा तुम्ही सरकारला समग्र समर्थन देत होतात की त्या निर्णयांची पिसं काढत होता? तेव्हा ती देशभक्ती होती की देशद्रोह? काय म्हणता... आठवत नाही कोणते निर्णय घेतले ते? ब्रोबर आहे, आता ७० वर्षांच्या घाणीत सर्व दबून गेलेत की हो...

:)

हा हा. मग तर प्रश्नच मिटला. रामराज्यच आलं म्हणायचं.

ऑन अ सिरीयस नोट. माझा अशा भ्रष्टाचारी कि सज्जन अशा काळ्या-पांढर्‍या मांडणीलाच आक्षेप आहे. काही अपवाद वगळता, माणसे अशी एका टोकाची नसतात. त्यांच्यात बर्‍याच छटा असतात आणि स्ठळ-कालपरत्वे त्यातली कोणती छटा समोर येईल ते सांगता येत नाही यावर माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे माझ्यासारख्या माणसाला जेंव्हा लोक विचारतात कि तु मोदी सपोर्टर आहेस कि विरोधक तेंव्हा माझी खुप पंचाइत होते. कारण त्यांना बायनरीमध्ये उत्तर अपेक्षित असतं आणि ते मला देता येत नाही.

संदीप डांगे's picture

24 Nov 2016 - 1:02 pm | संदीप डांगे

आता कसं बोललात..! शंभर टक्के सहमत!

बायनरीचीच मागणी आहे आजकाल, एकतर तुम्ही आमच्याकडे नाही तर तिकडचेच, अधलं मधलं काही नाही. बाकी जनतेला त्रास किंवा सुख ह्याचे फारसे काही नाही, ते टेम्पररी आहे. हे जे देशद्रोही किंवा देशभक्त अशी स्पष्ट विभागणी चालू आहे ती मात्रे भयावह आहे.

विशुमित's picture

24 Nov 2016 - 1:06 pm | विशुमित

+१११ सहमत..

त्यामुळे माझ्यासारख्या माणसाला जेंव्हा लोक विचारतात कि तु मोदी सपोर्टर आहेस कि विरोधक तेंव्हा माझी खुप पंचाइत होते. कारण त्यांना बायनरीमध्ये उत्तर अपेक्षित असतं आणि ते मला देता येत नाही.

तुमचे प्रतिसाद कमीच असतात लेख तर त्याहुन दुर्मिळ पण वा वा वा क्या बात है !
अती मार्मिक लिहीता हो तुम्ही एकदम मास्टर स्ट्रोक खरच

त्यामुळे माझ्यासारख्या माणसाला जेंव्हा लोक विचारतात कि तु मोदी सपोर्टर आहेस कि विरोधक तेंव्हा माझी खुप पंचाइत होते. कारण त्यांना बायनरीमध्ये उत्तर अपेक्षित असतं आणि ते मला देता येत नाही.

तुमचे प्रतिसाद कमीच असतात लेख तर त्याहुन दुर्मिळ पण वा वा वा क्या बात है !
अती मार्मिक लिहीता हो तुम्ही एकदम मास्टर स्ट्रोक खरच

असं दिलखुलास कौतुक कुणाला नाही आवडणार. प्रतिसादासाठी मनापासुन आभार...

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Nov 2016 - 9:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

काही अपवाद वगळता, माणसे अशी एका टोकाची नसतात. त्यांच्यात बर्‍याच छटा असतात आणि स्ठळ-कालपरत्वे त्यातली कोणती छटा समोर येईल ते सांगता येत नाही यावर माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे माझ्यासारख्या माणसाला जेंव्हा लोक विचारतात कि तु मोदी सपोर्टर आहेस कि विरोधक तेंव्हा माझी खुप पंचाइत होते. कारण त्यांना बायनरीमध्ये उत्तर अपेक्षित असतं आणि ते मला देता येत नाही.

"पाठिंबा माणसाला नाही तर चांगलेपणा आणि सत्य या तत्वांना द्यायचा आहे" असे ठरवले तर मनातले बरेच गोंधळ कमी होतात. माणसे बदलू शकतात, तत्वे तशीच राहतात.

अर्थात, याचा एक गैरफायदा असा की;

(अ) आज 'क्ष' चांगल्याच्या व सत्याच्या बाजूने बोलत आहे किंवा कृती करत आहे म्हणून त्याच्या बाजून बोलले की 'य' आणि त्याचे पाठीराखे नाराज होतात व बहुतेक तुम्हाला 'क्ष'चा पाठीराखा/भक्त वैगेरे विषेशणे लावतील; आणि...

(आ) उद्या 'य' चांगल्याच्या व सत्याच्या बाजूने बोलत आहे किंवा कृती करत आहे म्हणून त्याच्या बाजून बोलले की 'क्ष' आणि त्याचे पाठीराखे नाराज होतात व बहुतेक तुम्हाला 'य'चा पाठीराखा/भक्त वैगेरे विषेशणे लावतील.

हे सगळे त्यांच्या बायनरी मनाला न समजणारे आहे (देवा त्यांना माफ कर :) ), असे समजून सोडून देता आले पाहिजे. इतके जमले की सगळे गोंधळ दूर होतात !

सुबोध खरे's picture

24 Nov 2016 - 8:38 pm | सुबोध खरे

तसंही आजकाल आम्ही समतोल( बॅलन्सड) आहोत हे दाखवायची फॅशन आली आहे.
आम्ही कुंपणावर बसतो हे सांगण्यापेक्षा हे सोफिस्टिकेटेड आहे.

तिरकस प्रतिसादांना उत्तर देउन वेळ आणि शक्ति वाया घालवायची नाही असं ठरवलंय. तस्मात माझा पास.