तर मंडळी झालं असं की मिपाराज्यात अनागोंदी माजली. कोण कुणाचा डू आयडी, कोण कुणाचा खरा आयडी काही म्हणता काहीच ताळमेळ लागेना. एक दिवस असंच रमत गमत आम्ही खरडफळा गल्लीमध्ये डोकावलो. एरवी छान गुण्यागोविंदाने नांदणारे प्रजाजन अंगात वारं भरल्यासारखे खरडी टाकत होते. सहसा धुराळी धाग्यांना वळसा घालूनच आम्ही जनातलं मनातलं, जे न देखे रवी या गल्ल्यांमध्ये पोचत असल्याने खरडी वाचून वाद कोण घालतंय आणि कोण सरळ बोलतंय हेच आमच्या निरागस बुद्धीला
झेपेनासे झाले.
अरे काय चाललंय काय? असं बसल्या जागेवरूनच आम्ही ओरडलो. त्याचा फायदा घेऊन आमच्या चौकोनी ऑफिस कुटूंबाच्या एका कोपऱ्यानी मान न वळवता नुसते डोळे फिरवून कानावरचे हेडफोन सरळ केले. दुसरा कोपरा गॉन केस असा तुच्छ कटाक्ष टाकून पाय मोकळे करायला गेला. हा कोपरा सदोदित पाय मोकळे करायची संधी शोधत असतो हे निरिक्षण आम्ही नुकतेच मॅनेजरला झाकली मूठ सव्वा लाखाची या अभिनिवेशात बोलून दाखिवले असल्याने येणाऱ्या प्रसंगाच्या कल्पनेने अंमळ गुदगुल्या झाल्या. तिसऱ्या कोपऱ्याच लक्ष व्हाट्स ऍप वर आलेले नवीन फॉरवर्ड वाचण्यात असले कारणाने आमचा चित्कार ज्याप्रमाणे उदबत्तीचा धूर आता आपल्या नाकात जाणार जाणार असे आपल्याला वाटत असतानाच अलगद कुठेतरी विरून जातो आणि आपले डोळे उगाच त्या धुराचा मागोवा घेतात त्याच प्रमाणे बहुदा कोपऱ्याच्या कानाच्या पडद्या वर आदळण्यापूर्वीच त्या ध्वनीलहरी हवेतच विरून गेल्या. असो. आमच्या ऑफिसचं चौकोनी कुटूंब हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.
तर झालं असं की हा सर्व उपद्व्याप करताना आमच्या लक्षात आलं की काही मिपाकर हे चांगलं साहित्य वाचण्यास आसुसले आहेत. इथे आम्ही मिपा वाचकांना चातकाची उपमा देणार होतो परंतु मागे एका कवितेत पेरलेल्या उपमा वाचून श्री (वाचा दु) श्री (दु) अभ्या यांनी काय खमंग उपमा झालाय अशा अर्थाची प्रतिक्रिया नोंदवली असल्याने आम्ही मोह आवरता घेत आहोत. तर मनात आलं नाही नाही मिपाकरांचे असे हाल पहावत नाहीत. कुठे ते ट्रोल धाग्यांवर खबरदार जर बिनकामाचे काढाल धागे, चपला घेऊनी व्हा चालते असे म्हणणारे साहसी शूर मिपाकर आणि कुठे .... असोच.
तर सांगायचा मुद्दा हा आहे की उत्तम कार्याची सुरवात नेहमी स्वतःपासून करावी असा आदर्श बालपणीच घालून दिला असले कारणाने आम्ही तातडीने आता काहीतरी लिहिलेच पाहिजे असा ध्यास घेतला. एवढ्या सगळ्या गदारोळात दोन मिपाकर लक्षणीय वाटावी अशा प्रकारे मला संपादक करा ही मागणी करत होते. त्यापैकी एक त्यांची संन्यास घेण्याची वेळ झाल्याने घाई घाईत फक्त घोषणा देऊन मंचावरून निघून गेले. परंतु एक आयडी मात्र व्यवस्थेशी लढत होता. जनतेच्या प्रश्नांना तोंड देत होता. जेव्हा उत्तर नसेल तेव्हा स्त्रीद्वेश्टा या त्यांच्या सर्व सुखसोयींनी समृद्ध क्लबची जाहिरात करत होता. कुणी लक्षच देईना म्हणता त्या बापड्याने कळवळून मला फक्त पंधरा मिनिटे चार्ज द्या असे वक्तव्य केले आणि आमच्या डोक्यात अनेक घंटा वाजू लागल्या.
आठवा आठवा, कपूरांचा अनिल आणि मुखर्जीच्या राणीचा नायक आठवा. एक दिवसाचा मुख्यमंत्री झालेला हा नायक कशाप्रकारे चांगलं कामही करता येतं हे दाखवून देतो, इथे तशाच नाट्याचा संभव आहे हे लक्षात आले आणि आम्ही गहिवरून जाऊन आम्हाला उम्मीदपे दुनिया कायम है हे नुकतेच वाचलेले सुवचन आठवले. तर उत्सुकतेपोटी आम्ही या आयडीची म्हणजेच श्री(वाचा ल्लूऊ) श्री (ल्लूऊ) टका यांची एक छोटीशी मुलाखत घेतली. सर्व त्रस्त वाचकांनी जरूर आस्वाद घ्यावा. आता त्यांना संपादकच जर पंधरा मिनिट व्हायचं असेल तर मुलाखत त्याहून मोठी कशी असेल म्हणून आम्ही उदार मनाने काही कठीण प्रश्न या मंचावर उपस्थित केले नाहीत. परंतु वाचकांनी बिलकुल हयगय करू नये. आम्हास खात्री आहे श्री(ल्लूऊ) श्री(ल्लूऊ) टका निश्चितच आपल्या सर्व शंकांचे समाधान करतील.
प्रश्नकर्ता : पंधरा मिनिटांचा संपादक ही कल्पनाच जबरदस्त आहे. कसं काय सुचलं तुम्हाला हे?
उ: सगळं चांगलं काय तुम्हालाच सुचत का? कसं आहे तुम्हाला कधी झळ लागली नाही त्यामुळे तुम्ही निवांत असता.पण मी झळ भोगली आहे. विनाकारण बॅन होण्याचं दुःख काय असतं ते तुम्हाला कधी समजेल असं मला वाटत नाही. ते दुःख मी भोगलं आहे झालंच तर बॅटमॅननी भोगलं आहे. प्रगो प्यारे येत जात असतात. त्यांच काय नाय एवढं. मी,बॅटमॅन, बोकाशेट असे कित्येक निष्पाप बळी आहेत या सिस्टीमचे. प्रत्येकवेळेला आम्हीच का सहन करायचं? सांगा ना का? अरे काय जोक आहे का? कुणीही येतो डू आयडी घेऊन, मिपाचं वातावरण गढूळ करतो, आम्हाला चिडवून जातो आणि ते आयडी तरीही शाबूत? नाही नाही हे सगळं थांबलंच पाहिजे. परा असता तर हा दिवसच आला नसता.
प्र: (पहिल्याच उत्तराला आलेला आक्रमक पवित्रा पाहून गांगरून) तुमचं म्हणणं बरोबर आहे सर पण एक अशीही भूमिका आहे जी तुमच्याबाबतीत वारंवार निदर्शनास आणून दिली जाते ती म्हणजे आधी तुम्ही स्वतः चांगले प्रतिसाद देऊन आदर्श आचरण केलं पाहिजे. ते तांब्यासंस्थान वगैरे जरा अती होतं असं नाही वाटतं का? तुमचे आचरण पाहून आलंच मालकांच्या मनात तर तुम्हाला झाडू देण्यात येईल. पण त्याआधी तुमच्याचं धाग्याना तो झाडू पुरा पडणार नाही, नाही का?
उ: चांगले प्रतिसाद चांगले प्रतिसाद म्हणजे काय असतं ओ? तुमच्या कानांना बरं वाटेल असं बोललं की झालं का? एवढंच वाईट वाटत असेल तर माझे कित्येक धागे जे टाइमपास म्हणून काढले आहेत ते उडवले तरी चालतील पण आता माघार घेणे नाही. आणि तांब्यासंस्थानाचा मी अनभिशिक्त का काय असत तसा वारस आहे. सगळ्यांनीचं सिरेस होऊन कसं चालेल?
प्र: हं बरं मग?
उ: बरं मग काय बर मग? पुढचा प्रश्न विचारा की?
प्र: नाही पण ते आधीच्या प्रश्नाच उत्तर पूर्ण दिलंय असं वाटत नाही?आदर्श आचरण वगैरे....?
उ: ल्लूऊऊऊऊऊउ.....
प्र: असो. विचारते पुढचा प्रश्न. संपादक झाल्यावर तुम्ही सर्वात आधी काय कराल?
उ: हे काय विचारणं झालं. सर्वात आधी खरडफळ्यावर जाऊन घोषणा करेन "मी संपादक झालोय, बघतोच आता!" त्यानंतर माझा इथला जो मित्रपरिवार आहे त्यांना सगळ्यांना हीच घोषणा खरड म्हणून कॉपीपेस्ट करेन. त्यावर आमच्या दु दु मित्रमंडळींची जी काही प्रतिक्रिया असेल ती वाचून समजून उमजून मग त्यांना उत्तरं देईन. एक धागा काढीन नवा त्यात माझ्या संपादक झाल्याची घोषणा मीच करेन आणि ज्यांना ज्यांना मला दम द्यायचाय त्यांचे धागे उदाहरणार्थ म्हणून चिटकवून या पुढे असे लिखाण खपवून घेतले जाणार नाही असे सांगेन. झालंच तर बरेच दिवसांपासून एक लंडनवारीच्या फोटोंचा धागा काढायचा राहून गेला होता. लागलीच चार फोटो तिथेच टाकून मोकळा होईन. नंतर मात्र मी शांतपणे जरा कॉफी वगैरे पिऊन येईन. ऑफिसमधले काम करीन. काही झालं तरी संपादक हा माणूसच आहे. त्यालाही विश्रांती हवीच ना!
प्र: अगदी खरं आहे तुमचं म्हणणं. काश सर्वच मिपाकर असेच प्रगल्भ झाले तर!
उ: होतील हो. एकदा मी आलो ना संपादक पदावर सगळ्यांची नीट विल्हेवाट लावतो बघा.
प्र: (घाबरून) सगळ्यांची म्हणजे जरा अति होईल नाही? अहो लिहायला आणि वाचायला कुणी शिल्लक नको का?
उ: सगळ्यांची म्हणजे सगळ्या डू आयडीची हो. तुम्ही लगेच एक बोललं की दुसरा अर्थ काढून मोकळ्या होता.
प्र: माफ करा तुम्ही एक महत्वाचा शब्द वगळल्यामुळे गैरसमज झाला जरा.
उ: हेच हेच ना मला पटत नाही. जरा म्हणून धीर नसतो. नीट विचारलं असतं तर मी सांगितलं नसतं का मला काय म्हणायचं आहे ते? एक तर स्वतःच गैरसमज करून घ्यायचे. समोरचा काय म्हणतोय काय सांगायचा प्रयत्न करतोय ते पाहायचं नाही. आणि वर चूक माझीच हे जाहीर करायचं!
प्र: (वारंवार होणाऱ्या आक्रमक हल्ल्यानी गोंधळून) मी काय म्हणते तुम्ही वर जो काही पंधरा मिनिटांचा अजेंडा सांगितला त्यात विधायक कार्य काही होईलस वाटत नाही. तर अजेंडा जरा बदलायला हवा नाही का?
उ: काही नाही वेळ लागत. माझ्याकडे सर्व डेटा आहे. त्याला फक्त योग्य न्याय देणे बाकी आहे. हिटलिस्टचं आहे. फक्त गोळीबार करायची संधी मिळत नाहीये.
असं म्हणून टकासरांनी त्यांचा लॅपटॉप आमच्यासमोर धरला. त्यात एका फोल्डरमध्ये बरेच स्क्रीनशॉट होते. सगळे त्यांच्या त्यांच्या जन्मस्थानाप्रमाणे व्यवस्थित नामकरण करून ठेवले होते. म्हणजे माननीय मिपाकर सदस्याचे नाव आणि त्यांनतर त्याने गोंधळ केलेले ठिकाण अशा प्रकारे. जसं की अबक_खरडफळा, डइफ_xxxx, क्षयझी_xxx. व्यक्तिगत हल्ले टाळायचे असे मिपा धोरण असल्याने आम्ही मूळ आयडीनाम आणि धागे सांगू शकत नाही. पण असं म्हणूया की सर्वांचीच कुंडली दिसली. एक वर्ड फाईल दिसली त्यात काय असेल ह्या उत्सुकतेने आम्ही त्यावर क्लिक केले असता अनेक तयार मसुदे सापडले. कौतुकाने आम्ही ते वाचन करत होतो तेव्हा लॅपटॉप अक्षरश: ओढून घेऊन त्यांनी खरडवहीत कॉपीपेस्ट करेन तेव्हा वाचा असे दटावले. एकूणच काहीशा भयग्रस्त वातावरणात ही मुलाखत पार पडली. तरीही मूळचा खोडकर स्वभाव काही जात नसल्याने आम्ही जाता जाता शेवटी एक आम्हाला छळणारा प्रश्न विचारलाच.
प्र: मिपावर एका खास महाकंपूचे समर्थन असल्याशिवाय तुम्ही संपादक होणे अवघड आहे असं नाही वाटत का तुम्हाला?
उ: नाही झालो संपादक तर काय? लाडोबा तर आहे की नाही? ल्ल्लूउउउउ
प्र: (कपाळावर हात मारून घेत) अगदी अगदी! प्रश्नच नाही!
तर मित्रानो अशा प्रकारे ही मुलाखत आपल्यासमोर सादर करण्यास आम्हास अत्यानंद होत आहे. आमच्या अपुऱ्या अभ्यासामुळे जर काही प्रश्न राहून गेले असतील तर आपण ते जरूर विचारावेत. संन्यास घेऊन गेलेले तरुणांचे बलस्थान कायमचे भावी संपादक जेपी यांचीही मुलाखत घेऊन तिला शब्दरूप देण्याचा आमचा मानस आहे. श्री(ल्लूऊ) श्री(ल्लूऊ) टका यांनी ह्या लेखाचा प्रिंट आउट काढून आपल्या हापिसात सतत नजरेसमोर ठेवावा अशी आम्ही विनंती करतो. आणि आदर्श मिपाकर (संपादक) होऊनच दाखवावे!
जय हिंद! जय भारत! जय महाराष्ट्र! जय मिपा! जय सगळे!
प्रतिक्रिया
22 Sep 2016 - 11:59 am | रातराणी
आ. मा. गावडेसरांनी लेखन वाचून इथे प्रकाशित करण्यास योग्य आहे असा हिरवा कंदील दाखवल्याने धाडस करत आहे. श्री श्री टका सर आणि अप्रत्यक्षरित्या या लेखात आलेले अन्य मिपाकरांनी हा धागा खेळीमेळीने घ्यावा ही नम्र विनंती. :)
30 Sep 2016 - 9:54 am | टवाळ कार्टा
आता गावडेसर हे पण करतात?
22 Sep 2016 - 12:00 pm | अभ्या..
आहाहाहाहा,
टक्याला तह्यात (तो किंवा मराठी आंजा दोन्हीपैकी ज्यात धुग्धुगी शिल्लक असेल तोपर्यंत) संपादक करण्यात यावे एवढे बोलून याटिकानी मी खाली बसतो. जागा आहे म्हणून कुणीही माझ्या शेजारी लगेच चिटकायला/चिकटायला/खेटायला येऊ नये. तंबाखुचा खकाणा बसल्यास मंडळ जबाबदार नाही. नुसता चुना मिळणार नाही. धन्यवाद
.
दु. दु. अभ्या..
22 Sep 2016 - 5:46 pm | अत्रुप्त आत्मा
@तंबाखुचा खकाणा बसल्यास मंडळ जबाबदार नाही ›››
®नुसता चुना मिळणार नाही.››› दुत्त दुत्त!
22 Sep 2016 - 12:00 pm | सतिश गावडे
"आवाज" मधल्या वि आ बुवांच्या खुसखुशीत लेखनाची आठवण झाली.
22 Sep 2016 - 12:05 pm | यशोधरा
संपादक झाल्यावर श्रीटकाश्री प्रश्न विचारते झाल्यास केवळ हो किंवा नाही मध्ये उत्तरे द्यावीत, हे अॅड करा हो! =))
22 Sep 2016 - 12:17 pm | रातराणी
पॉइंट नोटेड!
30 Sep 2016 - 9:52 am | टवाळ कार्टा
आधी तेव्हडे जमले कि सांगा मग पुढे बघू
30 Sep 2016 - 10:16 am | यशोधरा
हो :D
30 Sep 2016 - 10:20 am | रातराणी
खरंतर तीन ऑप्शन पाहिजेत ना
A. हो
B. नाही
C. ल्ल्लूउउउउउउ
:D
30 Sep 2016 - 10:23 am | यशोधरा
हो :D
पण,
ल्ल्लूउउउउउउ - हा ठराविक लोकांसाठी असेल!
30 Sep 2016 - 12:10 pm | टवाळ कार्टा
आँ... दू दू दू...दूत्त दूत्त
.
.
.
हे पण ऍड करा त्यात ;)
30 Sep 2016 - 12:23 pm | यशोधरा
हो किंवा नाही मध्ये ते कसे बसवणार, म्हणून केले नाही.
22 Sep 2016 - 12:09 pm | एस
कसं सुचतं हो तुम्हांला हे सगळं? ;-)
22 Sep 2016 - 12:09 pm | इस्पिक राजा
वैयक्तिक निंदानालस्ती करुन काय साधले? मग टक्याने पिसे काढली की मात्र आरडाओरडा सुरु होइल.
22 Sep 2016 - 12:12 pm | अभ्या..
बोंबला, टक्या कशाला पिसे काढतय? तो स्वतःच पिसारा फुलवून नाचत बसला असेल हे वाचून. ;)
22 Sep 2016 - 12:21 pm | सतिश गावडे
टकया पीसे काढतो???
22 Sep 2016 - 12:22 pm | अभ्या..
ते काय आयब्रो, वॅक्सिंग सारखे सोपे वाटले काय गावडे सर?
टक्या इतकी मेहनत करणार नाही.
22 Sep 2016 - 1:03 pm | नाखु
(अंगात) आलेला टक्या असे कल्पनेनेच घाम फुटला, नुसता बिन (पिसाचा) आवरत नव्हता (संदर्भ) एक कट्टा चायाचित्र अता पिसे आल्यावर कसा आवरेल.
बाकी कल्पनेची आयडीया आणि "उम्मीद"वारी आवडली.
टक्या वायद्याचा पक्का आहेस ना?
खुलासाधीन नाखु
22 Sep 2016 - 1:50 pm | बोका-ए-आझम
त्या बावळ्या टकूचे मज लागले पिसे ग
असं गाणं म्हणावं लागेल ब्रे!
22 Sep 2016 - 1:12 pm | इरसाल
टक्या, आयब्रो आणी वॅक्सिंगपण करतो ???????????????
22 Sep 2016 - 1:12 pm | बोका-ए-आझम
तर हा लेख त्यानेच लिहून घेतलेला आहे याची दाट शक्यता आहे.
22 Sep 2016 - 5:04 pm | संजय पाटिल
सहमत!
30 Sep 2016 - 9:50 am | टवाळ कार्टा
असे वाटत असेल तर हाय तुमणे मुझे ओळख्याच नई
30 Sep 2016 - 9:52 am | टवाळ कार्टा
नाय ओ, अर्कचित्र म्हणतात याला, मिपावर असे धागे कमी आहेत आणि हा लेख झ्याक जमलाय ;)
22 Sep 2016 - 12:31 pm | खेडूत
:)
मस्त. सहस्रबुद्धेंच्या चकलीसारखी खुसखुशीत.
फक्त मुलाखतमूर्तीचा विचारात गढलेला फटू पायजे होता.( रेखाचित्र/ अर्कचित्र चालेल!)
22 Sep 2016 - 12:36 pm | यशोधरा
सहस्रबुद्धें कोण? कुठे मिळतात त्यांच्या चकल्या?
24 Sep 2016 - 6:17 am | आनन्दिता
कोणाला कशाचं ... यशो तै ला चकलीचं =))
24 Sep 2016 - 6:35 am | यशोधरा
धाग्यावर पॉपकॉर्न ऐवजी चकल्या घेऊन बसायला!! =))
22 Sep 2016 - 12:40 pm | जव्हेरगंज
फुटलो =)))
22 Sep 2016 - 1:15 pm | कैलासवासी सोन्याबापु
बाकी कल्पना नाही मात्र माननीय बाबबाब टका भाऊ, संपादकपदाची मान गळ्यात पडताच "रॉयल एनफिल्ड : प्रश्नोत्तरी" धागाच पहिल्या फटक्यात उडवतील असे वाटते.
(कार्ब्युरेटर पेट्रोलात बुडवुन बसलेला) बाप्या
22 Sep 2016 - 6:24 pm | अभ्या..
हाण तिच्या मारी.
अशा प्रकारे सोल्जरभावानी आपली बॅरेटा रिकामी केलेली आहे.
22 Sep 2016 - 2:11 pm | कपिलमुनी
टकाचा संपादकपद == रागांचा पंतप्रधानपद
=))
22 Sep 2016 - 2:23 pm | अजया
रारा रारा ,टका संपादक झाला तर तुम्ही टका साहेबांची पिए व्हावे. तुम्ही डिक्टेशन मस्त घेता ;)
22 Sep 2016 - 2:32 pm | पैसा
+१
हमखास यशस्वी, तुफान विनोदी, करुण रसप्रधान, एकपात्री, संगीत, फार्सिकल नाटकाचा प्रयोग. लैच्च मणोरंजक धागा आहे. याचे विडंबन बुवा किंवा स्पा कोणत्या शब्दात करतील या कल्पनेने हहपुवा!
23 Sep 2016 - 10:47 pm | रातराणी
अरे रे पी ए बी ए काय व्हायला सांगता! तिकीट देत असला तर आपण पार्टी बदलायला तयार आहे ;)
22 Sep 2016 - 2:26 pm | वाल्मिक
पूर्ण मुलाखत खोटी आहे ,जसे नारदमुनी कायम नारायण नारायण करत असतात ,टका सध्या फक्त पातेलं पातेलं करत आहे
22 Sep 2016 - 3:23 pm | प्रचेतस
=))
जिलबी पडली तर एकदाची.
बाकी आजपासून टवाळजी कार्टा ह्यांना भासं म्हणण्यास हरकत नाही.
23 Sep 2016 - 7:37 pm | मी-सौरभ
याला आमचा विरोध आहे. ओरोगिनल भा सं आता मा सं झाले असले तरी आमच्यासाठी भा सं म्हणजे तेच फक्त
ट्काला 'ऊपरा उ.सं.' म्ह्टलेलं चालेल का?
26 Sep 2016 - 9:02 am | नाखु
ट्काला 'कोपरा उ.सं.' म्ह्टलेलं चालेल का?
संदर्भ प्रा डाँचा को नाडा धागा
22 Sep 2016 - 5:06 pm | संजय पाटिल
वर म्हंटल्या प्रमाणेच.. खुसखुशीत!!
22 Sep 2016 - 6:03 pm | नीलमोहर
कोणास ठाऊक कसा, पण संपादक झाला टका
टकाने उठवले रान, बंद पाडले डू आयचे दुकान
सदस्य म्हणाले, व्वा व्वा !
टका म्हणाला, झाडूच हवा
कोणास ठाऊक कसा, पण संपादक झाला टका
टकाने मारली कात्री, ot करून रात्री
मिपाकर म्हणाले, छान छान !
टका म्हणाला, आपलीच शान
कोणास ठाऊक कसा, पण संपादक झाला टका
टकाने भरले रागे आणि धडाधड उडवले धागे
मालक म्हणाले, शाबास !
टका म्हणाला,
काही नाही......
टका म्हणाला,
आ ता मा झ्या त ता क द ना ही... !!
22 Sep 2016 - 6:27 pm | अभ्या..
खतरनाक. आवडलेली आहे कविता.
लाकडी घोड्यावर डुलणारा टक्या दिसायलाय नजरेसमोर.
22 Sep 2016 - 7:32 pm | रातराणी
सहमत!
22 Sep 2016 - 7:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
=)) =)) =))
23 Sep 2016 - 8:58 am | बोका-ए-आझम
मिपामधल्या आयडींची भरली होती सभा
टका नव्हता सभापती तरी मध्ये उभा!
टका म्हणाला टका म्हणाला
आयडींनो
मिपावरची सूट मिपावरची सूट
तुम्हा आम्हा सर्वांना डू आयडीचे शेपूट!
या शेपटाचे कराल काय
पिरातै म्हणाली अश्शा अश्शा
शेपटीने मी मारीन (अमेरिकन) माशा!
पुढची कडवी पूर्ण करावीत आणि प्रचंड हलके घ्यावे ही णम्र विनंती!
23 Sep 2016 - 9:17 am | पिलीयन रायडर
मंगलाष्टकं लिहायला हवी तिथे बड्बड गीतं!!!
23 Sep 2016 - 11:09 am | रातराणी
भारी आहे!
23 Sep 2016 - 9:18 am | शिव कन्या
हे भारी!
30 Sep 2016 - 9:48 am | टवाळ कार्टा
ख्या ख्या ख्या, भारी डोके चालते तुझे
30 Sep 2016 - 12:58 pm | सामान्य वाचक
कित्ती छान बड्बडबड्बडगीत
22 Sep 2016 - 6:33 pm | अजया
जबराट कविता =))))
22 Sep 2016 - 7:21 pm | माम्लेदारचा पन्खा
ब्वॉर......आता बघूया पुढे काय होतंय !
22 Sep 2016 - 8:20 pm | वडाप
ते टकाशेट निवुडणुकीला हुबं हाय का? आमच्या त्यास्नी शुबेच्चा. लय प्रामाणिक उमीदवार वाटतंय. तरुण रक्ताचं गडी हाय. पंधरा मिनिटाचंच राज्य मागतायत ह्यो तेंचा विनय हाइच. इत्त चांगलं काम करतील की लुकं पंधरा वर्स र्हा म्हनतील हा विस्वास ठीवा. ते सुलापुरातलं पावणं जरा तिकट बोलतं त्याचं मणावर घिऊ नगा. मदतीला पक्क हाय जनू. परचारासाठी आपली गाडी हैच. खाटाबिटा आनू नका. पब्लिक घिऊन जैल. पुना शुबेच्चा. ( मुलाखत घिणाय्रा म्यडमनी अगुदर शुबेच्चा दिल्या पैजेल)
22 Sep 2016 - 8:56 pm | किसन शिंदे
अच्छा, असं कनेक्शन आहे तर..
22 Sep 2016 - 10:20 pm | सही रे सई
टका"भाऊं"चा विजय असो.
एकच वादा, टक्या दादा
30 Sep 2016 - 9:46 am | टवाळ कार्टा
ओ माझ्याकड़े बहिणी आहेत आधीपासून, त्याच्यात व्हेकंसी नाही, गफच्या जागा रिकाम्या आहेत
30 Sep 2016 - 9:46 am | टवाळ कार्टा
ओ माझ्याकड़े बहिणी आहेत आधीपासून, त्याच्यात व्हेकंसी नाही, गफच्या जागा रिकाम्या आहेत
22 Sep 2016 - 10:52 pm | बॅटमॅन
१५ मिनिटे हा कालावधी कमी समजू नये. १५ मिनिटांत काहीही होऊ शकते. अफझलखानवधापासून हिरोशिमा नागासाकी स्फोटापर्यंत अक्षरशः काहीही़.
नायक पिच्चरमध्ये स्वच्छ भारत फेम अनिल कपूर जसा एका दिवसात अख्खा देश बदलतो तसे टकाशेट १५ मिनिटांत अख्खे मिपा बदलतील.
23 Sep 2016 - 9:14 am | पिलीयन रायडर
नीट प्लान रेडी असेल तर १५ मिनिटं खुप झाली.
30 Sep 2016 - 9:44 am | टवाळ कार्टा
बाब्बो, चक्क आपल्या तिघांचे एकमत?
1 Oct 2016 - 9:19 am | पिलीयन रायडर
स्क्रीनशॉट घेतलाय! मौल्यवान क्षण आहे मिपाच्या इतिहासात. =))
1 Oct 2016 - 9:24 am | पैसा
कोणातरी दोघांचे आयडी हॅक झाले असणार!
1 Oct 2016 - 9:29 am | पिलीयन रायडर
किती तो कॉन्फिडन्स!!!
22 Sep 2016 - 11:27 pm | खटपट्या
एकदा टका संपादक झाला की सर्व म्हामंडळं, समीत्या, कळव्यातल्या आमदारास्नी मिळनार.....
23 Sep 2016 - 12:07 am | वरुण मोहिते
हा हा हा!
23 Sep 2016 - 8:53 am | बोका-ए-आझम
तुम्हा लोक्सना जरा पण sense नाही यार! मिपाचा संपादक आणि आयडी काय? टवाळ कार्टा? १५ मिनिटांसाठी का होईना, दुसरा आयडी घ्यायला पायजेल हे!
चला, मी सुचवतो २-३
चमत्कारी चंदू/टक्कू मक्कू चंदू
अनाहत
पाऊंड्री (युकेला जाऊन आल्यानिमित्ताने)
भारदस्त मेला (टवाळ कार्टाचा प्रौढ अवतार)
गरजूंनी अजून सुचवावेत ही णम्र विणंती!
23 Sep 2016 - 8:55 am | सतिश गावडे
जॉनी वॉकर
शिवास रीगल
रॉयल स्टॅग
ब्लेन्डर्स प्राईड
इंपिरीयल ब्ल्यू
23 Sep 2016 - 9:20 am | नाखु
भारदस्त मेला (टवाळ कार्टाचा प्रौढ अवतार)
भारदस्त घोडा (टवाळ कार्टाचा प्रौढ अवतार)
लहान्ग्याला कार्टा मोठ्याले घोडा म्हणतेत असे पुर्वसूरींचे म्हणने आहे,संदर्भा (खुलाश्यासाठी)खालील प्रभुतीम्शी संपर्क करणे.
ऐतीहासीक साठी :बॅट्टमण्,वेदकालीन साठी :आत्मुदा चारोळीवाले शीलालेख स्म्दर्भासाठी :फक्त प्रचेतस सर
23 Sep 2016 - 7:41 pm | मी-सौरभ
ट्टॉक फेणे
कळव्याचा दादा
यंदा कर्तव्य आहे
नडला त्याला चपला
फोरेन रिटर्ण
23 Sep 2016 - 10:36 pm | बोका-ए-आझम
अश्वकुलात आमची कधी गणनाच केली नाही त्यामुळे कार्टा ते घोडा हा metamorphosis लक्षात आला नाही! ;)
25 Sep 2016 - 2:03 am | एकुलता एक डॉन
paatela ?
23 Sep 2016 - 10:39 pm | बोका-ए-आझम
असते तर ही नावं हिट झाली असती! ;)
23 Sep 2016 - 9:20 am | श्रीरंग_जोशी
टक्याची मुलाखत प्रत्यक्षात घेतली आहे असे वाटले.
बाकी टक्याचे वैशिष्ट्य म्हणजे साळसुदपणाचा आव आणुन आपण त्या गावचेच नाही असा दावा करणे. उदा - एखादा अट्टल फुकाड्या काही ठराविक लोक बाजूला असताना 'नेव्ही कट' हे शब्द ऐकून विचारेल, "अच्छा नेव्ही वाल्यांचीही स्पेशल हेअरस्टाइल असते का?" ;-) .
29 Sep 2016 - 2:10 pm | टवाळ कार्टा
हे माझ्यापेक्शा तुम्हालाच शोभून दिसेल...हा घ्या पुरावा =))
23 Sep 2016 - 10:42 pm | अभ्या..
इथे कुठेतरी मी काल टक्याचा फोटो पाहिल्यागत वाटतो. खालपर्यंत आलेला हुडी शर्ट घातलेला, गल्यात आत्मुबुवाच्या स्मायल्या, चिल्लर अंगठ्या आणि पार खाली घसरलेल्या पॅन्टीवर पट्टा चढवलेला. संपादक का कैतरी बॅज होता.
कुठे गेला तो फोटो? का काढला? कुणी लावला त्याने प्लीज मला पाठवा ना?
(टीपः परत लावायचा नसल्यास अजून एक खंग्री कॉपी बनवून लावली जाईल ह्याची टक्याने नोंद घ्यावी)
24 Sep 2016 - 6:36 am | यशोधरा
हाओ, मीपण पाहीलेला.
24 Sep 2016 - 7:20 am | रुपी
हो.. बहुतेक नीमोने टाकला होता (चु.भू.द्या.घ्या.).
बाकी, मुलाखत मस्त ;)
24 Sep 2016 - 7:50 am | रातराणी
नीमोच्या प्रतिसादातल्या टक्याच्या फोटोला पंख फुटून उडून गेलेला दिसतोय ;)
24 Sep 2016 - 7:43 pm | नीलमोहर
न जाणे तो सुदिन केव्हा उगवेल जेव्हा मिपावर दिलेल्या कुठल्याही लेख, चित्र, बॅनर इ.साठी आम्हांस स्पष्टीकरण
न द्यावे लागेल. असो.
आपणाला कुणालाच दृष्टिभ्रम झालेला नसून श्री.श्री.आ.मा.भा.सं यांच्या या सर्वांगसुंदर मुलाखतीस हातभार
म्हणून त्यांची एक गोजिरवाणी प्रतिमा खरेच इथे टाकण्यात आलेली होती. मात्र लोकहो, आपणांस माहीत असेलच,
आपले भा.सं किती साधेभोळे, गंभीर, मितभाषी, लाजाळू, सज्जन, सालस, सर्वगुणसंपन्न असे आहेत ते,
(कोण ते ल्ललुलुलूलूउउऊऊ करतंय !!)
त्यामुळे प्रत्यक्षाहूनही प्रतिमा उत्कट असे आपुलेच रूप पाहूनी ते कानकोंडे होऊनी वदले, आमची छबी इथून
त्वरित काढावी. आम्ही हे कार्य समाजहितासाठी, जनहितासाठी, अना _ _ साठी करणार आहो.
आम्हास कोणत्याही प्रसिद्धीची हाव नाही, किंबहुना गरजही नाही, आम्ही आलरेडी लोकप्रिय आहो.
(अता कोण ते अपने मुंह मियाँ मिठठू म्हणतंय !!)
भा.सं कधी आ.सं. बनतील सांगता येत नसल्यामुळे आम्हीही घाबरून लगोलग सं.मं.ना ती प्रतिमा काढायची
विनंती केली, ती लगेच काढलीही गेली (कोण ते सं.मं. च्या कार्यतत्परतेबद्दल शंका घेत असतंय !! )
मात्र तत्पूर्वी सं.मं.नी आम्हांस गोडीत पुन्हा असे न करण्याबद्दल वॊर्निंग ही दिली.
(पहिल्यांदाच अशी वॊर्निंग बिर्नींग मिळाल्यावर अशा काय गुदगुल्या झाल्या म्हणून सांगू, मिपावर असल्याचं
अगदी सार्थक झालं :)
तेव्हा आता कुणालाही ती प्रतिमा पहायची असल्यास कृपया श्री.श्री.आ.मा. भा.सं यांच्याशी संपर्क साधणे,
त्यांच्याजवळ ती सेव्ह केलेली असेलच :)
अन्यथा मा.श्री.श्री.अभ्या.. यांना विनंती की त्यांनी आपुले च्यालेंज इथेच पूर्ण करून दाखवावे.
एका आ.मा.भा.सं ची सुरस आणि चमत्कारिक कहाणी दीर्घोत्तरी सुफळ संपूर्ण.
24 Sep 2016 - 7:51 pm | अभ्या..
चायला टक्यानेच अर्ज मागे घेतला व्हय मांडवली करुन?
जौद्या मग. असल्या शेंदाडशिपायासाठी काही करायची आमची इच्छा नाही. पहिल्यापासूनच त्यांची ही पुच्छ ते मुरडिले सवय माहीत होती. जरा खरडवह्यांच्या संस्कारातून काही सुधारणा असेल असे वाटलेले पण त्यांना व्यनिचे गुलुगुलु अधिक आवडते असे दिसते. तस्मात भासं आणि त्यांचे प्रतिमासंस्करण आणि त्यांच्या कहाण्या त्यांनाच लखलाभ.
24 Sep 2016 - 10:46 pm | नीलमोहर
भा. सं. यांनी अर्ज वगैरे मागे घेतलेला नाही, वरील प्रकरणात त्यांच्या फोटोचा न विचारता वापर करणे
चुकीचेच होते, त्यांच्या जागी इतर कुणीही असतं तरी हेच केलं असतं, आणि ते योग्यच होतं,
यातून त्यांना प्रसिद्धीचा हव्यास नाही हे कळून येते.
24 Sep 2016 - 10:54 pm | अभ्या..
ओके.
.
.
गेला उडत.
30 Sep 2016 - 9:40 am | टवाळ कार्टा
फुकट फौजदार बनण्यापेक्षा शेंदाड शिपाई बरा, असो मला वैयक्तिक चिखलफेकीत रस नाही
30 Sep 2016 - 12:36 pm | अभ्या..
ह्या चिखलफेकीला मात्र गंभीरपणे घेतलेय बरका.
30 Sep 2016 - 1:10 pm | टवाळ कार्टा
ठिक आहे की
24 Sep 2016 - 8:09 pm | प्रचेतस
असा सगळा प्रकार झाला तर.
25 Sep 2016 - 11:33 pm | सतिश गावडे
आ.. दु दु दु..
26 Sep 2016 - 2:26 pm | टवाळ कार्टा
रारा आणि नीमो, तुम्च्या चपला पाठवून द्या
26 Sep 2016 - 2:32 pm | अभ्या..
सिंहासनावर ठेवून त्यांच्या नावाने राज्य करायचा बेत असेल तर आधीच सांगतो.
झेपणार नाही तुला.