(आमच्या घरात दर शुक्रवारच्या मित्रमंडळी आयोजित 'पोकर नाईट' नंतर शनिवारी सकाळी सगळे काही/सगळे जण ठप्प होते/होतात. अशा एका शनिवार सकाळचे हे चित्र)
फुकट सकाळ
***
कुठे कोण पडले पहाटे बघितले
कि वातावरण स्तब्ध नि:शब्द होते
सुटीच्या सकाळी असावे तसे हे
पहा फक्त पेले रिकामे रिकामे
***
नि ओट्यावरी आकृत्या बाटल्यांच्या
(नि सोफ्यावरी मित्रही सांडलेले!)
अकल्पित जशी गूढ पिशाच्चे असावीत
निघाले धुराचे किती लोट होते
फुप्फुसातुनी? घाबरा जाहलो मी
***
आधारीतः धुकट सकाळ
प्रतिक्रिया
3 Feb 2009 - 12:59 am | धनंजय
मस्तच!
(नसत्या धुराच्या लोटांना बघून घाबरा झालात की धुराच्या लोटांमुळे जीव कासावीस झाला?)
3 Feb 2009 - 1:03 am | चतुरंग
(खुद के साथ बातां : रंग्या, द्राक्षासवाच्या उल्लेखाने कसं अगदी ओळखीचं वाटतंय ना विडंबन? ;) )
चतुरंग
3 Feb 2009 - 7:01 am | सहज
बेला विडंबन आवडले.
:-)
3 Feb 2009 - 7:41 am | घाटावरचे भट
झकास विडंबन बेलाराव....
3 Feb 2009 - 8:40 am | सुनील
बर्याच आठवणी जाग्या झाल्या.
;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
3 Feb 2009 - 11:34 am | झेल्या
अवांतरः
राजकारण समाजकारण क्रीडाविश्व
'घडा''घडा' व्यक्त केलेले विचार
राशीभविष्य दिनविशेष चिंटू
बालमित्र सप्तरंग (चतुरंग यांची आठवण झाली) मुक्तपीठ फ्यामिली डॉक्टर
'सकाळ' फुकट कधीच येत नाही
साडेतीन रुपये पडतात :)
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
3 Feb 2009 - 2:38 pm | केशवसुमार
बेसनसेठ,
आज काय जोर लावलाय..
जुने दिवस आठवले..
(जुना)केशवसुमार
3 Feb 2009 - 3:44 pm | लिखाळ
मस्तच !
विडंबन आवडाले :)
-- लिखाळ.
3 Feb 2009 - 11:19 pm | प्राजु
बेला... खूप दिसांनी दिसलात. खूप बरं वाटलं.
मस्त विडंबन.. आवडलं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/