'शिरगाव च्या आत्तार सरांना 'क्रुती भक्ती ' पुरस्कार ' प्रदान

शनआत्तार's picture
शनआत्तार in जनातलं, मनातलं
13 Nov 2008 - 10:05 pm

शिरगाव च्या आत्तार सरांना " क्रुती भक्ती" पुरस्कार प्रदान
राजेंद्र चव्हाण शिरगाव

श्री. शमशुद्दिन नसिरुद्दिन आत्तार म्हणजेच शिर्गाव हायस्कूल चे आत्तार सर हे या वर्षीच्या नारायण आश्रमच्या 'क्रुती भक्ती ' पुरस्काराचे मानकरी आहेत. पणती होऊन तेवत राहणा-या , कार्यरत व्यक्तिंच्या साठी हा पुरस्कार आश्रमाच्या वार्षीक स्नेह मेळ्याव्यात प्रतीवर्षी दिला जातो. रविवार दिनांक १६/११/२००८ रोजी दुपारी २.३० वाजता हा कार्यक्रम नारायण आश्रम कोळोशी येथे होईल. संगणक आणी इंटरनेट या सारख्या नव्या तंत्रद्यना मध्ये स्वःता पारंगत होऊन , विद्यार्थी , शिक्षक आणि पाल़कांमध्ये त्या विषयी गोडी निर्माण करण्यात अतिषय महत्वाचे काम आत्तार सर गेली १० वर्षे करताहेत. ' शिक्षण आणि ग्रामीण पुनर्चने' साठी वचन बद्द असलेल्या नारायण आश्रमाला म्हणूनच सरांविषयी काव्तुक वाटत !
साधारण १०-१२ वर्षा पुर्वी कोकणात शाळा- शाळांमध्ये संगणक येऊ लागले होते. शहरात त्या वेळी प्रचंड फी आकारून संगणाकाचे वर्ग सुरू होते. नोकरी व्यवसायात संगणकाचे महत्व वाढत होते. गावात या गोष्टी फक्त एकण्या- वाचण्या पुरत्याच मर्यादीत होत्या. संगणक सगळ काही करू शकतो वगॅरे वगॅरे ..... पण तो दिवस कसा हे सुद्दा सगळ्याना माहीत नव्हत . तो फक्त एक चर्चेचा विषय होता. काव्तुकाचा विषय होता. कोकणातला सामान्य शेतकरी पालक तर एखाद्या गो-या परदेशी पर्यटकाकडे दोनक्षण बघाव तस संगणकाकडे बघत होता. गाव गोळा करून , मोठी सभा भरवून , लेझीम ढोल- ताशांच्या फटाक्यांच्या आवाजात आणि नेत्याच्या उपस्थितीत संगणक शाळांना भेट देण्याचे कार्यक्रम त्या काळी होत असत. लोक हा संगणक बघण्यासाठी गर्दी करत असत . असे कित्येक संगणक शाळांना मिळाले परंतू त्याचे स्वागत - समारंभ झाल्यावर त्याच्या कडे कुणी फार लक्ष देत नव्हते. थोडा वेळ गंमत बघुन पुन्हा आपल्या कामाला लागत होते. इतक्या वर्षानंतर अजूनही काही शाळांमध्ये संगणक बिघडेल म्हणून त्याला कोणी हातही लावत नाही. अंगनवाड्यांमधल्या खेळाण्यांसारखिच त्याची स्थिती. झाली आहे. ज्या वेगाने संगणक आपल्या घरातला व्हायला हवा होता , आपला मित्र बनायला हवा होता , तस झाल नाही . त्याच्याशी कोणी बोलायलाच तयार नव्हत. अशा या निरूत्साही वातावरणात म्हणूनच आत्तार सरांच महत्व फार मोठ आहे.!
तुम्हालाही आठवत असेल, शाळेच्या सहलीला गेल्यावर सगळ्यात पुढे धावणारी काही मुले असतात. तो नवा प्रदेश , ती नवी गोष्ट सगळ्यात आधी बघायची असते त्याना नुसती बघायची नसते तर पुन्हा मागे पळत येवून सगळ्या समोर त्यांच वर्णन करावयाचे असते. सहलीची रंगत वाढते अश्या मुलांनमुळे.! आपण ही त्यात असतो कधी कधी . पण वया बरोबर हा उत्साह ओसरत जातो. आत्तार सरांनी मात्र हे पुढे पळत जाणार मुल मनात छान जपलय!
१९९८ साली सरांनी संगणक प्रथम हाताळला तो बिघडेल काय ही भीती त्यांनाही वाटत होती. पण त्यानी त्यावर मात केली बाजारात उपलब्द असलेली पुस्तके वाचत राहीले. एकेक नवनवी गोष्ट शिकत राहीले ते. शिकैता शिकता ते इतरांना शिकवितही होते. हळू हळू आत्मविश्वास वाढत होता. २००३ साली एन. आय्.आय. टी ने किआऍस्क शिरगाव मध्ये सुरू केले आणि सरांनी पहिल्यांदाच इंटरनेटची गंमत अनुभवली. मुलं आणि सर एकत्र्च हा अनुभव घेत होते. सगळ जग आता जवळ , अगदी समोर ऊभे होते. काही गोष्टी मुलं सरांकडून शिकत होती. तर अनेक वेळा मुलंच सरांना शिकवत होती. इथ विद्यार्थी आणि शिक्षक हा भेद कधिच मावळला होता. सगळेच विद्यार्थी होते. मुलांनमध्ये मिसळून गेल्यामुळे शाळांतच नव्हे तर शाळेबाहेरही , घरी, मुलांच्या घोळक्यातच सर दिसत होते. ' संगण्यासारख नव काही सरांकडे नेहमीच असे . डाउन लोड, अपलोड, मेल चाऍट यासारखे शब्द नेहमी नेहमी सरांकडून एकून संगणक न येणा-या ला पण काही क्षण आपणास संगणकातले बरेच काही येते असे वाटत होते. ज्याना संगणाक शिकायचा शिकायचा आहे तो सरांच्या आसपास घुटमळणारच. मुलांसाठी संगणक हा गेम्स खेळण्यापेक्षाही वेगळा आहे हे व बरच काही शिकता येते हे सर्वाना सरांनी पटऊन दिले आहे.
आताशा सरांकडे स्वःताचा लॅपटाप असल्याने आणि इंटर्नेट ही असल्याने गेल्या ३ -४ वर्षात सरांच काम वाढलय. जिल्ह्यात आणि जिल्ह्या बाहेरही शिक्षकांसाठी आणि इतर सामाजीक संस्थांसाठी त्यानी संगणक प्रशिक्षण दिलय. अवघड सोपे करून सांगितल्याने त्यानी प्रशिक्षीत केलेल्या अनेकांना संगणक घेऊन ते सरांशी सतत संपर्कात रहात आहेत. अनेक शाळांमध्ये आता शॉशणिक सिडीज चे कार्यक्रम होत आहेत. सरांकडे तर अशा सिडीज चा केव्हडा तरी संग्रह झाला आहे. त्यात रोज भरच पडत आहे. रोज नव्या ३ -४ नव्या संकेत स्थळाना भेट देऊन त्यातल उपयुक्त ते सर्व डाउनलोड करण सुरू असत. त्यात नाटका साठी संगित असेल, कधी कोड, कधी विनोद, तर कधी छान्स गणित , कधी कविता,तर कधी उपग्रहातून घेतलेल छायाचित्र.

जीवनमानतंत्रविज्ञानशिक्षणविचारशुभेच्छाप्रतिसादअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

कपिल काळे's picture

13 Nov 2008 - 10:24 pm | कपिल काळे

ह्या आधीच्या त्यांच्या कामाचे कौतुक समस्त मिपा करांनी केले होते.

आता त्यांच्या संगणक शिक्षण प्रसाराच्या कार्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

अनंत अमुची ध्येयासक्ती
अनंत अन आशा
किनारा तुला पामराला!!

किप अप द गुड वर्क.

http://kalekapil.blogspot.com/

कुंदन's picture

13 Nov 2008 - 10:32 pm | कुंदन

अभिनंदन आत्तार सर....

पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा !!!

विसोबा खेचर's picture

14 Nov 2008 - 9:42 am | विसोबा खेचर

अभिनंदन..

(गाववाला) तात्या.

वेताळ's picture

14 Nov 2008 - 10:09 am | वेताळ

तुमच्या कार्याला सुयश मिळो हिच आमच्या कडुन तुम्हाला शुभेच्छा.
वेताळ

अभिजा's picture

28 Jan 2009 - 1:40 pm | अभिजा

मित्रांनो,
हे कोणत्या जिल्ह्यातील/तालुक्यातील शिरगांव गाव आहे ते कळेल काय?
धन्यवाद!

चंबा मुतनाळ's picture

28 Jan 2009 - 1:45 pm | चंबा मुतनाळ

अत्तारसरांचे अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा.

-चंबा

मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.'s picture

28 Jan 2009 - 2:28 pm | मधु मलुष्टे ज्य...

कार्यास माझ्याही शुभेच्छा !

-- मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.

साती's picture

28 Jan 2009 - 3:05 pm | साती

चांगला आणि माहितीपूर्ण लेख. आत्तार सरांचे अभिनंदन.
कुठल्या जिल्ह्यातले आणि कुठल्या तालुक्यातले शिरगांव? कारण शिरगांवे कोंकणात बरीच आहेत.
साती
मु./पो. शिरगांव
ता./ जि. रत्नागिरी.

अनंत छंदी's picture

28 Jan 2009 - 6:54 pm | अनंत छंदी

आत्तार सर
आपले मनापासून अभिनंदन.

कपिल काळे's picture

28 Jan 2009 - 8:21 pm | कपिल काळे

जि. सिंधुदुर्ग
ता.देवगड

येथील शिरगांव आहे हे.