बाबाच्या पोटावर
झोपतय एक वेडं पिल्लू
तोंडामध्ये अंगठा धरून
हसतंय हळू खुदूखुदू!
इवल्याशा बोटांच्या
इवल्या इवल्या मुठीने
ढुशी देत सारख्या सारख्या
करतयं बाबाला गुदूगुदू!
बा - बा - का - का
मध्येच हसू खळखळून
बोबड्या बोलांच गाणं एक
फिरतंय घरभर दुडूदुडू!
- संदीप चांदणे
प्रतिक्रिया
5 Apr 2016 - 1:02 pm | विजय पुरोहित
अतिशय आवडली....
5 Apr 2016 - 2:27 pm | प्रचेतस
मस्तच संदीप.
सध्या घरभर चैतन्य पसरलं असेल.
5 Apr 2016 - 2:29 pm | टवाळ कार्टा
मस्तय :)
5 Apr 2016 - 3:45 pm | अभ्या..
मस्तच. कसलं भारी.
5 Apr 2016 - 3:49 pm | शान्तिप्रिय
मस्त संदीप
अभिनंदन
घराची ओढ म्हणजे काय कळले असेल आता.
ओफिस मध्ये दुपारचे तीन वाजले की घरच्या ओढीने जीव कासावीस होत असेल.
5 Apr 2016 - 3:51 pm | नाखु
पिल्लू चांदण्यातली तारकाच ती !!! रोज चमचमणारच
झक्कास ...
5 Apr 2016 - 4:10 pm | यशोधरा
किती गोड :)
5 Apr 2016 - 6:47 pm | विवेकपटाईत
मस्त आवडली
5 Apr 2016 - 7:03 pm | नगरीनिरंजन
बेसावध ब्रीडर्सच्या बजबजपुरीतले बडबडगीत!
5 Apr 2016 - 7:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आतली कविता अशी बाहेर येते तर.
सेठ पार्टीचं विसरु नका.
अभिनंद्न. :)
-दिलीप बिरुटे
5 Apr 2016 - 10:28 pm | चांदणे संदीप
तुमच्यासाठी........आजही...उद्याही...कधीही*
.
.
.
.
.
*अटी लागू
(ही ऑफर फक्त दर महिन्याच्या १ ते १५ तारखेपर्यंतच लागू असणार आहे)
6 Apr 2016 - 12:16 am | अभ्या..
सॅण्डीबाबा. मलाबी पार्टीचा वायदा केलेला हैस. लक्षात ठेव. नायतर पुतणीला चिमटे काढायचे शिकवीन. ;)
6 Apr 2016 - 7:03 am | प्रचेतस
मी पण हाय पार्टीला बरं का.
6 Apr 2016 - 9:29 am | नाखु
आमंत्रणाची वाट बघण्याचा करंटेपणा करू शकत नाही.
5 Apr 2016 - 8:50 pm | एक एकटा एकटाच
मस्त मस्त मस्तच
5 Apr 2016 - 8:55 pm | पैसा
खूप गोड!
5 Apr 2016 - 8:57 pm | जव्हेरगंज
लै भारी !
5 Apr 2016 - 9:04 pm | अत्रुप्त आत्मा
आवल्ली मया!
मत्त मत्त कविता!
5 Apr 2016 - 10:30 pm | चांदणे संदीप
प्रतिसादांसाठी सर्वांचे आभार!
Sandy
6 Apr 2016 - 12:11 am | बोका-ए-आझम
ही अनुभवण्याचीच गोष्ट आहे आणि कन्यारत्न असेल तर मग काय विचारता?
6 Apr 2016 - 12:55 am | तुमचा अभिषेक
मस्त ! आणि इथेही अभिनंदन :)
6 Apr 2016 - 6:36 am | मदनबाण
:)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ए सनम आँखों को मेरी खुबसुरत साज दे... :- रंगा पतंगा
6 Apr 2016 - 11:35 am | रातराणी
गोड :) अभिनंदन!!
6 Apr 2016 - 12:33 pm | सस्नेह
गोड !
7 Apr 2016 - 12:28 am | उल्का
आवडली.
परंतु एक शंका - बोबड्या बोलीत सहसा का-का नसतं ता-ता असतं.
मात्र अपवाद असू शकतो. :)
8 Apr 2016 - 11:10 pm | शिव कन्या
:) अभिनंदन..... दुडूदुडू कविता सुंदर...