बोबडी कविता!
बाबाच्या पोटावर
झोपतय एक वेडं पिल्लू
तोंडामध्ये अंगठा धरून
हसतंय हळू खुदूखुदू!
इवल्याशा बोटांच्या
इवल्या इवल्या मुठीने
ढुशी देत सारख्या सारख्या
करतयं बाबाला गुदूगुदू!
बा - बा - का - का
मध्येच हसू खळखळून
बोबड्या बोलांच गाणं एक
फिरतंय घरभर दुडूदुडू!
- संदीप चांदणे
अतिशय आवडली....
मस्तच संदीप.
मस्तय :)
मस्तच. कसलं भारी.
मस्त संदीप
पिल्लू
किती गोड :)
मस्त आवडली
बेसावध ब्रीडर्सच्या
अहाहा.
प्रा. डॉ. सर...
सॅण्डीबाबा. मलाबी पार्टीचा
मी पण हाय पार्टीला बरं का.
मी
मस्त मस्त मस्तच
खूप गोड!
लै भारी !
आवल्ली मया! मत्त मत्त कविता!
सहज गुणगुणत लिहिलेल्या बडबडगीतावरच्या
अरे वा!
मस्त ! आणि इथेही अभिनंदन :)
:)
गोड :) अभिनंदन!!
गोड !
खूप छान
:) अभिनंदन..... दुडूदुडू