(छटाक)

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
18 Mar 2016 - 9:21 am

"अरे सम्जता कोण तुम्ही स्वतःला ?" असला प्रश्न तू मिपाकर साहित्यीकांना विचारतोस. अरे असें विचारावं कसं वाटल तुला. फार धाडसी रे बुवा तू.अरे मिसा होणे म्हणजे काय गुट़का खायची गोष्ट वाटली काय तुला? उघडली पुडी लावली तोंडाला. आँ म्हणे काय समजता स्वतःला. अरे बच्चमजी फार कष्ट आणि निर्ढावलेपण आल्याखेरीज होता येणार नाही मिसा तूला.

"काय म्हणतोस मिसा मिसा काय लावलयं म्हणून अरे इथेच चुकता तुम्ही वाचक मंडळी जरा म्हणून डोळे उघडून बघायचं नाही,तुमच्या ज्ञान कवाडांना झापडं लावलीत का काय तेच कळेना अरे मिसा म्हणजे मिपाकर साहीत्यीक.पुन्हा मध्ये मध्ये बोलू नको.तूच आलास ना भेटायला मग आता मी काय सांगतो ते गुमान ऐक."

मार मजेत म्हणतोयस काय समजता स्वतःला ? अरे कच्चमजी फार द्रष्टे आहेत मिसा अगदी लोकसत्तेत काय येणार याचे संकेत सगळ्यात पहिल्यांदा मिपाला आले होते त्याचा आनंद घेणार का नाही. लागला वर तोंड करून असले प्रश्न विचारायला ? मराठी भाषेची गळचेपी दूर करण्यासाठी आम्ही झटत असतो आम्ही आहोत म्हणून अस्मिता शिल्लक आहे मिपावर. नाहीतर तुम्हाला टिनपाट साहित्य वाचायला लागल असतं कळलं कारे !!
"काय म्हणतोस "टिन्पाट" हा शब्द मराठी साहित्यातला नाही ? अरे देवा कधी रे सुधारणार तुम्ही वाचक मंडळी ? अनुभुती तोकडी पडतो रे तुमची . ठीक आहे आम्हालाच घ्यावी लागेल ही जबाबदारी आम्च्या खांद्यावर . काय करणार समाज प्रबोधनाचा आणि लोकजागृतीचा भार उचलण्यास आम्च्या पेक्षा सक्षम आणि समर्थ कोण आहे दुसरे"

"बोललास ना मध्येच काही कळले नाही म्हणून . अरे बालका, मिसा व्हायचं तर लक्ष्यात ठेव वाक्यात फारसा अर्थ नसला तरी चालतो पण शब्दात मात्र वजन असले पाहिजे. बर ते जाऊ दे तुझ्या आकलनापलिकडचे आहे. तर काय सांगत होतो टिन्पाट बद्दल.
बघ हा शब्द फार जुना आहे आणि अशोकमामा नी सुद्धा वापरलाय."

"तुम्हा वाचकांना कळायला पाहिजे काय काय दिव्य करावं लागतं मिसांना अरे तुम्हा घरबसल्या सा़क्षात हेवनची म्हणजे स्वर्गाची अनुभुती द्यायला संजय दृष्टीच पाहिजे ते येरा गबाळ्याचे काम नाही. तुमची सुप्त स्वशक्ती जागृत करून त्यात विवेक यावा म्हणून तर बर्याच जणांना पुन्हा लिहिते व्हावं लागलं. फार कठीण काम आहे ते. अरे तुला सांगतो अशी कैक उदाहरणे आहेत सगळी आठवणार नाहीत आत्ता पण सांगेन तुला हळू हळू. तूही ज्ञानी आणि चतुर व्हावा हीच तर ईच्छा आहे आमची."

हे बघ मिपाकर मिसा , काय म्हणतोस पिवळा पीतांबर सारखं वाटतयं, मध्ये बोलून माझी लिंक तोडू नकोरे.हे बघ बरेच वाचक म्हणजे तू नाही त्यातला मला माहीतेय. पण बरेच वाचक

कवीतांवर शिटतात पण शिटण्यावरही कवीता झालेली पाहिलीयेस का कधी कुठे ?

सांग ना मला सांग ? मिसा चं वेगळेपण दिसतं ते इथं कळल का रे मी काय म्हणतोय ते.

अरे काय म्हणून सांगू तुला फार काटेरी वाटेवरचे काम आहे रे हे मिसांचे.अरे कुणाला माहीती नाही अश्या ठिकाणाहून माहीती आणायची, ती मिपावर टंकायची आणि लागलीच आलेच बॅट्या सारखे पुरावे मागायला. त्याचं काय जातयं तोंड वर करून पुरावे मागायला. आम्ही मागतो का पुरावे. जिथून हे ज्ञान कण वेचले तिथे? अरे फुलं वेचावीत रे झाड पाहू नये कुठले आहे ते.?

काय म्हणतोस तुला मिसा माहीतेयत, त्यांना ओळखतोस ??? वेडा रे वेडा अरे मिसांना ओऴखत असणं आणि "ओळखून" असण फार फरक आहे रे !!

जाऊ दे आता माझी माहीती शोधायची वेळ झाली पुढच्या वेळेला जरा निवांत वे़ळ काढून ये आणि तू कुठल्या मिसांना ओळखतो ते सांग, पाहू तरी मिपा वाचक आहेस का मुरलेला. आणि हो जाताना दार लावून घे आजकाल हे ब्लॉगवरच्या कवीता फेकणारे अरे चुकलं चिनी बनावटी किरकोळ वस्तू विकणारे दुपारी हैराण करतात रे !!

============================================
यापूर्वी व यानंतर कुठेही प्रकाशीत नाही.
नावे व व्यक्ती खरे असल्यास निव्व्ळ जोगायोग समजावा.
हे लिखाण "बिनबियांच्या कथा" या योजने अंतर्गत आहेत.
खुलासा संपला

"आधीच्या बिनबियांच्या कथा"
बिनबिया कथा

वाङ्मयमुक्तकविडंबनसाहित्यिकमौजमजाआस्वादमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

नाखुकाकांनी क्रिप्टीक लिहून अगदी आम्हास हेवनात नेलं. आम्ही हेवनात जातो न जातो तोच कबुतरांच्या शिटण्याने त्यांनी आम्हाला थेट पृथ्वीवरच्या ग्यालरीत आणलं.

अभ्या..'s picture

18 Mar 2016 - 11:06 pm | अभ्या..

ग्यालरीत नाही. विथिका म्हणायचं. ज्योथिका म्हैत्ते ना सदानाची तिची दुसरी सिस विथिका.

प्रचेतस's picture

18 Mar 2016 - 11:09 pm | प्रचेतस

हो हो. विथिकाच.

सतिश गावडे's picture

18 Mar 2016 - 9:55 am | सतिश गावडे

काही झेपलं नाही. ओ काका, जरा गरीबांना समजेल असं लिहा की. :)

बाकी ती शिटण्यावरही कवीता झालेली पाहिल्यासारखी वाटते. =))

नाखु's picture

18 Mar 2016 - 10:26 am | नाखु

तुम्हाला स्व समजला नाही.

वाचकांना किमान एका वाचनात लेख अजिबात समजता कामा नये असा "बाबांचा" सज्जड दम आहे.

तुम्ही जुणे असूनही जाणते आहात. (कवीतेवर चार शब्द लिहावेत ही विनंती.)

आपला नम्र नाखु

भरत्_पलुसकर's picture

18 Mar 2016 - 12:56 pm | भरत्_पलुसकर

मागं तुमी माज्या धाग्याव परतिसाद देऊन गेलेव्ते. त्याची परतफेड म्हुन ह्यो परतिसाद. धेनात ठेवा बरं का. ^=^

नाखु's picture

21 Mar 2016 - 8:56 am | नाखु

एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ

होबासराव's picture

18 Mar 2016 - 6:56 pm | होबासराव

तुम्हा घरबसल्या सा़क्षात हेवनची म्हणजे स्वर्गाची अनुभुती द्यायला संजय दृष्टीच पाहिजे ते येरा गबाळ्याचे काम नाही. तुमची सुप्त स्वशक्ती जागृत करून त्यात विवेक यावा म्हणून तर बर्याच जणांना पुन्हा लिहिते व्हावं लागल.

अगागा पुरता बाजार उठवलासा !

हेमंत लाटकर's picture

18 Mar 2016 - 7:44 pm | हेमंत लाटकर

सगळ डोक्यावरून गेल.

होबासराव's picture

18 Mar 2016 - 8:20 pm | होबासराव

इसका मतलब तुमकु स्व नहि गवश्या हय !

अत्रुप्त आत्मा's picture

18 Mar 2016 - 8:16 pm | अत्रुप्त आत्मा

हहीह्हीहही!

अभ्या..'s picture

18 Mar 2016 - 8:19 pm | अभ्या..

अगेन क्रिप्टिक नाखून्स,
रहम करो सरकार जाहिलोपर.

खटपट्या's picture

18 Mar 2016 - 11:10 pm | खटपट्या

चांगलंय ज्ये काय हात त्ये !!!

यशोधरा's picture

18 Mar 2016 - 11:12 pm | यशोधरा

कायच समजलं न्हाय. धन्यवाद.