डॉक्टर साहेबांची माफी मागुन आपले काव्य पुष्प मी मिपारसिकांच्या चरणी सविनय सादर करतो. या अज्ञबालकाचे चार तोडके मोडके बोबडे बोल तुम्ही गोड मानून घ्याल ही आशा करतो
वेळ संध्याकाळची मी पाळतो
मी विलायती ‘नीट’ घेणे टाळतो
फारसे चखणे नसावे वाटीतही
मी उगाचच मेन्युकार्डही चाळतो
ही मळलेली वाट आहे पण इथे
परताना मी किती ठेचकाळतो
कोणते असतात ग्रेव्हीत हे कलर
रंग शर्टाचा कसा डागाळतो
केवढे जडशीळ झाले हे नयन
देव जाणे कसा तोल सांभाळतो
चालला असता अजुनही एक स्मॉल
मी कुठे मोजून मापून ढोसतो
पैजारबुवा,
प्रतिक्रिया
27 Feb 2016 - 12:51 pm | अभ्या..
अहाहाहाहाहाहाहा.
माऊली माऊली.
अद्भुत, आरोग्यदायी पाककृती. क्या बात क्या बात.
27 Feb 2016 - 1:44 pm | मुक्त विहारि
छान जमलंय....
27 Feb 2016 - 1:45 pm | मुक्त विहारि
"चालला असता अजुनही एक स्मॉल
मी कुठे मोजून मापून ढोसतो."
ह्याला प्रचंड अनुमोदन.
27 Feb 2016 - 1:45 pm | अजया
=))
चढली जमली कविता!
27 Feb 2016 - 1:51 pm | कपिलमुनी
चियर्स !!
27 Feb 2016 - 1:54 pm | विवेक ठाकूर
विनम्रतेनं `नीट' घेतली आहे.
27 Feb 2016 - 2:49 pm | प्रचेतस
मायला, पैजारबुवा दंडवत.
27 Feb 2016 - 3:23 pm | आदूबाळ
एक नंबर, पैजारबुवा!
रिचवून जरी झालो डोलकर मी
सावरकरांनी गाडी चालवायचा नियम मी पाळतो
29 Feb 2016 - 12:52 pm | नाखु
खंग्री विडंबन..
डोलकरांचा कायमचा सावरकर मित्र नाखु
27 Feb 2016 - 4:02 pm | बाबा योगिराज
वेळ संध्याकाळची मी पाळतो
मी विलायती ‘नीट’ घेणे टाळतो
मंग आज संध्याकाळी सोडा का थम्बसप?
पैजारबुवा ग्लास फेकून मारायच्या आत पळून गेलेला बाबा.
27 Feb 2016 - 4:52 pm | ज्ञानोबाचे पैजार
दोस्तांसवे संध्याकाळ जावो, दुपारी सकाळचा सुर्य पाहो
जो जे वांछिल तो ते लाहो, ग्लासामध्ये,
पैजारबुवा,
27 Feb 2016 - 5:41 pm | बाबा योगिराज
जमलं. संध्याकाळी कुठं भेटायचं ते सांगा.
27 Feb 2016 - 4:33 pm | टवाळ कार्टा
खिक्क
27 Feb 2016 - 4:34 pm | बोका-ए-आझम
घेऊनि एक तरीही ' वन फाॅर द रोड '
नवीन खंब्यास मी अाताच इनाॅग्युरितो!
27 Feb 2016 - 5:08 pm | गवि
साहेब थोडी फुंक मारा नळीमध्ये झडकरि
कोणजाणे येथ जल्लां मीच कैसा गावतो
27 Feb 2016 - 5:14 pm | चाणक्य
भारीये.
27 Feb 2016 - 5:17 pm | विवेकपटाईत
कविता आवडली.
27 Feb 2016 - 7:05 pm | जव्हेरगंज
कडक!!!
27 Feb 2016 - 7:36 pm | drsunilahirrao
__/\__
27 Feb 2016 - 7:48 pm | अत्रुप्त आत्मा
मारा आ रे , मारा रे Sssss
तेरी इडंबन ने मुझे मारा रे ! =))
27 Feb 2016 - 8:09 pm | अभ्या..
आगे....
कोई जाये ले आये,
मेरी लाख दुआये पाये.
मै तो पिया की गली, मै तो पिया की गली,
बोतल फोड आया रे.....................
27 Feb 2016 - 7:48 pm | मित्रहो
काय लिहीलय जबरदस्त एकदम
27 Feb 2016 - 7:58 pm | एस
परताना म्हणजे काय?
27 Feb 2016 - 8:12 pm | अभ्या..
परतताना घ्या वाटल्यास चालताना घ्या...
तुम्ही पण ना...
ड्रिंक्सनंतर लोक भाषा विसरतेत, तुम्ही शब्द बघायलात...;)
(हलकेच घ्या, हलके हलके घ्या, हलके हलके व्हा)
27 Feb 2016 - 8:35 pm | एस
हीहीही: मी फकस्त बुवा खरं बोलताय्त की नाय ह्ये चेकवत हुतो. बुवा येकाच शब्दाला आडखाळले. म्हंजे 'नीट' घेत नाय हे खरं आसनारे! ;-)
27 Feb 2016 - 8:02 pm | चांदणे संदीप
कातील, चाबूक, फोडलय-तोडलय...
वांड, जबरी आणि......
.
.
.
.
.
____/\____
Sandy
27 Feb 2016 - 8:15 pm | पैसा
=)) स्वदेशी घ्या.
27 Feb 2016 - 8:27 pm | एस
तुम्ही काजू दिले तर आम्ही फेणी करू म्हंतो.
27 Feb 2016 - 8:29 pm | पैसा
या तर! मेक इन इंडियाचा प्रयोग करूया!
27 Feb 2016 - 8:21 pm | जेपी
चांगलय..=))
27 Feb 2016 - 11:10 pm | मनीषा
वा वा ! अद्भुत, आरोग्यदायीपाककृती .
चांगले आहे बालसाहित्य ...
27 Feb 2016 - 11:47 pm | एक एकटा एकटाच
खतरा
28 Feb 2016 - 10:21 am | रातराणी
दंडवत घ्या पैजारबुवा! _/\_
29 Feb 2016 - 1:03 pm | बॅटमॅन
जमियले वो पैजारबुवा!!!!!!
29 Feb 2016 - 1:51 pm | प्राची अश्विनी
:):)
1 Mar 2016 - 1:30 pm | भरत्_पलुसकर
छ्या छ्या नावापुढं बुवा लावता न कविता आसल्या लिता?
1 Mar 2016 - 3:01 pm | चलत मुसाफिर
पहिल्या धारेचे कडक विडंबन!!
1 Mar 2016 - 8:44 pm | सुमीत भातखंडे
'नीट' कविता आवडली :)
2 Mar 2016 - 1:03 pm | सत्याचे प्रयोग
मीही विलायती घेतो
एकट्याने मात्र टाळतो
महिनाअखेरला मात्र देशीही टाकतो
2 Mar 2016 - 1:17 pm | नूतन सावंत
कविता 'नीट' जमलीये.