मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
25 Feb 2016 - 9:34 pm

स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण यूट्यूबवर पाहिले. ते खाली पाहता येईल...

हे इथे टाकण्यामागे दोन उद्देश आहेत...

१. या भाषणातून सध्या गरमागरम चर्चा चालू असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबादमधील विद्यापीठ आणि मध्यवर्ती सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या इतर सर्व विद्यापीठांसंबंधी अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहीत होतील.

२. कोणत्याही प्रकारची सारवसारव न करता, मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी याचा सुंदर वस्तुपाठ म्हणावे असे हे भाषण आहे. तेव्हा तशी सकारात्मक चर्चा करू इच्छिणार्‍यांसाठी यातून शिकण्यासारखे खूप काही आहे.

.

राजकारणशिक्षणविचारप्रतिक्रियाबातमी

प्रतिक्रिया

विजय पुरोहित's picture

25 Feb 2016 - 9:36 pm | विजय पुरोहित

धन्यवाद डाॅक...
उत्तम माहिती...

होबासराव's picture

25 Feb 2016 - 9:40 pm | होबासराव

कोणत्याही प्रकारची सारवसारव न करता, मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी याचा सुंदर वस्तुपाठ म्हणावे असे हे भाषण आहे.

पगला गजोधर's picture

7 Jul 2016 - 1:16 pm | पगला गजोधर

:)

सचु कुळकर्णी's picture

7 Jul 2016 - 8:02 pm | सचु कुळकर्णी

तुमच्या ह्यॅ ह्यॅ ह्यॅ.... ;) ला
आमच पण खी खी खी ....;)

पगला गजोधर's picture

8 Jul 2016 - 12:00 pm | पगला गजोधर

तुमच्या खी खी खी ला ......
(आम्हाला कितीही राग आलेला असला, तरीही, वरकरणी शांत, मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह )
आम्ही उत्तर देऊ

कुछ तो लोग कहेंगे ....

;)

सुमीत भातखंडे's picture

25 Feb 2016 - 10:02 pm | सुमीत भातखंडे

हा व्हिडीयो शेयर केल्याबद्दल.

अभ्यासक्रम खरोखरच असे काही शिकवत असेल तर विषय च संपला. बाकी उत्तम, मुद्देसूद भाषण.

बोका-ए-आझम's picture

26 Feb 2016 - 12:10 am | बोका-ए-आझम

पण इथले आदर्श लिबरल त्या १२वी पास आहेत याच मुद्द्यावर अडकून यातले महत्वाचे मुद्दे लक्षातच घेणार नाहीत.

तर्राट जोकर's picture

26 Feb 2016 - 12:15 am | तर्राट जोकर

इथे मुद्दा कोण्या विशिष्ट पक्षाचा नसून भारतसरकारच्या एका जबाबदार खात्याचा व एका जीव गेलेल्या मुलाचा आहे. इथले अभ्यासू सदस्य या भाषणातला फोलपणा अभ्यासून आपल्या फॅक्टचेकींग वृत्तीचा निष्पक्ष परिचय देतील काय?

बोका-ए-आझम's picture

26 Feb 2016 - 7:20 am | बोका-ए-आझम

आता तुम्हाला समजलं असेलच मी घासकडवींच्या धाग्यावर जे बोललो होतो ते. एकदा माणसाने मत बनवलं की कोणत्याही घटनेकडे तो त्याच चष्म्यातून बघणार. तुम्ही स्वत:च त्याची सत्यता दाखवून दिलीत. I rest my case.

तर्राट जोकर's picture

26 Feb 2016 - 12:29 pm | तर्राट जोकर

निष्पक्ष फॅक्टचेकिंग करण्याची तयारी न दाखवता देशाचे नुकसान झाले तरी चालेल पण भाजपची तळी उचलण्याची प्रवृत्ती सोडणे शक्य होत नाही ही सत्यताही दिसली.

इराणींच्या भाषणाने समर्थकांना उन्मादझटका आला, तर विरोधकांमधे त्यांचे अ‍ॅक्ट्रेस असणे, कमी शिकलेले असणे ह्यावरुन नीच टिप्पणी करण्याचा ट्रेंड सुरु झाला. कोणीही त्या जे बोलल्या त्यातले खरेखोटे काय हे तपासण्याच्या फंदात पडले नाही.

चेक आणि मेट's picture

26 Feb 2016 - 12:40 pm | चेक आणि मेट

खरेखोटे काय हे तपासण्याच्या फंदात पडले नाही.

तुमच्याकडून खोटे काय हे जाणुन घ्यायला आवडेल

नाखु's picture

26 Feb 2016 - 12:50 pm | नाखु

म्हणून हा प्रतीसाद प्रपंचः

ठी़क बाकीच्यांच जाऊ द्या तुमचं काय "सत्य अन्वेषण" या खंडण उत्तरांबाबत :

  • उप कुलगुरूंच्या नियुक्त्यांबाबत दिलेले स्पष्टीकरण (आरोप रा गां नी केला होता)
  • ऱो वि च्या संदर्भात कुलगुरूंनीच केलेली शिफारस (आणि तेथील खासदारानेच केलेली पत्र शिफारस माहीती.)
  • जे एन यु च्या कर्मचार्यांनी आणि अगदी कामगार संघटनानी दिलेल्या अहवालातील माहीतीचा हवाला देऊन रा गांनी केलेला वस्तुस्थितीचा विपर्यास (रा गा किती प्रगल्भ+दुरदर्शी आहेत आणि त्यांचे सल्लागार नक्की काय सल्ला देतात हा एक वेगळा विषय आहे) रा गा होते उपस्थीत पण सोनीया नव्हत्या त्या मुळे त्यांनी फक्त रा गांचाच उल्लेख केला.
  • अजूनही एकाही मुद्द्याचा प्रतीवाद किंवा ही माहीती खोटी आहे असे एकाही प्रवक्त्यानी सांगीतले नाही. मग नेमके तुमच्याकडे कुठुन माहीती आली आणि असेल तर त्यांचे ठळक मुद्दे तरी खोडून काढा.

इराणी रा गा इतक्या शिकलेल्या नसतील पण सवरलेल्या नक्कीच आहेत.

ता क मी भाजपचा अंधळा समर्थक नाही पण निव्वळ भाजपाच आहे म्हणून शिव्या देणारेही पाहिले की....

चांगल्याला चांगले म्हणण्याची वाईट्ट खोड असलेला नाखु

होबासराव's picture

26 Feb 2016 - 5:12 pm | होबासराव

इराणी रा गा इतक्या शिकलेल्या नसतील पण सवरलेल्या नक्कीच आहेत.

रागा ग्रॅजुएट आहेत का? राजिव गांधि संजय गांधि फारिन मध्ये जाउन सुद्धा ग्रॅजुएशन कंप्लिट करु शकलेयत का ?
अर्नब गोस्वामि ने जेंव्हा रागा ची मुलाखत घेतलि होति तेव्हा डिग्रि दाखवण्यावरुन काहि तरि शो डाउन झाला होता.
वरिल प्रश्न जेनुन आहेत आणि मला फार काळा पासुन पडलेयत.
राजकिय पद सांभाळताना तुम्हि जर उच्च्शिक्षित असाल तर निश्चितच फायदा होतो पण ते आवश्यक नाहिये.
आपल्या पंचायत राजचि व्यवस्थाच मुळात टोपि-टाय अशि आहे. पदाधिकारि - अधिकारि
टोपि:- स्थानिक समस्येचि जाण असणारा लोकप्रतिनिधि
टायः- शासनाचा प्रतिनिधि
ग्रामपंचायतः- सरपंच ह्याला समांतर शासनाचा प्रतिनिधि:- ग्रामसेवक
पंचायत समिति:- सभापति बि.डि.ओ.
जिल्हा परिषदः- अधक्ष्य सि.ई.ओ.
पालक मंत्रि:- कलेक्टर
मुख्यमंत्रि प्रधान सचिव

होबासराव's picture

26 Feb 2016 - 5:23 pm | होबासराव

कलेक्टर ऑफिस ला जेंव्हा जनता दरबार भरलेला असतो कलेक्टर साहेब आलेले असतात बाजुला पोलिस अधिक्षक साहेब बसलेले असतात वाट पाहण सुरु असते ति पालकमंत्र्यांचि, मंत्रि येतात्...लगेच कलेक्टर साहेब आपल्या खुर्चितुन उठतात आणि बाजुच्या प्लास्टिक च्या चेअरवर जाउन बसतात आणि त्यांच्या खुर्चिवर पालकमंत्रि बसतात जनतेच गार्‍हाणे एकायला. ह्या गोष्टिचा मि स्वतः साक्षिदार होतो.
इथे पालकमंत्रि फक्त ४ थि पास होते. काय वाटत असेल त्या जिल्हाधिकार्‍याला ?

ह्याचे असे उत्तर ऐकले आहे की "कलेक्टर, कमिशनर हे जनतेचे सेवक असतात, आमदार, मंत्री हे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी असतात सो दे र्रिप्रेझेन्ट्स जनता. "

हाडक्या's picture

26 Feb 2016 - 10:35 pm | हाडक्या

+१ रे भाई.. हे पटलं.

चिगो's picture

2 Mar 2016 - 5:39 pm | चिगो

"कलेक्टर, कमिशनर हे जनतेचे सेवक असतात, आमदार, मंत्री हे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी असतात सो दे र्रिप्रेझेन्ट्स जनता. "

बरोबर.. लोकशाही व्यवस्थेत जनप्रतिनिधींचा मान हा नोकरशाहीपेक्षा जास्त असावा व असतो..

प्रदीप's picture

26 Feb 2016 - 6:08 pm | प्रदीप

अर्नब गोस्वामि ने जेंव्हा रागा ची मुलाखत घेतलि होति तेव्हा डिग्रि दाखवण्यावरुन काहि तरि शो डाउन झाला होता.
वरिल प्रश्न जेनुन आहेत आणि मला फार काळा पासुन पडलेयत.

येथे पहा. ही बातमी एका वर्तमानपत्रात आली, तिचा स्त्रोत ए. एफ. पी. ही फ्रेंच वृत्तसंस्था आहे! ही बातमी लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीच्या दरम्यान त्या संस्थेने प्रसारीत केली. त्यात ती वृत्तसंस्था म्हणते की " the other [ म्हणजे राहूल गांधी] a Harvard and Cambridge-educated scion of India's biggest political dynasty..." आणि पुढे ..."Often portrayed as a reluctant leader, he gave up a business career to enter politics..."

[तथाकथित] नामवंत वृत्तसंस्था सत्याचा किती विपर्यास करू शकते, त्याचे हे ढळढळीत उदाहरण आहे !

होबासराव's picture

26 Feb 2016 - 6:25 pm | होबासराव

नशिब dynasty च्या पहिले political वापरले

विकास's picture

26 Feb 2016 - 7:45 pm | विकास

राहुल गांधी हार्वर्ड विद्यापिठात शिकायला आले होते पण ऑलमोस्ट लगेचच परत भारतात आले.

त्यांची नंतरची बॉस्टनची ट्रीप (एन डी ए च्या काळातली) ही त्यांच्या कथीत ड्रग्ज आणि कथीत अनियमित रोकड जवळ ठेवल्याने गाजली. असे म्हणतात की त्यांना पकडले गेले होते. पण नंतर वाजपेयी सरकारने आपलेच दात आपलेच ओठ म्हणत वजन खर्च करून त्या प्रकरणाची काळजी घेतली... अधिकृत, म्हणजे दि हिंदू मधील्या बातमी प्रमाणे ;) मात्र इतकेच झाले होते.. संदर्भात जालावर भरपूर माहीती मिळू शकेल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Feb 2016 - 2:25 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

या भाषणाचा बुद्धीगामी प्रतिवाद इथे वाचनात आला. -
स्मृती इराणी राजीनामा द्या.

भाषणात केलेले उल्लेख वस्तुनिष्ठतेसाठी वस्तुपाठ म्हणून दुर्लक्षण्याजोगे आहेत -
१. स्मृती इराणी यांचे पती अल्पसंख्य आहेत.
२. अमकं फलाणं दिसल्यास शीर कापून देईन.
३. अमकं फलाणं दाखवल्यास राजकारण सोडून देईन.

मी संपूर्ण फीत बघितली नाही. जे मोती चटकन सापडले ते लिहिले.

अर्धवटराव's picture

26 Feb 2016 - 4:10 am | अर्धवटराव

जागल्याचा प्रतिवाद जर बुद्धीगामी असेल तर... नको.. मी काहि कुठला राजिनामा वगैरे देणार नाहि :)
पण एकुणच 'बुद्धीवाद' वगैरे शब्दमंडळीची एकुण सर्कस बघुन या प्रतिवादाला देखील बुद्धीगामी म्हणणं काहि आश्चर्याचं वाटलं नाहि.

तुम्हीही एक लेख लिहा. मी सर्टिफिकेट देतो.

अर्धवटराव's picture

26 Feb 2016 - 8:01 am | अर्धवटराव

ते सर्टीफिकेट पहिले द्या... लेख पाडतोच अकॉर्डींगली. डोक्यालिटी (== बुधीगामी ??) तशीच चालते ना ?? ;)

नाखु's picture

26 Feb 2016 - 8:58 am | नाखु

निषेध पत्रके कायम तयार असतात फक्त कश्याचा निषेध करायचा ते आम्ही शेवटच्या क्षणी+आयत्यावेळी ठरवतो.

मोदकच्या प्रशस्तीपत्रकाच्या निषेधावर सहमती असलेल्यांच्या निषेधासाठी काढलेल्या चळवळीला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या आंदोलनातील फुटीर गटाच्या "स्वमतवादीच्या" निवेदनातील मुख्य आणि लक्ष्यवेधी वाक्य.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Feb 2016 - 7:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जागल्याचा प्रतिवाद जर बुद्धीगामी असेल तर... नको.. मी काहि कुठला राजिनामा वगैरे देणार नाहि :)
पण एकुणच 'बुद्धीवाद' वगैरे शब्दमंडळीची एकुण सर्कस बघुन या प्रतिवादाला देखील बुद्धीगामी म्हणणं काहि आश्चर्याचं वाटलं नाहि.

हा प्रतिवाद निश्चितच अॅड होमिनेम आहे. प्रतिवादात काय चूक आहे हे न दाखवता, "तो नं, तो तसलाच" यात काही दम नाही.

असो. आज मटाने ही बातमी छापली आहे. स्मृती इराणी चक्क फेकंफाक करत होत्या.
'स्मृती इराणी लोकसभेत खोटं बोलल्या'

या बातमीतली व्हीडीओची क्लिप बघितली. बाईंचा सात्विक संताप सांस-बहू मालिकेला साजेसा आहे. ('टिढीश, टिढीश' इफेक्ट आले असते तर सगळं योग्यच सुरू आहे याचा दिलासाही मिळाला असता. विनोद आहे, त्यावरून गंभीर होऊ नये.) याच मंत्रिमहोदयांनी रोहित वेमुला (आणि त्याच्या इतर चार साथीदारांवर) कारवाईसाठी पाच पत्रं लिहिली होती.

श्रीगुरुजी's picture

26 Feb 2016 - 9:22 pm | श्रीगुरुजी

४९ मिनिटांच्या भाषणातल्या असंख्य मुद्द्यांपैकी फक्त ३ मुद्दे खोटे? निदान बाकीचे तरी खरे होते ना?

तर्राट जोकर's picture

26 Feb 2016 - 10:47 pm | तर्राट जोकर

कल्पना करतोय कि हे भाषण केजरीवाल यांनी केले असते तर तुम्ही अशाच प्रतिसादाला काय उत्तर दिलं असतं?

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Feb 2016 - 10:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

केजरीवाल मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू मांडताहेत अशी कल्पना करून (अशी केवळ कल्पनाच करता येईल म्हणा) जब्बर हसतोय ! =))

किती आशा ठेवली होती या माणसाकडून हे आठवून किती दु:ख होते ते सांगणे कठीण आहे
:(

तर्राट जोकर's picture

26 Feb 2016 - 11:20 pm | तर्राट जोकर

असं होऊच शकणार नाही ह्याबद्दलचा आपला दुर्दम्य आशावाद भावला. कित्येकांना इराणीसुद्धा असं काही भाषण करतील असं वाटलं नव्हतं. ते एक असो.

दिल्ली आपच्या जाहिरातींमधला चिंटुकसा मुद्दा उचलून तांडव करणार्‍या श्रीगुरुजींना आपल्या पक्षाच्या एका जबाबदार खात्याच्या मंत्री असलेल्या व्यक्तीने देशाच्या संसदसदनात धडधडीत खोटे बोलणे महत्त्वपूर्ण वाटत नाही,

बोका-ए-आझम's picture

26 Feb 2016 - 11:47 pm | बोका-ए-आझम

हे तुम्हाला कसं माहित? ज्या प्रसारमाध्यमांवर विसंबून आपण आपली मतं बनवतो ती प्रसारमाध्यमं कितपत विश्वासार्ह मानायची?

तर्राट जोकर's picture

27 Feb 2016 - 12:06 am | तर्राट जोकर

येस सर! जेव्हा प्रसारमाध्यमं आपल्याबाजूची बातमी देतात तेव्हा ती विश्वासार्ह अन्यथा नव्हे हे महत्त्वाचे लॉजिक विसरलो.

बोका-ए-आझम's picture

27 Feb 2016 - 7:17 am | बोका-ए-आझम

त्यालाही लागू पडतं तजो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Feb 2016 - 1:02 am | डॉ सुहास म्हात्रे

एका जबाबदार खात्याच्या मंत्री असलेल्या व्यक्तीने देशाच्या संसदसदनात धडधडीत खोटे बोलणे महत्त्वपूर्ण वाटत नाही,

ती चित्रफीत परत एकदा पाहून इराणींनी आपल्या सगळ्या मुद्द्यांसाठी कोणते लेखी पुरावे लोकसभेसमोर मांडले आहेत ते पहावे.

याशिवाय, अजून एक महत्वाचा मुद्दा जमेस धरावा की, त्या लोकसभेतील भाषणातील सर्व शब्द आणि सर्व दस्त लोकसभेच्या विवरणात नोंदले गेले आहेत आणि त्यांत काही खोटे आढळले तर ते लोकसभेच्या हक्कभंगाचे कारण होतील. असे असले तरी...

देशात कोठेही टाचणी पडली तरी त्याबद्दल पंतप्रधानांकडे जाब विचारला जाण्याच्या हल्लीच्या कालात, कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याने, लोकसभेत सादर केलेले ते पुरावे खोटे आहेत असे म्हटलेले नाही ("आमचा पत्रव्यवहार असा उघडा पाडून आम्हाला शरम वाटायला का लावलीत?" असे काही जणांनी जरूर म्हटले आहे, पण ते दस्त खोटे आहेत असे कोणीही म्हटलेले नाही.)

सोईस्कर माध्यमांमधल्या सोईस्कर बातम्यांच्या विश्वासार्हतेवर अवलंबून राहण्याऐवजी वरच्या वस्तुस्थितीला जास्त महत्व देणे सारासारविवेकाला धरून होईल. आजच्या घडीला, "जो केवळ (विषेशतः, आपल्याला सोईस्कर असलेल्या) माध्यमांवर विसंबला त्याच्या देशाचा कार्यभाग बुडाला" ही म्हण तयार करायला हरकत नाही :) :(

तर्राट जोकर's picture

27 Feb 2016 - 1:28 am | तर्राट जोकर

थांबा थोडं, इतक्यात निर्णय देणं योग्य नाही. वेमुला प्रकरण सुरुवातीपासून फक्त राजकारनाच्या घोळात आहे. ज्याला जे सोयीचं तितकं उचलून त्याचा उदोउदो करनं सुरु आहे. कोणताही पक्ष यास अपवाद नाही. रोहित च्या आत्महत्येच्या आधीपासून ते आतापर्यंत नीट प्रकरण पुढे आलेले नाही. मी स्वतः ह्या प्रकरणाकडे दुर्लक्ष ह्याच कारनाने केलं होते की हे मढ्यावरचं लोणी खाण्याची प्रवृत्ती आहे. आता कळतंय हे तितकं सोपं न राहता फार गुंतागुंतीचं झालंय. सदनात मंत्री देत असलेली माहीती खोटी आहे असे जाहीर होऊनही एंटोनी यांच्यावर काय कारवाई झाली काय हे ठावूक नाही, शिवाय मंत्री 'मला हीच माहीती मिळाली' ह्या कारणाखाली लपतात किंवा माहिती देतच नाहीत. मी भाषण बघितले नाही पण वर्डटूवर्ड स्क्रिप्ट वाचली. सामान्य लोकांना जोश, आवेश, दबंगस्टाईल वनलायनर्स इत्यादी ड्रामा आवडलेला असू शकतो. पण कन्टेन्ट महत्त्वाचे. रोहित व जेएनयु संदर्भातल्या किती प्रश्नांना काय वस्तुनिष्ठ उत्तरं दिलीत व त्याची परिणामकता किती ते तपासणे महत्त्वाचे. आंबेडकर-पेरियार सर्कल, बंडारू दत्तात्रय यांचे पत्र, त्यातला अ‍ॅन्टी-नॅशनल असा उल्लेख, इतर अनेक तपशील याबाबत मुळापासून अभ्यास करुन ही केस समजून घेणे आवश्यक आहे.

बाकी, टिकाकारांमध्येही मुद्देसूद अभ्यासाचा ठणठणाट आहे, काही तपशील त्यांच्याच अंगावर उलटतील म्हणून ते लपवत आहेत, भाजपसरकार बदनाम करण्यासाठी अतिनीच पातळीवर उतरुन काहीच्या काही टिका सुरु आहे. भाजपाला अगदी दलितांचे मारेकरी संबोधणे फालतूपणा आहे. त्यांच्या कुठल्याच मताला काही किंमत द्यावी असे आतातरी वाटत नाही, पुढेही वाटणार नाही. त्याचवेळेस इराणींच्या भाषेत अनेक अंडरकरंट दिसलेत ते आहेच. प्रकरणाची सत्यान्वेषीपद्धतीने सोडवणूक न करता आरोपांची आरोपांनी उत्तरे, आरोपांपुरती कातडीबचाव मलमपट्टी असले प्रकार भाषणात आहेत. माहितगार यांचे धागे, तसेच जुन्या बातम्या तपासून मंत्र्यांच्या भाषणाचे फलित मांडतो लवकरच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Feb 2016 - 1:33 am | डॉ सुहास म्हात्रे

जर इराणी खोट्या बोलल्या असत्या किंवा त्यांनी पुराव्यादाखल सादर केलेली कागदपत्रे खोटी असती तर काँग्रेस अजून गप्प बसली असती असा विश्वास असला तर मग असोच ! :)

तर्राट जोकर's picture

27 Feb 2016 - 2:00 am | तर्राट जोकर

त्याकरता अभ्यास लागतो डॉक्टरसाहेब, ऐसा कौन है अब उधर? :-)

अद्द्या's picture

27 Feb 2016 - 11:03 am | अद्द्या

सिब्बल , सिंदिया , चिदम्बरम, ??

हे सगळे राजकारणात मुरलेले आणि आणि अभ्यास करून मुद्दे मांडू किंवा खोडू शकतात .
पण अजून तरी त्यांनी तसं केलेलं दिसत नाहीये .. कुठल्याश्या न्यूज वर आलं कि त्या खोटं बोलल्या..

पण जर इराणींकडे खोटा रिपोर्ट असेल पोलिसांचा. तरी मला नाही वाटत भाजप ची मंडळी त्यांना तो रिपोर्ट संसदेत मांडू देतील .

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Feb 2016 - 5:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

काय हे ? आता कॉंग्रेस तुमच्यावर नाराज झाली आणि त्यांनी तुमच्या घरावर मोर्चा आणला तर त्यामागे सबळ कारण आहे असे म्हणावेच लागेल ! मी हे गंभीरपणे म्हणतोय कारण...

काँग्रेसमध्ये अभ्यासू असलेले लोक नाहीत असा आरोप आतापर्यंत त्यांच्या कट्टर विरोधकांनीही केलेला नाही =)) संघटनेत अभ्यासू लोक नसताना काँग्रेसने इतकी दशके देशात राज्य केले हे धाडसी विधान करणारे तुम्ही पहिलेच मानव असावेत !!!

आता तो अभ्यास राष्ट्र योग्य दिशेने नेण्यासाठी होतो/होत होता की नाही याबद्दल नक्की दुमत आहे, पण ती गोष्ट वेगळी ;)

शिवाय, गदारोळ करून कामकाज ठप्प करायला अभ्यास अजिबात लागत नाही, फक्त राज्यसभेत बहुमत असले की कोणतीही असलेली/नसलेली/कल्पित/बनवलेली कारणे पुरतात हे मागच्या चार लोकसभा सत्रावरून स्पष्ट दिसले नसेल तर मग मात्र कठीण आहे.

आता इथे तर इराणींनी चक्क सरकारदरबारी नोंद झालेल्या कागदपत्रांसह त्यांचे मुद्दे लोकसभेत मांडले आहेत आणि ते लोकसभेच्या कामकाजाच्या विवरणात नोंदले गेले आहेत. तरीपण काँग्रेसकडून एक साधा चुकार हुंकार/प्रतिसाद नाही !? किंबहुना, चर्चेचा आग्रह धरणारे आणि "मी जे बोलेन ते सरकारला अडचणी आणेल, म्हणून मला बोलून दिले जाणार नाही" असे दावे करणार्‍यांसकट सर्वजण इराणींच्या पहिल्या दोन एक प्रतिवादानंतरच सभात्याग करून सदनाबाहेर गेले, यातली मेख काय बरे ?

असो. मी कोणताच झेंडा हाती घेतलेला नाही. पण समोर स्पष्ट दिसणारी आणि छुपी कारणे, वर्तमान आणि भूतकाळातल्या वस्तूस्थितीच्या अभ्यासाने शोधून त्याचा सारासारविवेकाने अर्थ काढणे हा माझा छंद आणि व्यावसायीक कार्याचा भाग आहे. त्यानुसार मी काही निरिक्षणे मांडली आहेत. आता तेच मुद्दे परत परत उगाळण्यात अर्थ नाही. तसेच, सकारात्मक चर्चा करताना (मी किंवा दुसर्‍यांनी) निष्कारण फाटे फोडू नयेत असे मला वाटते.

सद्या जेवढे लिहिले आहे तेवढ्यात समजूत पटली तर भले; नाही पटली तरी भले ! कारण, मी जगातील कोणा एकाचे/अनेकांचे मत बदलायला जन्म घेतला आहे असा माझा कधीच दावा नसतो (अत्यंत डोकेखाऊ काम आहे हो ते ;) :) ). तेव्हा इत्यलम.

तर्राट जोकर's picture

27 Feb 2016 - 6:03 pm | तर्राट जोकर

असो. नका वेळ घालवू.

श्रीगुरुजी's picture

27 Feb 2016 - 2:07 pm | श्रीगुरुजी

दिल्ली आपच्या जाहिरातींमधला चिंटुकसा मुद्दा उचलून तांडव करणार्‍या श्रीगुरुजींना आपल्या पक्षाच्या एका जबाबदार खात्याच्या मंत्री असलेल्या व्यक्तीने देशाच्या संसदसदनात धडधडीत खोटे बोलणे महत्त्वपूर्ण वाटत नाही,

इतरांनी मुद्देसूद प्रतिसाद दिलेच आहेत. त्यामुळे अधिक लिहीत नाही.

स्मृती इराणी आपल्या ४९ मिनिटांच्या भाषणात नक्की काय आणि किती खोटे बोलल्या ते साधार सांगता का?

श्रीगुरुजी's picture

27 Feb 2016 - 2:08 pm | श्रीगुरुजी

वरच्या प्रतिसादातील पहिला प्रतिसाद तजो यांच्या प्रतिसादातील आहे व उर्वरीत प्रतिसाद हे त्याला उत्तर आहे.

तर्राट जोकर's picture

27 Feb 2016 - 2:16 pm | तर्राट जोकर

४९ मिनिटांच्या भाषणातल्या असंख्य मुद्द्यांपैकी फक्त ३ मुद्दे खोटे? निदान बाकीचे तरी खरे होते ना?
>> ग्रुजी, तुमच्या ह्या प्रतिसादासाठी आहे ते. आधीच विचारायचे ना कोणते मुद्दे खोटे, तुम्ही बाकीचे खरे होते ना म्हनून विचारताय.

श्रीगुरुजी's picture

27 Feb 2016 - 11:26 pm | श्रीगुरुजी

ते विचारलेच आहे वर.

श्रीगुरुजी's picture

27 Feb 2016 - 2:06 pm | श्रीगुरुजी

केजरीवाल मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू मांडताहेत अशी कल्पना करून (अशी केवळ कल्पनाच करता येईल म्हणा) जब्बर हसतोय ! =))

+१

केजरीवाल आणि त्यांच्या बोलभांड टोळीने जेटलींविरूद्ध भ्रष्टाचाराचे (नेहमीसारखेच) बिनबुडाचे आरोप केल्याने जेटलींनी यांच्याविरूद्ध न्यायालयात आपली बदनामी व मानहानी झाल्याचा खटला दाखल केला आहे. या खटल्यात केजरीवालांचा बचाव काय तर म्हणे जेटली १ लाखांहून अधिक मतांनी निवडणुक हरल्यामुळे त्यांना सार्वजनिक प्रतिष्ठा नाही (आणि सार्वजनिक प्रतिष्ठाच नसल्यामुळे बदनामी होण्याचा प्रश्नच नाही.). कायदेशीर खटल्यात असा हास्यास्पद आणि तर्कहीन बचाव?

बोका-ए-आझम's picture

27 Feb 2016 - 5:40 pm | बोका-ए-आझम

वाराणसीतून लोकसभेची निवडणूक हरले होते याचा विसर पडलेला दिसतो. डाॅ.आंबेडकर आणि इंदिरा गांधी हेही निवडणुकीत पराभूत झाले होते. हेही ते विसरले?

हाडक्या's picture

26 Feb 2016 - 10:13 pm | हाडक्या

हा प्रतिवाद निश्चितच अॅड होमिनेम आहे.

त्या इराणीबाईंबद्दल काडीची सहानुभुती नाही. परंतु तुमचाही प्रथम प्रतिसाद इराणींच्याप्रति "अॅड होमिनेम" असाच नाही का ? म्हणजे तुम्हीपण त्या भाषणातले छिद्रान्वेषण केलेत तसे इतरांच्या बाबतीतही केलेत असं दिसलं नाही इथे (इतरत्र केले असल्यास माहित नाही). इतरांच्याबाबतीत केले नाहीत म्हणून तुम्ही बोलू नव्हे असे म्हणायचे नाही नक्कीच. पण इतरांवर 'अ‍ॅड होमिनेम'चे आरोप करताना स्वतःचे अवलोकन प्रथम जास्त अपे़क्षित आहे.
(अगदी हाच दोष श्रीगुरुजींना ही लागू होतो हे वेगळे सांगायची गरज नसावी.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Feb 2016 - 11:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमचाही प्रथम प्रतिसाद इराणींच्याप्रति "अॅड होमिनेम" असाच नाही का ?

नाही.
इराणींचं भाषण वस्तुनिष्ठ नाही असं मला का वाटतं यासाठी त्यांच्या भाषणातले इमोसनल अत्याचार मुद्दे दाखवले.
अॅड होमिनेम म्हणजे - अमका माणूस ना, फालतूच आहे तो. (फालतू या जागी डावा, उजवा, वरचा, खालचा, मधला, असा काहीही शब्द संदर्भानुसार वापरा.)

त्या भाषणातले छिद्रान्वेषण केलेत तसे इतरांच्या बाबतीतही केलेत असं दिसलं नाही इथे (इतरत्र केले असल्यास माहित नाही).

याला व्हॉटअबाऊटरी (मराठीत 'तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म') म्हणतात. अॅड होमिनेमसारखी ही सुद्धा एक लॉजिकल फॅलसी आहे.

पण तुम्हाला हवंच असेल तर हे पहा. रवीश कुमारच्या एनडीटीव्हीवरच्या कार्यक्रमालाही मी दोन दिवसांपूर्वी नावं ठेवलेली आहेत; इमोसनल अत्याचार (हेच शब्द वापरलेले नाहीत) करतो हे ही एक कारण आहेच. त्याचा मूळ मुद्दा पटलेला आहे तरीही. इथे तर इराणी खोटं बोलत आहेत, अर्धसत्य सांगत आहेत अशा बातम्या मुख्य धारेतली माध्यमं प्रकाशित करत आहेत.

तुम्ही इवलासा प्रतिसाददेखील पूर्ण प्रतिसाद दिला नाहीत हो.

प्रथमतः

अॅड होमिनेम म्हणजे - अमका माणूस ना, फालतूच आहे तो. (फालतू या जागी डावा, उजवा, वरचा, खालचा, मधला, असा काहीही शब्द संदर्भानुसार वापरा.)

हा अर्थ इथे नमूद करण्याचं प्रयोजन? जणु काही तुम्हालाच फक्त माहीतीय. असो तरीपण धन्यवाद. आता हेच तुम्ही तुमच्याच प्रतिसादात "ती इराणी ना फालतूच" हा टोन आढळतो का ते पहा.

याला व्हॉटअबाऊटरी (मराठीत 'तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म') म्हणतात. अॅड होमिनेमसारखी ही सुद्धा एक लॉजिकल फॅलसी आहे.

परत ते "लॉजिकल फॅलसी" वगैरे दावे करण्याआधी जरा,

इतरांच्याबाबतीत केले नाहीत म्हणून तुम्ही बोलू नव्हे असे म्हणायचे नाही नक्कीच.

हे आमच्या प्रतिसादातले वाक्य का बरे वाचले नाहीत हो ?

इथे तर इराणी खोटं बोलत आहेत, अर्धसत्य सांगत आहेत अशा बातम्या मुख्य धारेतली माध्यमं प्रकाशित करत आहेत.

संसदेत त्यांनी दिलेले पुरावे पाहिल्याशिवाय बोलत नाही. तशीही आधी सांगितल्याप्रमाणे त्या इराणीबाईंविषयी काडीमात्र सहानुभुती नाही. त्यामुळे खोटे बोलत असल्यास खुशाल बोलावे तिला. पण तुमचा "अ‍ॅड होमिनेम" तुम्हाला दिसतोय का इतकेच.
(याबबतीत श्रीगुरुजींशी साम्य दिसतंय मात्र प्रतिसादात. ;) ह.घ्या.)

(सकल सामाजिक दांभिकतेची चीड असलेला आणि साधे सोपे मुद्दे सोडून उगी लॅटिन, संस्कृत शब्द वापरुन समोरच्या नावडत्या आवाजास गप्प करु पाहणार्‍या वृतीचा वीट आलेला)

मॅडमजी, आजपर्यंत या आत्महत्या प्रकरणी विरोधीपक्षाने इतकं रान उठवलं पण त्यात खुनाचा आरोप (कायदेशीरदृष्ट्या ज्याला खुन म्हणतात) ऐकला नाहि. जागलेसाहेब तर हि सरसकट खुनाची केस म्हणत आहेत.

मायावतीबाई एका दलीत व्यक्तीला इन्वेस्टीगेशन पॅनलमधे घेण्याचा आग्रह करतात हे मला समजु शकतं. पण जागल्यासाहेब तीच री ओढतात आणि त्यात बुद्धीगामी काय हे मला कळत नाहि.

अल्पसंख्यांक म्हणजे "संखेने कमि" असा काहिसा माझा अंदाज होता. पण त्याचासंबंध संख्येशी नसुन तो गट किती न्युसन्स व्हॅल्यु बाळगुन असल्याशी आहे हे नवीनच कळलं. आणि त्यात बुद्धीगम्यता आहे हा शोध पण नवीनच लागला.

थोडक्यात काय, तर "भाजपाशासीत केंद्र सरकारच्या राज्यात दलीत आणि अल्पसंख्यांकांचं हत्याकांड सुरु आहे" इतका सिंपल मुद्दा मांडायला जागल्यासाहेबांनी जी शाब्दीक कसरत केली आहे ति केवळ बुद्धीगामी नसुन बुद्धीअधोगामी आहे असं मला वाटतं. स्मृती इराणी तर अभिनेत्री आहेच. त्या स्कीलचा वापर त्या करतीलच. किंबहुना सरसकट राजकारणी जमातच थोडीफार अभीनय क्षमता बाळागुन असते व त्याचं शक्य तेव्हढं प्रदर्शन करतेच. पण आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात भारतीय लोकशाही प्रक्रीयेने निवडुन आलेलं केंद्र सरकार आपल्याच नागरीकांच्या हत्याकांडाचा अजेंडा राबवते हे मला पटत नाहि. जागल्यासाहेब तसं पटवुन द्यायला जे काहि तर्कट मांडत आहेत त्यात फार काहि 'बुद्धी' देखील दिसत नाहि.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Feb 2016 - 1:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

या नव्या प्रतिसादात अॅड होमिनेम नाही. हेच काल लिहिलं असतं तर माझा बराच वेळ वाचला नसता का! आता माझा सोशल मिडीयावेचा आजचा वेळ संपला. आता उरलेलं उद्या, किंवा नंतर किंवा आणखी कधी.

मैत्र's picture

27 Feb 2016 - 8:21 pm | मैत्र

तुम्हाला या प्रकरणाची खडान खडा माहिती असावी असं दिसतंय

जरा ती पाच पत्रं काय होती ते आणि ती सर्व पत्रं रोहित हा दलित असल्यामुळे त्याच्यावर अन्याय करणे या एकमेव हेतूने कशी लिहिली होती ही माहिती मिपाकरांना सांगितली तर आमच्या ज्ञानात भर पडेल.
अर्थात याला बगल देण्याची, जंक प्रश्न किंवा तत्सम काहीही कुजकट पणा करण्याची तुम्हाला विचारस्वातंत्र्य अर्थात फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन खाली मुभा आहेच.

श्रीगुरुजी's picture

27 Feb 2016 - 11:25 pm | श्रीगुरुजी

इराणीबाईंनी ५ पत्रे लिहिली होती म्हणे. एखाद्या केंद्रीय मंत्र्याला एका प्रकरणासाठी तब्बल ५ पत्रे लिहावी लागली याचाच अर्थ त्या विद्यापीठाचे कुलगुरू त्यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करीत होते. अन्यथा पहिल्या पत्रातच काम झाले असते. म्हणजेच कुलगुरू दबावाखाली काम करीत नव्हते.

प्रसाद१९७१'s picture

29 Feb 2016 - 10:26 am | प्रसाद१९७१

ते काँग्रेस नी नेमलेले असतील कुलगुरू, त्यांना आदेश असेलच की भाजपच्या मंत्र्यांची पत्रे इग्नोर करायची.
आणि कंटाळुन त्या कुलगुरु ला काढले की काँग्रेस, येचुरी, कारथ आहेतच बोंबा मारायला.

मार्मिक गोडसे's picture

29 Feb 2016 - 11:15 am | मार्मिक गोडसे

आणि कंटाळुन त्या कुलगुरु ला काढले की काँग्रेस, येचुरी, कारथ आहेतच बोंबा मारायला

कदाचीत ही ५ पत्र ह्याच हेतूने लिहीली नसतील कशावरून? पत्रात काय लिहीले हे समोर आले पाहीजे.

श्रीगुरुजी's picture

29 Feb 2016 - 1:03 pm | श्रीगुरुजी

ते काँग्रेस नी नेमलेले असतील कुलगुरू, त्यांना आदेश असेलच की भाजपच्या मंत्र्यांची पत्रे इग्नोर करायची.
आणि कंटाळुन त्या कुलगुरु ला काढले की काँग्रेस, येचुरी, कारथ आहेतच बोंबा मारायला.

मनमोहन सिंगांनी नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी अमर्त्य सेन यांची २०१२ मध्ये नेमणूक केली. २०१५ मध्ये त्यांची ३ वर्षांची मुदत संपल्यावर केंद्र सरकारने त्यांची पुनर्नेमणूक केली नाही. त्यावेळी लगेच "मोदी सरकारने अमर्त्य सेनना हटविले" अशा मथळ्यांच्या बातम्या आल्या होत्या. त्यांना हटवायचे असते तर मुदतीपूर्वीच २०१४ मध्येच हटविले नसते का? ३ वर्षे मुदत संपायची वाट पहायची गरज नव्हती.

बादवे, २०१५ मध्ये अमर्त्य सेन ८१ वर्षे वयाचे झाले होते. अशा वयात आणि आधीची ३ वर्षे पूर्ण झाली असताना नवीन व तुलनेने तरूण कुलगुरू नेमणे अगदी स्वाभाविक आहे. परंतु या प्रकाराला लगेच असहिष्णुतेचा रंग दिला गेला होता.

हैद्राबाद विद्यापीठाच्या कुलगुरूला काढले असते तर कदाचित असेच झाले असते.

प्रसाद१९७१'s picture

29 Feb 2016 - 2:19 pm | प्रसाद१९७१

त्या उपकारापोटी बाबा बंगाली ने मौनीबाबाच्या मुलीवर का मुलीच्या कोणावर भरपुर खैरात केली होती

श्रीगुरुजी's picture

29 Feb 2016 - 2:33 pm | श्रीगुरुजी

मुलीवरच कृपा झाली होती.

http://www.oneindia.com/feature/amartya-sen-nalanda-university-controver...

वयाच्या ८२ व्या वर्षी नालंदा विद्यापीठात पहिली ३ वर्षांची टर्म संपल्यावर आपली पुनर्नेमणूक व्हावी अशी सेनांची इच्छा होती.

As per reports Sen, who is said to be close to former PM Manmohan Singh and UPA chief Sonia Gandhi, appointed Gopa Sabharwal, who was just a reader at Delhi's Lady Shriram College, as VC. As per a Bihar Times report, she was given a salary of over Rs 5 lakh per month which is twice what the Delhi University VC was getting. As per the Bihar Times report, "From India, only four persons seems to have been involved besides Nalanda Mentor Group and all of those happen to be close friends from a single campus, Delhi University. The four sahelis from same campus viz. Gopa Sabharwal, Anjana Sharma, Upinder Singh and Nayanjot Lahiri are the only scholars and administrators of repute that a billion- strong population of India has produced to steer the signifier of Asian renaissance, Nalanda University." Upinder Singh, professor of Ancient Indian History in DU, is the eldest daughter of former PM Manmohan Singh. Two others being Daman Singh, a budding novelist and Amrit Singh, an American citizen married to an American.

बोका-ए-आझम's picture

26 Feb 2016 - 8:31 am | बोका-ए-आझम

मिलिंद धुमाळे यांचा प्रतिवाद हा प्रतिवाद नाहीच आहे. तो डावा फालतूपणा आहे. शाळेत रामायण आणि महाभारत शिकवणं याला शिक्षणाचं भगवेकरण म्हणणा-या माणसाच्या अकलेची कीव करावी तेवढी कमीच. उद्या एखाद्याने मुलाचं नाव राम ठेवलं तर बारशाचं भगवेकरण झालं असं म्हणणार की काय? एखाद्याच्या अंत्ययात्रेत लोक श्रीराम जयराम म्हणत जातात ते अंत्ययात्रेचं भगवेकरण म्हणायला हवं.

विकास's picture

26 Feb 2016 - 10:57 am | विकास

शाळेत रामायण आणि महाभारत शिकवणं

माझे शिक्षण पूर्णपणे सरकारी शाळेत झाले. मी शिकत असताना महाराष्ट्राने आणि राष्ट्राने बहुतांशी काँग्रेस आणि जनता पद्धतीची सरकारे (पुलोद वगैरे) अनुभवली...

त्यावेळेस आमची किंबहूना मोर ऑर लेस ठाण्यातल्या तरी सर्वच सरकारी शाळा कशा चालू होयच्या?

प्रथम - वंदे मातरम
मग - या कुंदे... सरस्वती वंदना
वरील दोन्ही गोष्टी लाऊडस्पिकरवरून

मग प्रत्येक वर्गात
गीताईचा कधी पहीला पण बहुतांशी वेळेस १२ वा अध्याय सर्व म्हणायचे. - हे नक्की त्यानंतर
मग कधी दासबोधातील सच्छिश्य लक्षणे पाठ करून घेयचे
कधी कुसुमाग्रजांचे कोलंबसाचे गर्वगीत
अथवा अजून कुठले गीत पाठ करायला लागायचे....
संध्याकाळी शाळा सुटायच्या आधी राष्ट्रगीत असायचे

शाळेतल्या शिक्षकांनी रामायण-महाभारत पण कधी कधी किमान संदर्भ म्हणून सांगितले तर कधी कधी हॅम्लेट पासून सायको पर्यंतच्या कथा सांगितल्या...

अर्थात शिक्षणाचे भगवेकरण झाले असे नाव ठेवायला भगवा हा शब्द देखील नव्हता... गंमत म्हणजे माझा कधी तरी देखील "उजव्या" विचारसरणीशी संबंध नव्हता. असला तर डाव्यांशी होता. म्हणजे मी काही डावा वगैरे नव्हतो. आत्तासारखाच सेंटरलाच होतो असे म्हणेन. पण नंतर डाव्यांच्यातला फोलपण समजला. थोडक्यात जर काही उजवेपणा आला असे कुणाला वाटले तर ते शाळेतले भगवे शिक्षण नसून डाव्यांनी ज्या पद्धतीने समाज आणि देश विभाजन चालू केले त्याच्यामुळे झाले. किंबहूना भगव्या शिक्षणामुळे मला कायम सेंटरला अर्थात समतोल विचार करायला भाग पाडले आणि अजूनही मी केवळ घेयची म्हणून कधीच कुणाचीचा चुकीची बाजू घेऊ शकत नाही...

असो.

श्रीगुरुजी's picture

26 Feb 2016 - 2:26 pm | श्रीगुरुजी

माझ्या शाळेची सुरूवात राष्ट्रगीताने व्हायची व शाळा संपताना वंदेमातरम् स्पीकर्सवरून ऐकल्यानंतरच शाळा सुटायची. शाळेत दरवर्षी गणेशात्सवात प्रत्येक वर्ग सजविण्याची स्पर्धा असायची. दर शनिवारी मुले उत्सफूर्तपणे ५-१० पैसे वर्गणी काढून नारळ, फुले आणून वर्गात कपाटात ठेवलेल्या मारूतीच्या तस्बिरीसमोर नारळ फोडून सर्वजण आरती म्हणायचे आणि नंतरच घरी जायचे. त्यावेळी आंतरशालेय गीता पाठांतर स्पर्धा असायची.

त्या काळात महाराष्ट्रात व देशात सर्वत्र काँग्रेसचा एकछत्री अंमल होता. ही शाळा सरकारी ग्रँटवर चालणारी होती. तेव्हा कधीही आणि कोणीही शिक्षणाच्या किंवा शाळेच्या भगवेकरणाचा आरोप केला नव्हता. हा शब्द १९९८ मध्ये अटलबिहारी वायपेयी पंतप्रधान झाल्यावर निधर्मांधांनी रूढ केला. आता तर गीता, रामायण, महाभारत इ. शब्द कानावर पडले तरी निधर्मांध चवताळून उठतात आणि भगवेकरण, भगवेकरण अशी कोल्हेकुई सुरू करतात.

पिलीयन रायडर's picture

26 Feb 2016 - 11:17 am | पिलीयन रायडर

मी स्मॄती इराणींच्या भाषणाची फॅन नाही. मलाही अनेक गोष्टी वाढीव वाटल्या. पण तू दुवा दिलेला लेखही "बुद्धीवादी" वाटला नाही.

इथे आपण लक्षात घेतले पाहिजे कि मॅडमनी पारशी समुदायातील व्यक्तीशी लग्न केले आहे, ना कि मुस्लीम, आपल्या देशात मुस्लीम आणि दलित समुदायावर अन्याय अत्याचार होत असतो,पारशी समाज हा आपल्या देशात सायलेंट झोनमध्ये आहे

पारशी माणसाशी लग्न केले हा मुद्दा नसुन भांडवल करायला माझ्याकडेही मुद्दे आहेत.. मी पण बोंबा मारु शकते की मी पारशी माणसाशी लग्न केलेली "स्त्री" आहे म्हणुन तुम्ही मला बोलु देत नाही. तेव्हा चिंधी मुद्दे घेऊन राजकारण तुम्हालाच करता येते असे नाही. मी पण करु शकते.. असा त्याचा अर्थ वाटला..

वरच्या लेखात, "मुस्लिमांवर आपल्या देशात अन्याय आणि अत्याचार झाले आहेत" असे वाक्य आहे.
कोणते अत्याचार? मला अजिबातच काही क्लिक होत नाहीये..

मुस्लिम आणि अत्याचार म्हणलं की मला, मुघलवगैरे लोकांनी कसे हिंदुवर अत्याचार केले इ महाराजांच्या काळातल्या गोष्टीच आठवतात. नंतर तर इंग्रजच आले अत्याचाराची गादी चालवायला. मग मुस्लिमांवर कुणी अत्याचार केले?

(अवांतर - उच्च वर्णीयांनी इतर जातींवर अन्याय केला. त्याचप्रमाणे मग मुस्लिम राज्यकर्त्यांनी सुद्धा इतर धर्मांवर केलाच ना? मग आपल्याला पण आरक्षण मिळायला हवे का? प्रश्न प्रामाणिक आहे. कुठलीही खोच नाही.)

रोहित वेमुला प्रकरणाबद्दल मलाच मुद्दलात नीट माहिती नाही म्हणुन त्यांनी लिहीलेला प्रतिवाद चांगला की वाईट ते ठाऊक नाही.

रामायण आणि महाभारत हे सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचे आहेत. त्यांचा धार्मिकतेशी संबंध कसा लावता येइल? असं तर काहीही शिकवणं अवघड होईल.

तर मुद्दा एवढाच आहे की फिल्मी डायलॉग असले तरी स्मृती इराणींचे भाषण उपरोक्त लेखापेक्षा बरेच चांगले होते. लेख अजिबातच बुद्धिगामी वाटला नाही.

श्रीगुरुजी's picture

26 Feb 2016 - 2:18 pm | श्रीगुरुजी

या भाषणाचा बुद्धीगामी प्रतिवाद इथे वाचनात आला. -

बुद्धीगामी?

हहपुवा

संपूर्ण लेखात निव्वळ निधर्मांध गरळ ओकली आहे. अर्थात निधर्मांध गरळ म्हणजेच बुद्धीगामी लेखन असेल तर मात्र आमची माघार.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Feb 2016 - 8:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

मॅडमचा आवेशच तसा होता.कोणत्याही आवेशपूर्ण भांडणात स्त्री अधिक खुलते. ने सुरू होणारा प्रतिसाद बुद्धीगामी आहे यात संशय तो काय !!!??? =)) =)) =))

बाकी चित्रफितीतले असंख्य मुख्य मुद्दे सोडून तीन अन्यथा दुर्लक्षण्याजोगे (पण भारतिय राजकारणात बसणारे) मुद्दे शोधून काढणार्‍या काकदृष्टीची आणि त्यावर...

मी संपूर्ण फीत बघितली नाही. जे मोती चटकन सापडले ते लिहिले.

असा डिस्क्लेमर म्हणजे सबळ पुराव्याविशी केलेल्या शास्त्रिय वादविवादाची परिसीमाच म्हणावी लागेल =)) =)) =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Feb 2016 - 9:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

मॅडमचा आवेशच तसा होता.कोणत्याही आवेशपूर्ण भांडणात स्त्री अधिक खुलते.

अन्यथा प्रखर स्त्रीपुरुषसमानतावादी असलेल्या व्यक्तींनी एखादा चष्मा चढवला की त्यांना वरच्या वाक्यातला लैंगिक ध्वन्यर्थ (sexist overtones) दिसेनासा होतो आणि स्त्रीपुरुषसमानतावाद मागच्या बेंचवर बसायला जातो हे पाहून अतीव दु:ख झाले.

चेक आणि मेट's picture

26 Feb 2016 - 7:27 am | चेक आणि मेट

सडेतोड

पॉइंट ब्लँक's picture

26 Feb 2016 - 7:43 am | पॉइंट ब्लँक

If I had mentioned Chanakya, I would be accused of being ‘saffron’, hence I quoted a Roman.

हा सगळ्यात मोठा षटकार होता :)

प्रदीप साळुंखे's picture

26 Feb 2016 - 8:04 am | प्रदीप साळुंखे

स्मृती ईराणींबाबत फारसं चांगलं मत नव्हतं,पण अलिकडे ते मत बदललयं.
(आपलं मत आपणच बदलू शकतो)

कपिलमुनी's picture

26 Feb 2016 - 8:58 am | कपिलमुनी

विकांतास वेळ काढून या भाषणाचा आस्वाद घेण्यात येईल

बाळ सप्रे's picture

26 Feb 2016 - 1:18 pm | बाळ सप्रे

अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहित होतील.

कोणत्याही प्रकारची सारवसारव न करता, मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी याचा सुंदर वस्तुपाठ

याबाबतीत साशंकता आहे.
आता सामान्य माणसाच्या दृष्टीने दोन्ही गोष्टी मिडीयाच पोहोचवते व आजकाल सत्याच्या अपलापाबद्दल मिडीया व सर्वच राजकीय पक्ष कुप्रसिद्ध असल्याने नक्की कोणती माहिती विश्वासार्ह हे सांगू शकत नाही. दोन्हीकडून या भाषणातील मुद्द्यांवर परस्पर विरोधी गोष्टी वाचायला मिळाल्या आहेत.

आणि शीर कापून अर्पण करणे, गंगेत वाहीलेल्या अस्थिही भारत माता की जय म्हणतील अशा आवेशाने झालेच तर भाषणाची विश्वासार्हता कमीच झाली माझ्यालेखी.

त्यामुळे " मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?" याचे उदाहरण म्हणजे हे भाषण म्हणावे ही माझ्यालेखी अतिशयोक्तीच !

बोका-ए-आझम's picture

26 Feb 2016 - 2:07 pm | बोका-ए-आझम

या आता.

पिलीयन रायडर's picture

26 Feb 2016 - 3:58 pm | पिलीयन रायडर

मुद्दे चांगले मांडले. खरे की खोटे ह्याची पडताळणी होऊ शकतेच. पुरावेही दाखवले त्यांनी अनेक ठिकाणी...

पण

आणि शीर कापून अर्पण करणे, गंगेत वाहीलेल्या अस्थिही भारत माता की जय म्हणतील अशा आवेशाने झालेच तर भाषणाची विश्वासार्हता कमीच झाली माझ्यालेखी.

ह्यामुळे मी सुद्धा ह्या भाषणाला वस्तुपाठ वगैरे म्हणणार नाही. ते डायलॉग नसते तर खरंच अजुन जास्त भावलं असतं भाषण.

उगा काहितरीच's picture

26 Feb 2016 - 1:34 pm | उगा काहितरीच

काल रात्री ऐकले हे पूर्ण भाषण ! काय तर बोलल्या स्मृती इराणीबाई ! जबरदस्त ! पहिले भाजपाचे महिला नेतृत्व म्हणून केवळ सुषमा स्वराज्य यांचे नाव समोर येत होते. पण आता स्मृतीबाईंचेही नाव घ्यायला हरकत नाही. रच्याकने माझी ना एक इच्छा आहे, राहुल गांधी , कपिल सिब्बल, सोनिया गांधी , नरेंद्र मोदी, अरूण जेटली, सुषमा स्वराज वगैरे यांनी एका मंचावर चर्चा करावी. व ती पूर्ण चर्चा लाइव्ह असावी .

पैसा's picture

26 Feb 2016 - 2:06 pm | पैसा

तियानमेन चौकातले रणगाड्यासमोर उभे राहिलेले विद्यार्थी आठवले.

पगला गजोधर's picture

26 Feb 2016 - 1:59 pm | पगला गजोधर

भाजपच्या अंतर्गत, सुषमा स्वराजेतर गटाला, एक चांगली महिला प्रवक्ता मिळाली, इथे पक्षाचे महिला-प्रतिनिधित्व, म्हणजे मला म्हणावयाचे आहे, की प्रत्येक राजकीय पक्षात काही प्रातिनिधिक नेते असतात.
काल्पनिक उदा. रामदास आठवले यांना मंत्रिमंडळात सामील केले तर, एखादा पक्ष सांगू शकतो की, आम्ही दलितांना सत्तेत सहभागी केले…
मुख्तारअब्ब्बास नक़्वि यांना महत्वाचे पद दिले (पक्षांतर्गत किंवा सरकार मध्ये ) तर, एखादा पक्ष सांगू शकतो की, आम्ही अल्पसंख्यांकाना सहभागी केले…
हे अशे प्रकार सर्वच पक्ष करतात,

इथे, माननीय स्मृती यांच्या भाषणामुळे, सुषमा स्वराज यांच्यावर असलेली पक्षाचे महिला-प्रतिनिधित्व करण्याचा बोजा बराच हलका झालाय. म्हणजे पूर्वी पक्षाला जिथे स्वराज यांचाच विचार करावया लागत असेल, तिथे आता दुसरा विकल्प सुद्धा त्यांना उपलब्ध झालाय.… म्हणजेच उदा. उद्या जर सुषमाजी स्वराज यांना काही कारणाने काही जबाबदारी घेता आली नाही किंवा पक्षाला त्यांना कार्यबाहुल्यामुळे आणखी जबाबदारी द्यायची नसेल, तर ऑप्शन तयार झालाय…
अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे

पैसा's picture

26 Feb 2016 - 2:25 pm | पैसा

पूर्वी लोक नेत्यांच्या भाषणांना गर्दी करत. आताचे नेते कैच्या कै बोलतात. ताजे उदाहरण म्हणजे आनंद शर्मा आणि तृणमूल काँग्रेसने या भाषणात जे एन यु मधील दुर्गादेवीच्या अपमानकारक उल्लेखाचा उल्लेख केला म्हणून स्मृतीला धारेवर धरले आहे.

बरेच दिवसांनी व्यवस्थित मुद्देसूद भाषण ऐकायला मिळाले. हल्ली अशी भाषणेही दुर्मिळ आहेत. त्यासाठी स्मृतीचे कौतुक.

श्रीगुरुजी's picture

26 Feb 2016 - 2:31 pm | श्रीगुरुजी

स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण युट्युबवर पाहिले. ते खाली पाहता येईल...

इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद! स्मृती इराणींचे भाषण अत्यंत जबरदस्त व तडाखेबंद होते. त्यांच्या भाषणामुळे आपण घायाळ होणार हे आधीच ओळखून खांग्रेसींनी आधीच पलायन केले होते. "मला संसदेत बोलून दिले जाणार नाही. माझ्या बोलण्याला ते घाबरतात" असे संसदेबाहेर विनोदी तारे तोडणारे राहुल गांधी या विषयावर संसदेत अजून बोललेच नाहीत.

ऑगस्ट २०१५ मध्ये ललित मोदी प्रकरणावरून सुषमा स्वराजांनी असेच आक्रमक व तडाखेबंद भाषण करून खांग्रेसींना घायाळ करून सोडले होते. या भाषणावरून त्या भाषणाची आठवण झाली. मला वाटते की यापुढे कोणत्याही वादग्रस्त प्रश्नावर बोलण्यासाठी भाजपने फक्त या दोघींनाच पुढे करावे. त्यांच्या भाषणापुढे खांग्रेसींची फॅ फॅ उडेल.

प्रतापराव's picture

26 Feb 2016 - 2:32 pm | प्रतापराव

स्मृती इराणींचे भाषण चांगले झाले मलाही आवडले होते पण आजच त्यांच्या भाषणातला डॉक्टरांशी संबंधित मुद्दा खोटा असल्याची बातमी वृत्तपत्रात आलीय. त्यामुळे भाषणाचे सादरीकरण उत्तम पण मुद्दे खोटे असे व्हायला नको

माहितगार's picture

26 Feb 2016 - 5:27 pm | माहितगार

शक्यय ज्युडीशिअल कमिशन सरकारने बसवले आहे, संसद सदस्यांनी मागितले असते तर संसदीय समितीसुद्धा नेमण्याशिवाय नमो सरकारला गत्यंतर राहीले नसते त्यात अशा सर्व बारकाव्यांची चौकशी होऊ शकते. एक मात्र खरे की अपघात स्थळावरील मृतदेह ताब्यात घेण्यास पोलीसांना विरोधकरणे, चौकशीच्या आधीच तपासाची दिशा नव्हे तर राजकीय उद्देशाने कुणाची तरी नावे संशयीत म्हणून जोडायला लावणे हे ही स्पृहणीय नसावे. ह्याच नाही इतरही केसेस मध्ये जमाव पोलीसांना त्यांच्या कामात व्यत्यय आणताना दिसतात ते योग्य नसावे.

विकास's picture

26 Feb 2016 - 8:37 pm | विकास

The protest had lasted all night and prevented the cops from taking the body for post mortem. (डिएनए इंडीया)

विकास's picture

26 Feb 2016 - 8:22 pm | विकास

डॉक्टरांच्या मुद्द्याबाबत त्यांना चूक ठरवले जात आहे आणि त्यावरून प्रश्न विचारणे योग्य देखील आहे. पण ती horrific युट्युब क्लिप बघत असताना काही वेगळेच प्रश्न पडले. आत्महत्या अथवा आत्महत्येचा प्रयत्न हा भारतात कायदेशीर गुन्हा आहे. त्याला ज्या पद्धतीने फासावरून काढून बेडवर ठेवले होते, ते नक्की कधी झाले? कारण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांनी चेक केले त्या आधी साधारण २ तास आधीच त्याचा मृत्यू झाला होता. त्या चित्रफितीत किमान एक पोलीस दिसतो पण न्यायालयात सादर केलेल्या पोलीस रिपोर्टप्रमाणे "... an unruly mob of students did not even allow police to take out Vemula's body to carry out the investigation."

Police Report

जर पोलीस रिपोर्ट पण खरा असेल (अजून पर्यंत माझ्या माहितीप्रमाणे त्यावर कोणी आक्षेप घेतलेला नाही) तर मग हा पोलीस तिथे कसा उभा राहू शकला?

त्या व्यतिरीक्त आता बाहेर आलेल्या बातमीनुसार तो दलीत नव्हता. दुर्दैवाने त्या असण्या-नसण्याने त्याचा जीव परत येणार नाही. पण हा मुद्दा आपल्याकडे कायद्यामुळे महत्वाचा आहे. कारण दलितांवरील अत्याचाराला वेगळ्या प्रकारे हाताळले जाते. जर हे खरे असले की तो दलीत नाही, तर ह्या कांगावखोर डाव्यांना आणि काँग्रेसला पण, या प्रसंगात समाजात जातियता माजवायला कारणीभूत आहेत म्हणून जाहीर करायला हवे. (तसे अधुनिक जातियतेचे विष पसरवण्यासाठी तेच कारणीभूत आहेत)

बोका-ए-आझम's picture

26 Feb 2016 - 10:17 pm | बोका-ए-आझम

मला वाटतं आत्महत्या हा आता गुन्हा मानला जात नाही.या सरकारने हा कायदा बदललेला आहे.

मृत्युन्जय's picture

1 Mar 2016 - 11:47 am | मृत्युन्जय

आत्मह्त्येचा प्रयत्न हा गुन्हा आहे पण आत्महत्य यशस्वी झाली तर तो गुन्हा नाही.

गामा पैलवान's picture

26 Feb 2016 - 11:14 pm | गामा पैलवान

विकास,

माझा अंदाज आहे की रोहितची हत्या झालेली आहे आणि त्याचा मृतदेह नंतर फासावर टांगलेला आहे. हे षड्यंत्र उघड होऊ नये म्हणून पोलिसांना पुढील तपासास अटकाव केला गेला.

आ.न.,
-गा.पै.

अद्द्या's picture

26 Feb 2016 - 4:55 pm | अद्द्या

स्मृती इराणीं बद्दल सुरुवातीला माझे स्वतः मत हि हेच होते कि दुसरं कोणी तरी शिकलेल माणूस तिथे हवा होता. पण गेल्या काही महिन्यात त्यांनी केलेलं काम आणि वेळोवेळी विरोधकांचे पुराव्यासकट केलेली चिरफाड बघून माझं मत बदललंय.
काम तर त्या करतातच पण त्यांची राजकीय समज जबरदस्त आहे. आणि कधीही पुराव्या विना बोलत नाहीत.
हो. आता शीर कापून ठेवेन इत्यादी भावनेच्या ओघात बोलून गेल्या .. पण ते कधीही "one morning i woke up at night" चांगलंच

बाकी ज्यांनी कालच्या भाषणावरून त्यांना "अजुनी नाटक करणारी बाई " वगेर म्हणलं ते बघून खरोखर वाईट वाटलं .

कोन्ग्रेस ने खरं तर सदनात हि चर्चा करून जमिनीवर शांत पडलेल्या कुऱ्हाडी वर तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली.

या भाषणाबरोबर अनुराग ठाकूर यांचं भाषण . .आणि काल राज्यसभेत पुन्हा एकदा इराणी आणि जेटली याचं भाषण हि ऐका. जबर उत्तर दिली आहेत

नाखु's picture

26 Feb 2016 - 5:09 pm | नाखु

शिकलेला का न शिकलेला (म्हणजे किती उच्चशिक्षीत वगैरे) यावर काहीच नसावे.

असे मला वाटते..

अद्द्या's picture

26 Feb 2016 - 5:24 pm | अद्द्या

जरूर. .तेच त्या साबित करत आहेत रोज

बोका-ए-आझम's picture

26 Feb 2016 - 6:05 pm | बोका-ए-आझम

सोनिया गांधींपेक्षा नक्कीच जास्त शिकलेल्या आहेत.