✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?

ड
डॉ सुहास म्हात्रे यांनी
गुरुवार, 02/25/2016 - 21:34  ·  लेख
लेख
स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण यूट्यूबवर पाहिले. ते खाली पाहता येईल... हे इथे टाकण्यामागे दोन उद्देश आहेत... १. या भाषणातून सध्या गरमागरम चर्चा चालू असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबादमधील विद्यापीठ आणि मध्यवर्ती सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या इतर सर्व विद्यापीठांसंबंधी अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहीत होतील. २. कोणत्याही प्रकारची सारवसारव न करता, मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी याचा सुंदर वस्तुपाठ म्हणावे असे हे भाषण आहे. तेव्हा तशी सकारात्मक चर्चा करू इच्छिणार्‍यांसाठी यातून शिकण्यासारखे खूप काही आहे. .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राजकारण
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
प्रतिक्रिया
बातमी

प्रतिक्रिया द्या
59310 वाचन

💬 प्रतिसाद (280)

प्रतिक्रिया

तुम्ही इवलासा प्रतिसाददेखील

हाडक्या
Fri, 02/26/2016 - 23:38 नवीन
तुम्ही इवलासा प्रतिसाददेखील पूर्ण प्रतिसाद दिला नाहीत हो. प्रथमतः
अॅड होमिनेम म्हणजे - अमका माणूस ना, फालतूच आहे तो. (फालतू या जागी डावा, उजवा, वरचा, खालचा, मधला, असा काहीही शब्द संदर्भानुसार वापरा.)
हा अर्थ इथे नमूद करण्याचं प्रयोजन? जणु काही तुम्हालाच फक्त माहीतीय. असो तरीपण धन्यवाद. आता हेच तुम्ही तुमच्याच प्रतिसादात "ती इराणी ना फालतूच" हा टोन आढळतो का ते पहा.
याला व्हॉटअबाऊटरी (मराठीत 'तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म') म्हणतात. अॅड होमिनेमसारखी ही सुद्धा एक लॉजिकल फॅलसी आहे.
परत ते "लॉजिकल फॅलसी" वगैरे दावे करण्याआधी जरा,
इतरांच्याबाबतीत केले नाहीत म्हणून तुम्ही बोलू नव्हे असे म्हणायचे नाही नक्कीच.
हे आमच्या प्रतिसादातले वाक्य का बरे वाचले नाहीत हो ?
इथे तर इराणी खोटं बोलत आहेत, अर्धसत्य सांगत आहेत अशा बातम्या मुख्य धारेतली माध्यमं प्रकाशित करत आहेत.
संसदेत त्यांनी दिलेले पुरावे पाहिल्याशिवाय बोलत नाही. तशीही आधी सांगितल्याप्रमाणे त्या इराणीबाईंविषयी काडीमात्र सहानुभुती नाही. त्यामुळे खोटे बोलत असल्यास खुशाल बोलावे तिला. पण तुमचा "अ‍ॅड होमिनेम" तुम्हाला दिसतोय का इतकेच. (याबबतीत श्रीगुरुजींशी साम्य दिसतंय मात्र प्रतिसादात. ;) ह.घ्या.) (सकल सामाजिक दांभिकतेची चीड असलेला आणि साधे सोपे मुद्दे सोडून उगी लॅटिन, संस्कृत शब्द वापरुन समोरच्या नावडत्या आवाजास गप्प करु पाहणार्‍या वृतीचा वीट आलेला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रतिवादात काय चूक आहे हे न दाखवता...

अर्धवटराव
Sat, 02/27/2016 - 00:26 नवीन
मॅडमजी, आजपर्यंत या आत्महत्या प्रकरणी विरोधीपक्षाने इतकं रान उठवलं पण त्यात खुनाचा आरोप (कायदेशीरदृष्ट्या ज्याला खुन म्हणतात) ऐकला नाहि. जागलेसाहेब तर हि सरसकट खुनाची केस म्हणत आहेत. मायावतीबाई एका दलीत व्यक्तीला इन्वेस्टीगेशन पॅनलमधे घेण्याचा आग्रह करतात हे मला समजु शकतं. पण जागल्यासाहेब तीच री ओढतात आणि त्यात बुद्धीगामी काय हे मला कळत नाहि. अल्पसंख्यांक म्हणजे "संखेने कमि" असा काहिसा माझा अंदाज होता. पण त्याचासंबंध संख्येशी नसुन तो गट किती न्युसन्स व्हॅल्यु बाळगुन असल्याशी आहे हे नवीनच कळलं. आणि त्यात बुद्धीगम्यता आहे हा शोध पण नवीनच लागला. थोडक्यात काय, तर "भाजपाशासीत केंद्र सरकारच्या राज्यात दलीत आणि अल्पसंख्यांकांचं हत्याकांड सुरु आहे" इतका सिंपल मुद्दा मांडायला जागल्यासाहेबांनी जी शाब्दीक कसरत केली आहे ति केवळ बुद्धीगामी नसुन बुद्धीअधोगामी आहे असं मला वाटतं. स्मृती इराणी तर अभिनेत्री आहेच. त्या स्कीलचा वापर त्या करतीलच. किंबहुना सरसकट राजकारणी जमातच थोडीफार अभीनय क्षमता बाळागुन असते व त्याचं शक्य तेव्हढं प्रदर्शन करतेच. पण आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात भारतीय लोकशाही प्रक्रीयेने निवडुन आलेलं केंद्र सरकार आपल्याच नागरीकांच्या हत्याकांडाचा अजेंडा राबवते हे मला पटत नाहि. जागल्यासाहेब तसं पटवुन द्यायला जे काहि तर्कट मांडत आहेत त्यात फार काहि 'बुद्धी' देखील दिसत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

या नव्या प्रतिसादात अॅड

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 02/27/2016 - 01:02 नवीन
या नव्या प्रतिसादात अॅड होमिनेम नाही. हेच काल लिहिलं असतं तर माझा बराच वेळ वाचला नसता का! आता माझा सोशल मिडीयावेचा आजचा वेळ संपला. आता उरलेलं उद्या, किंवा नंतर किंवा आणखी कधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

मूलभूत शंका

मैत्र
Sat, 02/27/2016 - 20:21 नवीन
तुम्हाला या प्रकरणाची खडान खडा माहिती असावी असं दिसतंय जरा ती पाच पत्रं काय होती ते आणि ती सर्व पत्रं रोहित हा दलित असल्यामुळे त्याच्यावर अन्याय करणे या एकमेव हेतूने कशी लिहिली होती ही माहिती मिपाकरांना सांगितली तर आमच्या ज्ञानात भर पडेल. अर्थात याला बगल देण्याची, जंक प्रश्न किंवा तत्सम काहीही कुजकट पणा करण्याची तुम्हाला विचारस्वातंत्र्य अर्थात फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन खाली मुभा आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

इराणीबाईंनी ५ पत्रे लिहिली

श्रीगुरुजी
Sat, 02/27/2016 - 23:25 नवीन
इराणीबाईंनी ५ पत्रे लिहिली होती म्हणे. एखाद्या केंद्रीय मंत्र्याला एका प्रकरणासाठी तब्बल ५ पत्रे लिहावी लागली याचाच अर्थ त्या विद्यापीठाचे कुलगुरू त्यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करीत होते. अन्यथा पहिल्या पत्रातच काम झाले असते. म्हणजेच कुलगुरू दबावाखाली काम करीत नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

ते काँग्रेस नी नेमलेले असतील

प्रसाद१९७१
Mon, 02/29/2016 - 10:26 नवीन
ते काँग्रेस नी नेमलेले असतील कुलगुरू, त्यांना आदेश असेलच की भाजपच्या मंत्र्यांची पत्रे इग्नोर करायची. आणि कंटाळुन त्या कुलगुरु ला काढले की काँग्रेस, येचुरी, कारथ आहेतच बोंबा मारायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आणि कंटाळुन त्या कुलगुरु ला

मार्मिक गोडसे
Mon, 02/29/2016 - 11:15 नवीन
आणि कंटाळुन त्या कुलगुरु ला काढले की काँग्रेस, येचुरी, कारथ आहेतच बोंबा मारायला
कदाचीत ही ५ पत्र ह्याच हेतूने लिहीली नसतील कशावरून? पत्रात काय लिहीले हे समोर आले पाहीजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

ते काँग्रेस नी नेमलेले असतील

श्रीगुरुजी
Mon, 02/29/2016 - 13:03 नवीन
ते काँग्रेस नी नेमलेले असतील कुलगुरू, त्यांना आदेश असेलच की भाजपच्या मंत्र्यांची पत्रे इग्नोर करायची. आणि कंटाळुन त्या कुलगुरु ला काढले की काँग्रेस, येचुरी, कारथ आहेतच बोंबा मारायला.
मनमोहन सिंगांनी नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी अमर्त्य सेन यांची २०१२ मध्ये नेमणूक केली. २०१५ मध्ये त्यांची ३ वर्षांची मुदत संपल्यावर केंद्र सरकारने त्यांची पुनर्नेमणूक केली नाही. त्यावेळी लगेच "मोदी सरकारने अमर्त्य सेनना हटविले" अशा मथळ्यांच्या बातम्या आल्या होत्या. त्यांना हटवायचे असते तर मुदतीपूर्वीच २०१४ मध्येच हटविले नसते का? ३ वर्षे मुदत संपायची वाट पहायची गरज नव्हती. बादवे, २०१५ मध्ये अमर्त्य सेन ८१ वर्षे वयाचे झाले होते. अशा वयात आणि आधीची ३ वर्षे पूर्ण झाली असताना नवीन व तुलनेने तरूण कुलगुरू नेमणे अगदी स्वाभाविक आहे. परंतु या प्रकाराला लगेच असहिष्णुतेचा रंग दिला गेला होता. हैद्राबाद विद्यापीठाच्या कुलगुरूला काढले असते तर कदाचित असेच झाले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

त्या उपकारापोटी बाबा बंगाली

प्रसाद१९७१
Mon, 02/29/2016 - 14:19 नवीन
त्या उपकारापोटी बाबा बंगाली ने मौनीबाबाच्या मुलीवर का मुलीच्या कोणावर भरपुर खैरात केली होती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मुलीवरच कृपा झाली होती.

श्रीगुरुजी
Mon, 02/29/2016 - 14:33 नवीन
मुलीवरच कृपा झाली होती. http://www.oneindia.com/feature/amartya-sen-nalanda-university-controversy-all-you-should-know-1661314.html वयाच्या ८२ व्या वर्षी नालंदा विद्यापीठात पहिली ३ वर्षांची टर्म संपल्यावर आपली पुनर्नेमणूक व्हावी अशी सेनांची इच्छा होती. As per reports Sen, who is said to be close to former PM Manmohan Singh and UPA chief Sonia Gandhi, appointed Gopa Sabharwal, who was just a reader at Delhi's Lady Shriram College, as VC. As per a Bihar Times report, she was given a salary of over Rs 5 lakh per month which is twice what the Delhi University VC was getting. As per the Bihar Times report, "From India, only four persons seems to have been involved besides Nalanda Mentor Group and all of those happen to be close friends from a single campus, Delhi University. The four sahelis from same campus viz. Gopa Sabharwal, Anjana Sharma, Upinder Singh and Nayanjot Lahiri are the only scholars and administrators of repute that a billion- strong population of India has produced to steer the signifier of Asian renaissance, Nalanda University." Upinder Singh, professor of Ancient Indian History in DU, is the eldest daughter of former PM Manmohan Singh. Two others being Daman Singh, a budding novelist and Amrit Singh, an American citizen married to an American.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

बुद्धिवादी प्रतिवाद?

बोका-ए-आझम
Fri, 02/26/2016 - 08:31 नवीन
मिलिंद धुमाळे यांचा प्रतिवाद हा प्रतिवाद नाहीच आहे. तो डावा फालतूपणा आहे. शाळेत रामायण आणि महाभारत शिकवणं याला शिक्षणाचं भगवेकरण म्हणणा-या माणसाच्या अकलेची कीव करावी तेवढी कमीच. उद्या एखाद्याने मुलाचं नाव राम ठेवलं तर बारशाचं भगवेकरण झालं असं म्हणणार की काय? एखाद्याच्या अंत्ययात्रेत लोक श्रीराम जयराम म्हणत जातात ते अंत्ययात्रेचं भगवेकरण म्हणायला हवं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

खी खी!

विकास
Fri, 02/26/2016 - 10:57 नवीन
शाळेत रामायण आणि महाभारत शिकवणं माझे शिक्षण पूर्णपणे सरकारी शाळेत झाले. मी शिकत असताना महाराष्ट्राने आणि राष्ट्राने बहुतांशी काँग्रेस आणि जनता पद्धतीची सरकारे (पुलोद वगैरे) अनुभवली... त्यावेळेस आमची किंबहूना मोर ऑर लेस ठाण्यातल्या तरी सर्वच सरकारी शाळा कशा चालू होयच्या? प्रथम - वंदे मातरम मग - या कुंदे... सरस्वती वंदना वरील दोन्ही गोष्टी लाऊडस्पिकरवरून मग प्रत्येक वर्गात गीताईचा कधी पहीला पण बहुतांशी वेळेस १२ वा अध्याय सर्व म्हणायचे. - हे नक्की त्यानंतर मग कधी दासबोधातील सच्छिश्य लक्षणे पाठ करून घेयचे कधी कुसुमाग्रजांचे कोलंबसाचे गर्वगीत अथवा अजून कुठले गीत पाठ करायला लागायचे.... संध्याकाळी शाळा सुटायच्या आधी राष्ट्रगीत असायचे शाळेतल्या शिक्षकांनी रामायण-महाभारत पण कधी कधी किमान संदर्भ म्हणून सांगितले तर कधी कधी हॅम्लेट पासून सायको पर्यंतच्या कथा सांगितल्या... अर्थात शिक्षणाचे भगवेकरण झाले असे नाव ठेवायला भगवा हा शब्द देखील नव्हता... गंमत म्हणजे माझा कधी तरी देखील "उजव्या" विचारसरणीशी संबंध नव्हता. असला तर डाव्यांशी होता. म्हणजे मी काही डावा वगैरे नव्हतो. आत्तासारखाच सेंटरलाच होतो असे म्हणेन. पण नंतर डाव्यांच्यातला फोलपण समजला. थोडक्यात जर काही उजवेपणा आला असे कुणाला वाटले तर ते शाळेतले भगवे शिक्षण नसून डाव्यांनी ज्या पद्धतीने समाज आणि देश विभाजन चालू केले त्याच्यामुळे झाले. किंबहूना भगव्या शिक्षणामुळे मला कायम सेंटरला अर्थात समतोल विचार करायला भाग पाडले आणि अजूनही मी केवळ घेयची म्हणून कधीच कुणाचीचा चुकीची बाजू घेऊ शकत नाही... असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

माझ्या शाळेची सुरूवात

श्रीगुरुजी
Fri, 02/26/2016 - 14:26 नवीन
माझ्या शाळेची सुरूवात राष्ट्रगीताने व्हायची व शाळा संपताना वंदेमातरम् स्पीकर्सवरून ऐकल्यानंतरच शाळा सुटायची. शाळेत दरवर्षी गणेशात्सवात प्रत्येक वर्ग सजविण्याची स्पर्धा असायची. दर शनिवारी मुले उत्सफूर्तपणे ५-१० पैसे वर्गणी काढून नारळ, फुले आणून वर्गात कपाटात ठेवलेल्या मारूतीच्या तस्बिरीसमोर नारळ फोडून सर्वजण आरती म्हणायचे आणि नंतरच घरी जायचे. त्यावेळी आंतरशालेय गीता पाठांतर स्पर्धा असायची. त्या काळात महाराष्ट्रात व देशात सर्वत्र काँग्रेसचा एकछत्री अंमल होता. ही शाळा सरकारी ग्रँटवर चालणारी होती. तेव्हा कधीही आणि कोणीही शिक्षणाच्या किंवा शाळेच्या भगवेकरणाचा आरोप केला नव्हता. हा शब्द १९९८ मध्ये अटलबिहारी वायपेयी पंतप्रधान झाल्यावर निधर्मांधांनी रूढ केला. आता तर गीता, रामायण, महाभारत इ. शब्द कानावर पडले तरी निधर्मांध चवताळून उठतात आणि भगवेकरण, भगवेकरण अशी कोल्हेकुई सुरू करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

मी स्मॄती इराणींच्या भाषणाची

पिलीयन रायडर
Fri, 02/26/2016 - 11:17 नवीन
मी स्मॄती इराणींच्या भाषणाची फॅन नाही. मलाही अनेक गोष्टी वाढीव वाटल्या. पण तू दुवा दिलेला लेखही "बुद्धीवादी" वाटला नाही.
इथे आपण लक्षात घेतले पाहिजे कि मॅडमनी पारशी समुदायातील व्यक्तीशी लग्न केले आहे, ना कि मुस्लीम, आपल्या देशात मुस्लीम आणि दलित समुदायावर अन्याय अत्याचार होत असतो,पारशी समाज हा आपल्या देशात सायलेंट झोनमध्ये आहे
पारशी माणसाशी लग्न केले हा मुद्दा नसुन भांडवल करायला माझ्याकडेही मुद्दे आहेत.. मी पण बोंबा मारु शकते की मी पारशी माणसाशी लग्न केलेली "स्त्री" आहे म्हणुन तुम्ही मला बोलु देत नाही. तेव्हा चिंधी मुद्दे घेऊन राजकारण तुम्हालाच करता येते असे नाही. मी पण करु शकते.. असा त्याचा अर्थ वाटला.. वरच्या लेखात, "मुस्लिमांवर आपल्या देशात अन्याय आणि अत्याचार झाले आहेत" असे वाक्य आहे. कोणते अत्याचार? मला अजिबातच काही क्लिक होत नाहीये.. मुस्लिम आणि अत्याचार म्हणलं की मला, मुघलवगैरे लोकांनी कसे हिंदुवर अत्याचार केले इ महाराजांच्या काळातल्या गोष्टीच आठवतात. नंतर तर इंग्रजच आले अत्याचाराची गादी चालवायला. मग मुस्लिमांवर कुणी अत्याचार केले? (अवांतर - उच्च वर्णीयांनी इतर जातींवर अन्याय केला. त्याचप्रमाणे मग मुस्लिम राज्यकर्त्यांनी सुद्धा इतर धर्मांवर केलाच ना? मग आपल्याला पण आरक्षण मिळायला हवे का? प्रश्न प्रामाणिक आहे. कुठलीही खोच नाही.) रोहित वेमुला प्रकरणाबद्दल मलाच मुद्दलात नीट माहिती नाही म्हणुन त्यांनी लिहीलेला प्रतिवाद चांगला की वाईट ते ठाऊक नाही. रामायण आणि महाभारत हे सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचे आहेत. त्यांचा धार्मिकतेशी संबंध कसा लावता येइल? असं तर काहीही शिकवणं अवघड होईल. तर मुद्दा एवढाच आहे की फिल्मी डायलॉग असले तरी स्मृती इराणींचे भाषण उपरोक्त लेखापेक्षा बरेच चांगले होते. लेख अजिबातच बुद्धिगामी वाटला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

या भाषणाचा बुद्धीगामी

श्रीगुरुजी
Fri, 02/26/2016 - 14:18 नवीन
या भाषणाचा बुद्धीगामी प्रतिवाद इथे वाचनात आला. -
बुद्धीगामी? हहपुवा संपूर्ण लेखात निव्वळ निधर्मांध गरळ ओकली आहे. अर्थात निधर्मांध गरळ म्हणजेच बुद्धीगामी लेखन असेल तर मात्र आमची माघार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मॅडमचा आवेशच तसा होता

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 02/26/2016 - 20:57 नवीन
मॅडमचा आवेशच तसा होता.कोणत्याही आवेशपूर्ण भांडणात स्त्री अधिक खुलते. ने सुरू होणारा प्रतिसाद बुद्धीगामी आहे यात संशय तो काय !!!??? =)) =)) =)) बाकी चित्रफितीतले असंख्य मुख्य मुद्दे सोडून तीन अन्यथा दुर्लक्षण्याजोगे (पण भारतिय राजकारणात बसणारे) मुद्दे शोधून काढणार्‍या काकदृष्टीची आणि त्यावर... मी संपूर्ण फीत बघितली नाही. जे मोती चटकन सापडले ते लिहिले. असा डिस्क्लेमर म्हणजे सबळ पुराव्याविशी केलेल्या शास्त्रिय वादविवादाची परिसीमाच म्हणावी लागेल =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मॅडमचा आवेशच तसा होता

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 02/26/2016 - 21:55 नवीन
मॅडमचा आवेशच तसा होता.कोणत्याही आवेशपूर्ण भांडणात स्त्री अधिक खुलते. अन्यथा प्रखर स्त्रीपुरुषसमानतावादी असलेल्या व्यक्तींनी एखादा चष्मा चढवला की त्यांना वरच्या वाक्यातला लैंगिक ध्वन्यर्थ (sexist overtones) दिसेनासा होतो आणि स्त्रीपुरुषसमानतावाद मागच्या बेंचवर बसायला जातो हे पाहून अतीव दु:ख झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

स्मृती ईराणी

चेक आणि मेट
Fri, 02/26/2016 - 07:27 नवीन
सडेतोड
  • Log in or register to post comments

मिश्किल

पॉइंट ब्लँक
Fri, 02/26/2016 - 07:43 नवीन
If I had mentioned Chanakya, I would be accused of being ‘saffron’, hence I quoted a Roman.
हा सगळ्यात मोठा षटकार होता :)
  • Log in or register to post comments

छान भाषण

प्रदीप साळुंखे
Fri, 02/26/2016 - 08:04 नवीन
स्मृती ईराणींबाबत फारसं चांगलं मत नव्हतं,पण अलिकडे ते मत बदललयं. (आपलं मत आपणच बदलू शकतो)
  • Log in or register to post comments

आस्वाद

कपिलमुनी
Fri, 02/26/2016 - 08:58 नवीन
विकांतास वेळ काढून या भाषणाचा आस्वाद घेण्यात येईल
  • Log in or register to post comments

अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा

बाळ सप्रे
Fri, 02/26/2016 - 13:18 नवीन
अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहित होतील.
व
कोणत्याही प्रकारची सारवसारव न करता, मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी याचा सुंदर वस्तुपाठ
याबाबतीत साशंकता आहे. आता सामान्य माणसाच्या दृष्टीने दोन्ही गोष्टी मिडीयाच पोहोचवते व आजकाल सत्याच्या अपलापाबद्दल मिडीया व सर्वच राजकीय पक्ष कुप्रसिद्ध असल्याने नक्की कोणती माहिती विश्वासार्ह हे सांगू शकत नाही. दोन्हीकडून या भाषणातील मुद्द्यांवर परस्पर विरोधी गोष्टी वाचायला मिळाल्या आहेत. आणि शीर कापून अर्पण करणे, गंगेत वाहीलेल्या अस्थिही भारत माता की जय म्हणतील अशा आवेशाने झालेच तर भाषणाची विश्वासार्हता कमीच झाली माझ्यालेखी. त्यामुळे " मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?" याचे उदाहरण म्हणजे हे भाषण म्हणावे ही माझ्यालेखी अतिशयोक्तीच !
  • Log in or register to post comments

बरं.

बोका-ए-आझम
Fri, 02/26/2016 - 14:07 नवीन
या आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

मुद्दे चांगले मांडले. खरे की

पिलीयन रायडर
Fri, 02/26/2016 - 15:58 नवीन
मुद्दे चांगले मांडले. खरे की खोटे ह्याची पडताळणी होऊ शकतेच. पुरावेही दाखवले त्यांनी अनेक ठिकाणी... पण
आणि शीर कापून अर्पण करणे, गंगेत वाहीलेल्या अस्थिही भारत माता की जय म्हणतील अशा आवेशाने झालेच तर भाषणाची विश्वासार्हता कमीच झाली माझ्यालेखी.
ह्यामुळे मी सुद्धा ह्या भाषणाला वस्तुपाठ वगैरे म्हणणार नाही. ते डायलॉग नसते तर खरंच अजुन जास्त भावलं असतं भाषण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

काल रात्री ऐकले हे पूर्ण भाषण

उगा काहितरीच
Fri, 02/26/2016 - 13:34 नवीन
काल रात्री ऐकले हे पूर्ण भाषण ! काय तर बोलल्या स्मृती इराणीबाई ! जबरदस्त ! पहिले भाजपाचे महिला नेतृत्व म्हणून केवळ सुषमा स्वराज्य यांचे नाव समोर येत होते. पण आता स्मृतीबाईंचेही नाव घ्यायला हरकत नाही. रच्याकने माझी ना एक इच्छा आहे, राहुल गांधी , कपिल सिब्बल, सोनिया गांधी , नरेंद्र मोदी, अरूण जेटली, सुषमा स्वराज वगैरे यांनी एका मंचावर चर्चा करावी. व ती पूर्ण चर्चा लाइव्ह असावी .
  • Log in or register to post comments

अगागा!

पैसा
Fri, 02/26/2016 - 14:06 नवीन
तियानमेन चौकातले रणगाड्यासमोर उभे राहिलेले विद्यार्थी आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

ऑप्शन

पगला गजोधर
Fri, 02/26/2016 - 13:59 नवीन
भाजपच्या अंतर्गत, सुषमा स्वराजेतर गटाला, एक चांगली महिला प्रवक्ता मिळाली, इथे पक्षाचे महिला-प्रतिनिधित्व, म्हणजे मला म्हणावयाचे आहे, की प्रत्येक राजकीय पक्षात काही प्रातिनिधिक नेते असतात. काल्पनिक उदा. रामदास आठवले यांना मंत्रिमंडळात सामील केले तर, एखादा पक्ष सांगू शकतो की, आम्ही दलितांना सत्तेत सहभागी केले… मुख्तारअब्ब्बास नक़्वि यांना महत्वाचे पद दिले (पक्षांतर्गत किंवा सरकार मध्ये ) तर, एखादा पक्ष सांगू शकतो की, आम्ही अल्पसंख्यांकाना सहभागी केले… हे अशे प्रकार सर्वच पक्ष करतात, इथे, माननीय स्मृती यांच्या भाषणामुळे, सुषमा स्वराज यांच्यावर असलेली पक्षाचे महिला-प्रतिनिधित्व करण्याचा बोजा बराच हलका झालाय. म्हणजे पूर्वी पक्षाला जिथे स्वराज यांचाच विचार करावया लागत असेल, तिथे आता दुसरा विकल्प सुद्धा त्यांना उपलब्ध झालाय.… म्हणजेच उदा. उद्या जर सुषमाजी स्वराज यांना काही कारणाने काही जबाबदारी घेता आली नाही किंवा पक्षाला त्यांना कार्यबाहुल्यामुळे आणखी जबाबदारी द्यायची नसेल, तर ऑप्शन तयार झालाय… अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे
  • Log in or register to post comments

सुरेख भाषण

पैसा
Fri, 02/26/2016 - 14:25 नवीन
पूर्वी लोक नेत्यांच्या भाषणांना गर्दी करत. आताचे नेते कैच्या कै बोलतात. ताजे उदाहरण म्हणजे आनंद शर्मा आणि तृणमूल काँग्रेसने या भाषणात जे एन यु मधील दुर्गादेवीच्या अपमानकारक उल्लेखाचा उल्लेख केला म्हणून स्मृतीला धारेवर धरले आहे. बरेच दिवसांनी व्यवस्थित मुद्देसूद भाषण ऐकायला मिळाले. हल्ली अशी भाषणेही दुर्मिळ आहेत. त्यासाठी स्मृतीचे कौतुक.
  • Log in or register to post comments

स्मृती इराणींचे संसदेतले

श्रीगुरुजी
Fri, 02/26/2016 - 14:31 नवीन
स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण युट्युबवर पाहिले. ते खाली पाहता येईल...
इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद! स्मृती इराणींचे भाषण अत्यंत जबरदस्त व तडाखेबंद होते. त्यांच्या भाषणामुळे आपण घायाळ होणार हे आधीच ओळखून खांग्रेसींनी आधीच पलायन केले होते. "मला संसदेत बोलून दिले जाणार नाही. माझ्या बोलण्याला ते घाबरतात" असे संसदेबाहेर विनोदी तारे तोडणारे राहुल गांधी या विषयावर संसदेत अजून बोललेच नाहीत. ऑगस्ट २०१५ मध्ये ललित मोदी प्रकरणावरून सुषमा स्वराजांनी असेच आक्रमक व तडाखेबंद भाषण करून खांग्रेसींना घायाळ करून सोडले होते. या भाषणावरून त्या भाषणाची आठवण झाली. मला वाटते की यापुढे कोणत्याही वादग्रस्त प्रश्नावर बोलण्यासाठी भाजपने फक्त या दोघींनाच पुढे करावे. त्यांच्या भाषणापुढे खांग्रेसींची फॅ फॅ उडेल.
  • Log in or register to post comments

स्मृती इराणींचे भाषण चांगले

प्रतापराव
Fri, 02/26/2016 - 14:32 नवीन
स्मृती इराणींचे भाषण चांगले झाले मलाही आवडले होते पण आजच त्यांच्या भाषणातला डॉक्टरांशी संबंधित मुद्दा खोटा असल्याची बातमी वृत्तपत्रात आलीय. त्यामुळे भाषणाचे सादरीकरण उत्तम पण मुद्दे खोटे असे व्हायला नको
  • Log in or register to post comments

हम्म

माहितगार
Fri, 02/26/2016 - 17:27 नवीन
शक्यय ज्युडीशिअल कमिशन सरकारने बसवले आहे, संसद सदस्यांनी मागितले असते तर संसदीय समितीसुद्धा नेमण्याशिवाय नमो सरकारला गत्यंतर राहीले नसते त्यात अशा सर्व बारकाव्यांची चौकशी होऊ शकते. एक मात्र खरे की अपघात स्थळावरील मृतदेह ताब्यात घेण्यास पोलीसांना विरोधकरणे, चौकशीच्या आधीच तपासाची दिशा नव्हे तर राजकीय उद्देशाने कुणाची तरी नावे संशयीत म्हणून जोडायला लावणे हे ही स्पृहणीय नसावे. ह्याच नाही इतरही केसेस मध्ये जमाव पोलीसांना त्यांच्या कामात व्यत्यय आणताना दिसतात ते योग्य नसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव

पोलिसांना विरोध

विकास
Fri, 02/26/2016 - 20:37 नवीन
The protest had lasted all night and prevented the cops from taking the body for post mortem. (डिएनए इंडीया)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

डॉक्टरांचा मुद्दा

विकास
Fri, 02/26/2016 - 20:22 नवीन
डॉक्टरांच्या मुद्द्याबाबत त्यांना चूक ठरवले जात आहे आणि त्यावरून प्रश्न विचारणे योग्य देखील आहे. पण ती horrific युट्युब क्लिप बघत असताना काही वेगळेच प्रश्न पडले. आत्महत्या अथवा आत्महत्येचा प्रयत्न हा भारतात कायदेशीर गुन्हा आहे. त्याला ज्या पद्धतीने फासावरून काढून बेडवर ठेवले होते, ते नक्की कधी झाले? कारण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांनी चेक केले त्या आधी साधारण २ तास आधीच त्याचा मृत्यू झाला होता. त्या चित्रफितीत किमान एक पोलीस दिसतो पण न्यायालयात सादर केलेल्या पोलीस रिपोर्टप्रमाणे "... an unruly mob of students did not even allow police to take out Vemula's body to carry out the investigation." Image removed. जर पोलीस रिपोर्ट पण खरा असेल (अजून पर्यंत माझ्या माहितीप्रमाणे त्यावर कोणी आक्षेप घेतलेला नाही) तर मग हा पोलीस तिथे कसा उभा राहू शकला? त्या व्यतिरीक्त आता बाहेर आलेल्या बातमीनुसार तो दलीत नव्हता. दुर्दैवाने त्या असण्या-नसण्याने त्याचा जीव परत येणार नाही. पण हा मुद्दा आपल्याकडे कायद्यामुळे महत्वाचा आहे. कारण दलितांवरील अत्याचाराला वेगळ्या प्रकारे हाताळले जाते. जर हे खरे असले की तो दलीत नाही, तर ह्या कांगावखोर डाव्यांना आणि काँग्रेसला पण, या प्रसंगात समाजात जातियता माजवायला कारणीभूत आहेत म्हणून जाहीर करायला हवे. (तसे अधुनिक जातियतेचे विष पसरवण्यासाठी तेच कारणीभूत आहेत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव

विकासजी

बोका-ए-आझम
Fri, 02/26/2016 - 22:17 नवीन
मला वाटतं आत्महत्या हा आता गुन्हा मानला जात नाही.या सरकारने हा कायदा बदललेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

आत्मह्त्येचा प्रयत्न हा

मृत्युन्जय
Tue, 03/01/2016 - 11:47 नवीन
आत्मह्त्येचा प्रयत्न हा गुन्हा आहे पण आत्महत्य यशस्वी झाली तर तो गुन्हा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

हत्या की आत्महत्या ?

गामा पैलवान
Fri, 02/26/2016 - 23:14 नवीन
विकास, माझा अंदाज आहे की रोहितची हत्या झालेली आहे आणि त्याचा मृतदेह नंतर फासावर टांगलेला आहे. हे षड्यंत्र उघड होऊ नये म्हणून पोलिसांना पुढील तपासास अटकाव केला गेला. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

स्मृती इराणीं बद्दल

अद्द्या
Fri, 02/26/2016 - 16:55 नवीन
स्मृती इराणीं बद्दल सुरुवातीला माझे स्वतः मत हि हेच होते कि दुसरं कोणी तरी शिकलेल माणूस तिथे हवा होता. पण गेल्या काही महिन्यात त्यांनी केलेलं काम आणि वेळोवेळी विरोधकांचे पुराव्यासकट केलेली चिरफाड बघून माझं मत बदललंय. काम तर त्या करतातच पण त्यांची राजकीय समज जबरदस्त आहे. आणि कधीही पुराव्या विना बोलत नाहीत. हो. आता शीर कापून ठेवेन इत्यादी भावनेच्या ओघात बोलून गेल्या .. पण ते कधीही "one morning i woke up at night" चांगलंच बाकी ज्यांनी कालच्या भाषणावरून त्यांना "अजुनी नाटक करणारी बाई " वगेर म्हणलं ते बघून खरोखर वाईट वाटलं . कोन्ग्रेस ने खरं तर सदनात हि चर्चा करून जमिनीवर शांत पडलेल्या कुऱ्हाडी वर तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. या भाषणाबरोबर अनुराग ठाकूर यांचं भाषण . .आणि काल राज्यसभेत पुन्हा एकदा इराणी आणि जेटली याचं भाषण हि ऐका. जबर उत्तर दिली आहेत
  • Log in or register to post comments

माणुस

नाखु
Fri, 02/26/2016 - 17:09 नवीन
शिकलेला का न शिकलेला (म्हणजे किती उच्चशिक्षीत वगैरे) यावर काहीच नसावे. असे मला वाटते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

जरूर. .तेच त्या साबित करत

अद्द्या
Fri, 02/26/2016 - 17:24 नवीन
जरूर. .तेच त्या साबित करत आहेत रोज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

स्मृती इराणी

बोका-ए-आझम
Fri, 02/26/2016 - 18:05 नवीन
सोनिया गांधींपेक्षा नक्कीच जास्त शिकलेल्या आहेत.
  • Log in or register to post comments

लो हँगिंग फ्रूट

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 02/26/2016 - 19:22 नवीन
हा चीप शॉट आहे. रागा सगळ्याच बाबतीत आणि सोगा हिंदी, शिक्षण इ. बाबतीत 'लो हँगिंग फ्रूट' आहेत. सोगांपेक्षा जास्त शिक्षण (आणि रागांपेक्षा कोणत्याही बाबतीत हुशार) ही काही प्रशंसा होऊ शकत नाही. (हे म्हणजे दुसरीतल्या दोन उजव्या मुलांना डाव्या हाताने लिहायला सांगायचं आणि त्या हस्ताक्षराची तुलना करायची इतपत ढिसाळ आहे.) मनमोहन सिंग, माँटेक सिंग अहलुवालिया, चिदंबरम्‌, कपिल सिब्बल, असे बरेच उच्चशिक्षित लोक दुसऱ्या बाजूला तुलना करायला आहेत. भाजपचे जेटली, जेठमलानीही उच्चशिक्षित आहेत. (आणखीही असतीलच; मला चटकन आठवले नाहीत.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

नवजातीयता

विकास
Fri, 02/26/2016 - 19:37 नवीन
हे उच्चशिक्षित प्रकरण जे डावे आणि त्यांच्या जवळची प्रसार माध्यमे आणतात त्यातून मला पुर्विच्या काळातला जातिय वर्चस्व आणायचा प्रकार आढळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

बोका-ए-आझम हे डावे आणि(/किंवा

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 02/26/2016 - 21:33 नवीन
बोका-ए-आझम हे डावे आणि(/किंवा) त्यांच्या जवळच्या प्रसारमाध्यमांपैकी एक असल्याचं मला माहीत नव्हतं. या माहितीचा मला काही उपयोग नाही; पण जंक माहितीमुळे नुकसान होत नाही. तेव्हा आभारच. जाती आणि शिक्षण यांच्यात फरक असल्याचं समजणं हे माझ्या लेखी शहाणपणाचं लक्षण आहे. जात जन्मामुळे मिळते, शिक्षण हे कर्तृत्व असतं. जात बदलता येत नाही, शिक्षण (आणि व्यवसाय) बदलता येतात. (स्मृती इराणी यांनाही actor-turned-politician म्हटलं जातं.) (आता मी शहाणपणा-wisdom याबद्दल बोलत्ये. यात शिक्षण, औपचारिक प्रमाणपत्रं यांचा संबंध नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

जाती आणि शिक्षण यांच्यात फरक

अनुप ढेरे
Fri, 02/26/2016 - 21:49 नवीन
जाती आणि शिक्षण यांच्यात फरक असल्याचं समजणं हे माझ्या लेखी शहाणपणाचं लक्षण आहे.
सहमत आहे. शिक्षण हे ओव्हररेटेड आहे हा समज धोकादायक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

जात नाही ती जात

विकास
Fri, 02/26/2016 - 22:30 नवीन
जात जन्मामुळे मिळते हे फारच पुरातन मत झालं. ;) मी जरा माडर्न इच्चार करतोय. म्हणून कालानुरूप जात म्हणजे काय हे सांगत होतो आणि अजूनही सांगत आहे. स्मृती इराणी यांनाही actor-turned-politician म्हटलं जातं यालाच मी नवजातीयतावाद म्हणतोय. जसे कर्ण हा अंगराज झाला तरी त्याला सूतपुत्र म्हणले जायचे. आता सूतपुत्र ही काही जात नव्हती. आता तसेच सतत इराणीबाईंना actor turned ... म्हणणे चालू आहे. त्यावेळेस तसे हिणावणारे पुरूष हे एका बाईबद्दल लिंगभेद करत बोलत आहेत असे म्हणले जात नाही कारण इराणीबाईंची जात ही अ‍ॅक्टींग आहे अस म्हणणे आणि बिंबवणे महत्वाचे असते. तेच त्या मणिशंकर अय्यरंनी "चायवाला" म्हणून पाहीले. त्यावेळेला ते ओबिसी ला हिणावतात असे म्हणले जात नाही. कारण त्यावेळेला मोदींची जात ही चायवाला करणे गरजेचे असते. आता कॉफी प्यायला पण घाबरतात ते सोडा. असे म्हणणार्‍यांमधे स्वतःच्या शिक्षणाचा एक अहंगंड आहे आणि सातत्याने इतरांच्या मनात बिंबवायचे असते की समोरची व्यक्ती ही काही राजकारणी नाही तर कोणी तरी अडाणी आहे. आणि अडाणी का? कारण कोणीतरी जातीने बुद्धीवादी असलेला तसे म्हणतो म्हणून? आणि हा शहाणपणा? बरं गंमत अशी की असल्या चमच्यांचे बर्‍याचदा बॉसेस काही शिकलेले असतात का तर तिथे देखील बोंब... काही माध्यमांचे मालक उच्चशिक्षित नसलेले शेटजी असतात ते वार्ताहारांना (खर्‍या अर्थाने चांगल्या) लायकीप्रमाणे घेतात पण नंतर आपल्याला काय हवे ते मांडायला सांगतात... तसेच सोनिया-राहूल सारख्या शिक्षणाच्या बाबतीत संभ्रम असलेल्यांच्या हाताखाली अय्यर, सिब्बल सारखे काम करतात. जे हवे तसे बोलतात-वागतात. तेंव्हा कमी अथवा झिरो शिक्षण ही जात नसते तर त्यांचे गांधी हे आडनावच जात झालेले असते.. मग "अर्थस्य पुरुषो: दासः" म्हणा अथवा "ब्राम्हणं भोजनं प्रियं" म्हणा काही कारणाने हे नवउच्चजातीय आरत्या ओवाळत स्वतःच्या पोळ्या भाजून घेतात. म्हणूनच त्याला मी नवजातीयता असे म्हणले आहे. जात केवळ जन्मानेच येते असे नाही. केवळ हिंदू आणि हिंदू धर्मातून धर्मांतर केलेल्यांनी पाळलेल्या पक्षि: भारतभरच्या समाजातच आहे असे नाही. सर्वत्रच आहे. ती सध्याच्या काळात समोरच्याला कमी दाखवण्यासाठी वापरलेले एक समाजवादी-साम्यवादी शस्त्र आहे. त्याचा सातत्याने वापर केला जातो, जसा हवा तसा आणि जेथे हवा तेथे...कधी क्लासकॉन्फ्लिक्ट म्हणत तर कधी कास्टकॉन्फ्लिक्ट म्हणत. बेसिकली कॉन्फ्लिक्ट पेटवत ठेवायचे आणि त्यावर आपल्या पोळ्या भाजायच्या हा उद्योग. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

एक निरिक्षण

अनुप ढेरे
Fri, 02/26/2016 - 22:43 नवीन
इराणींना रेफर करताना अ‍ॅक्टर टर्ण्ड पॉलिटिशिअन म्हणतात. तसं सोनियांना बार गर्ल टर्ण्ड पॉलिटिशिअन म्हणायला सुरुवात केली वार्ताहरांनी तर लिबरलांची काय रिअ‍ॅक्षन असेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

असं नाही म्हणायचं!

विकास
Fri, 02/26/2016 - 23:04 नवीन
इराणीबाई फक्त स्टारप्लस वर बहु होत्या. सोनिया मॅडम ह्या गांधी घराण्याच्या म्हणजे तमाम देशाच्या बहू आहेत! ;) या बहूस नावे ठेवलीत तर तमाम राष्ट्रनिष्ट काँग्रेसजनांचे बाहू फुरफुरतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

बहूत विनोद करते हो तुम

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 02/26/2016 - 23:07 नवीन
बहूत विनोद करते हो तुम विकासदा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

बोका-ए-आझम हे डावे आणि(/किंवा

हाडक्या
Fri, 02/26/2016 - 22:34 नवीन
बोका-ए-आझम हे डावे आणि(/किंवा) त्यांच्या जवळच्या प्रसारमाध्यमांपैकी एक असल्याचं मला माहीत नव्हतं. या माहितीचा मला काही उपयोग नाही; पण जंक माहितीमुळे नुकसान होत नाही. तेव्हा आभारच.
इथे बिटविन द लाईन जे सांगू पाहताय तेही "अ‍ॅड होमिनेम" नाही का हो ताई ?
जाती आणि शिक्षण यांच्यात फरक असल्याचं समजणं हे माझ्या लेखी शहाणपणाचं लक्षण आहे. जात जन्मामुळे मिळते, शिक्षण हे कर्तृत्व असतं. जात बदलता येत नाही, शिक्षण (आणि व्यवसाय) बदलता येतात. (स्मृती इराणी यांनाही actor-turned-politician म्हटलं जातं.) (आता मी शहाणपणा-wisdom याबद्दल बोलत्ये. यात शिक्षण, औपचारिक प्रमाणपत्रं यांचा संबंध नाही.)
याबद्दल नक्कीच सहमत. तुम्ही काय म्हणायचंय ते थोडक्यात मुद्देसूद लिहिता हे आवडलं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

इथे बिटविन द लाईन जे सांगू

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 02/26/2016 - 22:54 नवीन
इथे बिटविन द लाईन जे सांगू पाहताय तेही "अ‍ॅड होमिनेम" नाही का हो ताई ?
नाही. कारण १. मी अर्धवट मस्करी करत होते. २. बोका-ए-आझम जे म्हणत आहेत त्याला समांतर, पण 'कुठे त्या खातेऱ्यात हात घालायचा' असं म्हणत्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा