स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण यूट्यूबवर पाहिले. ते खाली पाहता येईल...
हे इथे टाकण्यामागे दोन उद्देश आहेत...
१. या भाषणातून सध्या गरमागरम चर्चा चालू असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबादमधील विद्यापीठ आणि मध्यवर्ती सरकारच्या अखत्यारीत येणार्या इतर सर्व विद्यापीठांसंबंधी अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहीत होतील.
२. कोणत्याही प्रकारची सारवसारव न करता, मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी याचा सुंदर वस्तुपाठ म्हणावे असे हे भाषण आहे. तेव्हा तशी सकारात्मक चर्चा करू इच्छिणार्यांसाठी यातून शिकण्यासारखे खूप काही आहे.
.
प्रतिक्रिया
2 Mar 2016 - 5:14 pm | श्री गावसेना प्रमुख
अहो साहेब तो आमदार नाहीये।बातमी परत वाचा बरं
2 Mar 2016 - 5:16 pm | होबासराव
किंबहुना कोण्यातरी आमदाराला कधीतरी रेपसाठी शिक्षा झाली आहे का?
होउ शकत का नाहि होउ शकत. गेले काहि महिने विद्यापिठातिल घटनांमुळे जो दबाव सरकार वर बनवल्या जात आहे त्याच्या निम्मा जरि दबाव / ति उर्जा आपण आशि घटना घडल्यावर जर वापरलि तर सरकार मधिल कोणाचि ताकत नाहि होणार असल्या निच माणसाला वाचवायचि. पण इथे प्रॉब्लेम हा आहे कि प्रत्येक समुहाचे डोके कधि आणि कुठे भडकवायचे आणि त्याचा राजकिय फायदा कसा करुन घ्यायचा हे प्रत्येक राजकिय पक्षाला चांगले माहि झालेय, त्यामुळे त्या त्या पक्षाचा कार्यकर्ता फक्त कार्यकर्ता म्हणुनच मिरवतो तो ज्या दिवशि अशा घटनांकडे एक सामान्य माणुस म्हणुन बघेल तो सुदिन.
मला तरि दिल्लित झालेले आंदोलन हे भारतिय इतिहासातले पहिले अस उदाहरण वाटत होते जिथे खरच सामान्य माणसाचि उर्जा न्याय मिळण्यासाठि वापरलि होति. पण कालांतराने त्या आंदोलनाचा फायदा एका अश्या धुर्त माणसाने घेतला कि आता लोक अश्या कुठल्या आंदोलनाला पाठिंबा देतिल कि नाहि शंका आहे.
2 Mar 2016 - 5:34 pm | तर्राट जोकर
मुद्दा होऊ शकते चा नसून झाली का असा आहे. बाकी सहमत अगदी.
पक्षाचे कार्यकर्ते माणूस-नागरिक म्हणून वावरतील तो सुवर्णक्षण असेल. अन्यथा अगदी खूनाच्या आरोपातुन शिक्षा भोगुन आलेल्या नेत्याचे कार्यकर्ते जंगी स्वागत करतात ह्या देशात. बाकी तर सार्या स्वप्नांच्या बाता सम्जुया.
2 Mar 2016 - 4:33 pm | गॅरी ट्रुमन
आता तर दस्तुरखुद्द जे.एन.यु नेच स्मृती इराणी संसदेत खरे तेच बोलल्या असे म्हटले आहे. नक्की काय चालू आहे समजत नाही.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/smriti-irani-was-right-in-...
2 Mar 2016 - 11:10 pm | श्रीगुरुजी
ते होणारच होतं. स्मृती इराणींनी लोकसभेत भाषण करताना सर्व अधिकृत कागदपत्रे बरोबर आणली होती. त्याच्याच आधारावर त्यांनी भाषणात विरोधकांना झोडपून काढलं.
2 Mar 2016 - 4:47 pm | होबासराव
सेम शो गेले तिन दिवस झाले पाकिस्तानात हि सुरु आहे, थोडाफार बदल आहे म्हणायला पण मुळाशी विचारधारा तिच आहे.
3 Mar 2016 - 1:28 am | विवेक ठाकूर
नौटंकी न करण्याबद्दल समज !
3 Mar 2016 - 12:27 pm | श्रीगुरुजी
वरील लिंकमधील खालील परिच्छेद -
आणि http://maharashtratimes.indiatimes.com/nation/smriti-irani-was-right-in-... या बातमीतील खालील परिच्छेद -
हे दोन्ही परिच्छेद नीट वाचले तर कोण खरे बोलतेय व कोण खोटे बोलतेय हे अगदी उघड आहे.
3 Mar 2016 - 12:36 pm | श्रीगुरुजी
अजून एक संदर्भ -
JNU Endorses Smriti Irani's Documents, Says Pamphlets Were Put up in Campus
याच बातमीतून -
“Our University’s internal security records authenticate that such kinds of pamphlets were put up in the campus in 2014. The documents presented by the HRD minister were correct according to our records and the same has been conveyed to the ministry” JNU Registrar Bhupinder Zutshi told Express.
Irani while giving clarification about her ministry's stringent action on 'Anti-National' forces, had last week read out a pamphlet in Parliament, which the student oranisers of the event later denied having issued alleging that the minister quoted from "half-cooked facts".
“In fact a complaint was also registered regarding the same” Zutshi said further.
आता अश्वमुखातून बाहेर आलेल्या या सत्यावर विश्वास ठेवायचा का एशियन एज च्या असत्यकथनावर विश्वास ठेवायचा हा ज्याच्या त्याच्या प्रवृत्तीचा प्रश्न आहे.
3 Mar 2016 - 7:49 am | श्री गावसेना प्रमुख
जे अफजल आणि इशरत च्या बचावात अपनी जान झोक रहे है ,ते मोदींच्या जाळ्यात अलगद अडकले आहेत, पुढची निवडणूक देशभक्त vs देशद्रोही , कर चले हम फिदा जान ओ तन साथियों अब तुम्हारे हमारे हवाले वतन साथियों आत्ताचे बाकी साथी तर वतन विकायला निघाले आहेत।