मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
25 Feb 2016 - 9:34 pm

स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण यूट्यूबवर पाहिले. ते खाली पाहता येईल...

हे इथे टाकण्यामागे दोन उद्देश आहेत...

१. या भाषणातून सध्या गरमागरम चर्चा चालू असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबादमधील विद्यापीठ आणि मध्यवर्ती सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या इतर सर्व विद्यापीठांसंबंधी अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहीत होतील.

२. कोणत्याही प्रकारची सारवसारव न करता, मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी याचा सुंदर वस्तुपाठ म्हणावे असे हे भाषण आहे. तेव्हा तशी सकारात्मक चर्चा करू इच्छिणार्‍यांसाठी यातून शिकण्यासारखे खूप काही आहे.

.

राजकारणशिक्षणविचारप्रतिक्रियाबातमी

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Feb 2016 - 7:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा चीप शॉट आहे. रागा सगळ्याच बाबतीत आणि सोगा हिंदी, शिक्षण इ. बाबतीत 'लो हँगिंग फ्रूट' आहेत. सोगांपेक्षा जास्त शिक्षण (आणि रागांपेक्षा कोणत्याही बाबतीत हुशार) ही काही प्रशंसा होऊ शकत नाही. (हे म्हणजे दुसरीतल्या दोन उजव्या मुलांना डाव्या हाताने लिहायला सांगायचं आणि त्या हस्ताक्षराची तुलना करायची इतपत ढिसाळ आहे.)

मनमोहन सिंग, माँटेक सिंग अहलुवालिया, चिदंबरम्‌, कपिल सिब्बल, असे बरेच उच्चशिक्षित लोक दुसऱ्या बाजूला तुलना करायला आहेत. भाजपचे जेटली, जेठमलानीही उच्चशिक्षित आहेत. (आणखीही असतीलच; मला चटकन आठवले नाहीत.)

विकास's picture

26 Feb 2016 - 7:37 pm | विकास

हे उच्चशिक्षित प्रकरण जे डावे आणि त्यांच्या जवळची प्रसार माध्यमे आणतात त्यातून मला पुर्विच्या काळातला जातिय वर्चस्व आणायचा प्रकार आढळतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Feb 2016 - 9:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बोका-ए-आझम हे डावे आणि(/किंवा) त्यांच्या जवळच्या प्रसारमाध्यमांपैकी एक असल्याचं मला माहीत नव्हतं. या माहितीचा मला काही उपयोग नाही; पण जंक माहितीमुळे नुकसान होत नाही. तेव्हा आभारच.

जाती आणि शिक्षण यांच्यात फरक असल्याचं समजणं हे माझ्या लेखी शहाणपणाचं लक्षण आहे. जात जन्मामुळे मिळते, शिक्षण हे कर्तृत्व असतं. जात बदलता येत नाही, शिक्षण (आणि व्यवसाय) बदलता येतात. (स्मृती इराणी यांनाही actor-turned-politician म्हटलं जातं.) (आता मी शहाणपणा-wisdom याबद्दल बोलत्ये. यात शिक्षण, औपचारिक प्रमाणपत्रं यांचा संबंध नाही.)

अनुप ढेरे's picture

26 Feb 2016 - 9:49 pm | अनुप ढेरे

जाती आणि शिक्षण यांच्यात फरक असल्याचं समजणं हे माझ्या लेखी शहाणपणाचं लक्षण आहे.

सहमत आहे. शिक्षण हे ओव्हररेटेड आहे हा समज धोकादायक आहे.

विकास's picture

26 Feb 2016 - 10:30 pm | विकास

जात जन्मामुळे मिळते

हे फारच पुरातन मत झालं. ;) मी जरा माडर्न इच्चार करतोय. म्हणून कालानुरूप जात म्हणजे काय हे सांगत होतो आणि अजूनही सांगत आहे.

स्मृती इराणी यांनाही actor-turned-politician म्हटलं जातं

यालाच मी नवजातीयतावाद म्हणतोय.

जसे कर्ण हा अंगराज झाला तरी त्याला सूतपुत्र म्हणले जायचे. आता सूतपुत्र ही काही जात नव्हती. आता तसेच सतत इराणीबाईंना actor turned ... म्हणणे चालू आहे. त्यावेळेस तसे हिणावणारे पुरूष हे एका बाईबद्दल लिंगभेद करत बोलत आहेत असे म्हणले जात नाही कारण इराणीबाईंची जात ही अ‍ॅक्टींग आहे अस म्हणणे आणि बिंबवणे महत्वाचे असते. तेच त्या मणिशंकर अय्यरंनी "चायवाला" म्हणून पाहीले. त्यावेळेला ते ओबिसी ला हिणावतात असे म्हणले जात नाही. कारण त्यावेळेला मोदींची जात ही चायवाला करणे गरजेचे असते. आता कॉफी प्यायला पण घाबरतात ते सोडा.

असे म्हणणार्‍यांमधे स्वतःच्या शिक्षणाचा एक अहंगंड आहे आणि सातत्याने इतरांच्या मनात बिंबवायचे असते की समोरची व्यक्ती ही काही राजकारणी नाही तर कोणी तरी अडाणी आहे. आणि अडाणी का? कारण कोणीतरी जातीने बुद्धीवादी असलेला तसे म्हणतो म्हणून? आणि हा शहाणपणा?

बरं गंमत अशी की असल्या चमच्यांचे बर्‍याचदा बॉसेस काही शिकलेले असतात का तर तिथे देखील बोंब... काही माध्यमांचे मालक उच्चशिक्षित नसलेले शेटजी असतात ते वार्ताहारांना (खर्‍या अर्थाने चांगल्या) लायकीप्रमाणे घेतात पण नंतर आपल्याला काय हवे ते मांडायला सांगतात... तसेच सोनिया-राहूल सारख्या शिक्षणाच्या बाबतीत संभ्रम असलेल्यांच्या हाताखाली अय्यर, सिब्बल सारखे काम करतात. जे हवे तसे बोलतात-वागतात. तेंव्हा कमी अथवा झिरो शिक्षण ही जात नसते तर त्यांचे गांधी हे आडनावच जात झालेले असते.. मग "अर्थस्य पुरुषो: दासः" म्हणा अथवा "ब्राम्हणं भोजनं प्रियं" म्हणा काही कारणाने हे नवउच्चजातीय आरत्या ओवाळत स्वतःच्या पोळ्या भाजून घेतात.

म्हणूनच त्याला मी नवजातीयता असे म्हणले आहे. जात केवळ जन्मानेच येते असे नाही. केवळ हिंदू आणि हिंदू धर्मातून धर्मांतर केलेल्यांनी पाळलेल्या पक्षि: भारतभरच्या समाजातच आहे असे नाही. सर्वत्रच आहे. ती सध्याच्या काळात समोरच्याला कमी दाखवण्यासाठी वापरलेले एक समाजवादी-साम्यवादी शस्त्र आहे. त्याचा सातत्याने वापर केला जातो, जसा हवा तसा आणि जेथे हवा तेथे...कधी क्लासकॉन्फ्लिक्ट म्हणत तर कधी कास्टकॉन्फ्लिक्ट म्हणत. बेसिकली कॉन्फ्लिक्ट पेटवत ठेवायचे आणि त्यावर आपल्या पोळ्या भाजायच्या हा उद्योग.

असो.

अनुप ढेरे's picture

26 Feb 2016 - 10:43 pm | अनुप ढेरे

इराणींना रेफर करताना अ‍ॅक्टर टर्ण्ड पॉलिटिशिअन म्हणतात. तसं सोनियांना बार गर्ल टर्ण्ड पॉलिटिशिअन म्हणायला सुरुवात केली वार्ताहरांनी तर लिबरलांची काय रिअ‍ॅक्षन असेल?

विकास's picture

26 Feb 2016 - 11:04 pm | विकास

इराणीबाई फक्त स्टारप्लस वर बहु होत्या. सोनिया मॅडम ह्या गांधी घराण्याच्या म्हणजे तमाम देशाच्या बहू आहेत! ;) या बहूस नावे ठेवलीत तर तमाम राष्ट्रनिष्ट काँग्रेसजनांचे बाहू फुरफुरतील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Feb 2016 - 11:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

बहूत विनोद करते हो तुम विकासदा :)

हाडक्या's picture

26 Feb 2016 - 10:34 pm | हाडक्या

बोका-ए-आझम हे डावे आणि(/किंवा) त्यांच्या जवळच्या प्रसारमाध्यमांपैकी एक असल्याचं मला माहीत नव्हतं. या माहितीचा मला काही उपयोग नाही; पण जंक माहितीमुळे नुकसान होत नाही. तेव्हा आभारच.

इथे बिटविन द लाईन जे सांगू पाहताय तेही "अ‍ॅड होमिनेम" नाही का हो ताई ?

जाती आणि शिक्षण यांच्यात फरक असल्याचं समजणं हे माझ्या लेखी शहाणपणाचं लक्षण आहे. जात जन्मामुळे मिळते, शिक्षण हे कर्तृत्व असतं. जात बदलता येत नाही, शिक्षण (आणि व्यवसाय) बदलता येतात. (स्मृती इराणी यांनाही actor-turned-politician म्हटलं जातं.) (आता मी शहाणपणा-wisdom याबद्दल बोलत्ये. यात शिक्षण, औपचारिक प्रमाणपत्रं यांचा संबंध नाही.)

याबद्दल नक्कीच सहमत. तुम्ही काय म्हणायचंय ते थोडक्यात मुद्देसूद लिहिता हे आवडलं. :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Feb 2016 - 10:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

इथे बिटविन द लाईन जे सांगू पाहताय तेही "अ‍ॅड होमिनेम" नाही का हो ताई ?

नाही. कारण १. मी अर्धवट मस्करी करत होते.
२. बोका-ए-आझम जे म्हणत आहेत त्याला समांतर, पण 'कुठे त्या खातेऱ्यात हात घालायचा' असं म्हणत्ये.

बोका-ए-आझम's picture

26 Feb 2016 - 10:57 pm | बोका-ए-आझम

बोका-ए-आझम हे डावे आणि(/किंवा) त्यांच्या जवळच्या प्रसारमाध्यमांपैकी एक असल्याचं मला माहीत नव्हतं. या माहितीचा मला काही उपयोग नाही; पण जंक माहितीमुळे नुकसान होत नाही. तेव्हा आभारच.

अभ्यास वाढवा हो ताई असं म्हणालो असतो. पण तुम्ही काय तेवढ्या महत्वाच्या नाहीत. So काय समजायचं ते समजा.

विवेकपटाईत's picture

26 Feb 2016 - 8:28 pm | विवेकपटाईत

काय ताई गम्मत करतायत का. या उच्च शिक्षित लोकांनी देशाचे किती दिवाळे काढले आहे. माहित आहे का? त्या पेक्षा अडाणी बारा, मोठा घोटाळा करू शकणार नाही.

माहितगार's picture

26 Feb 2016 - 8:57 pm | माहितगार

:)

माहितगार's picture

26 Feb 2016 - 8:41 pm | माहितगार

दोन्ही शॉट चुकीचे हे बरोबर, पण टेनिस मध्ये पहिल्याने चुकीचा शॉट मारला आणि दुसर्‍याने नुसता परतवला तरी परतवलेला शॉट हकनाक चुकीचा दिसतो ! काय म्हणता.

अनुप ढेरे's picture

26 Feb 2016 - 9:46 pm | अनुप ढेरे

मोंटेकसिंग अहलुवालिया हे मंत्री नव्हते. कींबहुना काँग्रेसचे देखील नव्हते कधी. आणि जयंत सिन्हा हे नाव गूगल करा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Feb 2016 - 11:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बरोबर. पण काँग्रेसच्या मर्जीतले जरूर असावेत.

मुद्दा एवढाच होता की कोणाच्याही शिक्षणाची तुलना करायची असेल तर दोन दहावी-बारावी लोकं का निवडावीत? चांगली शिकलेली लोकं निवडावीत. कोणाची रेघ लहान ही स्पर्धा करणं प्रतिगामी आहे. कोणाची रेघ मोठी याची स्पर्धा करावी.

माहितगार's picture

26 Feb 2016 - 11:54 pm | माहितगार

कोणाची रेघ लहान ही स्पर्धा करणं प्रतिगामी आहे. कोणाची रेघ मोठी याची स्पर्धा करावी.

आदर्श विचार आहे, पण लोकशाहीच्या नाण्याला अधिक कंगोरे असावेत,

१) लोकशाहीत सरपंच शाळेच्या मुख्याधापकापेक्षा अधिक, महापौर कॉलेजच्या प्राचार्यापेक्षा अधिक, राज्याचा शिक्षणमंत्री विद्यापिठाच्या कुलगुरुपेक्षा अधिक, केंद्रीय शिक्षण मंत्री युजीसीच्या चेअरमनपेक्षा अधिक शिकलेला असण्याची अपेक्षा करत बसण्यात अर्थ नाही.

२) त्याच वेळी राजकारणातल्या लोकांच्या क्षमतांप्रमाणेच मर्यांदांची चर्चा होण्यात गैरही नाही.

३) कुणाला मंत्री नेमायचे हा पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो, स्मृती इराणींपेक्षा सुषमा स्वराजांकडे हे खाते आधिक शोभले असते असे मला नेहमीच वाटते, तरीही एकदा मंत्रि केल्या नंतर जास्त राळ उडवण्यात पॉईंट नसावा तरीही राळ उडवली गेली. या बाबतीत छोटी रेष ओढण्याचा खेळ भाजपा समर्थकांनी चालू केलेला नाही ते फक्त चेंडू परतवत आहेत. दोन्ही बाजूला वेगवेगळ्या लेव्हलचे समर्थक असतात ते त्यांच्या त्यांच्या पातळीवर त्यांच्या त्यांच्या लेव्हलचे चेंडू परतवत असतात.

बोका-ए-आझम's picture

26 Feb 2016 - 10:20 pm | बोका-ए-आझम

हा चीप शॉट आहे.

कसा काय? ही वस्तुस्थिती आहे.

माहितगार's picture

26 Feb 2016 - 11:38 pm | माहितगार

अहो बोका बाईसाहेब म्हनत्यात तुमी नकारात्मक गोष्टी का दाखीवता ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Feb 2016 - 1:20 am | डॉ सुहास म्हात्रे

...आणि दाखवायच्याच झाल्या तर आमच्या सोईच्या गोष्टी (आणि सोईच्या नसल्या तर सोईच्या करून मगच) दाखवा :)

माहितगार's picture

27 Feb 2016 - 10:47 am | माहितगार

:)

सुमीत भातखंडे's picture

26 Feb 2016 - 7:20 pm | सुमीत भातखंडे

मिलिंद धुमाळे यांचा लेख वाचला.
रामायण/महाभारत कार्टूनच्या माध्यमातून शिकविले जाणे किंवा हिंदू धर्मातील सण साजरे केले जाणे ह्याला भगवी करण म्हणायचं असेल तर कठीण आहे.

विकास's picture

26 Feb 2016 - 8:47 pm | विकास

वेमुलाच्या न मिळालेल्या फेलोशिपवरून देखील आरडाओरडा चालू आहे, जणू काही ती मुद्दामून दिली नव्हती. पण आत्ता शोधत असताना टाईम्स ऑफ इंडीया मधे एक वेगळीच बातमी दिसली जी इतर कुठल्या माध्यमांमधे पटकन तरी दिसली नाही... खाली ती बातमी जशीच्या तशी चिकटवत आहे...

HYDERABAD: Four days after his suicide, it has now come to the fore that the delay in disbursement of Rohith Vemula's fellowship money was due to a confusion over two junior research fellowships (JRFs) that he secured during two different years. Vemula used to receive Rs 25,000 every month as fellowship, but this grant stopped in July 2015.

In his suicide note, Vemula stated he hadn't received his fellowship money for the past seven months. University officials in a report to the HRD ministry state that Vemula had first qualified for a fellowship for two years between July 7, 2012, and June 6, 2014. He cancelled his course in July 2013 and again qualified for a fellowship in March 2014.

Since Vemula had been paid in excess in his first fellowship, UoH had to seek clarification from the UGC on whether "such fellowship can be allowed" and for what period. This, according to them, compounded the confusion.

थोडक्यात त्याची फेलोशिप ही जुल्य २०१२ ते जुने २०१४ होती. पण त्याने त्या कार्यक्रमातून २०१३ मधेच अंग काढले. पण त्याला फेलोशिप मात्र ती ग्रँट संपेपर्यंत म्हणजे जुलै २०१५ पर्यंत मिळालेली होती. पण तो या कार्यक्रमात जवळपास आठ नऊ महीने नसताना (जुलै २०१३ ते मार्च २०१४) देखील त्याला पैसे मिळत होते. त्यामुळे अधिक पैसे आधीच दिले गेले असल्याने नवीन पैशाचे अकाउंटींग कसे करायचे हा प्रश्न होता...

हा मुद्दा कुणाच्याही बाबतीत होऊ शकला असता. अमेरीकन विद्यापिठात तर ग्रँट मधेच संपली अथवा समर मधे मिळाली नाही तर मुलांना कुठलीही कामे करावी लागतात...त्याचा गाजावाजा होत नाही. बरं या जागी कुणी अभाविपचा विद्यार्थी असता ज्याला आधीच ९ महीने जास्तीचे पैसे दिले हे बाहेर आले असते तर काय ठणाणा केला असता!

sagarpdy's picture

26 Feb 2016 - 8:55 pm | sagarpdy

धन्यवाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Feb 2016 - 9:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्पीच आवडलं मला, बाकी चालु द्या.

-दिलीप बिरुटे

तर्राट जोकर's picture

26 Feb 2016 - 10:44 pm | तर्राट जोकर

सोनिया गांधींवर यथेच्छ अगदी खालच्या दर्जाची टिका करणार्‍यांना स्मृती इराणींवरची वरच्या दर्जाची टिकाही बिल्कूल सहन होत नाही हे पाहून गंमत वाटते.

विकास's picture

26 Feb 2016 - 10:59 pm | विकास

खालच्या दर्जाची टिका

कृपया व्याख्या आणि सोनियांच्या बाबतीतली उदाहरणे देता का? जर खालच्या दर्जाची टिका असली तर ते अयोग्यच म्हणायला हवे.

आणि अ‍ॅक्टर टर्न असे सारखे हिणावणे ही उच्च दर्जाची टिका कशी ते देखील सांगितले तर बरे होईल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Feb 2016 - 11:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि अ‍ॅक्टर टर्न असे सारखे हिणावणे ही उच्च दर्जाची टिका कशी ते देखील सांगितले तर बरे होईल.

आधी एक कन्फेशन - मी 'सांस भी कभी बहू थी' किमान काही आठवडे बघितलं आहे.

आता पुढे. १. प्रीती झिंटाचा उल्लेख actor-turned-businessperson असा होतो. व्यक्तीच्या सीव्हीचा सारांश देण्याची ही पद्धत मलातरी चूक वाटत नाही.

२. स्मृती इराणीला अभिनेत्री म्हणणं हा मला अभिनयाचा अपमान वाटतो. कॅमेऱ्यासमोर किंवा स्टेजवर उभं राहिलेली प्रत्येक व्यक्ती अभिनय करते असं मला वाटत नाही.

३. बॉक्सर-टर्न्ड-खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल एकेकाळी बॉक्सर होता हा उल्लेख अपमानव्यंजक वाटतो का? का?

४. अभिनय करणं हे खालच्या दर्जाचं काम वाटतं का? (मला वाटत नाही.)

विकास's picture

26 Feb 2016 - 11:19 pm | विकास

भलतेच बै तुम्ही गंमतीशीर!
थांकु थांकू

व्यक्तीच्या सीव्हीचा सारांश देण्याची ही पद्धत मलातरी चूक वाटत नाही.
राजीव गांधींना पायलट टर्न्ड पंतप्रधान म्हणल्याचे आठवत नाही...अजून एक महत्वाचे आत्ताच्या जॉबसाठी त्याचा काय संदर्भ आहे तिथपर्यंतच सिव्हीचा संबंध असतो. नाहीतर उद्या बालवाडीतला विद्यार्थी टर्न्ड म्हणत खूपच टर्निंग पॉईंट घेत बसावे लागेल. गोविंदा खासदार असताना अथवा वैजंयंतीमालाला देखील असे म्हणले गेले नाही. मला कल्पना आहे की गोविंदाच्या बाबतीत ती बाब गोपनीय ठेवणे महत्वाचे असेल म्हणून बोलले गेले नसेल. पण तो वेगळा मुद्दा झाला.

स्मृती इराणीला अभिनेत्री म्हणणं हा मला अभिनयाचा अपमान वाटतो. कॅमेऱ्यासमोर किंवा स्टेजवर उभं राहिलेली प्रत्येक व्यक्ती अभिनय करते असं मला वाटत नाही.

मी त्यांचा अभिनय पाहीलेलाच नाही. त्यामुळे त्या संदर्भात नो कॉमेंट्स.

बॉक्सर-टर्न्ड-खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल एकेकाळी बॉक्सर होता हा उल्लेख अपमानव्यंजक वाटतो का? का?
विकीवर हबल टेलीस्कोप बद्दल लिहीताना The telescope is named after the astronomer Edwin Hubble. असे लिहीले आहे. The telescope is named after the boxer turned astronomer Edwin Hubble असे नाही. असो.

अभिनय करणं हे खालच्या दर्जाचं काम वाटतं का? (मला वाटत नाही.)

अजिबात नाही. कुठलेच काम कमी दर्जाचे नसते. कमी दर्जाचे असेलच तर तसे इतरांच्या बाबतीत दाखवणारी वृत्ती... जी (हिन वृत्ती) ही माध्यमे इराणीबाईंच्या बाबतीत सातत्याने दाखवत आली आहेत. कारण त्यांना काहीही करून त्या पॉलिटीशिअन नाहीत हे जनतेच्या डोक्यात बिंबवायचे आहे. तुमच्यासाठी साधे असेल हो, पण तसे नाही केले तर पुढच्या वेळेस अमेठीला काही खरे नाही ही भिती आहे ना!

मुळात दोघींवर (अथवा कोणावरही) अशी खालच्या दर्जाची टिका का करावी ? ( आता ते तिथे अभिव्यक्ती-स्वातंत्र्य वगैरे मध्ये येते का ते वेगळे तरीपण तशी टिका अमान्यच ).
हे सांगून तुम्हाला विचारतो की इथे एकाची रेघ कमी दाखवून दुसर्‍याची मोठी कशाला दाखवायचीय ? (तुमच्या काही प्रतिसादातून "तुम्ही केलं तेव्हा कसं चाललं मग आता का " असा सूर जाणवला आधीही आणि एका ठिकाणी सुहास म्हात्रेंनी तुम्हाला त्यावर एकाची चूक दाखवून दुसर्‍याच्या चुकीची तीव्रता कमी होत नाही अशा काहीश्या अर्थाचा प्रतिसादही दिला होता. तरीही सांगू पाहतोय )

चांगलं लिहिणार्‍यांसाठीही तटस्थपणे साधा विचार इतका कठीण का असावा ? म्हणजे इराणीबाईंवर केलेल्या आरोपाचं तिनं मुद्देसूद खंडन (ते कितपत बरोबर चूक तो मुद्दा वेगळा ) तेही संसदेसारख्या जबाबदार व्यासपीठावर केलं आणि त्यातल्या मुद्देसूदपणाबद्दल इथे कोणी लिहिलं. यावर इतकं काय व्हावं असं वाटून गेलं.

(सकल सामाजिक दांभिकतेची चीड असलेला आणि सध्या सगळीकडे तीच बजबजलेली पाहणारा)

तर्राट जोकर's picture

26 Feb 2016 - 11:43 pm | तर्राट जोकर

मुळात दोघींवर (अथवा कोणावरही) अशी खालच्या दर्जाची टिका का करावी ? ( आता ते तिथे अभिव्यक्ती-स्वातंत्र्य वगैरे मध्ये येते का ते वेगळे तरीपण तशी टिका अमान्यच ).
>> सहमत. तीव्रपणे.

मी कुठल्याही पक्षाचा समर्थक नाही. कुणाच्याही चुका दाखवून आपल्या चुका जस्टीफाय करणे मला व्यक्तिशः आवडत नाही. पण जेव्हा कोणी असे करतो तेव्हा त्याला त्याच्या पुर्वकर्मांची आठवण करुन त्यांचा दांभिकपणा उघडा पाडणे मला आवडते. भाजपसमर्थकांना असे उघडे पडणे आवडत नाही, त्यांची गेल्या दोन वर्षांपासून "तुम्ही केलं तेव्हा कसं चाललं मग आता का " हीच भूमिका आहे तरी तोच प्रश्न त्यांना विचारला की कळवळतात.

मिपावर कुणी काँग्रेससमर्थक नाही, असला तरी इथे पक्षाची बाजू मांडायला येत नाही किंवा ते दुर्लक्ष करतात. भाजपसमर्थकांचे तसे नाही, कुठे कोणी जराशी माचिसची काडी पेटवली तरी अख्खं फायर ब्रिगेड घेऊन पोचतात.(उदा> व्यवच्छेदक लक्षणांचे दोन्ही धागे, बडोदा डायनामाईट प्रतिसादावर काँग्रेसच्या आणीबाणीच्या उल्लेखाचा अतिरेकी, उताविळ, अनावश्यक आग्रह). फारच असुरक्षिततेची भावना. असो.

(सकल सामाजिक दांभिकतेची चीड असलेला आणि सध्या सगळीकडे तीच बजबजलेली पाहणारा)
>> सेम हीअर.

बोका-ए-आझम's picture

26 Feb 2016 - 11:11 pm | बोका-ए-आझम

दिलेल्या प्रतिसादाबद्दल बोलत असाल, तर बार गर्ल या व्यवसायाला कमी लेखताय असं वाटत नाही का? जे स्मृती इराणींना actor turned politician म्हणतात त्यांचंही अभिनेत्री या व्यवसायाबद्दल असंच संकुचित मत असेल.

तर्राट जोकर's picture

26 Feb 2016 - 11:25 pm | तर्राट जोकर

रे भगवान! ढेरेंचा प्रतिसाद वाचला नव्हता. तरी दोन्ही प्रतिसाद आलेत ते बरेच झाले. असो.

सोनिया गांधींबद्दल एकूण भाजपसमर्थकांकडुन ज्या दर्जाच्या टिका, विनोद ऐकलेत ते आठवून आता इराणींबद्दलची टीका सहन होत नाही हे दांभिक आहे. -हे निरिक्षण इथल्या कुठल्याही सदस्याच्या सोनियागांधींबद्दल्च्या टिप्पणीबद्दल नाही-

अश्लाघ्य टीका केली नव्हती. खुद्द नरेंद्र मोदींनी केली नव्हती. मां-बेटे की सरकार वगैरे राजकीय टीका असेल पण मर्यादा सोडून नव्हती. स्मृती इराणींवरही सगळ्या काँग्रेसवाल्यांनी अश्लाघ्य टीका केलेली नाही. ज्यांनी केलीय त्यांची मनोवृत्ती समजून येतेच - कुठलाही पक्ष असला तरीही. मात्र नरेंद्र मोदींबद्दल मौत का सौदागर वगैरे टीका सोनिया गांधींनी केली होती. तो त्यांचं भाषण लिहिणाऱ्याचा दोष समजू आपण एक वेळ.

तर्राट जोकर's picture

26 Feb 2016 - 11:57 pm | तर्राट जोकर

पुढचा प्रतिसाद लिहण्याआधी शब्दाचे घोळ होउ नये म्हनुन वाक्य नीट मांडतो.

सोनिया गांधींबद्दल भाजपसमर्थकांकडुन एकूण ज्या दर्जाच्या टिका, विनोद ऐकलेत

बोकाभाऊ, अंगावर यायला लागलं की शब्दांचे खेळ खेळणे, जबाबदार्‍यांपासून पळणे भाजपसमर्थकांसाठी नवीन नाही. तुम्हीही तेच कराल तर कसे चालेल?

माझ्या प्रतिसादात नसलेला सगळे भाजपचे लोक असा शब्दसमुह वापरुन तुम्ही तर्काने किल्ला लढवताय. मी सगळे भाजपचे लोक असे म्हटलेच नाही. भाजप म्हणजे निव्वळ नरेंद्रमोदी नाही. प्रत्येक गोष्टीत नरेंद्रमोदी आणल्याशिवाय चैन पडत नाही असे भाजपविरोधकांबद्दल बोलले जाते, भाजपसमर्थकही वेगळं काय करतात?

सोनिया गांधींबद्दल एकूण भाजपसमर्थकांकडुन ज्या दर्जाच्या टिका, विनोद ऐकलेत ते आठवून आता इराणींबद्दलची टीका सहन होत नाही हे दांभिक आहे. -हे निरिक्षण इथल्या कुठल्याही सदस्याच्या सोनियागांधींबद्दल्च्या टिप्पणीबद्दल नाही-

हा असा उल्लेख वाचल्यावर मी दिलेला प्रतिसाद आहे. नंतर तुम्ही दिलेला प्रतिसाद तब्बल अर्ध्या तासाने (११.५७) ला आहे. मधल्या काळात माझा प्रतिसाद प्रकाशित झाला आणि तुम्ही त्यावरून निष्कर्ष काढून मोकळे झालात. बाकी काही नाही, त्यावरून माझं - लोक आपलं मत आधीच बनवतात आणि मग त्या अनुषंगाने माहिती process अाणि interpret करतात - हे म्हणणं सिद्ध होतं.

तर्राट जोकर's picture

27 Feb 2016 - 10:54 am | तर्राट जोकर

मी फक्त माझ्या प्रतिसादावर आलेल्या तुमच्या प्रतिसादाबद्दल, व आपल्याच दोघांमधे होत असलेल्या चर्चेबद्दल बोलत आहे. इतर कुठे काय प्रतिसाद दिला त्याचा संबंध नाही. तुम्ही ज्या पद्धतीने मुद्दा मांडताय व गरज नसलेले तपशील (सगळे पक्षवाले) आणून मूळ मुद्द्याला बगल मार्ताय ते बघून मी बोलतोय. इथे टिका विरूद्ध टिका एवढाच विषय आहे. तीची पातळी दोन्ही पक्षसमर्थक ओलांडतात व तसे केल्याबद्दल एकमेकांविरूद्ध दांभिक आरोप करतात एवढेच निरिक्षण आहे. तुम्ही तिथे मोदी वैगरे आणायचे तसे काही कारण नव्हते. तुमचेच वाक्य तुम्हालाही लागू होतंय. असो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Feb 2016 - 1:27 am | डॉ सुहास म्हात्रे

तो त्यांचं भाषण लिहिणाऱ्याचा दोष समजू आपण एक वेळ.

आता तुमच्यावर चीप शॉट केल्याचा आरोप होणार ;) =))

सहजच "५० करोड की गर्लफ्रेंड" आठवला.

ते अश्लाघ्य / असंसदीय/ किंवा पर्सनल नव्हता का बोकाभाउ ?

बोका-ए-आझम's picture

27 Feb 2016 - 7:25 am | बोका-ए-आझम

काँग्रेसने केली त्या मानाने तो फारच सौम्य होता. आणि पुन्हा तेच - ती वस्तुस्थिती आहे. बाकी तुम्हाला ती टीका बोचण्याचं कारण काय? तुम्ही राहुलजींचे भक्त आहात की काय?

बोकाभाऊ.. ते मुद्द्याचे आणि त्यातल्या त्यात "प्रिन्सिपली" कोण बरोबर आहे ते बोलत आहेत.

आता तुमचे तितकेच वाक्य पकडून "त्यांनी केले म्हणून यांनी केले ते बरोबर ठरते का?" "भक्त असेल तरच टीका बोचावी का?" असले प्रतिवाद येतील.

हे म्हणजे त्यांनी १० वैयक्तीक हल्ले केले की "ते तसलेच आहेत म्हणून सत्तेवर नाहीत" आणि यांनी एक प्रत्युत्तर दिले की "बघा तुमची पण पार्टी चुका करते" असे न संपणारे आणि वरकरणी योग्य पण निरूपयोगी युक्तीवाद सुरू होतात.

कपिलमुनी's picture

27 Feb 2016 - 1:35 pm | कपिलमुनी

तुम्हाला ती टीका बोचण्याचं कारण काय? तुम्ही राहुलजींचे भक्त आहात की काय?

मी कोणाचाही भक्त नाही.आणि टीका मला बोचण्याचे कारण नाही.
तुम्ही अश्लाघ्य टीकेचा उल्लेख केलात म्हणून उदाहरण दिला.
एखाद्या स्रीची पैशाशी तुलना कोणत्याही परीस्थिती मधे चुकीचाच! ( किंमत ठरवल्याप्रमाणे)
कॉंग्रेसने पातळी सोडली म्हणुन मोदींनी सोडली तर दोघेही चूकच !
दुसऱ्याच्या मोठ्या चुकीमुळे मोदींची चूक योग्य ठरत नाही. जसा मोदींच्या पत्नीचा उल्लेख चुकीचा असेल तर शशी थरुर यांच्या पत्नीचाही उल्लेख चुकीचाच.
आता तुम्ही पण मोदींची प्रत्येक गोष्ट बरोबरच म्हणत असाल तर भक्त कोण हे उघड आहे.

सनी लिओन वर पेटणारे मिपाकर या प्राईस टॅगींग ला सपोर्ट करतात हे पाहून आश्चर्य वाचले

Gujarat Chief Minister Narendra Modi on Monday took potshots at Union Minister Shashi Tharoor's personal life, saying his wife was once his "50-crore-rupee girlfriend", a day after he made a comeback in the Union Cabinet reshuffle.

"Wah kya girlfriend hai. Apne kabhi dekha hai 50 crore ka girlfriend? (What a girlfriend? Have you ever seen a 50-crore girlfriend), Modi said at an election rally, in an apparent attack on Tharoor's wife Sunanda Pushkar.

"There was a Congress leader who was a minister. He was accused of amassing wealth from cricket. He had said in Parliament that he is not connected to the Rs 50 crore in the lady's name," the BJP stalwart said in an apparent reference to Tharoor in the context of the IPL cricket controversy involving Pushkar in 2010 which led to his resignation as Minister of State for External Affairs minister.

Modi, however, did not take any names.

"...And then girlfriend becomes wife, we learn some time later...the issues are still not settled and he (Tharoor) is now made a minister," the chief minister said.

हा संदर्भ शशी थरुर यांच्यावर २०१० मध्ये आलेल्या कोची टस्कर्स या आयपीएल संघासंबंधित जे भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते त्यावर होता. तेव्हा सुनंदा पुष्कर यांच्यासाठी थरुर यांनी या संघात १०% sweat equity मागितली होती. ही sweat equity नंतर ५% एवढी निर्धारीत करण्यात आली. त्यानंतर शशी थरुर यांना ते सुनंदा पुष्कर यांना proxy म्हणून वापरत असल्याच्या आरोपावरुन राजीनामा द्यावा लागला. त्यावरून हा शब्दप्रयोग मोदींनी केला.
त्यावर थरुर यांची प्रतिक्रिया होती - My wife is worth much more than Modi's imaginary fifty crores. In fact, she is priceless. For Mr.Modi to understand that, he will have to love someone.

म्हणजे शशी थरुर यांनाही हा शेरा अपमानास्पद वाटला नव्हता. आता त्या स्त्रीच्या पतीला हा अपमान वाटला नव्हता आणि तुम्हाला वाटतो म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे.

तर्राट जोकर's picture

27 Feb 2016 - 1:54 pm | तर्राट जोकर

बाकी तुम्हाला ती टीका बोचण्याचं कारण काय? तुम्ही राहुलजींचे भक्त आहात की काय?

>> आपल्याला तुमच्यासारखे हुच्च हुच्च विधानं करता येत नाही पण थोडा कॉमन सेन्स आहे. राहुलजींचे भक्त असले तरच ती टिका बोचावी अन्यथा नाही असे म्हणून तुम्ही शशी थरुर यांच्या पत्नीबद्दलचे मोदींचे उद्गार समर्थनीय ठरवत आहात. शिवाय ते सौम्य का तीव्र हे तुमच्या इच्छेवर ठरतंय. काँग्रेसजनांच्या स्त्रिया ह्या मान देण्यालायक नाहीत हेच तुमच्या विधानातून सूचित होतंय.

गामा पैलवान's picture

26 Feb 2016 - 11:38 pm | गामा पैलवान

विक्षिप्त आदिती,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला.

मटाचा हवाला देऊन तुम्ही म्हणताय :

>> स्मृती इराणी चक्क फेकंफाक करत होत्या.

रोहितच्या जवळ डॉक्टर पोहोचले नाहीत ही कसली हो फेकंफाक? याची भाऊ तोरसेकरांनी बरोब्बर पिसं काढली आहेत. त्यांच्या लेखाचा सारांश असा की रोहितची आत्महत्या ही राज्य शासनाच्या अखत्यारीत येते. रोहितची बातमी कळल्यावर बाईंनी राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याशी संपर्क साधला. ते कामात व्यग्र असल्याने संपर्क होऊ दिला नाही. मग त्यांनी रावांच्या कन्येशी संपर्क साधला. ती खासदार आहे. तिथेही काही माहिती मिळाली नाही. तेव्हा इराणी बाईंनी पोलिसांना कामाला लावलं. तर विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या कामात हस्तक्षेप सुरू केला (किंवा अगोदरपासूनच केला होता).

त्याचं काय आहे की, सामान्य जनतेला उपरोक्त सारांशातले बिंदू जोडून खरं चित्रं पुरं करता येतं. असोत बाई खोट्या. लोकांना मात्र खऱ्यात रस आहे.

आ.न.,
-गा.पै.

तर्राट जोकर's picture

27 Feb 2016 - 12:02 am | तर्राट जोकर

वेमुलाप्रकरण काही काल घडलं नाही. प्रकरणाचा योग्यप्रकारे तपास जणू झालाच नाही असे मंत्र्यांच्या उत्तरावरुन वाटले. केंद्रसरकारच्या खात्याला जर संसदेत उत्तर द्यायला लागतंय तर ती जबाबदारी त्यांचीच आहे, राज्यशासनाकडून योग्य माहिती घेणेही. ब्लेमगेम खेळण्यात व त्यामागे लपण्यात उपयोग नाही. मंत्र्यांची उत्तरं जर खात्रीशीर माहितीवर आधारित नसतील तर जनतेने कुणाकडे दाद मागायची? गृहमंत्र्याचे सईदट्वीटबद्दलची फजिती काही जुनी नाहीच.

तजो,

>> मंत्र्यांची उत्तरं जर खात्रीशीर माहितीवर आधारित नसतील तर जनतेने कुणाकडे दाद मागायची?

मलाही नेमकं हेच म्हणायचं होतं. रोहितच्या बाबतीत स्थानिक राज्य शासन उदासीन आहे. म्हणून केंद्र शासनास त्यात लक्ष घालावं लागतंय.

आता राज्य शासनाने योग्य माहिती पुरवली नाही म्हणून तेलंगणात राष्ट्रपती राजवट लागू करायची का? की पुरवलेली माहिती बिनमहत्त्वाची (=insignificant) आहे म्हणून दुर्लक्ष करायचं? इराणीबाईंनी दुसरा मार्ग चोखाळला तर एव्हढा गहजब का?

आ.न.,
-गा.पै.

विकास's picture

27 Feb 2016 - 2:12 am | विकास

भाऊ तोरसेकरांनी बरोब्बर पिसं काढली

भाऊ तोरसेकर हे बुद्धीवादी नाहीत. त्यामुळे मधल्याकाळात काही जणांनी चाल खेळून त्यांचे फेसबुकचे अकाउंटपण गोठवून घेतले होते. अर्थात त्याला विचारस्वातंत्र्याची गळचेपी म्हणायच काम नाय! ते बुद्धीवादी नाहीत त्यामुळे त्यांना विचारस्वातंत्र्य नाही! ;)

आत्ता एक लेख वाचनात आला की माध्यमे इराणीबाईंच्या कशी विरुद्ध आहेत ते... त्यातील खालचा भाग खूप बोलका वाटला:

In his book The Unforeseen President, John Perry writes: If you say nothing masscom will pillory you. If you dodge it, masscom will chase you. If you do not know the answer, it will place a dunce cap on your head. If you make an error, it will play that sound bite again and again until the whole world is laughing at you. If you misstate something it will mock you endlessly. If you apologise for the mistake it will project you as weak and flip flopping. If you argue you will be portrayed as thin-skinned…if you hit the right answer the masscom geniuses will crucify you for your gall."

प्रतापराव's picture

27 Feb 2016 - 11:08 am | प्रतापराव

राजकारणात शिक्षणाला महत्व जास्त नसते ह्यात तथ्य आहे.मात्र मानव संसाधन ह्या महत्वाच्या मंत्रिपदासाठी साधी पदविधर व्यक्ति भाजपासारख्या राष्ट्रिय पक्षाकडे असु नये हे दुर्दैवाचे आहे.एक काल्पनिक उदाहरण....एखादा गुंड राजकारणात जातो निवडुन येतो.पुर्वायुष्यात पोलिसांकडुन मार खाल्लेला असुनही नंतर ग्रुहमंत्री होउन पोलिसांकडुन सलाम ठोकुन घेतो हे जितके दुर्दैवि असेल तितकेच वरचे उदाहरन
दुर्दैवि आहे

lakhu risbud's picture

27 Feb 2016 - 11:49 am | lakhu risbud

उचलली जीभ लावली टाळ्याला !

तर्राट जोकर's picture

27 Feb 2016 - 12:15 pm | तर्राट जोकर

काल्पनिक कशाला, अशी अनेक जीतीजागती उदाहरणं आहेत.

प्रतापराव's picture

27 Feb 2016 - 12:22 pm | प्रतापराव

सहमत.बोलबच्चनला भुलणारी आपली जनता आहे.मग ते कोणत्याही पक्षाचे राजकारणी असो.

आणि सदर लेख आणि भाषणाची भलामण करणारे प्रतिसाद त्याचा आदर्श वस्तुपाठ आहेत!

मार्मिक गोडसे's picture

27 Feb 2016 - 1:05 pm | मार्मिक गोडसे

राजकारणात शिक्षणाला महत्व जास्त नसते ह्यात तथ्य आहे.मात्र मानव संसाधन ह्या महत्वाच्या मंत्रिपदासाठी साधी पदविधर व्यक्ति भाजपासारख्या राष्ट्रिय पक्षाकडे असु नये हे दुर्दैवाचे आहे

परंतू, हया बाईसाहेब त्यांना दिलेले काम चोख बजावत असतील तर ?

प्रतापराव's picture

27 Feb 2016 - 3:38 pm | प्रतापराव

चांगले भाषण म्हणजे चांगला कारभार असे समिकरण असेल तर प्रश्नच नाहि. बाइंच्या कारभाराला कंटाळुन दोन चार विद्वानांनि राजिनामा दिला होता असे वाचण्यात आले होते.

तर्राट जोकर's picture

27 Feb 2016 - 6:06 pm | तर्राट जोकर

हे हे, ह्यांच्या लेखी ते विद्वान म्हणजे कॉंग्रेसचे भाट असतील, काँग्रेसच्या काळात मिळणार्‍या सवलती इराणींनी बंद केल्या म्हणून कांगावा करुन बाहेर पडले.

श्रीगुरुजी's picture

27 Feb 2016 - 11:28 pm | श्रीगुरुजी

कोण हे दोनचार विद्वान?

नाखु's picture

1 Mar 2016 - 2:06 pm | नाखु

विद्वान नव्हते राजीनामा दिल्याने झाले असावेत.
तस्मात ध्गा उद्देशावर अज्याबात चर्चा करू नये.

गॅलरी प्रेक्षक
आसन क्र १०१५

नाव आडनाव's picture

1 Mar 2016 - 2:09 pm | नाव आडनाव

जेव्हढं मला आठवतंय त्यात एक अनिल काकोडकर होते.

विवेक ठाकूर's picture

27 Feb 2016 - 1:34 pm | विवेक ठाकूर

विद्यापिठाच्या चिफ मेडिकल ऑफिसर डॉ राजश्री यांनी, विद्यार्थ्याच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यावर, काही मिनीटात तिथे पोहोचून आणि वैद्यकीय तपासणी करुन संध्याकाळी ७.२० ला तो मृत झाल्याची घोषणा केली. तशी नोंदही त्यांनी विद्यापिठाच्या हेल्थ बुकमधे केली आहे. त्यांनी लगेच कुलगुरुंना तसं कळवलं आणि त्या स्वतः तिथे पहाटे तीन वाजेपर्यंत हजर होत्या. तिथे हजर असलेल्या प्रत्येकाला ते माहिती आहे असं त्यांनी म्हटलंय.

ही वस्तुस्थिती झिकरुल्लाह निशा या विद्यार्थ्यानं स्वतंत्रपणे वेरिफाय केली आहे.

I was the person who called health center immediately after learning that Rohith Hanged in NRS hostel. Within 5 minutes CMO Health center Dr. Rajashree P has reached the spot and she checked the pulses and declared him dead. There were Telangana police also present there.
Today MHRD minister lied to entire nation that no doctor and police were allowed to check the dead body till 6:30 AM of next day.

शिवाय विद्यार्थ्याला वेळीच मदत मिळाली असती तर तो रिवाइव होऊ शकला असता वगैरे धादांत खोटी आणि निव्वळ भावनिक वक्तव्य करुन बाईंनी संसदेची (आणि देशाची) पूर्ण दिशाभूल केली आहे. डॉ राजश्रींचं हे स्टेटमंट :

“I am a medical doctor and I have enough experience and competence to examine and determine if a person can be revived. In my opinion, Rohith was dead for probably 2-3 hours by the time he was found,” said Dr P Rajshree, the university’s medical officer.

तस्मात, सदर भाषण म्हणजे लेखकाला वाटला तसा वस्तुपाठ वगैरे काही नाही. हिंदी आणि इंग्रजी बोलण्याचा बर्‍यापैकी सराव आणि भावनिक भाषणबाजी करण्याची हतोटी यापलिकडे बाईंकडे काही दिसत नाही.

बातमीची लिंक

गामा पैलवान's picture

27 Feb 2016 - 2:52 pm | गामा पैलवान

विनय ठाकूर,

तुम्ही दुवा दिलेला लेख वाचला. त्यावरून इराणीबाई अडचणीत आलेल्या वाटंत नाहीत. त्यांनी पोलिसांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अहवालाचा हवाला दिलाय. म्हणजे कोणी खोटं बोलत असेल तर ते पोलीस किंवा विद्यापीठाची नोंदवही यांपैकी आहेत.

माझा अंदाज परत सांगतो. रोहितची हत्या झालेली आहे आणि ती आत्महत्या म्हणून खपवायचा प्रयत्न चाललाय. अन्यथा स्वत: फासावर गेलेल्या रोहितला टेबलावर आडवं कोणी केलं?

आ.न.,
-गा.पै.

शिवाय डॉ राजश्रींचा रिपोर्ट खाली दिला आहे त्यात तशी शक्यता दर्शवलेली नाही.

पण मूळ मुद्दा असा आहे.....एका जवाबदार मंत्र्यानी संसदेसमोर बोलतांना, गंभीर आरोप करण्यापूर्वी किमान फॅक्ट्स पूर्णपणे वेरिफाय करायला हव्यात. त्याच्या मृत्यूची नोंद संध्याकाळी ७.३० लाच झाली आहे, अशा वेळी दुसर्‍या दिवशी सकाळी ६.३० पर्यंत विद्यार्थ्याला वैद्यकीय मदतच मिळाली नाही आणि त्याही पुढे जाऊन, तशी मदत मिळाली असती तर तो वाचू शकला असता वगैरे बोलणं म्हणजे त्या पदावर त्यांची राहाण्याची त्यांची क्षमताच प्रश्नांकित करते.

डॉ राजश्रींनी केलेल्या स्टेटमंटची तीन ठिकाणी नोंद आहे.

The entry made by Dr Rajashree in the university health centre record book is also being shared widely online. Her statement on the record book says, she received a call from university's NRS hostel at around 7.20p.m. She immediately rushed to the hostel in the ambulance and found that the body by that time had been kept on the bed. It further reads that she informed the Vice-Chancellor, Dean of Students Welfare (DSW), Registrar immediately.

आणि रिपोर्ट मधली नोंद अशी आहे :

The document reads: “Body … cold, bloody abdomen, protruding tongue, froth coming out of the mouth.” The entry also says the pupils were dilated, that there was “no heart sound” and no sounds of breathing.

प्रदीप साळुंखे's picture

27 Feb 2016 - 2:59 pm | प्रदीप साळुंखे

एक-दोन त्रुटी जरी सापडल्या तरी त्या भाषणाचं महत्व कमी होत नाही.
जेएनयु,वेमुलाप्रकरणी सरकारवर होणारी निराधार आगपाखड त्यांनी पुराव्यांसहित जोशपूर्ण आवेशात खोडून काढली आहे.

हिंदी आणि इंग्रजी बोलण्याचा बर्‍यापैकी सराव आणि भावनिक भाषणबाजी करण्याची हतोटी यापलिकडे बाईंकडे काही दिसत नाही.

नेत्यांकडे भाषणाची कला असणे कधीही चांगले असते.
अहो एका राजकीय पक्ष्याच्या फक्त म्होरक्यानं भाषण केलं कि त्यांचे 12-13 चेले सहज निवडून येतात म्हणजे बघा!!

ज्योक मारतायं काय ? भाषणाचा गाभाच फ्रॉड आहे मग त्या उर्वरित डायलॉगबाजीला (बच्चेकी माँ, विसी कुणी अपाँइट केला, शिर कापून देईन, पदावर राहाणार नाही, स्वतःच्या गंगेतल्या अस्थी काय म्हणतील... वगैरे) काय अर्थ उरतो?

प्रदीप साळुंखे's picture

27 Feb 2016 - 3:54 pm | प्रदीप साळुंखे

ओक्के,
तुमचं मत वेगळं असू शकतं.
अपना अपना स्टाईल होता है|

विवेक ठाकूर's picture

27 Feb 2016 - 4:02 pm | विवेक ठाकूर

बाई फक्त स्टाईल मारतायंत आणि स्वतःचा टिआरपी वाढवतायंत. त्यांना बाकी कशाशी देणंघेणं नाही हाच तर मुद्दा आहे !

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Feb 2016 - 5:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेखाचे शिर्शक पाहिल्यास हे ध्यानात येईल की लेखात दिलेल्या चित्रफितीतल्या प्रसंगावरच चर्चा अपेक्षित आहे.

तेव्हा त्या मृत्युसंदर्भात, काही मतप्रदर्शन करण्याअगोदर, इतर कोण काय म्हणतो आहे याऐवजी, चित्रफितीत इराणी काय म्हणाल्या ते समजण्यासाठी, ती चित्रफित पाहिली असती तर बरे झाले असते. इतकेच !

मुख्य म्हणजे, कोणत्याही कारणाने, माध्यमातले सोईचे तेवढे उचलणे जमत नसल्याने, आम्ही मूळ पुरावा (जो इथे चित्रफितीच्या स्वरूपात आहे आणि ज्यात बरेच पुरावे आहेत तो) पाहून मतप्रदर्शन केले आहे. इतर फाटे फोडण्याचा मानस/अनुभव/आवड नसल्याने... पास :)

चित्रफित तुम्ही धागा काढण्यापूर्वीच खफवर टाकली गेली होती आणि त्याच वेळी ती फार बारकाईनं पाहिली आहे.

आम्ही मूळ पुरावा (जो इथे चित्रफितीच्या स्वरूपात आहे आणि ज्यात बरेच पुरावे आहेत तो) पाहून मतप्रदर्शन केले आहे

तेच तर प्रतापरावांनी वर म्हटलंय : बोलबच्चनला भुलणारी आपली जनता आहे !

माध्यमातले सोईचे तेवढे उचलणे जमत नसल्याने...

हे तुम्ही लिहीलं नसतं तर बरं झालं असतं ! कारण त्याचं असं आहे....

नेहमी व्यक्ती मूळात कशी आहे यावर तीच्या वक्तव्याची किंमत ठरते. व्यक्ती प्रामाणिक असेल आणि भले वक्तृत्वप्रविण नसेल, तर दुसर्‍याचं अहीत कदापी करणार नाही. पण व्यक्तीच फ्रॉड असेल तर तीचं वक्तृत्व कौशल्य कितीही भूलवो, शेवटी लोकांची फसवूणच होते. अर्थात, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. तस्मात, व्यक्तीची सचोटी, तिच्या वक्तव्यापेक्षा महत्त्वाची आहे. याचा व्यत्यासही तितकाच खरा आहे, जर व्यक्तीची दुटप्पेगिरी उघडकीस आली तर आपसूकच ती अप्रमाणिक आहे हे सिद्ध होतं.

तुम्हाला वक्तव्यानं भुरळ घातली आणि आता व्यक्ती अप्रामाणिक आहे हे पुराव्यानिशी शाबित झाल्यावर, ते मान्य करायला जड जातंय.

तुमच्या म्हणण्याप्रमाणे केवळ विडिओ आणि लेखाचं शीर्षक वाचून मत बनवणं हे केवळ अशिक्षित करु शकेल. कारण बाईंकडे वक्तृत्वशैली आहे किंवा नाही हा प्रश्न गौण आहे, बाई प्रामाणिक आहेत किंवा नाही हा मुद्दा आहे. अर्थात, इतका उघड मुद्दा इतरांनाच काय थोडी दिलदारी दाखवलीत तर तुम्हाला सुद्धा मान्य होईल.

तरीही केवळ शीर्षकाबद्दल बोलायचं झालं तर मी वरती म्हटल्याप्रमाणे : `हिंदी आणि इंग्रजी बोलण्याचा बर्‍यापैकी सराव आणि भावनिक भाषणबाजी करण्याची हतोटी यापलिकडे बाईंकडे काही दिसत नाही '.

आजानुकर्ण's picture

28 Feb 2016 - 3:24 am | आजानुकर्ण

तुमचा प्रतिसाद खूप आवडला. निव्वळ त्यासाठी लॉगिन करुन प्रतिसाद द्यायला आलो. महामहोपाध्याय इराणीदेवींचे भाषण हे फार तर 'खोटे बोल पण रेटून बोल' याचा सुंदर वस्तुपाठ आहे असे म्हणता येईल.

असो. बाकी चालू द्या.

अर्धवटराव's picture

28 Feb 2016 - 10:40 am | अर्धवटराव

"अरविंद बरोदब दीड तास" जर "मैफिलीसारखा" रंगत असेल इतर सर्वकाहि (वेल..नॉट लिटरली सर्वकाहि.. फ्यु आर एक्स्म्प्टेड ;) ) पानि कम चाय वाटणारच :ड

विवेक ठाकूर's picture

28 Feb 2016 - 11:10 am | विवेक ठाकूर

पेपर वगैरे वाचत असाल तर संसदेचा प्लॅटफॉर्म वापरुन जनतेची दिशाभूल केल्याबद्दल, इराणी बाईंविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल होतोयं.

अर्धवटराव's picture

28 Feb 2016 - 11:52 am | अर्धवटराव

विषय काय आणि प्रतिसाद काय!

मलाहि नेमकं हेच वाटलं. मूळात लेख काय आणि त्यावर प्रतिसाद काय. पण मग आठवलं... न्यायदानाची हौस एका जन्मात भागत नाहि हेच खरं

विवेक ठाकूर's picture

28 Feb 2016 - 12:01 pm | विवेक ठाकूर

स्वतः लेखक निरुत्तर आहेत आणि तुम्ही विचारतायं `लेख काय आणि त्यावर प्रतिसाद काय?' तुमचे प्रतिसाद तुम्हाला कळाले तरी पुरे !

अर्धवटराव's picture

28 Feb 2016 - 12:05 pm | अर्धवटराव

धागा लेखक निरुत्तर आहे कि उपेक्षा करतोय हे कळणं फार अवघड नाहि. आणि रेडेओला कान नसल्यामुळे त्याला प्रतिसाद ऐकुच जात नाहि, त्यामुळे ते कळावे अशी आमचीही अपेक्षा नाहि.

विवेक ठाकूर's picture

28 Feb 2016 - 12:53 pm | विवेक ठाकूर

स्वतःचे प्रतिसाद स्वतःला कळतायंत का ते आधी वाचून पाहा आणि जमल्यास विषयाला धरुन बोला.

अर्धवटराव's picture

28 Feb 2016 - 1:08 pm | अर्धवटराव

पुर्वजन्मीचे संस्कार टिकुन राहातात हे जगातल्या कुठल्याच प्रयोगशाळेत सिद्ध होऊ शकत नाहि. पण मिपाची बात हि कुछ और है.

स्वतःचे प्रतिसाद स्वतःला कळतायंत का ते आधी वाचून पाहा

तुम्हाला तसं वाटणं सहाजीक आहे.

आणि जमल्यास विषयाला धरुन बोला

तुम्हाला हेही वाटणं सहाजीक आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Feb 2016 - 1:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

चालुद्या (मिपाची बँड्विड्थ वापरून) मोफतचे स्वमतांध स्वप्नरंजन आणि स्वपाठ थोपटणे... ही सवय आता सर्वांनाच माहितीची झाली आहे...

(इथे कोणी नवीन वाचक असल्यास त्यांचा गैरसमज होऊ नये यासाठीच केवळ हा प्रतिसाद प्रपंच. जुने लोक ओळखून आहेतच)

अजून कळले नसल्यास : यापुढे जर एखादा वैयक्तीक, असंबंध आणि अतीभरकटलेला असा नसलेला प्रतिसाद आला तर आणि तरच अतीआश्चर्यपूर्वक त्याची दखल घेली जाईल. तशी शक्यता खूप धूसर आहे आणि हे केवळ संशयाचा फायदा देण्यासाठी लिहिले आहे.

चला, हे पण जरूरीपेक्षा जास्त महत्व देणे झाले.

विवेक ठाकूर's picture

28 Feb 2016 - 1:57 pm | विवेक ठाकूर

जनतेची दिशाभूल केल्याबद्दल इराणी बाईंविरुद्ध सोमवारी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल होतोयं.

याबद्दल कुणाची पाठ थोपटणार?

श्रीगुरुजी's picture

28 Feb 2016 - 2:05 pm | श्रीगुरुजी

पेपर वगैरे वाचत असाल तर संसदेचा प्लॅटफॉर्म वापरुन जनतेची दिशाभूल केल्याबद्दल, इराणी बाईंविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल होतोयं.

सर्व राजवटींच्या काळात असल्या हक्कभंग प्रस्तावांना भूतकाळात केराची टोपली नशीबात आली होती आणि यावेळीही केराची टोपलीच नशिबी येणार आहे. असले हजारो हक्कभंग प्रस्ताव आले तरी त्यामुळे कोणालाही शष्प फरक पडत नाही. विश्वास बसत नसेल तर पुढील आठवड्यात या प्रस्तावाचं काय होतंय ते बघा.

बाईंचं भाषण म्हणजे दामटून खोटं बोलण्याचा वस्तुपाठ आहे.

मग सांगा इथे. शिवाय एखाद्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याने तो दोषी सिद्ध होतो हा नवीन नियम झालाय हे माहित नव्हतं. शिवाय ज्यांनी हक्कभंग प्रस्ताव आणलाय ते राजा हरिश्चंद्राचे अवतार आहेत त्यामुळे त्यांनी एखादी गोष्ट म्हटली की ती सत्यच असणार. मग प्रश्नच मिटला!

विवेक ठाकूर's picture

28 Feb 2016 - 5:17 pm | विवेक ठाकूर

बाई काय खोटं बोलल्यात ते वर सप्रमाण दिलंय त्यामुळे दोष तर उघड आहे. आणि तुम्ही तर भलताच ज्योक मारतायं, हक्कभंगाचा ठराव येणं याचा ना खेद ना खंत, वर ठराव आणणारे कोण आहेत?

तुम्हाला लेखाचा विषय काय आहे याची तरी कल्पना आहे का?

लेखकाच्या मते :

मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ? याचं सदर भाषण हा `वस्तुपाठ' आहे

आणि बाईंच्या मुद्दलातच खोट आहे असा शाबित केलेला प्रतिवाद आहे. तस्मात, विषय काय आहे ते बघून प्रतिसाद द्या.

आता तो पूर्णपणे निघून गेला. झिकरुल्लाह निशा आणि डाॅ.राजश्री यांना तुम्ही वैयक्तिकरीत्या ओळखता का? एकदा आयडी बॅन होऊनपण अक्कल आलेली दिसत नाहीये.

विवेक ठाकूर's picture

28 Feb 2016 - 7:10 pm | विवेक ठाकूर

तुम्हाला वाचता तरी येतं असं वाटत होतं पण तुम्ही तर त्या खालची पातळी देखिल गाठू शकता हे दाखवून दिलं ! इथे व्यक्तींना ओळखण्याचा प्रश्नच येत नाही , पुरावे तर्कशुद्ध आहेत का हे महत्वाचं होतं पण ते बहुदा तुमच्या आवाक्या बाहेर दिसतंय .

आम्ही गि-हाईक बघून पुडी बांधतो.तुमच्यासारख्या अहंमन्य लोकांना तीच भाषा समजते. काय करणार? सरकारने मानसिक रुग्णांसाठी रुग्णालयं काढली आहेत. पण तुमच्यासारख्या मूर्खांसाठी काहीच ठेवलं नाही. Btw, तुम्हाला स्वाभिमान नाही का हो? एकदा जिथे आयडी बॅन झाला, तिथे परत येणं म्हणजे लाळघोटेपणाशिवाय आणखी काहीही नाही. आणि परत आपल्या मूर्खपणाची हद्द दाखवतात इथे. जाऊ दे. लहानपणीच चांगले संस्कार झाले असते तुमच्यावर तर अशी वेळ आली नसती!

श्रीगुरुजी's picture

28 Feb 2016 - 9:10 pm | श्रीगुरुजी


मग सांगा इथे. शिवाय एखाद्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याने तो दोषी सिद्ध होतो हा नवीन नियम झालाय हे माहित नव्हतं. शिवाय ज्यांनी हक्कभंग प्रस्ताव आणलाय ते राजा हरिश्चंद्राचे अवतार आहेत त्यामुळे त्यांनी एखादी गोष्ट म्हटली की ती सत्यच असणार. मग प्रश्नच मिटला!

जेव्हा काहीच करता येत नसते, आपली बाजू पूर्ण लंगडी असते, आपण पूर्ण उघडे पडलेलो असतो तेव्हातेव्हाच असले हक्कभंग प्रस्ताव आणले जातात. एखाद्या मंत्र्याने एखादी घोषणा अधिवेशन सुरू असताना सभागृहाऐवजी सभागृहाबाहेर केली तर लगेच सभागृहातील आमदारांच्या हक्काचा भंग झाला असा आरडाओरडा करून हक्कभंग प्रस्ताव आणला जातो. त्याला अर्थातच काहीही अर्थ नसतो.

राज्यसभेत विरोधकांचे बहुमत असल्याने मुद्दाम लोकसभेऐवजी राज्यसभेत हा प्रस्ताव येणार आहे. त्यावरील मतदानात सरकारऐवजी विरोधकांच्याच बाजूने जास्त मते पडणार आहेत. पण त्याने शष्प फरक पडणार नाही. जे भाषण स्मृती इराणींनी लोकसभेत केले तेच भाषण त्यांनी राज्यसभेत केले. परंतु लोकसभेत विरोधकांची हक्कभंग प्रस्ताव आणण्याची हिंमत नाही कारण तो प्रस्ताव तिथे मंजूर होणारच नाही. स्मृती इराणी खरोखरच खोटे बोलल्या याबद्दल विरोधकांची खात्री असती तर प्रस्ताव नामंजूर होणार हे दिसत असूनसुद्धा त्यांनी हक्कभंग प्रस्ताव लोकसभेत सुद्धा आणता आला असता. निदान त्यानिमित्ताने चर्चा होऊन त्यांचा तथाकथित खोटेपणा उघडकीला आणता आला असता. पण ते करायची हिंमत नाही. राज्यसभेत बहुमत असल्याने विरोधक फक्त तिथेच प्रस्ताव आणणार. राज्यसभेत विरोधक असल्याने वाटेल तो प्रस्ताव आणला तरी तो मंजूर होणारच आहे. त्याने काहीही फरक पडणार नाही. निरूद्योगी विरोधकांना त्यामुळे थोडावेळ गारगार वाटेल इतकंच. लोकसभेत जे भाषण अधिकृत रेकॉर्डमध्ये गेले आहे त्याच्याबद्दल कोणताही अधिकृत आक्षेप लोकसभेच्या कामकाजाच्या नोंदीत नसेल. पण राज्यसभेत जर सभापतींनी स्थगन प्रस्ताव चर्चेला घेऊन त्यावर मतदान घेतले तरच त्यावरील आक्षेप कामकाजाच्या नोंदीत येतील. म्हणजे एका सभागृहात त्या भाषणावरील आक्षेप अधि़कृत कामकाजात असतील तर दुसर्‍या सभागृहात तेच भाषण आक्षेपविरहीत असे कामकाजात नोंदले जाईल.

एकंदरीत त्यामुळे शून्य फरक पडेल.

चौकटराजा's picture

29 Feb 2016 - 9:09 am | चौकटराजा

आपल्याला नक्की आकडा म्हईत नाही पण तो मेजारिटीत असल्याने हक्कभंग कचर्‍यात जाणार हे नक्की. कारण आपल्या भार्तात व्यक्ति निवडून येत असली तरी पक्ष नावाची एक संस्था जो पर्यंत अस्तित्वात आहे तो पर्यन्त सत्दविवेकाने मतदान असंभव .

नेहमी व्यक्ती मूळात कशी आहे यावर तीच्या वक्तव्याची किंमत ठरते.

हे विठांच्या प्रतिसादातलं वाक्य
आणि त्यांच्या प्रतिसादांत त्यांनी स्मृती इराणींना लावलेली खोटारडेपणाची लेबलं पहा. यांनी आधीच ठरवून ठेवलेलं आहे की स्मृती इराणी खोटं बोलत आहेत आणि बाकीचे सगळे खरं बोलताहेत. पूर्वग्रहदूषित म्हणतात ते यापेक्षा वेगळं काय असतं?

श्रीगुरुजी's picture

29 Feb 2016 - 8:44 pm | श्रीगुरुजी

हे फार पूर्वीच लक्षात आले आहे. यांचे विचार पूर्वग्रहदूषित आहेत हे २०१४ पासूनच माहिती आहे. पण यांच्या विचारांशी जे सहमत आहेत ते 'सुज्ञ व विचार करू शकणारे' आणि नाहीत ते 'माथेफिरू' अशी विभागणी त्यांनी केव्हाच करून टाकली आहे.