लेखनप्रकार (Writing Type)
स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण यूट्यूबवर पाहिले. ते खाली पाहता येईल...
हे इथे टाकण्यामागे दोन उद्देश आहेत...
१. या भाषणातून सध्या गरमागरम चर्चा चालू असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबादमधील विद्यापीठ आणि मध्यवर्ती सरकारच्या अखत्यारीत येणार्या इतर सर्व विद्यापीठांसंबंधी अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहीत होतील.
२. कोणत्याही प्रकारची सारवसारव न करता, मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी याचा सुंदर वस्तुपाठ म्हणावे असे हे भाषण आहे. तेव्हा तशी सकारात्मक चर्चा करू इच्छिणार्यांसाठी यातून शिकण्यासारखे खूप काही आहे.
.
प्रतिक्रिया
काय ताई गम्मत करतायत का. या उच्च शिक्षित लोकांनी देशाचे किती दिवाळे काढले आहे. माहित आहे का? त्या पेक्षा अडाणी बारा, मोठा घोटाळा करू शकणार नाही.
:)
दोन्ही शॉट चुकीचे हे बरोबर, पण टेनिस मध्ये पहिल्याने चुकीचा शॉट मारला आणि दुसर्याने नुसता परतवला तरी परतवलेला शॉट हकनाक चुकीचा दिसतो ! काय म्हणता.
मोंटेकसिंग अहलुवालिया हे मंत्री नव्हते. कींबहुना काँग्रेसचे देखील नव्हते कधी. आणि जयंत सिन्हा हे नाव गूगल करा.
बरोबर. पण काँग्रेसच्या मर्जीतले जरूर असावेत.
मुद्दा एवढाच होता की कोणाच्याही शिक्षणाची तुलना करायची असेल तर दोन दहावी-बारावी लोकं का निवडावीत? चांगली शिकलेली लोकं निवडावीत. कोणाची रेघ लहान ही स्पर्धा करणं प्रतिगामी आहे. कोणाची रेघ मोठी याची स्पर्धा करावी.
कोणाची रेघ लहान ही स्पर्धा करणं प्रतिगामी आहे. कोणाची रेघ मोठी याची स्पर्धा करावी.आदर्श विचार आहे, पण लोकशाहीच्या नाण्याला अधिक कंगोरे असावेत, १) लोकशाहीत सरपंच शाळेच्या मुख्याधापकापेक्षा अधिक, महापौर कॉलेजच्या प्राचार्यापेक्षा अधिक, राज्याचा शिक्षणमंत्री विद्यापिठाच्या कुलगुरुपेक्षा अधिक, केंद्रीय शिक्षण मंत्री युजीसीच्या चेअरमनपेक्षा अधिक शिकलेला असण्याची अपेक्षा करत बसण्यात अर्थ नाही. २) त्याच वेळी राजकारणातल्या लोकांच्या क्षमतांप्रमाणेच मर्यांदांची चर्चा होण्यात गैरही नाही. ३) कुणाला मंत्री नेमायचे हा पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो, स्मृती इराणींपेक्षा सुषमा स्वराजांकडे हे खाते आधिक शोभले असते असे मला नेहमीच वाटते, तरीही एकदा मंत्रि केल्या नंतर जास्त राळ उडवण्यात पॉईंट नसावा तरीही राळ उडवली गेली. या बाबतीत छोटी रेष ओढण्याचा खेळ भाजपा समर्थकांनी चालू केलेला नाही ते फक्त चेंडू परतवत आहेत. दोन्ही बाजूला वेगवेगळ्या लेव्हलचे समर्थक असतात ते त्यांच्या त्यांच्या पातळीवर त्यांच्या त्यांच्या लेव्हलचे चेंडू परतवत असतात.
हा चीप शॉट आहे.कसा काय? ही वस्तुस्थिती आहे.
अहो बोका बाईसाहेब म्हनत्यात तुमी नकारात्मक गोष्टी का दाखीवता ?
...आणि दाखवायच्याच झाल्या तर आमच्या सोईच्या गोष्टी (आणि सोईच्या नसल्या तर सोईच्या करून मगच) दाखवा :)
:)
मिलिंद धुमाळे यांचा लेख वाचला.
रामायण/महाभारत कार्टूनच्या माध्यमातून शिकविले जाणे किंवा हिंदू धर्मातील सण साजरे केले जाणे ह्याला भगवी करण म्हणायचं असेल तर कठीण आहे.
वेमुलाच्या न मिळालेल्या फेलोशिपवरून देखील आरडाओरडा चालू आहे, जणू काही ती मुद्दामून दिली नव्हती. पण आत्ता शोधत असताना टाईम्स ऑफ इंडीया मधे एक वेगळीच बातमी दिसली जी इतर कुठल्या माध्यमांमधे पटकन तरी दिसली नाही... खाली ती बातमी जशीच्या तशी चिकटवत आहे...
HYDERABAD: Four days after his suicide, it has now come to the fore that the delay in disbursement of Rohith Vemula's fellowship money was due to a confusion over two junior research fellowships (JRFs) that he secured during two different years. Vemula used to receive Rs 25,000 every month as fellowship, but this grant stopped in July 2015. In his suicide note, Vemula stated he hadn't received his fellowship money for the past seven months. University officials in a report to the HRD ministry state that Vemula had first qualified for a fellowship for two years between July 7, 2012, and June 6, 2014. He cancelled his course in July 2013 and again qualified for a fellowship in March 2014. Since Vemula had been paid in excess in his first fellowship, UoH had to seek clarification from the UGC on whether "such fellowship can be allowed" and for what period. This, according to them, compounded the confusion.थोडक्यात त्याची फेलोशिप ही जुल्य २०१२ ते जुने २०१४ होती. पण त्याने त्या कार्यक्रमातून २०१३ मधेच अंग काढले. पण त्याला फेलोशिप मात्र ती ग्रँट संपेपर्यंत म्हणजे जुलै २०१५ पर्यंत मिळालेली होती. पण तो या कार्यक्रमात जवळपास आठ नऊ महीने नसताना (जुलै २०१३ ते मार्च २०१४) देखील त्याला पैसे मिळत होते. त्यामुळे अधिक पैसे आधीच दिले गेले असल्याने नवीन पैशाचे अकाउंटींग कसे करायचे हा प्रश्न होता... हा मुद्दा कुणाच्याही बाबतीत होऊ शकला असता. अमेरीकन विद्यापिठात तर ग्रँट मधेच संपली अथवा समर मधे मिळाली नाही तर मुलांना कुठलीही कामे करावी लागतात...त्याचा गाजावाजा होत नाही. बरं या जागी कुणी अभाविपचा विद्यार्थी असता ज्याला आधीच ९ महीने जास्तीचे पैसे दिले हे बाहेर आले असते तर काय ठणाणा केला असता!
धन्यवाद
स्पीच आवडलं मला, बाकी चालु द्या.
-दिलीप बिरुटे
सोनिया गांधींवर यथेच्छ अगदी खालच्या दर्जाची टिका करणार्यांना स्मृती इराणींवरची वरच्या दर्जाची टिकाही बिल्कूल सहन होत नाही हे पाहून गंमत वाटते.
खालच्या दर्जाची टिका
कृपया व्याख्या आणि सोनियांच्या बाबतीतली उदाहरणे देता का? जर खालच्या दर्जाची टिका असली तर ते अयोग्यच म्हणायला हवे.
आणि अॅक्टर टर्न असे सारखे हिणावणे ही उच्च दर्जाची टिका कशी ते देखील सांगितले तर बरे होईल.
आणि अॅक्टर टर्न असे सारखे हिणावणे ही उच्च दर्जाची टिका कशी ते देखील सांगितले तर बरे होईल.आधी एक कन्फेशन - मी 'सांस भी कभी बहू थी' किमान काही आठवडे बघितलं आहे. आता पुढे. १. प्रीती झिंटाचा उल्लेख actor-turned-businessperson असा होतो. व्यक्तीच्या सीव्हीचा सारांश देण्याची ही पद्धत मलातरी चूक वाटत नाही. २. स्मृती इराणीला अभिनेत्री म्हणणं हा मला अभिनयाचा अपमान वाटतो. कॅमेऱ्यासमोर किंवा स्टेजवर उभं राहिलेली प्रत्येक व्यक्ती अभिनय करते असं मला वाटत नाही. ३. बॉक्सर-टर्न्ड-खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल एकेकाळी बॉक्सर होता हा उल्लेख अपमानव्यंजक वाटतो का? का? ४. अभिनय करणं हे खालच्या दर्जाचं काम वाटतं का? (मला वाटत नाही.)
भलतेच बै तुम्ही गंमतीशीर!
थांकु थांकू
व्यक्तीच्या सीव्हीचा सारांश देण्याची ही पद्धत मलातरी चूक वाटत नाही.
राजीव गांधींना पायलट टर्न्ड पंतप्रधान म्हणल्याचे आठवत नाही...अजून एक महत्वाचे आत्ताच्या जॉबसाठी त्याचा काय संदर्भ आहे तिथपर्यंतच सिव्हीचा संबंध असतो. नाहीतर उद्या बालवाडीतला विद्यार्थी टर्न्ड म्हणत खूपच टर्निंग पॉईंट घेत बसावे लागेल. गोविंदा खासदार असताना अथवा वैजंयंतीमालाला देखील असे म्हणले गेले नाही. मला कल्पना आहे की गोविंदाच्या बाबतीत ती बाब गोपनीय ठेवणे महत्वाचे असेल म्हणून बोलले गेले नसेल. पण तो वेगळा मुद्दा झाला.
स्मृती इराणीला अभिनेत्री म्हणणं हा मला अभिनयाचा अपमान वाटतो. कॅमेऱ्यासमोर किंवा स्टेजवर उभं राहिलेली प्रत्येक व्यक्ती अभिनय करते असं मला वाटत नाही.
मी त्यांचा अभिनय पाहीलेलाच नाही. त्यामुळे त्या संदर्भात नो कॉमेंट्स.
बॉक्सर-टर्न्ड-खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल एकेकाळी बॉक्सर होता हा उल्लेख अपमानव्यंजक वाटतो का? का?
विकीवर हबल टेलीस्कोप बद्दल लिहीताना The telescope is named after the astronomer Edwin Hubble. असे लिहीले आहे. The telescope is named after the boxer turned astronomer Edwin Hubble असे नाही. असो.
अभिनय करणं हे खालच्या दर्जाचं काम वाटतं का? (मला वाटत नाही.)
अजिबात नाही. कुठलेच काम कमी दर्जाचे नसते. कमी दर्जाचे असेलच तर तसे इतरांच्या बाबतीत दाखवणारी वृत्ती... जी (हिन वृत्ती) ही माध्यमे इराणीबाईंच्या बाबतीत सातत्याने दाखवत आली आहेत. कारण त्यांना काहीही करून त्या पॉलिटीशिअन नाहीत हे जनतेच्या डोक्यात बिंबवायचे आहे. तुमच्यासाठी साधे असेल हो, पण तसे नाही केले तर पुढच्या वेळेस अमेठीला काही खरे नाही ही भिती आहे ना!
मुळात दोघींवर (अथवा कोणावरही) अशी खालच्या दर्जाची टिका का करावी ? ( आता ते तिथे अभिव्यक्ती-स्वातंत्र्य वगैरे मध्ये येते का ते वेगळे तरीपण तशी टिका अमान्यच ).
हे सांगून तुम्हाला विचारतो की इथे एकाची रेघ कमी दाखवून दुसर्याची मोठी कशाला दाखवायचीय ? (तुमच्या काही प्रतिसादातून "तुम्ही केलं तेव्हा कसं चाललं मग आता का " असा सूर जाणवला आधीही आणि एका ठिकाणी सुहास म्हात्रेंनी तुम्हाला त्यावर एकाची चूक दाखवून दुसर्याच्या चुकीची तीव्रता कमी होत नाही अशा काहीश्या अर्थाचा प्रतिसादही दिला होता. तरीही सांगू पाहतोय )
चांगलं लिहिणार्यांसाठीही तटस्थपणे साधा विचार इतका कठीण का असावा ? म्हणजे इराणीबाईंवर केलेल्या आरोपाचं तिनं मुद्देसूद खंडन (ते कितपत बरोबर चूक तो मुद्दा वेगळा ) तेही संसदेसारख्या जबाबदार व्यासपीठावर केलं आणि त्यातल्या मुद्देसूदपणाबद्दल इथे कोणी लिहिलं. यावर इतकं काय व्हावं असं वाटून गेलं.
(सकल सामाजिक दांभिकतेची चीड असलेला आणि सध्या सगळीकडे तीच बजबजलेली पाहणारा)
मुळात दोघींवर (अथवा कोणावरही) अशी खालच्या दर्जाची टिका का करावी ? ( आता ते तिथे अभिव्यक्ती-स्वातंत्र्य वगैरे मध्ये येते का ते वेगळे तरीपण तशी टिका अमान्यच ).
>> सहमत. तीव्रपणे.
मी कुठल्याही पक्षाचा समर्थक नाही. कुणाच्याही चुका दाखवून आपल्या चुका जस्टीफाय करणे मला व्यक्तिशः आवडत नाही. पण जेव्हा कोणी असे करतो तेव्हा त्याला त्याच्या पुर्वकर्मांची आठवण करुन त्यांचा दांभिकपणा उघडा पाडणे मला आवडते. भाजपसमर्थकांना असे उघडे पडणे आवडत नाही, त्यांची गेल्या दोन वर्षांपासून "तुम्ही केलं तेव्हा कसं चाललं मग आता का " हीच भूमिका आहे तरी तोच प्रश्न त्यांना विचारला की कळवळतात.
मिपावर कुणी काँग्रेससमर्थक नाही, असला तरी इथे पक्षाची बाजू मांडायला येत नाही किंवा ते दुर्लक्ष करतात. भाजपसमर्थकांचे तसे नाही, कुठे कोणी जराशी माचिसची काडी पेटवली तरी अख्खं फायर ब्रिगेड घेऊन पोचतात.(उदा> व्यवच्छेदक लक्षणांचे दोन्ही धागे, बडोदा डायनामाईट प्रतिसादावर काँग्रेसच्या आणीबाणीच्या उल्लेखाचा अतिरेकी, उताविळ, अनावश्यक आग्रह). फारच असुरक्षिततेची भावना. असो.
(सकल सामाजिक दांभिकतेची चीड असलेला आणि सध्या सगळीकडे तीच बजबजलेली पाहणारा)
>> सेम हीअर.
दिलेल्या प्रतिसादाबद्दल बोलत असाल, तर बार गर्ल या व्यवसायाला कमी लेखताय असं वाटत नाही का? जे स्मृती इराणींना actor turned politician म्हणतात त्यांचंही अभिनेत्री या व्यवसायाबद्दल असंच संकुचित मत असेल.
रे भगवान! ढेरेंचा प्रतिसाद वाचला नव्हता. तरी दोन्ही प्रतिसाद आलेत ते बरेच झाले. असो.
सोनिया गांधींबद्दल एकूण भाजपसमर्थकांकडुन ज्या दर्जाच्या टिका, विनोद ऐकलेत ते आठवून आता इराणींबद्दलची टीका सहन होत नाही हे दांभिक आहे. -हे निरिक्षण इथल्या कुठल्याही सदस्याच्या सोनियागांधींबद्दल्च्या टिप्पणीबद्दल नाही-
अश्लाघ्य टीका केली नव्हती. खुद्द नरेंद्र मोदींनी केली नव्हती. मां-बेटे की सरकार वगैरे राजकीय टीका असेल पण मर्यादा सोडून नव्हती. स्मृती इराणींवरही सगळ्या काँग्रेसवाल्यांनी अश्लाघ्य टीका केलेली नाही. ज्यांनी केलीय त्यांची मनोवृत्ती समजून येतेच - कुठलाही पक्ष असला तरीही. मात्र नरेंद्र मोदींबद्दल मौत का सौदागर वगैरे टीका सोनिया गांधींनी केली होती. तो त्यांचं भाषण लिहिणाऱ्याचा दोष समजू आपण एक वेळ.
पुढचा प्रतिसाद लिहण्याआधी शब्दाचे घोळ होउ नये म्हनुन वाक्य नीट मांडतो.
सोनिया गांधींबद्दल भाजपसमर्थकांकडुन एकूण ज्या दर्जाच्या टिका, विनोद ऐकलेत
बोकाभाऊ, अंगावर यायला लागलं की शब्दांचे खेळ खेळणे, जबाबदार्यांपासून पळणे भाजपसमर्थकांसाठी नवीन नाही. तुम्हीही तेच कराल तर कसे चालेल?
माझ्या प्रतिसादात नसलेला सगळे भाजपचे लोक असा शब्दसमुह वापरुन तुम्ही तर्काने किल्ला लढवताय. मी सगळे भाजपचे लोक असे म्हटलेच नाही. भाजप म्हणजे निव्वळ नरेंद्रमोदी नाही. प्रत्येक गोष्टीत नरेंद्रमोदी आणल्याशिवाय चैन पडत नाही असे भाजपविरोधकांबद्दल बोलले जाते, भाजपसमर्थकही वेगळं काय करतात?
सोनिया गांधींबद्दल एकूण भाजपसमर्थकांकडुन ज्या दर्जाच्या टिका, विनोद ऐकलेत ते आठवून आता इराणींबद्दलची टीका सहन होत नाही हे दांभिक आहे. -हे निरिक्षण इथल्या कुठल्याही सदस्याच्या सोनियागांधींबद्दल्च्या टिप्पणीबद्दल नाही-हा असा उल्लेख वाचल्यावर मी दिलेला प्रतिसाद आहे. नंतर तुम्ही दिलेला प्रतिसाद तब्बल अर्ध्या तासाने (११.५७) ला आहे. मधल्या काळात माझा प्रतिसाद प्रकाशित झाला आणि तुम्ही त्यावरून निष्कर्ष काढून मोकळे झालात. बाकी काही नाही, त्यावरून माझं - लोक आपलं मत आधीच बनवतात आणि मग त्या अनुषंगाने माहिती process अाणि interpret करतात - हे म्हणणं सिद्ध होतं.
मी फक्त माझ्या प्रतिसादावर आलेल्या तुमच्या प्रतिसादाबद्दल, व आपल्याच दोघांमधे होत असलेल्या चर्चेबद्दल बोलत आहे. इतर कुठे काय प्रतिसाद दिला त्याचा संबंध नाही. तुम्ही ज्या पद्धतीने मुद्दा मांडताय व गरज नसलेले तपशील (सगळे पक्षवाले) आणून मूळ मुद्द्याला बगल मार्ताय ते बघून मी बोलतोय. इथे टिका विरूद्ध टिका एवढाच विषय आहे. तीची पातळी दोन्ही पक्षसमर्थक ओलांडतात व तसे केल्याबद्दल एकमेकांविरूद्ध दांभिक आरोप करतात एवढेच निरिक्षण आहे. तुम्ही तिथे मोदी वैगरे आणायचे तसे काही कारण नव्हते. तुमचेच वाक्य तुम्हालाही लागू होतंय. असो.
तो त्यांचं भाषण लिहिणाऱ्याचा दोष समजू आपण एक वेळ.
आता तुमच्यावर चीप शॉट केल्याचा आरोप होणार ;) =))सहजच "५० करोड की गर्लफ्रेंड" आठवला.
ते अश्लाघ्य / असंसदीय/ किंवा पर्सनल नव्हता का बोकाभाउ ?
काँग्रेसने केली त्या मानाने तो फारच सौम्य होता. आणि पुन्हा तेच - ती वस्तुस्थिती आहे. बाकी तुम्हाला ती टीका बोचण्याचं कारण काय? तुम्ही राहुलजींचे भक्त आहात की काय?
बोकाभाऊ.. ते मुद्द्याचे आणि त्यातल्या त्यात "प्रिन्सिपली" कोण बरोबर आहे ते बोलत आहेत.
आता तुमचे तितकेच वाक्य पकडून "त्यांनी केले म्हणून यांनी केले ते बरोबर ठरते का?" "भक्त असेल तरच टीका बोचावी का?" असले प्रतिवाद येतील.
हे म्हणजे त्यांनी १० वैयक्तीक हल्ले केले की "ते तसलेच आहेत म्हणून सत्तेवर नाहीत" आणि यांनी एक प्रत्युत्तर दिले की "बघा तुमची पण पार्टी चुका करते" असे न संपणारे आणि वरकरणी योग्य पण निरूपयोगी युक्तीवाद सुरू होतात.
तुम्हाला ती टीका बोचण्याचं कारण काय? तुम्ही राहुलजींचे भक्त आहात की काय?मी कोणाचाही भक्त नाही.आणि टीका मला बोचण्याचे कारण नाही. तुम्ही अश्लाघ्य टीकेचा उल्लेख केलात म्हणून उदाहरण दिला. एखाद्या स्रीची पैशाशी तुलना कोणत्याही परीस्थिती मधे चुकीचाच! ( किंमत ठरवल्याप्रमाणे) कॉंग्रेसने पातळी सोडली म्हणुन मोदींनी सोडली तर दोघेही चूकच ! दुसऱ्याच्या मोठ्या चुकीमुळे मोदींची चूक योग्य ठरत नाही. जसा मोदींच्या पत्नीचा उल्लेख चुकीचा असेल तर शशी थरुर यांच्या पत्नीचाही उल्लेख चुकीचाच. आता तुम्ही पण मोदींची प्रत्येक गोष्ट बरोबरच म्हणत असाल तर भक्त कोण हे उघड आहे. सनी लिओन वर पेटणारे मिपाकर या प्राईस टॅगींग ला सपोर्ट करतात हे पाहून आश्चर्य वाचले
Gujarat Chief Minister Narendra Modi on Monday took potshots at Union Minister Shashi Tharoor's personal life, saying his wife was once his "50-crore-rupee girlfriend", a day after he made a comeback in the Union Cabinet reshuffle.
"Wah kya girlfriend hai. Apne kabhi dekha hai 50 crore ka girlfriend? (What a girlfriend? Have you ever seen a 50-crore girlfriend), Modi said at an election rally, in an apparent attack on Tharoor's wife Sunanda Pushkar.
"There was a Congress leader who was a minister. He was accused of amassing wealth from cricket. He had said in Parliament that he is not connected to the Rs 50 crore in the lady's name," the BJP stalwart said in an apparent reference to Tharoor in the context of the IPL cricket controversy involving Pushkar in 2010 which led to his resignation as Minister of State for External Affairs minister.
Modi, however, did not take any names.
"...And then girlfriend becomes wife, we learn some time later...the issues are still not settled and he (Tharoor) is now made a minister," the chief minister said.
हा संदर्भ शशी थरुर यांच्यावर २०१० मध्ये आलेल्या कोची टस्कर्स या आयपीएल संघासंबंधित जे भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते त्यावर होता. तेव्हा सुनंदा पुष्कर यांच्यासाठी थरुर यांनी या संघात १०% sweat equity मागितली होती. ही sweat equity नंतर ५% एवढी निर्धारीत करण्यात आली. त्यानंतर शशी थरुर यांना ते सुनंदा पुष्कर यांना proxy म्हणून वापरत असल्याच्या आरोपावरुन राजीनामा द्यावा लागला. त्यावरून हा शब्दप्रयोग मोदींनी केला.
त्यावर थरुर यांची प्रतिक्रिया होती - My wife is worth much more than Modi's imaginary fifty crores. In fact, she is priceless. For Mr.Modi to understand that, he will have to love someone.
म्हणजे शशी थरुर यांनाही हा शेरा अपमानास्पद वाटला नव्हता. आता त्या स्त्रीच्या पतीला हा अपमान वाटला नव्हता आणि तुम्हाला वाटतो म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे.
बाकी तुम्हाला ती टीका बोचण्याचं कारण काय? तुम्ही राहुलजींचे भक्त आहात की काय?
>> आपल्याला तुमच्यासारखे हुच्च हुच्च विधानं करता येत नाही पण थोडा कॉमन सेन्स आहे. राहुलजींचे भक्त असले तरच ती टिका बोचावी अन्यथा नाही असे म्हणून तुम्ही शशी थरुर यांच्या पत्नीबद्दलचे मोदींचे उद्गार समर्थनीय ठरवत आहात. शिवाय ते सौम्य का तीव्र हे तुमच्या इच्छेवर ठरतंय. काँग्रेसजनांच्या स्त्रिया ह्या मान देण्यालायक नाहीत हेच तुमच्या विधानातून सूचित होतंय.
विक्षिप्त आदिती,
तुमचा इथला प्रतिसाद वाचला.
मटाचा हवाला देऊन तुम्ही म्हणताय :
>> स्मृती इराणी चक्क फेकंफाक करत होत्या.रोहितच्या जवळ डॉक्टर पोहोचले नाहीत ही कसली हो फेकंफाक? याची भाऊ तोरसेकरांनी बरोब्बर पिसं काढली आहेत. त्यांच्या लेखाचा सारांश असा की रोहितची आत्महत्या ही राज्य शासनाच्या अखत्यारीत येते. रोहितची बातमी कळल्यावर बाईंनी राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याशी संपर्क साधला. ते कामात व्यग्र असल्याने संपर्क होऊ दिला नाही. मग त्यांनी रावांच्या कन्येशी संपर्क साधला. ती खासदार आहे. तिथेही काही माहिती मिळाली नाही. तेव्हा इराणी बाईंनी पोलिसांना कामाला लावलं. तर विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या कामात हस्तक्षेप सुरू केला (किंवा अगोदरपासूनच केला होता). त्याचं काय आहे की, सामान्य जनतेला उपरोक्त सारांशातले बिंदू जोडून खरं चित्रं पुरं करता येतं. असोत बाई खोट्या. लोकांना मात्र खऱ्यात रस आहे. आ.न., -गा.पै.
वेमुलाप्रकरण काही काल घडलं नाही. प्रकरणाचा योग्यप्रकारे तपास जणू झालाच नाही असे मंत्र्यांच्या उत्तरावरुन वाटले. केंद्रसरकारच्या खात्याला जर संसदेत उत्तर द्यायला लागतंय तर ती जबाबदारी त्यांचीच आहे, राज्यशासनाकडून योग्य माहिती घेणेही. ब्लेमगेम खेळण्यात व त्यामागे लपण्यात उपयोग नाही. मंत्र्यांची उत्तरं जर खात्रीशीर माहितीवर आधारित नसतील तर जनतेने कुणाकडे दाद मागायची? गृहमंत्र्याचे सईदट्वीटबद्दलची फजिती काही जुनी नाहीच.
तजो,
>> मंत्र्यांची उत्तरं जर खात्रीशीर माहितीवर आधारित नसतील तर जनतेने कुणाकडे दाद मागायची?
मलाही नेमकं हेच म्हणायचं होतं. रोहितच्या बाबतीत स्थानिक राज्य शासन उदासीन आहे. म्हणून केंद्र शासनास त्यात लक्ष घालावं लागतंय.
आता राज्य शासनाने योग्य माहिती पुरवली नाही म्हणून तेलंगणात राष्ट्रपती राजवट लागू करायची का? की पुरवलेली माहिती बिनमहत्त्वाची (=insignificant) आहे म्हणून दुर्लक्ष करायचं? इराणीबाईंनी दुसरा मार्ग चोखाळला तर एव्हढा गहजब का?
आ.न.,
-गा.पै.
भाऊ तोरसेकरांनी बरोब्बर पिसं काढली
भाऊ तोरसेकर हे बुद्धीवादी नाहीत. त्यामुळे मधल्याकाळात काही जणांनी चाल खेळून त्यांचे फेसबुकचे अकाउंटपण गोठवून घेतले होते. अर्थात त्याला विचारस्वातंत्र्याची गळचेपी म्हणायच काम नाय! ते बुद्धीवादी नाहीत त्यामुळे त्यांना विचारस्वातंत्र्य नाही! ;)
आत्ता एक लेख वाचनात आला की माध्यमे इराणीबाईंच्या कशी विरुद्ध आहेत ते... त्यातील खालचा भाग खूप बोलका वाटला:
In his book The Unforeseen President, John Perry writes: If you say nothing masscom will pillory you. If you dodge it, masscom will chase you. If you do not know the answer, it will place a dunce cap on your head. If you make an error, it will play that sound bite again and again until the whole world is laughing at you. If you misstate something it will mock you endlessly. If you apologise for the mistake it will project you as weak and flip flopping. If you argue you will be portrayed as thin-skinned…if you hit the right answer the masscom geniuses will crucify you for your gall."
राजकारणात शिक्षणाला महत्व जास्त नसते ह्यात तथ्य आहे.मात्र मानव संसाधन ह्या महत्वाच्या मंत्रिपदासाठी साधी पदविधर व्यक्ति भाजपासारख्या राष्ट्रिय पक्षाकडे असु नये हे दुर्दैवाचे आहे.एक काल्पनिक उदाहरण....एखादा गुंड राजकारणात जातो निवडुन येतो.पुर्वायुष्यात पोलिसांकडुन मार खाल्लेला असुनही नंतर ग्रुहमंत्री होउन पोलिसांकडुन सलाम ठोकुन घेतो हे जितके दुर्दैवि असेल तितकेच वरचे उदाहरन
दुर्दैवि आहे
उचलली जीभ लावली टाळ्याला !
काल्पनिक कशाला, अशी अनेक जीतीजागती उदाहरणं आहेत.
सहमत.बोलबच्चनला भुलणारी आपली जनता आहे.मग ते कोणत्याही पक्षाचे राजकारणी असो.
आणि सदर लेख आणि भाषणाची भलामण करणारे प्रतिसाद त्याचा आदर्श वस्तुपाठ आहेत!
राजकारणात शिक्षणाला महत्व जास्त नसते ह्यात तथ्य आहे.मात्र मानव संसाधन ह्या महत्वाच्या मंत्रिपदासाठी साधी पदविधर व्यक्ति भाजपासारख्या राष्ट्रिय पक्षाकडे असु नये हे दुर्दैवाचे आहेपरंतू, हया बाईसाहेब त्यांना दिलेले काम चोख बजावत असतील तर ?
चांगले भाषण म्हणजे चांगला कारभार असे समिकरण असेल तर प्रश्नच नाहि. बाइंच्या कारभाराला कंटाळुन दोन चार विद्वानांनि राजिनामा दिला होता असे वाचण्यात आले होते.
हे हे, ह्यांच्या लेखी ते विद्वान म्हणजे कॉंग्रेसचे भाट असतील, काँग्रेसच्या काळात मिळणार्या सवलती इराणींनी बंद केल्या म्हणून कांगावा करुन बाहेर पडले.
कोण हे दोनचार विद्वान?
विद्वान नव्हते राजीनामा दिल्याने झाले असावेत.
तस्मात ध्गा उद्देशावर अज्याबात चर्चा करू नये.
गॅलरी प्रेक्षक
आसन क्र १०१५
जेव्हढं मला आठवतंय त्यात एक अनिल काकोडकर होते.
बोका-ए-आझम हे डावे आणि(/किंवा