==================================================================
नव रात्र जल जागर : माळ पहिली... माळ दुसरी... माळ तिसरी... माळ चवथी... माळ पाचवी... माळ सहावी... माळ सातवी... माळ आठवी... माळ नववी... माळ दहावी...
==================================================================
आजच्या माळेतील विजय भुजबळ-, कृषी सहायक, मुचंडी जि. सांगली, 9922901901 यांच्याशी झालेला दूरध्वनी वार्तालापाचा गोषवारा:
तीव्र पाणीटंचाई तालुका असल्याने गेल्या ३-४ वर्षात टँकर द्वारे पाणी पुरवठा ही नित्याचीच बाब झाली होती. परिणामस्वरूप शेतीवर व फळबागांवर त्याचा विपरीत परिणाम होऊन उत्पादन क्षेत्रही घटत चालले होते. तसा हा परिसर द्राक्षे व डाळींबे याच्या फळबागांसाठी प्रसिद्ध व हवामानही अनुकुल असलेला.परंतु पाण्याचे दुर्भीक्ष याने शेतकरी वर्ग. हतबल झालेला होता.
जलयुक्त शिवार अभियानाने विजय भुजबळ यांनी शेतकर्यांमध्ये जल-साक्षरता निर्माण केली. इतर ठिकाणच्या अभियानाच्या यशोगाथा जागरूक शेतकरी वाचत अनुभवत असल्याने इअतर ठिकाणी येतात तश्या शेतकर्यांना सहभागी करून घेण्याच्या आडचणी आल्या नाहीत. परंतु सर्व शेतकर्यांना आपल्या क्षेत्रात ही योजना राबविणिआची होते. गाव सुमारे ५००० हेक्टर असलेले आहे. सगळीकडे एक्दम काम सुरु करणे शक्य नव्हते. मनुष्यबळ , त्याकरीता लागणारा निधी,या सगळ्याचा ताळमेळ बसणे आवश्यक होते म्हणून मुचुंडी तील काही क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. श्री भुजबळ व त्यांचे सहकारी यांनी सुमारे २३ माती बंधारे पुनरूजीवीत केले. बर्याच ठिकाणी बांध बंदीस्ती केली.
बांध बंदीस्ती म्हणजे काय आणि त्याचे महत्व ते त्यांच्याच शब्दात " बांध बदिस्ती म्हणजे तुमच्या शेतातील जो कोपरा/ भाग उताराचा आहे आणि त्या ठिकांणी पाणी साचवता येऊ शकते अश्या ठिकाणी एक मीटर खोल चर घेऊन पाणी साठवणे" हे प्रमाण दर हे़क्टरला २ मीटर आहे.त्याचे ठळक आणि सहज दिसणारे फायदे म्हणजे.पाणी शिवारातच मुरते.ते आप्ल्या शेतातून दुस्र्या,तेथून पुढे असे वाहून जात नाही.लगतच्या विहिरींना मिळणारे जमीनीखालील मृत झरे,जलस्तोत्र जीवंत होतात आणि विहिरींचा पाण्यात लक्षणीय वाढ होते.
अप्रत्य्क्ष फायदे म्हणजे जमीनीची धूप थांबते, माती वाहून जाऊन बंधार्यात गाळ साठण्याचे प्रमाण कमी होते.
श्री भुजबळ यांनी लोक सहभागातून दोन तलावातील गाळ काढला . तो गाळ काढण्याचा फक्त खर्च शासन करते. शेतकर्यांनी स्वखरचाने तो शेतात न्यायचा असतो. त्यालाही शेतकर्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि सुमारे दहा हजार ट्रॉली सुपीक गाळ शेतकर्यांना मिळाला. त्याचा फळ आणि पीक उत्पादनात नक्कीच चांगला फायदा होईल.
अवर्षणप्रवण "मुचंडी" झाले टॅंकरमुक्त
पिण्याच्या पाण्याचे संकट झाले दूर रब्बी व फळबागांना पाणी मिळाले
कायम दुष्काळी स्थितीत जगणाऱ्या मुचंडी (ता. जत, जि. सांगली) येथे लोकसहभाग, कृषी विभाग व पाटबंधारे विभाग यांच्या एकत्रित शक्तीतून जलसंधारणाची मोठी कामे झाली. विहिरी, कूपनलिका, बंधाऱ्यांत त्यामुळे पाणी वाढले. त्यातून फळबागांचे क्षेत्र वाढीस लागले. शेतकऱ्यांना रब्बी हंगाम घेता आला. उन्हाळी हंगामही शेतकऱ्यांसाठी सुखकारक ठरेल अशी चिन्हे आहेत.
राजकुमार चौगुले
दक्षिण महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील जत हा सर्वांत मोठा तालुका आहे. जतच्या पूर्वेकडील कर्नाटक सीमाभागाच्या लगत असणारी गावे गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला तीव्रतेने तोंड देत आहेत. यापैकीच मुचंडी हे कर्नाटक सीमाभागावरचे गाव.
मुचंडी गाव दृष्टिक्षेपात
- चार हजार लोकसंख्या
- गेल्या पाच वर्षांत गावची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी
- पाच हजार हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी चार हजार हेक्टर क्षेत्र पिकांखाली
- खरिपाचे क्षेत्र सोळा हजार तर रब्बीचे क्षेत्र 1939 हेक्टर, फळबागा 416 हेक्टरवर.
गाळ उपसला, पाणीसाठा वाढला
मुचंडी गावाला दोन तलाव, मात्र ते गाळाने भरले असल्याने तलावाला पाणी उपलब्ध नव्हते. तलावाच्या शेजारीच गावाला पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची विहीर आहे; परंतु त्यातही पाणी नसल्याने उन्हाळ्यात दररोज चार ते पाच टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागे. सहा महिन्यांपूर्वी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेअंतर्गत तलावातील गाळ उपसण्याच्या कामास सुरवात झाली. तीन महिने काम सुरू होते. सुमारे दहा हजार ट्रॉली गाळ बाहेर काढण्यात आला. यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा ठरला. मुंबईच्या सिद्धिविनायक ट्रस्ट व शिर्डीच्या साई संस्थानकडून आर्थिक मदत झाली. मिळालेली सुमारे नव्वद हजार रुपयांची मदत ट्रॅक्टरच्या डिझेलसाठी वापरण्यात आली. गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने तलाव अनेक दिवसांच्या कालावधीनंतर भरला. याचा फायदा पिण्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला झाला. "परक्युलेशन' होऊन विहिरीला पाणी आल्याने पाणीपुरवठा योजना सुरू झाली. दहा ते पंधरा हेक्टर परिसरातील विहिरी व कूपनलिकांतील पाण्याची पातळी वाढली. सध्या दुसऱ्या तलावातील गाळ उपसण्याचे काम वेगात सुरू आहे.
कामे व त्यांचे परिणाम
- टप्प्याटप्प्याने कृषी विभाग व पाटबंधारे विभागामार्फत बंधारे बांधण्यात आले.
- सध्या गावात 25 सलग समतल चर, 765 कंपार्टमेंट बंडिंग्ज्, 25 माती नालाबांध, 12 सिमेंट बंधारे, 37 शेततळी, 7 पाझर तलाव आहेत. यातून समाधानकारक पाणीसाठवण झाली.
- ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत 167 टीसीएम पाणीसाठा. गावाला शेती व पिण्यासाठी मिळून सुमारे 4364 टीसीएम पाण्याची गरज, पैकी फक्त 167 टीसीएम पाणीसाठा असला तरी पिण्याच्या पाण्याची मुख्य गरज भागली आहे. यामुळे टॅंकरची गरज सध्या नाही.
ठिबक सिंचनाद्वारा पाणीबचत
नुकत्याच झालेल्या पावसाने गावातील जुन्या बंधाऱ्यांतही थोडा-थोडा पाणीसाठा झाला. त्याचा फायदा शेजारील विहिरी व कूपनलिकांना झाला. यामुळे फळबागा उत्पादकांना ठिबक सिंचनाद्वारा यंदाच्या उन्हाळ्यापर्यंत तरी पाणी देणे शक्य होणार आहे.
फळबागा व रब्बीचे क्षेत्र वाढले
गावात या हंगामात 239 मिमी पाऊस झाला. जूनमध्ये 55, ऑगस्टमध्ये 18, सप्टेंबरमध्ये 126, तर ऑक्टोबरच्या पहिल्या सप्ताहाअखेर 40 मिमी पाऊस झाला. त्याचा अनुकूल परिणाम म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या सप्ताहाअखेर रब्बी ज्वारीची सुमारे 1700 हेक्टर, हरभरा 40, करडई 19, मका 17 तर सूर्यफुलाची 25 हेक्टरवर पेरणी झाली. गावतलाव व काही माती बंधाऱ्यांना पाणी आल्याने गेल्या दोन-तीन महिन्यांत द्राक्ष व अन्य फळबागांची पाच ते सहा हेक्टरवर लागवड झाली आहे. उन्हाळ्यापर्यंत थोडे का होईना पाणी मिळणे शक्य असल्याने येत्या काही दिवसांत लागवड वाढण्याची शक्यता आहे.
माझ्या दोन एकरांवरील द्राक्षबागेला भर पावसाळ्यात पाणीटंचाई भासत होती. शेजारी तलाव असला तरी त्यात पाणी नव्हते. तलावातील गाळ काढल्यानंतर माझ्या विहिरीतील पाण्याचा साठा वाढला. फेब्रुवारीपर्यंत तरी पाणीटंचाई भासण्याची शक्यता नाही. एखादा जोराचा पाऊस झाल्यास उन्हाळ्यातही पाणी कमी पडणार नाही अशी अपेक्षा आहे.
संजय काटे-9604592275
मुचंडी
गावात पाणलोटाची कामे झाल्याने समाधान आहे. मी शेततळे घेतले आहे. जलसंधारणाच्या कामांमुळे विहिरींचा पाणीसाठा वाढला आहे. यंदा तूर, भुईमूग ही पिके घेतली आहेत. आता गरजेनुसार सिंचन करू शकतो.
गुरुलिंग गोटे, मुचंडी
मुचंडीत प्रस्तावित सात कोटी रुपयांच्या कामांपैकी एक कोटी रुपयांची पाणलोट विकासाची कामे जलयुक्त शिवार योजनेतून झाली. उर्वरितही लवकर होतील या उद्देशाने वाटचाल सुरू आहे.
रवींद्र कांबळे
उपविभागीय कृषी अधिकारी, जत, जि. सांगली
तालुक्यात मोठ्या प्रमाणात आम्ही जलसंधारणाची कामे हाती घेतली आहे. मुचंडी तर यंदा टॅंकरमुक्त झाले आहे.
- बाळासाहेब लांडगे, तालुका कृषी अधिकारी जत
ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे गावात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली. याचा फायदा भविष्यात पीक क्षेत्र वाढण्यावर होणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाद्वारे फळबाग व अन्य पिकांची लागवड करण्याची तयारी सुरू केली आहे. साखळी बंधारे, तलावांत समाधानकारक पाणीसाठा आहे. एखादा जोराचा पाऊस झाल्यास पुढील पावसाळ्यापर्यंत शेती व पिण्याची फारशी टंचाई जाणवणार नाही अशी शक्यता आहे.
विजय भुजबळ-9922901901
कृषी सहायक, मुचंडी
जमाना पुरावे मागण्याचा आहे आणि सजग मिपाकर कसे अपवाद असतील, त्या चौकस मिपाकरांसाठी
मिपा परिवारचे वतीने मी विजय भुजबळ, कृषी सहायक, मुचंडी, अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या आहेतच तुम्हीही द्या ही आग्रहाची विनंती. संपर्क क्रमांक 9922901901
प्रतिक्रिया
20 Oct 2015 - 9:24 am | प्रचेतस
उत्तम माहिती नाखुकाका.
20 Oct 2015 - 9:32 am | एस
सहमत.
20 Oct 2015 - 10:08 am | अनुप ढेरे
आवडतिये मालिका!
20 Oct 2015 - 1:21 pm | जगप्रवासी
उत्तम लेखमालिका
21 Oct 2015 - 2:25 am | राघवेंद्र
धन्यवाद नाखुकाका !!!
21 Oct 2015 - 11:59 am | अजया
उत्तम लेखमालिका.वाचतेय.
21 Oct 2015 - 7:18 pm | पैसा
वाचते आहे! बंधार्यातील गाळ काढणे एकूण शेतीला सर्वप्रकारे फायदेशीर झालेले दिसते.
21 Oct 2015 - 9:05 pm | स्वधर्म
लेख व विषय अावडला. धन्यवाद.
यातील टीसीएम पाणीसाठा म्हणजे नक्की किती पाणीसाठा? टीएमसी (थाउजंड मिलीयन क्युबिक फीट) हे माप मोठ्या धरणसाठ्याचा संदर्भात ऐकलेले अाहे, पण टीसीएम नाही.
तसेच,
यात एकूण क्षेत्र जर पाच हजार असेल, तर केवळ खरीपाचे क्षेत्रच सोळा हजार कसे?
23 Oct 2015 - 11:11 am | नाखु
क्षेत्र खरीपाचे क्षेत्र १६८९ हेक्टर
लहान बंधार्यातील पाणी साठा Thousand Qubic Meter असा मोजला जातो आणि तो (थाउजंड मिलीयन क्युबिक फीट) बरेच लहान(छोटे) परिमाण आहे (मैल आणि फूट).
आधिक कल्पना खालील चित्रफीतीतून येईल
शेत तळे पाणी साठा
आजच श्री भुजबळ यांचे कडून माहीती घेतली त्या नुसार अद्द्यावत केली आहे