चारचा चहा touch screen असतो!
कपाच्या कानाला गुदगुल्या केल्या कि
आतल्याआत मस्तसे हसतो,
How's the day? म्हणून
मिश्कीलपणे विचारतो!
चारचा चहा screen saver असतो!
शरीराचा tab refresh करतो
मनाचे software update करतो,
What's on your mind? म्हणून
खोडीलपणे विचारतो!
चारचा चहा google map असतो !
मनाचा cursor global होतो
पण हातातला mouse local च राहतो
...... ............. ............ .......
............ हळूहळू चारचा चहा धूसर होतो
अरबी समुद्रापार दिसेनासा होतो......... !
प्रतिक्रिया
14 Oct 2015 - 8:46 pm | मांत्रिक
व्वा! स्टाईल बाकी स्टाईल!!!
नं. १
14 Oct 2015 - 9:15 pm | प्रचेतस
तुमच्या कविता उत्तम असतात, ही मात्र आंग्ल शब्दांमुळे खटकली शिवाय मुक्तपिठीय वाटली.
14 Oct 2015 - 9:44 pm | शिव कन्या
आणिन हो देशी शब्द!
तूर्तास तुमाला सुचतील ते द्या.
14 Oct 2015 - 9:51 pm | प्रचेतस
आम्हाला नाही हो सुचत.
14 Oct 2015 - 10:38 pm | dadadarekar
ते मराठी शब्द देतील
14 Oct 2015 - 11:52 pm | सौन्दर्य
चारचा चहा पिऊन तरतरी आली. आवडला.
15 Oct 2015 - 5:18 am | कंजूस
छान! आम्ही चहापत्तीचा चहा पितो.
15 Oct 2015 - 11:52 am | वेल्लाभट
चारचा असो की सहाचा
कप मस्त हा चहाचा
15 Oct 2015 - 12:49 pm | तिमा
पहाटॅ चारचा चहा, पहाटॅ पांच वाजता , घर सोडायला मदत करतो.
15 Oct 2015 - 2:35 pm | बाबा योगिराज
भेष्टच....
एकदम चाय, चिलम, चपाटी आठवल.
४ वाजता चहासोबत कप केक आवडीने ख़ानारा बाबा.
15 Oct 2015 - 2:35 pm | बाबा योगिराज
भेष्टच....
एकदम चाय, चिलम, चपाटी आठवल.
४ वाजता चहासोबत कप केक आवडीने ख़ानारा बाबा.
15 Oct 2015 - 4:01 pm | मनीषा
चहा अगदी हवा हवा असतो
कधीही आणि कुठेही
आरोग्यदायी पाककृती ... :))
15 Oct 2015 - 4:30 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
दमामि ने सहाचा वडा केलेला आहे आता कोणीतरी एकचं प्याला लिहिल नै का? =))
15 Oct 2015 - 5:36 pm | प्राची अश्विनी
कडक!
15 Oct 2015 - 9:26 pm | शिव कन्या
हैच चारचा चा कडक!
यातनं सहाचा वडा, बाराची बिअर निघाली!
15 Oct 2015 - 9:27 pm | शिव कन्या
हैच चारचा चा कडक!
यातनं सहाचा वडा, बाराची बिअर निघाली!
15 Oct 2015 - 9:27 pm | शिव कन्या
हैच चारचा चा कडक!
यातनं सहाचा वडा, बाराची बिअर निघाली!
15 Oct 2015 - 9:27 pm | शिव कन्या
हैच चारचा चा कडक!
यातनं सहाचा वडा, बाराची बिअर निघाली!
15 Oct 2015 - 6:29 pm | विवेकपटाईत
आमच्या हाफिसत ३.३० ला चाय आती है. सोबत बिस्कुट आणिक तळलेली (सामोसा, वडा इत्यादी). चहा पिल्या नंतर घड्याळी कडे लक्ष, सुट्टी केंव्हा होणार....
17 Oct 2015 - 2:46 pm | राजेंद्र मेहेंदळे
३.३० नंतरच घड्याळाकडे लक्ष? आम्ही ७ ला बॅग उचलली की लोक्स कुजकटासारखे विचारतात "हे काय्?आज हाफ डे?"
22 Oct 2015 - 5:37 am | शिव कन्या
चहा गोड मानून घेतलात!
सर्वांचे आभार.