"हाय"कू

नाखु's picture
नाखु in जे न देखे रवी...
7 Oct 2015 - 9:37 am

"हाय"कू

"हाय"कू
हा प्रकार समजवण्याचा नाही समजण्याचा आहे. लेखक मकदूरांना त्यांचे प्रेरणास्थान श्री श्री श्री श्री आत्मुदा (इथे आपला उजवा हात आपल्याच उजव्या आणि डाव्या कानाला लावेल न लावेल असा स्पर्श करणे अतिआवश्यक आहे).यांनी कार्यबाहुल्याने आणी किंचीत खप्पामर्जी (कट्टप्पा मर्जी नाही) असलेने मार्गदर्शनास नकार दिला.

पुणे प्रांतीही त्यांना केलेली आर्त विनवणी दुर्लक्षली गेली आणि आम्हाला अंगठा दाखविला. ( त्या अंगठ्याला चुना होता असे वल्लींचा अंदाज आहे, त्या मुळे तो अंगठा आमच्या विनवणीसाठी ठेंगा म्हणून होता का चैतन्यचूर्ण करामत हे कळाले नाही. आमच्या भीडस्त आणि कोकरू मनाने तो प्रोत्साहन "थम्स अप" या अर्थाने घेऊन समजूत घातली.)

शेवटी बॅटोबांशी संपर्क केला तर ते गारव्या यांच्या "गीतेतील ऊकार आणि मिपातील टुकार एक अन्योन्य कार्यकारण भाव” या शोधनिबंधासाठी मार्गदर्शक म्हणून व्यग्र आहेत असे समजले. आम्ही खट्टू मनाने गुरुजी प्रतीमा डोळ्यासमोर आणून पुढील काव्य-जिलेबी पीठ लावायला घेतले आणि......

खास मिपाकरांसाठी ताट सजवले.

******

ब्लॉग रद्दी
थोपु सद्दी
वाचक रिता सुना सुना
=================

धागा पिसाट
गर्दभ सुसाट
खेळ नव्याने जुना जुना
=================

भाव विभोर
हाव छचोर
साद घालीसी पुन्हा पुन्हा
==================

हळूच कट्टा
मिटवू बट्टा
भांड्याची आठवण गुन्हा गुन्हा
======================

खफ जोगवा
लेख नागवा
किंचाळे मनगटी चुना चुना
===================

अखिल मिपा "हाय"खालेल्या कुप्रसीद्ध चिमण हटेला मित्र परीवार आणि सत्कार मूर्ती जेपी संचालीत ट का मिपा साक्षर ते सु(र्)शिक्षीत योजना यांचे सहकार्याने आणि प्रोत्साहनाने.

अनर्थशास्त्रआरोग्यदायी पाककृतीइशाराकाहीच्या काही कवितागरम पाण्याचे कुंडफ्री स्टाइलभूछत्रीहास्यवाङ्मयचारोळ्याबालगीतमुक्तकविनोदऔषधोपचार

प्रतिक्रिया

दमामि's picture

7 Oct 2015 - 9:47 am | दमामि

भारी कविता
तुम्ही लिहिता
आठवे ब्रम्हेंची लुना लुना
( तेवढं एकच यमक शिल्लक होतं)

अत्रुप्त आत्मा's picture

7 Oct 2015 - 10:21 am | अत्रुप्त आत्मा

हहा हहा हहा हहा!!! :-D

गळका नळ
फाटकं टमरेल
थेंब थेंब पाणी पुन्हा पुन्हा

आगोबा रांगेत
डब्डे टांगेत
घूसखोर आहे जुना जुना

:-D

सस्नेह's picture

7 Oct 2015 - 10:42 am | सस्नेह

बुवा रॉक्स !

सरड्याची धाव कुंपणापर्यंत तशी बुवाची धाव टमरेलापर्यंत.

अभ्या..'s picture

8 Oct 2015 - 12:08 am | अभ्या..

सांगतोच सरांना.
तुम्हाला सरडा म्हणला म्हणून.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Oct 2015 - 12:25 am | अत्रुप्त आत्मा

@बुवाची धाव टमरेलापर्यंत.>> अपेक्षित निरर्थक

'अत्मरंजन' लिवायचं राहिलं काय ?

टवाळ कार्टा's picture

7 Oct 2015 - 11:59 am | टवाळ कार्टा

सिंव्हाचा गड
चोहिकडे हिरवळ
उत्कटतेस साक्षी कोना कोना ;)

सतिश गावडे's picture

7 Oct 2015 - 1:11 pm | सतिश गावडे

लेखातील हायकू प्रचंड आवडले.

प्रतिसादात इतरांनी ठिगळं लावलीच आहेत तर मी ही एका गीताची आठवण करुन देतो. गीत गायले आहे लोकसंगितातील नामवंत गायकाने. गाण्याची सुरुवात "ना"चे यमक साधणारी काहिशी अशी आहे

*(माझ्या बायकोचा)
सांगू किती मी चांगुलपणा
असल्यावरती टनाटना
नसल्यावर मग कणाकणा

*ही ओळ नेमकी आठवत नाही.

तर्राट जोकर's picture

7 Oct 2015 - 1:36 pm | तर्राट जोकर

ढळला पदर,
बाजारी गदर,
वेड लावी कुणा कुणा

कुजकट जळला
राखेत कळला
देह संपतो जुना जुना

काचेवर टकटक
बघतो एकटक
सिग्नलवर विकतो चणा चणा

आरती इथे
लक्ष तिथे
दूध जातंय का उतू क्षणा क्षणा

सतिश गावडे's picture

7 Oct 2015 - 1:46 pm | सतिश गावडे

दुसरा आवडला.
पहिल्यामध्ये "गदर" काही अर्थाने वापरला आहे की नुसताच यमकी फिलर आहे? :)

प्यारे१'s picture

7 Oct 2015 - 1:51 pm | प्यारे१

गदर म्हणजे बंडाळी किंवा हाराकिरि सदृश परिस्थिति...

अर्थ बरोबर बसतोय.

तर्राट जोकर's picture

7 Oct 2015 - 1:54 pm | तर्राट जोकर

@सतिश, प्यारे म्हणतायत तसंच.

धन्यवाद!

सतिश गावडे's picture

7 Oct 2015 - 2:00 pm | सतिश गावडे

प्यारे आणि तर्राट जोकर, आभारी आहे.

किसन शिंदे's picture

7 Oct 2015 - 1:46 pm | किसन शिंदे

हयकु मस्त जमलेत नाखुकाका.

पद्मावति's picture

7 Oct 2015 - 1:53 pm | पद्मावति

मस्तं हायकू. आवडलं.

नाखुनकाका मस्त जमलेत हायकू. इतरांचे हायकू सुद्धा त्यांच्या त्यांच्या 'सोच के अनुसार' च उतरले आहेत.

सर्वनाखुहायकुआवडलेलेआहेत।स्पेसबाररहितप्रतिसादकसंघाकडूननाखुहितार्थजारी

तुम्च्याल्याप्टोप्चाकिबोर्ड्ख्राब्झाल्लाहेब्घून्वैट्टवाट्ले :)

देवाचीमर्जीपुसातेडोळेजास्त्वाइ्टवाटु्नघेऊनकाहिविनंती;)

माझेड्वाळेपाणाव्व्ल्लेअस्सेतुम्ह्ल्लाक्कावाट्ले

वाइट्वाट्लेकील्हान्पोरेगळाकाढुन्रडतात्महणून

टवाळ कार्टा's picture

8 Oct 2015 - 12:05 pm | टवाळ कार्टा

मग्ल्हान्पोरांन्नाघेउन्खेळाय्ल्लाघेव्वून्ज्जा

जेपी's picture

7 Oct 2015 - 2:23 pm | जेपी

आवडले..

सूड's picture

7 Oct 2015 - 2:37 pm | सूड

जमलंय!

यांनी कार्यबाहुल्याने आणी किंचीत खप्पामर्जी (कट्टप्पा मर्जी नाही) असलेने मार्गदर्शनास नकार दिला.

हे फार बरं झालं. =)) तुम्ही मार्गदर्शनाशिवाय मस्त लिहीलं आहे. 'दोन कवि येती तेथे कवितेची माती' हे संतवचन लक्षात ठेवा.

शब्दवेडी's picture

7 Oct 2015 - 3:08 pm | शब्दवेडी

हायकू म्हणजे नेमकं काय? त्याचे पण प्रकार असतात का?

मधुरा देशपांडे's picture

7 Oct 2015 - 3:09 pm | मधुरा देशपांडे

:) आवडले.

प्रचेतस's picture

7 Oct 2015 - 4:14 pm | प्रचेतस

एकापेक्षा एक खतरनाक हायकू झालेत.

बॅटमॅन's picture

7 Oct 2015 - 4:38 pm | बॅटमॅन

नाखुन काका
काव्य सपाटा
काढि पिसांना पटा पटा!

दिवाकर कुलकर्णी's picture

7 Oct 2015 - 6:19 pm | दिवाकर कुलकर्णी

गद्य लेखन
पद्य लेखन
सर्व लेखन
वंद्य लेखन
ष्टाईल्च भारी है भाई

पैसा's picture

7 Oct 2015 - 6:34 pm | पैसा

=))
नाख़ुनचे हायकु
भिताय कायकु
नवलेखकाना जुने म्हणा!

अन्या दातार's picture

7 Oct 2015 - 6:42 pm | अन्या दातार

नवलेखकांना 'आपले' म्हणा हे जास्त चांगलं वाटतय

पैसा's picture

7 Oct 2015 - 6:57 pm | पैसा

ते मी नव्या बाटलीत जुनी दारु वगैरे अर्थानी म्हटले होते. हायकू मधे बरेच अर्थ दडलेले असतात ना! पण हेही चालेल!!

दिवाकर कुलकर्णी's picture

7 Oct 2015 - 7:34 pm | दिवाकर कुलकर्णी

चारोलीचे हायकु
भितोय कायकु
भ्यायास्नी आमाय हाय कि
घरा याक बायकु
( तिस इचारूण शाण लिवल्याल हाय )

उंच शीडी
चढतेय कुडी
खालचं रान ठणाणा

रांगडा गडी
धरुन तंगडी
जोर काढी खणाणा

मित्रहो's picture

7 Oct 2015 - 8:04 pm | मित्रहो

एकापेक्षा हायकू
सांगती नाखु
बाकी सारे मम म्हणा

गुर्जीँची खप्पामर्जी? ती का म्हणे?

रातराणी's picture

7 Oct 2015 - 11:53 pm | रातराणी

कालचीच स्क्रिप्ट
कालचाच बग
लंचटाइम झाला पळा पळा.

हे गुर्जीन्साठी

गुर्जी नाराज
कुणाचा आवाज
धोतर तुमचे सांभाळा सांभाळा.

रुसू नका बरे! :)

मदनबाण's picture

8 Oct 2015 - 3:27 am | मदनबाण

मस्त...

@ आत्मास्तु
हॅहॅहॅ... ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ittage Recchipodham... ;) :- Temper

dadadarekar's picture

8 Oct 2015 - 6:40 am | dadadarekar

शेतकरी मरतो
मोदी फिरतो
नवा देश पुन्हा पुन्हा

अत्रुप्त आत्मा's picture

8 Oct 2015 - 8:49 am | अत्रुप्त आत्मा

तेच पीठ
तीच जिल्बि
मती मंद तू रे जुना जुना

टवाळ कार्टा's picture

8 Oct 2015 - 12:04 pm | टवाळ कार्टा

कधी हि तेस
कधी जीनी यस
येती पुन्हा माई-नाना :)

बॅटमॅन's picture

8 Oct 2015 - 2:09 pm | बॅटमॅन

कंचाबी इश्श्यू
धरता टिश्श्यू
लावी जनां तो चुना चुना

खमके उत्तर
यमकी लक्तर
"बुवा मस्त!" म्हणा म्हणा

टवाळ कार्टा's picture

8 Oct 2015 - 2:46 pm | टवाळ कार्टा

आरारा =))

अत्रुप्त आत्मा's picture

9 Oct 2015 - 3:16 pm | अत्रुप्त आत्मा

खमके उत्तर
यमकी लक्तर
"बुवा मस्त!" म्हणा म्हणा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif

लैच भारी.. बर्‍याच दिसांनी चांगली जिल्बी खाल्ली.
हैकूदाता सुखी भव|

@दादादरेकर कसं जमतं हो तुम्हाला सगळ्या गोष्टी मोदींना चिकटवायला??

अभिजीत अवलिया's picture

9 Oct 2015 - 7:20 am | अभिजीत अवलिया

खुप चांगले आहेत हाय कू...

चौकटराजा's picture

10 Oct 2015 - 4:59 pm | चौकटराजा

बुवा रॉक्स खवट फॉक्स
करतो टॉक्स
अगोबाच्या नावाने ठणा ठणा

बाजीगर's picture

19 Oct 2015 - 3:07 am | बाजीगर

आधी ते बाबरी
आता हे दादरी,
सहीष्णूतेचा गुन्हा पुन्हा

प्यारे१'s picture

19 Oct 2015 - 4:37 pm | प्यारे१

झाला खून एक
पडती मुडदे अनेक
मरते लोकशाही पुन्हा पुन्हा

असू दे की हिंदू
असो मुसलमान
वारतो तो धर्म पुन्हा पुन्हा

हाती असो तलवार
असो ती कृपाण
चिरते ते सत्य पुन्हा पुन्हा

खाऊ आम्ही शाक
किंवा खाऊ पाव
जाई सुळी येशू पुन्हा पुन्हा

नकोच ती नीती
नको मज पंथ
जगवा माणुसकी पुन्हा पुन्हा