तर मंडळी, डोळ्यात जरा पेंग याय लागलीय. तरीबी तुमाला सांगतुच.
व्हय, बांधावरच घडलं आसं.
मी दारं धरत बसलू होतू. म्हशी लिंबाखाली बांधल्या व्हत्या. कालवाडाचं दावं जरा लांब ठिवूनच बांधलं व्हतं, न्हायतरं म्हशी त्येला ढोसरतात.
रानात चिटपाखरु नव्हतं. ह्यो ऊनाचा कार.
तेवढ्यात लाईट गीली. कटाळा करत उठलू, आन हीरीवर मोटर चालु कराय चाललू.
जाताना वाटत शितली दिसली.बहुतेक खुरपाय चालली व्हती. घट्ट साडी नेसली व्हती, आंग कसं एकदम भरल्यालं वाटत हुतं. सरळ माझ्याकडचं येत चालली.
"कारं राजाभाव हीरीवर चालला व्हय?" हातातलं खुरपं डोक्यावर धरत तिनं ईचारलं.
"व्हय, लाईट गीलती, बघतू आलीय का, मक्यावर पाणी सोडलयं" मी बी आपलं टावेलानं तोंड पुसत पुसत बोललू.
"बराय बाबा, पाणी तरी हाय हीरीला, बायकु कुठं दिसत न्हाय?" हीला नस्त्या चौकश्या.
"आसलं घरीच , घर सारवाय काढलयं"
"सरपानाला काय आसल तर बघु कारं? सकाळच्याला पाणी तापवायला हुईल तेव्हढचं" आस्सं, म्हंजी हीला सरपानाला आमचचं शेत घावलं तर.
"आगं बघकी, त्या तिथं एक बाभळ वाळलीय, बघ काय घावतयं का, काटकुटं बघुन जा" म्या तिला वाट मोकळी करुन दिली.
तशी शितली पुढं गीली. ही शितली मजी पवाराच्या रामाची बायकु. बाय नुसती उफाड्याची. माझ्यासंग आपणहुन बोलायची.
मी आपला बुजरा गडी, परक्या बायशी बोलताना जरा चार हात लांबच ऱ्हायचू. पण ह्या शितलीसंग गुलुगुलू बोलू वाटायचं. लय दिसापस्न नजर ठिवून व्हतु पर काय हातात घावली न्हाय.
हिरीवर गीलु. लाईट आली नव्हती. थुडी वाट बघुन परत मळ्यावर आलू.
शितली खुरप्यानं लाकडं तोडत व्हती.
म्या उगाच इचारायचं म्हणून ईचारलं.
"काय गं, इकटीला येवडा भारा झेपल का? नस्ता न्हीव लागतू घरापतुर"
"कशाला राजाभाव, मला सवय हाय, तसबी सरपान सांच्यालाच न्हेनार हाय, आता नुसतचं बांधून ठिवतीय"
"आसं, मग आता कुठं दौरा हाय?"
"लय ऊन झालय बघ, आता पलिकडं माळयाच्या खोपीत जाऊन पडणार हाय, तेवढच बरं वाटतं जीवाला, सांच्याला जाताना ह्यो भारा बी घीऊन जाईन"
आयला बराय हीचं, माळ्याच्या खुपीत आतापतुर हरीभाऊचा कब्जा हुता. पण म्हातारं गेलं पंधरा दिवस लेकीकडं गेलतं. खुपीत आता कोणच न्हवतं. मी पण ऊन्हाचं तिकडचं पालथा पडायचू.
शितलीनं भारा बांधुन लिंबाच्या झाडाखाली ठिवला. साडीवरनं पालापाचुळा झटकला.
म्हशीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली "कालवाड का लांब बांधलीयं? सावलीत बांध की लिंबाच्या"
"आगं म्हशी ढोसऱ्यात्यात, सारखं त्यंच्यावर ध्यान ठिवाय लागतं"
" बरं राजाभाव, जाव कारं? डोकं लय ठणकायला लागलयं, ह्या उनात नकू नकू झालयं" शितली खुपीकडं जात जात म्हणाली.
"चालतयं की, मी हाय हीतच, काय लागलं तर सांग" मी आपला तिला पाठीमागनं बघत बोललू.
शितली बांधावरनं खुपीकडं निघाली, जरा पुढं गीली नसल तर मधनचं माझ्याकडं वळुन बघत म्हणाली "आली आसल तुला बी झोप तर यी रं म्हागणं, खुपीत लय जागा हाय".
डुलक्या चालीनं शितली पुढं पुढं जात ऱ्हायली. माझ्याकडं एकदा नजर रोखुन झटक्यात खुपीत शिरली.
मायला हीचा डाव समजायला जरा येळच लागला. पर शेवटी हातात घावलीच म्हणायची.
शितली खुपीत झुपली आसलं. मलाबी थुडी जागा ठिवली आसलं. आता डोळ्याला बी जरा पेंग याय लागलीय. तवा मंडळी, मी हाय खुपीत , तुम्ही तेवढं म्हसरावर लक्ष ठिवा.
प्रतिक्रिया
21 Sep 2015 - 11:52 pm | दिवाकर कुलकर्णी
आमी ठिवतो म्हसरावर लक्स,तुमी म्होर चं ऐकवा
22 Sep 2015 - 12:06 am | अभ्या..
तुम्ही रामभाव का राजाभाव?
का असा दुजाभाव?
22 Sep 2015 - 12:30 am | जव्हेरगंज
चुक रिपेअरींगला पाठवली आहे.
धन्यवाद.
22 Sep 2015 - 6:45 pm | द-बाहुबली
जव्हेरगंज म्हणजे काय हो ?
22 Sep 2015 - 6:51 pm | अभ्या..
कडब्याची कशी गंज असते तशी जवाहिरांची गंज. लै मोठी लठठ असते. ;)
22 Sep 2015 - 6:53 pm | अभ्या..
किंवा रत्नाने जवाहिराने मढवलेला गंज असतो. भगुनं आसतं ओ एक उंच. ताक घुसळऊन ठ्येवत्यात त्यात.
22 Sep 2015 - 6:54 pm | अभ्या..
नायतर हिरे मोती ह्यांना गंज लागला की जो चुरा पडतो त्याला जव्हेरगंज म्हणत्यात.
22 Sep 2015 - 11:29 pm | जव्हेरगंज
मायला, या ढेपिनिशन्स कुटुन पाडल्या म्हणायच्या. का म्हुन गरीबाच्या आयडीमागे लागलाय. लैच आवाडल्याला दिसतुय.
मग चालु द्या.. :)
23 Sep 2015 - 1:33 pm | द-बाहुबली
जब कोइ मिपाकर होताहय तब वह गरीब श्रीमंत नही होता... वह सिर्फ मिपाकर व्होताहै. जरा जव्हेरगंजचा अर्थ इस्कटुन सांगाकीराव..
25 Jan 2019 - 9:18 pm | जव्हेरगंज
वाघुळमानसास ब्हवतेक माहीत आसल.
जय हिंद.
23 Sep 2015 - 8:31 pm | द-बाहुबली
का तुम्हास्नी ठाव नायी ?
काहीहीं हं ज....
26 Sep 2015 - 7:19 pm | अनिता
दत्ताजी शिंदे यांच्या हत्तीचे हे नाव होते.
ह्या जव्हेरगंज देखील मीपा च्या गर्दीत घुसला आणि धमाल उडवली!
26 Sep 2015 - 7:32 pm | जव्हेरगंज
तुम्हीच का त्या? खफवर माझं पहीलं कोडं सोडविण्याऱ्या? कधीपासुन शोधतोय तुम्हाला. अहो हेच नामाचा ईस्कुट करायला. :)
22 Sep 2015 - 6:52 pm | कैलासवासी सोन्याबापु
जव्हेरगंज!!
एक गाव बारा भानगडी भारी पकड़ताय गावात!!! आम्ही बारके होतो तवा एकाच्या कांद्याच्या चाळीत अन एकाच्या कापसाच्या गंजीत असले चमत्कार चिक्कार पाहिलेत! एकदम आठवले!! :D :D
22 Sep 2015 - 7:04 pm | प्यारे१
गावातल्या बर्याच जनांच्या गुडघ्यांवर जखमा दिसतेत. काय कारन म्हायत्ये का? ;)
22 Sep 2015 - 7:13 pm | संजय पाटिल
तुमी समध्या गावाचे गुडघे तपासुन र्हायलाय जनु?
22 Sep 2015 - 8:06 pm | प्यारे१
बघायला कशाला पायजे ?
फुटके गुडघे म्हणजे शान असते गावात. म्हाईत न्हाई काय? ;)
22 Sep 2015 - 8:25 pm | पीके
आयला, आसं पण आसतय व्हय?
आमचं तर गुड्घं आनी कोपरं पन पार सोलुन निघलं व्हतं....
ल्हान पनी कब्बडी, खोखो आनी पकडापकडी लय खेळायचू राव, त्याची आठवन झाली..
22 Sep 2015 - 9:00 pm | प्रभाकर पेठकर
त्ये पकडापकडीच नडलय बगा!
22 Sep 2015 - 7:28 pm | दमामि
जरा त्ये क्रमशः लिवायचं राह्यलं बघा!
22 Sep 2015 - 8:28 pm | पीके
त्ये इलच हो, पण त्यो टक्या कुठं हाय?
23 Sep 2015 - 10:38 am | दमामि
टक्या म्हनलं, जरा मिपावर लक्ष ठेवा ....
25 Sep 2015 - 8:41 am | जव्हेरगंज
ही 'टक्या' नक्की काय भानगड हाय?
कुणी सांगल काय? :)
22 Sep 2015 - 9:01 pm | प्रभाकर पेठकर
कथेचा ग्रामिण बाज (आणि अर्थात तपशिल) भारी आवडला बघा.
23 Sep 2015 - 9:20 am | शित्रेउमेश
मस्त
23 Sep 2015 - 10:06 am | चाणक्य
एक नंबर.
23 Sep 2015 - 11:51 am | तुषार काळभोर
भाषा, वागणं येकदम डिट्टेलवार वर्णन.
भाग दुसरा??
23 Sep 2015 - 8:28 pm | जव्हेरगंज
टाकु काय? :)
23 Sep 2015 - 8:50 pm | चाणक्य
झोप झाली आसल खुपीत तर टाका. शितली बी जाईन आता उन्ह उतरल्यावर. तवा तुमाला येळ गावलच.
24 Sep 2015 - 11:53 am | जव्हेरगंज
जरा आजुन एक डुलका काढु द्या.
मग टाकतु म्होरचा भाग. लय घाय तुमास्नीबी:)
24 Sep 2015 - 12:00 pm | प्यारे१
हे तर सांटा बांटा च्या पुढचंय.
सांटा आपल्या GF ला सांगतो घरला ये कुनीच नाही. ही येऊन बघते तर दाराला कुलूप.
काढ़ा तुम्ही डुलका च काढ़ा
24 Sep 2015 - 12:16 pm | जव्हेरगंज
लगता हय हमारे डुलके का मतलब आप ठिक से समजे नही भाय :)
अब सगळच ईस्कटनेका दिल नही करता हय.:)
सांभ्याळयो.
24 Sep 2015 - 12:24 pm | प्यारे१
नशीब. लयनीवर हायसा. बाकी झापा ज़रा नीट लावून घ्या. आनि काय उनाची तिरीप येत असली तर समदे कवडसे लिपून घ्या जा. काय त्ये मोबाइल मंदी रिकार्ड हुतंय बगा हल्ली. म्हंजे तुमि असनार झोपंत. उगा काय तरांगडं नको गया!
24 Sep 2015 - 12:27 pm | चांदणे संदीप
त्या खुपीकड बगा आधी, तीच लय इस्कटली आसन! ;)
23 Sep 2015 - 8:48 pm | दा विन्ची
लई वेळा टाका राव.
तुमास्नी म्हाईत नसल पण खुपीला मागच्याबाजूला एक बारकी फट हाय . तिथं आमी काल पस्न थांबलुया.
23 Sep 2015 - 8:53 pm | एक एकटा एकटाच
जबरी प्रतिसाद
25 Sep 2015 - 9:51 am | फारएन्ड
जबरी :)
25 Sep 2015 - 10:50 am | अभिजीत अवलिया
जबरदस्त. कथेचा ग्रामीण बाज खूप आवडला. बाकी क्रमशः टाकायचे राहून गेले का?
25 Sep 2015 - 11:52 am | बाबा योगिराज
है हा हुर्रर्र......च च च
वो जव्हेर भौ, तुमची म्हैस् सुटली ओओओओ.
आर कूड़ै,
माळ्याच्या खुपीकड चाल्ली ओओओओ
25 Sep 2015 - 5:51 pm | जव्हेरगंज
कायबी करा, पर लवकर धरा. तिला खुपीकडं येऊ देऊ नकासा.:)
25 Sep 2015 - 6:27 pm | बाबा योगिराज
हो हो हो हैं हैं हैं.......
.
वो तुमची म्हस मारू रायली ना वो.....
सांभाळा तिला.
25 Sep 2015 - 6:33 pm | जव्हेरगंज
एखादा 'रेडा' दिसतुय का बघा तिथं. त्याशिवाय न्हाय आता ती शांत व्हायची.:)
25 Sep 2015 - 6:51 pm | बाबा योगिराज
आता ह्ये बी आमिच कराच का???
25 Sep 2015 - 12:00 pm | नाखु
भाग कधी ?????
25 Sep 2015 - 12:46 pm | प्यारे१
काय नाखु काका,
तुम्ही पण?
याचा काय दुसरा भाग असणार आहे?
आपापले हत्ती घोड़े गाढ़वं फुर्फुरवा आणि ठोका...धाव कल्पनेच्या विस्तृत झोपडीत. जिथं नसेल कुठल्याही बंधनाची म्हस जिच्यावर ठेवावं लागेल तुमचं....लक्ष ;)
26 Sep 2015 - 9:34 am | नाखु
उगा श्रीरामाने विंट्री मारून मा(सा)ज करण्यापेक्षा यांनाच चान्स द्यावा अशी समस्त वाचक वर्गाची इच्छा आहे.
अभामिपादुस्राभाग्नियमीत्वाचक्समीक्षक्भशक्प्रतीक्षा संघ संचालीत जे पी मित्रंमंडळ सह्कार्याने दमामी यांनी चालीवलेली संयुक्त साहीत्य चळवळ.
26 Sep 2015 - 10:34 am | ज्ञानोबाचे पैजार
शितली अन राजाभाउच काय चाललय ते मी अन दा विन्ची बाभळी मागुन बघत हुतो. "म्या दा विंचीला म्हटलो आज राजाभाऊ बार उडवतय बघ." त्यो म्हणाला "अरं राजाभाऊ नुसतच बोलबच्चन हाय. ऐन टायमाला गडी गळफाटतोय बघ" त्याची न माजी पाच पाच रुपयांची शर्यत लागली. म्हनुन मग खुपीच्या मागच्या बाजूच्या फटिला म्या अन दा विन्ची डोळ लावुन बसलो.
शितली लगबगीने खुपीत शिरली आनी तिच्या मागुन राजाभाऊ धोतार वर करीत आता आलं. दा विन्ची म्हणाला "बेन खाल मुंडी अन पाताळ धुंडी निगालं, एवडा बाराचा असल अस वाटल नव्हता गड्या." मी म्हणालो " आता गप ऱ्हां उगा गडबड करू नकु न्हायतर सगळा इस्कोट होईल."
शितली लई लाडात आलती. तिनी लाजत लाजत राजाभाऊ कडे फायल आणी पदराशी चाळा करता म्हनाली "नुसता बघत काय हुबा रायलाया शरट काडा कि" राजाभाऊ ने लगबगीने शर्ट काडला आणी तिकडच खुटीला लावला.
शितली राजाभाऊच्या आणखी जवळ सरकली आनी म्हनली "त्यो बनेल बी काडा ना ...." राजाभाऊने झटकन बनेल बी उतरवला.
शितली लई खुश झाली आणी मोठ्यांदा म्हनाली " ए शिरप्या आता बाहेर ये, हे बघ दूद प्यायल न्हाई की ह्ये असा होत. बाग कशी एक एक बरगडी दिसतीय. म्हनुन सारक सांगत असतोय रोज दुद पिता जा. आता ऐकशीलना माज्या बाळा? पिशील ना रोज दूद? "
म्या दा विंचीचे तोंड घट दाबुन धरलं तरी पन राजाभाऊला चाहुल लागलीच .
आता त्यो चप्पल घेउन आमच्या माग पळत येतुया.
आमचीबी म्हसर जरा तुमी बागा आम्ही आलुच.....दा मिण्टात
पैजारबुवा,
26 Sep 2015 - 10:38 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
दं ड व त.
अगगगगग!!! _/\_!!!!! ठ्ठो!!!
26 Sep 2015 - 11:28 am | चांदणे संदीप
ठ्ठो! ख्वाह्याइङ्ग! होहोहोहोहो!
वारलो!
26 Sep 2015 - 12:02 pm | बाबा योगिराज
पैजारबुआ __/\__
ख्या ख्या ख्या... बाब्बो मेलो ना....
26 Sep 2015 - 12:13 pm | प्यारे१
सप्तरंगी पोपट कसा दिसतो याचे तंतोतंत वर्णन.
26 Sep 2015 - 12:40 pm | बोका-ए-आझम
पैजारबुवा की जय!
26 Sep 2015 - 6:13 pm | जव्हेरगंज
समदा इस्कुटचं केला की राव! बाकी आमच्या अेठ पॅक्सला बरगड्या म्हटल्याबद्दल शितलीचा निषेध...!
-(पळुनपळुन दमलेला) राजाभाऊ
26 Sep 2015 - 6:30 pm | पैसा
=)) =))
26 Sep 2015 - 12:26 pm | ज्योति अळवणी
मस्त गावरान भाषेचा बाज. आवाडली
26 Sep 2015 - 10:14 pm | दा विन्ची
दं ड व त.
अगगगगग!!! _/\_!!!!! ठ्ठो!!!
26 Sep 2015 - 10:31 pm | दा विन्ची
पैजारबुवा तुमी एवढ चालू असशीला आसं वाटल न्हवत . सुमडीत आणि बाकी ग्यांग्ला पद्धतशीर टांग मारून तुमी कवा आला ते मला कळलंच न्हाई बघा.
हेच्या म्होर गावातलं कोन्च्बी लफड तुमाला पत्त्या लागू देणार न्हाय बघा
27 Sep 2015 - 12:59 am | भीडस्त
पर तुम्ही शीतलीवं बईद्वार ध्यान ठिवा सोयरं
कसं ह्ये कनि
बाईचं खुरपं लयीच् वाखं ह्ये.....
खुरप्यानि डायरिक बाभळिची लाकडं तोडिती म्हयी काय खरं नाय पघा....
तुम्ही आपला आयवज सन्भाळून ठ्वा.......
उगं दहा मिंटापाई
हावय ग्येली नं धावय गेली
आसं म्हणित आयुश्यभर त्वोंड झोडून घ्याया लागण् पघा..
27 Sep 2015 - 11:39 am | जव्हेरगंज
खुरपं भाऱ्यापशीच ठिवलयं पघा तिनं, लिंबाखाली नव्हं. ( बाभुळ म्होरल्या अंगाला, घ्या पघुन)
तवा आयवजाला काय ईशेष धोका न्हाय.
धा मिंट्ट? ह्या, आता सांच्यापतुर ताणुन देणार हाय!
27 Sep 2015 - 1:03 am | भीडस्त
खुरपं न बाभळ पघाया भेट्न का?