महाभारताचे जीवन सार: (भाग १)

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
24 Aug 2015 - 11:53 am

महाभारतात संपूर्ण जीवनाचे सार सामावले आहे. महाभारत कथा जीवनाच्या प्रत्येक विषय आणि अंगाला स्पर्श करते. मी एकेक करून ते आपल्यापुढे मांडत आहे, अर्थात जसे मला ते जाणवले किंवा समजले तसे! - निमिष सोनार - पुणे (sonar.nimish@gmail.com)
#महाभारताचे_जीवन_सार: (भाग १) सतत एखाद्या व्यक्तीचा पक्ष घेणे किंवा त्यांची बाजू (चूक असली तरी) आयुष्यभर घेत राहणे याचे दुष्परिणाम चांगलेच आपल्या लक्षात येतात. अधर्म दिसत असूनही भीष्माने आयुष्यभर कौरवांची बाजू घेतली किंबहुना त्याला घ्यावी लागली, भलेही मनातून त्याला पांडव चांगले वाटत होते. आपल्याच नातवांमध्ये सत्याने वागणारे पांडव दिसत असूनही धृतराष्ट्र आणि दुर्योधनाच्या दबावाखाली आणि त्यांनी घेतलेल्या काही शपथेपायी त्यांनी चुकीच्या व्यक्तींचा म्हणजे कौरवांचा पक्ष घेतला आणि पांडवांना त्याचे नुकसान सोसावे लागले. म्हणजे मनात वेगळे करायचे पण करावे लागते वेगळेच असे मानसिक द्वंद्व भीष्म सोसत राहिले. पण शेवटी देव (कृष्ण) सत्याचा वाली असतो.
मग देवाने पांडवांची बाजू घेतली आणि विजय सत्याचा झाला आणि होतोच. कुणाच्या बाजू घेण्याने अथवा न घेण्याने सत्य बदलत नाही. आजच्या जीवनात सुद्धा आपल्याला तेच दिसते. नि:पक्षपातीपणा आजकाल क्वचितच आढळतो. सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात कुणीतरी प्रभावशाली माणूस नियम लावताना "बाजू" कुणाची आहे हे पाहून निर्णय देत असतो. म्हणजे बाजू पाहून नियम वाकवले जातात. नियमांचा उपयोग स्वत:च्या फायद्यानुसार वाकवून केला जातो. नावडतीचे मीठ अळणी असा काहीसा हा प्रकार आहे. राजकारणात याहून वेगळे चित्र नाही. सत्ताधारी कोणत्याही राजकीय पक्षाचे असो, पण सत्ताधारी चांगले निर्णय घेत असले तरी फक्त विरोधाला म्हणून विरोधी पक्षाकडून नावाला शब्दशः: जागून विरोध केलाच जातो आणि चांगल्या गोष्टी अमलात आणल्या जात नाहीत आणि सत्याचा विजय व्हावा अशी वाट बघणारा सामान्य माणूस त्याची आशा गमावून बसतो. "विरोधी पक्ष" असे नाव बदलले आणि "देखरेख पक्ष" असे नाव ठेवले तर? मानसिकतेत बदल होईल का?

धर्मसमाजजीवनमानप्रकटनविचारआस्वादसमीक्षामत

प्रतिक्रिया

अद्द्या's picture

24 Aug 2015 - 12:41 pm | अद्द्या

"विरोधी पक्ष" असे नाव बदलले आणि "देखरेख पक्ष" असे नाव ठेवले तर?

^^

काय फरक पडेल नाव बदलल्याने ?
माझं नाव मी क्लार्क केंट ठेवलं तर मी superman होणारे का ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Aug 2015 - 7:12 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

माझं नाव मी क्लार्क केंट ठेवलं तर मी superman होणारे का ?

हॅ हॅ हॅ हॅ हॅ!!!!

कळावे आपलाच
-जॉनी डेप-

बॅटमॅन's picture

26 Aug 2015 - 4:20 pm | बॅटमॅन

हॅ हॅ हॅ हॅ हॅ!!!!
कळावे आपलाच

-ब्रूस वेन-

dadadarekar's picture

25 Aug 2015 - 9:36 am | dadadarekar

विरोधी पक्षाने देखरेख करायची.

सत्ताधारीने काय करायचे ?

निमिष सोनार's picture

24 Aug 2015 - 12:46 pm | निमिष सोनार

व्यक्तिगत जीवनात सकारात्मक भाषा आणि शब्द वापरून पाहा. प्रयत्न करून पाहा. बदल होतोच..
हे वाचा:
http://www.misalpav.com/node/25747

प्रसाद गोडबोले's picture

24 Aug 2015 - 3:13 pm | प्रसाद गोडबोले

लेख वाचुन डोळ्यात पाणी आले !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Aug 2015 - 7:13 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अगदी अगदी. तीन बादल्या भरल्या मी आत्ताच.

अत्रुप्त आत्मा's picture

25 Aug 2015 - 7:31 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif

_मनश्री_'s picture

24 Aug 2015 - 3:22 pm | _मनश्री_

कसल जीवनाच सार
सत्ता आणि पैशासाठी नाती विसरून एकमेकांचे जीव घ्या , मग समोर तुमचा आजोबा असो किंवा गुरु

मला पांडव प्रकर्षाने धर्मराज युधिष्ठिराचा तर भयंकर राग येतो …
स्वतःच्या बायकोला पणाला लावले आणि हा म्हणे धर्मराज

आणि बायको म्हणजे काय खेळण वाटल काय ५ जणात वाटून घ्यायला

प्रदीप साळुंखे's picture

24 Aug 2015 - 3:56 pm | प्रदीप साळुंखे

पण जर द्रौपदीने ठाम भूमिका,आणि काय ते स्त्रिया घेतात ती दुर्गावताराची कडक भूमिका घेतली असती,तर कोणी कशाला बायको वाटून घेतोय?
एका हाताने टाळी वाजत नाही हो!
आणि काय ते म्हणे कुंती सांगते जे काही आहे ते पाचजण वाटून घ्या.आणि पुर्वजन्मात म्हणे पाच पती मिळण्याचे वरदान मिळाले?
छे छे असं कोठे असतं काय?

हेमंत लाटकर's picture

25 Aug 2015 - 3:16 pm | हेमंत लाटकर

कुंतीला माहित होते स्वयंवर अर्जुनच जिंकणार. कुंतीला कौरवांचा सुड घ्यायचा होता त्यासाठी पाच भाऊ एकत्र राहणे आवश्यक होते. द्रोपदी सुंदर होती तिच्यामुळे पाच भावात फुट पडू नये म्हणून कुंती पाच भावात वाटून घ्या असे म्हणाली. पंडू कुंती व माद्रिसहित वनसावात गेले. तेथे देवाला आवाहन करून कुंतीला यमापासून युधिष्टर, वायुपासून भीम, इंद्रापासून अर्जुन तसेच अश्विनीकुमारापासून नकुल व सहदेव झाले. हिमालयाच्या पायथ्याशी त्याकाळी काही जाती मध्ये बहुपति पद्धत अस्तिवात होती. चार किंवा पाच भावात एक पत्नी असायची.

हेमंत लाटकर's picture

25 Aug 2015 - 3:20 pm | हेमंत लाटकर

अश्निणीकुमारापासूम माद्रिला नकुल व सहदेव झाले.

द-बाहुबली's picture

24 Aug 2015 - 3:37 pm | द-बाहुबली

आपण श्शक मधे महाभारत रचायचा प्रयत्न का बरे करुन बघत नाही ?

एकदम टकाटक आयड्या...ब्राव्हो!

१. एक पक्ष्याचे जोडपे संभोग करत होते. एका पारध्याने बाण मारला. त्याला शाप मिळाला.

२. एक हरणाचे जोडपे संभोग करत होते. पांडूने बाण मारला. त्याला शाप मिळाला.

तात्पर्य : दुसर्‍याच्या संभोगात अडथळे आणू नयेत.

अत्रुप्त आत्मा's picture

25 Aug 2015 - 7:28 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/object/pen-2-smiley-emoticon-emoji.gif

द्वि-पात्री सार करून बघाल का? मग हळु हळु पंचपात्री वगैरे करूयात.

माम्लेदारचा पन्खा's picture

26 Aug 2015 - 1:05 pm | माम्लेदारचा पन्खा

एक हरणाचे जोडपे संभोग करत होते. पांडूने बाण मारला. त्याला शाप मिळाला

कोणता हो?

अत्रुप्त आत्मा's picture

26 Aug 2015 - 2:28 pm | अत्रुप्त आत्मा

@ कोणता हो? >> http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-smiley-face.gif

अन्या दातार's picture

26 Aug 2015 - 2:10 pm | अन्या दातार

कुणाच्या बाजू घेण्या-न घेण्याने फरक पडत नसेल तर कृष्ण कौरवांच्या बाजूने असता तर काय झाले असते असा एक प्रबंध लिहा ना सर.

सोनार सरांचा पंखा
अन्या