मसाण

कोमल's picture
कोमल in जनातलं, मनातलं
12 Aug 2015 - 3:12 pm

कहानी शुरू होती है एक पोर्न से।

देवी. एका कॉम्प्युटर क्लास मधली ट्यूटर. तिच्या एका मित्राकडे, पियुषकडे आकृष्ट होते. लैंगिक संबंधांचे कोडे उलगडण्यासाठी ती पोर्न पाहून पियुषसोबत एका स्वस्तातल्या लॉज मध्ये जाते. तिथे अचानक पडलेल्या पोलिसांच्या धाडीला घाबरून पियुष आत्महत्या करतो. पोलिसांनी या धाडीचा विडिओ बनवलेला असतो. त्यांपैकी एक इन्स्पेक्टर मिश्रा, देवी आणि तिच्या वडीलांपुढे एक मार्ग ठेवतो;

३ लाख रुपये द्या, कोर्ट-कचेरी आम्ही पाहून घेऊ नाहीतर तिचा विडिओ इंटरनेट वर टाकू.

विद्याधर पाठक; देवीचे वडील हे संस्कृत प्रोफेसर असतात आणि गंगाघाट वर धार्मिक साहित्य पण विकत असतात. मग सुरु होतो देवी आणि विद्याधर यांचा पैसे उभे करायचा लढा.

त्याच वेळी वाराणसी मधेच अजून एक प्रेमकहाणी सुरु होते. पॉलीटेक्निक मध्ये सिविल शिकणारा दीपक आणि कविता, शायरी यांची खूप आवड असणारी चुणचुणीत मुलगी शालू.

तू किसी रेल सी गुजरती है, मै किसी पूल सा थरथरता हुं।
तू भले रत्ती भर ना सुनती है, मै तेरा नाम बुड्बुडता हुं ।

दीपक अत्यंत हुशार पण गंगेच्या काठावर अंत्यसंस्कार करणाऱ्या घरातला खालच्या जातीतला असतो तर शालू उच्च जातीतली गुप्ता घरातली असते. दीपक शालूला प्रेमाची कबुली देत मागणी घालतो आणि शालू पण स्वीकारते.
दीपक त्यांच्या कुळातल्या अंतरांबद्दल पण सांगतो, शालूला याने फरक नाही पडत,

'तुम कहीं अच्छी नौकरी पकडलो, फिर भागना भी पडा तो भाग जायेंगे'.

तिच्या या पाठबळाने दीपक जोमाने कॅम्पस इंटरव्युव्जच्या तयारीला लागतो.

तिकडे विद्याधर पैशांची जुळवाजुळव करतांना स्वतः बनवलेल्या तत्वांना बगल देऊन एक प्रकारच्या सट्ट्यात उतरतो. गंगेच्या किनारी पोरेसोरे एक खेळ नेहमीच खेळतांना दिसतात, पाण्यात उड्या मारून नदीतले पैसे गोळा करण्याचा. अशाच पोरांवर मोठी माणसे सट्टा खेळतात; कोण किती पैसे गोळा करून आणेल याची बोली लागते. विद्याधरकडे कामाला असलेला अनाथ 'झूटा' या खेळात तरबेज असतो आणि खेळ खेळू द्यावा म्हणून कायम विद्याधरची मनधरणी करत असतो, विद्याधर कायम या खेळाला 'जुआं' म्हणून टाळत असतो. पण पैशांची चणचण विद्याधरला इकडे खेचून आणते. एकावेळेस विद्याधर खूप मोठी बाजी झूटावर लावतो. पण पैसे आणायला पाण्यात उडी मारलेला झूटा वर येत नाही. बेशुद्ध झूटाला बाकी पोर बाहेर काढतात. बेशुद्ध पोर, बुडालेले पैसे आणि गांजलेला विद्याधर. हॉस्पिटल मध्ये झूटाला शुद्ध येते,

मेरे वजह से आपके पैसे डूब गये ना. ये देखिये मुझे क्या मिला. अब ये आपका.

तो विद्याधरला नदीत सापडलेली सोन्याची अंगठी देतो.

देवीला कॉम्प्युटर क्लास मधली नोकरी सोडावी लागते आणि एका खाजगी ऑफिसमधली रिसेप्श्निस्टची नोकरी 'देगी क्या' अशा थेट प्रश्नांना वैतागून ती सोडते. शेवटी रेल्वेमध्ये तिकीट काउंटरवर तात्पुरती नोकरी मिळते आणि पाठक कुटुंब पैशाचा प्रश्न सोडवतात.

एका रात्री दीपक चे वडील त्याला घाटावर बोलावतात,

प्रेतांची रांग आहे मदतीला ये.

प्रेताची कवटी फोडण्यासाठी मदत करत असतांना तो ऐकतो,

तीर्थयात्रेला जाणाऱ्या कुटुंबाची बस नदीत पडली, कोणीच नाही वाचलं.

नविन मांडलेल्या चितेवर कोणीतरी शालूला आणून ठेवत.

विद्याधर ३ लाख मधला शेवटचा हफ्ता इन्स्पेक्टर मिश्राला देतो.
गंगेकाठी दीपक आपल्या मित्राच्या कुशीत धायमोकलून रडतो.
देवी पियुषच्या कॉलेज मधून त्याच्या घरचा पत्ता मिळवते.

काही दिवसांनी दीपकला अलाहबादमध्ये नोकरी मिळते.
देवी रेल्वेमधली नोकरी सोडून अलाहबादला पुढच्या शिक्षणासाठी जाते.

देवी पियुषने दिलेलं गिफ्ट गंगेत सोडायला संगमावर येते आणि पहिल्यांदाच पियुषसाठी मनमोकळं रडून घेते. तिथेच आलेला दीपक तिला पाणी देतो.

दोन नद्यांच्या एक होण्याच्या ठिकाणी जायला ते दोघे मिळून एका होडीत बसतात.

रिचा चड्डाने देवी च्या भुमिकेला न्याय दिला आहे. संजय मिश्रांनी हुशार प्रोफेसर तरी हताश बाप विद्याधर हुबेहूब उभारला आहे.
श्वेता त्रिपाठी आणि विकी कौशल या दोघांनी शालू आणि दीपकचे प्रेम छान साकारले आहे.
नीरज घायवान याचं दिग्दर्शनातले पदार्पण मसाण सारख्या जबरदस्त कथेने झाले आहे. प्रेक्षकाला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य कथेत, दिग्दर्शनात आणि कॅमेऱ्यात नक्कीच आहे.

प्रचंड भावनिक असूनही चित्रपट कधीच रडवणारा नाही वाटत. त्या भावनांची, वास्तविकतेची खोली मनात घर करून जाते.
नीरजने याआधी 'ग्यांग्ज ऑफ वासेपूर'च्या सहाय्यक दिग्दर्शकाचे काम अनुराग कश्यप साठी केले होते.
मसाण मध्ये त्याने वाराणसीच्या भाषेचा लहेजा, अंत्यसंस्कार आणि मुख्य म्हणजे गंगाघाट याच्या डिटेलिंगवर उत्तम काम केले आहे. वरुण ग्रोवर यांची कथा आणि 'तू किसी रेल सी ', 'मन कस्तुरी रे, जग दस्तुरी रे' ही गाणी एक छाप नक्कीच सोडून जातात.

'Fly away solo' या नावाने कान्स/कान महोत्सवात उतरून या चित्रपटाने क्रिटिक आणि 'Promising Future' असे दोन पुरस्कार मिळवले आहेत.

आता तुम्हीही पाहून सांगा तुम्हांला मसाण चित्रपट कसा वाटतो ते

नाट्यसमाजजीवनमानदेशांतरचित्रपटसमीक्षाअनुभवमत

प्रतिक्रिया

बाबा योगिराज's picture

12 Aug 2015 - 3:20 pm | बाबा योगिराज

परिक्षन तर छान आहे. जमेल तसा बघेन.

विशाल कुलकर्णी's picture

12 Aug 2015 - 3:29 pm | विशाल कुलकर्णी

खुप जणांकडून ऐकलं आहे. त्यात रिचा चड्ढा आणि संजय मिश्रा हे दोघेही प्रचंड गुणी कलाकार. संजय तर आवडता कलाकार त्यामुळे पिक्चर पाहणार हे नक्की. या विकांताला जाईन बहुदा.
परिचयासाठी धन्यवाद !

जडभरत's picture

12 Aug 2015 - 3:36 pm | जडभरत

एकदम छान परिचय दिलात!
सादरीकरण ताकदवान असणारच! कथाही वेगळी! बघणार नक्कीच!

अभ्या..'s picture

12 Aug 2015 - 3:38 pm | अभ्या..

छान परिक्षण.
कथा जबरदस्त दिसतेय.
पाहू जमल्यास.

किसन शिंदे's picture

12 Aug 2015 - 7:40 pm | किसन शिंदे

कोण कोण?

अभ्या..'s picture

12 Aug 2015 - 7:45 pm | अभ्या..

आयला किसना तू पण.
चला जाऊया.
तू तिकीट काढ. म्या पॉपकॉर्न खातो (च्यायला हे 'मी पॉर्न पाहतो' चालीवरचे वाक्य वाटायले)

प्यारे१'s picture

12 Aug 2015 - 9:09 pm | प्यारे१

आयला अभ्या तू पण????

किस्नानं पॉपकॉर्न पुडा हातात धरलाय आणि अभ्या (डब्या) त्याच्या शेजारी (कसा त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही) बसून एकेक पॉपकॉर्न खातोय असं चित्र डोळ्यापुढे आलं.

हलकं घ्या रे !

कोमल, छान परीक्षण.
चित्रपटाचं नाव आजच वाचलं. मिळाल्यास पाहूच्च.

प्रचेतस's picture

12 Aug 2015 - 4:07 pm | प्रचेतस

उत्तम परिचय.

छान लिहिलंय. मसाण हा एक ताकदीने चितारलेला चित्रपट असेल याची खात्री हे परीक्षण वाचून पटते.

परीक्षण आवडले.पिक्चर बघावासा वाटतोय.

अस्वस्थामा's picture

12 Aug 2015 - 5:36 pm | अस्वस्थामा

लिहिलंय छान (अर्धेच वाचले). पण एक प्रश्न विचारावासा वाटतो. परिक्षणात इतका कथाभाग उघड करुन सांगण्याची गरज असते का ?
मी चित्रपट पाहिला नाही पण अर्धे परिक्षण वाचतानाच बर्‍याचशा गोष्टी ज्या चित्रपटाच्या महत्वाच्या घटना आहेत त्या अशा उघड केलेल्या पाहून मग उरलेले वाचन थांबवले.
किमान स्पॉइलर अलर्ट टाका हो पुढच्या वेळेस.

कथेमध्ये सस्पेंस असा नाहिये फार. कलाकारांचा दमदार अभिनय पाहातांना जो अनुभव येतो त्यात चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला आहे.

तुमचा सल्ला मात्र नक्की ध्यानात ठेवेन.

मुक्त विहारि's picture

12 Aug 2015 - 6:45 pm | मुक्त विहारि

तसे असेल तर, आपला पास....

किसन शिंदे's picture

12 Aug 2015 - 7:54 pm | किसन शिंदे

उत्तम परिक्षण!

बहिरुपी's picture

12 Aug 2015 - 8:18 pm | बहिरुपी

मी चित्रपट पाहिला आहे. सगळी कथाच सांगितलीत तुम्ही...आता थेटरात जावुन लोकं काय बघणार? बरं झालं अस्वस्थामा तुम्ही वाचायच थांबवलत ते.

बाकी पिक्चर आवडला गेला आहे.

बरंच झाल तुम्हाला परिक्षण नाही आवडल ते. मी फक्त छोटासा प्रयत्न केलेला मला आवडलेला चित्रपट माझ्या शब्दात मांडायचा.

आता तुमच्या भाषेतून वेगळ, अनुभवी परिक्षण वाचायला नक्की आवडेल.

वाट पाहातेय. लवकर येउद्या. कारण मसाण पुण्यात फक्त ५ चित्रपट गृहात् चालु आहे. लोकांनी 'थेटरात' जाऊन पाहिला पाहिजे ना..

बहिरुपी's picture

12 Aug 2015 - 8:44 pm | बहिरुपी

व्हय! आता लिवतो परीक्षण्..आन काय म्हणु? थेटरात जाण्यापरीस कोमलताईच परीक्षण (?) वाचा?

नकाच वाचू ओ. पण याच चित्रपटाच चांगले परिक्षण कसे झाले असते याचा फ़क्त एक आदर्श मला आणि भविष्यात परिक्षण लिहिणाऱ्याना मिळेल इतकेच.

शिकाऊ आहे न मी अजून..

कोमलताई लिहीत रहा. कोण जाणे आम्हाला हि चित्रपट बघायला मिळेल नं मिळेल! हां वरती फक्त सूचना लिहा की "कथा पूर्ण स्पष्ट केली आहे. त्यामुळे ज्यांना थिएटर मध्ये जाऊन पहावयाचा असेल त्यांनी परीक्षण वाचू नये."
मला तर अतिशय आवडलं परीक्षण.

आभार. पण मसाण बाबत कथा सांगणे आणि ती अनुभवणे यांत खूप फरक आहे. जसं 'थोडासा रूमानी हो जाये'ची खरी मजा चित्रपट पाहातांनाच येते, मग त्याची कथा शब्दांत उतरावली तरी चित्रपटापुढे ती केव्हाही फिकीच पडणार.

मी यांच् कंप्यारीजन नाही करत, फक्त उदहारण म्हणून सांगितले.

तुम्ही बरोबरच आहात! कथा ऐकणे व ती प्रत्यक्ष अनुभवणे यात खूप फरकंय!!! कथा ऐकल्याने मला तर नाही फरक पडत ती अनुभवण्यात. म्हणजे प्रेमाविषयी आपण सर्वच जण वाचतो पण त्यामुळे ते अनुभवताना कुठेही कमी येत नाही. असो!!!! ज्याचे त्याचे मत!!!!

मात्र वर सांगितल्या प्रमाणे कथा भाग इतका उघड करू नये. आमच्या सारख्यांना ज्यांना सिनेमाचे नाव आजच कळले असेल त्यांना मग सिनेमा जाऊन पाहण्यासारखे काही उरत नाही.

विशाखा पाटील's picture

12 Aug 2015 - 11:13 pm | विशाखा पाटील

http://maharashtratimes.indiatimes.com/cinemagic/cine-review/Masaan/movi...
हे परिक्षण वाचून हा चित्रपट बघितला. यात पूर्ण कथा दिलेली नाही. कथा कळली तरी बघायलाच हवा, असा हा चित्रपट आहे.

पैसा's picture

12 Aug 2015 - 11:40 pm | पैसा

बघावासा वाटतोय.

प्रियाजी's picture

12 Aug 2015 - 11:53 pm | प्रियाजी

मी हा चित्रपट पाहिला आहे. परिक्षणही वाचले आहे. तरीही एक सल्ला दीएन. परीक्षण वाचले तरीही चित्रपट जरूर बघा. पैसे वाया जाणार नाहित.पडद्यावर पाहूनच अनुभवण्यासारखे खूप काही आहे येथे.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Aug 2015 - 11:57 pm | अत्रुप्त आत्मा

हसरे........,
छान केलयस गं परिक्षण.

पद्मावति's picture

13 Aug 2015 - 1:31 am | पद्मावति

ह्या चित्रपटाविषयी आधी ऐकले नव्हते. पण आता बघावासा वाटतोय.

कोमल's picture

13 Aug 2015 - 10:02 am | कोमल

__/\__ सगळ्यांचे आभार.

प्रियाजी म्हणतात तसं पडद्यावर पाहुन अनुभवण्यासारखे खूप आहे.

मस्त लिहिलं आहेस परीक्षण. खूप आवडलं. हा चित्रपट पहायच्या यादीत आहे खरा, पण बघू शकेन का अशी भीतीही आहे. खूप अंगावर येतात असे चित्रपट. तू लिहित जा गं अशी परीक्षणं. झक्कास जमलंय.

श्रीरंग_जोशी's picture

14 Aug 2015 - 7:45 am | श्रीरंग_जोशी

नेहमीपेक्षा वेगळ्या चित्रपटाचं परीक्षण आवडलं.