इतिहासाचे मारेकरी आणि पहारेकरी

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
15 Apr 2015 - 8:48 pm

सुभाषबाबूंच्या संदर्भातील गेल्या काही दिवसात आलेल्या अधिकृत बातम्यांवरून मिपावर नको इतके चर्वितचर्वण झालेले दिसले. त्यामुळे जरी वरकरणी विषय समान असला तरी चर्चेचे मुद्दे वेगळे आहेत हे कृपया सर्वांनी विचारात घ्यावे.

सुभाषबाबूंचा इतिहास हा "आजच्या संदर्भात" सगळा आदर्श नसावा. त्यांच्या उद्देशांवर (देशाचे स्वातंत्र्य) कोणी शंका घेऊ शकेल असे मात्र वाटत नाही... आणि हे मी काही ते सशस्त्र क्रांतीचे सक्रीय समर्थक होते म्हणून म्हणतोय असे समजू नका. त्यात काहीच गैर नव्हते. ज्यांना सक्रीय क्रांती करणे जमले ती त्यांनी केली आणि ज्यांना नि:शस्त्र क्रांती करायची होती ती त्यांनी केली. मात्र हिटलरच्या जर्मनीबरोबर आणि त्याच अंगाने जाणार्‍या जपानबरोबर त्यांनी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र म्हणून जरी मैत्री केली असली तरी, "जर-तर" च्या भाषेत चुकून पण जर्मनी-जपान कोणीही तात्पुरते आशियाच्या बाजूने जिंकत आले असते तर भारताचे पण खरे नव्हते असे वाटते. अर्थात हे देखील समजते की त्यावेळेस (१९४१) जर्मनीची सगळी दुष्कृत्ये बाहेर आली नव्हती...असो.

आजच्या टाईम्स ऑफ इंडीया मधे पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि सुभाषबाबूंचे पुतणनातू सुर्या बोस यांच्या जर्मनीत झालेल्या भेटीची बातमी आली आहे. सुर्या बोस यांच्या वडीलांवर देखील त्या काळात पाळत ठेवली गेली होती. या सर्व पार्श्वभूमीवर देखील श्री. सुर्या बोस यांचे खालील म्हणणे वाचण्यासारखे आहे...

"I gave the PM a few points in writing, including the issue of surveillance on the family so that the truth comes out," Surya said. He said he impressed on Modi that India as a nation was strong enough to face the truth, even if it was unpalatable.

"The declassified information needn't paint a glorious picture of Netaji. It may say something negative. In all probability, it will. We must not shirk from the truth even if it adversely affects Netaji's image. The family is ready to face it," he said.

या बातमीत श्री बोस यांनी इतिहासाकडे अलिप्तपणे बघण्याची दाखवलेली वृत्ती आणि धैर्य हा या चर्चेचा विषय आहे.

सुभाषबाबूंवर त्यांच्या हयातीत आणि नंतरच्या (बहुदा) काल्पनिक हयातीत, तसेच त्यांच्या कुटूंबियांवर स्वातंत्र्योत्तर २० वर्षे पाळत ठेवली गेली. त्याला अर्थातच बहुतांशी नेहरू आणि त्यांच्यावेळचे गृहमंत्री सरदार पटेल पासून ते लालबहाद्दूर शास्त्री जबाबदार होते. तसेच नेहरूंच्या नंतरचे पंतप्रधान शास्त्री, नंदा आणि इंदीरा गांधी, त्यांच्या त्या त्या वेळच्या गृहमंत्र्यांसकट सर्वच जबाददार होते. त्यात यशवंतराव चव्हाण देखील आले. तरी देखील अंतिमतः या निर्णयांवर वेळोवेळच्या पंतप्रधानांनी शिक्कामोर्तब केल्या शिवाय हे केले गेले असे म्हणत केवळ गृहमंत्र्यांवर जबाबदारी टाकली जाणार असेल तर ती मोठ्ठी दिशाभूल आहे आणि त्यातून केवळ पंतप्रधान हे स्वतः निर्णय घेत नव्हते इतकेच सिद्ध होऊ शकेल, जबाबदारी टळू शकणार नाही. बरं त्यांनी तसे करणे ही कदाचीत त्या काळातील (फॉरवर्ड ब्लॉक आणि तत्सम अतिरेकी डाव्या संघटनांमुळे) गरज देखील असेल आणि ते त्या त्या नेत्यांनी गोपनिय ठेवले असेल तर त्यातही काही चूक नाही. पण ते आता इतक्या वर्षांनी इतिहास म्हणून प्रसिद्ध झाले तर वास्तव जगासमोर येऊ शकेल.

अर्थात या सर्वांचा लसावि असे म्हणता येऊ शकेल तो म्हणजे काँग्रेस....आणि गंमत म्हणजे एकीकडे पाळत ठेवणारे दुसरीकडे त्यांना राष्ट्रभक्त देखील म्हणत होते. याच काळात सावरकरांना (मला वाटते चीन युद्धाच्या वेळेस देखील) अटक/स्थानबध्दता करण्यात आली होती. श्यामाप्रसाद मुखर्जींचा (१९५३) गुढ मृत्यू झाला होता. भगतसिंग बद्दल देखील बोलले गेले आहेच. असे अनेक असेल जे कदाचीत बाहेर येणार नाही अथवा काळाच्या ओघात "गंगार्पण" झाले आहे.

सुभाषबाबूंचे दुसरे पुतणनातू आणि सध्या तॄणमूल कडून खासदार असलेले अमेरीकास्थित सुगाता बोस मात्र नेहरूंना जबाबदार ठरवायला तयार नाहीत तर केवळ पटेलांनाच चूक ठरवत आहेत. गंमत म्हणजे ते इतिहास आणि राजकीय विषयातले तज्ञ आणि हार्वर्ड मधे प्राध्यापक आहेत! अर्थात त्यांना प्रत्यक्षात बोलताना ऐकलेले असल्याने, त्यांच्या असल्या वक्तव्याबद्दल आश्चर्य वाटत नाही... दुर्दैवी मात्र नक्की वाटते. दुसरे सन्माननीय प्राध्यापक अमर्त्य सेन यांनी अजून यासंदर्भात (एरवी मांडतात तशी) मते मांडलेली नाहीत. कम्युनिस्ट पार्टीकडून देखील या संदर्भात बोलले गेलेले दिसले नाही. बाकीचे डावे विचारवंत देखील "सुभाषबाबूंच्या पहारेकर्‍यांबद्दल" गप्पच आहेत आणि कागदपत्रे जाहीर करा असे देखील म्हणलेले वाचले तरी नाही. मात्र हे आणि त्यांचे डावे पूर्वज याच काळापासून ते आजतागायत कुठलाही पुरावा नसताना तत्कालीन संघापासून ते आजच्या बालस्वयंसेवकापर्यंत सर्वांना "गांधीचे मारेकरी" म्हणून समाजाची दिशाभूल करत राहीले.

या इतिहासाच्या मारेकर्‍यांनी आणि पहारेकर्‍यांनी स्वतःचे विचार रुजावेत म्हणून बुद्धीवादीपणाने हिंदू आणि हिंदूत्वाचा द्वेष पसरवत, त्यांच्याबद्दल खोटे बोलून, त्यावर खोटे संशोधन करून आजपर्यंत या तथाकथीत विचारवंतांनी देशाचे सामाजिक-आर्थिक-राजकीय नुकसान केले आहे. या मारेकर्‍यांचे आणि पहारेकर्‍यांचे भांडे फोडणे आणि त्यांच्या असल्या (वि)कृतीशील विचारसरणीस दूर करणे ही काळाची गरज आहे.

इतिहाससमाजराजकारणप्रकटनविचारमाध्यमवेधमत

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

15 Apr 2015 - 10:07 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

वाचनीय.
आता जबाबदारी नरेंद्रची. त्या फाईल्स उचलाव्यात व सरळ टी.व्ही.वर येऊन वाचून दाखवून 'पर्दाफाश' करावा.
मोठ्या बहुमताने निवडून दिले आहे लोकांनी भाजपाला.तेव्हा एवढे करायला काहीच हरकत नाही.

पॉइंट ब्लँक's picture

15 Apr 2015 - 11:31 pm | पॉइंट ब्लँक

मोठ्या बहुमताने निवडून दिले आहे लोकांनी भाजपाला.तेव्हा एवढे करायला काहीच हरकत नाही.

अस्स जालं होय. तुमच्या खांग्रेसला चाळीस वर्ष निवडून दिलं होत, त्यांना बरं जमलं नाही ते?

आपणास कसे माहीत की माईसाहेब काँग्रेसलाच मतदान करायच्या?

अर्धवटराव's picture

15 Apr 2015 - 10:08 pm | अर्धवटराव

बाण लागला बरोब्बर :)

विकास's picture

15 Apr 2015 - 11:36 pm | विकास

जाणत्या राजाने समजूत घातली आहे. ती वाचल्यावर समजले की ती हेरगिरी नव्हती तर काळजी करण्याची पद्धत होती म्हणून. =))

"When the NCP was in power in Maharashtra and I was a Union minister working in Delhi, people like Bhujbal in the state used to keep a tab on my movements. The department concerned has to keep an eye on important people, who are doing pivotal work in public life for their safety. Hence, the Maharashtra state that kept an eye on me was not for espionage. When I was the home minister in Maharashtra, the department also kept an eye on my movements for safety," he said.

"Similarly, the relatives of Netaji Subhash Chandra Bose were important for the country. The government would have been held accountable if anything untoward had happened with them. As a result, the IB had kept an eye on Bose's family for their safety and not for espionage," added Pawar, who was in the city to review activities of the NCP in the district and attend a number of programmes.

काळा पहाड's picture

16 Apr 2015 - 12:58 am | काळा पहाड

म्हणजे नक्कीच काही तरी घोळ आहे.

विकास's picture

16 Apr 2015 - 1:19 am | विकास

मी तसं काही म्हणलेले नाही! ;)

काळा पहाड's picture

16 Apr 2015 - 1:30 pm | काळा पहाड

ते बोल्लं की त्याचं उल्टंच अस्तंय हो.. लईच चालू हाय बेनं.. म्हून म्हन्लं.

आमच्या डोक्यावर गांधीहत्येचा कलंक लागला आहे म्हणुन आम्हीही तुमच्या डोक्यावर नेताजी प्रकरणाचा कलंक लावणारच.

बाकी , गांधीहत्या कुणी व कुठल्या मास्टरमाइंडच्या आदेशानुसार केली हे तर गोडसे बोलतोय नाटकातही आहे.

विकास's picture

15 Apr 2015 - 11:31 pm | विकास

आमच्या डोक्यावर गांधीहत्येचा कलंक लागला आहे
खोटारडे पणा ने तो लावला होता. स्वतःच्या विचारसरणीत असलेला अंगभूत द्वेष पसरवण्याकरता...
आता राहूल गांधींना कोर्टात जावे लागणार असल्याने इतर शहाणपणाने तसे बोलणे टाळतील असे समजूयात.

म्हणुन आम्हीही तुमच्या डोक्यावर नेताजी प्रकरणाचा कलंक लावणारच.
अनुज धर या लेखक-पत्रकाराने आणि "मिशन नेताजी" नामक संस्थेच्या मागितलेल्या माहीती अधिकारांतर्गत विनंतीनुसार पश्चिम बंगालच्या सिआयडी खात्याने दोन जुन्या फाईल्स मुक्त केल्या त्यातील माहितीतून हे बाहेर आले. वास्तवीक काँग्रेस आणि भाजपाने देखील आधी राज्य असताना (आणि आत्ता मोदींच्या काळात हे प्रकरण बाहेर यायच्या आधी) ह्या संदर्भातील फाईल्स मुक्त करायला असमर्थता दर्शवली होती. का? तर सुरक्षा आणि मित्र राष्ट्रांना त्रास होऊ शकतो म्हणून!

असो आता मुक्त झालेल्या पत्रांमधून नेहरूंचा हात स्पष्ट दिसतो:

Neharu letter

विकास's picture

16 Apr 2015 - 12:48 am | विकास

गांधीहत्या कुणी व कुठल्या मास्टरमाइंडच्या आदेशानुसार केली हे तर गोडसे बोलतोय नाटकातही आहे.

काय वेळ आली आहे! स्कॉलर्ली पुरावा नसल्याने कुठल्यातरी फुटकळ नाटकात काय लिहीले आहे त्यावरून ठरवले जात आहे. तरी देखील त्या नाटका संदर्भात य.दी फडक्यांचा http://www.mkgandhi-sarvodaya.org/godse.htm लेख वाचा. (आणि हो फडके हे काही उजवे नाहीत...) आणि त्यावर अजून चर्चा करायची असेल तर अवश्य नवीन धागा काढा. तेथे काथ्याकूट करूयात.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

16 Apr 2015 - 12:50 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

आणी धाग्यात तू ही आधीच ठरवले आहेस विकासा-

सुभाषबाबूंवर त्यांच्या हयातीत आणि नंतरच्या (बहुदा) काल्पनिक हयातीत, तसेच त्यांच्या कुटूंबियांवर स्वातंत्र्योत्तर २० वर्षे पाळत ठेवली गेली. त्याला अर्थातच बहुतांशी नेहरू आणि त्यांच्यावेळचे गृहमंत्री सरदार पटेल पासून ते लालबहाद्दूर शास्त्री जबाबदार होते.

म्हणजे आधी तू हे ठरवूनच टाकले आहेस व त्यावर चर्चा करायची.

पिकासा चा भाउ विकासा.. ;)

चिनार's picture

16 Apr 2015 - 12:58 pm | चिनार

बाकी , गांधीहत्या कुणी व कुठल्या मास्टरमाइंडच्या आदेशानुसार केली हे तर गोडसे बोलतोय नाटकातही आहे

हितेश भाऊ !
गोडसे बोलतोय या नाटकात आपण गोडसेंच बोलणं ऐकणं अपेक्षित आहे. त्यात त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय
"गांधी वधाला फक्त मी आणि मीच कारणीभूत आहे!"
वधामागचा कोन्ग्रेस ला "अपेक्षित" असलेल्या मास्टर माइण्ड चे नाव जर नाटकात घेतले असते तर कोन्ग्रेस सरकारने त्या नाटकावर इतके वर्ष बंदी ठेवली नसती.
तुझ्या वरच्या प्रतिसादावरून तुझा एकंदरीत व्यासंग आणि बुद्धीची पातळी लक्षात आलेली आहे.

कपिलमुनी's picture

15 Apr 2015 - 11:48 pm | कपिलमुनी

300 potential

'येथे कुणा एकाची पाठराखण वा कुणाची निंदा' असे नसून, याविषयीची सत्यता काय हे जाणुन घेणे महत्वाचे.

आजच केंद्र सरकारने एक समिती गठीत केली असुन ती समिती अशा अन्य ८५ फाईलींच्या बाबत त्या उघड करायच्या का याबद्दल निर्णय घेणार आहे, अशी बातमी दुरदर्शनवर एकली, तसे झाले तर याविषयीचे सत्य काय ते उघड होइलच.

सुभाषबाबूंची भारतीय जनतेत स्वातंत्र्यकाळापुर्वीपासुनच 'हीरो' अशी प्रतिमा होती, आहे व राहील यात काहीच शंका नाही, त्यांच्या गूढ मृत्यूबद्दलचे सत्य जाणुन घेण्यात सगळ्यांनाच रस आहे, ते गूढ जर कुणी उकलले तर त्यामध्ये गैर ते काय ? त्याविरोधात एव्हढी कावकाव कशासाठी ?? येउद्या की सत्य बाहेर.

येथे 'त्यांच्या कुटूंबियांवर स्वातंत्र्योत्तर २० वर्षे पाळत ठेवली गेली' ते भारतात नसताना ( जिवंत असताना वा नसताना ) ती ही सतत २० वर्षे, याची गरज त्यावेळच्या आपल्या नवस्वतंत्र देशाच्या सरकारला का भासली ?? अगदी मागील पानावरुन पुढे यापद्ध्तीने ते का ?? येथे हा 'का' महत्वाचा ?? ती कोणी ठेवायला सांगितली हे दुय्यम असे मी समजतो. इंग्रजांनी तसे केले हे आपण समजु शकते, त्याबद्दल हा 'का' उद्भवत नाही परंतु नंतर आलेले तर आपलेच स्वकिय होते.

असे कितीतरी 'राजकिय गूढ-मृत्यू' त्या कालखंडात झालेत, त्यांना न्याय मिळायला हवा असे जर कुणाला वाटले तर ते अयोग्य कसे ?? या गूढतेची उकल यथावकाश होइल अशी चिन्हे दिसताहेत.

@.....हितेसभॉय, अरे या लोकशाहीतला तुझा विधाने करण्याचा, प्रतिक्रिया देण्याचा अधिकार मान्यच, पण तु स्वतः हिंदु नसताना / नास्तिक असताना व एक सर्वमान्य डु.आय.डी. असताना, वारंवार कोणत्याही विषयाला / चर्चेला ओढूनताणुन आमच्या हिंदु धर्माशी जोडुन, आमच्या देवदिकांना बोल लावण्याचा अधिकार तुला कोणी दिला ?? तुझ्या उपासना पद्धतीबद्दल ( जर असलीच तर ) जर कोणी काही वावगे बोलले तर तु खपवून घेशील काय ?? एक लक्षात ठेव तुला येथे कोणीच गंभीरपणे घेत नाही पण तुला आता 'समजावून सांगण्याची' वेळ आली आहे. तेव्हा यापुढे आमच्या 'हिंदु धर्माबद्दल' लिहीताना जरा जपुन, अंत पाहू नकोस. तुझ्यासाठी तुर्त एव्ह्ढेच.....!!!

क्लिंटन's picture

16 Apr 2015 - 2:51 pm | क्लिंटन

लेख आवडला. त्यावर काहीसा विस्कळीत प्रतिसाद---

सुभाषचंद्र बोसांच्या संदर्भात जे काही झाले ते पब्लिक डोमेनमध्ये नक्कीच यायला हवे असे वा॑टते. राजनाथ सिंगांनी तसे करता येणार नाही यासाठी कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकेल आणि इतर देशांशी संबंध बिघडू शकतील असे कारण त्यामागे दिले होते.

त्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकेल हे कारणच मला पटलेले नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखायची जबाबदारी राज्य सरकारची असते आणि ते काम राज्य सरकारला न जमल्यास शेवटी ती केंद्राची जबाबदारी ठरेल.

सुभाषचंद्र बोस खरोखरच त्या विमान अपघातात गेले की नाही याविषयी बराच संभ्रम आहे.सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारख्यांचे म्हणणे आहे की सुभाषचंद्र नंतर रशियात गेले आणि त्यांना स्टॅलिनने ठार मारले. जर का ही माहिती उघड केली तर त्यामुळे रशियाशी संबंध बिघडायची भिती का वाटावी? एकतर रशियाने स्वतःच लेनिन आणि स्टॅलिन यांच्या राज्यपध्दतीला नाकारले आहे. या घटनेला किमान ६० वर्षे उलटली आहेत आणि भारत जर रशियाकडून तेल विकत घ्यायला तयार असेल तर पुटिन यांनाही फार काही तक्रार करायचे कारण असेल असे मला तरी वाटत नाही.

सुभाषचंद्र बोसांचे नक्की काय झाले ही माहिती पब्लिक डोमेनमध्ये आली आणि त्यामुळे त्यांच्या जनमानसातील प्रतिमेवर परिणाम झाला तरी हरकत नाही ही भूमिका त्यांच्या कुटुंबियांनी घेतली आहे ही नक्कीच कौतुकास्पद आहे. या निमित्ताने सुभाषचंद्र बोसांविषयी लोकांच्या मनात जे काही समज-गैरसमज आहेत ते समजले तरी ते चांगलेच असेल.

बाकी यानिमित्ताने आणखी एक गोष्ट जरूर लिहावीशी वाटते. सुभाषचंद्र बोसांना अनेक हिंदुत्ववादी विचारांचे लोक सावरकर, लोकमान्य टिळक यांच्याबरोबरचे समजतात हे बघून गंमत वाटल्याशिवाय राहत नाही. एकतर सुभाषचंद्रांचे गुरू चित्तरंजन दास हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे कट्टर पुरस्कर्ते होते.मुस्लिमांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नसेल तर स्वातंत्र्यलढा यशस्वी होणार नाही असे गांधीजींना वाटत होते तसेच चित्तरंजन दासांनाही वाटत होते. १९२३ मध्ये त्यांनी बंगालमधील मुस्लिम पुढार्‍यांबरोबर (विशेषतः हकिम अजमल खान) 'बंगाल करार' याच उद्देशाने केला होता आणि त्यात मुस्लिमांना आरक्षण दिले जाईल असे म्हटले होते. त्या कराराला काँग्रेसमधल्याच अनेक पुढार्‍यांचा विरोध होता. त्यांचे शिष्य सुभाषचंद्रांनी कलकत्ता महानगरपालिकेचे सी.ई.ओ असताना या आरक्षणाची अंमलबजावणीही केली होती.

ज्या खिलाफत चळवळीला पाठिंबा दिल्याबद्दल गांधीजींविरूध्द हिंदुत्ववादी लोक आगपाखड करतात त्याच चळवळीविषयी सुभाषचंद्र बोस यांनी The Indian Struggle या पुस्तकात पान ५५ वर म्हटले होते---

"In 1921, besides the above three leaders, the Ali brothers (Moulana Mohammed and Moulana Shaukat Ali) had a unique position among the public. This was due partly to their own activities and their suffering during the Great War--partly to the new awakening among the Moslems -- but largely due to the propaganda conducted in their favour by the Mahatma. The Mahatma associated himseld so closely with them that they came to be looked upon as the right and the left hand of the Mahatma, In their company the Mahatma toured the country and one clearly remembers that in those days whenever there was a popular shout of 'Victory to Mahatma Gandhi' (Mahatma Gandhi Ki Jai), it would be accompanies by a shout of 'Victory to the Ali Brothers' (Ali Bhai-o-Ki Jai). Though after some years the Ali brothers parted company with the Mahatma, I do not think one could find fault with the latter for his intimate association with them. The real mistake in my opinion did not lie in connecting the Khilafat issue with the other national issues, but in allowing the Khilafat Committee to be set up as an independent organisation throughout the country, quite apart from the Indian National Congress. The result of this was that when later on Ghazi Mustafa Kemal Pasha, as the leader of the New Turkey, forced the Sultan to abdicate and abolished the office of Khialifa altogether, the Khilafat question lost all meaning and significance and the majority of the members of the Khilafat organisations were absorbed by sectarian, reactionary and pro-British Moslem organisations. If no separat Khilafat committees had been organised and all Khilafatist Moslems had been persuaded to join the ranks of the Indian National Congress, they would probably have been absorbed hy the latter when the Khilafat issue became a dead one."

हेच जर का अन्य कोणत्या काँग्रेसच्या पुढार्‍याने म्हटले असते तर तो पुढारी दाढ्या कुरवाळणारा, तळवे चाटणारा वगैरे विशेषणांनी ओळखला गेला असता.

सुभाषचंद्रांचा पाकिस्तानला विरोध नक्की होता का याविषयीही प्रश्न उभा रहावा असे त्यांचे बर्लिन रेडिओवरून केलेल्या एका भाषणातील विधान होते . या भाषणाचा वृत्तांत ---" He assured Mr Jinnah that his Pakistan scheme would never materialise so long as the British were in India.He emphasised that Pakistan could be created only under a National Government."

म्हणजे सुभाषचंद्रांचा पाकिस्तानला खरोखरच विरोध होता का? आणि तरीही सुभाषचंद्र असते तर अखंड भारत आपल्याला मिळाला असता हा एक काहीसा भाबडा समज हिंदुत्ववादी लोकांमध्ये आढळतो हे बघून काहीशी गंमतच वाटते.हा प्रकार फेसबुकवरील विविध ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणावर बघितला आहे.

सुभाषचंद्रांच्या जपान्यांशी हातमिळवणी करायच्या धोरणाविरूध्द मी पूर्वीच मिपावर लिहिले आहे.त्याची पुनरावृत्ती नको. पण या निमित्ताने अशा काही इतर मुद्द्यांचीही चर्चा जरूर व्हावी असे नक्कीच वाटते.

काळा पहाड's picture

16 Apr 2015 - 3:23 pm | काळा पहाड

असं म्हणणारा माणूस निदान माझ्या तरी पहाण्यात नाहीत. बहुतांश लोकांना सुभाषबाबू एक हीरो (ज्यांनी थरारक गोष्टी केल्या) म्हणून आवडतात. त्यातल्या राष्ट्रवादी (पक्ष नव्हे) लोकांना या गोष्टी त्यांनी देशासाठी केल्या, देशासाठी खस्ता खाल्ल्या म्हणून आवडतात. त्यातल्या शिकल्या सवरलेल्यांना ते आयसीएस ची परिक्षा पास होवू शकणारे विद्वान होते आणि त्यावर लाथ मारू शकणारे स्वाभिमानी होते म्हणून आवडतात. नेहरूंच्या मेंगळट धोरणासमोर (लेटस फेस इट, ही वाज प्रॉबॅबली राहुल गांधी ऑफ दोज टाईम्स लिव्हींग इन द शॅडो ऑफ गांधीजी) सुभाषबाबू उठून दिसतात. ते आर्मी युनिफॉर्म मध्ये रुबाबदारही दिसतात. ज्या गोष्टी आम्ही सर्व सामान्य मध्यमवर्गी लोक करू शकत नाही त्या त्या करणारे ते त्या वेळचे बंडखोर वृत्तीचे नेते, एक कॅरिस्मॅटीक पर्सनॅलिटी म्हणून ते लोकांना आवडतात. त्यांचं आयुष्यच एखाद्या दंतकथे प्रमाणे आहे, त्यांचं नाहीसं होणं धरून. अशा व्यक्तीला जर रशियन स्थानबद्धतेत यातनामय मरण आलं असेल तर त्याची जबाबदारी आम्ही शोधणारच. नेहरूंनी त्यांच्या व्यक्तीगत स्वार्थासाठी जर ब्रिटीश सरकारवर (रशियन सरकारवर दबाव टाकण्यासठी) दबाव टाकला असेल आणि हे जर सिद्ध झालं, तर नेहरूंचं इतिहासातलं स्थानाबद्दल काय केलं जाईल हे तुम्हाला सांगायला नको (स्टॅलीन एक काळी लोकांचा हिरो होता म्हणे). जर असं काही नसेल तर नेहरूंना घाबरायचं काहीच कारण नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

16 Apr 2015 - 6:08 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

नेहरूंच्या मेंगळट धोरणासमोर (लेटस फेस इट, ही वाज प्रॉबॅबली राहुल गांधी ऑफ दोज टाईम्स लिव्हींग इन द शॅडो ऑफ गांधीजी)

आणी

नेहरूंनी त्यांच्या व्यक्तीगत स्वार्थासाठी जर ब्रिटीश सरकारवर (रशियन सरकारवर दबाव टाकण्यासठी) दबाव टाकला असेल

मेंगळट धोरणे राबवणारा पंतप्रधान ब्रिटिश सरकारवर कसा काय दबाव टा़कू शकतो ब्वॉ ?आणी ५०च्या दशकात रशियन सरकारवर दबाव टाकणे म्हणजे बाकरवडी खाण्यासारखे सोपे वाटले का रे पहाडा?
बोस हिरो होतेच पण तसे लिहिताना ईतरांना दोष का? असो.
१९५७ पासून लोकसभेत हजेरी लावणार्या अटलजींचे काय म्हणणे आहे ह्या विषयावर ?

क्लिंटन's picture

16 Apr 2015 - 6:41 pm | क्लिंटन

मेंगळट धोरणे राबवणारा पंतप्रधान ब्रिटिश सरकारवर कसा काय दबाव टा़कू शकतो ब्वॉ ?

अरे काय दिवस आले आहेत? चक्क मी माईसाहेबांशी सहमत आहे :)

hitesh's picture

16 Apr 2015 - 8:05 pm | hitesh

.गांधी नेहरु नेभळट होते असे लबाड संघवाले म्हणतात.

नेहरुनी म्हणे नेताजीना संपवायला स्टालिनला पत्र लिहिले अsehee लबाड संघवाले म्हणतात.

भगतसिंगाना फाशी देऊ नये म्हणुन गांधीजींनी इंग्रजांवर दबाव टाकला नाही असेही हेच लबाड लोक म्हणतात.

यांच्या पारड्यात कुणीही मोठे नेते नाहीत याचे फ्रस्ट्रेशन ते काढत असतात.. मग वेळ पडली की काँग्रेसचे नेहरु गांधी याना स्मरणीय मान. काँग्रेसच्या पटेलांचा पुतळा बांध. कम्युनिस्ट भगतसिंग , मुस्लिम्प्रेमी नेताजी यांना प्रेमाने आपले म्हणणे, असेही हे लोक करतात.

काळा पहाड's picture

16 Apr 2015 - 10:31 pm | काळा पहाड

तुम्ही मला लबाड संघवाले म्हणताय का हितेशभौ?

विकास's picture

16 Apr 2015 - 10:52 pm | विकास

यांच्या पारड्यात कुणीही मोठे नेते नाहीत याचे फ्रस्ट्रेशन ते काढत असतात..

हो ना! ह्यांच्या पारड्यात मोठे नेते असते तर काँग्रेसच्या लोकांसारखे आज फटाके उडवता आले असते! पण कसचं काय... टाईम मॅगझिन मधे आलेल्या प्रेसिडंट ओबामांच्या "रीफॉर्म - इन - चार्ज" फ्रॉम पॉव्हर्टी टू प्राइम मिनिस्टर असे नेत्याबद्दल वाचावे लागले नसते! (बाकी ओबामा पण चावटच आहेत.... मोदींना "फ्रॉम पॉव्हर्टी टू प्राइम मिनिस्टर" असे म्हणले "फ्रॉम आम आदमी/कॉमन मॅन टू प्राइम मिनिस्टर" असे नाही म्हणले! ;)

हुप्प्या's picture

16 Apr 2015 - 9:38 pm | हुप्प्या

दबाव हा शब्द चुकीचा वाटतो.
नेहरु हे ब्रिटिशधार्जिणे होते आणि ते ब्रिटिश लोकांनाही सोयीचे होते. त्यामुळे हे परस्परांच्या सोयीची योजना होती. त्यामुळे मी तुमच्यासाठी हे करतो, तुम्ही माझ्यासाठी ते करा अशी देवाणघेवाण होणे अशक्य नव्हते.
दुसर्‍या महायुद्धानंतर शीतयुद्ध जोरात होते. जेव्हा अमेरिकेची आणि रशियाची रस्सीखेच जोरात होती त्या काळात भारताचे राजकीय, भौगोलिक आणि एकंदरीत स्ट्रॅटेजिक महत्त्व रशियाच्या लेखी होते. ते तसेच अबाधित रहावे म्हणून स्टालिनने नेहरूना मदत केली असेल अशी शक्यता इतकी अवास्तव वाटत नाही.

काळा पहाड's picture

16 Apr 2015 - 10:29 pm | काळा पहाड

माई, हे नक्की "ह्यां"चं मत आहे की तुझं? तुझा युएसपी तुझे "हे" आहेत हे लक्षात घे.

मेंगळट धोरणे राबवणारा पंतप्रधान ब्रिटिश सरकारवर कसा काय दबाव टा़कू शकतो ब्वॉ ?

तू जरा नीट वाच.

अटलजींचे काय म्हणणे आहे ह्या विषयावर ?

अटल"जी"? फक्त अटल म्हणायचे पद्धत आहे ना? बाकी हे तू अटलजींनाच जावून का विचारत नाहीस? मी बीजेपी मध्ये पण नाही आणि अटलजींचा पीए पण नाही.

बाकरवडी खाण्यासारखे

माई तुझं वय काय, तू खातेस काय. जास्त तेलकट गोष्टी खात जावू नकोस.
जोक्स अपार्ट, बोस हे ब्रिटिशांच्या डोळ्यात सलत होते. ब्रिटिशांनी बोसना मारण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले. असं असताना ब्रिटिशांनी बोस यांना रशियन सरकारकडून ताब्यात घेण्यासाठी आकाशपाताळ एक केलं असण्याची शक्यता आहे. या बाबतीत ब्रिटीशांना फक्त उकसवायची गरज असावी. बाकी काम त्यांनी केलं असेलच.
बाय द वे,

आणि हे जर सिद्ध झालं

बोस हिरो होतेच पण तसे लिहिताना ईतरांना दोष का? असो.

अग मै, जर नेहरूंनी असं पत्र लिहिलं असेल असं कुणीतरी लिहीतय, तर दोष काय शारूक खान ला देणार का?

क्लिंटन's picture

16 Apr 2015 - 7:07 pm | क्लिंटन

नेहरूंनी त्यांच्या व्यक्तीगत स्वार्थासाठी जर ब्रिटीश सरकारवर (रशियन सरकारवर दबाव टाकण्यासठी) दबाव टाकला असेल आणि हे जर सिद्ध झालं, तर नेहरूंचं इतिहासातलं स्थानाबद्दल काय केलं जाईल हे तुम्हाला सांगायला नको

मध्यंतरी सुब्रमण्यम स्वामींनी म्हटले होते की नेहरूंनी सुभाषचंद्र बोसांना स्टॅलीनकरवी संपवले.

सुब्रमण्यम स्वामींच्या या म्हणण्यातील काही भाग तरी नक्कीच गंमतीशीर आहे. उदाहरणार्थ स्टॅलीनने १९४५ साली नेहरूंना पत्र लिहून सुभाषचंद्र बोसांचे काय करू हे विचारले. मला तरी ही गोष्ट पूर्ण हास्यास्पद वाटते. स्टॅलीनने १९२० च्या दशकाच्या शेवटी रशियन सैन्यात 'पर्ज' घडवून आणून लष्करातील जवळपास सर्व वरीष्ठ नेतृत्व संपविले होते. याच स्टॅलीनने लाखो रशियनांना ठार मारले होते.समजा सुभाषचंद्र बोस त्याच्या तावडीत सापडले असतील तर त्यांना ठार मारायचा आदेश द्यायला याच स्टॅलीनला ऑफ ऑल द पीपल, पंडित नेहरूंच्या सल्ल्याची गरज पडावी हे अनाकलनीय वाटते.

दुसरे म्हणजे १९४५ मध्ये स्टॅलीनला नेहरूंना खिजगणतीतही धरायची गरज वाटली असेल असे मानायचे कारण नाही. रशियाने किती प्रतिकूल परिस्थितीत झगडून हिटलरचा पराभव केला हे जगासमोरच होते.युध्द संपल्यानंतर सुरवातीला दोस्त राष्ट्रांचे जर्मनीवर नियंत्रण होते. अशावेळी फ्रान्सला कोणताही भाग देण्यास स्टॅलीनने पूर्ण नकार दिला होता.कारण काय तर रशियाने सुमारे दोन कोटी लोकांची आहुती युद्धात दिली होती तर फ्रान्सने १५ दिवसातच हिटलरपुढे गुढघे टेकले होते अशा फ्रेंचांना विजयातील हिस्सा फुकटात द्यायची काही गरज नाही. फेब्रुवारी १९४५ च्या याल्टा कॉन्फरन्सच्या वेळी स्टॅलीनने रूझवेल्ट यांची राहायची व्यवस्थाही अधिक सोयीची केली होती आणि चर्चिलना फार महत्व दिले नव्हते. असा स्टॅलीन पंडित नेहरूंना सल्ला मागण्याइतके महत्व देऊ शकेल हे मला तरी अशक्य वाटते.

मी पण पंडित नेहरूंचा अगदी फार मोठा चाहता आहे असे अजिबात नाही.पण म्हणून एखाद्याला झोडपायचेच म्हणून अशा कुठल्याकुठल्या मुद्द्यावरून राळ उठवायला मला तरी आवडत नाही.

बाकी तुम्हाला कुठल्याकुठल्या कारणावरून सुभाषचंद्र बोस आवडत असतील तर ते तुमचे मत झाले.त्याचा आदरही आहे. पण माझ्या स्वतःच्या दृष्टीकोनातून आझाद हिंद सेनेचा पराभव झाला हे चांगलेच झाले. सुभाषचंद्रांच्या देशभक्तीविषयी कोणीही शंका घेऊ शकणारच नाही.पण त्यांचा जपानबरोबर जायचा निर्णय मला स्वतःला अजिबात समर्थनीय वाटत नाही. याविषयी या आणि या धाग्यावर पूर्वीच लिहिले आहे.त्याची पुनरावृत्ती टाळतो.

अनुप ढेरे's picture

16 Apr 2015 - 8:02 pm | अनुप ढेरे

याविषयी या आणि या धाग्यावर पूर्वीच लिहिले आहे.त्याची पुनरावृत्ती टाळतो.

तेच धागे शोधत होतो. जबरदस्त चर्चा आहेत त्या. धन्यवाद!

आजानुकर्ण's picture

16 Apr 2015 - 7:09 pm | आजानुकर्ण

मस्त प्रतिसाद क्लिंटनसाहेब, प्रतिसाद आवडला.

प्रश्नः
कम्युनिष्ट विचारसरणीचे भगतसिंग, फॉरवर्ड ब्लॉकसारख्या पक्षाची सुरुवात करणारे आणि मुस्लिमप्रेमी सुभाषबाबू, गायीला उपयुक्त पशू माना असे म्हणणारे विज्ञाननिष्ठ सावरकर, संघावर बंदी आणणारे पटेल या सर्वांमध्ये एक साम्य आहे. त्यामुळे ते सर्व आम्हाला एकाचवेळी प्रिय वाटतात.

उत्तरः
त्यांचे आडनाव नेहरु किंवा गांधी नाही हेच. बाकी काय बोलणार.

विकास's picture

16 Apr 2015 - 8:38 pm | विकास

माहितीपूर्ण प्रतिसाद!

बाकी यानिमित्ताने आणखी एक गोष्ट जरूर लिहावीशी वाटते. सुभाषचंद्र बोसांना अनेक हिंदुत्ववादी विचारांचे लोक सावरकर, लोकमान्य टिळक यांच्याबरोबरचे समजतात हे बघून गंमत वाटल्याशिवाय राहत नाही.

टिळकांच्या बरोबरचे समजतात असे मी कधी वाचलेले नाही. पण एक संदर्भ मी सावरकरी वाड्मयात पाहीला आहे तो म्हणजे सावरकर-सुभाषबाबू भेट. सावरकरांनी रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत असताना आणि नंतर सैनिकी शिक्षण घ्या आणि सैन्यात भरती व्हा असे तरूणांना आवाहन केले होते. त्यावरून त्यांच्यावर टिका देखील झाली होती. (अत्रे, ज्यांनी त्यांना आधी "स्वातंत्र्यवीर" ही पदवी दिली, त्यांनी त्यावरून त्यांना "रिक्रूटवीर" म्हणून हिणावले देखील!). अर्थात त्यांचा वरकरणी उद्देश त्यांनी लपवला नव्हता. एका भाषणात (आठवणीतून) त्यांनी सांगितल्याचे वाचले आहे की, देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे हे नक्की त्यावेळेस अचानक देश सांभाळायला सैन्य कुठून आणायचे, तेंव्हा आता तयारी करा... पण या रिक्रूट भरतीचा उपयोग आझाद हिंद सेनेला काही अंशी झाला. तसेच नंतर नेव्हीचे बंड झाले त्यावेळेस ब्रिटीश घाबरू शकले.

तेंव्हा सांगायचा मुद्दा हा की दोघांचे स्वातंत्र्यासाठी मार्ग समान असल्याने आणि कदाचीत सुभाषचंद्रांना देखील काँग्रेसने त्यावेळेस वाळीत टाकल्याने बाकी इतिहास न वाचता सावरकरांच्या बरोबरचे समजत असावेत.

बाकी मुद्यांशी सहमतच.

अर्धवटराव's picture

16 Apr 2015 - 9:35 pm | अर्धवटराव

अभिनव भारतीचा विसर्जन समारंभ करताना सावरकरांनी अध्यक्षस्थानी सुभाषबाबुंचा फोटो ठेवला होता असं कुठेतरी वाचलं होतं. अमेरीका व जपान अखेरचे शांतीप्रयत्न करत असताना देखील जपान महायुद्धात नक्की उतरेल अशी बातमी सावरकरांच्या सोर्सेसनी त्यांना दिली होती. तेंव्हा महायुद्धाचा पुरेपूर उपयोग करुन घ्यायचा असेल तर सुभाषबाबुंना देशाबाहेरुन प्रयत्न या मताचे सावरकर होते (नक्की संदर्भ आठवत नाहि).
तसंही सावरकर वगैरे मंडळींचं बरचसं काम गुप्त रुपात चालत असल्यामुळे त्याचे उघड संदर्भ जगजाहीर व्हायचे चान्सेस कमि आहेत. पण सुभाषबाबु आणि सावरकर कुठेतरी लिंक्ड असावे हे नक्की.

क्लिंटन's picture

17 Apr 2015 - 6:44 pm | क्लिंटन

टिळकांच्या बरोबरचे समजतात असे मी कधी वाचलेले नाही.

नरहर कुरुंदकरांनी म्हटल्याप्रमाणे 'अहिंसक मार्गाचा अवलंब न करणारे सगळे गांधीविरोधी आणि सगळे गांधीविरोधी हे हिंदुत्ववादी' या न्यायाने सावरकर, भगतसिंग, गदर पार्टी , अनुशीलन समिती इत्यादी सगळे बरोबरचे समजले जातात. आणि सावरकरांचे प्रेरणास्थान असलेले लोकमान्य टिळकही-- मग भले स्वतः टिळकांनी लखनौ करार केला होता, लोकमान्यांनीही गांधीजींप्रमाणेच लोकांच्या प्रबोधनावर भर देऊन लोकांमध्ये आपल्याला स्वातंत्र्य हवे ही जाणीव निर्माण करण्यावर भर दिला होता इत्यादी गोष्टींना फाट्यावरच मारायचे. म्हणूनच टिळकांचा उल्लेख केला. अशा स्वरूपाची चित्रेही बघायला मिळतात. त्यात तर शिवाजी महाराज, सुभाषचंद्र बोस आणि चंद्रशेखर आझाद एकत्र दाखविले आहेत.काही चित्रांमध्ये भरीला भर म्हणून राणा प्रतापही असतात.तेव्हा गांधीजींच्या मार्गाला विरोध असलेले सर्व लोक क्रांतिकारक आणि सगळे हिंदुत्ववादी अशा प्रकारची एक धारणा असते.त्याला उद्देशून मी हे विधान केले.

अर्थात त्यांचा वरकरणी उद्देश त्यांनी लपवला नव्हता. एका भाषणात (आठवणीतून) त्यांनी सांगितल्याचे वाचले आहे की, देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे हे नक्की त्यावेळेस अचानक देश सांभाळायला सैन्य कुठून आणायचे, तेंव्हा आता तयारी करा...

याच बरोबर सावरकरांचा उद्देश होता की सैन्यात जाऊन शस्त्रे आणि ती चालवायचे प्रशिक्षण मिळवा.त्या बंदुकांची तोंडे कुठे वळवायची ते कधीही ठरवता येईल.

मागे एक गोष्ट वाचल्याची आठवते. चिंतामणराव देशमुख लोकमान्यांना भेटायला गेले होते आणि स्वातंत्र्यासाठी काहीतरी करायचे आहे असे त्यांनी लोकमान्यांना म्हटले.त्यावर लोकमान्यांनी त्यांना सांगितले की आज ना उद्या स्वातंत्र्य मिळणारच आहे आणि त्यानंतर अर्थतज्ञ आणि बँकर्सची देशाला गरज पडेल. अशावेळी चिंतामणरावांसारखे लोक देशाला गरजेचे असतील म्हणून लोकमान्यांनी चिंतामणरावांना स्वातंत्र्यलढ्यात न पडायचा सल्ला दिला.

प्रदीप's picture

18 Apr 2015 - 2:16 pm | प्रदीप

शेषराव मोरे ह्यांनी अतिशय सखोल अभ्यास करून लिहीलेल्या "१९४७- काँग्रेसने आणी गांधीजींनी अखंड भारत का नाकारला' ह्या पुस्तकात, 'नेताजी व हिंदू मुस्लिम प्रश्न' ह्या उपप्रकरणांत तत्कलीन भारतीय मुस्लिमांच्या मागण्या व त्यांतून उद्भवलेले जटिल प्रश्न, ह्यांजवर नेताजींची भूमिका काय होती, ह्यावर सविस्तर चर्चा केलेली आहे.
[आवृत्ति दुसरी, पृष्ठे ३०८- ३१५]

अनेक संदर्भ देऊन मोरे लिहीतात की नेताजींच्या मते, हिंदू-मुस्लिम समस्या खर्‍या अर्थाने अस्तित्वात नव्हतीच, तर ब्रिटीशांनी ती फूट मुद्दाम निर्माण केलेली होतीं. नेताजींच्या म्हणण्यानुसार "भारतीय जनतेत (राष्ट्रीय व भावनिक दृष्टींनी) फूट पडत नसल्यामुळे त्यंनी भारताची भौगोलिक व राजकीय फाळणी करण्याचे ठरविले. तीच पकिस्तानची योजना होय, की जी ब्रिटीशांच्या सुपीक मेंदूतून जन्माला आलेली आहे", नेताजींच्या मते, पाकिस्तान ही एक 'अजब', 'अव्यवहारीक' व 'अशक्यप्राय' योजना होती.

ऑगस्ट १९४२ साली त्यांनी 'स्वतंत्र भारत व त्याचे प्रश्न' नावाच्या लेखात लिहीले होते की "भारतातील आजची मुस्लिम समस्या ब्रिटीशांची कृत्रिम निर्मीती आहे... ब्रिटीशांचे राज्य संपताच ती अदृश्य होऊन जाईल. ....प्रत्येकाला नोकरी, अन्न, शिक्षण आणि धार्मिक व सांस्कृतिक स्वातंत्र्य मिळाल्यास (स्वतंत्र) भारतात अल्पसंख्याकांचा प्रश्नच स्किल्लक उरणार नाही'.

'पाकिस्तान' मागणीवरील तोडगा म्हणून मुस्लिम लीगकडे भारताची सर्व सत्ता देऊन टाकण्याचा नेताजींचा प्रस्ताव होता. जून १९४० मध्ये त्यांनी जिनांची भेट घेऊन लीगने काँग्रेसबरोबर स्वातंत्रयलढ्यात सहभागी होण्याचा व नंतर जिनांनी 'स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा' प्रस्ताव ठेवला होता.

मोरे लिहीतात की नेताजी, बंगाली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देशबंधू चित्तरंजन दास ह्यांचे शिष्य होते. ह्या दासांनी काँग्रेसपुढे १९२३ साली 'बंगाल करार' मांडला होता. काँग्रेसने तो तेव्हा फेटाळला, पण (देशबंधूंच्या नेतृत्वाखालील) बंगाल प्रांतिक काँग्रेसने १९२४ साली तो मान्य केला. त्या करारातून, नेताजींच्या म्हणण्यानुसार 'देशबंधूंनी सर्व मुसलमानांची खात्री करून दिली की ते मुसलमानांचे खरे मित्र आहेत'. ह्या 'बंगाल करारा'नुसार राज्यातील ५२ टक्के मुसलमानांना विधीमंडळात ६० टक्के, तर नोकर्‍यांत ५५ टक्के जागा राखीव होत्या.

१९३८ च्या काळात जिना सुभाषबाबूंना म्हणाले होते की "मि. बोस, माझे मित्र चित्तरंजन दास ह्यांचे आपण शिष्य आहात. त्यामुळे तुमचे आणि माझे जमायला काहीच हरकत नाही. माझे आणी गांधींचे मात्र जमणे शक्य नाही".

सुभाषबाबूंच्या 'आझाद हिंद फौजेच्या' प्रतिनिधी मंडळात ७ पैकी ४ प्रतिनिधी (लेफ्टनंट) मुसलमान होते. ही 'आझाद हिंद फौज'ही पाकिस्तानच्या विचारापासून मुक्त नव्हती. इक्बाल शेदाई हे त्या फौजेतील क्रमांक दोनचे प्रभावशाली नेते. त्यांना फौजेचे मुख्यालय इटलीतील रोम येथे पाहिजे होते. नेताजींना हे मान्य झाले नाही. परिणाम असा झाला की शेदाईंनी आझाद हिंद फौजेत फूट पाडून 'आझाद मुस्लिम फौज' स्थापन केली.

नेताजींनी १९४२ साली 'आझाद हिंद फौजे'च्या प्रचारासाठी 'आझाद हिंद रेडियो' केंद्र सुरू केले. पण नंतर फौजेतील मुस्लिमांन खूष ठेवण्यासाठी दुसरे 'आझाद मुस्लिम रेडियो' केंद्र चालू केले.

सदर उपप्रकरणाचा समारोप करतांना मोरे लिहीतात की "रासबिहारी बोस व सुभाषचंद्र बोस ह्यांना हिंदु- मुस्लिम प्रश्न महत्वाचा वाटत नव्हता; फाळणीची मागणी अजब, अव्यवहार्य व अशक्यप्राय म्हणून गंभीरपणे विचारात घ्यावीशी वाटत नव्हती. स्वतंत्र व अखंड भारतात मुसलमानांचा प्रश्न कसा मिटवावा ह्याबद्दल त्यांची कोणतीही योजना नव्हती व ब्रिटीश गेले की हा प्रश्न आपोआप अदृश्य होईल असे त्यांना वाटत होते. त्या काळातील जिनांच्या गर्जना, मुस्लिम प्रश्नांचे गांभीर्य व सैन्यातील मुस्लिम प्राबल्य लक्षात घेता असे म्हणणे भाग आहे की नेताजींची आझाद हिंद फाउज विजयी झाली असती तरी अखंड व स्वतंत्र भारतात स्थिर लोकसत्ताक सरकार स्थापन होऊ शकले नसते: अराजक व हिंदु- मुस्लिम यादवी युद्धाचे आव्हान उभे ठाकले असते. स्वातंत्र्यप्राप्तीएवढाच, किंबहुना त्याहूनही अधिक महत्वाचा प्रश्न हिंदू मुस्लिम समस्या आहे, हे नेताजींच्या लक्षात आले नाही.

होबासराव's picture

16 Apr 2015 - 6:14 pm | होबासराव

तुझ्या ह्यांच (नं. ३ भगेंन्द्र कुमार) काय मत आहे ह्या बाबतित

हुप्प्या's picture

16 Apr 2015 - 9:44 pm | हुप्प्या

सुभाषचंद्र बहुधा निधर्मी, कम्युनिस्ट विचारांचे होते तरी ते हिंदुत्ववाद्यांना आवडतात म्हणून इतके आश्चर्य का वाटावे? सावरकर कमालीचे विज्ञाननिष्ठ होते. हिंदुत्त्ववाद्यांना तेही प्रिय आहेत. समूह जेव्हा एखाद्यावर फिदा होतो तेव्हा त्याचे १००% विचार पटलेले असतात असे नाही. तसे शक्य नाही. त्यातल्या त्यात उठून दिसणारी वैशिष्ट्ये आवडू वा नावडू शकतात. शत्रूचा शत्रू तो माझा मित्र असे रोखठोक धोरण जास्त भावणारे होते. गांधी व नेहरूंचे ब्रिटिशांना मदत करण्याचे धोरण अनाकलनीय होते. निदान तटस्थ रहाता आले असते.
हिटलर वा जपानी लोकांचे अत्याचार हे आवडतात म्हणून सुभाषचंद्रांना समर्थन द्या असे कुणाही भारतीयाला वाटले असेल असे वाटत नाही. भारतात ज्यू वा चिनी लोकांवर (अगदी मूठभर संख्येने असले तरी) वंशमूलक अत्याचार झालेले नाहीत. तसे करावेत असे कुणाला वाटत असेल असे मला वाटत नाही. तेव्हा हिटलरबद्दल आकर्षण असेल तर केवळ ब्रिटिशांचा शत्रू म्हणूनच. लाखो ज्यूंची कत्तल करणारा म्हणून नाही.
तसेच सुभाषचंद्रांविषयीचा आदर हा कम्युनिस्ट विचारसारणी होती, खिलाफतचा समर्थक म्हणून नक्कीच नाही.

क्लिंटन's picture

16 Apr 2015 - 10:37 pm | क्लिंटन

समूह जेव्हा एखाद्यावर फिदा होतो तेव्हा त्याचे १००% विचार पटलेले असतात असे नाही. तसे शक्य नाही. त्यातल्या त्यात उठून दिसणारी वैशिष्ट्ये आवडू वा नावडू शकतात.

बरोबर आहे ना. पण सावरकर विज्ञाननिष्ठ असले तरी त्यांना मुस्लिमांना राखीव जागा द्यावात असे वाटत होते का? अर्थातच प्रत्येकाला नक्की कोणते वैशिष्ट्य भावेल हा ज्याचा त्याचा मुद्दा झाला पण तरीही डावे विचार, मुस्लिम आरक्षण, खिलाफत चळवळ इत्यादी गोष्टी बघितल्या तर हिंदुत्ववाद्यांना अन्यथा न आवडणार्‍या गोष्टी सुभाषचंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात होत्या. तरीही ते सुभाषचंद्रांना पाठिंबा देतात याचे कारण केवळ गांधींपेक्षा त्यांचा मार्ग वेगळा होता यापेक्षा वेगळा अर्थ काढता येईल का? एक तर अनेक लोकांना या गोष्टी माहित नसतात, आणि असल्या तरी ते सुभाषचंद्र गांधीजींपेक्षा वेगळ्या मार्गाचे म्हणून अशा अनेक अत्यंत क्रिटिकल गोष्टींकडे दुर्लक्ष करतात की काय हा प्रश्न नक्कीच पडतो.

२६ जानेवारी १९४३ रोजी सुभाषचंद्रांनी बर्लिनमध्ये भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (डिसेंबर १९२९ मध्ये लाहोर काँग्रेसमध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास झाल्यानंतर २६ जानेवारी १९३० रोजी देशभर स्वातंत्र्यदिन साजरा केला गेला होता.त्यानंतर १९४७ पर्यंत २६ जानेवारी रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असे) कार्यक्रम आयोजित केला होता त्यात भाषण केले होते. नाझी रेजिमचा ज्यू द्वेष होता हे सगळ्यांनाच माहित आहे. त्यावेळी पॅलेस्टाईनमध्ये ज्यू लोकांचे स्थलांतर चालू होते आणि अरबांमध्ये अस्वस्थता होती.ज्यू द्वेषामुळे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने नाझी रेजिमचा या अरबांना पाठिंबा होता. याच अरबांपैकी जेरूसलेमचा मुफ्ती, ज्यूंची इराकमध्ये कत्तल करणारा इराकचा माजी पंतप्रधान इत्यादी या कार्यक्रमाला हजर होते. यावेळी सुभाषचंद्रांनी केलेले भाषण बघितलेत तर ते कोणी केले आहे हे नाव न वाचता कोणी नुसते भाषण वाचले तर तो माणूस ताबडतोब दाढ्या कुरवाळणार्‍यांच्या गोटात सामील केला जाईल असे ते भाषण होते. या भाषणाच्या वेळी सुभाषचंद्र त्यांच्या सैनिकी गणवेषात किंवा धोतर-कुर्त्यामध्ये गेले नव्हते तर काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये गेले होते. आता ते काय घालून तिथे गेले यावरून फार तर्क करायची इच्छा नाही पण समोरचा ऑडिअन्स लक्षात घेता सुभाषचंद्र मुद्दामून काळ्या शेरवानीमध्ये तिथे गेले हे सूचकात्मक नव्हते का?

"“By the beginning of the present century, the British … discovered the Muslim problem in year 1906 when Lord Minto was the Viceroy. Prior to this there was no such problem in India. In the great revolution in 1857, Hindus and Muslims had fought side by side against the British, and it was under the flag of Bahadur Shah, a Muslim, that India’s first war of independence was fought…. Consequently, the British policy has now fallen back on its last hope. If Indian people cannot be divided, then the country – India – has to be spilt up geographically and politically. This is the plan called Pakistan which has emerged from the fertile brain of a Britisher. Though the vast majority of the Indian Muslims want a free and independent India, though the president of the Indian National Congress today is Maulana Abul Kalam Azad, a Muslim, and though only a minority of the Indian Muslims support the idea of Pakistan, the British propaganda throughout the world gives the Indian Muslims are not behind the national struggle for liberty and want India to be divided up.” सुभाषचंद्र.ऑर्ग या वेबसाईटवर सुभाषचंद्रांची भाषणे दिली आहेत.त्यात बघूनही याची खात्री करता येईल.

तेव्हा सांगायचा मुद्दा हा की इतके विरोधाभास असूनही हिंदुत्ववादी विचारांचे लोक सुभाषचंद्रांना पाठिंबा देतात याचे नवल वाटते.विशेषतः ज्या कारणांसाठी गांधीजी दाढ्या कुरवाळणारे ठरतात नेमके तेच सुभाषचंद्रांनी केले तरी त्यांना पाठिंबा हे कोडे मला उलगडलेले नाही.आणि शत्रूचा शत्रू हा आपला मित्र हे धोरण जपानसारख्या शत्रूच्या शत्रूसंदर्भात समर्थनीय नव्हते हे यापूर्वीच मिपावर मांडले आहे. भारतीय भूभागात इंटरेस्ट नसलेला इतर कोणताही शत्रूचा शत्रू परवडला असता आणि त्याला पाठिंबाच दिला असता पण जपानची केस वेगळी होती.त्यामुळे या कारणावरूनही लोक कसे काय सुभाषचंद्रांना पाठिंबा देऊ शकतात हेच कळत नाही.

(स्पष्टीकरणः मला स्वतःला धर्माबिर्माचे फार नाही.पण तरीही मी एक उजव्या गटाचा राष्ट्रवादाला पाठिंबा देणारा आहे. तरीही माझ्यासारख्या विचारांचे अनेक सुभाषचंद्रांना कसा काय पाठिंबा देतात याचे कोडे नक्कीच वाटते. या बाबतीत तरी मी या टिपीकल उजव्यांप्रमाणे नाही)

अर्धवटराव's picture

16 Apr 2015 - 10:54 pm | अर्धवटराव

जर्मनी-जपानची बाजु घ्यायचं एक महत्वाचं आणि सोपं कारण म्हणजे जर हि राष्ट्रे युद्ध जिंकले असते (तशी शक्यता अगदी नगण्य नव्हती) तर ब्रिटीशांनी भारताला एक गुलाम भेट द्यावा तसा जर्मनी-जपानच्या हवाली केला असता. भारताकडे काहिच बार्गेन पॉवर नसती. सुभाषबाबुंच्या प्रयत्नांमुळे फॉर्मेलिटी म्हणुन का होईना, जपानने भारताला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिला असता (तसंही आझाद हिंद सेनेचं सरकार जपान्यांनी मान्य केलच होतं). पुढे काय व्हायचं ते रामायण घडायचं ते घडलंच असतं, पण भारत एक स्वतंत्रराष्ट्र म्हणुन जपान्यांचा सामना करायला उभं राहिलं असतं. अन्यथा ब्रिटीशांपेक्षाही अधिक भयंकर मालकाची गुलामगिरी सुरु झाली असती.

क्लिंटन's picture

17 Apr 2015 - 11:57 am | क्लिंटन

अन्यथा ब्रिटीशांपेक्षाही अधिक भयंकर मालकाची गुलामगिरी सुरु झाली असती.

पण जपानी हे ब्रिटिशांपेक्षा भयंकर होते हेच मान्य करायला अनेक लोक तयार नसतात :(

माझा मुद्दा १९४२-४३ च्या काळापेक्षा सध्याच्या काळास अधिक जास्त निगडीत आहे. सुभाषचंद्रांनी देश स्वतंत्र व्हावा याच उद्देशाने सगळा खटाटोप केला होता याविषयी कोणीही शंका घेऊच शकणार नाही.१९३७-३८ मध्येच ऑस्ट्रेलियातील आणि अमेरिकेतील वर्तमानपत्रांमध्ये जपान्यांनी चीनमध्ये कसे अत्याचार केले होते याविषयी बातम्या येत होत्या.इंग्लंडमधून आय.सी.एस झालेल्या आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा पर्स्पेक्टिव्ह असलेल्या सुभाषचंद्रांनाही या बातम्या कळल्या नसतील हे मानणे तसे जडच जाते.पण सर्वसामान्यांना या बातम्या कळल्या नसतील तर ते नक्कीच समजू शकते.भारतातील सर्वसामान्य न्यू यॉर्क आणि मेलबर्नमधील वर्तमानपत्रे नक्कीच वाचत नव्हते.कदाचित त्याकाळी मी असतो तर त्या भारलेल्या वातावरणात आणि देश स्वतंत्र करायचाच आहे या उद्देशाने मी पण सुभाषचंद्रांना डोक्यावर धरले असते. पण २०१५ मध्ये पूर्वी माहित नसलेल्या या अनेक गोष्टी आता सर्वसामान्यांनाही माहित झाल्या असतानाही आजचे सर्वसामान्य लोक सुभाषचंद्रांना का डोक्यावर धरतात?

नरहर कुरूंदकर म्हणाले होते ते किती बरोबर होते हे आता जाणवते-- "अहिंसेच्या मार्गाचा अवलंब न करणारे सगळेच क्रांतिकारक आणि सगळेच गांधीविरोधी. आणि असे सगळेच गांधीविरोधी म्हणजे हिंदुत्ववादी" अशी सोयीस्कर विभागणी आधीच केलेली असते.बहुदा म्हणूनच सुभाषचंद्रांना उजव्या गटाचेही लोक पाठिंबा देतात.

खंडेराव's picture

17 Apr 2015 - 2:00 pm | खंडेराव

अंदमान बेटांवर भरपुर अन्याय केले. बरे ते अजुन पुढे आले नाहित.

क्लिंटन's picture

17 Apr 2015 - 2:07 pm | क्लिंटन

अंदमान बेटांवर भरपुर अन्याय केले. बरे ते अजुन पुढे आले नाहित.

जपान्यांनी अंदमानात नक्की काय केले याविषयीचा हा लेख सुभाषचंद्रांच्या जपान्यांशी हातमिळवणी करायचे समर्थन करणार्‍या सगळ्यांनी वाचावा असा आहे. अनेकांना वाटते की जपान्यांना भारतीयांविषयी फार प्रेम होते आणि त्यांनी इंग्रजांना हाकलून दिल्यानंतर आपल्याला गपगुमान स्वातंत्र्य दिले असते. जपान्यांनी अंदमानात नक्की काय केले हे वाचल्यास हा गैरसमज गळून पडायला हरकत नसावी.आपले मोठे नशीब की जपानी आणि आझाद हिंद सेना यांचा पराभव झाला.अन्यथा जपान्यांनी दक्षिण-पूर्व आशियात केले होते अगदी तसेच अत्याचार भारतातही झाले असते.

कपिलमुनी's picture

17 Apr 2015 - 5:01 pm | कपिलमुनी

जपानी लोकांचे अत्याचार वाचल्यावर ते विकॄत असल्याची खात्री पटते.

बोका-ए- आझम यांची एक लेखमालिका आहे मिपा वर. त्यात काही लेखांमध्ये दुस-या महायुद्धात जपान्यांनी कीती कृर अत्याचार केले त्याचे शहारे आणणारे वर्णन आहे.

काळा पहाड's picture

18 Apr 2015 - 12:48 am | काळा पहाड

क्लिंटन साहेब,
स्वातंत्र्य मिळण्यात आझाद हिंद सेनेचा काही रोल होता का? बिलकुल होता. आझाद हिंद सेनेचं बनणं, त्यांचं ब्रिटिशांविरुद्ध उभं रहाणं आणि त्यांची कोहिमापर्यंत धडक यानं ब्रिटीश हादरले. त्यांची संपूर्ण मदार २ गोष्टींवर अवलंबून होती. १) भारतीय सैन्याची निष्ठा आणि २) त्यांच्या साम्राज्यावर न मावळणारा सूर्य (थोडक्यात, त्यांची आर्थिक आणि सामरिक महासत्ता असणं). दुसर्‍या महायुद्धानं दुसर्‍या गोष्टीची वाट लावली. आझाद हिंद सेनेनं बाकीच्या भारतीय सैन्यासमोर एक असं उदाहरण उभं केलं की ज्यामुळे त्यांच्या साम्राज्याला धोका उत्पन्न झाला. ब्रिटिशांनी शहाणपणाचा निर्णय घेतला.

क्लिंटन's picture

18 Apr 2015 - 11:27 am | क्लिंटन

नक्कीच. स्वातंत्र्य मिळण्यात आझाद हिंद सेनेचा वाटा नक्कीच होता.माझा मुद्दा केवळ जपान्यांशी हातमिळवणी करण्यापुरता आहे.

arunjoshi123's picture

20 Apr 2015 - 5:39 pm | arunjoshi123

Posterity will ask uncomfortable questions about the vandalism of the Japanese and the role played by them for the freedom of India in collaboration with Subhas Chandra Bose. Ironically, Bose was in Port Blair between December 29-31, 1943. He visited the cellular jail where Diwan Singh, the president of the Indian Independence League and hundreds of his companions were languishing, but he did not visit them. After wining, dining and dancing in the Ross Island he went back to Singapore. This is how Tojo helped Bose to get freedom for India from the British.

असे लेखात लिहिले आहे. याची भाषा लेखकाच्या मानसिकतेची सूचक आहे. बाय द वे, जॅपनीज सैन्य जर असलेच होते तर हेच अत्याचार त्यांनी मणिपूरमधे का केले नाहीत?

क्लिंटन's picture

20 Apr 2015 - 6:10 pm | क्लिंटन

अंदमानात अत्याचार केले त्याचे काय?

जॅपनीज सैन्य जर असलेच होते तर....

म्हणजे जपानी सैन्याने दक्षिण-पूर्व आशियात जो धुमाकूळ घातला होता त्याकडे दुर्लक्ष करून जपानी सैन्य तसले नव्हते असे तुम्हाला वाटत असल्यास तुमच्या नंदनवनात सुखात रहा.

जपानी सैन्य तसले नव्हते

नाह. नाह. मला तसले नव्हते, इ इ नै म्हणायचं.
--------------------------------------------------
युद्धोत्तर काळात चुकुनमाकून जपानचं भारतावर राज्य असतं (एकतर यातल्या चुकुनमाकून शब्दावरच तुम्हाला आपत्ती आहे, पण ते असो.) तर ते अत्यंत दुष्टपणे भारताशी वागले असते असा जो आपणांस आत्मविश्वास आहे त्याचा स्रोत काय आहे हे जाणायचे आहे. म्हणजे जपानचे शांतिकालीन अत्याचार, इ इ.

क्लिंटन's picture

20 Apr 2015 - 6:42 pm | क्लिंटन

तर ते अत्यंत दुष्टपणे भारताशी वागले असते असा जो आपणांस आत्मविश्वास आहे

का हो जपान्यांनी दक्षिण-पूर्व आशियात अगदी १९४० च्या दशकात जे काही केले ते तुम्हाला दिसत नाही का?इतर ठिकाणचे सोडाच आपल्याच अंदमानातही केले ते पण तुम्हाला दिसत नाही का? जे त्यांनी अंदमानातही केले ते बंगालमध्ये कशावरून केले नसते? एखादी गोष्ट विष आहे हे समजले की त्यापासून दूर राहण्यातच शहाणपणा आहे हे मला समजते. तुम्हाला हवे असेल तर ते विष आहे की नाही हे पिऊन खात्री करावीशी वाटत असेलही. मला तसे वाटत नाही.

आणि तुम्ही मला प्रश्न विचारत आहात की जपानी भारताशी दुष्टपणे वागले असते हा विश्वास कशावरून तसाच मी तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो की ते भारताशी दुष्टपणे वागले नसते हा विश्वास तुम्हाला कशावरून वाटतो?

युद्धकालीन परिस्थिती आणि शांतिकालीन परिस्थिती यांत फरक आहे. I don't think either of us has adequate evidence to establish who was more cruel and whether Japan would have been a worse ruler in peacetime. असो, आपणाशी दर्जात्मक आणि वस्तुनिष्ठ संवाद झाला आहे त्याचा आनंद आहे.

वॉल्टर व्हाईट's picture

20 Apr 2015 - 10:33 pm | वॉल्टर व्हाईट

युद्धकालीन परिस्थिती आणि शांतिकालीन परिस्थिती यांत फरक आहे

हा मुद्दा दमदार आहे खरा.

क्लिंटन's picture

21 Apr 2015 - 10:57 am | क्लिंटन

नवे मुद्दे आल्यामुळे त्याविषयी लिहित आहे.

माओने त्याच्या २७ वर्षांच्या राजवटीत लाखो लोकांना ठार मारले. स्टॅलिननेही तेच केले. आता हा शांततेचा काळ म्हणायचा की युध्दाचा? अन्य कोणत्या देशाशी प्रत्यक्ष युध्द चालू नसलेला काळ शांततेचा म्हटला तरी लाखांना ठार मारले जात असेल तर तो काळ शांततेचा कसा? जपानी फिलीपीन्समध्ये घुसले जानेवारी १९४२ मध्ये. नोव्हेंबर १९४४ मध्ये त्यांना तिथून मागे रेटले गेले. जानेवारी १९४२ नंतर जपान्यांनी पॅसिफिकमधील इतर अनेक ठिकाणे जिंकली होती आणि आपले क्षेत्र फिलीपीन्सपेक्षा बरेच वाढवले होते. अमेरिकन सैन्याने जपान्यांवर फिलीपीन्समध्ये हल्ला केला तो अगदी १९४४ मध्ये. मधल्या काळात तिथे शांतता होती की जपानी इतरत्र युध्दात असल्यामुळे युध्दजन्य परिस्थिती? दोन्ही बाजू आपल्या सोयीप्रमाणे तिथे शांतता होती किंवा युध्दजन्य परिस्थिती होती असे म्हणू शकतात. तसेच अंदमानात एकदा जपानी घुसल्यानंतर शांतता म्हणायची की जपानी इतरत्र युद्धात असल्यामुळे युध्दजन्य परिस्थिती? तेव्हा जपानी खुनशी होतेच आणि त्यांना युद्धजन्य परिस्थितीची सूट देता येईल असे मला तरी वाटत नाही.

तुम्हीच अन्य एका प्रतिसादात जपान्यांना भारताविषयी तो बुध्दाचा देश म्हणून प्रेम वाटत होते असे लिहिले आहेत. म्हणजे जपानी जे काही करत होते तो बुध्दाचा मार्ग होता का? आणि अनेकांना हिटलर आर्य वंशाचा उदोउदो करायचा आणि भारतही मुळातला आर्य लोकांचा देश म्हणून हिटलरलाही भारताविषयी प्रेम होते असा उफराटा सिध्दांत मांडतात. कालच मिपा सदस्य राजघराणे यांनी त्यांच्या ब्लॉगवर याविषयीच लिहिले आहे आणि असे वाटणार्‍यांचे मत कसे चुकीचे आहे हे दाखविओन दिले आहे. आता सगळी दुनिया भारताभोवती फिरत होती आणि सगळ्यांना आपल्याला मदत करायची होती असे वाटायला लागले तर खरोखरच अवघड आहे.

अर्धवटराव's picture

17 Apr 2015 - 9:32 pm | अर्धवटराव

" ब्रिटीशांपेक्षाही अधिक भयंकर मालकाची गुलामगिरी " म्हणजे साहेबांपुढे भारताची जी(काहि उरली सुरली) पत होती त्यापेक्षाही डिग्रेड झालेली आपली कंडीशन याअर्थाने हे वाक्य वापरलं आहे.

जास्त अत्याचारी कोण? इंग्रज कि जपान? अगदी खरं सांगायचं तर मला माहित नाहि. दोन्ही बाजुंच्या इतक्या गोष्टी वाचुन, ऐकुन आहे कि डावं-उजवं करणं मला शक्य वाटत नाहि. तत्कालीन जीव-रासायनीक युद्धाची तयारी करणारं , चीनला ताब्यात ठेवणारं जपान खरच मनुष्यराज्य म्हणुन घ्यायच्या लायकीचं आहे का हा प्रश्न पडावा. अफ्रीका, आशीया, अमेरीकेत ब्रीटनचे प्रताप ऐकुन त्यांच्यात काळीज नावाचा अवयव मिसींग आहे का असं वाटावं. एकदाका माणसाचं माणुस म्हणुन मुल्य नाकारलं कि गोर्‍या युरोपीयनांना आणि काळ्या आशीयायी सत्तांना मनुष्य हाडामासाची केवळ व्यापारी दृष्टीने किंमत उरते. असो.

राहिला मुद्दा जनता जनार्दनाच्या गांधीवादी-गांधीविरोधी, हिंसा-अहिंसा, हिंदुत्ववादी-सेक्युलर वगैरे घोळाचा. या तमाशाला थोडंफार करमणुक मुल्य असण्यापलिकडे फार काहि बघायची गरज नाहि. यांना नेहरुंनी आधुनीक भारताची केलेली पायाभरणी पण दिसत नाहि आणि जनसंघापासुन तो आतापावेतो उजव्या आघाडीत एकही कर्तुत्ववान नेता दिसत नाहि. गांधीचा चरखा आणि सावरकरांची पिस्तुल हे केवळ दृष्य परिमाणं होती. ते का धारण केलं गेलं, त्यामागचं मनगट, मन आणि मेंदु काय होता याचा विचार करण्याची गरज फारशी कोणाला वाटत नाहि. स्वतःला हिंदुत्ववादी वा गांधीवादी म्हणणे म्हणजे नेमकं काय याचाच जिथे पत्ता नाहि तिथे बाकी तपशील काय कामाचा.

संदीप डांगे's picture

17 Apr 2015 - 10:15 pm | संदीप डांगे

लय भारी...

आजानुकर्ण's picture

17 Apr 2015 - 10:28 pm | आजानुकर्ण

नेहरुंचे मूल्यमापन कोणत्या गोष्टीवर करायचे याचीही किमान माहिती पब्लिकला नसते. नेहरुंबाबत लेडी माऊँटबॅटनला सिगरेट ऑफर करणारा स्त्रीलंपट ही इतकीच माहिती शाखेतल्या बौद्धिकात मिळत असल्याने त्यात पब्लिकचाही फारसा दोष नाही.

क्लिंटन's picture

17 Apr 2015 - 10:32 pm | क्लिंटन

जास्त अत्याचारी कोण? इंग्रज कि जपान? अगदी खरं सांगायचं तर मला माहित नाहि. दोन्ही बाजुंच्या इतक्या गोष्टी वाचुन, ऐकुन आहे कि डावं-उजवं करणं मला शक्य वाटत नाहि.

मला वाटते की जपानी अधिक भयंकर होते. इंग्रज हे संत अजिबात नव्हते पण जपानी त्याहून कितीतरी पटींनी अधिक खुनशी होते. जपानने मांचुरियावर हल्ला केला १९३२-३३ मध्ये.त्यानंतर १९४५ पर्यंत म्हणजे १२-१३ वर्षात जपानने जो काही धुमाकूळ घातला त्याला तोड नाही. चीनसारख्या मोठ्या देशातही ३% पर्यंत लोकसंख्या १२-१३ वर्षात ठार मारणे म्हणजे किती भयानक प्रकार होता हे दिसतेच. फिलीपाईन्ससारख्या देशात जपानी घुसले १९४२-४३ मध्ये म्हणजे त्यांना वेळ मिळाला २-३ वर्षेच. तरीही विविध अंदाजांप्रमाणे फिलीपाईन्सची ४% लोकसंख्या जपान्यांनी या २-३ वर्षात स्वाहा केली.

ब्रिटिशांचे म्हणाल तर ते क्रूर होतेच यात शंका नाही.पण जपानी क्रौर्याच्या बाबतीत ब्रिटिशांच्या चार नाही शंभर पावले पुढे होते. जपान्यांनी या स्पीडने एखाद्या देशावर १५० वर्षे राज्य केले असते तर मला वाटते एतद्देशिय १००% लोकसंख्येचा खातमा केला असता. ब्रिटिशांच्या धोरणांमुळे बंगालमध्ये लाखो लोक मारले गेले यात शंकाच नाही.१८५७ नंतरही उत्तर भारतात इंग्रजांनी प्रचंड क्रौर्य दाखविले. तरीही जपान्यांपेक्षा इंग्रज कमी होते याची काही उदाहरणे--
भारतीयांच्या मनातील असंतोषाला वाट करून दिली नाही तर परत १८५७ सारखा उठाव होईल या स्वार्थी हेतूने का होईना त्यामानाने सुसंस्कृत विचार करून काँग्रेसची स्थापना करणारा इंग्रजच होता. राणीच्या जाहिरनाम्यानंतर आलेल्या व्हाईसरॉय कॅनिंगला दयाळू कॅनिंग म्हणायचे असेही वाचले आहे.रिपनही असा एक अत्याचार न करणारा व्हाईसरॉय होता. मुंबई प्रांतालाही रे, एलफिस्टन सारखे गव्हर्नर होते. लोकमान्य टिळकांवर रितसर खटला चालवून, कायद्याप्रमाणे शिक्षा दिली गेली होती. १९०८ मध्ये राजद्रोहाच्या खटल्यात त्यांना ६ वर्षाची शिक्षा झाली तसाच खटला इंग्रज सरकारने त्यांच्याविरूध्द १९१६ मध्ये आणला होता त्यात त्यांची निर्दोष मुक्तताही झाली होती. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे असे लोकमान्य उघडपणे लिहू शकत होते. स्वराज्य पक्ष निवडणुका लढवून विधीमंडळात जाऊन इंग्रजांची तिथे अडवणुक करायचा प्रयत्न करत होता.त्याला फार महत्व दिले गेले असे नाही पण विधीमंडळात जाऊन भारतीयांची बाजू मांडायला परवानगी होती. सुभाषचंद्र कलकत्याचे आणि सरदार पटेल अहमदाबादचे महापौर होऊ शकले.त्यांना तिथे मर्यादित का होईना अधिकार होते. १९३५ च्या गव्हर्मेंट ऑफ इंडिया कायद्यानुसार १९३७ मध्ये निवडणुका होऊन अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची राज्य सरकारे सत्तेत आली.त्यांनाही राज्य पातळीवर मर्यादित का होईना अधिकार होते. यापैकी पाव टक्काही गोष्टी जपानी राज्यात होणे शक्य नव्हते.

म्हणूनच म्हणतो की जपानी आपल्या डोक्यावर बसले असते तर ते आपल्यासाठी आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे झाले असते.

संदीप डांगे's picture

17 Apr 2015 - 11:10 pm | संदीप डांगे

अजून एक. फाळकेसाहेब चित्रपट निर्मिती करून व्यवस्थित व्यवसाय करू शकत होते. अशा काही घटना ऐकल्या, वाचल्या की नेमकी स्वातंत्र्यपूर्व भारतातली परिस्थिती कशी होती याचे कुतूहल अजून वाढत जाते. इंग्रजांविरोधी स्वातंत्र्यलढा आणि त्याचवेळी सामान्य पद्धतीने चाललेले समाजजीवन यांचा परस्परविरोधी सूर शालेय इतिहासात कधीच समोर येत नाही. त्याकाळाचे चित्र आजच्या सामान्य पब्लिकच्या मनात जे आहे त्यापेक्षा वेगळे निश्चित असले पाहिजे हे इतिहासाचा स्नातक असतांना समग्र पद्धतीने अभ्यास करतांना जाणवायचे. अर्थात उपलब्ध करून दिलेल्या मोजक्या साधनांवर आपण केवळ तर्क लावू शकतो. तो तर्कही तसाच लागावा अशी उपलब्ध झालेल्या पुराव्यांची इच्छा असेल तर?

फाळकेसाहेब चित्रपट निर्मिती करून व्यवस्थित व्यवसाय करू शकत होते.

सर्व मुस्लिम शासकांत औरंगजेबाच्या दरबारात सर्वाधिक हिंदू मंत्री, अधिकारी होते असे ऐकून आहे.

अर्धवटराव's picture

17 Apr 2015 - 11:28 pm | अर्धवटराव

या मागे इंग्रजांची दयाबुद्धी होती कि जगावर राज्य करण्याच्या अनुभवातुन आलेलं मॅनेजमेण्ट स्कील ? आरमाराच्या जोरावर अत्यंत कमि काळात इंग्रज जगभर पसरला पण महान आरमार परंपरा आणि साम्राज्य असणारा जपान भारतात त्यापुर्वीच शस्त्र घेऊन का आला नाहि? स्लो पोइजन देऊन जगाला बटीक बनवणाराव जास्त क्रुर कि सरळ शीर कापणारा?
माझ्या मते जपान विरुद्धचा लढा भारताला जास्त सोपा आणि निर्णायक असता. पण या सर्व जर-तर च्या बाबी झाल्या. असो.

काळा पहाड's picture

18 Apr 2015 - 12:35 am | काळा पहाड

या मागे इंग्रजांची दयाबुद्धी होती कि जगावर राज्य करण्याच्या अनुभवातुन आलेलं मॅनेजमेण्ट स्कील ?

याला व्हाईट मॅन्स बर्डन असं म्हणतात. http://en.wikipedia.org/wiki/The_White_Man%27s_Burden

आरमाराच्या जोरावर अत्यंत कमि काळात इंग्रज जगभर पसरला पण महान आरमार परंपरा आणि साम्राज्य असणारा जपान भारतात त्यापुर्वीच शस्त्र घेऊन का आला नाहि?

दोन कारणं.
१. जपान हा व्यापारी देश नव्हता. ब्रिटीश सुरवातीला व्यापारी म्हणून आले आणि भारतीय राजांचा मूर्खपणा त्यांनी पाहिला नसता (आणि वर उल्लेखिल्याप्रमाणे व्हाईट मॅन्स बर्डन चा पगडा त्यांच्यावर नसता) तर ते व्यापारीच राहिले असते.
२. जपान हा पारंपारिक रित्या साम्राज्यवादी देश नव्हता. त्याचं चरित्र दुसर्‍या महायुद्धामध्ये बदललं ते टोजो सारख्या नेत्यांमुळं. मुळात जपानी राजा या युद्धाबद्दल तितकासा उत्साही नव्हता.

माझ्या मते जपान विरुद्धचा लढा भारताला जास्त सोपा आणि निर्णायक असता.

अजिबात नाही. जपानी नि:संशय क्रूर होते आणि आहेत. ते अतिशय रेसिस्ट सुद्धा आहेत. ब्रिटिशांच्या अंमलाखाली असणं हे भारताला बर्‍याच बाबतीत फायद्याचं होतं.

अर्धवटराव's picture

18 Apr 2015 - 1:46 am | अर्धवटराव

जपानी नि:संशय क्रूर होते आणि आहेत. ते अतिशय रेसिस्ट सुद्धा आहेत. ब्रिटिशांच्या अंमलाखाली असणं हे भारताला बर्‍याच बाबतीत फायद्याचं होतं.

म्हणुनच जपान विरुद्ध भारतीय लोकमत लवकर पेटुन उठलं असतं व त्यांना सरळ अंगावर घ्यायला देखील तयार झालं असतं. इंग्रजांबाबत भारतात नाहि म्हणायला सॉफ्ट कॉर्नर होता व स्वतंत्र भारताचे इंग्रजांशी मैत्रीपूर्ण संबंध असावे अशीही आपली मनसीकता होती. महायुद्धानंतर जपानने जर भारताला अंकीत करायचा प्रयत्न केला असता तर भारताचा प्रतिकार फार जास्त तिखट असता.

क्लिंटन's picture

18 Apr 2015 - 11:44 am | क्लिंटन

म्हणुनच जपान विरुद्ध भारतीय लोकमत लवकर पेटुन उठलं असतं व त्यांना सरळ अंगावर घ्यायला देखील तयार झालं असतं.

यात अनेक गृहितके आहेत. पूर्वीही राजपुत, शीख, मराठे, विजयनगर साम्राज्य इत्यादींनी मोंगल आक्रमणांचा मुकाबला केलाच होता.तेव्हा जास्त खुनशी शत्रू असेल तर प्रतिकारही जास्त तिखट होईल असे म्हणणे वरकरणी ठिक आहे. पण पूर्वीची परिस्थिती १९४५ मध्ये राहिली नव्हती. मोंगल असू देत किंवा राजपूत-मराठे, दोघेही पारंपारिक शस्त्रांनीच (तलवारी, भाले इत्यादी) लढाई करायचे. तेव्हा त्यात आपली बाजू फार पडती होती अशी परिस्थिती नव्हती.पण १९४५ मध्ये शत्रूकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, विमाने, रणगाडे वगैरे होते. आपली तयारी कितपत होती? क्रांतिकारकही गावठी पिस्तुलातून दोन-चार गोळ्या झाडून जुलमी इंग्रज अधिकार्‍यांचा वध करू शकत होते.पण आपल्याकडे अशी शस्त्रास्त्रे, विमाने वगैरे होती का? त्यांच्या मशीनगनला आपली गावठी पिस्तुले कशी पुरी पडणार होती? औरंगजेबाच्या काळापासून १९४५ पर्यंत युध्दतंत्रात मोठे बदल झाले होते आणि वैयक्तिक शौर्याच्या जोरावर जिंकायचे दिवस बरेच मागे पडले होते. सुरवातीला अगदी अशीच पडती बाजू अफगाणिस्तानातील लोकांची रशियनांबरोबर होती.पण अमेरिकेने त्यांना शस्त्रपुरवठा केलाच होता आणि अफगाणिस्तान डोंगराळ आणि दुर्गम असल्यामुळे त्याचा फायदा अफगाणांना झाला. तसा फायदा आपल्याला फार तर मणीपूर, नागालँड अशा ठिकाणी झाला असता पण बंगालसारख्या सपाटीच्या प्रदेशामध्ये आपण काय करणार होतो?

आणि ब्रिटिशांविरूध्दचा आपला लढाही ०.००१% क्रांतिकारक सोडले तर 'अमुकअमुक काँग्रेसमध्ये तमुकतमुक ठराव पास झाला' अशा स्वरूपाचाच होता. अर्थात असे ठराव करूनच लोकांना स्वातंत्र्य हवे याची जाणीव अधिकाधिक होत होती आणि अशाच वातावरणातून क्रांतिकारक निर्माण होऊ शकतात.पण मुळात स्वातंत्र्य कशाकरता हेच माहित नसेल अशा समाजातून क्रांतिकारक निर्माण कुठून होणार? हे विविध काँग्रेसमधले ठराव ही जाणीव करायचे काम करत होते हे नक्कीच. तेव्हा आपला समाज फारसा लढवय्या नव्हता निदान १८५७ नंतर तरी.अशा समाजातले लोक खुनशी जपान्यांना कसा प्रतिकार करणार आणि त्यातूनही हातात शस्त्रे पुरेशी नसताना?

टी.एन.कौल म्हणून आपले अगदी सुरवातीचे आय.एफ.एस ऑफिसर होते.ते १९५०-५१ मध्ये चीनमध्ये भारतीय दुतावासात होते.तिथे त्यांना अफगाणिस्तानचा राजदूत म्हणाला होता-- ३० कोटींच्या तुमच्या देशावर लाख-दीड लाख इंग्रज १५० वर्षे राज्य करूच कसे शकले? आमच्या देशात आम्ही अशा मूठभर इंग्रजांची चटणी उडवली असती आणि पळता भुई थोडी केली असती. याविषयी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात वाचले आहे (पुस्तकाचे नाव विसरलो).

तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे प्रचंड खुनशी जपान्यांना प्रतिकार करायची लाख इच्छा आपल्याला असूनही ते शक्य होणे कितपत शक्य होते? विशेषतः आपली बाजू अशी पडती असताना?

अर्धवटराव's picture

19 Apr 2015 - 4:55 am | अर्धवटराव

महायुद्ध जर ब्रिटेशांच्या पराभवाने संपते तर जपानशी भारताचा सामना तसाहि झालाच असता. प्रश्न केवळ इतका उरतो कि भारत जपानला गुलाम वसाहत म्हणुन हस्तांतरीत होतो कि उपकृत राष्ट्र म्हणुन.

प्रदीप's picture

18 Apr 2015 - 2:46 pm | प्रदीप

जपान्यांनी जेते म्हणून इतर देशांत नुसता नरसंहारच केलेला नाही, तर त्यांनी त्याचबरोबर जिवंत माणसांना, त्यांच्या अत्यंत क्रूर व पाशवी धोरणांमुळे, पराकोटीच्या यातना दिलेल्या आहेत. चीन, फिलीनीन्स ('फिलीपाईन्स' नव्हे), कोरीया, हाँगकाँग ह्या सर्व ठिकाणी त्यांनी स्त्रीयंवर बलात्कार व त्यांना जबरदस्तीने वेश्या बनविणे, जीवंत पकडलेल्या शत्रूसैनिकांच्या शरीरांवर, निरनिराळे पाशवी, यमयातना देणारे प्रयोग करणे असे अनेक प्रकार केलेले आहेत. म्हणूनच ह्या सर्व ठिकाणी जपानद्वेषाचे पडसाद अजूनही नेहमी उमटत असतात.

कुठलाही परका देश एकाद्या, white knight प्रमाणे आपल्या 'मदतीस' येऊन, आपणांस सोडवेल व नंतर शांतपणे आपला प्रांत आपल्याकडे सोपवून आनंदानेमाघारी जाईल,ह्यासारखी खुळचट कल्पना ज्यांनी केली, त्यांना मी तरी थोर, प्रगल्भ नेते वगैरे मानण्यास तयार नाही.

ब्रिटीश मुळात व्यापारी अधिक आणि, धर्म अथवा सत्तेची इर्षा असलेले, कमी. त्यामुळे त्यांनी अनेक वसाहती विषेश क्रौर्य न करता वसवल्या व आर्थिक आणि/किंवा राजकीय अपरिहार्यता येईस्तोंवर त्या तशाच चालवल्या. अर्थात एकदा एखाद्या देशात सत्ताग्रहण केल्यानंतर ते जेते म्हणूनच वावरले, तेव्हा त्यांचे व स्थानिक जनतेचे हितसंबंध समान राहिले नाहीत. तरीही, जगभरच्या वसाहतींचा विचार करता ब्रिट्सांच्या कॉलनीज खूपच 'प्रेम़ळ', स्वतःबरोबरच स्थानिक जनतेचाही थोड्याफार प्रमाणात उद्धार करणार्‍या वाटतात. ते व डच सोडता, इतर कुठल्याही युरोपियन, अमेरिकन जपानी वसाहतींच्या बाबतीत असे म्हणणे कठीण आहे.

अर्धवटराव's picture

19 Apr 2015 - 5:31 am | अर्धवटराव

जपानला कुणाही भारतीय नेत्याने आपला भाग्यविधाता समजण्याची चूक केली
नव्हती. जपानी पाहुणा आपला नवा मालक बनुन येतो कि उपकारकर्‍ता हाच प्रश्न होता.

बाकी ब्रिटीश वीट जपानी दगडापेक्षा मऊ असेलही. अमेरीकेची सगळी दादागिरी उघड दिसत असुन देखील जगाचा पोलीस म्हणुन इतर महासत्तांपेक्षा तेच परवडतात. ( भारताला आपण महासत्ता मानतच नाहि :) ).

जपानचे सहाय्य घेतले असते तर त्यांनी तसेच अत्याचार भारतात केले असते जसे चीन वा अन्य भागात केले ह्यात अनेक गृहितके आहेत. एक म्हणजे भौगोलिक अंतर. जपान हा काही महाकाय देश नाही. त्यामुळे त्यांचे सैन्य भारतापर्यंत पोचले असते तर ते तितकेसे प्रबळ राहू शकले नसते. रसद, दारूगोळा पुरवणे दुरापास्त होत गेले असते. भारतानेही प्रतिकार केलाच असता. तिकडे पॅसिफिकमधे पर्ल हार्बर वगैरे अमेरिकेच्या कुरापती काढून त्या देशाला अंगावर घेणे हेही चालूच होते ह्यामुळे इतक्या विविध आघाडीवर जपान लढत असते तर नक्कीच हरले असते. कदाचित हे सुभाषचंद्रांनाही जाणवले असेल. आणि म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले असेल. ब्रिटिश जपान्यांपेक्षा सुसंस्कृत होते ह्यात दुमत नाही. पण शेवटी तो शत्रूच. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध जपानचे सहाय्य घेतले म्हणजे लगेच जपान्यांच्या अत्याचाराला खुले द्वार असे मला वाटत नाही. तसेही अणुबॉम्ब प्रकरण झाल्यामुळे ते दाती तृण घेऊन शरण आलेच त्यामुळे जर तर प्रकरण ताणायचे असेल तर अगदी जपान शिरजोर होऊ लागला असता तरी तो फार काळ तसा टिकला नसता.
दुसरे असे की सुभाषचंद्रांची विचारसारणी ही नेहरु गांधींपेक्षा वेगळी होती. ते राजकीय विरोधक होते त्यामुळे काँग्रेस व इंग्रज ह्यांच्या बाजूने नेताजींची डाळ शिजण्यासारखी नव्हती. राजकीय महत्त्वाकांक्षा ही निव्वळ गांधी नेहरूंच्या हक्काची गोष्ट असली पाहिजे असे मानणेही खुळचटपणाचेच आहे.

क्लिंटन's picture

20 Apr 2015 - 10:40 am | क्लिंटन

बरोबर आहे ना. पण जपान्यांनी अगदी पापुआ न्यू गिनीमध्येही जाऊन अत्याचार केलेच होते.ते पण जपानला फार जवळ होते असे नाही. आणि जपान्यांनी अंदमानात घुसूनही त्याच गोष्टी केल्याच होत्या.तेव्हा जपान्यांशी संग म्हणजे विषाची परिक्षा होती. तसे जपान्यांना करता आले नसते तर एक भारतीय म्हणून मला आनंदच झाला असता पण जपान्यांना मुद्दामून बरोबर घ्यायला नको होते असे वाटते.

ह्म्म.. पंचतंत्रातली साप आणि पक्ष्यांची गोष्ट आठवली. ( अजून कोणी उल्लेख कसा केला नाही बरं?)

झाडाच्या मुळाशी असलेल्या बिळातून एक साप पक्षी घरट्यात नसताना येई आणि त्यांची अंडी पळवायचा प्रयत्न करी. त्याला उपाय म्हणून ते पक्षी त्या बिळापर्यंत मासे विखरुन एका मुंगुसाला बोलावतात. तो सापाला तर मारतो पण आता त्याला नव्या खाद्याचा शोध लागलेला असतो. ते मुंगुस अंड्यांबरोबरच पक्ष्यांवरपण हल्ला करु लागते.

आता मुंगसाने हल्ला केला असता की नाही हाच तो प्रश्न आणि त्याबद्दल ही चर्चा. :)

क्लिंटन's picture

20 Apr 2015 - 3:46 pm | क्लिंटन

:)

अहो मुंगुस म्हटल्यावर ते हल्ला करणारच. आणि मुंगुस आपल्यावर हल्ला करणार नाही आणि सापाला मारून गपगुमान निघून जाईल अशी कल्पना करून घेणे हा पण घातक स्वप्नाळूपणा नाही का?

घातक स्वप्नाळूपणा

अर्थात.. :)

हाडक्या's picture

20 Apr 2015 - 6:17 pm | हाडक्या

रिपीट प्रकाटाआ..

हाडक्या's picture

20 Apr 2015 - 6:16 pm | हाडक्या

रिपीट प्रकाटाआ..

हाडक्या's picture

20 Apr 2015 - 6:17 pm | हाडक्या

रिपीट प्रकाटाआ..

हुप्प्या's picture

20 Apr 2015 - 10:51 pm | हुप्प्या

कुठली बोधकथा वास्तवात वापरत येईल याबाबत तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. मुंगुस आणि त्याचे पक्षी खाणे ह्याची तुलना जपानी सैन्याशी करता येईल का? जपानी लोकांच्या अत्याचारामुळे त्यांची खाद्याची, पगाराची, दारुगोळ्याची गरज भागत होती का? की त्याकरता त्यांना त्यांच्या रसदीची सोय करावी लागत होती?
गोष्टीतले मुंगुस हे एकाच वेळी जंगलाच्या अनेक मैल दूर असणार्‍या दोन तीन टोकाशी असणार्‍या प्राण्यांशी लढत होते का? वगैरे मुद्देही यात आणता येतील.
काही वेळा राजकीय तडजोड म्हणून दुष्ट वृत्तीच्या लोकांशी हातमिळवणी केली गेली आहे. ती प्रत्येक वेळेस अपयशीच ठरली आहे असे नाही. उदा. मित्रराष्ट्रांनी स्टालिनशी केलेले सहकार्य.
जी गोष्ट इतिहासात घडलेलीच नाही ती घडली असती तर काय काय होऊ शकले असते ह्याविषयीचा वाद हा काही मर्यादेपर्यंतच केलेला बरा. कारण त्याची सत्यासत्यता पडताळून पहाणे अशक्य असते. तेव्हा निव्वळ एकेकाचे वैयक्तिक मत आणि त्यामागची कारणमीमांसा इतकेच ह्या उहापोहाचे मर्यादित स्वरूप असू शकते.

मुंगुस आणि त्याचे पक्षी खाणे ह्याची तुलना जपानी सैन्याशी करता येईल का?

अहो, बाळबोध बोधकथेचे तात्पर्य घ्यायचे असते (म्हणींसारखेच). अशी कथेची पिसे काढत बसला तर कसे हो..
थोडक्यात या कथेचे तात्पर्य आहे "असंगाशी संग प्राणाशी गाठ".
मग तुम्हाला मुंगसाची मानसिकता, धार्मिकता, विचारसरणी इ.इ. अभ्यासायची असेल तर माझी काही हरकत नाही. ;)

जी गोष्ट इतिहासात घडलेलीच नाही ती घडली असती तर काय काय होऊ शकले असते ह्याविषयीचा वाद हा काही मर्यादेपर्यंतच केलेला बरा. कारण त्याची सत्यासत्यता पडताळून पहाणे अशक्य असते. तेव्हा निव्वळ एकेकाचे वैयक्तिक मत आणि त्यामागची कारणमीमांसा इतकेच ह्या उहापोहाचे मर्यादित स्वरूप असू शकते.

हे अगदी मान्य.. :)

प्रदीप's picture

18 Apr 2015 - 3:51 pm | प्रदीप

..

(प्रतिसाद दोनदा प्रकाशित झाल्याने हा काढून टाकत आहे).

चीनसारख्या मोठ्या देशातही ३% पर्यंत लोकसंख्या १२-१३ वर्षात ठार मारणे म्हणजे किती भयानक प्रकार होता हे दिसतेच. फिलीपाईन्ससारख्या देशात जपानी घुसले १९४२-४३ मध्ये म्हणजे त्यांना वेळ मिळाला २-३ वर्षेच. तरीही विविध अंदाजांप्रमाणे फिलीपाईन्सची ४% लोकसंख्या जपान्यांनी या २-३ वर्षात स्वाहा केली.

३% आणि ४% च फक्त? ब्रिटिशांनी १००% उत्तर अमेरिका नष्ट केली. १००% ऑस्ट्रेलिया. १००% न्यू झी लँड. आफ्रिका ....?? असोच.
----------------------------------------------------------------
युरोपीय सोडून कॉलनी नसण्याचे भाग्य नेपाळ आणि जपान या दोनच देशांना लाभलेले आहे असे ऐकून आहे. जपानी लोक थोडेसे सैल पडले तेव्हा त्यांच्यावर नको ते राजकीय आणि व्यापारी कायदे लादायचा प्रयत्न झाला. (आमचे ऐकत असाल तर तुम्हाला स्वतंत्र म्हणू.) यातून शिकला म्हणून जपान 'मर्सिलेस' बनला. तो तसा नसता तर स्वतंत्र नसता आणि आज एक टुच्चड बिनकामी भूभाग असूनही जगातली दुसरी आर्थिक महासत्ता नसता.

क्लिंटन's picture

20 Apr 2015 - 5:48 pm | क्लिंटन

हो बरोबर आहे ना. फक्त जपानने जे काही केले ते ७०-८० वर्षांपूर्वीच्या काळात आणि अमेरिकेत किंवा ऑस्ट्रेलियातील मुळातील संस्कृती पूर्ण नष्ट केली गेली ४०० वर्षांपूर्वी. म्हणजे या दोन घटनांमध्ये किमान तीन शतकांचे अंतर होते.आणि १९४० च्या दशकात आपली गाठ १९४० च्या दशकातल्याच जपानबरोबर होती ३००-४०० वर्षांपूर्वीच्या युरोपिअनांबरोबर नव्हती.अशावेळी ब्रिटिश वीट असतील तर जपानी दगड होते.

तेव्हा उत्तर अमेरिकेत युरोपिअनांनीच उच्छेद केला या उल्लेखाचा संदर्भ समजला नाही.

आपली गाठ १९४० च्या दशकातल्याच जपानबरोबर होती ३००-४०० वर्षांपूर्वीच्या युरोपिअनांबरोबर नव्हती.

जपान शरणच आले नसते तर अमेरिकेने एकूण किती अणुबाँब टाकले असते असे वाटते? अमेरिका देखिल १९४० च्या दशकातली होती. आणि युरोपीय देशांपेक्षा कमी क्रूर इ इ मानली जायची.
-----------------------------------------------
१९४० असो नैतर १६४०. युरोपीय ते युरोपीय. युद्ध ते युद्ध.
आपण श्रेष्ठ , कॉलनी कनिष्ठ, आणि कॉलनीतल्या लोकांशी नीच वागायचे ही विचारधारा युरोपीय आहे. पूर्वेकडे युद्ध संपले, मॅटर क्लोज.

जपान्यांनी या स्पीडने एखाद्या देशावर १५० वर्षे राज्य केले असते तर मला वाटते एतद्देशिय १००% लोकसंख्येचा खातमा केला असता.

चीन, रशिया, कोरिया, फिलिपिन्स, हाँग काँग, इंडोनेशिया, इ इ ठिकाणी जपानचे राज्य होते. तिथे जो खातमा झाला आहे / नाही ते पाहता वरील विधान सयुक्तिक आहे काय?
------------------------------------------------------------------------
आणि हो, भारतीय लोक संपवले असते असं इतक्या सहजासहजी म्हणता येत नाही. मंजे रेड इंडीयन्स संपवणे आणि भारतीय संपवणे यांत बराच फरक आहे. इथे नुसते जालियनवाला झाले तर लोकांचे डोके फिरायचे. बंदुकीला गाईची चरबी लावलेली महाग पडायची. ऑनेस्टली स्पिकिंग, कधीकधी मला भारतात ब्रिटिशांचे राज्य होते कि ती काही एतत्द्देशीयांचीच कुटील अरेंजमेंट होती असा प्रश्न पडतो.

क्लिंटन's picture

20 Apr 2015 - 6:04 pm | क्लिंटन

चीन, रशिया, कोरिया, फिलिपिन्स, हाँग काँग, इंडोनेशिया, इ इ ठिकाणी जपानचे राज्य होते. तिथे जो खातमा झाला आहे / नाही ते पाहता वरील विधान सयुक्तिक आहे काय?

यापैकी कोणत्या ठिकाणी जपान्यांचा १५० वर्षे ताबा होता ते सांगा.

'जो खातमा झाला आहे' मंजे जितके टक्के झाला, जितक्या वर्षांत आहे. वॉर टाइम परिस्थिती आणि अदरवाईज परिस्थिती यांची तुलना होऊ शकत नाही.

म्हणूनच म्हणतो की जपानी आपल्या डोक्यावर बसले असते तर ते आपल्यासाठी आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे झाले असते.

http://en.wikipedia.org/wiki/Taiwan_under_Japanese_rule
इथे असे लिहिले आहे कि तैवान १८९५ ते १९४५ असे चांगले ५० वर्षे जपानची कॉलनी होते. तिथे फार कै आग फुकाटा दिसत नाही.

क्लिंटन's picture

20 Apr 2015 - 6:55 pm | क्लिंटन

तैवान १८९५ ते १९४५ असे चांगले ५० वर्षे जपानची कॉलनी होते. तिथे फार कै आग फुकाटा दिसत नाही.

आणि दक्षिण-पूर्व आशियात कित्येक ठिकाणी १९४० च्या दशकात २-४ वर्षातच फुफाटा तुम्हाला दिसत नाही. कारण काय तर १८९० च्या दशकात तैवानमध्ये तसे झाले नाही. उत्तम.

जपानने १८७० च्या सुमारास आपले अलगतावाद धोरण संपवले आणि नंतर २५ वर्षातच तैवान गिळंकृत केला. कदाचित त्यांची रक्तपिपासा सुरवातीच्या काळात तितकी नसेलही आणि नंतरच्या काळात ती वाढली. १९४० च्या दशकात तर अगदी निंसंशयपणे जपान्यांनी रक्तपिपासा जोरदार होती. म्हणजे कसे झाले सुरवातीला एखादा वाघ माणसांवर नुसताच गुरगुरत असेल पण मारत नसेल पण नंतर माणसाच्या रक्ताची त्याला चटक लागली. आणि तुमच्यासारखे लोक म्हणणार अरे सुरवातीला तो नुसताच गुरगुरत होता.त्याने कोणाला मारले होते? म्हणजे तो रक्तपिपासू नाहीच. इतर ठिकाणी त्या वाघाने काय केले वगैरे गोष्टींना फाट्यावरच मारायचे. असा वाघ तुम्हाला तुमच्या घरात ठेऊन घ्यावासा वाटत असेल तर तो तुम्हालाच लखलाभ असो. अशा वाघापासून दूर राहण्यातच शहाणपणा आहे असे माझे स्पष्ट मत आहे.

हा मुद्दा मी कित्येकवेळा मांडला आहे.तो तुम्हाला मान्य नसल्यास किंवा समजला नसल्यास किंवा समजावून घ्यायचा नसल्यास माझा नाइलाज आहे. सारखी तीच तीच गोष्ट लिहायचा कंटाळा आला आहे. तेव्हा माझ्यातर्फे या चर्चेत पूर्णविराम देत आहे. नवीन मुद्दा आल्यास परत येईनच.पण काळरेषेची गल्लत करून विचित्र मुद्दे कोणी मांडत असेल तर त्याकडे पूर्ण दुर्लक्ष.

कोणत्याही क्षणी चर्चा संपवण्याच्या आपल्या अधिकाराचा मला पूर्ण आदर आहे.
पण तरीही ...
१. युद्धकालातील देशांचे जिंकलेल्या प्रदेशातील वर्तन हे तत्समान परिस्थितींशीच तोलावे. शांतिकालाशी नाही. त्यांची सरमिसळ करू नये. म्हणजे ब्रिटिशांनी भारतीयांना आय सी एस बनू दिले वा जालियनवालाबाग हे जपानच्या तैवानमधील तत्समान परिस्थितींशी तोलावे. दुसर्‍या महायुद्धाशी नाही. अँड सो ऑन.
----------------------------------------------------------------------
२. युद्धकालात किंवा यादवी कालात, स्वकीयांशी किंवा परकीयांशी आपण जनरली कोण किती क्रूर आणि सौम्य याचा रिव्ह्यू करू-
अ. अमेरिका - दोन अणुबाँब, व्हिएटनाम
ब. जर्मनी - ज्यूंची कत्तल
क. जपान - पूर्वेकडचे अन्याय
ड. रशिया - लेनिन, स्टेलिन चे 'कर्तृत्व'
इ. चीन - माओ चे काम
ब्रिटीशांकडे, फ्रान्सकडे या महायुद्धांत कत्तल करायचा कोणता मोठा मौका आलेला जो त्यांनी सोडला? बिचारे जिथे जिंकले ती त्यांचीच भूमी होती. रशिया आणि अमेरिकेने त्यांना जिंकून दिले.

यात जपानचाच असा बाऊ करण्यात अर्थ नाही. उलट बुद्धाची जन्मभूमी म्हणून जपान्यांत भारताबद्दल नेहमी आदर राहिला आहे.

पण जपानी हे ब्रिटिशांपेक्षा भयंकर होते हेच मान्य करायला अनेक लोक तयार नसतात

असा विचार लोकांना करायला ब्रिटिश भाग पाडू शकतात मंजे नक्कीच फार हुशार असावेत. जपानी जर असे ब्रिटिशांपेक्षा भयंकर असते तर जगात जपानचे राज्य नसते का? ज्यांना थांबवायला शेवटी अणुबाँब लागला त्यांच्यासाठी जग खुलेच होते ना अणुबाँबचा शोध लागला नव्हता तेव्हा जिंकायला?

क्लिंटन's picture

20 Apr 2015 - 5:58 pm | क्लिंटन

जपानी जर असे ब्रिटिशांपेक्षा भयंकर असते तर जगात जपानचे राज्य नसते का? ज्यांना थांबवायला शेवटी अणुबाँब लागला त्यांच्यासाठी जग खुलेच होते ना अणुबाँबचा शोध लागला नव्हता तेव्हा जिंकायला?

का हो तुम्ही प्रत्येक वेळी काळरेषेची गल्लत का करत आहात? जपानचा खुनशीपणा १८७० च्या सुमारास जपानी साम्राज्य ज्याला म्हणतात त्या काळापासून सुरू झाला. टोजोच्या काळात विशेषतः वाढला.

सतराव्या आणि अठराव्या शतकात जपान इतर जगापासून पूर्णपणे अलग पडल्यासारखे होते आणि जपानी लोकांना जपान सोडायला आणि बाहेरच्यांना जपानमध्ये प्रवेश करायलाही परवानगी नव्हती.

सतराव्या आणि अठराव्या शतकात जपान इतर जगापासून पूर्णपणे अलग पडल्यासारखे होते आणि जपानी लोकांना जपान सोडायला आणि बाहेरच्यांना जपानमध्ये प्रवेश करायलाही परवानगी नव्हती.

हे मी थोड्या वेगळ्या शब्दांत मांडतो. अमेरिकेला जपानने आपले वाणिज्यिक नियम, बंधने स्वीकारावी असे वाटायचे. म्हणून अमेरिकेने/युरोपने पुश (मंजे काय ते समजून घ्या) केल्यावर जपानने "परवानगी" बंद केली (व्यापारासाठी किंवा कसेही कोणी आले कि थेट वर.
आणि हा प्रकार प्रत्येक शतकात होता. म्हणून जपान आज इतका तगडा नॉन्-युरोपीय देश आहे. नैतर बाकी प्रत्येक देश किती दोहित आहे याचा बराच हिशेब निघतो.
-------------------------------------------
भारतात ब्रिटिश किंवा मुस्लिम आक्रमक आले तेव्हा जे घडलं नाही (चोख उत्तर इ इ )याचं जे आपल्याला नेहमी वैफल्य वाटत असतं ते जपानमधे घडलं, अगदी पूर्वीपासून. आणि म्हणून त्यांना एका पातळीवर 'ब्रिटिशांपेक्षा क्रूर' जज करण्याचा प्रयत्न केला जातो.

क्लिंटन's picture

20 Apr 2015 - 6:34 pm | क्लिंटन

तुम्ही परत काळरेषेची गल्लत का करत आहात? अमेरिका आणि जपानमधले वाणिज्यिक युध्द १९३० च्या दशकातील. जपान २०० वर्षे जगापासून अलग होते तो कालावधी सतराव्या शतकापासून (१६**) ते सुमारे १८७० पर्यंत. या काळात पहिले १०० वर्षे अमेरिका हा देशच ब्रिटिशांची वसाहत होता. अमेरिकेचे जागतिक घडामोडींमध्ये सगळीकडे नाक खुपसायचे प्रमाणे वाढले पहिल्या महायुध्दाच्या सुमारास.त्यापूर्वीच जपानने अलगतावाद संपविला होता. या काळरेषेच्या गल्लतीविषयीचा मुद्दा मी तीनवेळा मांडला आहे.तो यापुढे परत मांडायचा नाही.

आणि जपान्यांनी युरोपिअन आला की ठार मारायचे हा प्रकार केला कारण ते ख्रिस्ती धर्माचा प्रचार करतील, आपल्या संस्कृतीवर घाला घालतील म्हणून. ते केले ते अगदी उत्तम केले.तरीही १६-१७ व्या शतकात युरोपिअनांनी उत्तर अमेरिकेत आणि आफ्रिकेत प्रचंड क्रौर्य दाखविले म्हणून १९४० च्या दशकात जपान्यांनी दक्षिण-पूर्व आशियात जे क्रौर्य दाखवले त्यात काय विशेष असे तुम्ही म्हणत असाल आणि असे खुनशी लोक भारतात आलेले चांगले असे तुम्हाला वाटत असेल तर असे वागणे तुम्हालाच लखलाभ असो.

बबन ताम्बे's picture

20 Apr 2015 - 6:55 pm | बबन ताम्बे

श्री. क्लिंटन यांचे सर्व प्रतिसाद वाचले. त्यांनी वस्तुनिष्ठ प्रतिपादन केले आहे असे मला वाटते. क्रूर आणि अत्याचारी जपानी भारतात आल्यावर भारतीयांशी सरळ वागले असते ह्याची सुतराम शक्यता दिसत नाही. अमेरिकेने अणुबाँब टाकला नसता तर जपान्यांनी अजून हाहाकार माजवला असता. जपानी राज्यकर्ते आणि सैनिकांनी केलेल्या अत्याचाराची फळे अणुबाँबच्या रुपाने जपानच्या निरपराध जनतेला भोगायला लागली.
ब्रिटीशांना घालविण्यासाठी त्यांच्याहून भयंकर सैतानांना घरात घेणे म्हणजे आत्मघात होता असे माझेही मत आहे.
गांधीजींचा देखील याच कारणासाठी सुभाष् बाबूंना विरोध होता असे वाचल्याचे आठवते.

गांधीजींचा देखील याच कारणासाठी सुभाष् बाबूंना विरोध होता असे वाचल्याचे आठवते.

मी आजवर जे काहि गांधीजींबद्दल वाचलं वा ऐकलं आहे त्यात हा संदर्भ कुठेच आला नाहि. जमल्यास आठवुन नक्की संदर्भ द्या. गांधीजींच्या राजकीय आणि सामाजीक लढ्याचा बराच काथ्याकुट केला जातो. त्यांची आंतरराष्ट्रीय राजकारणातील समज फार कुणी प्रकाशात आणत नाहि.

बबन ताम्बे's picture

21 Apr 2015 - 11:32 am | बबन ताम्बे

नक्की कुठे वाचले ते आठ्वत नाही. कदाचीत वर्तमानपत्रात देखील वाचलेले असू शकेल. पण त्या लेखातील "ब्रिटीशांचे राज्य जाऊन जपान्यांचे राज्य येणार असेल तर मी ब्रिटीश राज्यास प्राधान्य देईन " असे गांधीजींचे (किंवा त्यांच्या तोंडी घातलेले) वाक्य नक्की आठवते.