घटना जुनी आहे.१० वी झाल्यावर सगळे करता तस मला सेवायोजन कार्यालयात नावनोंदणी करायला जायच होत.
गावाकडुन गादी पकडुन जिल्ह्याला जायला उशीर झाला..१ वाजला.कार्यालयात पोहचलो.
माझे येण्याचे कारण तिथल्या कर्मच्यार्याला सांगितल..त्यांने बोर्डाकडे बोट दाखबल..कार्यालय १ वाजता बंद..
डोळ्यासमोर तो बोर्ड,कर्मचारी,पुन्हा होणारी चक्कर,वाया जाणारा वेळ आणी पेसा नाचु लागला..
त्या कर्मचार्याला काही तरी करायची विंनती केली...
मी" काहीतरी करा साहेब..पुन्हा यायला जमणार नाही."
तो," नियम म्हणजे नियम नंतर या.."
मी," बघा काही करता येत का.."
तो",मी काय बघु ..तुम्हीच पहा.."
सरकारी कर्मचार्यांच्या सुचक बोलण्याबद्दल ऐकुन होतो..मी हिशोब केला..३ बोट दाखवली..त्यांने आणखीन दोन मिसळली..
काम झाल ...मी तासाभरात गावी वापस..
=================================================================================
वरच्या प्रसंगात मी पहिली लाच दिली..नंतर वेगवेगळ्या सरकारी कार्यालयात जात राहिलो..कधी स्वतःसाठी..कधी दुसर्यासाठी.
"सरकारी काम-सहा महिने थांब"या म्हणीचा प्रत्यय घेत राहीलो.
मी ही "टाईम ईज मनी" म्हणत टाईम वाचवण्यासाठी मनी देत राहीलो..
चपराश्याला चहापाणी देण्यापासुन .एखाद्या क्लासवन अधिकार्याला मिठाई देत माझी लाचखोरी चालु राहीली.
=================================================================================
वरच सगळ आठवायला कारण कालची एक घटना कारणीभुत ठरली.
बर्याच दिवसानी मुळ गावी आलोय.सध्या कुणी रहात नाही ईथे..काल संध्याकाळी ..लाईट चालु करायला गेलो तर बत्ती गुल.
तेवढ्यात शेजारी सांगत आला..विज मंडळाने आमची विज बिल न भरल्या मुळे आजच कापली आहे.
नेहमी प्रमाणे आधी सटकली कारण दोन महीने बिल भरल नाही हे खर होत..पण दोन दिवसापुर्वी सगळ बिल भरल होत.
मोर्चा विज मंडळाकडे वळवला.६ वाजता गेलो..सगळा शुकशुकाट..दोन जण गप्पा मारत बसले होते..
त्यांना का आलोय ते सांगितल..त्यांनी नेहमी प्रमाणे नियमावर बोट ठेवल आणी उद्या पावती घेऊन यायला सांगितल.
आणी माझी बत्ती पेटली..मी ऑनलाईन बिल भरल होत..त्याच समस मोबाईल मधे होता..ते या लोकांच्या ऑफलाईन नोंदीत अजुन आल नव्हत..त्या कर्मचार्याला सगळ सांगितल..तो पुन्हा सुचक बोलला..
या वेळेस मी ५ बोट दाखवली..त्यांने ५ मिसळली..काम झाल ..........लाईट आली.
जाता जाता. - लाच देण चांगल का वाईट? याचा विचार मी करत नाही.कारण आजपर्यंत कुठल्याही वाईट गोष्टीत भागिदार झालो नाही.
एक प्रश्न विचारतो...तुम्ही कधी अशी लाचखोरी केली आहे ?
( मिपावरील सरकारी कर्मचार्यांनी हलके घ्यावे.मी सरसकटीकरण करत नाही.)
प्रतिक्रिया
7 Feb 2015 - 11:42 am | म्हया बिलंदर
काम करण्यासाठी नाही पण झाल्यावर बक्षिसी दिल्यात. अरे हो अजून तरी लाचखोर भेटला नाही कोणी. अगदी सिग्नल वरच्या मामांना दिल्येल्या पैश्यांची पावतीसुद्धा घेतिलिये.
7 Feb 2015 - 11:49 am | कैलासवासी सोन्याबापु
ते केजरीवाल की कोण ते हे सगळे बंद करवणार म्हणे? नाही असे ऐकले मात्र होते!!
7 Feb 2015 - 11:59 am | स्वामी संकेतानंद
तो लाख प्रयत्न करेल हो बंद करण्याचा. पण आपणच, सामान्य नागरिकच त्याला तसं करू देणार नाही. आपल्यालाच लाच द्यायची सवय लागली आहे ना!
9 Feb 2015 - 12:25 pm | सविता००१
अगदी बरोब्बर
7 Feb 2015 - 12:20 pm | सुधांशुनूलकर
आमच्या (म्हणजे मी आणि बायको, दोघांच्या) नशिबाने आम्हाला कधीच लाच द्यावी लागली नाहीये. कधीकधी थोडा त्रास होतो, तो चालवून घेतो.
@स्वामी संकेतानंद - आपणच, सामान्य नागरिकच त्याला तसं करू देणार नाही. आपल्यालाच लाच द्यायची सवय लागली आहे ना! - प्रचंड सहमत.
7 Feb 2015 - 6:04 pm | 'पिंक' पॅंथर्न
हल्ली अॅंटीकरप्शन खात्याच्या भीतीने हे लाच घेणारे ( आणि देणारेही) शहाणे झालेत. लाच पैशाऐवजी वस्तुरुपात दिली जाते. आणि त्याला 'सप्रेम भेट' असे गोंडस नाव दिले जाते.
7 Feb 2015 - 6:57 pm | रेवती
अजून लाच दिलेली नाही किंवा दिलीये पण लक्षात आली नाही. भारतातल्या ड्रायव्हिंग स्कूलने ड्रायव्हिंग शिकवण्याचे व लायसेन्स शुल्क म्हणून बरेच पैसे घेतले. मला असा संशय आहे की माझ्यासारख्या कच्च्या विद्यार्थिनीला पास करवून घेण्यासाठी त्यांनी पैसे दिले असणार व ती शिकवण्याची फी म्हणून आधीच आमच्याकडून घेतले असणार.
नुकतेच महापालिकेत एका कागदाचे काम करण्यासाठी मनुष्याने रु ६०० हे शुल्क व रु दीड हजार जास्त मागितले. नवर्याने लगेच अमुक एकाला फोन करतो, मग बघतो कशी लाच घेतो टाईप म्हटले. पण प्रत्यक्षात मात्र मनुष्याने पैसे न घेता, म्हणजे फक्त रु ६०० घेऊनच काम केले. मी असते तर त्या म्हसोबाचे दीड हजार रुपये नक्की दिले असते. कारण सगळी कागदपत्रे लाच न देता कायदेशीररीत्या करून घेण्याच्या हट्टापायी मी 15 वर्षे हेलपाटे घातलेत. आता पेशन्स संपलाय. या शेवटच्या कागदासाठी पुढच्या भारतवारेची वाट बघणे शक्य नव्हते. पण सुदैवाने काम झाले. लेखात तुम्ही असे का म्हटलेय हे समजू शकते. कधीकधी दाद देत नाहीत मेले.
7 Feb 2015 - 9:24 pm | लॉरी टांगटूंगकर
"टाईम ईज मनी" म्हणत टाईम वाचवण्यासाठी मनी देत राहीलो.
असेच काहीसे.
देत राहीलो. लिहायला चांगलं नाही वाटत, पण बर्याचदा वेळ आणि मनस्ताप वाचवण्यासाठी हा प्रकार केलेला आहे.
पासपोर्टच्या वेळेस व्हेरिफिकेशन चार्जेस म्हणून वर्दीने थेट पैसे मागितले होते. काय करणार??
माझ्यासमोर एकाला त्याने तुझं काम करत नाही जा. काय वाट्टेल ते कर, तुला पासपोर्ट कसा मिळेल ते बघतो म्हणुन धमकावलेला.
7 Feb 2015 - 11:30 pm | विलासराव
पासपोर्टच्या वेळेस व्हेरिफिकेशन चार्जेस म्हणून वर्दीने थेट पैसे मागितले होते. काय करणार??
माझ्यासमोर एकाला त्याने तुझं काम करत नाही जा. काय वाट्टेल ते कर, तुला पासपोर्ट कसा मिळेल ते बघतो म्हणुन धमकावलेला.
माझ्याबाबतीत असेच झाले होते. ऑफीसरने स्वतः पैसे मागीतले नाहीत. पण पोलीस असे धमकावत होता तुमचे काम कसे होते ते पहातो म्हणुन. मी १९९२ ला कॉलेजला असतानाच सहजच अर्ज केला होता. तर पोलीसाने कशाला दुबईला जायचे आहे असे विचारले. आनी म्हनुनच पैसेही मागीतले.
मीही त्याला डेरींगमधे म्हणालो चौकशी पासपोर्ट खात्याने तुम्हाला करायला सांगीतली आहे. माझ्या नावावर काहीही गुन्हा नोंद नाही. खरतर त्याअगोदर मी पोलीस स्टेशनला कधीच गेलो नव्ह्तो. मग जर असे अस्ताना मला जर पासपोर्ट मिळाला नाही तर मी तुझ्या सायबाची नौकरी घालवतो का नाही बघच मग....! असा बाणा दाखवला आनी पासपोर्ट मिळणारच नाही असे धरुन चाललो. पण त्यानंतर काहीच आठवड्यात पासपोर्ट घरी आलासुद्धा.
8 Feb 2015 - 1:54 am | लॉरी टांगटूंगकर
पुढच्या वेळेला जै विलासराव म्हणून नडतो जो कोण असेल त्याला. :D
पण राव, त्याच्यासाठी जरा निवांत काम पाहीजे. उगा कटकटी कशाला म्हणून शॉर्टकट मारला जातो..
स्वामी संकेतानंद यांच्याशी सहमत.
8 Feb 2015 - 2:12 am | आदूबाळ
एक "मी नै त्यातली" अवतार
दिवाळी. सरकारी हपीसरकडे नजराणा घेऊन जातो. एरवी अतीव हरामखोरी करणारा ऑफिसर आज फुल मूडमध्ये असतो. ऐसपैस गफ्फा मारतो. स्वहस्ते मिठाई खिलवतो.
वेळ पाहून नजराणा पेश करतो. ऑफिसर हबकतो! तौबा तौबा! मी असलं काहीच करत नाही हो, तुमचा गैरसमज झालाय. उचला ते. या आता.
बुचकळ्यात पडून नजराणा उचलून चालू पडतो. एक जिना उतरताच मागून सायबाचा प्यून धावत येतो. घरी घेऊन जा. मॅडम बघतील काय करायचं ते.
सायबाच्या मलबार हिलवरच्या किंवा बँडस्टँडवरच्या घरी. टिंग टाँग. मॅडम? साहेबांनी हे तुम्हाला द्यायला सांगितलंय. तौबा तौबा. आम्ही असलं काही करत नाही हो! साहेब धुतल्या पंच्यासारखे स्वच्छ की हो! निघा आता.
दुप्पट बुचकळ्यात पडून बाहेर. गेटवरचा वॉचमन कडेला घेतो. खोका वहाँ रख्खो. त्या जागेवर आधीच एल्सीडी टीवी, टीबीझेडच्या खोक्यांची रास. रख्खा? जाव!
मॅडम तक पंहुचेगा ना ठीकसे? साब - भरोसा नहीं तो सामने रुको - रोड के उस पार. थांबतो.
थोड्या वेळाने मॅडम खुद्द वॉचमनच्या खोपटात येतात. कायकाय आलंय त्याची रेकी करतात. वॉचमन एकेक खोका उचलून त्यांच्या मागोमाग.
अ जॉब वेल डन.
9 Feb 2015 - 11:11 am | नाखु
(अनेक कामापैकी एक असल्याने) गेली १५-२० वर्षे ही "सदीच्छा भेट"+मिठाई+नववर्ष डायरी वाटपात आहे.
हुद्द्या परत्वे त्याचे महत्व बदलत जाते ड्राय्फ्रूट बॉक्स मिळत असल्याने मिठाईचा "पाण्-उतारा" अव्हेर करणारे दर्जा "अ" अधिकारी जसे पाहिले तसेच रोजंदारीवर असलेल्या "शासकीय पण कंत्राटी" कर्मचार्याला त्याच मिठाई-पुड्याने मनोमन खूश झालेले पाहीले आहे.
वैय्क्तीक जीवनात कायदेशीर नळ्-जोड नाकारला गेल्याने उपायुक्त पदापर्यंत चकरा-धडक मारलेला.
आणि अर्थात पैश्यासारखा (सढळ) वेळ खर्च करावा लागलेला
नाखु.
दुपारचे ११ वाजलेत गीतगंगामध्ये ऐकूयात "दाम करी काम येड्या"
9 Feb 2015 - 12:13 pm | अनिता ठाकूर
एखाद्या आजारावर उपचार म्हणून रेकी करतात हे माहित आहे.पण, सामानाची, दुकानाची, एखाद्या विशिष्ट एरियाची रेकी का व कशी करतात?
9 Feb 2015 - 12:23 pm | स्वामी संकेतानंद
रेकी म्हणजे टेहळणी हो. Reconnaissance. त्याला शॉर्टमध्ये रेकी म्हणतात.
9 Feb 2015 - 12:57 pm | अनिता ठाकूर
अस होय? म्हणजे ह्या रेकीचा त्या उपचार पद्धतीशी काही संबंध नाही तर.
9 Feb 2015 - 3:45 pm | अन्या दातार
बादरायण संबंध म्हणू शकता की ;)
10 Feb 2015 - 11:42 am | अनिता ठाकूर
तसं म्हणू. एक रेकी आजाराची टेहळणी करून उपचार करते, तर दुसरी रेकी म्हणजे गुन्ह्याच्या जागेची टेहळणी.
10 Feb 2015 - 12:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
Reconnaissance (शॉर्टफॉर्मः recce/reccy/recco रेकी/रेको) हा मूळचा युद्धशास्त्रातला शब्द आहे. "युद्ध छेडण्यापूर्वी तेथील भूभाग आणि शत्रूच्या बळाची केलेली प्राथमिक पाहणी" असा त्या शब्दाचा अर्थ आहे. हा शब्द हल्ली प्राथमिक भूशास्त्रिय पहाणीसाठीही वापरला जातो.
10 Feb 2015 - 1:07 pm | अनिता ठाकूर
पूर्ण स्पेलिंग पाहिल्यावर शब्दकोशात मला हा अर्थ मिळाला.पण म्हणजे, शत्रुच्या बळाची पाहणी करण्याकरता करतात तेव्हा ती टेहळणी आणि भूशास्त्रीय कारणाकरिता करतात तेव्हा ती पाहणी.
12 Feb 2015 - 10:29 am | पैसा
वेळ नसेल तर द्यावे लागते. लांज्याच्या मामलेदार कचेरीत पीक कर्जासाठी झाडांचे मॉर्टगेज रजिस्ट्रेशन करायचे २००० रुपये घेतले. पैसे देत नाही म्हटले तर कीबोर्ड मोडलाय, वेबकॅम चालत नाहीये काय वाटेल ते सांगतात म्हणे. गोव्यातून परत चकरा मारायचा खर्च आणि वेळ विचारात घेऊन मुकाट पैसे देऊन मोकळे झाले.
रेल्वेत पूर्वी टीसी लोक ५० रुपये घेऊन सीट द्यायचे. हल्ली सरळ पावती फाडतात ही सुधारणा कशामुळे झाली माहीत नाही. पण बरं वाटतं. आयत्या वेळी रिझर्व्हेशन करायला जमले नसेल तर तर हे पैसे निदान रेल्वेकडे तरी जातात.