वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
15 Jan 2015 - 3:24 am
गाभा: 

मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.

माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.

भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.

शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?

एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.

मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.

ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.

माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.

शिक्षण : जेमतेम डिप्लोमा

पगार : २२००/-

नौकरी : खाजगी.

जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.

इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)

वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल.

आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.

लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.

शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.

अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.

दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.

थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?

संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.

डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

प्रतिक्रिया

सविता००१'s picture

22 Jan 2015 - 12:03 pm | सविता००१

पैसाताई

प्रसाद१९७१'s picture

22 Jan 2015 - 1:52 pm | प्रसाद१९७१

संसारात अशा अनेक गोष्टी असतात की जिथे आपल्या अकॅडेमिक शिक्षणाचा काहीही संबंध नसतो.

अनेक काय हो जवळजवळ सगळ्याच गोष्टींमधे अकॅडेमिक शिक्षणाचा काहीही संबंध नसतो.

पिवळा डांबिस's picture

22 Jan 2015 - 11:26 pm | पिवळा डांबिस

माझ्या प्रतिसादातला मुद्दा हा "शिक्षणातली परस्पर अनुरूपता" हा आहे. सहजीवनात त्याचं महत्व आहे असं माझं प्रतिपादन आहे. माणूस अल्पशिक्षीत असलं म्हणजे संसार होत नाहीत असं मी म्हंटलेलं नाही. दोघेही जर अल्पशिक्षीत असतील तरी त्यांच्या स्वता:च्या समजुतीप्रमाणे ते संसार करणारच की! आणि अल्पशिक्षणात जर एकमेकाला अनुरूप असतील तर ते एक त्या प्रकारचं सहजीवनही होईल. प्रश्न हा जर शिक्षणात अनुरूपता नसेल (कारण माझा मूळ प्रतिसाद उच्चशिक्षीत मुलांना अल्पशिक्षीत मुलींशी लग्न करायला काय अडचण आहे? यावर होता)तर सहजीवन कसं होईल हा आहे.

संसारात अशा अनेक गोष्टी असतात की जिथे आपल्या अकॅडेमिक शिक्षणाचा काहीही संबंध नसतो.

करेक्ट! पण संसारात अशाही अनेक गोष्टी असतात की जिथे आपल्याला आपल्या शिक्षणापासून मिळालेल्या विचारशक्तीचा खूप उपयोग असतो.

माझ्या आईवडिलांचं लग्न झालं तेव्हा वडील इंटर आर्ट्स आणि आई म्याट्रिक डी एड होऊन नोकरी करत होते. आताच्या दृष्टीने पाहता ते अल्पशिक्षितच.

त्या वेळी (त्यांच्या लग्नाच्या वेळी) ते जरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे अल्पशिक्षीत असले (तुमच्या म्हणण्याप्रमाणे कारण त्या काळी हे शिक्षण अल्प समजलं जात नसे. एका काळाच्या फूटपट्ट्या दुसर्‍या काळाला लावायच्या नसतात.) तरी शिक्षणाने एकमेकांना अनुरूप होते. एक जण एमे आहे आणि दुसरं शाळा नापास अशी परिस्थीती तर नव्हती ना! लग्नानंतर पुढे खूप शिकून त्यांनी नांव कमावलं हा त्यांच्या महत्वाकांक्षेचा भाग झाला आणि त्याबद्दल त्यांचं कौतुकच आहे! संसारात सो कॉल्ड प्रॉव्हर्बियल बांगडे फ्राय करणं तर अनाव्हॉयडेबल असतंच पण त्यापुढेही काही असतं हे त्यांनी जाणलं आणि परिश्रम करून ते मिळवलं यासाठी त्यांचं जास्त कौतुक आहे. तुम्ही त्यांना विचारून पहा, मी सांगतो त्यापेक्षा वेगळं काही ते सांगतील असं मला वाटत नाही.....
एनिवे, मला काय वाटतं ते मला वाटतं मी पुरेसं स्पष्ट मांडलेलं आहे. कुणाला पटेल, कुणाला नाही पटणार. जर अजूनपावेतो मी कुणाला माझी बाजू समजावून देऊ शकलो नसलो तर आणखी माझ्याकडे काही नाही. आणि आता मला या विषयावर टंकायचा टंकाळा (बघितलंत, माझा कळफलकही टंकाळला!!) आलाय तेंव्हा माझ्यातर्फे लेखनसीमा!
मात्र पुढे कधी गोव्याला आलो की तुमच्याकडे बांगडे खायला येण्याचं निमंत्रण समजून ते राखून ठेवत आहे.
:)

पैसा's picture

22 Jan 2015 - 11:58 pm | पैसा

तरी नाय पटलं! पुन्हा माझ्या घरातलं, माझे एल एल बी झालेले आजोबा आणि शाळेत न गेलेली आजी यांचं उदाहरण दिलं असतं. पण सगळंच आत्मचरित्र नको म्हणून गप बसते आता. मात्र

*शिक्षण आणि विचारशक्ती, सामाजिक भान यांचा काही संबंध नसतो
*यशस्वी संसार, सहजीवनासाठी दोघांचं एकसारखं/अनुरूप शिक्षण अजिबात आवश्यक नसतं

यावर मी ठाम आहे.

बांगडे रशेद करून देण्याचं आमंत्रण अर्थातच कायम आहे. कधी येताय? :D

मुक्त विहारि's picture

23 Jan 2015 - 12:29 am | मुक्त विहारि

"शिक्षण आणि विचारशक्ती, सामाजिक भान यांचा काही संबंध नसतो.यशस्वी संसार, सहजीवनासाठी दोघांचं एकसारखं/अनुरूप शिक्षण अजिबात आवश्यक नसतं."

सहमत

(डॉ.आजोबा आणि ४बुके शिकलेल्या आज्जीच्या सर्वोत्तम सहजीवनाचा साक्षीदार) मुवि

पुष्कर जोशी's picture

12 Jun 2016 - 3:41 am | पुष्कर जोशी

chemistry मध्ये catalyst असतो.. तो main reaction मधे मध्ये कधीच भाग घेत नाही पण reaction ला मदत करत असतो !!

शिक्षणाचे आयुष्यातील स्थान हेच आहे...

यशोधरा's picture

22 Jan 2015 - 8:29 am | यशोधरा

प्रतिसाद आवडला.

आपण शाळा कालेजात जे शिकतो त्याचा घरात, किंवा नाती जोडताना आणि टिकवताना किती उपयोग अस्तो?

मान्य आहे की सगळंच नसतं उपयोगाचं!! पण सहज गप्पांमध्ये अमक्या तमक्या वेळी वाचल्या गोष्टीचा रेफरन्स देऊन काही बोललं तर ते तिला/त्याला समजायला नको? कोणत्याही नात्यात संभाषण महत्त्वाचं असतं हो, बेसिक मध्येच लोच्या असेल तर गाडी पुढे जायची कशी? समजून घ्यायची तयारी असेल तर ठीक आहे, पण हे समजून घ्यायची तयारी सगळ्यांचीच असेल असं नाही ना!!

आधीच एकमेकांची शैक्षणिक पार्श्वभूमी माहित असताना भांडणात केवळ एकमेकांचा उद्धार करायला ती वापरणं चूक आहे हे मान्य!! पण शिक्षण अगदी निरर्थक ठरवणं काही पटत नाही ब्वॉ.

सामान्य वाचक's picture

21 Jan 2015 - 2:53 pm | सामान्य वाचक

सहमत

पिलीयन रायडर's picture

21 Jan 2015 - 2:57 pm | पिलीयन रायडर

+१

शिक्षणाला महत्व नसेल तर चौथी पास मुलगी आणि पी.एच.डी मुलगा सुखाने नांदतील.. पण तसं होत नाही.. विचारांची लेव्हल तर शिक्षणाने नक्कीच बदलते..

अजया's picture

21 Jan 2015 - 8:01 am | अजया

आणि हे झाले४००!!

अनन्त अवधुत's picture

21 Jan 2015 - 8:18 am | अनन्त अवधुत

४०० पार

पैसा's picture

21 Jan 2015 - 9:27 am | पैसा

जेपीभौ अदृश्य असल्याने आम्ही डॉ. खरे, टवाळ कार्टा आणि आजानुकर्णाचा अक्षता देऊन सत्कार करत आहोत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Jan 2015 - 9:30 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

वाटाण्याच्या!!!

टवाळ कार्टा's picture

21 Jan 2015 - 10:31 am | टवाळ कार्टा

"पुस्प्गुच" नस्ल्याने माझा णिशेध
;)

हाडक्या's picture

21 Jan 2015 - 4:55 pm | हाडक्या

पै तै .. आनी आमी ?? *unknw*

आमच्या खारीच्या वाट्याची नोंद न घेतल्याबद्दल णिशेढ .. !!

(ता.क. आम्हास अक्षता नको.. टकाला द्या..)

टवाळ कार्टा's picture

21 Jan 2015 - 5:17 pm | टवाळ कार्टा

अक्षता कितवी शिकलीय ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Jan 2015 - 11:06 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुझ्याहुन दोन यत्ता जास्त, ते पण एकदा पण केटी नं लागता =))

(ह.घे. रे) गर्ल्फ्रेंड नसण्यापे़क्षा केटी लागणं लै जास्त सेन्सिटिव्ह टॉपिक आहे.

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 11:29 am | टवाळ कार्टा

मी आजपर्यंत डिस्टिंक्शन कधी सोडले नै ते पण मुंबै वर्शीटीतुन :P

सुबोध खरे's picture

22 Jan 2015 - 11:51 am | सुबोध खरे

के टी आणि डीस्तीन्क्षन काय घेऊन बसलायत?
एक लक्षात ठेवा
काही जण "खूप" शिकतात.
काही जण "खुपदा" शिकतात.
शेवटी शिकल्याशी मतलब.

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 1:51 pm | टवाळ कार्टा

खिक्क :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Jan 2015 - 4:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नशिबवान आहेस. =))

पोरगी आणि डिस्टिंक्शन मिळायला नशिब लागतं. मेरेकु थ्रु-आउट डिस्टिंक्शन (बी.ई. ला रँक) विथ वाय डी आहे पुणे युनिव्हर्सिटीच्या कुरुपेनं. एम ३ च्या आवशिचा घोवं!!!

लोकं झायरात करायचा एक चान्स सोडत नैत राव!! *mosking*

कपिलमुनी's picture

22 Jan 2015 - 4:11 pm | कपिलमुनी

उपवर मुलांचा प्रश्न गंभीर आहे .

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Jan 2015 - 4:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आपल्याकडे एक म्ह्ण आहे की ओ

बोलणार्‍याची माती विकली जाते, आणि नं बोलणार्‍याचं सोनही पडुन राहतं अश्या अर्थाची.

झैरात आणि मार्केटींग केल्याशिवाय कै होत नै ओ मार्केटात. तुमची करायचीये का झैरात? मी आणि टक्या झैरात एजन्सी चालु कर्तोय.

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 4:26 pm | टवाळ कार्टा

+१११११

"चर्चा तर होणारच" झैरात एजन्सी :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Jan 2015 - 4:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नाव भारीये रे. चल तुझा प्रॉफिटमधे १% वाढवला. आता तु "दो टक्के का पार्टनर" =))

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 4:42 pm | टवाळ कार्टा

नक्को...

लोक परंपरा-नातीगोती विसरुन आधुनीक झाली आणी असले प्रकार चालु झाले.
पुर्वी एखादी नवी नवरी लग्न होऊन सासरी आली की नणंद दारात अडवुन विचारायची" सोडते आत तुला,काय देणार मला?"
याचर खमकी वहिनी पण" होतील मला पोरी,तेंव्हा देईन तुमच्या घरी..!!" असे उत्तर द्यायची.
मामाची मुलगी पटवणे याच प्रकारात मोडते.
आता काळ थोडा बदलला आहे,त्यामुळे मामाची मुलगी न पहाता आत्याला मुली आहेत का ? याचा शोध घ्यावा.
आत्याला नसतील तर तिच्या नंणदेला आहेत का हे पहावे.
तात्पर्य आधी नात्यात शोध घ्यावा नंतर इतरत्र मुली शोधत फिरावे.
एकदा मुलगी सापडली कि तिला कसे पटवायचे हे आप आपल्या कुवतीवर ठरवावे.
बस,ट्रेन ओर लडकी या सारखे छपरी डॉयलॉग रील लाईफ चांगले वाटतात रीयल लाईफ मधे नाही.
.
..
.
हा प्रतिसाद आपल्या आपल्या कुवतीवर वापरावा.जबाबदारी माझी नाही.
प्रेमात पडल की शिक्षण सारखे मुद्दे आपोआप बाद होतात.

टवाळ कार्टा's picture

21 Jan 2015 - 10:33 am | टवाळ कार्टा

लोक परंपरा-नातीगोती विसरुन आधुनीक झाली

याच्यामुळेच मुलींची परिस्थिती चांगली झालीय...त्याचे साईड इफेक्ट म्हणजे त्या आता डोक्यावर बसतात

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Jan 2015 - 10:42 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अनुभवाचे बोल असं म्हणणार होतो. पण मी तुझं नावं वाचलं =))

टवाळ कार्टा's picture

21 Jan 2015 - 11:17 am | टवाळ कार्टा

हे आण्भवाचे"च" बोल आहेत...पण माझ्या नाही दुसर्यांच्या...मी फक्त मेसेंजर ;)

हाडक्या's picture

21 Jan 2015 - 4:57 pm | हाडक्या

मेसेंजर ऑफ द्वाड .. *lol*

याच्यामुळेच मुलींची परिस्थिती चांगली झालीय...त्याचे साईड इफेक्ट म्हणजे त्या आता डोक्यावर बसतात
अरे बाकीचा प्रतिसाद पकड..

विटेकर's picture

21 Jan 2015 - 2:41 pm | विटेकर

१२:४९ नंतर १४:४० म्हणजे जवळजवळ २ तास एकही प्रतिसाद नाही ...
एक मिपाकर म्हणून शरम...........

टवाळ कार्टा's picture

21 Jan 2015 - 2:55 pm | टवाळ कार्टा

ते जौदे...मुविंचा शेवटचा प्रतिसाद केव्हा होता??? ;)

कपिलमुनी's picture

21 Jan 2015 - 3:41 pm | कपिलमुनी

पत्रिका बघण्याचा फॅड , आधी जाती , पोटजाती, मग नाड , गोत्र , राशी ( यात षडाष्टक आणि उपाध्ये ) आणि मग गुण जुळायला लागतात.
काही जातींमध्ये पदर जुळावा लागतो म्हणे म्हणजे काय तर कुठुन तरी नाते असावे किंवा खानदानच्या प्युअरपणा लागतो ..

आता एवढ्या सगळ्या गाळण्यामधून ज्या काय पोरी राहतील ..तिथून पुढे रंग , उंची, बांधा , रूप ,
हे झाला की शिक्षण , आर्थिक परिस्थिती यांचे मॅचिंग होते ..
य्यानंतर मग शेवटी वर- वधू भेटतात आणि स्वभाव जमतो कि नाही ते बघायचा !
शिंगरू आधीच्या फिल्टर मध्येच दमलेला असतय !

बादवे , एवढे असूनसुद्धा सर्व मंगल कार्यलये ६ महिने अगोदरच फुल्ल असतात . म्हणजे या दिव्यांतून पार पडून सर्वांची लग्ने होतात असे दिसते :)

बादवे , एवढे असूनसुद्धा सर्व मंगल कार्यलये ६ महिने अगोदरच फुल्ल असतात . म्हणजे या दिव्यांतून पार पडून सर्वांची लग्ने होतात असे दिसते

लोकसंख्या १२० कोटी असलेल्या देशात कितीही नखरे केले तरी लोकांची कमतरता तितकीशी जाणवत नसावी बहुधा.

टवाळ कार्टा's picture

21 Jan 2015 - 3:53 pm | टवाळ कार्टा

हे फिल्टर क्रायटेरीया उलट्या क्रमाने नाही वाटत???

प्रसाद गोडबोले's picture

21 Jan 2015 - 3:53 pm | प्रसाद गोडबोले

मी ५०० वा प्रतिसाद टंकण्यासाठी टपुन बसलो आहे बरं का :D

टवाळ कार्टा's picture

21 Jan 2015 - 4:02 pm | टवाळ कार्टा

ब्यानरसकट लिवा ;)

ब्यानरवर ब्रायन लालाचं चित्र असूद्या...

टवाळ कार्टा's picture

21 Jan 2015 - 8:01 pm | टवाळ कार्टा

अग्दी अग्दी...पण ब्यानर कुटांय :(

अवांतर - मुविंना त्यांच्या धाग्याने इतिहास घडवलाय त्याचा पत्ता आहे का? ;)

काळा पहाड's picture

21 Jan 2015 - 7:16 pm | काळा पहाड

माजा ५०० वा होता.. तुमचा ५०२ वाला झाला.. खिक..

प्रसाद१९७१'s picture

21 Jan 2015 - 4:12 pm | प्रसाद१९७१

परंतु संसार चांगला होण्यासाठी दोघात सामन्जस्य असणे जास्त आवश्यक आहे. बाकी रूप पैसा कुटुंब इ सर्व गोष्टी दुय्यम आहेत.

संसार चांगला होण्यासाठी शरीरसंबंध बाबतीतील कंपॅटीबिलीटी, आवडनिवड हा मुद्दा कोणीच मांडला नाही हे बघुन आश्चर्य आणि खेद वाटला. लग्न करण्यामागे ( at least पुरुषांच्या मनात ) sex partner मिळवणे हा सर्वात महत्वाचा हेतू असतो ( असे माझे मत आहे ).

जर हे खरे असेल तर रुप, वजन ह्या गोष्टी महत्वाच्या ठरत नाहीत हे खरे आहे का? फक्त स्वभाव फार छान आहे म्हणुन ८०-९० किलोची मुलगी कोणी पसंत करेल का?

टवाळ कार्टा's picture

21 Jan 2015 - 4:18 pm | टवाळ कार्टा

शिव शिव शिव
असे लिहिताच कसे तुम्ही...लग्नासाठी मुलगी बघताना मुलीचा physical appearance याबद्दल मुलाने अपेक्षा ओपनली दाखवू नये...नाहीतर त्याच्यावर materialistic असा शिक्का बसतो मुलीकडून...मग भले मुलीच्या अपेक्षेत २ बिएचके फ्लॅट असून्दे...

बॅटमॅन's picture

21 Jan 2015 - 5:18 pm | बॅटमॅन

अगदी अगदी..........वर असं बोलल्यावर 'इतकी वर्षे पोरांनी माज केला, पोरींनी आता जरा माज इन रिटर्न दाखवला तर बिघडलं कुठं' इ.इ. अर्ग्युमेंट्स आहेतच.

कपिलमुनी's picture

21 Jan 2015 - 5:25 pm | कपिलमुनी

मुलाचा टक्कल , सुटलेले पोट या गोष्टी मुली बघतातच .. मुलांनी physical appearance वर टिप्पणी केली तर लगेच materialistic !!

हाडक्या's picture

21 Jan 2015 - 5:32 pm | हाडक्या

टका आणि प्रसाद, या बाबतीत अंशतः असहमत.
कारण की,

संसार चांगला होण्यासाठी शरीरसंबंध बाबतीतील कंपॅटीबिलीटी, आवडनिवड हा मुद्दा कोणीच मांडला नाही हे बघुन आश्चर्य आणि खेद वाटला.

हे मान्य. म्हणूनच टकाने लिव-इन बद्दल मांडले तेव्हा त्याला समर्थन दिले होते. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि शक्य झाल्यास जाणून घेणे ही गरजेचे आहे हे ही मान्य.

पण म्हणून,

लग्न करण्यामागे ( at least पुरुषांच्या मनात ) sex partner मिळवणे हा सर्वात महत्वाचा हेतू असतो ( असे माझे मत आहे ).

जर हे खरे असेल तर रुप, वजन ह्या गोष्टी महत्वाच्या ठरत नाहीत हे खरे आहे का? फक्त स्वभाव फार छान आहे म्हणुन ८०-९० किलोची मुलगी कोणी पसंत करेल का?

हे कसे मत तयार केलेत ?
सेक्स ही दोन्ही बाजूंची गरज आहे हे प्रथम स्वीकारले पाहिजे (म्हणजे मुलींनी देखील हा आपल्याला "अनुरुप"आहे का हे पाहणे चूक समजू नये ) पण आणि फक्त पुरुषांसाठी हा "सर्वात महत्वाचा हेतू" असतो असे म्हणणेच अगदीच गैर आहे.

दुसरा मुद्दा असा की फक्त सुंदर मुलगी/मुलगा असेल तर सेक्स साठी अनुरुप होतो हे कसे ठरवलेत हो ?
ह्यात भावनिक अनुरुपता हा खूप मोठा मुद्दा आहे. जर स्त्रीची(अथवा पुरुषाची) इच्छा नसेल तर प्रणयाराधन अतिशय यांत्रिक आणि नीरस असणार (थोडे अतिशयोक्ती करून सांगतो, जणु सेक्स डॉलच मग).
इथे तीच व्यक्ती तुमची प्रिय असेल, तुम्हाला हवा तसा प्रतिसाद देत असेल, तुम्हाला आनंद देत असेल तर "८०-९० किलोची मुलगी" अप्सरेस लाजवेल. तो समागम असेल.

टका "materialistic" अपेक्षांबद्दलचा दृष्टीकोन समजू शकतो पण म्हणून फ्लॅटची तुलना मुलीच्या "physical appearance"ची कशी होईल राव.

बॅटमॅन's picture

21 Jan 2015 - 5:34 pm | बॅटमॅन

टका "materialistic" अपेक्षांबद्दलचा दृष्टीकोन समजू शकतो पण म्हणून फ्लॅटची तुलना मुलीच्या "physical appearance"ची कशी होईल राव.

का नाही होणार? अनादि काळापासून स्त्रीचे सौंदर्य आणि पुरुषाचे सामर्थ्य यांचीच जोडी लागत आलेली आहे. काळानुरूप शारीरिक सामर्थ्याचे रूपांतरण फ्लॅट, इ. मध्ये झाले इतकेच.

विटेकर's picture

21 Jan 2015 - 5:39 pm | विटेकर

बट्टमनाशी सहमत

हाडक्या's picture

21 Jan 2015 - 5:41 pm | हाडक्या

बॅटमॅन भौ, "का नाही होणार?" या प्रश्नाच्या उत्तरासाठी अनादि काळापासून काय होतय याचा संदर्भ देण्यापेक्षा, तुम्हाला काय "बरोबर्/योग्य/rational" वाटते त्या मुद्द्यांचा वापर केलात तर बोलता आले असते.
बर्‍याच गोष्टी अनादि काळापासून होतात म्हणून योग्य ठरत नाहीत ना.

मटेरिअलिस्टिक अपेक्षांमध्ये शरीरविषयक अपेक्षांचा समावेश होत नाही का? नसेल तर का? फ्लॅट इ. बद्दल काही बोलले की ते साधेसुधे मटेरिअलिस्टिक आणि रंग, फिगर, इ. बद्दल काही बोलले की पर्व्हर्ट असे काही क्लासिफिकेशन आहे का?

मटेरिअलिस्टिक अपेक्षांमध्ये शरीरविषयक अपेक्षांचा समावेश होत नाही का?

होतोच की.. तेच तर टका पण म्हणतोय ना ब्याट्या.
मी म्हणतोय की, फक्त सुंदर, सुडौल मुलगी असली म्हणजे भारी सेक्स असेल हा एक ठोकताळा म्हणून पण येडपट सिद्धांत आहे.
समागम अनुरुपता एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्याला सगळ्यात कमी महत्त्व दिले जाते. आता आपल्या बाबतीत ते कसे जाणून घ्यायचे, त्याचे रस्ते ज्याचे त्याने शोधावेत. ;)

बॅटमॅन's picture

21 Jan 2015 - 6:04 pm | बॅटमॅन

मी म्हणतोय की, फक्त सुंदर, सुडौल मुलगी असली म्हणजे भारी सेक्स असेल हा एक ठोकताळा म्हणून पण येडपट सिद्धांत आहे.

अगदी डिरेक्ट कॉजेशन नसलं तरी ष्ट्राँग कोरिलेशन नाहीच असं म्हणवतं का ओ तुम्हांला या केसमध्ये ;)

हाडक्या's picture

21 Jan 2015 - 6:36 pm | हाडक्या

डिरेक्ट कॉजेशन नसलं तरी ष्ट्राँग कोरिलेशन नाहीच

डिरेक्ट कॉजेशन नसलं तरी ष्ट्राँग कोरिलेशन नाहीच असे म्हणता येणार नाही हे मान्य.
सुंदर पोरगी दिसली की आपण आकर्षित होतोच की. (अगदी घरी बायको पूर्ण समाधान देत असेल तरीही!) पण ते एक नर म्हणून बाय नेचर आहे. ती सुंदर मुलगी तुम्हाला "सुंदर अनुभव" देऊ शकेल याची त्यात कोणतीही शाश्वती नाही (पण इतर सगळे "फीट" असेल तर तुम्हाला पोरे-बाळे होतील, दॅट इज एक्स्पेक्टेड रिजल्ट बाय नेचर ;) ).
म्हणून "ष्ट्राँग कोरिलेशन" असले तरीही ते समागम अनुरुपतेसाठी "कंक्लुजिव" नक्कीच नाही हे म्हणायचेय, जे प्रतिसादकर्त्याला म्हणावयाचे होते. आता तुम्हाला याबद्दल (समागम अनुरुपता) काय वाटतेय ते साध्या शब्दात व्यक्त करा बघू . :)

प्रसाद१९७१'s picture

21 Jan 2015 - 6:59 pm | प्रसाद१९७१

आपण आकर्षित होतोच

बरोबर आहे सायबा, मी तेच तर म्हणतोय. आकर्षितच होउ शकलो नाही तर कसला नंतर सुंदर अनुभव वगैरे. सुरुवात तर आकर्षणातुनच होणार ना.

डिरेक्ट कॉजेशन नाही हे अगोदरच कबूल केलेय की. :) त्यामुळे बाकी मुद्याशी सहमत आहे हेवेसांनल. :)

प्रसाद१९७१'s picture

21 Jan 2015 - 5:43 pm | प्रसाद१९७१

नशिबानी स्त्री च्या सौंदर्याचे रुपांतर दुसर्‍या कशात झाले नाही ते बरे आहे.

बॅटमॅन's picture

21 Jan 2015 - 5:45 pm | बॅटमॅन

जर झाले असते तर इन्बिल्ट प्रतिक्रियाही त्या बदलानुरूपच असती. सो चिल!

कवितानागेश's picture

21 Jan 2015 - 10:32 pm | कवितानागेश

हुन्ड्यात होउ शकते रुपान्तर.

टवाळ कार्टा's picture

21 Jan 2015 - 8:02 pm | टवाळ कार्टा

हेच्च लिहायला आलो होतो

प्रसाद१९७१'s picture

21 Jan 2015 - 5:41 pm | प्रसाद१९७१

फक्त पुरुषांसाठी हा "सर्वात महत्वाचा हेतू" असतो असे म्हणणेच अगदीच गैर आहे.

"फक्त" शब्द तुम्ही टाकलाय. वर मी ते मत माझे आहे असे लिहीले आहेच.

तुम्हाला हवा तसा प्रतिसाद देत असेल, तुम्हाला आनंद देत असेल तर "८०-९० किलोची मुलगी" अप्सरेस लाजवेल. तो समागम असेल.

पुन्हा माझा पुर्वीचाच मुद्दा. जी गोष्ट लग्ना आधी मोजुन बघता येणार नाही त्या गोष्टी पेक्षा जी मोजुन घेता येइल ती बघावी. उदा - ८०-९० किलोच्या मुली पेक्षा ५०-५५ ची ( ज्याच्या त्याच्या आवडी प्रमाणे आकडे बदलुन घ्या ) चालेल. पुढे काय होइल ती रीस्क दोन्ही केस मधे सारखीच आहे. मग at least जे समोर दिसतय ते तेरी बघुन घ्यावे.

हाडक्या's picture

21 Jan 2015 - 5:52 pm | हाडक्या

चला, "फक्त" या शब्दावरून तुम्हाला "benefit of the doubt" दिला. तसेही ते तुमचे मत आहे आणि मला मान्य नाही हे मांडून झालेले असल्याने त्याला सोडून देऊ.

दुसर्‍या मुद्द्यासाठी मी आधीच म्हणालोय की म्हणून तर मला लिव-इनचा पर्याय ( ज्यात अर्थातच समागम अनुरुपता गृहित धरलीये) जास्त योग्य वाटतोय आणि मी त्याचे समर्थन करतोय.

पुढे काय होइल ती रीस्क दोन्ही केस मधे सारखीच आहे. मग at least जे समोर दिसतय ते तेरी बघुन घ्यावे

हे दोन्ही बाजूंनी लागू होतेय एवढे ( लग्नाच्या बाजारातला एक घटक म्हणून) मान्य.
पण तुम्ही ज्या "शरीरसंबंध बाबतीतील कंपॅटीबिलीटी, आवडनिवड" या त्यापेक्षा जास्त व्यापक आणि महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलत होता त्याला माझं उत्तर होते.
नुसते वजन आणि दिसणे पाहून या गोष्टी नै जुळत हो (ते काय T मध्ये U बसवायचे काम नाही फक्त की मी ७० चा आणि ती ५५ ची म्हन्जे झाले ;) ). बाकी विषय मोठ्ठा आहे, जाणते/जाणत्या अजून अणुभवाचे बोल सांगतीलच.

आजानुकर्ण's picture

21 Jan 2015 - 7:10 pm | आजानुकर्ण

अहो प्रसादराव, सेक्ससाठी लग्न केलेच पाहिजे वगैरे गैरसमज आजच्या पिढीच्या मनात नाहीत. आजच्या पिढीतले जे मनाने अजूनही मागच्या पिढीत आहेत ते संकेतस्थळीय पब्लिक सोडले तर सेक्स आणि लग्नाचा फारसा संबंध आहे असे आजकाल कोणी मानत नाही.

प्रसाद१९७१'s picture

21 Jan 2015 - 7:16 pm | प्रसाद१९७१

सेक्ससाठी लग्न केलेच पाहिजे वगैरे गैरसमज आजच्या पिढीच्या मनात नाहीत

तुमचा पूर्ण मान राखुन पाहीजे तेंव्हा,पाहीजे तितके, हक्काच्या, भिती मुक्त , सेफ सेक्स साठी ( आणि बिन खर्चाच्या ) लग्न हाच एकमेव पर्याय आहे. लिव्ह इन पण आहे, पण तो भारतात रुजणे अवघड आहे. आणि लिव्ह इन आणि लग्न ह्यात फक्त तांत्रिक फरक आहे.

आजच्या पिढीला वर लिहीलेल्या ३-४ गोष्टी पूर्ण करतील असे काय ऑप्शन आहेत हे माझ्यासारख्या मागास माणसाला सांगा तरी.

आजानुकर्ण's picture

21 Jan 2015 - 7:21 pm | आजानुकर्ण

भारतात लग्नाचे अॅवरेज वय आता तिशीपर्यंत आले आहे. १४-१५व्या वर्षी पौगंडावस्थेत आल्यापासून भिन्नलिंगी आकर्षणाच्या भावना सुरु होतात. आता लोक १५ वर्षं कळ काढतात असं म्हणायचंय का? जालावर भरपूर सर्वे उपलब्ध आहेत. तब्बल सत्तर-ऐँशी टक्के पब्लिकला लग्नापूर्वी सेक्सचा अनुभव असतो. एवढं कशाला ओळखीच्या कोणत्याही केमिस्ट-फार्मसिस्टला जाऊन विचारा. अमेरिकेच्या तुलनेत भारतातील कुमारीमातांचे नगण्य प्रमाण पाहता हा सर्व सेक्स सेफच असावा असा माझा अंदाज आहे. लग्नानंतरचा सेक्स बिनखर्चाचा असतो असं कुणी सांगितलंय. लग्नाचा वन टाईम प्रीमियम भरतातच की!

प्रसाद१९७१'s picture

21 Jan 2015 - 7:30 pm | प्रसाद१९७१

मालक - सेक्स च्या अनुभवासाठी मी लोक लग्न करतात असे म्हणले नाही.
मी तुम्हाला ४-५ गोष्टींची यादी दीली होती त्या फक्त लग्न ( किंवा लिव्ह इन ) मधेच मिळतात.

हे ते बेनिफिट

पाहीजे तेंव्हा,पाहीजे तितके, हक्काच्या, भिती मुक्त , सेफ सेक्स साठी ( आणि बिन खर्चाच्या )

बिन खर्चाचा म्हणजे तुलनात्मक नगण्य. आणि बायको नोकरी करत असेल तर ...

आजानुकर्ण's picture

21 Jan 2015 - 7:43 pm | आजानुकर्ण

बायको नोकरी करत असेल तर ..

हो हे खरंय. 'तू तर फक्कड मासिक हुंडा' ही कविता आठवली.

मृत्युन्जय's picture

22 Jan 2015 - 10:31 am | मृत्युन्जय

अमेरिकेच्या तुलनेत भारतातील कुमारीमातांचे नगण्य प्रमाण पाहता हा सर्व सेक्स सेफच असावा असा माझा अंदाज आहे.

पुराणकालीन भारतातही कुमारी मातांची प्रकरणे अपवादानेच होती. या अर्थी काँडमचा शोध भारतातच लागला हे सिद्ध करता येउ शकेल.

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 1:53 pm | टवाळ कार्टा

अग्गागा =))
आपल्या पुराणांत बरेच काही आहे...फक्त ते बाहेर तेव्हाच येते जेव्हा दुसर्या कोणत्यातरी देशातले लोक त्याचा शोध लावतात

इथे शिक्षण कमी म्हणजे अगदी दहावी बारावी पास असं नव्हतं म्हणायचं मला.पण बी ए,बि काॅम झालेल्या कितीतरी मुली असतात ज्याना चांगली नोकरी मिळत नसल्याने घरी असतात.अशा मुलींबद्दल लग्नेच्छु मुलं काय म्हणतात? तसंच माझ्या ऒळखीत काही एम बि ए होऊनही त्यांना गृहिणी असणे,स्वयंपाक करणे अावडते.त्या स्वखुशीने नोकरी करत नाहीत.अशी मुलगी सांगुन आल्यास मुलांचे काय म्हणणे असेल जाणून घ्यायला आवडेल.

टवाळ कार्टा's picture

21 Jan 2015 - 4:20 pm | टवाळ कार्टा

बी ए,बि काॅम झालेल्या कितीतरी मुली असतात ज्याना चांगली नोकरी मिळत नसल्याने घरी असतात.अशा मुलींबद्दल लग्नेच्छु मुलं काय म्हणतात?

त्याच्या आधी त्याच मुली बी ए,बि काॅम झालेल्या मुलांबद्दल काय म्हणतात हे विचारलेत का? मग जरा वस्तुस्थिती समजेल

मला लग्नेच्छु मुलांना काय वाटते हेच जाणून घ्यायचे आहे.मुलींना अशा मुलांबद्दल काय वाटते याने मुलांच्या मतात फरक पडणार आहे का?सरळ साधा प्रश्न आहे,डिग्री आहे पण नोकरी नाही,कराविशी वाटत नाही अशा मुलीची निवड मुलं करतात का? मुलींचा वेगळा प्रश्न काढुन सहाशे करता येतीलच!!

टवाळ कार्टा's picture

21 Jan 2015 - 5:19 pm | टवाळ कार्टा

डिग्री आहे पण नोकरी नाही,कराविशी वाटत नाही

शिकलो तर त्याचा उपयोग केलाच पाहिजे...अश्या मताचा आहे मी

लॉरी टांगटूंगकर's picture

21 Jan 2015 - 4:17 pm | लॉरी टांगटूंगकर

आणि ४५०!

प्रसाद१९७१'s picture

21 Jan 2015 - 4:18 pm | प्रसाद१९७१

बाकी रूप पैसा कुटुंब इ सर्व गोष्टी दुय्यम आहेत.

डॉक्टर साहेब * - दुय्यम आहेत हे मान्य आहे पण त्या दुय्यमतेला पण एक थ्रेशोल्ड लिमिट असते. पैसा दुय्यम आहे मान्य पण अपेक्षेपेक्षा कीती कमी चालेल? बेसिक गोष्टी साठी पण जर झगडायला लागत असेल तर बायको अ‍ॅक्सेप्ट करेल का? तसेच रुपाबद्दल पण.

प्रत्येकाचे थ्रेशोल्ड लिमिट वेगळे असु शकते हे पण मान्य केले पाहीजे.

* : तुम्हाला आवडले नाही तरी डॉक्टर बद्दल माझ्या मनात आदराचीच भावना येते, त्यामुळे साहेब म्हणणारच

तुमचं रुप सौंदर्य इ. इ. वाचुन,"रुपास भाळलो मी" गाणं राहुन राहुन डोक्यात येतंय!!

कपिलमुनी's picture

21 Jan 2015 - 5:00 pm | कपिलमुनी

पत्रिका बघावी कि नको ?
असे कंफ्युज झालेले पालक फार दिसतात आणि मुले पण माझा विश्वास नाही पण आइ बाबा साठी ई कारणे देतात

तसं नाही. स्थळ आवडले नाही तर सांगायला पत्रिका हे एक पोलिटिकली करेक्ट कारण आहे.

टवाळ कार्टा's picture

21 Jan 2015 - 5:20 pm | टवाळ कार्टा

पत्रिका नकार कळवायचा १ समंजस उपाय आहे

इंडीड. म्हणजे मनातून स्थळाला श्या घालायच्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र कुंडलीतल्या ग्रहांवर खापर फोडता येते.

कपिलमुनी's picture

21 Jan 2015 - 5:26 pm | कपिलमुनी

आधी पत्रिका पाठवून मग ती जुळत असेल तरच बघण्याचे कार्यक्रम होतात ना ?

बॅटमॅन's picture

21 Jan 2015 - 5:52 pm | बॅटमॅन

अहो कुंडली काय, कधीही आणि कशीही ट्विस्ट करता येते.

सूड's picture

21 Jan 2015 - 5:56 pm | सूड

+१ अगदी!!

टवाळ कार्टा's picture

21 Jan 2015 - 8:04 pm | टवाळ कार्टा

अग्दी अग्दी...मी माझी कुंडली कोणाकडून "अ‍ॅडजस्ट" करुन घ्यायची ते ठरवले पण आहे ;)

विटेकर's picture

21 Jan 2015 - 5:27 pm | विटेकर

बट्ट्मन ...
स्वानुभव का ?
नै , अंमळ ज्यास्तीचा घाव लागलेसा वाटतो !

मला पण एक नकार आला होता ... इचलकरंजीहून ! तेव्हापासून पुन्हा जन्मात इचलकरंजीला गेलो नाही. वाईट वाटले की इचलकरंजी सारख्या गावातून नकार यावा ???? (बाकी स्थळ काय खासं नव्हते म्हणा !)

मराठी_माणूस's picture

21 Jan 2015 - 5:50 pm | मराठी_माणूस

इचलकरंजी सारख्या गावातून नकार यावा ????

म्हणजे काय ?

बाकी स्थळ काय खासं नव्हते म्हणा

कोल्ह्याला....... ह्.घेणे. :)

स्वानुभव आहे आणि तो दोन्ही साईडकडून आहे. त्यामुळे घाव बीव काही नाही. नो हार्ड फीलिंग्स.

टवाळ कार्टा's picture

21 Jan 2015 - 8:10 pm | टवाळ कार्टा

मला पण एक नकार आला होता ... इचलकरंजीहून ! तेव्हापासून पुन्हा जन्मात इचलकरंजीला गेलो नाही. वाईट वाटले की इचलकरंजी सारख्या गावातून नकार यावा ???? (बाकी स्थळ काय खासं नव्हते म्हणा !)

हायला...जाज्वल्य अभिमान फक्त एकाच शहराला असावा? बाकी शहरे पानी कम चाय??? ;)

विटेकर's picture

21 Jan 2015 - 5:04 pm | विटेकर

बापरे ! हा विषय असेल तर १००० पर्यन्त जाणार !

कपिलमुनी's picture

21 Jan 2015 - 5:13 pm | कपिलमुनी

तुमचे मत काय आहे पत्रिकेवर ;)

विटेकर's picture

21 Jan 2015 - 5:20 pm | विटेकर

मुनीश्री ,
हा तुमचा फुल्ल्टॉस वाया जाणार नाही ! अरे , कुणीतरी धोंडोपंताना बोलवा रे !
प्रतिसादासाठी सध्या जागा राखून ठेवत आहे.

सौंदाळा's picture

21 Jan 2015 - 6:23 pm | सौंदाळा

घरी डस्ट्बिन्स आहेस का यासारखेच ऐकलेले एक वाक्य
एका उपवर मुलीच्या पित्याकडुन बढाई मारताना: आमच्या मुलीला सासु-सासरे हवेत पण भिंतीवरचे
(४८९ झाले चला रे आज रेकॉर्ड करुनच टाकु ५०० चे)

टवाळ कार्टा's picture

21 Jan 2015 - 8:12 pm | टवाळ कार्टा

कहर...अशा वेळी आपणही घरातला कोयता घेउन यावे आणि म्हणावे...चला आमच्या मुलाचीसुध्धा हिच इच्छा आहे तेव्हा तुमच्या पासूनच सुरवात करु ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Jan 2015 - 10:21 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

मृत्युन्जय's picture

21 Jan 2015 - 6:27 pm | मृत्युन्जय

४९०. आता तरी थांबा रे मेल्यांनो. सहा पाने पाहिलेला हा मिपावरचा पहिलाच धागा असावा. आज काळे काकांच्या धाग्यावर देखील मात झाली म्हणायची. सुंदरच.

आता तरी थांबा रे मेल्यांनो.

पाहता काय सामिल व्हा...फक्त १०च प्रतिसाद पाहिजेत. *HAPPY*

बॅटमॅन's picture

21 Jan 2015 - 6:33 pm | बॅटमॅन

संमंला एक कळकळीची विनंती. प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज ५०० होऊद्या. मग नंतर पायजे तेव्हा बूच मारा.

हो ना. आधीच इनिंग्स डिक्लेर करू नका...

सुबोध खरे's picture

21 Jan 2015 - 6:41 pm | सुबोध खरे

वैचारिक पातळी वरून एक किस्सा आठवला. पूर्वी पण केंव्हा तरी टंकला होता.
आमचा एक मद्रासी( तामिळ) मित्र आहे. ( आमच्या २ वर्षे मागे आहे आणी आता मोठा कॅन्सर सर्जन आहे ). त्याला एकदा त्याच्या वर्गातील ख्रिश्चन मुलीवरून चिडवत होतो. त्यावर तो आम्हाला( मला आणी माझ्या तेलुगु मित्राला) म्हणाला कि मला अशी सोफिस्तीकेटेड मुलगी नको आहे. मला साधी इडली, वडा, डोसा करणारी मुलगी बायको म्हणून पाहिजे. मी त्याला शांतपणे म्हटले मग तुला एखादी तमिळ मोलकरीण पण चालेल. त्यावर आमचा तेलुगु मित्र म्हणाला अरे तू तिला १००० रुपये दिलेस तर ती बेडरूम मध्ये पण येईल( हि १९९० सालची गोष्ट आहे). तो यावर उसळला. मग त्याला आम्ही समजावले कि वैचारिक पातळी काही गोष्ट असते कि नाही तू एवढा डॉक्टर आहेस. तुझ्या मानसिक पातळीवर असलेलीच मुलगी पाहिजे. काय शिकली आहे ते महत्त्वाचे नाही पण केवळ लग्नाचे वय येईपर्यंत "काहि तरी करायचे" म्हणून कॉलेजात जाणारी मुलगी कशी चालेल?

हाडक्या's picture

21 Jan 2015 - 8:14 pm | हाडक्या

मी त्याला शांतपणे म्हटले

तुम्ही नेहमी सगळ्या गोष्टी "शांतपणे" कशा हो सांगता ? उच्चुकता लागलीये जाणून घ्यायची :)))

टवाळ कार्टा's picture

21 Jan 2015 - 8:19 pm | टवाळ कार्टा

बहुतेक अजुन तुम्ही डॉ.ना भेटला नाहीत...ते लशकरात होते त्यांची दंबूक नेहमीच जवळ असणार...मग समोरच्याला शांतपणे सांगितले तरी तो ऐकतो ;)

(डॉ.सर...कृ.म.न.घे. = कृपया मनावर न घेणे) :)

सुबोध खरे's picture

21 Jan 2015 - 8:41 pm | सुबोध खरे

ट का शेट
ते बाकी दोन जण अजूनही लष्करात आहेत मी फक्त खाली झालो.
@ हाड्क्या - एखाद्या माणसाला कोणतीही गोष्ट पटवून द्यायची असेल तर ती शान्तपणेच सांगायला लागते नाहीतर लोक तुम्हाला हलके घेतात.

हाडक्या's picture

21 Jan 2015 - 8:47 pm | हाडक्या

मग समोरच्याला शांतपणे सांगितले तरी तो ऐकतो

ह्याबद्दल डॉक्टरीण काकूंकडून ऐकायला आवडेल .. ;)

(डॉ.सर...कृ.म.न.घे. = कृपया मनावर न घेणे)

कित्ती कित्ती तो णम्र णम्र हो टका.. (की दंबूकीला बघून आलाय काय म्हैत) :)))

सुबोध खरे's picture

21 Jan 2015 - 9:15 pm | सुबोध खरे

मग या कि १५ फेब्रुवारी ला कशेळे येथे

हाडक्या's picture

21 Jan 2015 - 9:28 pm | हाडक्या

डॉक भारतात नै अत्ता म्हणून, नै तर आलोच असतो.. (मी नै भित हो तुमच्या दंबुकीला. ;) )

सुबोध खरे's picture

21 Jan 2015 - 10:28 pm | सुबोध खरे

हाडक्या साहेब
आत्ता एवढा वेळ मी शांतपणे एका स्त्रीला समजावत होतो कि तुझ्या कपाळावर कुंकू फार दिवस राहणार नाही. तिच्या यजमानांना यकृताचा कर्करोग आहे आणि त्यासाठी ती माझ्याकडे आलेली होती. तिच्या दुर्दैवाने तो कर्करोग यकृताच्या बाहेर पसरलेला होता आणि ती आपण लिव्हरट ट्रान्सप्लांट करू वगैरे बोलत होती. लोकांनी तिला बरीच खोटी अशा दाखवलेली होती. अशा स्त्रीला वस्तुस्थिती समजावून देण्यासाठी फार शांतपणे बोलावे लागते. एक तर यजमानांची नोकरी सुटलेली वर ती स्वतः नोकरी करत नाही. एक दीर कर्करोगाने गेलेला त्याच्या साठी हिच्या यजमानांनी बराच खर्च केला होता आई ची मूत्रपिंडे खराब झालेली वडिलांना पक्षाघात झाला होता यात त्यांचा पाण्यासारखा पैसा खर्च झालेला होता. अशा परिस्थितीतहि हि स्त्री वेडी आशा मनात ठेवून नवर्याच्या लिव्हर ट्रान्सप्लांट साठी प्राथमिक गोष्टींसाठी १० लाख रुपये खर्च करायला निघाली होती. तिला तुझ्या नवर्याचा लिव्हर ट्रान्सप्लांट होणे शक्य नाही हे समजावून सांगायची पाळी माझ्या वर आली होती. तुझ्या यजमानांकडे( वय ५३ वर्षे) फार तर ६ महिने आहेत हे एखाद्या ४८ वर्षाच्या स्त्रीला समजावून सांगण्यासाठी फार शांतपणेच समजवावे लागते.

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 9:57 am | टवाळ कार्टा

_/|\_

हाडक्या's picture

23 Jan 2015 - 8:37 pm | हाडक्या

काका, आपली गंमत आपण फारच मनावर घेतलीत असं दिसतंय. तुमच्या प्रतिसादात जास्त रिपीट होणारा शब्द उचलून चेष्टा करत होतो, त्याचा आणि तुमच्या प्रतिसादाचा तसा काही एक संबंध नाहीये (मला उगीच गिल्ट लावण्याचा हेतू मात्र दिसतोय उगा)

बाकी आपण ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्राचे ह्या गोष्टी भाग आहेत. तसेही आपापल्या क्षेत्रात अशा काहीतरी गोष्टींना तोंड द्यायलाच लागतं .. आता उद्या इथे कोणी पोलिस असेल तर तो मला काय काय बघावं लागतं आणि तुम्ही माझी चेष्टा कर्ताय असे म्हणू लागला तर अवघड?, नाही का ?

चेष्टा प्रतिसादक आयडीची होती, डॉक्टरची नव्हे, तेव्हा तुम्ही तुमच्या क्षेत्रात नक्कीच चांगले काम अगदी "शांतपणे" करत असाल पण त्या क्षेत्राचे संदर्भ नको तिथे वापरु नका असे म्हणेन.

मी ही इथे एक आयडी म्हणून आहे, बाहेर अगदी मी देवेंद्र फडणवीस असेन (नाहीये! आधीच सांगतो) अथवा कोणी अजून असेन, मला त्या प्रतिमेचा वापर इथे करायचा नाहीये आणि त्याचे भांडवल पण करायचे नाहीये.

आपला डॉक्टर म्हणून आदर आहे पण हा मानभावीपणा पटला नाही असे खेदाने नमूद करतो.

बाहेर अगदी मी देवेंद्र फडणवीस असेन (नाहीये! आधीच सांगतो)

आयला, देवेंद्र फडणवीस मिपावर आले का काय म्हणून लै भारी वाटलं होतं. पण हे कंसातलं वाचून क्ल्प्ड झाला. ;)

आजानुकर्ण's picture

23 Jan 2015 - 9:02 pm | आजानुकर्ण

मी ही इथे एक आयडी म्हणून आहे, बाहेर अगदी मी देवेंद्र फडणवीस असेन (नाहीये! आधीच सांगतो)

मी पण देवेन्द्र फडणवीस नाहीये! टोलविषयी चौकश्या करु नयेत.

हाडक्या's picture

23 Jan 2015 - 9:19 pm | हाडक्या

ह्या ह्या ह्या .. हीच मिपड्यांची खासियत..
मुद्दा अल्लगद बाजूल ठेवायचा आणि उदाहरणावर काथ्या कुटायला सुरुवात करायची.. :))))

सुबोध खरे's picture

24 Jan 2015 - 9:09 am | सुबोध खरे

हाड्क्यासाहेब
मला पण नंतर वाटले कि तो प्रतिसाद टाकायला नको होता. परंतु मिपावर स्व्सम्पादनाचा पर्याय नाही म्हणून मी शांत बसलो. नाहीतरी कोणी त्याकडे लक्ष दिलेले नाही तर खाजवून खरुज का काढा.
असो आपल्याला ते लागले असेल तर मनापासून माफी.

सौंदाळा's picture

21 Jan 2015 - 6:57 pm | सौंदाळा

दोन अफलातुन किस्से (सत्यघटनेवर आधारीत)
एक जण (लग्न न झालेला) दुसर्‍या मित्राला सांगत होता, लग्न करताना बायको हडकुळी पाहीजे म्हणजे पहिले बाळंतपण झाले की बायकोची अंगकाठी एकदम सुंदर होते. नाहीतर सामान्यतः बायका जाड होतात बाळंतपणानंतर. या शहाण्यानेपण मित्राचे ऐकुन अशीच पाप्याचे पितर असलेली बायको केली. पहिल्या बाळंतपणानंतर बायकोची अ‍ॅनॅमिक कंडीशन झाली आणि तिला काही महिने अंथरुणावरुन उठणे पण अवघड झाले आणि नंतर तर ती अत्यंत रोगट दिसु लागली. भरपुर जिवन्सत्वे, टोनिक्स दिल्यावर परत लग्नाच्या वेळेसारखी हडकुळी झाली.
आता दुसरा किस्सा
गावाकडे २१ वर्षाच्या एकाने १४ वर्षाच्या मुलीशी लग्न केले. मुलगी दिसायला सुंदर मात्र दोघांच्या उंचीत ०.५/१ इंचाचाच फरक होता. लग्नानंतर १ वर्षात मुलगी नवर्‍यापेक्षा १ इंचाने उंच झाली.

सुबोध खरे's picture

21 Jan 2015 - 10:50 pm | सुबोध खरे

आमच्या मावसभावाला एक मुलगी दाखवायला आणली होती ती त्याच्या पेक्षा दुप्पट आडवी होती. तिला वाकून नमस्कार सुद्धा करता येत नव्हता. आणि वडील म्हणाले होइलहो लग्नानंतर "बारीक". अशी उदाहरणे फार कमीच.

काळा पहाड's picture

21 Jan 2015 - 7:03 pm | काळा पहाड

आणि ५००.. टाळ्या...

आदूबाळ's picture

21 Jan 2015 - 8:31 pm | आदूबाळ

ह्या... हे ५००व्या प्रतिसादाचं ब्रूटफोर्सिंग झालं...

खेडूत's picture

21 Jan 2015 - 7:04 pm | खेडूत

:)
काथ्या कुटून कुटून काई निष्कर्ष निघेल तर शपथ!
पण मुविन्चे हबीणन्दण.

टवाळ कार्टा's picture

21 Jan 2015 - 8:13 pm | टवाळ कार्टा

हा धागा निष्कर्षासाठी नाहीये...अनुभव शेयर करायला आहे ;)

प्रसाद गोडबोले's picture

21 Jan 2015 - 7:05 pm | प्रसाद गोडबोले

५००

*clapping*
सर्व प्रतिसादकांचा पुस्प्गु्च देऊन सत्कार करण्यात येत आहे.
ऐतिहासिक धाग्यासाठी मुविंचे अभिनंदन!

पूस्प्गुच हा शब्द आठवणीने लिहिल्याबद्दल तुमचाही डब्बल सत्कार. वरिजिनल पूस्प्गुच वाल्या बैंची आठवण झाली.

प्रमोद देर्देकर's picture

21 Jan 2015 - 7:31 pm | प्रमोद देर्देकर

काथ्या कुटून कुटून एक निष्कर्श निघाला कि थवुन केलेले असो कि प्रेमविविवाह लग्न म्हणजे फक्त

अ‍ॅड्जस्ट्मेंट
अ‍ॅड्जस्ट्मेंट अ‍ॅन्ड
अ‍ॅड्जस्ट्मेंट

हाडक्या's picture

21 Jan 2015 - 8:19 pm | हाडक्या

थवुन केलेले असो कि प्रेमविविवाह लग्न

"थवुन केलेले" :))) .. :))) .. :)))

पैसा's picture

21 Jan 2015 - 9:16 pm | पैसा

मंद्या, आदुबाळ, क्लिंटन कोणतरी विश्लेषण करा रे! आणि मानाचे गणपती कोण ते सांगा जरा! बॅटमॅन, टवाळ कार्टा, हाडक्या, काळापहाड, आजानुकर्ण, डॉ. खरे यातले कोण कोण आहेत ते!

एक गोष्ट लक्षात आली का भो? एक पियुषा सोडता लग्नाच्या मुलींनी आपली मतं मांडलेली दिसली नैत फारशी. कन्क्लुजन काय काढावं? ;) :-/

तै मला माझ्या तिकडल्या धाग्याची आठवण आली
जे तिकडे टाकले आहे तेच् पेस्टू का इकडे पण.. ;)
कारण विचार अजुन तरी नैत बदललेले..

पैसा's picture

21 Jan 2015 - 9:30 pm | पैसा

टाक की! करू म्हणे ६०० पार!! =))

पेस्टा पेस्टा. पुढच्या ५००ची चिंता आत्तापासूनच करायला हवी.

हाडक्या's picture

21 Jan 2015 - 9:40 pm | हाडक्या

पै तै..

बादवे, ही एक खरी गोष्ट की अनाहीता झाल्यामुळे मुलींना विरोधी मतांना तोंड न देता (तिकडे चित्र वेगळेही असेल कदाचित) या बद्दल बोलता येत असेल पण मुलांना मात्र अजूनही इथे उघड्यावरच यावे लागते. ;)

जर मुलींनी पण इथे मते मांडली तर इतर लग्नाळू मुलांना कळेल ना ते कुठे चुकतायत किंवा दुसरी बाजू काय विचार करतेय.

पैसा's picture

21 Jan 2015 - 9:47 pm | पैसा

अनाहिताचा काय संबंध नाही! स्पेशल तिथले विषय वेग़ळे असतात. मला वाटते, त्या इथे जो काय धुमशान काथ्या कुटला त्याची मजा बघतायत फांदीवर बसून! वाद घालण्यापेक्षा गप्प बसून माहिती घेणे जास्त हुषारीचे नाही का!!

वाद घालण्यापेक्षा गप्प बसून माहिती घेणे जास्त हुषारीचे नाही का!!

माहिती घेतायत की मज्जा घेतायत, त्यांनाच म्हैत. ;)

अनाहीतान्तर्फे अजून एक हजेरी लावते चला . आम्ही मजा नाही घेतो आहोत . दोन चार गोष्टी सगळ्यांनाच माहिती आणि मान्य आहेत हे आपण धरून चालू :

१. अनाहीतांतर्फ़े च आलेल्या काही कीस्स्यांवरून आणि प्रतिसादांवरून आपण हे मान्य करू की काही गोष्टी या सरसकट मंजूर अथवा नामंजूर आहेत : उदा: मुलीच्या (किंवा मुलाच्या ) आईने प्रमाणाबाहेर दोघांच्या संसारात चब ढब करणे . प्रमाणाबाहेर हा मुद्दा प्लीज ध्यानात घ्या. मुलीकडचे जर काही युक्तीच्या चार गोष्टी सांगत असतील अननुभवी वय म्हणून तर केवळ मुलीकडचे म्हणून सल्ले झिडकारू नये. लहान मुलांना वाढवताना आपण सतत त्यांना स्पून फीडिंग करत नाही अन्यथा त्यांची निर्णयक्षमता कधीच प्रगल्भ होणार नाही , त्यांना आत्मविश्वास येणार नाही वगैरे. नवीन लग्नाला सुद्धा हा मुद्दा लागू पडतो असं माझं मत आहे आणि काही प्रमाणात पालक आणि नवरा बायको यांनी तारतम्याने हे अंतर जोपासलं पाहिजे . एकदा मुलं झाली की मग दोघांच्या राज्यात आजी आजोबांना अनन्यसाधारण महत्त्व येतं , तसं ते यावं पण. आणि तो पर्यंत चा प्रवास जर साधारण गोडीने किंवा सुज्ञ पणे झाला असेल तर बाळाच्या अंगी लागतं आणि सुनेच्या पण ! त्यामुळे मुलीची आई आणि तिची चब ढब हा एक अत्यंत व्यक्तीसापेक्ष विषय आहे. पण blanket statement ज्याला म्हणतात ते साधारण सगळ्यांना मान्य व्हायला हरकत नाही.

२. मुली पैसा घर वगैरे गोष्टींना जास्त महत्त्व देतात , मुलाच्या कर्तृत्वाकडे नाही बघत वगैरे संदर्भ सुद्धा पुन्हा पुन्हा आले आहेत . धागा सुरूच झाला साधारण त्या मुद्द्यावरून . अनेकींच्या आणि अनेकांच्या प्रतिसादांवरून पण मला वाटतं आत्ता पर्यंत हे पुराव्यानिशी शाबित झालंय की ही गोष्ट सरसकटिकरण करण्याजोगी नाहीये.

३. शिक्षण , वैचारिक पातळी साधारण जुळणे हा सुद्धा मुद्दा सगळ्यांना मान्य आहे त्यामुळे अजून त्यात काय बोलायचं ?

मला सगळ्यात जास्त वेधक आणि वाद - क ( :P ) मुद्दे वाटले ते म्हणजे साधारण एक सूर आहे की मुलींच्या आणि त्यांच्या आई बाबांच्या अपेक्षा वाढल्यात आणि दुसरं म्हणजे पुरुष लग्न करताना sex चा विचार करतात , "at least" पुरुष असं कुणी तरी लिहिलंय .

ज्या मुली स्वतः कमी शिकलेल्या आहेत पण अपेक्षा निवडणुकीत जेमतेम पास झालेल्या शिवसेनेच्या वरताण आहेत त्यांचा आणि कुठे तरी एक किस्सा वाचला की MSCIT करून मास्टर्स केलंय सांगतात वगैरे त्याचे किस्से आपण सोडून देऊ . कारण ते वागणं मुळात च चुकीचं आहे . प्रतारणा मग ती किती ही छोटी आणि सकृतदर्शनी निरुपद्रवी (खोटे दात वाला किस्सा ) वाटली तरी प्रतारणाच . पूर्वीच्या काळी शेजारणीने केलेले अभ्रे पहिल्या मुली च्या लग्नात तिने केलेत पासून ते सातवीच्या लग्नात पण सातवीने च केलेत सांगणे या मागची मानसिकता आणि वरच्या गोष्टीं मधली मानसिकता यात फार फरक नाही . आज च्या काळात पण अशा गोष्टींवरून न्यूनगंड आणि तो लपवण्यासाठी अशी सारवासारव का असावी , असावी का नसावी हा एक वेगळा विषय होईल . अशाच प्रकारचे मुलांचे किस्से ही आहेत ते पण यावर काडीच टाकायची असेल तर सांगत बसता येईल .

पण आपण एक साधारण एकमेकांना जमणारं शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी या सगळ्याचा विचार करून एकमेकांना भेटणारी मुलं मुली विचारात घेऊ . साधारण भारतातली गेल्या २-३ दशकांमधली वाढत्या वेगाने अगोदर च बदललेली म्हणजे सुधारलेली आर्थिक स्थिती किंवा बदलण्याची भरपूर शक्यता असलेली कुटुंबं बघता आर्थिकदृष्ट्या स्थिर असणं हा आज काल आटोक्याबाहेरचा प्रकार राहिलेला नाहीये . ज्या कुटुंबांची आर्थिक स्थिती आत्ता अपवादात्मक चांगली नाहीये , किंवा फार चांगली नाहीये ते सुद्धा मुलींना किंवा मुलांना शिकवतात , गरज पडली तर कर्ज काढतात पण मागच्या पिढी पेक्षा दोन पावलं पुढे जाण्याची क्षमता यावी या करता सगळ्यांचे प्रयत्न असतात च . मुद्दा हा आहे की शिक्षण आई वडिलांनी करून दिलं आहे , आई वडिलांची जबाबदारी नाहीये पण तरी सुद्धा म्हणावं तितकं स्थैर्य नाही . आत्ता जे २८-३५ वर्षांचे आहेत ते सगळे कदाचित हे मान्य करतील की आपल्या आई वडिलांनी त्यांच्या आई वडिलांचे निम्मे संसार केले गरज पडली तेंव्हा आणि आपला संसार सांभाळला . त्या मानाने आज च्या आमच्या पिढीवर काहीच जबाबदाऱ्या नाहीत . असं असताना आणि आज काल व्यवहार चातुर्य दाखवलं तर गाठीशी थोडा फार पैसा बाळगून असणं हे फारसं कठीण नसताना सुद्धा जर एखादा मुलगा २८-२९ व्या वर्षी पुरेसं स्थैर्य बाळगून नसेल तर तो एक प्रसाद १९७१ म्हणतात तसा "दिसणारा " भाग म्हणून दखलपात्र का असू नये ?

आता पुरेसं शब्दाची व्याख्या कुणाची काय आणि कुणाची काय . पण ती व्याख्या असणार च . माझं लग्न झालं तेंव्हा नवऱ्याचा घरात पगार यायचा १८ हजार , माझी नोकरीच नव्हती कारण नुकतंच BE झालं होतं . माझं वय होतं २२ आणि नवर्याचं २४ . आता जर कुणी माझ्याच एखाद्या चुलत , मावस बहिणीला ज्या २८ वर्षांच्या आहेत त्यांना म्हणलं की १८ हजार वाल्या माणसाशी लग्न कर तर कसं चालेल ? त्या बघतात तो मुलगा किमान २९-३० , तो या वयात जर १८हजार कमवत असेल तर अवघड आहे .आता यात त्यांचं आणि माझं सारखं शिक्षण आणि त्या बघत असलेल्या मुलांचं पण तेवढं शिक्षण गृहीत धरलेलं आहे . प्रत्येकाचं वय , प्रत्येकाची लग्नाच्या वेळेची स्थिती या वरून ही व्याख्या ठरते . ते लक्षात घ्यायलाच हवं . माझा प्रेमविवाह आणि त्यांचा अरेंज याचा तसा अर्था अर्थी काही संबंध नाही . मी २८ व्या वर्षी लग्न केलं असतं याच नवऱ्याशी तर पगार अर्थात च १८ हजाराच्या किती तरी पटीने जास्त असणार होता . म्हणजे मी त्याचा पगार तेवढा मोठा होई पर्यंत लग्न केलं नाही असा ही अर्थ एखाद्याने काढला असता . आत्ता पर्यंत आलेल्या सगळ्या मुलींच्या आणि ज्यांचा प्रेमविवाह किंवा दाखवून विवाह , पण सुखी समाधानी लग्न आहे अशा प्रतिसादांमध्ये मला एक च समान सूत्र दिसतंय : आत्ता आर्थिक स्थिती २ लाख घरात आणण्याची नाहीये पण ती क्षमता निर्विवाद आहे , या न त्या निमित्ताने ते विश्वासार्ह पद्धतीने समोर आलेली आहे आणि बायकोने ती जाणते पणाने ओळखून लग्न केलेलं आहे . पगार हा फक्त एक उदाहरणार्थ घेतलेला घटक आहे . यात सगळंच येतं , मधुरा किंवा पिरा म्हणाल्या तसं शिक्षणाची पात्रता येणार आहे अथवा त्यात कमी जास्त असलं तरी अहंकार मध्ये येणार नाही याची शक्यता प्रत्येकीला मनापासून अपील झालेली आहे .

आता हे अपील होण्यासाठी मुलांनी आपले अहंकार बाजूला ठेवायला हवेत आणि मुलींनी पण डोळसपणा दाखवायला हवा . असा मुलगा किंवा अशी मुलगी मिळेपर्यंत थांबायची तयारी पण हवी . आपल्या समाजात अनेकदा आपलं वैवाहिक आयुष्य कसं असायला हवं , जोडीदार कसा हवा याबद्दल वैचारिक गोन्धळ दिसतो . म्हणजे इडली डोसा करणारी बायको हवी तर मग स्वैपाकीण ठेव असं म्हणणं पण अयोग्यच आहे कारण एखाद्याला बायकोच्या हाताला चव असावी , मुलांना घरचं प्रेमाने वाढलेलं अन्न मिळावं, सहचारिणी सुगरण असावी असं वाटणं यात काही चूक नाही पण त्या साठी तिने नोकरी न केलेलीच बरी किंवा जास्त शिकलेली नको बाबा मग फार डोकं चालतं असं म्हणलं की आला वैचारिक गोंधळ . न झालेल्या मुलांच्या जेवण खाण्यासाठी आत्ता होणाऱ्या बायकोचे पंख छाटायची थोडीशी पुरुषी (:P) मानसिकता आहे ही . आणि ही बऱ्याचदा घरच्यांच्या दबावातून येते , नको ती उदाहरणं नको त्या दृष्टीकोनातून बघण्याने येते, पर्यायाने स्वतःचे असे स्वतंत्र विचार नसल्याने येते . अशांना एखादी कमी शिकलेली मुलगी सुद्धा नको म्हणत असेल तर मी तिचं समर्थन च करेल . शिक्षणाने बऱ्याच गोष्टी सोप्या होत असल्या तरी माणसाची ओळख बनते त्याच्या कामावरून . कमी शिकलेल्या पण एखादी कला हातात असलेल्या किंवा केवळ स्वैपाकाच्या जोरावर कुटुंबांना कठीण परिस्थितीतून बाहेर काढणाऱ्या स्त्रिया आपल्याला सगळ्यांनाच माहिती असतात . कळीचा मुद्दा आहे तो लग्न झालं म्हणून जोडीदारावर किती जोर गाजवता येतो या ज्याच्या त्याच्या मताबद्दल , एखादीने आपली ओळख बनवण्याच्या शक्यतेवर च घाला घालणाऱ्या मानसिकतेबद्दल . sex या विषयाबद्दल पण तेच , नैसर्गिक गरज मुलांची आणि मुलींची वेगळी कशी ? अपेक्षा पण वेगळी कशी असणार ? आता तो अनुभव एकमेकांबरोबर घेतल्याशिवाय आणि अनेकदा घेतल्याशिवाय परस्परपूरक आहेत का हे समजणं अवघड आहे पण मुलाचं टक्कल जर एखादी साठी टर्न ऑफ असेल तर त्यांचा अनुभव सुंदर बनण्याची शक्यता किती तरी पटीने कमी होते . अशा वेळी मुलीने टकलावरून नाकारलं एव्हड्या चांगल्या मुलाला असं म्हणणं एकांगी ठरू शकतं . वैवाहिक जीवनाचा पाया जर शारीरिक नातं असेल तर त्याला कमी का लेखायचं ? मुलींच्या अशा अपेक्षा असतात आणि त्या रेटण्या इतक्या किंवा त्यावरून एखादा मुलगा नाकारण्या इतक्या आता त्या धाडसी झाल्या आहेत हे चांगलंच आहे न? घरच्यांच्या दबावाला किंवा असं कसं नाही म्हणायचं म्हणून एखादीने केलं लग्न आणि नाही ती समरस होऊ शकली तर आयुष्यभर दोघं नाखूष . त्यापेक्षा हे बर नाही का ? मुली आता बोलून दाखवतात आणि त्यांच्या अपेक्षा वाढल्यात असं म्हणण्यापेक्षा जी मुलगी अशा वातावरणात वाढून सुद्धा तुमच्याशी लग्न करायला तयार असेल ती अगदी मनापासून तयार आहे यात दिलासा नाही का वाटत ? किंबहुना तो तसा वाटण्याइतकं प्रगल्भ आता मुलांनी आणि समाजानी पण व्हायला हवं .

पैसा, शिक्षण, रूप, मालकीचं घर , परदेशी प्रवास किंवा तिथेच राहणं या सगळ्यांना अत्यंत अनाठायी महत्त्व आलंय कारण अनेकांना त्यांच्या सहजीवनात काय हवंय हेच नक्की माहिती नसतं .निदान आजू बाजूच्या तथाकथित सुखी संसारांमध्ये जे काही आहे ते एकत्रितरीत्या मला मिळावं असा एक सर्वसाधारण भाव दिसतो अनेकदा . हे माहिती नसणं हा आपल्या कौटुंबिक संस्थेचं माझ्या मते अपयश किंवा मर्यादा अथवा दोन्ही आहे . जो पर्यंत हे नीट काळात नाही की जोडीदार कसा हवा आणि तो तसा का हवा आणि तो मिळेपर्यंत थांबण्याची तयारी येत नाही आणि समाज तशी परवानगी देत नाही तो पर्यंत लग्न जमून सुद्धा तो जुगार राहण्याचीच शक्यता जास्त .

सगळ्यांनीच काही प्रेमविवाह करण्याची गरज नाही आणि शक्यता पण नाही . खरं सांगायचं तर दाखवून लग्न करतात त्यामुळे एक मानसिक स्थैर्य आपल्याकडे वयाच्या विशीत येतं बऱ्यापैकी. त्यामुळे अरेंज म्यारेज मोडीत काढण्याच्या मताची मी तरी नाही . पण त्या मुला मुलीना मात्र श्वास घ्यायला मिळावा आणि त्यांच्या छोट्या मोठ्या अपेक्षा बोलून दाखवल्या म्हणून त्यांना ओशाळं करू नये , त्या इच्छा आकांक्षांचा मान ठेवावा सगळ्यांनीच असं वाटतं .

फार मोठा झाला प्रतिसाद :)

एस's picture

22 Jan 2015 - 7:58 am | एस

या पंचशतकी धाग्यावरचा एकमेव वाचनीय प्रतिसाद!

बॅटमॅन's picture

22 Jan 2015 - 12:03 pm | बॅटमॅन

अगदी असेच म्हणतो.

अतिशय सुंदर प्रतिसाद स्रुजा !!

नाखु's picture

22 Jan 2015 - 8:58 am | नाखु

खरा "हत्ती" तुम्ही शोधला आणि आम्हाला दाखवला.सुरेख विवेचन.
बाकी सगळे "सोंड","पाय" "शेपूट" इथेच अडकून पडले होते.

श्रीरंग_जोशी's picture

22 Jan 2015 - 9:15 am | श्रीरंग_जोशी

विचारात पाडणारे विचार मांडले आहेत स्रुजा यांनी.

पैसा's picture

22 Jan 2015 - 9:10 am | पैसा

स्टँडिंग ओव्हेशन तुला!

प्रमोद देर्देकर's picture

22 Jan 2015 - 9:26 am | प्रमोद देर्देकर

+१११११११११ तेच म्हणतो पैसातै. फक्त सुजाताईंचा एकमेव समतोल प्रतिसाद. आवडला.

सुरेख प्रतिसाद स्रुजा.

आरोही's picture

22 Jan 2015 - 12:03 pm | आरोही

असेच म्हणते

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 10:06 am | टवाळ कार्टा

नावाप्रमाणेच "सुजा"ण प्रतिसाद....आवडेश :)

सविता००१'s picture

22 Jan 2015 - 10:09 am | सविता००१

अतिशय सुंदर, संयत भाषेत लिहिलेला, नेमका प्रतिसाद.
अत्यंत आवडला.

मुक्त विहारि's picture

22 Jan 2015 - 10:35 am | मुक्त विहारि

मस्त प्रतिसाद...

मृत्युन्जय's picture

22 Jan 2015 - 10:36 am | मृत्युन्जय

सुरेख प्रतिसाद. चला हा धागा १००० कडे नेउयात. नाहितर व्यनिमनि वरुन त्याची सोय झाली असणारच

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jan 2015 - 12:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

बर्‍याच महत्वाच्या गोष्टींचा समतोल आढावा घेणारा उत्तम प्रतिसाद ! *good*

इशा१२३'s picture

22 Jan 2015 - 12:57 pm | इशा१२३

स्रुजा मस्त प्रतिसाद.अगदि नेमके लिहिले आहेस.अत्यंत वाचनिय.

>>असं कसं नाही म्हणायचं म्हणून एखादीने केलं लग्न आणि नाही ती समरस होऊ शकली तर आयुष्यभर दोघं नाखूष . त्यापेक्षा हे बर नाही का ?

हे मात्र खरं!! काही वेळा बायका हे असलं मनात साठवून ठेवतात आणि ज्या वेळी बोलून दाखवतात त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. ऐकणार्‍याच्या मनात मात्र कायमचं उरतं ते.

संतुलित प्रतिसाद हेवेसांनल !!

मधुरा देशपांडे's picture

22 Jan 2015 - 2:58 pm | मधुरा देशपांडे

खूप आवडला.