मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.
माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.
शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.
ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.
माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.
शिक्षण : जेमतेम डिप्लोमा
पगार : २२००/-
नौकरी : खाजगी.
जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.
इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)
वाहन : समोरच्या शेजार्याने दिलेली सायकल.
आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.
लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.
अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.
दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.
थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?
संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.
डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
प्रतिक्रिया
12 Oct 2015 - 7:28 pm | बदामची राणी
हो का? कित्ती कित्ती छान! आपल्याला कोणतही तत्व आणायच नाही बुवा. मग काय? आता धरा फाऊल.
ऑन अ सिरिअस नोट, मी नवीन नाही इथे. पण लिहित नाही. फक्त वाचते. आता फारच वेगळी मत दिसल्यानी लिहिल^ ईतकच.
12 Oct 2015 - 7:28 pm | बदामची राणी
हो का? कित्ती कित्ती छान! आपल्याला कोणतही तत्व आणायच नाही बुवा. मग काय? आता धरा फाऊल.
ऑन अ सिरिअस नोट, मी नवीन नाही इथे. पण लिहित नाही. फक्त वाचते. आता फारच वेगळी मत दिसल्यानी लिहिल^ ईतकच.
12 Oct 2015 - 7:30 pm | स्वप्नांची राणी
अगं अगं...झालीस पास तू...!!
12 Oct 2015 - 7:32 pm | बदामची राणी
ते खर तर मलाही समजल. जलतत्व वगैरे ऐकल होत. :)
12 Oct 2015 - 7:38 pm | बदामची राणी
ते खर तर मलाही नाही समजल. जलतत्व वगैरे ऐकल होत. :)
बघ लिहायची सवय नसल्यानी हे अस तत्व वगैरे आल की चुका होतात.
पास केल्याबद्दल आभारी आहे.कित्ती कित्ती छान! :)
12 Oct 2015 - 9:52 pm | इन कम
मी आणि माझी मैत्रीण कॅन्टीन मध्ये कॉफी घेत होतो. तिच्याकडे 'बघण्याचे'कार्यक्रम चालू होते.
मी: काय मग? कसा होता कालचा मुलगा?
ती:मुलगा ओके होता पण he is not cool
मी: का? काय झाल? सेटल तर आहे मस्त
ती: हो ग… पण तो स्मोकिंग नाही करत आणि ड्रिंक्स तर अजिबात घेत नहि. सो बोरिंग …
मी आणि कॉफी दोन्ही गार!
12 Oct 2015 - 9:58 pm | नाव आडनाव
तुमच्या मैत्रिणिचा प्रॉब्लेम सॉल्व झाला असं समजा. वरच्या काही प्रतिक्रियांत बघा, एक जण ड्रिंक्स घेणारा (आणि लग्नाचा पण) आहे :)
12 Oct 2015 - 10:13 pm | इन कम
लग्न झाल राव तीच आता
12 Oct 2015 - 10:26 pm | जातवेद
वाचलो बुवा
12 Oct 2015 - 10:03 pm | प्यारे१
महाग पडत असेल नै 'कोल्ड' कॉफी?
12 Oct 2015 - 10:30 pm | एस
मुविंना खरंच काही काम नव्हतं!
'धागा बनानेवाले, क्या तेरे मन में समायी...?'
लग्न आणि लग्नविषयक चर्चा ह्या दोन गोष्टींवर कायदेशीर बंदी आणली गेली पाहिजे. निरर्थक वादविवाद! तोपर्यंत निदान धागा वाचनमात्र व्हायला हवा.
12 Oct 2015 - 10:44 pm | श्रीरंग_जोशी
जोवर लोक सांसदीय भाषेत एकमेकांशी सामाजिक विषयांवर चर्चा करत आहे तोवर सदर धागे वाचनमात्र करणे म्हणजे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणे होईल.
आपल्या सूचनेवर पुनर्विचार करावा ही विनंती.
बाकी कायदेशीर बंदीबाबत कायदेमंडळांकडे पत्रव्यवहार करू शकताच.
13 Oct 2015 - 12:14 am | अभ्या..
श्रीरंग गांधी,
तुमच्या सत्याच्या प्रयोगाचे आम्ही फ्यान आहोत. ;)
13 Oct 2015 - 12:18 am | प्यारे१
सत्याचे प्रयोग नावाचा आयडी 'येथे' आहे.
-प्यारंग जोशी
(ते येथे अपडेट होईल ना नंतर ;) )
13 Oct 2015 - 12:18 am | श्रीरंग_जोशी
फ्यान आहात तर मग वाईच वारा येऊ द्या की ;-) .
13 Oct 2015 - 12:29 am | अभ्या..
वाईच वारा
आवलेचा प्यारा.
(समीर हवा का झोंका चालीवर वाचावे. किंवा ह्यापी गो लक्की वाचले तरी चालेल)
13 Oct 2015 - 12:56 am | प्यारे१
कैच्या कै....
13 Oct 2015 - 12:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
विषयाला धरुन चर्चा पुढे चालु ठेवावी. सत्याचे प्रयोग लग्नासारख्या धाग्यांवर नकोत.
13 Oct 2015 - 12:10 pm | अभ्या..
विषयाचा मोह वाईट ;)
13 Oct 2015 - 12:23 pm | टवाळ कार्टा
कश्याचाही मोह वाईटच...मोहाची कशी असते ते मात्र म्हैत नै
13 Oct 2015 - 12:32 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
इथल्या हौशी मंडळींना माहिती असेल ना रे त्याविषयी काढ एखादा काथ्याकुट धागा.
13 Oct 2015 - 6:08 pm | सूड
काथ्याकूट कशाला एकदा घेऊनच बघ ना!! नाही चढली तर तुला कळेल आणि चढली तर सोबतच्यांना!! =))
13 Oct 2015 - 6:07 pm | सूड
ह्यासाठी तुला एक मस्तानी! =))
13 Oct 2015 - 9:04 pm | श्रीरंग_जोशी
गांधीजींचं नाव घेऊन मस्तानीसारखं पेय? आपल्याच्यानी हसू आवरलं नाही बुवा.
किमान एखाद्या मिपा कट्ट्याला दोघे मिळून उपास तरी करावा (सद्भावना दिवस साजरा होईल).
13 Oct 2015 - 9:12 pm | अभ्या..
शेळीच्या दूधाची मस्तानी चालेल?
मला नाहीच चालणार.
उपास करीन पण कट्ट्याच्या पवित्र दिवशी नको. एखादा पवित्र महिना पाहीन न करीन.
13 Oct 2015 - 9:19 pm | श्रीरंग_जोशी
भावना अधिक महत्वाची त्यामुळे दूध कोणते याने फरक पडू नये.
मिपाकट्ट्यापेक्षा अधिक पवित्र दिवस मिपाकरांसाठी कोणता असणार ;-) ?
13 Oct 2015 - 9:29 pm | टवाळ कार्टा
गायीचे दूध घ्यायला सांग त्याला
14 Oct 2015 - 3:01 pm | सूड
दूध म्हटलं की चितळ्यांचं!!
14 Oct 2015 - 3:09 pm | टवाळ कार्टा
खिक्क
16 Oct 2015 - 5:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
चितळ्यांचं दुध घेता तुम्ही. बापरे. कुठली वैरण घालता म्हणे भिलवडीची का =))
16 Oct 2015 - 7:17 pm | सूड
ते चितळे ला विचार ने, आमाला काय विचारते?
(सूडबावा पूनावाला)
14 Oct 2015 - 1:16 am | बॅटमॅन
शेळीच्या दुधाची मस्तानी???????????????
उद्या केळाची बिर्यानी बनवशील लेका अभ्या. फुटलो ना वाचून मर्दाऽ =))
14 Oct 2015 - 1:22 am | श्रीरंग_जोशी
कच्च्या केळांचे कबाब बनू शकतात. संदर्भ: हिंदी चित्रपट बावर्ची (नायकाच्या भूमिकेत राजेश खन्ना). तर बिर्यानी बनायलाही हरकत नसावी =)) .
14 Oct 2015 - 1:48 am | प्यारे१
नियोजित वधु आणि वरांना मस्तानी नको नुसती छान कॉफी बनवता येते का हे पाहायला लागतं म्हणे हल्ली.
बाकी शेळीला मध्ये आणल्याबद्दल अभ्याचा मौन धरून नैष्ठिक निषेध!
14 Oct 2015 - 3:11 pm | टवाळ कार्टा
इथे कॉफीवर काही श्लेष अपेक्षित आहे का????
;)
14 Oct 2015 - 3:14 pm | प्यारे१
पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे :)
13 Oct 2015 - 12:03 am | तर्राट जोकर
काय चाललंय बा हे...?
13 Oct 2015 - 12:04 pm | टवाळ कार्टा
धाग्यात हे लिहिलेले....याबाबत कोणी काही लिहिले होते का या धाग्यावर?
13 Oct 2015 - 5:26 pm | साधा मुलगा
हल्लीच्या मुली एकत्र कुटुंब पद्धतीत राहतील का? पुरेसे मोठे घर असेल तर? मुलगा चांगला असेल ,पुरेसा कमावता असेल तर? घरात dust bin नको, जेष्ठ नागरिक नको असले प्रतिसाद वाचून विचारतो आहे.
- अजून लग्नाला वेळ असलेला पण मुलींच्या अपेक्षांनी धास्तावलेला साधा मुलगा
13 Oct 2015 - 5:34 pm | खटपट्या
घर पुरेसं मोठं असेल तर राहीलं पाहीजे. तोट्यापेक्षा फायदेच जास्त असतात एकत्र कुटूंब पध्दतीत. कमीत कमी प्रयत्न केला पाहीजे. न जमल्यास चर्चा करून, सामंजस्याने, कटूता टाळून वेगळे व्हावे.
13 Oct 2015 - 6:14 pm | मीता
+१
13 Oct 2015 - 6:07 pm | प्यारे१
>>>> अजून लग्नाला वेळ असलेला पण मुलींच्या अपेक्षांनी धास्तावलेला साधा मुलगा
जन्मतारीख काय? उंची किती? नोकरी काय करता?
13 Oct 2015 - 6:19 pm | टवाळ कार्टा
पैसे किती हे पहिले
13 Oct 2015 - 6:21 pm | प्यारे१
मी कुणाला पगार विचारत नाही हल्ली . थांबवलंय. ;)
13 Oct 2015 - 11:07 pm | palambar
ह्म्म एकंदरित अवघड प्रकरण आहे सध्या तरि, आपल्या कडे समाजाचा फार प्रभाव आहे सर्व गोश्टित ,
शिक्शण , लग्न , संसार, ईई . लोक मदतिला कमि पण अड्चणित टाकायला लगेच जातिल. समुपदेशक
लोकांचि फार गरज आहे. माझ्या एका मुस्लिम मैत्रिणि च्या मुलिचे लग्न झाले, मुलगा निवड्तांना हुनर आहे ना
एवधेच बघितले. म्हनजे नोकरि करित नाहि पण उद्योग करु शकतो ना एवढेच बघितले.
15 Oct 2015 - 1:31 pm | खटपट्या
काय हूनर पाहून लग्न ठरवले मग?
15 Oct 2015 - 7:42 pm | palambar
computer sales&service business असे तिने सांगितले . सांगायचा मुद्दा कि एकत्त्र कुटुंब , पगार वैगेरे साठि
नकार दिला नाहि.
16 Oct 2015 - 7:06 pm | खटपट्या
ओके, गुजराती लोक व्यवसाय बघून सोयरीक जुळवतात. नोकरी असेल तर नाक मुरडले जाते.
15 Oct 2015 - 11:25 am | जातवेद
यशस्वी ५०,००० वाचनांकडे वाटचाल.
15 Oct 2015 - 8:23 pm | प्रसाद गोडबोले
खरेच लग्न ठरवणे इतके अवघड आहे का ?
वधु वरांच्या अपेक्षांचे मेळ घालण एइतके कॉम्प्लिकेटेद असेल असे मला वाटले नव्हते .
वधुवरांच्या अपेक्षा म्यॅच करता यावा अन नीयरेस्ट नेबर ही सजेस्ट करता यावा ह्या साठी फार पुर्वी मी एक अॅल्गोरिथ्म लिहिला होता , तो वापरुन अॅप आणि म्यॅट्रीमोनियल बनवले तर तुफान चालल का ?
( इतर म्यॅट्रीमोनियलस सुध्दा सजेशन्स देतातच पण तुमच्या अपेक्षांच्या सर्वात जवळ कोण येते आणि तुम्ही कोणाच्या अपेक्षांच्या सर्वात जवळ जाता हे सांगणारा अॅल्गोरिथम नाहीये बाजारात बहुतेक )
लग्नाळुंच्या माहीतीपुर्ण मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत !!
15 Oct 2015 - 8:26 pm | टवाळ कार्टा
पार्टनरशिप मध्ये कंपनी चालवुया का??? मी अॅप बन्वतो
15 Oct 2015 - 8:37 pm | प्रसाद गोडबोले
तुला खरेच अॅप बनवता येते का ?
व्यनि कर .
15 Oct 2015 - 8:40 pm | टवाळ कार्टा
बेसिक येते...पुढचे शिकू शकतो
15 Jun 2016 - 3:12 pm | कानडा
अॅप चे काही झाले का पुढे?
---
कानडा
15 Oct 2015 - 8:29 pm | प्यारे१
लग्नाळु मधलं लग्न बाजूला आणि शिल्लक फक्त अळू....
खाल्ला की खवखव! क्याय च्याल्लंय क्याय????
16 Oct 2015 - 4:53 pm | भीमराव
कामातनं वेळ काढुकाढुन तिन दिवस लागले राव कुटलेला काथ्या बघायला,
आमच्या पुढे घरात दोन जन नंबराला असल्याने सद्ध्या तरी आमी घरच्यांच्या दृष्टीनं दुर्लक्षीतच आहे. आमच्यात एक नमुना असाही आहे, ज्याची १२ एकर बागायती शेती, स्वत:चा अजुन एक उद्योग, गावात मोठ घर, घरी आई व्यतीरीक्त कोणाची जबाबदारी नाही, ब्यांकब्यालंस रग्गड तरी लग्न जमत नाही, कारण काय तर पोरगा शेती करतो. आमची मुलगी शेतात काम करनार नाही.
बर एखाद्याला शेती नाही पन नोकरी किंवा उद्योगात चांगला जम आसला तरी पोरी देत नाहीत कारण काय त शेती नाही.
आता प्रश्न असा पडतो, शेतात काम नाही करनार त मुलाकडे शेती हवी ही अट कशाला!
विक्रमी धाग्यावर पयलाच प्रतीसाद न आमचाबी सहभाग
16 Oct 2015 - 5:27 pm | सौंदाळा
एकदम सहमत
नात्यातल्या मुलाचे (बी.कॉम एलएलबी) शेती करतो म्हणुन लग्न जमत नव्हते.
शेवटी ३६व्या वर्षी लग्न झाले.
किती राहिले रे अजुन
16 Oct 2015 - 8:01 pm | बॅटमॅन
आयला, म्हणजे लगीन झाल्याझाल्या कुदळफावडे अन पाटी घेऊन श्यातावं पाटवनार वाटलं का काय त्यास्नी =))
16 Oct 2015 - 8:09 pm | प्यारे१
आमच्या बॉस नं सांगितलेला किस्सा-
कुठेतरी चांदोली धरण परिसरात काम सुरु असताना एका मजूराच्या बायकोचं आणि मजूराचं भांडण ऐकू आलं. चौकशी केली तर म्हणे बायको म्हणे मला नवऱ्यानं फसवलंय. काय झालं? तर बायको म्हणे नवरा माझ्या बा ला म्हणाला होता की मी ऑपरेटर आहे आणि इथे बघितलं तर हां बिगारी आहे. कुदळ फावडं वाला.
नवरा म्हणे मी आहेच की ऑपरेटर..... फावडा ऑपरेटर.
16 Oct 2015 - 9:24 pm | भीमराव
तेच म्हन्तो ना मी, पन लय यडी रताळी मान्स राव, १० वी नापास पोरगी पन नोकरीवाला नवरा मागती, आमाला वाटल्यालं चांगल्या पगाराच्या नोकरदारांच बरं आसल पन हितं काय तिथं काय सेमच कि ओ.
16 Oct 2015 - 5:50 pm | भीमराव
बाकी शिपाई गड्यानंतर पोरगी न मिळण्यात शेतकरीच आघाडीवर हैत
आमी कुटलं मांजार मारलय कुनास्ठाव.
तरी बरं आमी बागायत पट्ट्यातलेय.
16 Oct 2015 - 8:19 pm | मोदक
बाकी शिपाई गड्यानंतर पोरगी न मिळण्यात शेतकरीच आघाडीवर हैत
याच्यावर काही कविता / गझल वगैरे रचल्या गेल्या नाहीत का?
16 Oct 2015 - 9:26 pm | भीमराव
मोडक राव तुम्ही ल्ह्या की आमी वाचतो,
17 Oct 2015 - 10:57 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
प्रतिसाद क्रमांक १४००. मुविंना पुस्प्गुच्चं. मला मिसळ.
21 Oct 2015 - 12:15 pm | हेमन्त वाघे
मला एक तांत्रिक प्रश्न पडला आहे .
सध्या अनेक मुली सिगरेट फुंकताना दिसतात .तसेच चांगल्या हॉटेल मध्ये , पब आणि पार्टीत बर्याच जनी आता दारू पण पितात . लाईट बीर आणि बकार्डी ब्रीझ्रर ला तर अनेक मुली दारू मनात पण नाहीत .
आणि आपल्या मुली यात नाहीत हो असे म्हणू नका. यात बर्याच मराठी मुली आहेत.
तर या मुली लग्नाच्या प्रोफाईल मध्ये काय लिहितात ? खरे लिहितात काय ? तसेच खरे सांगतात काय ? नव्या पिढीतील मुलांना काय वाटते ? अशी कोणती मुलगी कोण्या निर्व्यसनी मुलाला भेटली होती का? मग काय झाले ?
( मला ऎक निर्व्यसनी मुलगी भेटली होती जी मला भलत्याच "तयारीची" वाटली ... काय झाले ते मी इकडे लिहिले आहे ... ( http://www.misalpav.com/node/३०७४१ तिन्ही भाग पहा))
तसेच कोणी धुम्रालन न करणाऱ्या मुलाने रीतसर बघून फुकड्या मुलीबरोबर लग्न केले काय ? हा कसा अनुभव असतो..
तसेच पिणाऱ्या मुली नवर्याला लग्नानंतर पिऊ देतात काय ?
21 Oct 2015 - 1:29 pm | अभिजित - १
काय तंत्र आहे !! प्रश्न कुठलाही असो, तो दारू पर्यंत नेउन भिडवणे !!
21 Oct 2015 - 2:32 pm | टवाळ कार्टा
यात "तांत्रिक" प्रश्न कोणता??
21 Oct 2015 - 1:22 pm | बिन्नी
खूपच कन्फ्यूजिंग आहे हा धागा :(
काहीक्प्रतिसाद तर समजतच नाहीत..
12 Jun 2016 - 1:09 am | पुष्कर जोशी
हहपूवा
12 Jun 2016 - 9:50 am | हरकाम्या
जुन्या जखमेवरच्या " खपल्या " काढुन काय समाधान मिळते राव.?
15 Jun 2016 - 2:54 pm | कैलासवासी सोन्याबापु
काय निष्कर्ष निघाला मग?
17 Jun 2016 - 5:24 pm | आनंदी गोपाळ
इतक्या सार्या प्रतिसादांत जेमतेम एक पान भरेल इतकेही रिलेव्हंट वा वाचनीय प्रतिसाद नाहीत.
18 Jun 2016 - 8:44 am | सुयोग पुणे
मी लग्नाळू होतो तेव्हाची गोष्ट..एका विख्यात विवाह संस्थेतून आलेले स्थळ..मुलगी चाळीसगाव ची.. पहिला चहापोहे कार्यक्रम आमच्या घरी झाला..मुलीचे पालक येऊ शकत नसल्याने तिचा धाकटा भाऊ सोबत आला होता..तेव्हा जुजबी बोलणे झालं..नंतर आम्ही दोघानी बाहेर भेटायचे असं तिच म्हणाली..त्याप्रमाणे आम्ही भेटलो..सीसीडी मध्ये..मला २-३ प्रश्न विचारले तिने.. अगदी सुरूवातीलाच..
ती - तू ड्रीन्कस घेतोस का
मी - नाही..
ती- कधीच नाही घेतलीस
मी- नाही
ती - स्मोकीन्ग करतोस का
मी - नाही..
ती - कधी अफेअर होतं का
मी - नाही..
ती - खरंच का
मी - खरंच सांगतोय..
ती - आजकालच्या जगात असं कोणी नसतं
मी - पण मी असाच आहे..
ती - तू स्मोक करत नाहीस.. दारू पित नाहीस .. तुझं अफेअर पण नाहीये.. मग तुझ्या आयुष्यात चार्मच काय राहिला..
मी - प्रत्येकाच्या चार्म च्या व्याख्या वेगळ्या असतात..
खरंतर मी चाट पडलो होतो.. काय बोलावं कळत नव्हतं.. चाळीसगाव सारख्या लहान शहरात राहीलेल्या मुलीची अशी मतं असतील तर मोठ्या ठिकाणी राहीलेल्या मुली काय विचारतील अशा विचाराने मी हैराण झालो ..यथावकाश एका पुण्यातल्या मुलीची आणि माझी चार्म ची व्याख्या जुळली..